#टक्के मतदान
Explore tagged Tumblr posts
Text
Gujarat Himachal एक्झिट पोल Results LIVE: 5 वाजेपर्यंत गुजरातमध्ये किती टक्के मतदान? भाजपा गड राखणार?
Gujarat Himachal एक्झिट पोल Results LIVE: 5 वाजेपर्यंत गुजरातमध्ये किती टक्के मतदान? भाजपा गड राखणार?
Gujarat Himachal एक्झिट पोल Results LIVE: 5 वाजेपर्यंत गुजरातमध्ये किती टक्के मतदान? भाजपा गड राखणार? अहमदाबाद: गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्याच मतदान संपलं. हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. आज Exit Poll चे आकडे जाहीर होणार आहे. या दोन राज्यातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूला आहे? ते एक्झिट पोलमधून स्पष्ट होईल. सर्वाधिक लक्ष गुजरातच्या एक्झिट पोलकडे आहे.…
View On WordPress
#&8216;��ोल&8217;#gujarat#himachal#live:#results#आजच्या प्रमुख घडामोडी#एक्झिट#किती#गड#गुजरातमध्ये#टक्के#बातमी आजची#भाजपा#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मतदान;#राखणार?#राजकारण#राजकारण लेटेस्ट#वाजेपर्यंत#शासन#सरकार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 29 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक, मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय मुंबईतल्या बैठकीत होणार असल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती. • विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानासंदर्भात काँग्रेस साशंक, मतदान आकडेवारीसंदर्भात निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. • राज्य कर्मचारी विमा महामंडळाअंतर्गतही मिळणार आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेचे लाभ. • ५५ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप, लंपनला सर्वोत्कृष्ठ मराठी वेबसिरीजचा पुरस्कार. आणि • तुळजाभवानी मंदिर विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त, सहा टप्प्यात होणार काम.
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सरकार स्थापनेसंदर्भातल्या अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर फडणवीस यांनी सामाजिक माध्यमावरुन राज्यात विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल शहा यांचे आभार मानले. दरम्यान, ही बैठक अतिशय सकारात्मक झाली, यानंतर मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे, त्यात मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान कसं वाढलं, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रक्रियेत साडे सात टक्के इतकं मतदान वाढलं असून, मतदान प्रक्रियेतच संशय असल्याचं ते यावेळी म्हणाले. सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान सुरू असलेल्या केंद्रांचा व्हिडीओ आणि फोटो आयोगाने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली.
दरम्यान, निवडणूक आयोगानं यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, विशेषकरुन शहरी भागात संध्याकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी गर्दी होते, २०१९ च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती होती, असं आयोगानं सांगितलं आहे. राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५८ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं होतं, तर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६ पूर्णांक शून्य पाच इतकी होती. ही सामान्य बाब असून, शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान सुरु होतं, असं आयोगानं स्पष्ट केल��� आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत येणाऱ्या आरोग्य सुविधांचा समावेश, राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या सुरक्षा कवचात करून, त्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचं, कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या योजनेचा लाभ १४ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना होईल, देशभरातल्या कर्मचाऱ्यांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, तसंच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत जोडलेल्या देशभरातल्या तीस हजारपेक्षा जास्त रुग्णालयांमधल्या सेवांचा लाभही त्यांना मिळेल असं या पत्रकात म्हटलं आहे. उपचार खर्चावर कोणतीही मर्यादा नसेल, तसंच देशातल्या धर्मादाय रुग्णालयांमध्येही या योजनेच्या लाभार्थ्यांना सेवा देण्यात येईल, असंही यात सांगण्यात आलं आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आज आणि उद्या राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्याच्या सूचना शिक्षण विभागानं दिल्या आहेत. सर्व जिल्ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अपार आ��डी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिल्या आहेत.
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला. दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा 'पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' पुरस्कार, मराठी वेब सिरीज ‘लंपन’ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाच्या इफ्फिमध्ये प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांचा त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते.
थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी�� तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं “फुले दाम्पत्याचे समग्र स्त्रीमुक्तीसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान झालं. विविध संघटना तसंच सेवाभावी संस्थांतर्फे शहरातल्या औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ काल प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागर��� सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
श्री क्षेत्र आळंदी इथं काल संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धअभिषेकाने सोहळ्याला सुरूवात करण्यात आली, त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. संजीवन समाधी सोहळ्याची सांगता एक डिसेंबरला संत ज्ञानेश्वरांच्या छबीना मिरवणुकीनं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यात आपेगाव या संत ज्ञानेश्वर माउलींच्या जन्मगावी देखील संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. संस्थानचे प्रमुख ज्ञानेश्वर विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.
तुळजाभवानी मंदिर आणि परिसराच्या ५८ कोटी रुपयांच्या विकास कामासाठी पुरातत्व संचालनालयाची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून, एकूण सहा टप्प्यात हे काम होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल तुळजापूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रत्येक टप्प्यामध्ये काम करताना पुजारी भाविक यांना येणाऱ्या अडचणी, सूचना प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्यात, असं त्यांनी सांगितलं.
जालना महानगरपालिका उजास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडची चौथी मागणी काल सातारा, वाशिम आणि वर्धा इथं रवाना करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत जालना महापालिकेच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या या सॅनिटरी पॅडला इतर राज्यातूनही मागणी आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी या��ाबत माहिती दिली, हे सॅनिटरी पॅड आपल्याला पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे आहेत. कमी किंमतीत आहेत. आणि अत्यंत हायजेनीक आहेत. या सर्व गोष्टीमुळे आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गुजरात, मध्यप्रदेश, डेहरादून इत्यादी ठिकाणी त्याला मार्केट उपलब्ध झालेले आहे. आतापर्यंत जवळ जवळ २५ ते ३० हजार पॅड आपण तिकडे विक्री केलेले आहे. या पॅडमुळे लोकल महिलांना रोजगार सुद्धा मिळत आहे.
राज्यात सोयाबीन खरेदीला १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातल्या १७ हमीभाव केंद्रांवर २५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळे, शेतकनी सोयाबीन विकण्याची घाई न करता खरेदी केंद्राकडेच नोंदणी करावी, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. अपर पोलीस महासंचालक, वाहतुक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं, या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील यावेळी उपस्थित होते.
केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९ पर्यवेक्षकांसह २५६ प्रगणकांच्या सहाय्याने पशुधनाची माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुपालकांनी त्यांना पशुधनाची माहिती द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ नानासाहेब कदम यांनी केलं आहे.
हवामान राज्यात पुढचे दोन दिवस सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भातल्या तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
0 notes
Text
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान - महासंवाद
मुंबई, दि. २२: महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस…
View On WordPress
0 notes
Text
भाजपच्या कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न ? , नगर जिल्ह्यातील ‘ ह्या ‘ मतदारसंघातील मविआ उमेदवाराचा आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी अखेर निवडणूक आयोगाने काल जाहीर केलेली असून राज्यात पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं होतं त्यानंतर आश्चर्यकारकरित्या मतदानाची शेवटपर्यंतची टक्केवारी ही 65.11 जाहीर करण्यात आली आहे. वाढीव मतदान हे नक्की कुणाच्या फायद्यात पडले हे उद्या निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ही 61.6%इतकी होती…
0 notes
Text
नाशिकमध्ये ६१ तर दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान!
नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांत किरकोळ वाद वगळता लोकशाहीचा मतोत्सव शांततेत पार पडला. शहरासह ग्रामीण भागात तळपत्या उन्हात मतदानासाठी मतदारांमध्ये अभूतपूर्व उत्साह दिसून आला. रात्री ११ वाजता प्राप्त माहितीनुसार, नाशिकमध्ये ६१ व दिंडोरीत ६२.६६ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. उशिरापावेतो मतदान प्रक्रिया सुरू असल्यामुळे अंतिम टक्केवारीत वाढ होण्याची…
View On WordPress
0 notes
Text
जालना लोकसभा मतदारसंघात 69.18 टक्के मतदान
69.18 percent polling in Jalna Lok Sabha constituency जालना, दि. 14 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जालना लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी उत्साहात मतदान पार पडले. एकूण 69.18 टक्के मतदान झाले. जिल्हा प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांना प्रतिसाद देत प्रशासनाच्या आवाहनाला दाद देऊन मतदारांनी उर्त्स्फूतपणे मतदान केले.सोमवार, दिनांक 13 मे 2024 रोजी जालना लोकसभा…
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-lok-sabha-the-reason-for-the-drop-in-voting-percentage-is/
0 notes
Text
गोंदिया जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान | जिपसाठी 243 व पंससाठी 388 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद
गोंदिया जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान | जिपसाठी 243 व पंससाठी 388 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद
गोंदिया, दि.22 : ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मंगळवारी (दि.२१) मतदान घेण्यात आले. यात जिल्हा परिषदेसाठी ६९.६९ टक्के मतदान झाले आहे. निवडणूक विभाग प्रसारमाध्यमांना मतदानाच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाचेही आकडेवारी देऊ शकले नाही, यावरुन प्रशासनाची संथगती आणि नियोजन व्यवस्थित नसल्याचे पुन्हा…
View On WordPress
0 notes
Text
अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविलेल्या 'घरुन मतदान' उपक्रमात नोंदणीकृत ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांचे मतदान
अंधेरी पूर्व मतदारसंघात राबविलेल्या ‘घरुन मतदान’ उपक्रमात नोंदणीकृत ज्येष्ठ मतदारांपैकी ९१ टक्के मतदारांचे मतदान
मुंबई उपनगर, दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आलेल्या ‘घरून मतदान’ या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ४३० मतदारांनी सहमती दर्शवली होती. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी घरून मतदान करून आपले लोकशाहीविषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी…
View On WordPress
0 notes
Text
Gujarat Assembly Election 2022: पहिल्या टप्प्यात सुमारे 60 टक्के मतदान
Gujarat Assembly Election 2022: पहिल्या टप्प्यात सुमारे 60 टक्के मतदान
Gujarat Assembly Election 2022: पहिल्या टप्प्यात सुमारे 60 टक्के मतदान अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी गुरूवारी सुमारे 60 टक्के मतदान झाले. त्यामुळे 89 मतदारसंघांमध्ये नशीब आजमावत असलेल्या 788 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. काही तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. मतदानाचा अवधी संपल्यानंतरही काही केंद्रांवर मतदारांच्या रांगा…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर कामकाज तहकूब
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत बैठक
विधानसभा निवडणुकीत मतदान वाढल्यासंदर्भात निवडणूक आयोगाने उत्तर देण्याची काँग्रेसची मागणी, मतदान आकडेवारीसंदर्भात आयोगाचं स्पष्टीकरण
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान
श्री क्षेत्र आळंदी इथं संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा
आणि
छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट बंधनकारक
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर एका खासगी कंपनीच्या लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला. विरोधी पक्ष देशाच्या हिताशी संबंधित नसलेले मुद्दे उचलत आहेत, असं म्हणत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घो��णाबाजी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या जागेवर परतायला सांगितलं, आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. राज्यसभेतही या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केली. मात्र, सभापती जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे कामकाज तहकूब झालं.
दरम्यान, वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वरचा अहवाल सादर करण्याची मुदत २०२५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ठेवला होता, तो सभागृहानं संमत केला.
****
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र चव्हाण यांनी आज लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
****
केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला ३० नोव्हेंबरपर्यंत अपार आयडी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातल्या ६५ लाख विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच हे आयडी द्यावेत, अशा सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने उद्या आणि परवा राज्यातल्या सर्व व्यवस्थापन आणि सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अपार दिवस साजरा करण्यात यावा, अशा सूचना सर्व संबंधितांना देण्यात आला आहेत.
****
झारखंड मुक्तीमोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी आज चौथ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. इंडिया आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते.
****
महाराष्ट्रात सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय घेण्यासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार आहे. त्यानंतर राज्यात सरकार स्थापनेसंचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
****
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान कसं वाढलं, याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रक्रियेत साडे सात टक्के इतकं मतदान वाढलं असून, मतदान प्रक्रियेतच संशय असल्याचं ते यावेळी म्हणाले. सायंकाळी साडे पाच ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदान सुरू असलेल्या केंद्रांचा व्हिडीओ आणि फोटो आयोगाने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली.
****
दरम्यान, निवडणूक आयोगानं यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. राज्यात अनेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेनंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, विशेषकरुन शहरी भागात संध्याकाळच्या वेळी मतदान करण्यासाठी गर्दी होते, २०१९ च्या निवडणुकीतही हीच परिस्थिती होती, असं आयोगानं सांगितलं आहे. राज्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ५८ पूर्णांक २२ टक्के मतदान झालं होतं, तर अंतिम मतदानाची टक्केवारी ६६ पूर्णांक शून्य पाच इतकी होती. ही सामान्य बाब असून, शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान सुरु होतं, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतीदिन. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीनं “फुले दाम्पत्याचे समग्र स्त्रीमुक्तीसाठी योगदान” या विषयावर व्याख्यान झालं. विविध संघटना तसंच सेवाभावी संस्थांतर्फे शहरातल्या औरंगपुरा परिसरातल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने फुले यांच्या जीवन कार्यावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
****
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना आज प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार छ��न भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. एक लाख रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
येत्या एक डिसेंबरला होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षार्थींना नवीन प्रवेश प्रमाणपत्र जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
****
श्री क्षेत्र आळंदी इथं आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तीभावात पार पडला. सकाळी माऊलींच्या समाधीवर दुग्धअभिषेकाने सोहळ्याला सुरूवात करण्यात आली, त्यानंतर संत नामदेव महाराजांच्या हस्ते किर्तन सेवा देण्यात आली. यावेळी मुख्य समाधी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, नामदेव महाराजांचं संजीवन समाधी सोहळ्याचं किर्तन हे कार्यक्रम झाले. संजीवन समाधी सोहळ्याची सांगता एक डिसेंबरला संत ज्ञानेश्वरांच्या छबीना मिरवणुकीनं होणार आहे.
****
जालना महानगरपालिका उजास प्रकल्पाच्या माध्यमातून महिला बचत गटांद्वारे उत्पादित केलेल्या मासिक पाळीत वापरण्यात येणाऱ्या सॅनिटरी पॅडची चौथी मागणी आज सातारा, वाशिम आणि वर्धा इथं रवाना करण्यात आली. दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय उपजिविका अभियानांतर्गत जालना महापालिकेच्या माध्यमातून उत्पादित केल्या जाणाऱ्या या सॅनिटरी पॅडला मध्यप्रदेश, गुजरात, डेहरादून, कालाहंडी, तेलंगना, चंद्रपूर या भागात मागणी असून, आजपर्यंत या गटानं ३० हजारांहून अधिक सॅनिटरी पॅड उत्पादनाचा टप्पा गाठल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाला हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. अपर पोलीस महासंचालक, वाहतुक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल असं, या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
****
केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना सुरू झाली असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४९ पर्यवेक्षकांसह २५६ प्रगणकांच्या सहाय्याने पशुधनाची माहिती गोळा करण्यात येत आहे. पशुपालकांनी त्यांना पशुधनाची माहिती द्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ नानासाहेब कदम यांनी केलं आहे.
सर्वांना कळवू इच्छितो की, दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या काळात २१वी पंचवार्षिक पशुगणना मोबाईल ॲप द्वारे करण्यात येणार आहे तरी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील असलेले पशुधनाची सर्व माहिती आपल्याकडे पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना देऊन सहकार्य करावे.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा आज समारोप झाला. डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांनी सामाजिक, राजकीय, साहित्य, औद्योगिक, सांस्कृतिक आणि इतर सर्वच क्षेत्रात केलेलं काम आज दिशादर्शक आहे, असं मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्थेमार्फत ’बालविवाह मुक्त भारत’ अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या ५० गावांमध्ये संस्थेमार्फत जनजागृती करून बालविवाह शंभर टक्के थांबवण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे बालविवाह मुक्त भारत चळवळी�� सर्वांनी सहभाग नोंदवावा, असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
****
0 notes
Text
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान - महासंवाद
मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर – ७१.७३ टक्के, अकोला – ६४.९८ टक्के, अमरावती – ६५.५७ टक्के, औरंगाबाद- ६८.८९ टक्के, बीड – ६७.७९ टक्के, भंडारा – ६९.४२ टक्के, बुलढाणा – ७०.३२ टक्के, चंद्रपूर- ७१.२७ टक्के, धुळे…
View On WordPress
0 notes
Text
नगर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात मतमोजणीच्या किती फेऱ्या ? , बारा मतदारसंघाची माहिती
नगर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात मतमोजणीच्या किती फेऱ्या ? , बारा मतदारसंघाची माहिती
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची आकडेवारी अखेर निवडणूक आयोगाने काल जाहीर केलेली असून राज्यात पाच वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झालं होतं त्यानंतर आश्चर्यकारकरित्या मतदानाची शेवटपर्यंतची टक्केवारी ही 65.11 जाहीर करण्यात आली आहे. वाढीव मतदान हे नक्की कुणाच्या फायद्यात पडले हे उद्या निकाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत एकूण मतदानाची टक्केवारी ही 61.6%इतकी होती…
0 notes
Text
जवळपास निम्म्या कुटुंबांना यंत्र दुरुस्तीचा खर्च जास्त वाटतो: सर्वेक्षण
जवळपास निम्म्या कुटुंबांना यंत्र दुरुस्तीचा खर्च जास्त वाटतो: सर्वेक्षण
मतदान केलेल्या सुमारे 38 टक्के कुटुंबांकडे लॅपटॉप आणि मोबाईल फोन यांसारख्या तीनपेक्षा जास्त गॅझेट्स आहेत ज्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे, परंतु जवळपास निम्म्या प्रतिसादकर्त्यांना दुरुस्तीचा खर्च निषेधार्ह वाटला, असे ऑनलाइन प्लॅटफॉर्म लोकलसर्कलच्या अहवालात म्हटले आहे. “एकूण आधारावर, 43 टक्के भारतीय कुटुंबांकडे तीन किंवा त्यापेक्षा जास्त-पाच वर्षांपेक्षा कमी जुनी उपकरणे आहेत जसे की लॅपटॉप आणि…
View On WordPress
0 notes
Text
जालना लोकसभा मतदारसंघात 6 वाजेपर्यंत 65.66 टक्के मतदान*
Jalna loksabha 65.66 Jalna 59.5 Badnapur 69 Bhojardan 68.66 Sillod 64 Paithan 66 Fulambri 67.6
View On WordPress
0 notes