#कबरीवर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
औरंगजेबाचे गौरवगान करुन दोन समुदायात तेढ निर्माण करण्याच्या प्रकरणाबद्दल सखोल चौकशी करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.
जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यात राज्य शासन अपयशी – विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची टीका.
मणिपूरमधली परिस्थिती सुरळीत करण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करण्याची विरोधी पक्षांची मागणी.
आणि
औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं करण्याची विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांची सूचना.
****
औरंगजेबाचे गौरवगान करून दोन समुदायामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रकाराबद्दल सखोल चौकशी करण्यात येईल, तसंच गरज पडल्यास विशेष चौकशी समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. नितेश राणे यांनी याबाबत मागणी केली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या औरगजेबाच्या कबरीवर जाण्याला आपला विरोध नसून जाती धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे असं अबू आझमी यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले.
****
राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांवर उपाययोजन करण्यात राज्य शासन अपयशी ठरत असल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. या मुद्यावर विरोधी पक्षांतर्फे सभागृहाबाहेर अभियान राबवणार असल्याचं त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत मांडलेला संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरील स्थगन प्रस्ताव अध्यक्ष राहु�� नार्वेकर यांनी अमान्य केला. भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या आवाजाचा नमुना घेतला जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. कोणालाही राष्ट्रपुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलता येणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या शिदोरी या मासिकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं फडणवीस यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या यशोमती ठाकूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांना पूर्ण संरक्षण दिलं जाईल आणि धमकी देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही ते याबाबत उत्तर देताना म्हणाले.
****
पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस महामार्ग यासाठी जमीन अधिग्रहण करण्यामध्ये झालेला गैरव्यवहार आणि त्यासंबंधी तक्रारी यांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. मनिषा चौधरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. ही चौकशी करताना संबधित आमदारांनाही बोलावलं जाईल, हा चौकशी अहवाल महिनाभरात घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.
****
मनोरा आमदार निवासाच्या इमारतींचं भूमिपूजन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात ही माहिती दिली. यात चाळीस मजले आणि अठ्ठावीस मजले असलेल्या दोन इमारती बांधल्या जातील. प्रत्येकी एक हजार फुटांचं घर आमदारांना उपलब्ध करून दिलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांबाबत स्थगन प्रस्ताव विरोधी पक्ष सदस्यांनी दिला होता. या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत, काल झालेला अपघात गंभीर आहे. हा रस्ता तातडीनं बंद करून त्यावर तज्ज्ञाची समिती स्थापन करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती. अध्यक्षांनी त्याला अनुमती नाकारली.
****
मणिपूरमधली परिस्थिती सुरळीत करण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं आज राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मणीपूरमधल्या स्थितीबाबत त्यांना माहिती दिली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं २९ आणि ३० जुलैला मणीपूरचा दौरा केला. त्यावेळी जे पाहिलं, ते राष्ट्रपतींसमोर मांडलं, असं ते म्हणाले. मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत निवेदन करावं, या मागणीबाबतही या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींकडे निवेदन दिलं आहे. त्यावर योग्य कार्यवाही करण्याचं आश्वासन राष्ट्रपतींनी दिलं, असं खरगे यांनी सांगितलं.
****
मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरुन झालेल्या गोंधळामुळं आजही लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. पंतप्रधानांनी निवेदन द्यावं अशी मागणी करत द्रमुक, तृणमूल, संयुक्त जनता दल या पक्षांच्या खासदारांनी हौद्यात उतरुन घोषणा दिल्या. या गोंधळातच प्रश्नोत्तरांचा तास सुरु करण्याचे प्रयत्न पीठासीन अधिकाऱ्यांनी केले पण गदारोळ सुरुच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी विरोधकांना मणिपूर हिंसाचारावर स्थगन प्रस्ताव मांडायला परवानगी नाकारली. सदनात निवेदन करणं हा पंतप्रधानांचा विशेषाधिकार असल्यामुळे त्यांना सदनात येण्याचे आदेश अध्यक्ष देऊ शकत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा दृष्टकोन हा महिला सक्षमीकरणाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. ते गांधीनगर इथं महिला सक्षमीकरणाच्या जी-२० मंत्रीस्तरीय बैठकीच्या उद्घाटन सत्राच्या वेळी बोलत होते. महिलांच्या विकासात येणारे अडथळे दूर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सर्व क्षेत्रात महिलांच्या समान संधीच्या आवश्यकतेवर भर दिला. सहकार क्षेत्रात विशेषत: दुग्धव्यावसायातल्या महिलांच्या योगदानाचं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्मरण करुन बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं एकत्रीकरण हे परिवर्तनाचं एक शक्तीशाली माध्यम असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षात राज्यातील दूध उत्पादनात तीन हजार दोनशे दोन हजार टन इतकी व���ढ झाली आहे. २०२१-२२ यावर्षी राज्यात चौदा हजार तीनशे हजार टन इतके दूध उत्पादन झाले आहे. दरम्यान, दुध उत्पादनात वाढ होण्यासाठी देशातल्या सर्व जिल्ह्यात राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी राज्यांना सोळा गोकुळ आणि दोन राष्ट्रीय कामधेनू प्रजनन केंद्रांच्या स्थापनेसाठी निधी जारी करण्यात आला असल्याचं कृषी विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड परवा- शुक्रवारी नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी समारंभात सहभागी होतील. तसंच, रेशीमबागेतल्या कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक केंद्रालाही ते भेट देणार आहेत. त्यानंतर, उपराष्ट्रपती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत, ‘प्राणिती’ ह्या भारतीय महसूल सेवा विभागाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठीच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करतील.
****
मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरतर्फे सार्व���निक आरोग्य विभागाच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेला ‘सर्वांसाठी परवडणाऱ्या दरात कर्करोग उपचार केंद्र’ हा प्रकल्प राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. या संबंधी अधिकृत घोषणा या केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यशाळेत केली. हा प्रकल्प जून २०१६ मध्ये सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला होता.
****
ख्यातनाम कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या अकस्मात मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा अकस्मात मृत्यू वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्यानं एक व्यापक कलादृष्टी असलेला संवेदनशील प्रतिभावंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी सर्जनशीलतेची छाप उमटवणाऱ्याचं असं जाणं अपेक्षित नव्हतं, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. चित्रपट आणि कला क्षेत्रात अतिशय बहुमूल्य योगदान त्यांनी दिलं आणि त्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला, असं नमूद करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला, असं नमूद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
****
औरंगाबाद विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आज शहर पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. त्यांनी यावेळी जायकवाडी धरणातल्या उद्भव विहीरीच्या सुरू असलेल्या कामाला भेट देऊन पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. शहर पाणीपुरवठा योजनेचं काम गतीनं करतांना कोणत्याही अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेण्यासोबतच दर्जेदार आणि गतीनं काम करा, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले. याबाबत आपण सातत्यानं आढावा घेऊन वेळोवळी पाहणी करणार असल्याचंही विभागीय आयुक्त आर्दड म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचं उदिष्ट असलेल्या तीनशे अठ्ठावीस गावांमधली अपूर्ण कामं २४ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक मीनल करनवाल यांनी दिले आहेत.
****
0 notes
Text
औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल
औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? मनसेचा मुख्यमंत्र्यांना सवाल राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. त्यावरुन मनसेचे आमदार राजू पाटलांनी शिवसेनेला शाब्दीक फटका दिलाय, औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर गुडघे टेकून काय मिळालं? असा प्रश्न त्यांनी…
View On WordPress
#“औरंगजेबाच्या#आजच्या घडामोडी#कबरीवर#काय#गुडघे#टेकवणाऱ्यांसमोर#टेकून#ठळक बातम्या#डोकं#ताजी बातमी#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#मनसेचा#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#मिळालं#मुख्यमंत्र्यांना#सवाल
0 notes
Text
महाराष्ट्र हादरला..कबरीवर विटा लावणारा ' तो ' कोण ? , असा अडकला आरोपी
महाराष्ट्र हादरला..कबरीवर विटा लावणारा ‘ तो ‘ कोण ? , असा अडकला आरोपी
महाराष्ट्रात महिलांसोबत विवाहबाह्य संबंधातून होणारा हिंसाचार हा काही नवीन नाही अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील जोशी पेठ येथे समोर आलेली असून फिरदोस जुबेर खाटीक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदिल उर्फ नटू अल्ताफ खाटीक ( वय 36 राहणार जोशी पेठ ) याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मयत महिलेच्या कबरीवर विटा लावल्यानंतर तिच्या छळाचा हा प्रकार उघड झालेला…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र हादरला..कबरीवर विटा लावणारा ' तो ' कोण ? , असा अडकला आरोपी
महाराष्ट्र हादरला..कबरीवर विटा लावणारा ‘ तो ‘ कोण ? , असा अडकला आरोपी
महाराष्ट्रात महिलांसोबत विवाहबाह्य संबंधातून होणारा हिंसाचार हा काही नवीन नाही अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील जोशी पेठ येथे समोर आलेली असून फिरदोस जुबेर खाटीक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदिल उर्फ नटू अल्ताफ खाटीक ( वय 36 राहणार जोशी पेठ ) याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मयत महिलेच्या कबरीवर विटा लावल्यानंतर तिच्या छळाचा हा प्रकार उघड झालेला…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र हादरला..कबरीवर विटा लावणारा ' तो ' कोण ? , असा अडकला आरोपी
महाराष्ट्र हादरला..कबरीवर विटा लावणारा ‘ तो ‘ कोण ? , असा अडकला आरोपी
महाराष्ट्रात महिलांसोबत विवाहबाह्य संबंधातून होणारा हिंसाचार हा काही नवीन नाही अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील जोशी पेठ येथे समोर आलेली असून फिरदोस जुबेर खाटीक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदिल उर्फ नटू अल्ताफ खाटीक ( वय 36 राहणार जोशी पेठ ) याच्या विरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मयत महिलेच्या कबरीवर विटा लावल्यानंतर तिच्या छळाचा हा प्रकार उघड झालेला…
View On WordPress
0 notes
Text
शिवसेना किशोरी पेडणेकर यांनी रौफ मेमनच्या व्हिडिओवर भाजप मोहित कंबोजला फटकारले
शिवसेना किशोरी पेडणेकर यांनी रौफ मेमनच्या व्हिडिओवर भाजप मोहित कंबोजला फटकारले
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात आणि विशेषत: मुंबईच्या राजकीय वर्तुळात याकूब मेमनच्या कबरीवर केलेल्या कथित सुशोभीकरणाचा वाद चांगलाच पेटला आहे. बी जे पी आणि शिवसेना हे काम नेमकं कुणाच्या कार्यकाळात झालं, यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे या कब्रिस्तानची जबाबदारी असलेल्या ट्रस्टने सुशोभीकरण झालंच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय सुंदोपसुंदी सुरू असताना एक…
View On WordPress
#bjp#अप मेमन#उद्धव ठाकरे#किशोरी पेडणेकर#ताज्या मराठी बातम्या#पॉलिटिक्स बातम्या#बातम्या मराठीत#मराठी बातम्या#मराठीतील ताज्या राजकारणाच्या बातम्या#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या#महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या#मोहित कंबोज#याकूब मामन कबर#राजकारण बातम्या#राजकारणाच्या बातम्या मराठीत#राजकीय बातम्या#लेटेस्ट मराठी बातम्या#शिवसेना
0 notes
Text
AIMIM नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केल्याचा मुद्दा तापला, आता अभिनेत्री रवीना टंडनची पोस्ट आली चर्चेत
AIMIM नेते ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर पुष्प अर्पण केल्याचा मुद्दा तापला, आता अभिनेत्री रवीना टंडनची पोस्ट आली चर्चेत
रवीना टंडन अकबरुद्दीन ओवेसी (फाइल फोटो) अभिनेत्री म्हणाली, ‘देशातील प्रत्येकाला त्याने कोणाची पूजा करावी, कोणाची करू नये याचे स्वातंत्र्य आहे. जर प्रत्येकाला हा अधिकार मिळाला असेल तर ते करण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही. कारण आपण सहनशील लोक आहोत. AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवेसी (अकबरुद्दीन ओवेसी AIMIM) गुरुवारी महाराष्ट्रातील औरंगाबाद दौऱ्यावर होते. आपल्याच पक्षाचे इम्तियाज जलील आणि वारिस पठाण…
View On WordPress
0 notes
Text
औरंगजेबच्या कबरीवर नतमस्तक होऊन समस्त महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या अकबरुद्दीन ओवैसी वर कारवाई करा !
औरंगजेबच्या कबरीवर नतमस्तक होऊन समस्त महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या अकबरुद्दीन ओवैसी वर कारवाई करा !
शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आली मागणी! कुडाळ पोलीस स्थानकात देण्यात आले निवेदन ! ए.आय.एम.आय.एम पक्षाचे अकबरुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यात तेथील औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहुन नतमस्तक झाले. औवेसी यांच्या या कृतीमुळे सर्व शिव व शंभूप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे ओवैसी वर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने करण्यात आली. निवेदनात म्हटले…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 May 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ मे २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· सरकारी भांडारांकडून मे अखेरपर्यंत गहू खरेदी सुरू ठेवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
· पतसंस्थांमधल्या ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत राज्य सरकार धोरण ठरवणार-अर्थमंत्री अजित पवार
· राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण अशक्य-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
· काँग्रेस पक्षाची येत्या ऑक्टोबर महिन्यापासून भारत जोडो यात्रा
· लोका���ुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा निर्णय
· औरंगाबाद महानगरपालिकेनं कोट्यवधींची पाणीपट्टी नागरिकांना व्याजासह परत करावी-खासदार इम्तियाज जलील यांची मागणी
· हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पावसात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू
आणि
· थॉमस-उबेर बॅडमिंटन चषक पटकावत भारतीय संघाने घडवला इतिहास
****
सरकारी भांडारांकडून होत असलेली गहू खरेदी मे अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय खाद्य महामंडळ आणि राज्य सरकारांनी ही खरेदी सुरू ठेवावी, असं केंद्र सरकारनं काल राज्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. बाजारातल्या गव्हाच्या किंमती आणि इतर परिस्थितीमुळे यंदाच्या रबी हंगामात गव्हाच्या केंद्रीय साठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यताही यात व्यक्त करण्यात आली आहे.
****
देशभरातल्या नद्यांमध्ये क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी, केंद्र सरकारने विविध उपक्रम हाती घेतले असल्याचं, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितलं आहे. बंदरे-नौवहन-जलमार्ग मंत्रालय आणि भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ - फिक्की यांनी अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेत ते काल बोलत होते. देशांतर्गत जलमार्गांमधील क्रूझ सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने नदी क्रूझ सेवेसाठी मार्गदर्शक कृती आराखडा करण्याचं आणि गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केलं.
****
राज्यातल्या पतसंस्थांमधल्या ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत सरकार लवकरच धोरण ठरवणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. काल सांगलीत एका पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख तसंच पारदर्शी व्हावं, त्यामध्ये आधुनिकीकरणाचा अवलंब करावा, यामध्ये डिजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंग सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, आदी सूचना पवार यांनी केल्या.
राज्यात उसाचं विक्रमी उत्पादन झालं असून, ऊस गाळपाचं प्रमाणही वाढलं आहे. ही बाब लक्षात घेऊन तोडणी वाहतुकीसाठी टनाला दोनशे रुपये अनुदान दिलं जाईल, असं आश्वासन पवार यांनी दिलं आहे. दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनाचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते काल झालं. कर्नाटक राज्याप्रमाणे अल्पसंख्याक समाजासाठी उपयुक्त असणाऱ्या योजना महाराष्ट्रात राबवण्याचं आश्वासन पवार या��ेळी दिलं.
****
राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण शक्य नसल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत गोरेगाव इथं उत्तर भारतीयांसाठी भाजपनं घेतलेल्या उत्तर सभेत बोलत होते. हनुमान चालिसा म्हणणं हा राजद्रोह आणि औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणं हा राजशिष्टाचार ठरेल, याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कल्पना तरी केली असेल का, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही वेगळी होणार नाही, असं ठामपणे सांगताना फडणवीस यांनी अतिरिक्त ऊस, शेतकरी आत्महत्या, एसटी कामगारांचे प्रश्न, मराठा तसंच ओबीसी आरक्षण यासह अनेक मुद्यांवरून राज्यसरकारवर टीका केली.
****
काँग्रेस पक्ष येत्या ऑक्टोबर महिन्यात भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. राजस्थानातल्या उदयपूर इथं काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराच्या समारोप सत्रात हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही घोषणा केली. आपण पुन्हा सत्तेत येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना, संवाद हा कॉंग्रेस पक्षाचा डीएनए असून, नेहमी संवाद व्हावा हाच आमचा प्रयत्न असल्यानं, आपण चर्चेला वाव देतो. इतर कोणत्याही पक्षात अशी मोकळी चर्चा करण्याचं स्वातंत्र्य नसल्याचं राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, समोर असलेली आव्हानं आणि राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एका सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. पक्षाच्या केंद्रीय मंडळाच्या व्यतिरीक्त हे सल्लागार मंडळ असेल मात्र त्यांना निर्णयप्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप करण्याची मुभा नसेल. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षांतर्गत सुधारणांसाठी एका कृतीदलाहीची स्थापना केली जाणार आहे. हे कृती दल पक्ष रचना, विविध पक्षांतर्गत नेमणुका, निवडणूक आणि निधी व्यवस्थापन, जनसंपर्क यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले २५५ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८० हजार ८४० झाली आहे. काल या संसर्गाने एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १७५ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३१ हजार ४६७ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ५१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
बुद्ध पौर्ण��मा आज साजरी होत आहे. या निमित्तानं तथागत भगवान गौतम बुद्धांना अभिवादनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अर्थसाह्यातून लुंबिनी इथं उभारण्यात येणाऱ्या बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राचं भूमिपूजन आज बुध्द पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्धांनी दिलेली अहिंसा, शांती आणि करुणेची शिकवण जनसामान्यांना तसेच राष्ट्रांना नेहमीच मार्गदर्शक सिद्ध झाली आहे. आज ही मूल्ये अधिक प्रास���गिक असल्याचं, राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
औरंगाबाद इथल्या एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या वतीनं आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘त्रिसरण पंचशील’ संगीत मैफलीचं आयोजन करण्यात आलं आहे. सायंकाळी सहा वाजता एमजीएमच्या रुख्मिणी सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
****
महाराष्ट्रात लोकायुक्त नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर लोकायुक्त नियुक्त करू, असं लेखी आश्वासन सरकारनं दिलं होतं. मात्र अद्याप लोकायुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत आंदोलनाची तयारी झाली असून, दोनशेहून अधिक तालुक्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेनं शहरातल्या नागरिकांना पाणीपुरवठा न करता आजपर्यंत वसूल केलेली कोट्यवधींची पाणीपट्टीची रक्कम व्याजासह परत करावी, तसंच आतापर्यंत नागरिकांकडे थकित असलेली पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्याकडे सादर केलं. औरंगाबाद शहराला वेळेवर आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा, यासाठी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला होता. तरीही महापालिका आणि जिल्हा प्रशासनानं पाणी पुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. पाणीपट्टीमध्ये ५० टक्के कपात करण्याची पालकमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा ही केवळ महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळावी या हेतूने केली असल्याची टीका खासदार जलील यांनी केली.
****
हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसात एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाल���. वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ इथं ही घटना घडली. साहेबराव नामाजी कदम असं या ७० वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसापासून बचावासाठी ते झाडाखाली थांबले होते. त्याच झाडावर वीज पडून साहेबराव यांचा मृत्यू झाला. वाघीशिंगी इथं एका शेतात झाडाखाली बांधलेल्या दोन गायी वीज पडून दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
थॉमस-उबेर बॅडमिंटन चषक भारतीय संघाने पटकावला आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच दाखल झालेल्या भारतानं १४ वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या इंडोनेशिया संघाचा तीन-शून्य अशा फरकानं पराभव करत इतिहास घडवला. लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी एकेरीत, तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकिरेड्डी या जोडीने इंडोनेशियाच्या संघाला पराभूत केलं. पहिल्या एकेरी लढतीत लक्ष्य सेन ने इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुका गिनटिंगचा ८-२१, २१-१७, २१-१६ असा पराभव केला. दुहेरी लढतीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने मोहम्मद अहसान आणि केविन संजय सुकामुल्जो या जोडीला १८-२१, २३-२१, २१-१९ असं पराभूत केलं. दुसऱ्या एकेरी लढतीत श्रीकांतने जोनाथन क्रिस्टीचा २१-१५, २३-२१ असा थेट पराभव करत, थॉमस चषकावर भारताचं नाव कोरलं.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी दूरध्वनीवरून विजेत्या संघाशी संवाद साधत, त्यांचं अभिनंदन केलं. हा विजय सगळ्या खेळाडूंमध्ये उत्साह आणि स्फूर्ती जागवणारा असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर हा विजय म्हणजे भारतीय बॅटमिंटनच्या सुवर्णकाळाचा प्रारंभ असल्याचं, उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय संघाला एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.
****
रामकृष्ण उपसासिंचन प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल तसंच धुळे-सोलापूर महामार्गातील औट्रम घाटात बोगदा करण्यासाठी एमएसआरडीसी ला सूचना करण्यात येईल असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं जिल्ह्यातल्या ५ हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी १ लाख रुपये कर्ज वाटपासाठी घेण्यात आलेल्या कर्ज वितरण मेळाव्यात ते काल बोलत होते.
बँकेकडून जास्तीत जास्त गरजूंना कर्ज ��ेता आलं पाहिजे मात्र यासाठी कर्जदारांनी वेळेत परतफेड करुन बँकेला सहकार्य करावं असं आवाहन मंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
इंधन दर वाढ आणि वाढत्या महागाईच्या केंद्र सरकारचा निषेध करत उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला सदस्यांनी काल रस्त्यावर चूल पेटवून धरणे आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्ष वैशाली मोटे, युवती प्रदेशाध्यक्षा सलक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली रॅली देखील काढण्यात आली.
****
हवामान
नैऋत्य मोसमी पाऊस आज दिवसभरात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळं पुढच्या ५ दिवसात अंदमान - निकोबार बेटांवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळमधल्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
राज ठाकरेंच्या धमकीचा प्रभाव, अफझलखानच्या कबरीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
राज ठाकरेंच्या धमकीचा प्रभाव, अफझलखानच्या कबरीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
राज ठाकरेंच्या धमकीचा प्रभाव, अफझलखानच्या कबरीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला राजकीय वाद आता सातारा येथील अफझलखानच्या कबरीपर्यंत पोहोचला आहे. या भागात राज्य सरकारने सातारा जिल्ह्यातील अफझलखानच्या कबरीवरील सुरक्षा वाढवली आहे. 102 बटालियन रॅपिड अॅक्शन फोर्स मुंबईचे सहाय्यक कमांडर स्वप्नील पाटील आणि त्यांचे 50 जवान आणि 15 क्यूआरटी…
View On WordPress
0 notes
Text
मनसे आक्रमक; औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास मनाई, पोलिसांचा बंदोबस्त
मनसे आक्रमक; औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास मनाई, पोलिसांचा बंदोबस्त
मनसे आक्रमक; औरंगजेबाच्या कबरीवर जाण्यास मनाई, पोलिसांचा बंदोबस्त औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी होत असताना एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या खुलताबादमध्ये औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकला. यावरून मोठा राजकीय वाद सुरू झाला. आता मनसेने औरंगजेबच्या कबरीवरून इशारा दिल्याने पुरातत्त्व विभाग सावध झालं आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याची मागणी…
View On WordPress
0 notes
Text
BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा 'तो' फोटो सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे
BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा ‘तो’ फोटो सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे
BJP पदाधिकारी औरंगजेबाच्या कबरीवर; काँग्रेसनं समोर आणला फडणीसांसोबतचा ‘तो’ फोटो सचिन सावंत यांनी यावरुन एक सवाल उपस्थित केला आहे औरंगाबादमध्ये पक्षाचे नेते अकबरुद्दी ओवैसी यांच्या दौऱ्यानंतर राज्यात मोठा वाद सुरु झाला आहे. ओवैसींनी एका कार्यक्रमासाठी हा दौरा केला होता. या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यापूर्वी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती माथा टेकवला. यामुळे राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला असून,…
View On WordPress
#“औरंगजेबाच्या#bjp#आणला#आहे#उपस्थित#एक#कबरीवर#काँग्रेसनं#केला#तो#पदाधिकारी#फडणीसांसोबतचा#फोटो#बातम्या#यांनी#यावरुन#सचिन#समोर#सवाल#सावंत
0 notes
Text
“औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हाच तुमच्यात…”; राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
“औरंगजेबाच्या कबरीवर फुले अर्पण करणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हाच तुमच्यात…”; राणांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आ��ा दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हनुमान चालिसा…
View On WordPress
#“औरंगजेबाच्या#“तुमच्यात#अर्पण!#आव्हान#कबरीवर#करणाऱ्यांचे#तेव्हाच#तोडून#दाखवा#दात#फुले#बातम्या#मुख्यमंत्र्यांना#राणांचे
0 notes
Text
Gajanan Kale : ‘…तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला हा शापच; मनसेच्या गजानन काळेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Gajanan Kale : ‘…तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला हा शापच; मनसेच्या गजानन काळेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
Gajanan Kale : ‘…तर बाळासाहेब ठाकरे यांनी वरून दिलेला हा शापच; मनसेच्या गजानन काळेंचा शिवसेनेवर हल्लाबोल कोणत्याही विचारधारेशी बांधिलकी न ठेवता हे अनैसर्गिक सरकार आले आहे, त्याचीच फळे या महाराष्ट्रात आलेली दिसत आहेत. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर… या अर्थाने ईश्वराचीच काठी या सरकारला बसली की काय, असे गजानन काळे म्हणाले. सोलापूर : औरंगजेब याच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होणाऱ्यांबरोबर स्वत:ला…
View On WordPress
0 notes
Text
शिवसेना लढाईतही हरली आणि तहात पण हरली ; मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांची टीका
शिवसेना लढाईतही हरली आणि तहात पण हरली ; मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांची टीका
शिवसेना लढाईतही हरली आणि तहात पण हरली ; मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांची टीका राज्यसभेतील दो�� मतांसाठी औरंगजेबाच्या कबरीवर डोक टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळविले. शिवसेना प्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकांचा बळी पण दिला. सेना लढातही हरली आणि तहात पण हरली, अशी बोचरी टीका कल्याण ग्रामीण मधील मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली…
View On WordPress
#आजच्या घडामोडी#आणि#आमदार#टीका!#ठळक बातम्या#तहात#ताजी बातमी#पण#पाटील#प्रमोद#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#मनसेचे#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#यांची#लढाईतही#शिवसेना#हरली
0 notes
Text
“मुख्यमंत्री औरंगाबादला आमदार विकत घ्यायला…”, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
“मुख्यमंत्री औरंगाबादला आमदार विकत घ्यायला…”, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
“मुख्यमंत्री औरंगाबादला आमदार विकत घ्यायला…”, किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घोडेबाजाराच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. त्यात ओवेसींनी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्यामुळे…
View On WordPress
#आजच्या घडामोडी#आमदार#उद्धव#औरंगाबादला#किरीट#घ्यायला#ठळक बातम्या#ठाकरेंवर#ताजी बातमी#निशाणा!#बातमी#बातमी विशेष#बातम्या#भारत लाइव्ह#भारत लाईव्ह न्यूज#भारत लाईव्ह मीडिया#महाराष्ट्र#महाराष्ट्र समाचार#महाराष्ट्राची बातमी#मुख्यमंत्री#विकत#सोमय्यांचा
0 notes