#यावरुन
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १३ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
लोकसभेत आज संविधानावर चर्चेला सुरुवात झाली. देशानं राज्यघटना स्वीकारली त्या घटनेला ७५ वर्षं पूर्ण होत असल्यानिमित्त ही विशेष चर्चा होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेला सुरुवात करताना, आपलं संविधान सार्वभौम आणि सक्षम असल्याचं सांगितलं. आपली राज्यघटना सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनातल्या सर्व पैलूंना स्पर्श करून राष्ट्र उभारणीचा मार्ग मोकळा करते, असं ते म्हणाले. सरकार संविधानाच्या मूल्यांना केंद्रस्थानी ठेऊन काम करत असून, संविधानात नमूद केल्याप्रमाणे धर्म आणि भावना, याचा आदर करत असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान हे राष्ट्र निर्माणाचं, देशाच्या विकासाचं रोल मॉडेल असून, संविधानानंच जनतेला अधिकार दिले असल्याचं सिंह यांनी नमूद केलं. हर घर नल, महिला सशक्तीकरण, सामाजिक न्याय, जीएसटी, नवीन फौजदारी कायदे, नारी शक्ती वंदन अधिनियम यासारख्या सरकार राबवत असलेल्या विविध योजना आणि कायद्यांचा राजनाथ सिंह यांनी उल्लेख केला. संविधान निर्माणात पुरुषांप्रमाणेच काही महिलांचा देखील मोलाचा वाटा होता, असं सांगून राजनाथ सिंह यांनी, या महिलांचा गौरव केला. दरम्यान, संविधानावरच्या या दोन दिवसीय चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर देणार आहेत. राज्यसभेत १६ आणि १७ तारखेला संविधानावर चर्चा होणार आहे.
राज्यसभेत सभापतींच्या अविश्वास प्रस्तावावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज आजही होऊ शकलं नाही. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अविश्वास प्रस्तावावर सामाजिक माध्यमावर केलेल्या वक्तव्यावर सभापती जगदीप धनख�� यांनी आक्षेप घेतला. या प्रस्तावावर चर्चा करण्याची विरोधी पक्षांची मागणी त्यांनी फेटाळून लावली. सदनात विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नसल्याचा आरोप खरगे यांनी केला. यावरुन दोन्ही बाजुच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. दरम्यान, सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेत कामकाज होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे.
१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा आज २३ वा स्मृतिदिन आहे. या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या सुरक्षा जवानांना आणि पीडितांना देशभरातून आदरांजली अर्पण केली जात आहे. लोकसभा आणि राज्यसभेत आज संसद दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संसदेच्या सुरक्षा रक्षकांनी धैर्य आणि शौर्य दाखवून दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, असं सांगून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दहशतवादाशी खंबीरपणे लढण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. राज्यसभेत यासंदर्भात बोलताना सभापती जगदीप धनखड यांनी, हा दिवस राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हानांना तोंड देताना दक्षतेची आणि एकतेची गरज दर्शवत असल्याचं नमूद केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, खासदारांनी आज संसद भवनात हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या संगमनगरीच्या दौऱ्यावर असून, १३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या महाकुंभ सोहळ्याचं त्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होत आहे. यावेळी सात हजार कोटींच्या महाकुंभ प्रकल्पाचं उद्घाटनही होत असून, यात दहा उड्डाणपूल, घाट आणि नदीकाठच्या रस्त्यांचा समावेश आहे. भारद्वाज आश्रम कॉरीडॉर, श्रींगवेरपूर धाम कॉरडॉर, अक्षव्यत कॉरीडॉर, हनुमान मंदिर कॉरीडॉर यांचंही उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत.
येत्या युवा दिनी अर्थात १२ जानेवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थिती होणाऱ्या या प्रदेश अधिवेशनाला १० हजार भाजप पदाधिकारी, तरूण कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, असं बावनकुळे म्हणाले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळात तरूणाईला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी अभियान सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सर��ंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींना तत्काळ अटक करावी, या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी लातूर इथल्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन काल लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
‘एक देश एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘अपार’ नोंदणीत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक राखला आहे. अहिल्यानगर जिल्हा दुसऱ्या स्थानावर तर रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ लाख १९ हजार ९५ विद्यार्थ्यांची म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक ‘अपार’ नोंदणी पूर्ण झाली आहे.
मस्कत इथं सुरु असलेल्या महिला कनिष्ठ हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताचा उपान्त्य फेरीतला सामना उद्या जपान सोबत होणार आहे.
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? अयोध्येतील राम मंदिरावरुन नारायण राणेंचा सवाल
चारही पिठांचे शंकराचार्य अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाला अनुपस्थित राहणार आहेत. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी थेट शंकराचार्यांवरच तोफ डागली आहे.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
विश्लेषण: फिनलँडच्या महिला पंतप्रधानांचा खासगी व्हिडीओ लीक, पण यावरुन वाद पेटण्याचं कारण काय?
विश्लेषण: फिनलँडच्या महिला पंतप्रधानांचा खासगी व्हिडीओ लीक, पण यावरुन वाद पेटण्याचं कारण काय?
विश्लेषण: फिनलँडच्या महिला पंतप्रधानांचा खासगी व्हिडीओ लीक, पण यावरुन वाद पेटण्याचं कारण काय? फिनलँडच्या पंतप्रधानांची ड्रग्ज चाचणी करण्याची मागणी कशासाठी होत आहे? फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांचा आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. ३६ वर्षीय सना मरीन यांच्या या व्हिडीओमुळे सध्या एकच वाद निर्माण झाला आहे. सना मरीन यांच्यावर विरोधकांनी टीकेची…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 5 years ago
Text
कॉलेजचे प्रथम वर्ष...
१९८३ साली मराठवाड्यात अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाले. त्यावेळेस लातूरच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. कॉलेजचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे बर्‍याच सुविधांचा अभाव होता. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल तशा तशा सुधारणा होत होत्या. गेस्ट लेक्चरर्स बोलावून एक्स्ट्रा क्लासेस घेतले जायचे. कॉलेजची स्वतंत्र बिल्डींगही नव्हती. सायन्स कॉलेजच्या इमारतीवर चौथा अन पाचवा असे दोन मजले बांधले होते. तिथेच वर्ग भरायचे. पायर्‍या चढण्या उतरण्याचा मस्त व्यायाम व्हायचा. केमिस्ट्री, फिजिक्सचे प्रॅक्टीकल्स सायन्स कॉलेजच्या लॅबमध्येच व्हायचे. वर्कशॉप अजून तयार झाले नव्हते. जुन्या बिल्डींगच्या एका भागात कारपेंटरी, ब्लॅकस्मिथी, वेल्डींग, इलेक्ट्रीकल काम असे गटा गटाने शिकवले जायचे. रंधा मारतांना हाताला गोळे यायचे. लेथ मशीनवर हात कपडे काळे व्हायचे. शिकणारेही अन शिकवणारे दोघेही नवीन. सगळीच मजा होती. पण हळुहळू सुधारणा होत होती.  
कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या मुलांनी प्रवेश घेतला होता. मुलगी मात्र एकच होती, पण ती फर्स्ट इयर नंतर पुन्हा कधी दिसली नाही. सुरुवातीला जीन्स, टीशर्ट अशा वेशभुषेतील मुलांसमोर बेलबॉटम, ओपन शर्ट अशा अवतारात वावरणार्‍या मला थोडे बुजल्यासारखे व्हायचे. शर्ट इन करायची कधी सवयच नव्हती. पण जसे जसे मित्र नवीन बनत गेले तसे मी त्या वातावरणात समरसून गेलो. दक्षिण भारतीय व हिंदी भाषिक मुलांबरोबर भाषेची देवणघेवाण करतांना मजा य���यची.
      त्यावेळी मोठा भाऊ (दिलीप) लातूरलाच एम.एस.ई.बी.त सहाय्यक अभियंता होता. वहिनी, लहान पुतण्या व भावासोबतच मी त्याच्या सरस्वती नगरातल्या घरात रहायचो. पुतण्याला जवळच्याच एका  बालवाडीत घातले होते. भावाची फिरायची ड्युटी असल्यामुळे बर्‍याचदा त्याच्यासोबत आम्ही सगळेच जायचो. काही वेळेस त्याच्या साईट्सवर जायचो. सिव्हिलची कामे कसे चालतात हे तो सांगायचा. अर्थात सगळं डोक्यावरुन जात होतं ही गोष्ट वेगळी म्हणा! पण ��ूप मजा यायची.
एकदा वहिनी माहेरी गेल्या होत्या. आम्ही दोघेच घरी होतो. दौर्‍यावरुन भाऊ रात्री उशीरा आला. आत बेडरुममध्ये झोपायला गेला. बेडरुमच्या खिडकीत माझे एक वाद्य ठेवलेले होते. मी सहज म्हणालो ‘खिडकीतले वाद्य हात घालून कुणी रात्री वाजवेल बरं!’ तो हसला आणि कपडे बदलून झोपला. काही वेळाने हळूच बाहेरच्या खोलीत येऊन झोपला. अर्थात एकट्याला झोप येत नव्हती म्हणून तो बाहेर आला, पण त्या वाद्य वाजवण्याशी त्याचा संबंध जोडून दुसर्‍या दिवशी आम्ही खूप हसलो. 
त्याच्याकडे अल्विन पुष्पक स्कुटर होती. पण मला चालवता येत नव्हती. एका मित्राने दयानंद कॉलेजच्या ग्राऊंडवर त्याची स्वतःची स्कुटर मला चालवायला शिकवली. मलाच पेट्रोल भरुन द्यावे लागायचे. दोन चकरा झाल्या की तो म्हणायचा पेट्रोल संपले, आता उद्या. असे म्हणून दोन तीन दिवस त्याने मला शिकवायच्या निमित्ताने मजा करुन घेतली.
स्कुटर शिकल्यामुळे अधुनमधून अल्विन पुष्पक चालवायला मिळायची. एकदा वहिनीला बाजारात काही काम होते. त्यांना स्कुटरवर घेऊन गेलो. भावाची जीप बिघडली होती म्हणून ऑफीसला जायच्या वेळेच्या आत परत यायला त्याने सांगितले. पण परत यायला उशीर झाला. आम्ही येईपर्यंत तो निघून गेला होता. बहुतेक कुणीतरी घ्यायला आले असावे. स्कुटर देण्यासाठी मी त्याच्या ऑफिसला गेलो. पाहिले तर काय! समोरच माझी सायकल! तो म्हणाला ‘जीप नाही, स्कुटर तुम्ही घेऊन गेलात, मग काय करणार! आलो सायकलवरच!’ त्याच्या स्टाफला या प्रकाराची खूप गम्मत आणि आश्चर्य वाटले. या साधेपणामुळेच सर्व स्टाफ त्याला खूप मानायचा. थोडावेळ तिथे बसून सायकल घेऊन घरी आलो.
माझे बरेच मित्र घरी यायचे. भाऊ सिव्हील इंजिनिअर असल्यामुळे आमच्या सोबत गप्पा मारायला, आम्हाला शिकवायला त्याला खूप आवडायचे. अभ्यास कसा करावा हे तो सांगायचा. वाचून समजून घ्यायचे, मग सोप्या भाषेत त्याचे नोट्स काढायचे असे सांगायचा. त्यावेळी मी वेंकट नावाच्या एका मित्राकडे अभ्यासाला जायचो. बहुतेक वेळा तिथेच झोपायचो. त्याने हे नोट्सचे खूप मनावर घेतले. पुस्तकच्या पुस्तक शब्दश: लिहुन काढले. पान नंबरसहीत! पुस्तक वाचले काय अन नोट्स वाचले काय, दोन्ही सारखेच! कागदाचे गठ्ठेच गठ्ठे तयार झाले होते. पुस्तकांची हस्तलिखित कॉपीच तयार असल्यामुळे एकच पुस्तक असले तरी आमचे दोघांचेही भागायचे!   
अभ्यास, कॉलेज, ट्यूशन असा आमचा व्यस्त दिनक्रम सुरु होता. ड्रॉईंग बोर्ड, ड्राफ्टर, कोरे कागद तसेच काही पुस्तके भावाचेच मला मिळाले होते. त्याच्या इंजिनिअरिंगच्या वेळेसचे 1975-76 सालचे त्याने जपून ठेवलेले हे साहित्य कामाला येत होते.
सायकल हेच त्यावेळचे वाहन होते. टु व्हिलर वगैर लाड नव्हते. ड्रॉईंग बोर्ड काखेत पकडुन एका हाताने सायकल चालवत कसरत करत आम्हाला कॉलेजला जावे लागायाचे.  असेच एकदा आम्ही मित्र मिळून जात असतांना अशोक हॉटेलच्या चौकात एक मित्र हाताला अवघड झाल्यामुळे रस्त्यातच पाय टेकवून ड्रॉईंग बोर्ड व्यवस्थित करत होता. आम्ही चार पाचजण त्याच्या बाजूला थांबलो. काही वेळाने मागे पाहिले तर ही भली मोठी गाड्यांची रांग! समोरच्या बाजूनेही काही गाड्या, रिक्षा थांबल्या होत्या. एवढ्या गाड्या कशाला थांबल्या हे आधी लक्षातच आले नाही. मग एकदम आमच्या लक्षात आले की आम्ही थांबलोय म्हणजे सिग्नल असेल असे समजून बाकीचेही थांबले आहेत. हळूच सायकली रस्त्याच्या बाजूला घेतल्या. जसे आम्ही बाजूला झालो तसे एक एक गाडीवाले, आम्ही काही खोडसाळपणा केला आहे अशा नजरेने रागा रागाने आमच्याकडे पहात निघाले. खरं म्हणजे आमच्या ध्यानीमनीही नव्हते की असे काही होईल म्हणून! हा प्रकार पाहुन आजुबाजूचे लोक हसायला लागले. आम्ही खाली मान घालून तिथुन सटकलो.
एके दिवशी कॉलेजहुन परत येतांना टाऊन हॉलसमोर पोलिसांनी सायकली अडवल्या. शेकडो सायकली तिथल्या मैदानात जप्त करुन ठेवत होते. मलाही अडवले. नगरपालिकेचे परमिट असेल तरच सायकल परत मिळणार होती. आता आली का पंचाईत! मी आणि एक दोन मित्र थांबलो होतो. आम्ही पाहिले की फक्त मुलांच्याच सायकली पकडणे चालू होते, मुलींच्या नाही. त्या आरामात जात होत्या. मला रागच आला. मी पोलिसाला म्हणालो ‘तुम्ही असा दुजाभाव का करताय? मुलींना आणि मुलांना वेगळा न्याय कसा काय?’ यावर तो म्हणाला ‘आम्हाला जे सांगितले आहे ते करतोय. तुम्ही साहेबांना बोला.’ मी सरळ तिथे खूर्चीवर बसलेल्या इंस्पेक्टरकडे गेलो आणि तोच प्रश्न विचारला. ते लगेच म्हणाले ‘नाही असं काही सांगितलेलं नाही. सायकली त्या सायकलीच. मग मुलींच्या असो वा मुलांच्या. सर्वांना सारखाच नियम आहे.’ आणि त्यांनी जोरात ओरडून पोलिसांना सर्वांच्या सायकली पकडायचा आदेश दिला. ज्या पोलिसाने आमची सायकल पकडली होती तो तरुण होता. आता मुलींच्या सायकली पकडायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला होता. त्या आनंदातच त्याने हळूच आमच्या सायकली बाहेर काढून दिल्या आणि वर आम्हालाच ‘थँक्यू’ म्हणाला. आमचे काम फत्ते झाले. सायकलवर टांग मारून भर्��र्रकन तिथून निघून गेलो.
वेंकटच्या रुमवर आम्ही दिवसरात्र अभ्यास करायचो. एकदा तो गावाला गेला होता. दोन दिवसांनी आला. मला घ्यायला घरी आला. वहिनींनी मस्त चहा नाष्टा दिला. नाष्टा करत सहज पेपरला बातमी वाचली की एका घरात सासूने सुनेला कित्येक महिन्यापासून तळघरात डांबून ठेवले होते. पोलिसांनी तिला सोडवले तेव्हा ती मरणासन्न अवस्थेत होती वगैरे वगैरे. आम्ही त्यावर चर्चा करत, त्या सासूला शिव्या घालत खात खात बोलत होतो. बातमीच्या  शेवटी त्या घराचे वर्णन आणि फोटो होता. ते पाहुन आम्ही उडालोच! ते घर म्हणजे तेच, जिथे वेंकटची रुम होती! ताडकन उठून आम्ही सायकलवरुन रुमकडे गेलो. तिथे सगळा सन्नाटा होता. दुसर्‍या एका भाडेकरुकडून समजले की पोलिसांनी रात्रीच घरातल्या सर्वांना पकडुन नेले आहे. इतरही सविस्तर माहिती त्यांनी दिली. एवढ्या दिवसांपासून तिथे राहून आम्हाला कुणालाच माहित नव्हते की त्या घराला तळघर आहे. कधी कसला आवाजही आला नव्हता की शंका येण्यासारखे काही दिसलेही नव्हते. आता त्या घरात रहाणे शक्यच नव्हते. आमची आम्हालाच किळस वाटू लागली. त्याच दिवशी वेंकटने सामान उचलले आणि दुसर्‍या एका मित्राच्या रुममध्ये तात्पुरता शिफ्ट झाला!
दरम्यान भावाची औरंगाबादला बदली झाली. काही दिवसातच त्याचे सर्व सामान शिफ्ट झाले, आणि पहिल्यांदाच मी स्वतंत्रपणे रुम करुन राहू लागलो. रूम पार्टनर अर्थातच वेंकट...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note · View note
nashikfast · 2 years ago
Text
जरा त्यांचा मार्ग अनुसरा...
जरा त्यांचा मार्ग अनुसरा…
    सध्या आपल्या भारतात चलनी नोटांवर कोणाचे चित्र असावे, कोणाचे चित्र नसावे, यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. लोक अत्यंत तावातावाने विविध पर्याय सुचवत आहेत. त्यावरुन तयार केलेली काही व्यंगचित्रे देखील समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या सर्व गदारोळात मला एक सर्वसामान्य व्यक्ती  म्हणून मला आजपासून 25 वर्षांपासून कवीवर्य कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध अस्या “स्वातंत्र्यदेवतेची विनवणी” या फटका स्वरुप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचे हजारो कोटी ५० खोक्यांच्या माध्यमातून शिंदे गटातील आमदारांना दिले का? शिवसेनेची विचारणा | shivsena doubts money used to destabilized maharashtra government with help of shinde group is from gujarat drug smuggling business hits towards bjp scsg 91
गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचे हजारो कोटी ५० खोक्यांच्या माध्यमातून शिंदे गटातील आमदारांना दिले का? शिवसेनेची विचारणा | shivsena doubts money used to destabilized maharashtra government with help of shinde group is from gujarat drug smuggling business hits towards bjp scsg 91
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमुळे झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा नवा संघर्ष पहायला मिळत आहे. असं असतानाच शिंदे गटातील आमदारांनी प��शांसाठी शिवसेनेशी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी अनेकदा केला आहे. यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
MothersDay | आईच्या ऋणातूनही कधीही मुक्त होऊ शकत नाही - सौ.रत्ना नवसुपे
#MothersDay | आईच्या ऋणातूनही कधीही मुक्त होऊ शकत नाही - सौ.रत्ना नवसुपे #Ahmednagar
(Photo Rutuja Ahmednagar) MothersDay | स्वराज्य रक्षणी फौंडेशनच्यावतीने मातृदिन साजरा MothersDay | अहमदनगर (दि १० मे २०२२ ) –  ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’ असे म्हटले जाते. यावरुन मातेची महिती आपणा सर्वांच्या लक्षात येते. साधी ठेच जरी लागली तरी आपण ‘आई गं’ असे म्हणतो. लहान मुलं असो वा कितीही मोठा व्यक्ती त्याच्या यशाचे प्रथम श्रेय तो आपल्या आईला देतो. न मागता सर्वकाही देणारी व्यक्ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 3 years ago
Text
"पेट्रोल डिझेल LPG च्या किंमती वाढवून भाजपनं ४ राज्यांतील विजयाची पहिली भेट दिली"
“पेट्रोल डिझेल LPG च्या किंमती वाढवून भाजपनं ४ राज्यांतील विजयाची पहिली भेट दिली”
दोन दिवसांत पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. यावरुन आता काँग्रेसनं भाजपवर टीका केली आहे. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी भाजपवर निशाणा साधत त्यांनी चार राज्यांतील विजयाची पहिली भेट दिल्याचं म्हटलं.  “जेव्हा भाजप सत्तेत येईल तेव्हा पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती वाढतील असं मी निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच सांगितलं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १२ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
देशभरात अपघात ग्रस्तांसाठी रोखरहित उपचार योजना लवकरच सुरु केली जाईल, अशी माहिती केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. ही योजना सहा राज्यांमध्ये सुरु असून, लवकरच उत्तर प्रदेश आणि नंतर उर्वरित देशात सुरू केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या योजनेमुळे रस्ते अपघातातील पीडितांना रूग्णालयात दीड लाख रुपयांपर्यंतचे रोखरहित उपचार मिळू शकतील. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या संख्येवर चिंता व्यक्त करून गडकरी यांनी, खासदरांना, प्रत्येक जिल्ह्यात अपघात प्रतिबंधक समित्या स्थापन करण्याची विनंती केली. दरम्यान, लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर विविध सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामार्ग भूसंपादनात शेतकर्यांना किरकोळ मोबदला मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. २०१३च्या कायद्याप्रमाणे भूसंपादन करावं, अशी मागणी त्यांनी केली. यावर गडकरी यांनी, भूसंपादन हे राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे होत असल्याचं सांगितलं. धाराशिव शहर सुरत - चेन्नई महामार्गाला जोडण्यासंदर्भातही निंबाळकर यांनी विचारणा केली असता, यासंदर्भात विचार करण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं. उमरगा - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसून, त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचं प्रमाण वाढत असल्याकडेही खासदार निंबाळकर यांनी लक्ष वेधलं. तसंच टेंभुर्णी - लातूर मार्गाचं चौपदरीकरणासंदर्भात विचारणा केली. एका महिन्यात यासंदर्भात टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परभणीला राष्ट्रीय किंवा राज्यमार्गाला जोडण्यासाठी विनंती केली. यावर बोलताना गडकरी यांनी, महाराष्ट्रात ७८ प्रकल्प सुरु असून, लवकरात लवकर ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी अहिल्यानगर - शिर्डी मार्गाची दुरावस्था झाली असल्याचं सांगितलं. हा अडीच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून, १५ दिवसांचं टेंडर काढून कामाला सुरुवात करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. रस्त्यांच्या कामात दिरंगाई करणार्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची मागणी वाघचौरे यांनी केली. पूर्वी कंत्राटदारांसाठी शिथिल केलेले नियम आता पुन्हा कडक केले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांनी पिंपळनेर ते सटाणा रस्त्याबाबत, तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देहू - पंढरपूर पालखी मार्गात असलेल्या संरक्षण विभागाच्या जागेतल्या जागेबाबत विचारणा केली. हे दोन्ही मार्ग लवकरात लवकर पूर्ण होतील, असं गडकरी यांनी सांगितलं.
विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं. आज सकाळी सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्षांचे स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी ��ेटाळून लावले. यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत घोषणाबाजी सुरू केली. सभापतींच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह किंवा टीका केली जाऊ शकत नाही, असं सभागृह नेते जे पी नड्डा यांनी नमूद केलं. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सभापतींना प्रश्न विचारल्याचा त्यांनी निषेध केला. काँग्रेस पक्ष घटनात्मक अध्यक्षपदाचा अवमान करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी, विरोधी सदस्यांच्या वर्तनावर निषेधाचा प्रस्ताव मांडला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांचा अमूल्य वेळ, मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानांच्या पाठिंब्याने महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे आणि आता त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचं ध्येय असल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराविषयी ठरलं असून, त्यात कोणताही तिढा नाही, असं फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाला दिवाळी दरम्यान एसटीच्या जादा फेर्यांमधून २ कोटी ४२ हजार रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं आहे. गेल्या १५ आक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत पुणे, सोलापूर, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, परांडा, माजलगाव या मार्गावर जादा फेऱ्या चालवण्यात आल्या होत्या.
फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँड मास्टर डी गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यात चौदावा आणि अंतिम सामना होणार आहे. हा सामना अनिर्णित राहील्यास उद्या स्पीडचेस प्रकारातून विजेता निवडा जाईल. दोन्ही खेळाडुंना सध्या प्रत्येकी साडे सहा गुण मिळाले आहेत.
खेलो इंडिया २०२५ हिवाळी स्पर्धा लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये दोन स्वतंत्र टप्प्यांमध्ये होणार आहेत. लडाखमध्ये २३ ते २७ जानेवारी या काळात आईस हॉकी आणि आईस स्किइंगसारख्या स्पर्धा होणार आहेत, तर जम्मू-काश्मीरमध्ये २२ ते २५ फेब्रुवारी या काळात अल्पाइन स्किइंग, स्नोबोर्डिंग अशा स्पर्धा होणार आहेत. क���ंद्रीय क्रीडामंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.
0 notes
kokannow · 3 years ago
Text
मनसेची गावडे यांनी बोलावलेली तालुका बैठक आणि घेतलेला ठराव बेकायदेशीरच !
मनसेची गावडे यांनी बोलावलेली तालुका बैठक आणि घेतलेला ठराव बेकायदेशीरच !
सखाराम उर्फ सचिन सावंत यांनी दिली प्रतिक्रिया कुडाळ : काही मोजक्या पदाधिकांऱ्यांना बोलावून काल बडतर्फ प्रसाद गावडे यांनी तालुका बैठकीच्या नावाखाली घेतलेली बैठक आणि ठराव पूर्णतः बेकायदेशीर आहे, असे सखाराम उर्फ सचिन सावंत यांनी म्हटले आहे.तालुका बैठक बोलावताना बैठकीचे निमंत्रण तालुक्यातील सर्व पदाधिकांऱ्यांना दिले नाही. यावरुन बैठकीच्या ��योजनाचा हेतूच दिसून येतो. काही लोकांना फोन करुन दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years ago
Text
'सारथी' व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 17 :- ‘एमपीएससी’च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पहिल्या पाचपैकी 4, पहिल्या 10 पैकी 7, एकूण उत्तीर्ण 597 पैकी 198 उमेदवार ‘सारथी’ संस्थेचे आहेत. यावरुन ‘सारथी’ची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सारथी’च्या कामगिरीचे कौतुक केले. देशात, जगाच्या पाठीवर उद्योगक्षेत्राची गरज ओळखून रोजगार मिळवून देणारे अभ्यासक्रम तरुणांनी निवडावेत. प्रशिक्षणानंतर…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 3 लाखांपर्यंत मिळू शकतो पगार
Tumblr media Tumblr media
Photo- Pixabay नवी दिल्ली | सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्याच लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या पोस्ट विभागाअंतर्गत इंडिया पोस्ट पेेेेेेेेमेंट्स बॅकेने विविध व्यवस्थापकीय पदाच्या (Managerial positions) भरतीसाठीची जाहिरात समोर आली आहे. अनेक वेगवेगळ्या पदासाठी जागा निघल्या आहेत. टेक्नोलाॅजी (Technology), प्रोडक्ट, ऑपरेशन्स, रिस्क मॅनेजमेंट ही पदं भरली जाणार आहेत. चीफ काॅम्प्लायन्स ऑफिसर (Chief Compliance Officer) आणि इंटर्नल ऑम्बुड्समॅन या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल. तुमच्या श्रेणीनुसार तुम्हाला पगार मिळणार आहे. महिन्याला तुम्ही 3 लाखापर्यंत पगार मिळवू शकता. यासंबधीची माहिती IPPB च्या अधिकृत बेवसाईटवर (Official website) उपलब्ध आहे. तसेच यासाठी अर्ज करायचा असल्यास तुम्ही ippbonine.com यावरुन भरती विभागातून अधिकृत अधिसूचना डाउनलोड करू शकता. तसेच ऑनलाईन अर्ज देखील करु शकता. दरम्यान, अर्ज करण्याची तारीख 10 सप्टेंबर रोजी सुरु झाली आहे. तर अर्ज (application) करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर लगेचच अर्ज करा. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा 'तो' फोटो सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे
BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा ‘तो’ फोटो सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे
BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा ‘तो’ फोटो सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे औरंगाबादमध्ये पक्षाचे नेते अकबरुद्दी ओवैसी यांच्या दौऱ्यानंतर राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे. ओवैसींनी एका कार्यक्रमासाठी हा दौरा केला होता. या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यापूर्वी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती माथा टेकवला. यामुळे राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला असून,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 3 years ago
Text
कोळघर शिवारात आढळला गवा !
गोलटगाव : औरंगाबाद तालुक्यातील कोळघर शिवारात शनिवारी गवा प्राणी दिसून आल्याने शेतकऱ्यांसह मुलांनी पळ काढला . दरकवाडी येथील शेतकरी कृष्णा गुलचंद वाघ हे आपल्या कोळघर येथील गट क्रमांक ४१ मधील शेतात गव्हास पाणी देत होते . यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा आठ वर्षीय मुलगाही होता . त्याची नजर त्या गवा प्राण्यावर गेली . कुणाचा तरी बैल आपल्या शेतात सुटून आला असल्याचे मुलाने सांगितले . यावरुन कृष्णा वाघ यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
गोंदिया जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान | जिपसाठी 243 व पंससाठी 388 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद
गोंदिया जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान | जिपसाठी 243 व पंससाठी 388 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद
गोंदिया, दि.22 : ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान घे��्यात आले. यात जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक विभाग प्रसारमाध्यमांना मतदानाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचेही आकडेवारी देऊ शकले नाही, यावरुन प्रशासनाची संथगती आणि नियोजन व्यवस्थित नसल्याचे पुन्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
narayan-rane-criticism-on-shiv-sena-chief-uddhav-thackeray bjp-want-to-be-called-chita-sarkar | Loksatta
narayan-rane-criticism-on-shiv-sena-chief-uddhav-thackeray bjp-want-to-be-called-chita-sarkar | Loksatta
काल (१७ स्प्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्य प्रदेशातील मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले ८ चित्ते सोडण्यात आले. तब्बल ७० वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा दाखल झाला. नरेंद्र मोदींचा हा महत्वकांशी प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला…
Tumblr media
View On WordPress
0 notes