#धावांनी
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 January 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांवर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. • सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे पाच संशयित-लातूर इथल्या रुग्णांचा समावेश-आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन. • राज्यसरकारतर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन. आणि • महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा स्कॉटलंडवर १५० धावांनी दणदणीत विजय.
गुईलेन बॅरे सिंड्रोम-जीबीएसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आजाराबाबत आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या. हा आजार संसर्गजन्य नाही, प्रतिकार शक्ती कमी झाल्याने तसंच दूषित पाणी आणि न शिजवलेले मांस खाल्यामुळे हा आजार होतो, त्यामुळे अशाप्रकारचं अन्न टाळावं आणि पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत.
दरम्यान, जीबीएस विषाणूच्या प्रादुर्भावाचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजाणी करावी. तसेच या रुग्णांची दैनंदिन अद्ययावत माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाला सादर करावी, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या. या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विभागा��ं आवश्यक औषध पुरवठा आणि साधनसामुग्री उपलब्ध करून घेण्याचे निर्देशही मुश्रीफ यांनी दिले. या आजाराची सामान्य लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ सरकारी रुग्णालयात तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असं आवाहनही मुश्रीफ यांनी केलं.
सोलापूर जिल्ह्यात जीबीएस आजाराचे पाच संशयित आढळून आले आहेत. त्यापैकी चौघांवर उपचार सुरु असून, एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असलेले चार ही रुग्ण लातूर, निलंगा, तसंच अणदूर या ठिकाणचे आहेत. या आजारावर औषधोपचारासाठी जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्र्यांच्या परवानगीने दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचं, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. नागरिकांनी घाबरुन न जाता, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तातडीनं उपाय योजना राबवाव्या अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे, ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. शासकीय योजनांच्या माध्यमातून नागरिकांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नसेल तर या योजना फक्त जाहिरातीतच दिसतात अशी टीका पटोले यांनी केली. दरम्यान, एसटीची भाडेवाढ तत्काळ रद्द करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे, १५ टक्के भाडे वाढ करून सरकार जनतेला लुटत असल्याची टीका पटोले यांनी केली.
एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आजही राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नाशिक शहरातील ठक्कर बाजार बस स्थानकावर माजी आमदार वसंत गिते, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, यांच्या उपस्थितीत सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. धुळे बस स्थानकावर आज सकाळी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ बसस्थानकावरही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, आणि संबंधित कामगारांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. सिने टी व्ही संघटनेचे पदाधिकारी मनोज जोशी आणि जॉनी लिव्हर यांच्यासह अनेक कलाकारांनी आज मंत्रालयात फुंडकर यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन सादर केलं, त्यानंतर फुंडकर यांनी हे निर्देश दिले.
राज्यसरकार यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावर्षी मुंबई इथं तीन दिवसांचा पहिला चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येईल, याबाबतच्या तारखा आणि नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील, असं शेलार यांनी सांगितलं. दरम्यान, साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. राज्यातून १ हजार ५६० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले असून छत्रपती संभाजीनगर विभागातून १५६ विद्यार्थ्यांचा पात्रता यादीत समावेश आहे.
प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात उद्या मौनी अमावस्येला तिसरं शाही स्नान होत आहे. यासाठी भाविकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. सरकारने सात-स्तरीय सुरक्षा योजना लागू केली असून महाकुंभ परिसराला नो-व्हीआयपी झोन घोषित करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. भाविक आणि यात्रेकरूंसाठी आरोग्य सेवांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या आयसीसी अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारताने स्कॉटलंडवर १५० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संघ १४ षटकांत फक्त ५८ धावांतच सर्वबाद झाला. भारताकडून आयुषी शुक्लाने ४ बळी घेतले, तर वैष्णवी शर्मा आणि गोंगादी त्रिशाने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याआधी, भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत फक्त एक बळी गमावून २०८ धावा केल्या. भारताकडून गोंगादी त्रिशाने ५९ चेंडूत सर्वाधिक ११० धावा केल्या. दरम्यान, भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज राजकोट इथं खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा २०२५-२६ या वर्षासाठी १५ हजार २१६ कोटी रुपयांचा पतआराखडा नाबार्ड मार्फत तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या आराखड्याचे प्रकाशन केलं. कृषी पत क्षेत्रात शेतमाल उत्पादन, देखभाल आणि विपणन, कृषी कर्ज आणि संलग्न उपक्रमांसाठी ४ हजार २६७ कोटी रुपये, कृषी प��याभूत सुविधा क्षेत्रासाठी २३९ कोटी रुपये आणि पूरक क्षेत्रविकासात सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी ८ हजार १० कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात आज सकाळी ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेतील ठेवीदारांनी रस्ता रोको आंदोलन केलं. ठेवीदारांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारले जावेत तसेच ठेवीदाराच्या ठेवी लवकरात लवकर परत द्याव्यात, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान या मागण्यांसाठी ठेवीदार कृती समितीचे प्रमुख संदीप उबाळे यांनी पाच फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यातील नागापूर इथल्या विविध विकासकामांचे लोकार्पण खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक कुटूंबास ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी कचरापेटीचे वाटप करण्यात आलं. यावेळी सुंदर माझे अंगण अभियानातंर्गत उत्कृष्ट कुटूंबांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
परभणी इथं नियोजित हजरत शहा तुराबुल हक ऊर्सच्या तयारीचा आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी आढावा घेतला. हा ऊर्स दोन फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या ऊर्समध्ये देशभरातून भाविक आणि व्यापारी मोठ्या संख्येनं येतात. कायदा आणि सुरक्षेच्या अनुषंगानं सर्वधर्मीय शांतता समितीची बैठकही घेण्यात आली.
संदर्भित रुग्णालयांमध्ये मोफत उपचार योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड आवश्यक असल्याचं छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं आहे. ते आज या योजनेच्या आढावा बैठकीत बोलत होते. स्वस्त धान्य दुकानं, आपलं सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र आदी ठिकाणी या योजनेची नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नोंदणीसाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना स्वामी यांनी यावेळी दिल्या.
बीड जिल्हा ग्रंथालयात आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्हयातील शिरुर कासार ११ आणि १२ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची यावेळी मस्के यांनी माहिती दिली.
0 notes
cinenama · 1 year ago
Text
टीम इंडियाने दिली देशाला भाऊबीजेची भेट; वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक
indvsnz World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
IND vs SL : श्रीलंकेला 55 धावांवर गुंडाळत भारताचा 302 धावांनी विजय
https://bharatlive.news/?p=185878 IND vs SL : श्रीलंकेला 55 धावांवर गुंडाळत भारताचा 302 धावांनी विजय
टीम इंडियानं ...
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
रोहित-धवन करणार ओपनिंग, तिसर्‍या वनडेत टीम इंडियाची प्लेइंग 11 अशी असू शकते
रोहित-धवन करणार ओपनिंग, तिसर्‍या वनडेत टीम इंडियाची प्लेइंग 11 अशी असू शकते
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा वनडे, टीम इंडिया खेळत आहे 11: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना उद्या, 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. रोहित ब्रिगेडने पहिले दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. अशा स्थितीत तिसरी वनडे जिंकून टीम इंडियाला वेस्ट इंडिजचा सफाया करायला आवडेल. जाणून घ्या या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल. शिखर धवन आणि रोहित…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 4 years ago
Text
भारत 151 धावांनी विजयी | 49 बॉल शिल्लक असताना  इंग्लंडचा दुसरा डाव 120 धावांवर गुंडाळला; सिराजने 4 घेतले बळी
भारत 151 धावांनी विजयी | 49 बॉल शिल्लक असताना  इंग्लंडचा दुसरा डाव 120 धावांवर गुंडाळला; सिराजने 4 घेतले बळी
 लंडन : भारताने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत हरवून 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी विजय मिळवला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या नाबाद 89 धावांच्या भागीदारीमुळे भारताने 272 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लिश संघ 120 धावांवर सर्वबाद (ऑलआउट) झाला. मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. त्याने जोस बटलर, मोईन अली,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
भारत वि. इंग्लंड: डाव्यांचा पराभव करण्यासाठी पाहणारे पाहुणे | टीम इंडियाने हा शानदार विक्रम एका शानदार विजयासह तयार केला, आयसीसी कसोटी स्पर्धेत विराट सेनेचा सामना न्यूझीलंडशी होईल
भारत वि. इंग्लंड: डाव्यांचा पराभव करण्यासाठी पाहणारे पाहुणे | टीम इंडियाने हा शानदार विक्रम एका शानदार विजयासह तयार केला, आयसीसी कसोटी स्पर्धेत विराट सेनेचा सामना न्यूझीलंडशी होईल
डिजिटल डेस्क (भोपाळ). डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल (//4848) आणि ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (//47)) यांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसर्‍या दिवशी शनिवारी भारताने शानदार विजय नोंदविला. आहे. यासह, भारत आयसीसी कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला, तेथे त्यांचा सामना 18 जून रोजी लॉर्ड्सच्या मैदानावर न्यूझीलंडशी होईल. 4 सामन्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
crime-chovis-tass · 2 years ago
Text
Ind vs Aus Women T20 :हरमनचा 'तो माईंड 'गेम' अन् टीम इंडियाचा विजय, कोणाच्याच लक्षात आला नाही!
Ind vs Aus Women T20 :हरमनचा ‘तो माईंड ‘गेम’ अन् टीम इंडियाचा विजय, कोणाच्याच लक्षात आला नाही!
Ind vs Aus Women T20 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (INDvsAUS) झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या महिला संघाने थरारक विजय मिळवला. सुपर ओव्हरपर्यंत (Ind vs Aus Super Over) गेलेल्या सामन्यात भारताने 4 धावांनी विजय मिळवला. भारताकडून ऋचा घोष (Richa Ghosh) आणि स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर 21 धांवांचं आव्हान ठेवलं होतं. याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
batmaharashtratodaynews · 6 years ago
Video
विदर्भाने लागोपाठ दुसऱ्यांदा रणजी चषक जिंकला.  . . विदर्भाने रणजी करंडकच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रला ८७ धावांनी पराभूत करून लागोपाठ दुसऱ्या वर्षी रणजी करंडक जिंकला.  . . अधिक माहितीसाठी वाचा पूर्ण बातमी : http://bit.ly/2ByXIBN . . #Vidharbha #Defeat #Saurashtra #Ranji #Trophy #Win #JamthaStadium #Nagpur #Crickets #Sports #Updates #MaharashtraToday https://www.instagram.com/p/Btk8CffhEi-/?utm_source=ig_tumblr_share&igshid=12mdne1jc4dfy
1 note · View note
loksutra · 3 years ago
Text
अफेअरमध्ये कोणीच का नाही, सुपर-4मध्ये टक्कर देत टीम इंडियाचा दबदबा
अफेअरमध्ये कोणीच का नाही, सुपर-4मध्ये टक्कर देत टीम इंडियाचा दबदबा
टीम इंडियाने आशिया चषक विजेतेपदावरचा कब्जा कायम ठेवण्याच्या दिशेने दुसरे पाऊल टाकले आहे. भारतीय संघाने स्पर्धेच्या गट टप्प्यातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने हाँगकाँगचा पराभव केला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter आशिया कप 2022 च्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने हाँगकाँगला हरवून सुपर-4 मध्ये आपला प्रवेश पक्का केला आहे. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 3 years ago
Text
पहिल्या एक दिवशीय सामन्यात भारताचा विजय
Tumblr media
पोर्ट ऑफ स्पेन : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा पहिला वनडे सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १ -० अशी आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने दमदार फलंदाजी करत ९७ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. मात्र या विजयानंतर देखील शिखर धवन निराश आहे. भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे आव्हान ठवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजकडून कायल मायेर्स आणि ब्रँडन किंग यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले. अखे�� भारताने पहिला सामना ३ धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर म्हणून९७ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनची निवड करण्यात आली. दरम्यान, सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिखर धवन म्हणाला की, शतक साजरे करता आले नाही यामुळे मी निराश आहे. मात्र एकूण हा एक सांघिक प्रयत्न होता. आम्ही एक चांगली धावसंख्या उभारली होती. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झाला. Read the full article
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : नाशिकचा सातारा विरुद्ध  विजय
राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : नाशिकचा सातारा विरुद्ध विजय
साई राठोड ,समकीत सुराणा प्रभावीपूना क्लब  व परभणी चे ही  विजय नाशिक मध्ये चालू असलेल्या, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १६ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नाशिकने सातारा विरुद्ध एक डाव व २३ धावांनी मोठा विजय मिळवला. नाशिक तर्फे साई राठोड ८७, वेद सोनवणे ६२, सिध्हार्थ…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• दावोसमध्ये झालेल्या गुंतवणुकीपैकी ९८ टक्के थेट परदेशी गुंतवणूक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. • मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन. • भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. • राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ६० धावांनी विजय.
स्वित्झर्लंडच्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचादरम्यान महाराष्ट्रानं केलेल्या सामंजस्य करारांच्या एकंदर गुंतवणुकीपैकी ९८ टक्के गुंतवणूक ही थेट परदेशी गुंतवणुकीच्या स्वरूपात असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दावोस इथून काल वार्ताहर परिषदेत बोलताना त्यांनी, या गुंतवणुकीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी ग्वाही ��िली. या ज्या काही गुंतवणुकीचं एक महत्वाचं जे काही याचं फिचर असेल तर याच्यामध्ये जवळपास अठ्ठाण्णव टक्के जी गुंतवणूक आहे, ही फॉरेन डायरेक्ट इनव्हेसमेंट आहे. ती एफडीआय एफआय च्या माध्यमातून या ठिकाणी येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक आपल्या देशाकरता आपल्या राज्याकरता यासाठी महत्वाची आहे, ही गुंतवणूक ही थेट विदेशी गुंतवणूकीच्या स्वरुपात येत आहे. आपल्याला कल्पना आहे की थेट विदेशी गुंतवणूकीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि त्यात जॉबची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आणि एक प्रकारे आपली जी काही त्या ठिकाणी अर्थव्यवस्था आहे. ती विस्तारीत होते एक्सपांड होते.
या परिषदेदरम्यान महाराष्ट्रानं एकंदर ६१ सामंजस्य करार केले असून त्यामुळे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातल्या सर्व भागात आणि क्षेत्रात गुंतवणूक आल्यानं राज्‍याचा समतोल विकास होईल, असा ‍विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २८ पैकी २० कंपन्या राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारापैकी किती अंमलात आले याची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना केलं. दावोसमध्ये सर्व गुंतवणूकदार एकत्र येतात, त्यामुळं इथे येणं आवश्यक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, जे एफडीआय आहे त्यामुळे त्यांची अशी इच्छा असते की त्यांचे जे ग्लोबल पार्टनर आहेत. त्यांचे जे इनव्हेस्टर आहेत. किंवा त्यांच्या सोबत जे लोकं टेक्नॉलॉजी मांडताय अशा सगळ्यांच्या प्रेझेन्स मध्ये एमओयु झाले पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतय नेटवर्कींगचं कनेक्टींच एक महत्वाचं सेंटर आहे. इथला तुमचा प्रेझेन्स हा जे काही जगभरातले उद्योजक असतात, जे इनव्हेस्टर असतात त्यांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करतो.
दरम्यान, दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचे ऐतिहासिक सामंजस्य करारांची प्रथा सलग तिसऱ्या वर्षी कायम राहिली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात काही हजार कोटींची गुंतवणूक यानिमित्ताने येणार असून, औद्योगिक क्षेत्रात समतोल राखण्याचं कामही महायुती सरकारने केलं, असं सामंत म्हणाले.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या ह��्ते होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष २०२५ निमित्तानं वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन आणि देशभर नव्यानं स्थापन झालेल्या १० हजार नवीन बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात यावेळी करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात अजंग गावात आयोजित सहकार परिषदेसह विविध कार्यक्रमांना शहा उपस्थित राहणार आहेत.
भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते काल परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या देश कृषि उत्पादन निर्यातीमध्ये जगात अग्रेसर ठरत आहे, असं ते म्हणाले. मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे या कार्यक्रमास उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती काल पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते, असं नमूद केलं.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा काल मुंबईत मेळावा झाला. यावेळी बोलताना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, वेळ येईल तेव्हा स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं सांगितलं.
साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते काल बोलत होते. एफआरपीच्या प्रमाणात एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढत नाही, या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री तसंच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच��� सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यातल्या शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. तूर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करावी, तसंच नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. हमी भावाने ३०० केंद्रांवरून तीन लाख मेट्रीक टन तूर खरेदी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावं आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मुंबईत कुर्ला बसस्थानक इथं या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते काल बोलत होते. बसस्थानक ही सार्वजनिक जागा असून, तिथे स्वच्छता ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.
महिला क्रिकेटमध्ये, १९ वर्षांखालील टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला. काल झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात ११८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकात नऊ बाद ५८ धावाच करु शकला.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात नवी दिल्लीत मूळच्या बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातल्या देवडी इथल्या फ्लाईंग ऑफीसर दामिनी देशमुख या परेड कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. याबद्दल दामिनी यांचे वडील माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दामिनीचे आर्मी परेडसाठी सलेक्शन झाले, ही गोष्ट आमच्या कुटुंबासाठी खूपच अभिमानाची आहे. आम्हाला त्याचा खूप आनंद झालेला आहे.
महसूल विभागात अंतर्भाव झालेल्या अनेक नवीन संगणकीय प्रणालींची कार्यपद्धती प्रशिक्षणातून जाणून घ्यावी, असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्वरुपाचं आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्यात येत्या ३० ते १३ फेब्रुवारी दरम्यान स्पर्श -कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. यासंर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून तालुकास्तरावर नवीन आयुष्यमान कार्ड काढण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने आज कर समाधान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांचे मालमत्ता कराबाबत आक्षेप, तक्रारी निकाली काढण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येतं.
नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे आणि उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना १७ हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
umran malik fastest ball ipl history: IPLमध्ये फायर; स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान चेंडू - umran malik bowls second fastest ball of ipl history and fastest of ipl 2022 clocks 157 kmph vs delhi capitals
umran malik fastest ball ipl history: IPLमध्ये फायर; स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान चेंडू – umran malik bowls second fastest ball of ipl history and fastest of ipl 2022 clocks 157 kmph vs delhi capitals
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने केलेल्या गोलंदाजांच्या धुलाईमुळे ही लढत चर्चेत आली असली तरी या सामन्यात एक इतिहास घडला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत २०७ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल हैदराबादला १८६ धावाच करता आल्या. दिल्लीने ही लढत २१ धावांनी जिंकली. या लढतीत हैदराबादचा पराभव झाला असला तरी संघातील जलद…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
NZ vs SA : डी कॉक, ड्युसेनने धुतले, केशव महाराजच्या फिरकीने नाचवले; न्यूझीलंड १९० धावांनी पराभूत
https://bharatlive.news/?p=184950 NZ vs SA : डी कॉक, ड्युसेनने धुतले, केशव महाराजच्या फिरकीने नाचवले; न्यूझीलंड ...
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
पहिल्या T20 मध्ये भारताने इंग्लंडला हरवले, हार्दिकने बॅटिंगनंतर बॉलने केले चमत्कार
पहिल्या T20 मध्ये भारताने इंग्लंडला हरवले, हार्दिकने बॅटिंगनंतर बॉलने केले चमत्कार
इंग्लंड विरुद्ध भारत 1ली T20, द रोझ बाउल साउथम्प्टन: द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये भारताने इंग्लंडचा 50 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या शानदार विजयाचा हिरो होता हार्दिक पांड्या. त्याने चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी चमकदार कामगिरी केली. प्रथम हार्दिकने अवघ्या 33 चेंडूत 51 धावांची तुफानी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 January 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. • मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं आवाहन. • कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पासंदर्भात जागतिक बँकेचं पथक उद्या सांगली दौऱ्यावर. • राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाची सुरुवात. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर ६० धावांनी विजय.
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून निरंतर प्रेरणा मिळते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती आज पराक्रम दिवस म्हणून साजरी होत असून, यानिमित्त दिलेल्या व्हिडिओ संदेशात पंतप्रधान बोलत होते. नेताजींनी आरामदायी जीवनाचा मार्ग न पत्करता भारताच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात परिश्रम घेतले, आपणही विकसित भारताच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अशा प्रकारे मेहनत घ्यायला हवी, असं पंतप्रधान म्हणाले, नेताजी ने देश की स्वतंत्रता के लिए आजाद हिंद फौज बनाई, इसमें देश के हर क्षेत्र हर वर्ग के वीर और वीरांगनाएं शामिल थीं। सबकी भाषाएं अलग-अलग थीं, लेकिन भावना एक थी देश की आजादी। यही एकजुटता आज विकसित भारत के लिए भी बहुत बड़ी सीख है। तब स्वराज के लिए हमें एक होना था, आज विकसित भारत के लिए हमें एक रहना है। देशाच्या एकतेला बाधा आणणाऱ्या शक्तींपासून दक्ष राहायला हवं असं पंतप्रधान म्हणाले. आज भारत गुलामीच्या मानसिकतेमधून बाहेर पडत आहे. वारशाचा अभिमान बाळगत विकासाच्या वाटेवर चालत आहे. याच बळावर जागतिक स्तरावर भारताचा आवाज बुलंद होत असून, जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा दिवस दूर नाही, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण केली. संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही ��ेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहिली.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त राजभवन इथं आदरांजली वाहिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हस्ते झालं. जगातल्या इतर निवडणूक यंत्रणांचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यासह तेरा निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे जवळपास ३० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत. निवडणूक व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी या परिषदेत चर्चा होणार आहे. लोकशाही असलेल्या देशात निवडणुकीचं भवितव्य हे तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर, तसंच राजकीय प्रचारात आणि निवडणूक कार्यपद्धतीत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर, यावर अवलंबून असल्याचं, राजीव कुमार यावेळी म्हणाले.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत जवळपास दहा कोटी भाविकांनी कुंभस्नान केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज कुंभमेळा परिसरात भेट देऊन आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या कक्षांच्या वतीनं सुरु असलेल्या प्रसिद्धी व्यवस्थेची पाहणी केली. प्रसार भारतीनं या महाकुंभसाठी व्यापक प्रसिद्धीसाठी व्यवस्था केली असल्याचं त्यांनी सांगितलं. महाकुंभसंबंधी अनेक रोचक तथ्यं आकाशवाणी तसंच दूरदर्शनचे प्रतिनिधी सामान्यांपर्यंत पोहोचवत असल्याचं ते म्हणाले. प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानाच्या या पर्वाच्या माध्यमातून एकात्मतेची भावना वृद्धींगत होत असल्याचं जाजू यावेळी म्हणाले. दरम्यान, महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त गर्दीची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे विभागानं दीडशे अतिरिक्त रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातल्या कृषि विद्यापिठाने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषि संशोधनावर अधिक भर द्यावा, असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सव्वीसावा दीक्षांत समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. वातावरणाशी जुळवून घेत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ होईल, अशा प्रकारच्या बि-बियाण्यांवर संशोधन करून शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या मोहिमेचा विद्यापीठाने भाग बनावं, असं राज्यपाल म्हणाले. कृषीमंत्री माणिकराव कोक���टे या कार्यक्रमास उपस्थित होते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या समारंभात राज्यपालांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
कृष्णा नदीतलं पुराचं पाणी मराठवाड्यात आणण्याचं नियोजन असून, त्याबाबतच्या प्रकल्पास जागतिक बँकेनं मंजूरी दिली आहे. जागतिक बँकेचं एक पथक उद्या, २४ तारखेला यासाठी सांगली दौऱ्यावर येत आहे. या भागातल्या सांडपाणी प्रकल्पाची, अवर्षण प्रवण भागाची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे. तसंच पथक कृष्णा नदी आणि परिसरात राहणाऱ्या कुटुंबांच्या भेटी घेणार आहे. या प्रकल्पासाठी तीन हजार २०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, त्यापैकी दोन हजार ३३८ कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जागतिक बँक करणार आहे.
साखर कारखानदारीत काळानुसार बदल आवश्यक असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज ते बोलत होते. एफआरपी अर्थात रास्त किफायतशीर दरात वाढ होते त्या प्रमाणात एमएसपी अर्थात किमान आधारभूत किंमत वाढत नाही, या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातल्या रांजणी इथल्या नॅचरल शुगर या सहकारी साखर कारखान्याला या वर्षीचा वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राज्यातल्या सर्व एस टी बस स्थानकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानामध्ये एस.टी. कर्मचाऱ्यांसोबतच लोकांनीही सहभागी व्हावं आणि ती एक लोकचळवळ व्हावी, असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. मुंबईत कुर्ला बसस्थानक इथं या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते आज बोलत होते. बसस्थानक ही सार्वजनिक जागा असून, तिथे स्वच्छता ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचं सरनाईक म्हणाले.
महिला क्रिकेटमध्ये, १९ वर्षांखालील टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिलांनी निर्धारित षटकात ११८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल श्रीलंकेचा संघ २० षटकात नऊ बाद ५८ धावाच करु शकला.
जळगाव जिल्ह्यात परधाडे स्थानकाजवळ काल संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यातल्या १० जणांची ओळख पटली असून, त्यात एक लहान मूल आणि तीन महिलांचा समावेश आहे.
महसूल विभागात अंतर्भाव झालेल्या अनेक नवीन संगणकीय प्रणालींची कार्यपद्धती प्रशिक्षणातून जाणून घ्यावी, असं आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी ग्राम महसुल अधिकाऱ्यांना केलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या काळात आपल्या कामाच्या स्वरुपाचं आकलन करुन त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, या प्रशिक्षणाचा अंतिम उपयोग हा लोकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी व्हावा, अशी अपेक्षा स्वामी यांनी व्यक्त केली.
सुप्रसिध्द कवी, नाट्यकथा लेखक प्राध्यापक अनिल पंढरीनाथ सोनार यांचं आज पहाटे धुळ्यात, वार्धक्यामुळे निधन झालं, ते ७९ वर्षांचे होते. सोनार हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कार्यकारणीचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष होते.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातला रहिवासी असलेल्या आरोपीस जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सश्रम जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २५ ऑगस्ट २०१८ रोजी ही घटना घडली होती.
0 notes