#शतकांसह
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 21 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १८ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज बाधित झालं. अमित शहा यांनी काल राज्यसभेत संविधानावरच्या चर्चेला उत्तर देताना केलेल्या वक्तव्यावर, आज लोकसभेत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. आज सदनाचं कामकाज सुरु होताच या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेतही हेच चित्र पाहायला मिळालं. अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाजही दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेतही आज काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा आपण निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर भाजपचे आशिष शेलार यांनी हरकत घेतली आणि संसदेतल्या कार्यवाहीबाबत या सभागृहात बोलणं उचित नसल्याचं सांगितलं. त्यावर अध्यक्षांनी, हे वक्तव्य तपासून उचित कारवाई केली जाईल असं सांगितलं.
विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यसभेतला हा मुद्दा उपस्थित करुन चर्चेची मागणी केली. मात्र एका सभागृहाचा मुद्दा दुसर्या सभागृहात उपस्थित करता येत नसल्याचं सांगून, उपसभापती निलम गोर्हे यांनी ही मागणी फेटाळली. यावर विरोधी पक्षाचा सदस्यांनी गदारोळ केला आणि हौद्यात उतरुन घोषणाबाजी केली. या गदारोळातच उपसभापतींनी विरोधक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करत असल्याचं म्हंटलं. त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. दरम्यान, विधान परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती, तोपर्यंत राम शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे.
सोयाबीन, कापसाला योग्य भाव मिळत नसल्याचं सांगून विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही, धानाला बोनस नाही, अशी स्थिती असून, सरकारने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग - एमपीएससी मार्फत वर्ष २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
जगभरातल्या संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातला मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव आजपासून सुरू होत आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातल्या अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला येत्या २९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, यात्रा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितलं. या यात्रेच्या आढावा बैठकीनंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. या यात्रेत शेतकऱ्यांसाठी भव्य कृषी आणि पशु प्रदर्शन, कृषिनिष्‍ठ शेतक-यांचा सत्‍कार, अश्‍व, श्‍वान, कुकूट प्रदर्शन आणि विविध स्‍पर्धेचे उद्घाटन, कुस्‍त्‍यांची दंगल, पारंपारीक लोककला महोत्‍सव, महिला आरोग्य शिबिर तसंच शेवटच्‍या दिवशी लावणी महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती करणवाल यांनी दिली.
क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आज ब्रिस्बेन इथं झालेल्या कसोटी सामन्यानंतर अश्विननं पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. अनिल कुंबळे नंतर सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या अश्विनच्या नावावर ५३७ बळी आहेत. तसंच फलंदाजीत अश्विननं सहा शतकांसह तीन हजार धावा केल्या आहेत. ३०० कसोटी बळी आणि तीन हजार धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन क्रिकेट जगतातला ११ वा खेळाडू ठरला, तर ११ वेळा मालिकावीर किताब पटकावत अश्विननं मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती.
दरम्यान, बॉर्डर-गावस्कर मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या, प्रत्यूतरात भारतीय संघानं पहिल्या डावात २६० धावा केल्या. वारंवार पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात दुस��्या डावात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला सात बाद ८९ धावांवर रोखलं. भारतासमोर विजयासाठी २७५ धावांचं आव्हान होतं. मात्र, भारतीय संघाच्या आठ धावा झाल्या असतानाच पाऊस आणि खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत असून, मालिकेतला चौथा सामना मेलबर्न इथं २६ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
MI vs LSG:KL राहुलने शतकासह इतिहास रचला, 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज ठरला
MI vs LSG:KL राहुलने शतकासह इतिहास रचला, 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज ठरला
MI vs LSG:KL राहुलने शतकासह इतिहास रचला, 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज ठरला लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुलने आपल्या 100व्या आयपीएल सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने चांगली सुरुवात करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. संघाचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वोत्तम खेळी खेळत 56 चेंडूत आयपीएल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
रोहित शर्माने मार्टिन गुप्टिलला मागे टाकून मोठा T20I माईलस्टोन गाठला | क्रिकेट बातम्या
रोहित शर्माने मार्टिन गुप्टिलला मागे टाकून मोठा T20I माईलस्टोन गाठला | क्रिकेट बातम्या
रोहित शर्माचा फाइल फोटो© एएफ��ी भारताचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात चांगलाच संपर्कात होता आणि त्याने केवळ 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने न्यूझीलंडच्या फलंदाजांना मागे टाकले मार्टिन गप्टिल पुरुषांच्या T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. रोहितच्या आता 129 सामन्यांमध्ये 27 अर्धशतके आणि 4 शतकांसह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IPL: राजस्थानच्या खेळाडूंच्या ताब्यात ऑरेंज आणि पर्पल कॅप, हे खेळाडू देत आहेत स्पर्धा
IPL: राजस्थानच्या खेळाडूंच्या ताब्यात ऑरेंज आणि पर्पल कॅप, हे खेळाडू देत आहेत स्पर्धा
राजस्थानच्या खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या पर्पल आणि ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. राजस्थान रॉयल्सचा युझवेंद्र चहल या मोसमात सर्वाधिक 18 बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याचवेळी, राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलर तीन दमदार शतकांसह या मोसमातील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे. दोन्ही खेळाडू दीर्घकाळ अव्वल स्थानावर आहेत. जोस बटलरकडे ऑरेंज कॅप आहेजोस बटलर या मोसमात अप्रतिम…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
आफ्रिकेविरुद्धच्या शतकासह हरमनप्रीतचा इशारा ; सराव सामन्यात भारतीय महिला संघाचा दोन धावांनी निसटता विजय
आफ्रिकेविरुद्धच्या शतकासह हरमनप्रीतचा इशारा ; सराव सामन्यात भारतीय महिला संघाचा दोन धावांनी निसटता विजय
आफ्रिकेविरुद्धच्या शतकासह हरमनप्रीतचा इशारा ; सराव सामन्यात भारतीय महिला संघाचा दोन धावांनी निसटता विजय रॅनिओरा (न्यूझीलंड) उपकर्णधार हरमनप्रीत कौरने (११४ चेंडूंत १०३ धावा) साकारलेल्या दमदार शतकाच्या बळावर भारतीय संघाने रविवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दोन धावांनी निसटता विजय मिळवला. हरमनप्रीत गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडत होती. त्यामुळे काही माजी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
VIDEO : यश धुलचा डबल धमाका; लागोपाठ शतकांसह विश्वविजेत्या कॅप्टननं नोंदवला नवा विक्रम!
VIDEO : यश धुलचा डबल धमाका; लागोपाठ शतकांसह विश्वविजेत्या कॅप्टननं नोंदवला नवा विक्रम!
VIDEO : यश धुलचा डबल धमाका; लागोपाठ शतकांसह विश्वविजेत्या कॅप्टननं नोंदवला नवा विक्रम! भारताच्या अंडर-१९ विश्वविजेत्या संघाचा कर्णधार यश धुलने यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी सुरू ठेवली आहे. पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा धुल हा दिल्लीचा पहिला आणि एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. यशने गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या चौथ्या दिवशी तामिळनाडू विरुद्ध…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
इंग्लंड विरुद्ध भारत: जो रूट, जॉनी बेअरस्टो यांनी भारताविरुद्ध नाबाद शतकांसह कसोटी क्रिकेटमध्ये पहिले यश मिळवले | क्रिकेट बातम्या
इंग्लंड विरुद्ध भारत: जो रूट, जॉनी बेअरस्टो यांनी भारताविरुद्ध नाबाद शतकांसह कसोटी क्रिकेटमध्ये पहिले यश मिळवले | क्रिकेट बातम्या
ENG vs IND: जो रूट आणि जॉनी बेअरस्टो एजबॅस्टन येथे इंग्लंडचा ऐतिहासिक विजय साजरा करत आहेत.© एएफपी पासून चमकदार शतके जो रूट आणि जॉनी बेअरस्टो इंग्लंडने एजबॅस्टन येथे भारताला पुन्हा नियोजित 5व्या कसोटीत पराभूत करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठे आव्हान पूर्ण केले आणि मंगळवारी मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. रुटने नाबाद १४२ धावा केल्या तर बेअरस्टोने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नाबाद ११४ धावा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 November 2018 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ नोव्हेंबर २०१८ सकाळी ७.१० मि. ****  दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याचा केंद्राकडे ७ हजार कोटी रुपये मदतीच्या मागणीचा प्रस्ताव  ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी मैत्रेय समुहाविरोधात राज्यभरात ३० गुन्हे दाखल  आज लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलल्या आणि  वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा टी ट्वेंटी सामना ७१ धावांनी जिंकत भारताची मालिकेत विजयी आघाडी **** राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ७ हजार कोटी रुपये मदतीच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुष्काळ आणि उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर ते काल वार्ताहरांशी बोलत होते. डिसेंबरपर्यंत केंद्राचं पथक पाहणी करेल आणि जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली़. कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्कांचं पाणी मराठवाड्याला प्राप्त करून देण्यासाठीच्या २२०० कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पाला येत्या चार वर्षात गती देऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर… हा प्रकल्प गतीनं पुर्ण करणार असून, त्यासाठी निधी कमीपडू दिला जाणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली. राज्यातील दुष्काळी भागासाठी ७हजार कोटी रूपयांच्या आर्थिक मदतीची मागणी केंद्राकडे करत आहोत. दुष्काळी परिस्थितील तलावातील गाळ, छोट्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहतूकीसाठी राज्यस्थरीय अनुदानीत योजना तयार करत आहोत. २४३गावं वाऱ्यावर ४०७ उपाययोजनासाठी १२कोटी रूपयांचा आराखडा तयार केला असून, ग्रॉमिण भागातील पाणीपुरवठा उपाययोजना जून २०१९ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याच मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील पशूधनाला मार्च पर्यंत पूरेल इंतका चारा असून, त्यानंतरच्या चाऱ्यासाठी रब्बी पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन चारा लागवड करण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मनरेगाच्या कामावर मागेल त्याला काम देण्यासाठी ४२लाख मनुष्य दिवस पूरेल इतकी कामं तयार असून, आवश्यक त्या नियमात शितीलता आणण्याचा सुतोवाचक मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद. **** दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. ते काल कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्यातल्या १५१ तालुक्यांमधले १५ हजार गावं दुष्काळसदृश म्हणून जाहीर केली आहेत. त्यांना केंद्राच्या सहाय्यानं मदत करण्यात येईल. त्याचबरोबर ज्या ठिकाणी ६५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे, त्या ठिकाणीही नागरिकांना सुविधा देण्यास प्राधान्य दिलं जाईल. त्यामध्ये आणखी पाच हजार गावांची भर पडेल, असं त्यांनी नमूद केलं. ****   भाजप प्रणीत सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. सरकार शेतकऱ्यांना मदत करत नसून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. **** पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला फरार आरोपी मेहूल चोकसी याच्या हाँगकाँगमधल्या बनावट कंपनीच्या संचालकाला काल अटक करण्यात आली. दीपक कुलकर्णी असं त्याचं नाव असून, तो काल हाँगकाँगहून कोलकत्याला पोहोचताच, विमानतळावरच त्याला अटक करण्यात आली. **** ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी मैत्रेय समुहाविरोधात राज्यात ३० गुन्हे दाखल झाले असून या गुन्ह्यांच्या तपासांमध्ये समुहाच्या वित्तीय आस्थापनाच्या अभिलेखातून ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे अद्याप आपल्या रक्कमेची मागणी न केलेल्या ठेवीदारांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये अथवा जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकांनी केलं आहे. **** १९९२ च्या बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई न्यायालयानं शेअर दलाल हर्षद मेहता याचा भाऊ अश्विन मेहता आणि आठ बँक अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. १९९२ साली उघड झालेल्या या प्रकरणात या आरोपींनी भारतीय स्टेट बँकेला सुमारे एकशे पाच कोटी रुपयाला ठकवल्याचा आरोप होता, या प्रकरणातला मुख्य आरोपी हर्षद मेहता याचा २००१ साली मृत्यू झाला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** आज लक्ष्मीपूजन. संपूर्ण ��ेशभरात आज दीपावली साजरी होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर गृहसजावट, मिठाई, पूजासाहित्यासह नागरिकांच्या, विशेषत: महिलांच्या गर्दीने बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. आभुषणं, वाहनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह कपडेबाजारही वधारला आहे. दीपावली स्नेहमिलनासह दिवाळी पहाटसारख्या विविध सांगितिक कार्यक्रमांनी उत्सवाच्या वातावरणात अधिकच भर पडत आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण सर्वांच्या, विशेषतः उपेक्षितांच्या जीवनात सुख-समृध्दी घेऊन येवो, दिवाळी साजरी करताना ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा विचार अंगीकारावा, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. **** नांदेड इथल्या श्री सचखंड गुरूद्वारात काल ऐतिहासिक तख्तस्नानानं दिवाळीला प्रारंभ झाला. देशविदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी गोदावरी नदीतून घागरीने पाणी आणून, पवित्र सिंहासन स्थळासह गुरूद्वारा परिसराची स्वच्छता केली. **** लखनौ इथं झालेल्या टी २० सामन्यात भारतानं काल वेस्ट इंडिजचा ७१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतानं, १९५ धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघाला २० षटकांत ९ बाद १२४ धावाच करता आल्या. ६१ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत नाबाद १११ धावा करणारा भारताचा कणर्धार रोहित शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रोहित शर्मा हा टी २० आंतराराष्ट्रीय सामन्यात चार शतकांसह सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. कालच्या विजयामुळे भारतानं तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० नं विजयी आघाडी घेतली असून, तिसरा सामना येत्या रविवारी चेन्नई इथं होणार आहे. **** चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू उपान्त्य फेरीत पोहोचली आहे. काल झालेल्या सामन्यात सिंधुनं रशियाच्या एवजेन्या कोस्तेस्काया हीचा २१ - १३, २१ - १९ असा पराभव केला. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांच्या जोडीला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. **** येत्या दहा ते चौदा तारखांदरम्यान लातूर इथं, मुलींच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत देशभरातून सत्तेचाळीस विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत. **** परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं कमी दाबानं वीज पुरवठा होत असल्याच्या कारणावरुन गावकऱ्यांनी काल महावितरण कार्यालयात उपअभियंता एस पी जाधव यांना घेराव घालून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. गावात सध्या एका दिवसाआड आठ तास पूर्ण दाबाने आणि १५ तारखेनंतर सुरळीत वीज पुरवठा करण्याचं लेखी आश्वासन जाधव यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. **** लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात बेलकुंड इथल्या श्री संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखानाच्या अध्यक्षपदी गणपती बाजुळगे तर उपाध्यक्षपदी शाम भोसले यांची निवड झाली आहे. काल झालेली ही निवडणूक बिनविरोध ठरली. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काल सकाळी हा अपघात झाला. ओम पंचमेढे असं या मृत युवकाचं नाव असून दिवाळीनिमित्त मित्राला भेटण्यासाठी जात असतांना त्याचा अपघात झाल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली. **** धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी काल काँग्रेसचे आमदार काशिराम पवार यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तालुक्यात दुष्काळ जाहीर न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, प्रसंगी मंत्रालयावर शिंगाडे मोर्चा काढू, असा इशारा यावेळी देण्यात आला. **** अवाजवी प्रवास भाडे आकारणाऱ्या खाजगी बस चालक, मालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद इथं विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ज्यादा भाडे आकारणाऱ्या ११ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली. खासगी बस चालकांनी जास्तीचं भाडं आकारल्यास प्रवाशांनी तक्रार करण्याचं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. **** येत्या चोवीस तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जनतेला सुरक्षेची भावना वाटली पाहिजे, यासाठी पोलिस दलाने अत्यंत दक्षपणे काम करावं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, ते काल उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. *****
0 notes