#मंत्रालयाच्या
Explore tagged Tumblr posts
Text
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या
मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत नागरिक निघाले; नाशिकच्या नागरिकांनी मुंबईची वाट का धरली ? जाणून घ्या चैतन्य गायकवाड, नाशिक : नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीसाठी दत्तनगर, चुंचाळे शिवार या परिसरातील नागरिकांनी आज नाशिक ते मुंबई असा अर्थनग्न पायी मोर्चा काढला आहे. मंगळवारी सकाळी अंबडच्या एक्सलो पॉईंट येथून नागरिकांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.…
View On WordPress
#अर��धनग्न#अवस्थेत#का#गुन्हेगारी#घ्या#जाणून#दिशेने#धरली#नागरिक#नागरिकांनी#नाशिकच्या#निघाले…#मंत्रालयाच्या#मुंबईची#वाट
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 25 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कोणत्याही विषयावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही. • विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची-मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन. • महिला हिंसाचाराविरोधात केंद्र सरकारचं आजपासून 'अब कोई बहाना नहीं' अभियान. • विधानसभा निवडणूक निकाल राज्यपालांकडे सादर-सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. आणि • बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यावर भारताची पकड मजबूत.
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली.
विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाचा ११६वा भाग काल प्रसारित झाला. येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं, दिल्लीत ११ आणि १२ जानेवारी रोजी भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू असून, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं.
महिलांवरील हिंसेच्या विरोधात केंद्र सरकार आजपासून अब कोई बहाना नहीं, या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करत आहे. या अभियानाअंतर्गत देशातले नागरीक, सरकारी यंत्रणा तसंच इतर घटकांना महिलांच्या विरोधात हिंसेला संपवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय, तसंच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या अभियानाअंतर्गत आज दिल्लीत होत असलेल्या कार्यक्रमात अब कोई बहाना नहीं, या विषयावर एक चित्��पट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली.
दरम्यान, राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी काल आपापल्या विधीमंडळ पक्षांची स्वतंत्र बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. शिवसेनेच्या आमदारांचीही काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या सर्व निर्णयांचे एकाधिकार पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. सरकार स��थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत असं ते म्हणाले.
दरम्यान, लाडक्या बहिणींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांचं औक्षण करुन, त्यांचं अभिनंदन केलं.
निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा असल्याचं, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात त्यांनी, जनतेने दाखवलेला विश्वास आणि प्रेमाबद्दल आभार मानले. हे यश विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, त्या तुलनेत आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात झाली, त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याविरोधात जातील हे मनाला पटत नाही, लाडकी बहीण योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला असं सांगितलं. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा ��रु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असं पवार ��्हणाले.
झारखंडमध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या २८ तारखेला होणार आहे. झारखंड मुक्ति मोर्चा - जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला, त्यानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्याचं सोरेन यांनी सांगितलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ पैकी ३४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला आहे. भाजपला २१, काँग्रेसला १६, राष्ट्रीय जनता दलाला चार, तर मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन जागांवर विजय मिळवता आला आहे.
गोव्यात सुरु असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीमध्ये काल क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टूमॉरो या स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली. टीम ग्रीननं तयार केलेल्या, गुल्लू या चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटातला अभिनेता, पुष्पेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. लव्हफिक्स सबस्क्रिप्शन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी, विशाखा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उदयोन्मुख दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेत, १०० युवा कलाकारांची निवड करण्यात आली होती. त्यांना दिलेल्या विषयावर केवळ ४८ तासात लघुपट बनवायचा होता. १०० युवांना ५ चमूत विभागण्यात आलं होतं.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन बाद १२ धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी सात गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला आता ५२२ धावांची आवश्यकता आहे. जसप्रित बुमराहनं दोन, तर मोहम्मद सिराजनं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारताने काल दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित केला. या डावात यशस्वी जयस्वालनं १६१, विराट कोहलीनं १००, तर के एल राहुलनं ७७ धावा केल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला कालपासून आळंदीमध्ये सुरुवात झाली असून, राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल होत आहेत. आळंदी नगरपरिषद, देवस्थान, एमआयटी महाविद्यालय, वारकरी सेवा संघ आणि इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने वारी काळात शहर आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छत��चं काम हाती घेण्यात आलं आहे. समाधी सोहळ्याच्या काल पहिल्याच दिवशी चाकण चौक ते प्रदक्षिणा मार्ग, शिवसृष्टी परिसर, माउली मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट या भागात पडलेला कचरा गोळा करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रायणी नदी घाटावर जनजागृतीपर पथनाट्य देखील सादर करण्यात आलं.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त धाराशिव जिल्हा पर्यटन विकास समिती आणि पुरातत्व विभागाच्यावतीनं काल चामर लेणी इथं हेरीटेज वॉक घेण्यात आला. जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी यावेळी इतिहासप्रेमींना चामर लेणीची माहिती सांगितली. लेणीपासून जवळच असलेल्या जुणी गल्ली इथल्या पुरातन गढीचीही पाहणी यावेळी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं देखील जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभाग आणि इंटॅकच्या वतीने काल शहरातल्या सोनेरी महल परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालक जया वाहाणे यांनी यावेळी वारसा सप्ताहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी या परिसराचा इतिहास आणि स्मारकांची, तर पुरातत्व समन्वयक डॉ. कामाजी डक यांनी प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात असलेल्या पुराणवस्तूंची सविस्तर माहिती दिली.
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आज पशुगणनेला सुरुवात होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेअंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या
** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कोणत्याही विषयावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही ** विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची-मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन ** महिला हिंसाचाराविरोधात केंद्र सरकारचं आजपासून 'अब कोई बहाना नहीं' अभियान ** विधानसभा निवडणूक निकाल राज्यपालांकडे सादर-सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आणि ** बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यावर भारताची पकड मजबूत
या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र, AIR छत्रपती संभाजीनगर, या यू- ट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.
[$2E59F6D6-ACDC-4CB7-86AD-EF1BA209637D$NEW CLOSING SIGNATURE TUNE - NEW CLOSING SIGNATURE TUNE - ]
[$3A007504-60D4-46C0-A92B-4094FC30DAE4$NEW OPENING SIGNATURE TUNE - NEW OPENING SIGNATURE TUNE - ]
नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात ��ी वैभवी जोशी आपलं स्वागत करते.
ठळक बातम्या
** संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ-कोणत्याही विषयावर चर्चेला तयार असल्याची सरकारची ग्वाही ** विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका महत्त्वाची-मन की बातमधून पंतप्रधानांचं प्रतिपादन ** महिला हिंसाचाराविरोधात केंद्र सरकारचं आजपासून 'अब कोई बहाना नहीं' अभियान ** विधानसभा निवडणूक निकाल राज्यपालांकडे सादर-सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आणि ** बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यावर भारताची पकड मजबूत
आता सविस्तर बातम्या
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालणार असून, २६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी, या अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली.
विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या कार्यक्रमाचा ११६वा भाग आज प्रसारित झाला. येत्या १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या १६२ व्या जयंतीदिनी साजरा होणाऱ्या असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं, दिल्लीत ११ आणि १२ जानेवारी रोजी भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमाअंतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू असून, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची वा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं.
महिलांवरील हिंसेच्या विरोधात केंद्र सरकार आजपासून अब कोई बहाना नहीं, या राष्ट्रीय अभियानाची सुरुवात करत आहे. या अभियानाअंतर्गत देशातले नागरीक, सरकारी यंत्रणा तसंच इतर घटकांना महिलांच्या विरोधात हिंसेला संपवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय, तसंच ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या अभियानाअंतर्गत आज दिल्लीत होत असलेल्या कार्यक्रमात अब कोई बहाना नहीं, या विषयावर एक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांची जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि राजपत्राची प्रत काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सादर करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी काल राज्यपालांना ही अधिसूचना सुपूर्द केली.
दरम्यान, राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी काल आपापल्या विधीमंडळ पक्षांची स्वतंत्र बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. शिवसेनेच्या आमदारांचीही काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या सर्व निर्णयांचे एकाधिकार पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्तास्थापन करतानाही मतभेद नाहीत असं ते म्हणाले. ** दरम्यान, लाडक्या बहिणींनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांचं औक्षण करुन, त्यांचं अभिनंदन केलं.
निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजप-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा असल्याचं, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात त्यांनी, जनतेने दाखवलेला विश्वास आणि आभार मानले. हे यश विकसित महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील, असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे.
राज्य विधानसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल कराड इथं निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणामुळे मतांचं ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, त्या तुलनेत आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात झाली, त्यामुळे ओबीसी मतदार आपल्याविरोधात जातील हे मनाला पटत नाही, लाडकी बहीण योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला असं सांगितलं. हा लोकांनी दिलेला निर्णय असल्याने, त्याची कारणमीमांसा करु, यावर अभ्यास करुन पुन्हा नव्या उत्साहाने लोकांसमोर येऊ, असं पवार म्हणाले.
झारखंडमध्ये नवीन सरकारचा शपथविधी येत्या २८ तारखेला होणार आहे. झारखंड मुक्ति मोर्चा - जेएमएमचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा केला, त्यानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी सोरेन यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केल्याचं सोरेन यांनी सांगितलं. झारखंड विधानसभा निवडणुकीत ८१ पैकी ३४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला आहे. भाजपला २१, काँग्रेसला १६, राष्ट्रीय जनता दलाला चार, तर मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन जागांवर विजय मिळवता आला आहे.
[$C6C96025-1C31-49C9-90B1-C0DC4CBC2ACA$MID Break - HMD CSN - MID Break - HMD CSN - ]
गोव्यात सुरु असलेल्या ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीमध्ये काल क्रिएटीव्ह माईंड्स ऑफ टूमॉरो या स्पर्धेच्या निकालांची घोषणा करण्यात आली. टीम ग्रीननं तयार केलेल्या, गुल्लू या चित्रपटाला, सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला. याच चित्रपटातला अभिनेता, पुष्पेंद्र कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. लव्हफिक्स सबस्क्रिप्शन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी, विशाखा नाईक यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. उदयोन्मुख दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या स्पर्धेत, १०० युवा कलाकारांची निवड करण्यात आली होती. त्यांना दिलेल्या विषयावर केवळ ४८ तासात लघुपट बनवायचा होता. १०० युवांना ५ चमूत विभागण्यात आलं होतं.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ५३४ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या कालच्या तिसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तीन बाद १२ धावा झाल्या आहेत. त्यामुळे भारताला सामना जिंकण्यासाठी सात गडी बाद करण्याची, तर ऑस्ट्रेलियाला आता ५२२ धावांची आवश्यकता आहे. जसप्रित बुमराहनं दोन, तर मोहम्मद सिराजनं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारताने काल दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालनं १६१, विराट कोहलीनं १००, तर के एल राहुलनं ७७ धावा केल्या.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याला कालपासून आळंदीमध्ये सुरुवात झाली असून, राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल होत आहेत. आळंदी नगरपरिषद, देवस्थान, एमआयटी महाविद्यालय, वारकरी सेवा संघ आणि इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने वारी काळात शहर आणि इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं आहे. समाधी सोहळ्याच्या काल पहिल्याच दिवशी चाकण चौक ते प्रदक्षिणा मार्ग, शिवसृष्टी परिसर, माउली मंदिर परिसर, इंद्रायणी नदी घाट या भागात पडलेला कचरा गोळा करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी इंद्रायणी नदी घाटावर जनजागृतीपर पथनाट्य देखील सादर करण्यात आलं.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त धाराशिव जिल्हा पर्यटन विकास समिती आणि पुरातत्व विभागाच्यावतीनं काल चामर लेणी इथं हेरीटेज वॉक घेण्यात आला. जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी यावेळी इतिहासप्रेमींना चामर लेणीची माहिती सांगितली. लेणीपासून जवळच असलेल्या जुणी गल्ली इथल्या पुरातन गढीचीही पाहणी यावेळी करण्यात आली. ** छत्रपती संभाजीनगर इथं देखील जागतिक वारसा सप्ताहानिमित्त पुरातत्व विभाग आणि इंटॅकच्या वतीने काल शहरातल्या सोनेरी महल परिसरात हेरिटेज वॉक घेण्यात आला. पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालक जया वाहाणे यांनी यावेळी वारसा सप्ताहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी या परिसराच्या इतिहासाबद्दल आणि स्मारकांबद्दल, तर पुरातत्व समन्वयक डॉ. कामाजी डक यांनी प्रादेशिक वस्तुसंग्रहालयात असलेल्या पुराणवस्तूंची सविस्तर माहिती दिली.
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आजपासून सुरु होत आहे. मुंबई इथले विचारवंत तुषार गांधी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी सिने कलावंत किरण माने असतील. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन महफिल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आज पशुगणनेला सुरुवात होत आहे. २१ व्या पंचवार्षिक पशुगणनेअंतर्गत विविध प्रजाती, लिंग -वयनिहाय ही गणना केली जाणार आहे. यासाठी नियुक्त प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
0 notes
Text
“मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना — मागेल त्याला शेततळे(Magel Tyala Shettale)” हा महाराष्ट्र राज्य सरकारने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत 2022–23 मध्ये सुरू केलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. राज्यातील शेतकरी, विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीवर अवलंबून असलेल्या पाणीटंचाईच्या आव्हानांना तोंड देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
योजनेचा उद्देश || Purpose of the Scheme:
महाराष्ट्रातील 82% शेतजमीन पावसावर अवलंबून असल्याने, शेतकरी अनेकदा विसंगत पावसाचा सामना करतात, ज्यामुळे पीक उत्पादन कमी होते आणि काही प्रकरणांमध्ये, संपूर्ण पीक अपयशी ठरते. “मागेल त्याला शेततळे” योजना, ज्याला वैयक्तिक शेत तलाव उपक्रम म्हणूनही ओळखले जाते, ही आव्हाने कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी आर्थिक सहा��्य प्रदान करून सुरू करण्यात आली. हे तलाव पावसाचे पाणी पकडण्यात आणि साठवण्यात मदत करतात, कोरड्या हंगामात सिंचनासाठी विश्वसनीय जलस्रोत सुनिश्चित करतात, ज्यामुळे पिकांचे संरक्षण होते आणि नुकसान कमी होते.
आर्थिक सहाय्य || Financial Assistance:
या योजनेअंतर्गत, वैयक्तिक शेतकरी शेततळ्याच्या आकारानुसार, किमान ₹14,433 ते कमाल ₹75,000 पर्यंतच्या अनुदानासाठी पात्र आहेत. या आर्थिक सहाय्याचा उद्देश तलाव बांधण्याशी संबंधित खर्च भागवणे आहे, ज्यामुळे शेतकरी त्यांच्या जमिनीवर शाश्वत पाण्याचे स्रोत निर्माण करू शकतात.
For More Info: Magel Tyala Shettale || मागेल त्याला शेततळे — मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना (gloriousmaharashtra.com)
#Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme#Magel Tyala Shettale#Individual Farm Pond#Maharashtra agriculture scheme#farm pond subsidy#water conservation#sustainable farming#rainfed agriculture#MahaDBT portal#Chhatrapati Shivaji Maharaj Krishi Yojana#farm irrigation#agricultural subsidies#Maharashtra Government schemes#farmer support#irrigation schemes
0 notes
Text
VAMNICOM Bharti 2024/VAMNICOM Pune Recruitment 2024
VAMNICOM पुणे जॉबच्या संधी VAMNICOM म्हणजे वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. ही भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सहकारी व्यवस्थापन संस्था आहे. VAMNICOM ही सहकारी व्यवस्थापन क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्लामसलत करणारी प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1967 मध्ये झाली आणि ती पुणे, महाराष्ट्र, भारत येथे आहे. ऑफर…
View On WordPress
0 notes
Text
देशात पुन्हा कोरोनाचा कहर
२४ तासांत आढळले ३,०३८ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोविड-१९ चे ३,०३८ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोविडचे २१,००० हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत कोविडमुे ७ मृत्यूची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये कोरोनामुे २, उत्तराखंडमध्ये १, महाराष्ट्रात १, जम्मूमध्ये १ आणि दिल्लीत २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज (मंगळवार) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड प्रकरणांची एकूण संख्या ४.४७ कोटी वर पोहोचली आहे. सध्या सक्रिय प्रकरणं एकूण संक्रमणांपैकी ०.०५ टक्के आहेत. Read the full article
0 notes
Text
HPCL मुंबई भरती 2023: विविध 65 रिक्त पदांची भरती जाहीर
HPCL मुंबई भरती 2023 - HPCL Mumbai Bharti 2023 HPCL Mumbai Bharti 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील एक आघाडीचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. कंपनी मुंबई आणि विशाखापट्टणम येथे असलेल्या रिफायनरीजसह पेट्रोलियम उत्पादनांचे शुद्धीकरण, साठवण, वितरण आणि विपणन यात गुंतलेली आहे. HPCL कडे भारतभर पसरलेली झोनल आणि प्रादेशिक कार्यालये, टर्मिनल्स, पाइपलाइन नेटवर्क्स, विमान सेवा केंद्रे, LPG बॉटलिंग प्लांट्स आणि अंतर्देशीय रिले डेपोचे विशाल नेटवर्क आहे. एचपीसीएल रिफायनरी विभाग मुंबई रिफायनरीमध्ये शिकाऊ कायदा, 1961 आणि नियमांच्या तरतुदीनुसार एकूण 65 शिकाऊ उमेदवारांना नियुक्त करण्याचा प्रस्ताव देत आहे. प्रस्तावित अप्रेंटिसशिप प्रोग्राममध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी यांसारख्या अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थींसाठी 40 पदांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल शाखेतील तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थींसाठी 25 पदे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार 16-03-2023 आणि 20-03-2023 दरम्यान NATS पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. HPCL मुंबई भरती 2023 - HPCL Mumbai Bharti 2023 Read the full article
0 notes
Text
'जी-२०' राष्ट्रांच्या अतिथी प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण
पुणे दि.१६- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या परिषदेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
मंत्रालयाच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवू : सावंत...
0 notes
Text
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट २०२३ मध्ये महाराष्ट्राचा सहभाग
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट २०२३ मध्ये महाराष्ट्राचा सहभाग
नवी दिल्ली, 10 : वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यासोबतच ऑक्टोबर 2023 मध्ये मेगा फूड इव्हेंट चे आयोजन केले जाणार आहे. यात महाराष्ट्रचा सहभाग असणार आहे. येथील विज्ञान भवनमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (एफपीआय) वतीने ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट 2023’ या विषयावरील बैठकीचे आयोजन येथे करण्यात आले. सर्व निवासी आयुक्तांसोबत…
View On WordPress
0 notes
Text
मंत्रालयाच्या गेटला ठोकलं टाळं, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
https://bharatlive.news/?p=184960 मंत्रालयाच्या गेटला ठोकलं टाळं, पोलिसांकडून आमदारांची धरपकड
मराठा ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 06 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
जल व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वतता याबाबत जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनातर्फे आजपासून पंधरा दिवसांचा जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रीय जल जीवन मिशन, पेयजल आणि स्वच्छता विभाग आणि जल शक्ती मंत्रालयाच्या सहकार्याने ही मोहिम राबवण्यात येत आहे. वी�� राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जलस्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण यासाठी नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्यात येणार आहे. पाण्याचा वापर आणि पाणी व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्यानं भाजपनं राज्यभरातील आपल्या चाळीस पदाधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पक्षशिस्त आणि अनुशासन भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं पक्षानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी दिलीप भोईर यांचं पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरुद्ध त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी स���ंगितलं.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील पाच नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्यानं निलंबनाची कारवाई केली. यात माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं स्वीपअंतर्गत तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधिज्ञ अनंतराव जगतकर यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वासाठी वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा करूनही उमेदवारी न मिळाल्यानं पक्षाचा राजीनामा देत असल्याचं जगतकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
धाराशिव तालुक्यातल्या तेर इथंल्या श्री संत गोरोबा काका कुंभार यांची पालखी काल कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी यांनी या पालखीचं धाराशिव शहरात स्वागत केलं.
परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या हस्ते जिल्हा परिषद परिसरात काल वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हा परिषद परिसर सुशोभ��करण करण्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरात करंज, गुलमोहोर, अशोक, जांभूळ, कदंब अशा विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील चार मतदारसंघांची सन १९८५ ते २०१९ या वर्षांतील पूर्वपीठिका- माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचं प्रकाशन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते काल झालं. या पुस्तिकेत जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणूकांची सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरात मतदान जनजागृतीसाठी काल सायकल रॅली काढण्यात आली. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा उच्चांकी मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केलं. या रॅलीत दीडशे सायकलस्वार सहभागी झाले होते. मतदारांनी यावेळी मतदान करण्याची शपथ घेतली.
संभाजी ब्रिगेड पक्षाद्वारे विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत दोन उमेदवारांसह राज्यात २५ उमेदवार असल्याची माहिती आज संभाजी ब्रिगेडचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुहास राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातल्या वार्ताहर परिषदेत दिली. पक्षाद्वारे मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड, जालना, बीड, धाराशिव, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, नाशिक, सांगली जिल्ह्यातून उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात काल पोलिसांनी कारवाई करत १५ हजार रूपयांचे प्रतिबंधित अमली पदार्थ जप्त केले. सुरत इथून खाजगी वाहनाद्वारे अमली पदार्थ आणले जात असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात नशेच्या गोळ्या तसंच औषध आणि शस्त्रांचा समावेश आहे.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त काल अखिल महाराष्ट्र विद्यामंदिर समितीच्यावतीनं दिलं जाणारं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी यांना प्रदान करण्यात आलं. सांगली इथं विष्णुदास भावे नाट्यगृहात शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. गौरव पदक, पंचवीस हजार रुपये, शाल आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
0 notes
Text
माल वाहने मानक delsp नुसार जीपीएस होतील
माल वाहने मानक delsp नुसार जीपीएस होतील
नवी दिल्ली. मालवाहू वाहनांच्या सुरक्षेचा विचार करून रस्ते वाहतूक मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या वाहनांमध्ये निश्चित दर्जाचे जीपीएस असेल, ज्याच्या मदतीने वाहनांवर लक्ष ठेवले जाईल. निश्चित मानकांसह जीपीएस पूर्वीपेक्षा अधिक आधुनिक असेल. हा टू-सिम मोबाईल प्रमाणे काम करेल, म्हणजेच देशातील कोणत्याही शहरात किंवा हवामानात जीपीएस नेहमी कनेक्टेड असेल. रस्ते वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना…
View On WordPress
0 notes
Text
NIN Pune Bharti 2024/NIN Bharti Pune/नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी-NIN
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी (NIN) ही भारतातील एक संस्था आहे जी नैसर्गिक उपचार पद्धती, जीवनशैलीतील बदल आणि नैसर्गिक उपचारांच्या वापरावर भर देणारी पर्यायी औषध प्रणाली, निसर्गोपचाराच्या प्रचार आणि संशोधनासाठी समर्पित आहे. ही संस्था पुणे, महाराष्ट्र, भारत येथे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीबद्दल येथे काही प्रमुख मुद्दे आहेत: स्थापना: भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या…
View On WordPress
0 notes
Text
धक्कादायक : मंत्रालयामध्ये एका व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न
धक्कादायक : मंत्रालयामध्ये एका व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न
गुरुवारी मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयात असलेल्या जाळीवर उडी घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे मात्र हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी खाली उतरवलं. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते. बघ्यांची गर्दी मंत्रालयाच्या आतील परिसरामध्ये जमली होती त्यामुळे काहीकाळ…
View On WordPress
0 notes
Text
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट २०२३ मध्ये महाराष्ट्राचा सहभाग
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट २०२३ मध्ये महाराष्���्राचा सहभाग
नवी दिल्ली, 10 : वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यासोबतच ऑक्टोबर 2023 मध्ये मेगा फूड इव्हेंट चे आयोजन केले जाणार आहे. यात महाराष्ट्रचा सहभाग असणार आहे. येथील विज्ञान भवनमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या (एफपीआय) वतीने ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष आणि मेगा फूड इव्हेंट 2023’ या विषयावरील बैठकीचे आयोजन येथे करण्यात आले. सर्व निवासी आयुक्तांसोबत…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्रातील युवक आणि महिलांना मिळणार उद्योजकता प्रोत्साहन
महाराष्ट्रातील युवक आणि महिलांना मिळणार उद्योजकता प्रोत्साहन
महाराष्ट्र चेंबर आणि एम.एस.एम.ई मंत्रालय संयुक्त अभियान राबवणार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मान्यता ब्युरो न्यूज । सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील युवकांना व महिलांना उद्योजकतेसाठी प्रेरित करून त्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व केंद्र सरकारच्या एम.एस.एम.ई मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबविण्यासाठी एम.एस.एम.ई…
View On WordPress
0 notes