#पंतप्रधानांचा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १३ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• युवकांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, पंतप्रधानांचा विश्वास • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काम करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन • राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात यावर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या होणार दाखल • प्रयागराज इथं शाही स्नानाने महाकुंभमेळ्याला सुरुवात आणि • छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल प्रकल्प
भारताची युवाशक्ती लवकरच विकसित राष्ट्र निर्माण करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील, याचा रोडमॅप युवक तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त विश्वास युवकांवर होता, प्रत्येक समस्येवर युवक उत्तर शोधतील, असा त्यांचा विश्वास होता. त्यावर आपलाही ठाम विश्वास असल्याचं मोदी यांनी सांगितलं. देश अनेक क्षेत्रात आपलं लक्ष्य निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले, ‘‘भारत ने हर परिवार को बँक अकाऊंटसे जोडने का लक्ष्य रखा। आज भारत का करीब करीब हर परिवार बँकिंग सेवा से जुड चुका है। भारत ने गरीब महिलाओं ��ी रसोई को धुयें से मुक्त करने का संकल्प लिया। हमनें दस करोड से अधिक गॅस कनेक्शन देकर इस संकल्प को भी सिद्ध किया। आज कितने ही सेक्टर्स मे भारत अपने लक्ष्यों को तय समय से भी पहले हासिल करके दिखा रहा है।’’
यावेळी पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केलं. या उपक्रमाद्वारे ज्या सूचना आणि कल्पना तरुण नेत्यांकडून केल्या जातील, त्या राष्ट्रीय धोरणात समाविष्ट केल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली. एक लाख नव्या तरुण लोकांना राजकारणात आणण्याचा मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला. विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या कार्यक्रमाला दहा जानेवारीपासून सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांनी देशभरातल्या जवळपास तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधला, तसंच दहा विषयांवरल्या सर्वोत्कृष्ट निबंधांच्या संकलनाचं प्रकाशन केलं.
दरम्यान, स्वामी विवेकानंद यांना काल त्यांच्या जंयतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. तसंच राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
विधानसभा निवडणुकीत राज्याला अस्थिरतेतून बाहेर काढून एक मजबूत स्थिर सरकार देण्याचं काम जनतेनं केलं, असं प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. प्रदेश भाजपाच्या शिर्डी इथं झालेल्या अधिवेशनात ते काल बोलत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं आवाहन त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना यावेळी केलं. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे, असं सांगत शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. येत्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीतही विधानसभेसारखाच विजय मिळवायचा आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना, केवळ सरकार बदलणं नाही तर समाज बदलणं हे भाजपचं उद्दिष्ट असल्याचं नमूद केलं. विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या जनतेनं शिवशाही स्थापन करण्यासाठी अभूतपूर्व यश दिलं आहे. भाजपच्या आतापर्यंतच्या इतिहासाचं हे सुवर्णशिखर असल्याचं गडकरी म्हणाले.
राज्य परिवहन महामंडळ-एस.टी.च्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून, याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी लालपरी धावताना दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते काल ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी १७ नव्या ��ाड्यांचं लोकार्पणही झालं. स्वच्छतेसह सुरक्षित प्रवासाला महत्त्व देत एकूणच परिवहन सेवेचं चित्र बदलण्याचा आराखडा बनवला जात असून टप्प्याटप्प्यानं एसटीच्या आधुनिकीकरणाला सुरुवात होईल, असं सरनाईक म्हणाले.
पुण्यात होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात यंदा प्रथमच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा अशा ग्रंथांवर चर्चा होणार असल्याची घोषणा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मराठी संस्कृती जगभरात नेण्यासाठी विश्व मराठी संमेलन आयोजित केलं जातं, मात्र या संमेलनाचा पॅटर्न बदलला असून, मराठी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी या ग्रंथांवर चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचं सामंत यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं आजपासून महाकुंभ मेळा सुरू झाला. आज पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान पार पडलं. यासाठी प्रशासनानं सर्व तयारी केली असून, भाविकांना या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षात प्रयागराज शहरात १० ठिकाणी ५५ हजार चौरस मीटरवर ६३ प्रकारची १ लाख २० हजार झाडं लावून हे जंगल विकसित करण्यात आलं आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या ४७२व्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. यानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुंटुब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह, राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव यावेळी उपस्थित होते. यानिमित्त, छत्रपती संभाजीनगर इथं दुचाकी फेरी काढण्यात आली. बीड शहरात जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादनासाठी नागिरक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी शहरात राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवा निमित्त त्यांच्या जिवनचरित्राचं सामुहिक वाचन, सामुहिक महाआरती करण्यात आली. जालना शहरात राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्वपक्षीय नागरिक जयंती उत्सव समितीच्यावतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत निघालेल्या दुचाकी फेरीमध्ये आमदार अर्��ुन खोतकर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला.
व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयातर्फे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती - राष्ट्रीय युवा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं काल उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम झाला. देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे या अंत���्गत गेल्या नऊ तारखेपासून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. संस्थेच्या उद्योजक होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये सध्या १७ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे, याच्या सकारात्मक परिणामांचा वेध घेणारा हा वृत्तांत.. ‘‘या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था, स्मार्ट क्लासरूम, सिंथेटिक टर्फ सह क्रीडांगण, आदी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी गुणवत्तेची पंचसूत्री हा प्रकल्प राबवला जात आहे. या विविध उपक्रमांमुळे मनपाच्या सिल्क मिल प्राथमिक शाळेची केंद्र शासनाने PM Shri स्कूल म्हणून तर नारेगाव आणि बनेवाडी इथल्या दोन शाळांची, राज्य शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड केली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात मनपाच्या किराडपुरा शाळेला गौरवण्यात आलं आहे.’’
खो-खो विश्वचषक स्पर्धेला आजपासून नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममध्ये सुरुवात होत आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचं हे पहिलंच वर्ष आहे. भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर तर महिला संघाचं नेतृत्व बीड जिल्ह्यातली प्रियंका इंगळे करत आहे. डीडी स्पोर्टस वाहिनीवरुन रात्री साडे आठ वाजेपासून सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.
महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडवर ११६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित ५० षटकात पाच बाद ३७० धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ सात खेळाडू गमावत २५४ धावांवर सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
धाराशिव इथल्या व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातले प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमार शामराज यांना भारत सरकारचं पेटंट मंजूर झालं आहे. जलचर प्रजाती नियंत्रण पद्धतीच्या उपकरणासाठी हे पेटंट मंजूर करण्यात आलं. या उपकरणाद्वारे मत्स्यपालानातील पाण्याची गुणवत्ता आणि प्रजातीचं आरोग्य, याचं निरीक्षण करता येतं.
चालकानं प्रसंगावधान राखल्यानं अंबाजोगाई तालुक्यात काल बस अपघाताचा मोठा अनर्थ टळला. तालुक्यातल्या पठाण मांडवा घाटात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. बस चालक पारजी उबाळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत बस घाटाच्या कठड्यावर आदळवली. यात ती घाटातल्या झाडांना अडकून अपघात टळला.
0 notes
Text
कॅनडाच्या पंतप्रधानांचा निज्जर हत्या प्रकरणी नवीन दावा, म्हणाले...
https://bharatlive.news/?p=146654 कॅनडाच्या पंतप्रधानांचा निज्जर हत्या प्रकरणी नवीन दावा, ...
0 notes
Text
"ज्यांनी भारताला लुटले ते पैसे देतील": भ्रष्टाचारावर पंतप्रधानांचा इशारा
“ज्यांनी भारताला लुटले ते पैसे देतील”: भ्रष्टाचारावर पंतप्रधानांचा इशारा
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर टीका करत म्हटले आहे की, भारत ज्या दुहेरी दुष्प्रवृत्तींना तोंड देत आहे आणि त्यावर मात करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. 76 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना ते म्हणाले की, घराणेशाही देशाच्या संस्थांना पोकळ करत आहे आणि अनेक प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरत आहे. “भ्रष्टाचार देशाचे दीमक…
View On WordPress
0 notes
Text
ब्रिटनच्या पंतप्रधानांचा इशारा, युक्रेनमध्ये युद्ध झाले तर दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्त विनाश होईल, रशियाला रक्तपात टाळण्याचा सल्ला
ब्रिटनच्या पंतप्रधानांचा इशारा, युक्रेनमध्ये युद्ध झाले तर दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्त विनाश होईल, रशियाला रक्तपात टाळण्याचा सल्ला
View On WordPress
0 notes
Text
मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही : देवंद्र फडणवीस
मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही : देवंद्र फडणवीस
पंतप्रधानांसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यावरुन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंजाबमधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. असा आरोप फडणवीसांनी केला. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती, असाही दावा त्यांनी केलाय. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा २०…
View On WordPress
0 notes
Text
पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण
पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ कॉरिडोरचं आज लोकार्पण
२५०० मजुरांसोबत भोजनही करणार नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपल्या ड्रीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदीने स्वत: फेसबुक वर काशी विश्वनाथ धामचे फोटो शेअर केली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सह नवीन चेहरे वाराणसी पोहचणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी काशी विश्वनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. काशी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 23 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २३ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
गेल्या दीड वर्षात देशातल्या युवकांची दहा लाख सरकारी नोकर्यांमध्ये नियुक्ती झाल्याचं पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सांगितलं आहे. रोजगार मेळाव्याअंतर्गत शासकीय कार्यालयं आणि विभागांमध्ये निवड झालेल्या ७१ हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान केली, त्यावेळी ते बोलत होते. रोजगार मेळाव्यांमुळे युवकांचं सक्षमीकरण होत असून, त्यांची क्षमता आणि कौशल्याचा उपयोग करुन घेणं, ही सरकारची प्राथमिकता असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. सरकारच्या नवनवीन योजना आणि धोरणांमुळे ग्रामीण भागात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार मिळाला आणि त्यांना त्यांच्या आवडीचं काम करण्याची संधी मिळाली, असं पंतप्रधान म्हणाले. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, डिजिटल इंडिया यासारख्या युवा केंद्रीय योजनांचा त्यांनी उल्लेख केला. केंद्र सरकारनं विधानसभा आणि लोकसभेत महिलांसाठी आरक्षण लागू केलं, आज आपला देश महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे सातत्यानं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राज्यात नागपूर आणि पुणे इथं रोजगार मेळावा घेण्यात आला. नागपूर इथं आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २५७ जणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली. शासकीय नोकऱ्यांमध्ये नवनियुक्तांनी आपल्या अंगभूत तसंच व्यक्तिगत कौशल्याचा विकास करून केवळ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे व्हावं, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेल्या रोजगार मेळाव्यात ५०० जणांना नियुक्तीपत्रं प्रदान करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत नाताळ उत्सवात सहभागी होणार आहेत. भारतीय कॅथोलिक बिशप्स परिषदेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ख्रिस्ती समाजाचे प्रमुख नेते, चर्चचे कार्डिनल्स आणि बिशप्स यांच्याशी ते चर्चा करतील. कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयातला पंतप्रधानांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती आज राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरी होत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्लीत किसान घाट या चौधरी चरण सिंग यांच्या समाधीवर आदरांजली अर्पण केली. राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशा��्या अन्नसुरक्षा आणि समृद्धीमध्ये शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. खाद्य सुरक्षा सुनिश्चित करणं, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करणं आणि देशाच्या कृषी वारश्याच्या संरक्षणात शेतकऱ्यांच्या अमूल्य भूमिकेचं स्मरण यानिमित्त केलं जातं.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर असून, राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रामांमध्ये ते सहभागी होणार आहेत. यावेळी जवळपास १३ लाख ३० हजार घरांचं हस्तांतरण त्यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, पुण्यातल्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषी आर्थिक संशोधन केंद्राचा ७० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत पार पडला.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त, उद्या २४ डिसेंबरला ग्राहक व्यवहार विभाग, जागो ग्राहक ॲप, जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ट लॉन्च करणार आहे. या ॲपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात कारवाई करणं केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधीकरणाला शक्य होणार आहे. जागो ग्राहक ॲपमुळे ग्राहकांना URLची माहिती मिळणं शक्य होईल, तसंच यातून काही धोका असल्यास ग्राहकाला सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. जागृती ऍपमुळे ग्राहकांना URL ची तक्रार करता येणार आहे.
अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी इथल्या मैत्री संघ महिला शेतकरी गटातल्या निमंत्रक आणि सदस्यांनी विद्रूपा नदीच्या पात्रामध्ये वनराई बंधारा तयार केला आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीनं कान्हेरी सरप इथं सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत या गटानं सहभागी होत ही कामगिरी केली. कान्हेरी सरप हे गाव बार्शीटाकळी तालुक्यातलं लोकसंख्येने मोठं गाव असून, गावाच्या शिवारात नदी खोल��करण, शेततळे, बांध बंदिस्ती केल्यानं गावच्या शिवारातल्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पुण्यात वाघोली इथं भरधाव डंपरनं चिरडल्यामुळे फुटपाथवर झोपलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळानं २०२५ च्या आयसीसी चँपियन्स करंडक स्पर्धेतल्या भारताच्या सामन्यांसाठी, तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब आमिरात या देशाची निवड केली आहे. सुरक्षाविषयक कारणांमुळे भारतानं पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्ताननं हा निर्णय जाही�� केला. त्यामुळे भारताचे सर्व सामने आता संयुक्त अरब आमिरातीमध्ये खेळले जाणार आहेत.
0 notes
Text
पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख वैयक्तिक द्वेशातून; मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
https://bharatlive.news/?p=92178 पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख वैयक्तिक द्वेशातून; मुख्यमंत्री शिंदेंचे ...
0 notes
Text
ट्विटरद्वारे लाल ध्वजांकित कॅमेराकडे पाहत असलेल्या पंतप्रधानांचा AAP नेत्याचा क्रॉप केलेला व्हिडिओ
ट्विटरद्वारे लाल ध्वजांकित कॅमेराकडे पाहत असलेल्या पंतप्रधानांचा AAP नेत्याचा क्रॉप केलेला व्हिडिओ
पीएम मोदी राष्ट्रपतींचे अभिवादन परत करताना दाखवणारे मूळ व्हिडिओमधील स्क्रीनग्राब नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅमेऱ्यांकडे पाहत आहेत तर राष्ट्रपती राम नाथ कोविंद त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत असे सुचवणारा आम आदमी पक्षाच्या नेत्याने ट्विट केलेला व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचे ट्विटरने म्हटले आहे. AAP नेते संजय सिंह यांची पोस्ट ट्विटरद्वारे “संदर्भाबाहेर सादर” म्हणून चिन्हांकित केली गेली…
View On WordPress
0 notes
Photo
पंतप्रधानांच्या अहंकारानं जवानांना शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं : राहुल गांधी सरकारची कारवाई ही पंतप्रधानांचा अहंकार | #FarmerProtest #RahulGandhi #NarendraModi http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/rahul-gandhi-shares-viral-photo-of-farmers-protest-says-this-is-very-dangerous/?feed_id=26672&_unique_id=5fc2307455262
0 notes
Photo
पंतप्रधानांचा महामारीविरोधात महासंकल्प रविवारी रात्री ९ वाजता, ९ मिनिटे प्रकाशमान होवूयात मुंबई : कोरोना महामारीविरोधातील लढाईत ५ एप्रिलला रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यात किंवा बाल्कनीत उभे राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू ठेवावी.
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, नायजेरियाची राजधानी अबुजा इथं काल ते पोहोचले असून सतरा वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच नायजेरिया दौरा आहे तर गयानाला १९६८ नंतर भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. ब्राझीलमध्ये रियो दे जानेरो इथं उद्या १८ तारखेला जी-२० शिखर बैठकीत पंतप्रधान उपस्थित राहतील. या दौऱ्यामुळं या देशांसोबत लोकशाही आणि वचनबद्धतेवर आधारित सामरीक भागीदारीचं नवं द्वार उघडेल, असा विश्वास त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान या देशांसोबत विविध क्षेत्रातील अनेक करार देखील अपेक्षित आहेत.
दरम्यान, नायजेरियामध्ये स्थित मराठी भाषिक आपली संस्कृती आणि भारताशी संलग्न राहत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. नाय��ेरियातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पुण्यातून जळगावला जाणाऱ्या वाहनातून पाच कोटी ५९ लाख ६१ हजार रुपयांचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. परवा रात्री उशिरा जळगाव शहरातल्या रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. जवळपास चार किलो सोनं आणि ३४ किलो चांदी जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, परवा दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार इथं भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची काल प्रचार सभा सुरू असताना गोंधळ झाला, त्यामुळं एक गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी झाली. दर्यापूर मतदार संघात शिवसेनेकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ हे उमेदवार असून त्यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदेले यांच्यात लढत होत आहे, या ठिकाणी महायुतीमध्ये दोन गट आहेत. काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गोंधळ झाला, यानंतर नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेतील किसान चौकातकाल प्रचार सभा झाली.
आजच्या दोन वर्षानंतर इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धनामध्ये अनेक कामं केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव इथं सोनाजी महाराज संस्थानमध्ये अकरा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री विठ्ठलाच्या उत्सवाची काल मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. भालेगाव इथं संत श्री नरहरी महाराजांनी सुरु केलेल्या या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा असून प्रती पंढरपूर म्हणून भालेगावच्या या विठ्ठलाची ओळख जिल्हाभरात आहे.
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घरातील लग्न झालेली मुलगी हजेरी लावते तसंच खामगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी होतात.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २४० गुन्ह्याची नोंद करून २२६ संशयीतांना अटक करण्यात आली. तर १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात ४७ गुन्हे नोंदवून ३९ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
ब��ड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक सामाजिक प्रसार माध्यामावर प्रसारित झाली आहे. याबद्दीलची तक्रारी काही उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतल्या गणेश शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याने त्याला निर्गमित करण्यात आलेल्या या टपाली मतपत्रिकेचं छायाचित्र मत नोंदवल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीमधून प्रसार माध्यमांवर टाकलं. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितलं आहे.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्य ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
Text
‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’, दिल्लीत जागोजागी होर्डिंग्ज
‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिचिंग’, दिल्लीत जागोजागी होर्डिंग्ज
भाजपाचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा यांनी हे होर्डिंग्ज लावले असून यापूर्वीच माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल
from LoksattaLoksatta https://ift.tt/2PbRrQy
View On WordPress
0 notes
Text
महागाईचा हटके स्टाईलने निषेध; सिलेंडरवर पंतप्रधानांचा हसणारा फोटो लावून विरोध; video व्हायरल
महागाईचा हटके स्टाईलने निषेध; सिलेंडरवर पंतप्रधानांचा हसणारा फोटो लावून विरोध; video व्हायरल
महागाईचा हटके स्टाईलने निषेध; सिलेंडरवर पंतप्रधानांचा हसणारा फोटो लावून विरोध; video व्हायरल नवी दिल्ली : सध्या देशभरात महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच सिलेंडरच्या किमतीने हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. याचाच विरोध दर्शवण्यासाठी विरोधी पक्षांकडून नामी शक्कल लढवली आहे. तेलंगणामध्ये टीआरएसकडून पंतप्रधान मोदी यांचे हसतानाचे फोटो सिलेंडरवर लावले…
View On WordPress
#Video#आताची बातमी#ट्रेंडिंग बातमी#निषेध#न्यूज अपडेट मराठी#पंतप्रधानांचा#फोटो#फ्रेश बातमी#बातम्या#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महागाईचा#महाराष्ट्राची बातमी#रेगुलर अपडेट#लावून#वायरल बातमी#विरोध#व्हायरल#सिलेंडरवर#स्टाईलने#हटके#हसणारा
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मराठी भाषेमुळे देशाचं सांस्कृतिक वैविध्य अधिक समृद्ध होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन, ठाणे तसंच वाशिम इथं विविध विकास कामांचं लोकार्पण
संविधान रक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा काढण्याचं खासदार राहुल गांधी यांचं आश्वासन
छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा
एनआयए तसंच एटीएसची छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात कारवाई-तीन जण ताब्यात
मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू
आणि
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान सामना, त�� भारत - बांगलादेश पुरुष संघांमध्ये आज पहिला टी ट्वेंटी सामना
****
मराठी भाषेमुळे देशाचं सांस्कृतिक वैविध्य अधिक समृद्ध होत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल काल मुंबईत राज्य सरकारच्या वतीनं पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पैठणीचा शेला, मराठी भाषेचं बोधचिन्ह, संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा आणि कवीवर्य कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना, मराठी भाषेला हा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या साडे तीनशेव्या वर्षात संपूर्ण देशाने केलेला मानाचा मुजरा असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
मराठी भाषेला हा दर्जा संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राज्यभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षात केलेला मानाचा मुजरा आहे. मराठी भाषा का इतिहास बहोत समृद्ध रहा है। इस भाषा से ज्ञान की जो धारायें निकली उन्होंने कई पिढीयों का मार्गदर्शन किया है। और वो आज भी हमें रास्ता दिखाती है।
मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्यानंतर या भाषेत संशोधन आणि शिक्षणाचं प्रमाण वाढेल, असं सांगत, जगभरात मराठी भाषा पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, काल ठाणे इथं, ठाणे आणि मुंबईतल्या ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली, यामध्ये मुंबई मेट्रोच्या आरे ते वांद्रे कुर्ला संकुल या भूमिगत मेट्रो टप्प्याचं उद्घाटन, ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी, तसंच नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र विकासासाठी नैना प्रकल्पाच्या पायाभरणीचा समावेश आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं विविध विकास कामांचं उद्घाटन तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीवरंजन सिंह, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी, देशाचं आर्थिक पातळीवर नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात असीम क्षमता असून, सर्वांनी एकत्र येऊन विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
साथीयों हमारे महाराष्ट्र मे देश के आर्थिक प्रगती का नेतृत्व करने की असीम क्षमता है। ये तभी होगा जब गांव, गरीब, किसान, मजदूर, दलित, वंचित सबको आगे बढाने का अभियान मजबुती से चलता रहेगा। मुझे विश्वास है, आप सब अपना आशीर्वाद बनाये रखेंगे। हम सब साथ मिलकर विकसित महाराष्ट्र, विकसित भारत के सपने को पुरा करेंगे।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १८ व्या, आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ५ व्या हप्त्याचं वितरण मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत १ हजार ९२० कोटी रुपयांचे साडे सात हजाराहून अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांना पंतप्रधानांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.
शेतीला दिवसा वीज पुरवठा करणासाठी १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, बुलडाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे सौर प्रकल्प आहेत. हे प्रकल्प उभारायला मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना २० कोटी ५५ लाख रुपये विकासनिधी त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोहरादेवी इथल्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या चार मजली संग्रहालयात बंजारा समाजाची माहिती देणारी १३ प्रदर्शनं आहेत. जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजांचं दर्शन घेऊन, पंतप्रधानांनी बंजारा समाजातल्या मान्यवरांची भेट घेतली.
****
संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल, असं मत, लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काल कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते. आरक्षणाची ही मर्यादा इंडिया आघाडी हटवेल आणि संसदेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयानं समन्स बजावलं आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ला��ार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा, आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शहरातल्या खडकेश्वर परिसरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी दीड वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांनी हजर राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लार्भार्थीचा सन्मान मेळावा आणि त्याच बरोबर शासकीय योजनेचा सुभारंभ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. जिल्हाभरातील सर्व महिला भगिनीला विनम्र आहवान आहे की आपण या कार्यक्रमला उपस्थिती लावावी”
दरम्यान, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या ८०० लाभार्थी भाविकांचा पहिला जत्था आज रेल्वेने अयोध्येला रवाना होणार आहे. याच योजनेअंतर्गत नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन पहिली रेल्वे येत्या १२ ऑक्टोबरला अयोध्येसाठी निघणार आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं काल छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव इथं छापे टाकून चौघांना ताब्यात घेतलं. दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यातल्या सहभागाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा भागातून एक आणि एन-6 परिसरातून एक अशा दोन जणांना तर जालना इथल्या चमडा बाजार भागातून एका तरुणाला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
****
मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यातून काल मोसमी पाऊस परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उर्वरीत महाराष्ट्रातूनही पुढच्या आठवड्यात मोसमी पाऊस पूर्णपणे परतून जाईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
श्रीक्षेत्र माहूर इथल्या स्कायवॉक आणि लिफ्टच्या कामाला गती देण्यात आली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे. या कामासाठी ५१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मंदिर परिसरातील रस्ते तसंच इतर सुविधांचाही विकास केला जात असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
****
नवरात्रादरम्यान तुळजापूर इथं येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून तीन ठिकाणी आरोग्य शिबीरं भरवण्यात आली आहेत. येत्या १८ तारखेपर्यंत ही शिबीरं चालणार आहेत. शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर १९ आरोग्य पथकं तैनात करण्यात आली असून, १३ रुग्णवाहिका तसंच आरोग्य दूतांची १५ पथकं तैनात ��हेत.
****
संयुक्त अरब अमिराती इथं सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया - श्रीलंका, तसंच इंग्लंड - बांग्लादेश यांच्यात सामने झाले.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश पुरुष संघांमध्ये तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं खेळवला जाणारा हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल.
****
कृष्णा खोऱ्यातून धाराशिव जिल्ह्याला मिळणारं हक्काचं सात टीएमसी पाणी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात येईल , अशी माहिती, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातल्या सिंदफळ इथं पंपग्रह पाहणी दरम्यान ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याची सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी केली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगामी तीन महिन्यात ही तपासणी पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या ११८ शाळांमधल्या क्रीडांगण विकासासाठी ‘खेलो लातूर’ उपक्रम राबवला जात आहे. औसा तालुक्यात चलबुर्गा इथल्या मैदानाचं उद्घाटन नुकतंच मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 27 September 2024
Time - 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक - २७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा रविवारी २९ सप्टेंबरला पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजनही यावेळी होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. मुसळधार पावसामुळे पंतप्रधानांचा कालचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता.
दरम्यान, पंतप्रधान मोदी परवा रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा अंतर्गत आतापर्यंत नऊ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली. पौष्टिक आहाराबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणारे उपक्रमही राबवल्याची मंत्रालयानं दिली आहे.
****
देशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत ऐंशी कोटीं रोपांची लागवड करण्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं आहे. ३० सप्टेंबर या अंतिम मुदतीच्या आधी हे लक्ष्य गाठले असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं. यात उत्तर प्रदेश सरकारने सर्वाधिक २६ कोटी रोपांची लागवड केली आहे.
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा केला जात आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातल्या पिढ्यांसाठी अधिक शाश्वत आणि न्याय्य पर्यटन उद्योगाला चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. पर्यटन मंत्रालयातर्फे आज नवी दिल्ली विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे प्रदर्शन सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
देशात कापसाच्या उत्पादनात पुढच्या वर्षी किमान एक हजार किलो प्रति हेक्टरने वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या देशातल्या कापसाचं उप्पादन साडेचारशे किलो प्रति हेक्टर असून, ते अमेरिका, रशिया, चीन, ब्राझील या देशात होणाऱ्या दोन हजार ते दोन हजार दोनशे किलो प्रति हेक्टर उत्पादनापेक्षा कमी असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं ‘महाविजय संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या युवा सेना, महिला आघाडी आणि शिवसेना सोशल मीडिया या तीन विभागांकडून राज्यभरात हे अभियान राबवलं जाणार आहे.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील यांचं आज धुळे इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. पाटबंधारे आणि अन्य खात्याचं मंत्रिपद भूषवलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अक्कलपाडा आणि अन्य प्रकल्प पूर्णत्वास नेले. काँग्रेस पक्षातही अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत आज परभणी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. या पथनाट्यातून ओला कचरा सुखा कचरा विलागिकरण, आपला कचरा आपली जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी महानगरपालिकेच्यावतीनं विविध माहिती फलक लावण्यात आले होते.
****
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात राज्यातल्या सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातल्या उदयनगर बांग्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. येत्या रविवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित कार्यक्रमात शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथ��्या सरस्वती भूवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे उद्या २८ तारखेला सुरमणी पंडित उत्तमराव अग्निहोत्री स्मृति संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आलं आहे. या समारोहात सुप्रसिद्ध संवादिनी वादक आणि पंडित उत्तमराव अग्निहोत्री यांचे नातू ओंकार अग्निहोत्री यांचं सादरीकरण होणार आहे.
****
भारत आणि बांग्लादेशदरम्यान दुसरा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना आजपासून कानपूर इथं सुरु झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. उपाहारापर्यंत बांग्लादेशच्या दोन बाद ७४ धावा झाल्या होत्या.
****
0 notes