#लावून
Explore tagged Tumblr posts
Text
Devoleena Bhattacharjee: 'गोपी बहू'ने केले लग्न! सिंदूर, मंगळसूत्र लावून शेअर केला फोटो
Devoleena Bhattacharjee: ‘गोपी बहू’ने केले लग्न! सिंदूर, मंगळसूत्र लावून शेअर केला फोटो
Devoleena Bhattacharjee: ‘गोपी बहू’ने केले लग्न! सिंदूर, मंगळसूत्र लावून शेअर केला फोटो Devoleena Bhattacharjee: देवोलीना भट्टाचार्जीने कोणाशी लग्न केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Devoleena Bhattacharjee: देवोलीना भट्टाचार्जीने कोणाशी लग्न केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. Go to Source
View On WordPress
#&8216;गोपी#bhattacharjee:#devoleena#केला#केले#फोटो#बहू&8217;ने#मंगळसूत्र#मनोरंजन#लग्न#लावून#शेअर#सिंदूर
0 notes
Text
करंट लावून शिकार करण्याचा प्रयत्न | तिघांना अटक, एक पसार
चामोर्शी : चामोर्शी वनपरिक्षेत्राअंतर्गत अड्याळ-१ नियतक्षेत्रात ९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अवैधरित्या करंट लावून वन्यप्राण्याची शिकार करण्याचा प्रयत्न करणार्या ३ आरोपींना चामोर्शी वनपरिक्षेत्राच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. अरूण किर्तीमंतराव मडावी, संतोष संन्याशी कुळमेथे दोघे रा. प्रियदर्शनी, जागेश्वर देवराव घोडाम रा. रश्मीपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अन्य एक पसार…
View On WordPress
0 notes
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुव��्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली ��कटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पुतणी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन ��ाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ ख��ली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे ��ेण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील आई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवत��.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुकसान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घाल��्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य क��लकर्णी
2 notes
·
View notes
Text
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं... समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय��ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes
·
View notes
Text
नमस्कार मी अभिषेक बाळासाहेब कळमकर , आश���वासन नव्हे तर वचन देतो की..
नमस्कार मी अभिषेक बाळासाहेब कळमकर.. महाविकास आघाडीकडून तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत आहे. माझा अनुक्रमांक एक असून मी आपल्याला नगरच्या विकासासाठी मला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. नगर शहरातील आजची परिस्थिती पाहिली तर शहरातील तरुण वर्ग सकाळी स्वतःची दुचाकी लावून त्यानंतर सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करतो तो फक्त दोन वेळ पोटाची खळगी भरण्यासाठी. रोजगाराच्या संधी नगरकरांपासून हिरावल्या…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.11.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 November 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
· केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
· छत्रपती संभाजीनगर इथल्या मद्यनिर्मिती कारखान्यात चार कामगारांचा अपघाती मृत्यू
आणि
· दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात १३५ धावांनी दणदणीत पराभव करत भारताचा मालिकाविजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काल हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काश्मीरमधून हटवलेल्या कलम ३७० च्या मुद्यावरून काँग्रेस पक्षावर तर हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. काल नांदेड इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. दरम्यान, कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबं��ित अधिनियमांनुसार कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागाला दिले आहेत.
दरम्यान, परभणी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल सभा घेतली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहतील, तसंच सोयाबीनला सात हजार रूपये भाव मिळेल अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी आज राज्यात प्रचार सभा घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या आज चिमूर आणि धामणगाव रेल्वे इथं प्रचार सभा होणार असून, प्रियंका गांधी आज शिर्डी आणि कोल्हापुरात, तसंच उद्या गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रचारसभा घेतील, असं चेन्नी��ला यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं हॉट एअर बलून राईडच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त तथा जिल्ह��� स्वीप नोडल अधिकारी अंकुश पांढरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
Byte...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे...
Byte...
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत काल दुपारी एका मद्यनिर्मिती कारखान्यात मका साठवण टाकी फुटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. रॅडिको डिस्टलरी नावाच्या कारखान्यात ही दुर्घटना झाली. मका साठवण्याची टाकी खालून फुटल्याने या टाकीला वेल्डिंग करत असतांना, टाकी कोसळल्याने कैक क्वींटल मका तसंच टाकीचे पत्रे, काम करत अस मजुरांच्या अंगावर पडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल जोहान्सबर्ग इथं झालेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं यजमान संघाचा १३५ धावांनी दणदणीत पराभव करत, चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत एक बाद २८३ धावा केल्या. तिलक वर्माने ४७ चेंडूत १२० धावा केल्या, तर संजू सॅमसनने ५६ चेंडूत १०५ धावा केल्या. अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले. विजयासाठी २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १८ षटक दोन चेंडूत १४८ धावांवर संपुष्टात आला. नाबाद १२० धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
��ोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे. या चित्रपटाच्या नावातूनच शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा संबंध असल्याचं जाणवतं, या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, आदी कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती काल सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी झाली. गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
****
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही काल साजरी झाली. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा झाला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कपिलधार इथं दोन दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरूवात झाली. संत मन्मथस्वामी यांच्या समाधी स्थळी दर्शनासाठी विविध ठिकाणांहून दिंड्यांचे आगमन झालं असून भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं गुरुवारी रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे,असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरु आहे. लातूर शहर मतदारसं��ात ३६८ मतदारांपैकी ���४९ जणांनी काल गृहमतदान केलं. यामध्ये १०० वर्षांवरील १० मतदारांचा समावेश आहे. उदगीर मतदारसंघात जवळपास ६२६ मतदारांनी या ��ुविधेअंतर्गत आपला मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये करडखेल इथल्या वयाची १०५ वर्षे पूर्ण केलेल्या मतदार जिजाबाई किसन कसबे यांचाही समावेश आहे.
****
0 notes
Text
. 🍁 *ज्ञान गंगा* 🍁 .
➖ *विवाहातील प्रचलित वर्तमान परंपरांचा त्याग :-* ➖
विवाहात व्यर्थ खर्च बंद करावा लागेल. उदाहरणार्थ मुलीच्या विवाहात मोठी वरात घेऊन येणे, हुंडा देणे, ह्या व्यर्थ परंपरा आहेत. ज्यामुळे मुलगी ही कुटुंबावरील भार समजली जाते आणि तिला गर्भातच खुडण्याचे उद्योग सुरु आहेत. माता-पित्यांसाठी तर हे महापाप आहे. मुलगी देवीचे स्वरूप आहे. आमच्या विकृत परम्परानी मुलीला शत्रू बनविले आहे. श्री देवीपुराणाच्या तीसर्याे स्कंदात याचे प्रमाण आहे कीह्या ब्रह्माण्डाच्या प्रारम्भी तिन्ही देवतांचा (म्हणजेच श्री ब्रह्मदेवजी, श्री विष्णुजी आणि श्री शिवजी) यांचा त्यांची श्री दुर्गादेवीजींनी विवाह केला त्यावेळी कोणी वरात काढली नव्हती किंवा भोजनावळ सुद्धा घातल्या नव्हत्या. ना नाचगाणी होती किंवा बँडबाजा होता. श्री दुर्गादेवीने आपल्या ज्येष्ठ पुत्रास श्री ब्रह्मदेवाला म्हटले की हे ब्रह्मा! ही सावित्री नामक मुलगी तुला पत्नीच्या रूपात देत आहोत. हिला घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाट. त्याचप्रमाणे आपल्या मधल्या पुत्राला म्हणजेच श्री विष्णु यांना लक्ष्मीजी आणि कनिष्ठ पुत्र श्री शंकरजींना पार्वतीजी देऊन सांगितले, ह्या तुमच्या पत्नी आहेत. ह्यांना घेऊन जा आणि आपले घर प्रपंच थाटा. तिघेही आपल्या पत्नी बरोबर घेऊन आपल्या लोकात गेले आणि मग जगाचा विस्तार झाला.
*शंका समाधान* :- काही व्यक्ति असे म्हणतात की पार्वतीजीचा मृत्यु झाला. त्या देवीचा पुनर्जन्म राजा दक्षाच्या घरात झाला होता. यौवनात पदार्पण केल्यावर देवी सतीजींनी (पार्वती) ना��दाने सांगितल्यानंतर श्री शंकरांना पति म्हणून स्वीकारण्याचा दृढ़ संकल्प करून आपल्या मातेकरवी आपली इच्छा पिता दक्ष याला सांगितली. तेव्हा राजा दक्ष यांनी म्हटले की हे शंकरजी माझे जावई बनण्यायोग्य नाहीत कारण ते नागडे राहतात. एकाच मृगजीन बांधून राहतात आणि शरीरावर राख फासून भांगेच्या नशेत असतात. सर्पांना सोबत ठेवतात. अशा व्यक्तिशी माझ्या मुलीचा विवाह करून जगात मी आपले हसू नाही करून घेणार. परंतु देवी पार्वती सुद्धा जिद्दीला पक्कया होत्या. त्यांनी स्वतःची इच्छा श्रीशंकरजींना कळवली आणि त्यांना सांगितले मी आपल्याशी विवाह करू इच्छीत आहे. राजा दक्षाने पार्वतीजीचा विवाह अन्य कोणासोबत ठरविला होता. त्याच दिवशी श्री शंकरजी आपल्या हजारोंच्या सँख्येतील भूत-प्रेत, भैरव आणि आपल्या गणां सह विवाह मंडपात पोहोचले. राजा दक्षाच्या सैनिकांनी विरोध केला. शंकारांची सेना आणि दक्षाच्या सेनेत युद्ध झाले. पार्वतीजींनी शंकरजींना वरमाला घातली. श्री शंकरजी पार्वतीजींना बलपूर्वक कैलाश पर्वतावर आपल्या घरी घेऊन गेले. काही व्यक्ति असे म्हणतात की बघा! श्री शंकरजी सुद्धा भव्य अशी वरात घेऊन पार्वतीशी विवाह करण्यास आले होते. त्यामुळे वरातीची परंपरा पुरातन आहे. त्यामुळे वरातीशिवाय विवाहात शोभा येत नाही. त्याचे उत्तर असे आहे की हा विवाह नव्हता तर प्रेम प्रसंग होता. पार्वतीजींना बलपूर्वक इचलून घेऊन जाण्यासाठी श्री शंकरजी वरात नाही तर सेना घेऊन आले होते. विवाहाची पुरातन परम्परा श्री देवी महापुराणाच्या तीसर्यार स्कंदात आहे व ती वर सांगितली आहे. मुले आणि मुलींनी आपल्या माता-पित्याच्या इच्छेनुसार विवाह केला पाहिजे. प्रेम विवाह हे महाक्लेशाचे कारण होऊ शकते. पुढे भगवान शंकरजी आणि पार्वतीजी यांच्यामध्ये काही गोष्टींवरून तंटा झाला. शंकरजींनी पार्वतीजीशी पत्नीचे नाते समाप्त केले व बोलाचाली सुद्धा बंद केली. पार्वतीजींनी विचार केला आता हे घर माझ्यासाठी एक नरकच बनले आहे.त्यामुळे काही दिवस मी आईकडे जाऊन राहते. पार्वतीजी आपल्या पिता दक्षाच्या घरी माहेरी गेल्या. त्या दिवशी राजा दक्ष यांनी एका हवन यज्ञाचे आयोजन केले होते. राजा दक्षाने आपल्या मुलीला सन्मानाने न वागवता म्हटले की आज काय घ्यायला आली आहेस? बघितलेस त्याचे प्रेम, निघून जा माझ्या घरातून. पार्वतीजींनी आपल्या आईस श्री शंकरजी नाराज झाल्याची गोष्ट सांगितली. मातेने आपल्या पतिला सगळे सांगितले होते. पार्वतीजींना ना माहेरी काही स्थान होते ना सासरी. प्रेमविवाहाने अशी गंभीर परिस्थिति उत्पन्न निर्माण केली की दक्ष पुत्रीला आत्महत्या करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही आणि राजा दक्षाच्या ��िशाल हवनकुण्डात जाळून मृत्यू पावल्या. धार्मिक अनुष्ठानाचा नाश केला. आपले अमोल मानवी जीवन गमावून बसल्या. पित्याचाही नाश करवला कारण जेव्हा श्री शंकरजींना हे सर्व माहिती झाल्यावर ��े आपली सेना घेऊन तिथे गेले आणि आपले सासरे दक्षजीचे मुंडके छाटून टाकली. नंतर बकर्याऊचे मुंडके लावून जीवित केले. त्या प्रेम विवाहाने कसे घमासान केले. श्री शंकरांच्या सैन्याला वरात असल्याची बतावणी सांगून ह्या कुप्रथेला जन्म दिला आहे. आणि हा प्रसंग प्रेमविवाह रूपी कुप्रथेचा जनक आहे आणि हे समाजाच्या विनाशाचे कारण बनले आहे.
जे विवाह सुप्रथेनुसार झाले, ते आजपर्यंत सुखी जीवन जगत आहेत. जसे श्री ब्रह्मदेवजी आणि श्री विष्णुजी.
*विवाह करण्याचा उद्देश* :- संततीची उत्पाती हाच विवाहाचा उद्देश आहे. मग पति-पत्नी मिळून परिश्रम करून मुलांचे पालन करतात. त्यांचा विवाह करून देतात. मग ते आपले घर थाटतात. त्याशिवाय प्रेमविवाह हे समाजात अशांतिचे बीज पेरत आहेत. समाज बिघडवणारे हे अस्तनीतले निखारे आहेत.
0 notes
Text
श्रद्धांजली टाटांना
झाला अस्त सूर्याचाअखंड ज्योत लावून ।प्रगतीचे ध्येय त्याचेदेश निघाला न्हाऊन ।आपलेसे केले जगालामदतीला जाई धाऊन ।लक्षावधिंचा तो रतनगेला साधेपणात राहून ।करून टाटा तुम्ही गेलेतआठवणीच आता ठेवून ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
Disturbing Incident in Bhayandar: Man Caught Spying on Girls Bathing; MNS Women’s Brigade Takes Immediate Action
भाईंदर मध्ये एक आंबट शौकीन पहाटे ४ वाजता लहान मुलींना आंघोळ करताना बाथरूमच्या खिडकीतून पहायचा. त्यांच्या आईने कॅमेरा लावून फुटेज पाहिले तर ते खरेच होते. सदर प्रकार दोन दिवस घडत होता. त्यांनंतर त्या आईने मनसे कडे तक्रार केली. मग काय मनसे च्या महिला ब्रिगेडने चोपून काढले 👊👊 pic.twitter.com/IYboBrdHmv — MNS Videos (@mnsvideos) October 2, 2024 Concerned for the safety of the children, the mother…
0 notes
Text
बायको : मॉलमध्ये तुम्ही स���ंदर साडी नेसलेल्या त्या बाईकडे
टक लावून का बघत होतात?
Pradip – मी विचार करत होतो.
जर हीच साडी तू नेसली असतीस,
तर तू किती सुंदर दिसली असतीस.
😂😂😂😌😌😌😃😃😃🤨🤨🤨
0 notes
Text
Sara Ali Khan : मास्क लावून सारा अली खानने केली मुंबई ट्रेनची सफर
Sara Ali Khan : मास्क लावून सारा अली खानने केली मुंबई ट्रेनची सफर
Sara Ali Khan : मास्क लावून सारा अली खानने केली मुंबई ट्रेनची सफर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आहे. या चर्चा साराचा मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रंगल्या आहेत. साराने वेळ वाचवण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आहे. या चर्चा साराचा मुंबई…
View On WordPress
0 notes
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते.
0 notes
Text
ॲनल फिस्टुला किंवा फिस्टुला-इन-ॲनो ही एक ॲनोरेक्टल स्थिती आहे जिथे गुदा कालवा आणि पेरियानल त्वचेदरम्यान एक असामान्य बोगदा तयार होतो. गुदेच्या आतील भागात आठ ते दहा ग्रंथी असतात, जे आपल्या स्रावाने मलमार्ग सुगम ठेवतात. या ग्रंथींमध्ये इन्फेक्शन होणे किंवा सूज येणे हा प्रकार वारंवार घडत असतो. याने रुग्णाला विशेष त्रास होत नाही आणि त्यामुळे त्याकडे विशेष लक्षही दिले जात नाही; पण एखाद्या वेळी हा आजार उग्ररूप धारण करतो आणि त्यामुळे अनेक पेच निर्माण होतात. या त्रासाची सुरुवात गुदेमध्ये दुखण्यापासून होते आणि मलमार्गात काहीतरी बाहेर येण्यास तत्पर आहे, असा भास होऊ लागतो. हे दुखणे खाली बसल्यावर, खोकल्यानंतर शौच झाल्यावर अधिक तीव्र असते. थंडी वाजून ताप येणे, वारंवार लघवी करायची इच्छा होणे असेही घडते. दुखऱ्या जागेवर हात लावून बघताना तिथे एखादी गाठ किंवा सुजलेला भाग जाणवतो. आत पू असल्यामुळे तो भाग टंच आणि गरम लागतो. जर या अवस्थेतही त्याकडे दुर्लक्ष केले गेले, तर ती गाठ फुटते आणि पू वाहू लागतो. रुग्णाला दुखणे कमी वाटायले लागते, ताप उतरून जातो आणि काही दिवसाने आराम होतो. मात्र, हा आराम अस्थायी स्वरूपाचा असतो. कारण अनेकदा त्याची परिणिती भगंदरमध्ये होते आणि वारंवार त्रास देऊ लागते. जेव्हा पू भरलेली गाठ आपोआपच फुटते तेव्हा ती बाहेर त्वचेवर एक छिद्र बनवते आणि तसेच छिद्र मलाशयामध्येही तयार होते. ही दोन्ही छिद्रे एका गुहेसारख्या मार्गाद्वारे आपसात जोडलेली असतात. या दोन तोंडाच्या व्रणालाच ‘फिश्चुला’ असे म्हणतात. या गुहेसारख्या जागेमध्ये विष्ठा आणि अन्य दूषित पदार्थ जमा होत राहतात. हे मार्ग स्थायी स्वरूपाचे होऊन जातात. छिद्र नेहमी उघडे राहते. जेव्हा या मार्गामध्ये जमा होणारी घाण त्या जागेच्या क्षमतेपेक्षा अधिक होते, तेव्हा हा जमलेला स्राव बाह्य छिद्रावर जोर देतो आणि ते छिद्र मोठे होऊ लागते. त्यातून पातळ पू झिरपू लागतो. हे स्रवणे काही दिवसांपर्यंत सुरू राहते आणि आतली जागा रिकामी झाल्यावर छिद्र हळू-हळू पुन्हा बंद व्हायला लागते; पण आतले छिद्र आणि मार्ग मात्र तसेच राहतात. ज्यामुळे पुन्हा मल त्यात जमा होऊ लागतो आणि या दुष्टचक्राची पुनरावृत्ती होत राहते. हा क्रम वर्षानुवर्षे चालू राहतो. काही रुग्णांना वारंवार होणाऱ्या या विकृतीमुळे दोन किंवा अधिक छिद्रे उत्पन्न होतात. त्या प्रत्येकातून पू वाहात राहतो. जीर्णावस्थेत पोहोचलेल्या जुन्या भगंदरच्या आत कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. https://www.kaizengastrocare.com/
1 note
·
View note
Text
बाळासाहेब मुरकुटे यांचा प्रचार करत असलेल्या वाहनाला अडवलं अन..
नेवासा तालुक्यातील ��ोनई इथे नवीपेठ भागात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा प्रचार करत असलेल्या एका वाहनाला तीन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकली आडव्या लावून दमदाटी केल्याचा प्रकार सात तारखेला घडलेला आहे. वसंत एकनाथ वडागळे असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून कांगोणी येथील ते रहिवासी आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी फिर्यादी यांच्या म्हटल्यानंतर घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. ‘ इथे…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता पथकाकडून १९ किलो सोन्यासह ३७ किलो चांदी जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज चौथा आणि शेवटचा सामना
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली. काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० पुन्हा एकदा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, परंतु गांधी घराण्याची चौथी पिढीही हे काम करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शहा यांनी टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदारांचं समर्थन मिळत नसल्याने, काँग्रेस पक्ष मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करत आहे, परंतु काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केल्याचं गडकरी म्हणाले.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेल्या १९ वर्षात आम्ही काय केलं यावर ही पुस्तिका असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे वेळेअभावी ही सभा न घेता मतदार संघांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या ब्लू प्रिंटवरून आपल्याला हिणवलं गेलं, त्या ब्लू प्रिंट मधील प्रश्नांचाच या जाहीरनाम्यात समावेश केल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
��त्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा सा��्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, अंमलबजावणी, सोयीसुविधांच्या पूर्ततेसोबतच जनजागृतीसाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर मतदानाचे संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तर, २७ लाख बँक ग्राहकांना मतदानाचं आवाहन करणारे लघूसंदेश -एसएमएस पाठवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट – कैवल्य जोशी, नवमतदार
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीही आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवन परिसरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली, तसंच आकाशवाणीवरून नागरिकांना संबोधित करत, जनजातीय अर्थात आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्य��सह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही आज साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुलसी विवाह सोहळ्याची आज सांगता होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं काल रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे, असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
धुळे जिल्हात आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या एक महिन्यात ‘सी-व्हिजिल ॲप’ वर एकूण ५४ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून २४ तक्रारी चुकीच्या असल्याचं समोर आलं, यापैकी ६ तक्रारी जिल्हा स्तरावर तर १८ तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर फेटाळण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान शांततेत आणि प्र��ोभनमुक्त होण्यासाठी राज्य सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना यांनी दिले आहेत. मिना यांच्या अध्यक्षतेखाली आज धुळ्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन-एकनं आघाडीवर आहे.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे.
****
0 notes
Text
न सांगता मी राहू कसे
शब्दा�� मी सांगू कसेन सांगता राहू कसे दिन रात्र होते चूर नशेनेनको विचारू हे प्रेम कसे हलक्या सरी पडतानानवी ओळख होतानामनाला माझ्या फसवून गेलीअनोळखे दुःख देऊन गेली येऊन माझ्या समोरीवेड मला लावून गेली शब्दात मी सांगू कसेन सांगता मी राहू कसे
0 notes