#नोकरी निर्माण करा
Explore tagged Tumblr posts
Text
Career in Agriculture Sector | शेतकऱ्यांच्या पोरांनो! शेतीचा अभ्यास करूनही मिळताहेत लाखोंच्या नोकऱ्या; जाणून घ्या योग्यता
Career in Agriculture Sector | काळानुसार कृषी क्षेत्रातील शक्यता वाढल्या आहेत. आधुनिक शेतीमुळे तरुणांसाठी सुवर्ण भविष्याची दारे खुली झाली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. तरुणाईचा कलही या क्षेत्राकडे वाढला आहे. आजकाल कृषी क्षेत्रातील अनेक कोर्सेस टॉप ट्रेंडमध्ये आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हीही कृषी क्षेत्रात (Career in Agriculture Sector) लाखोंची नोकरी मिळवू शकता. शेतीतील करिअरमधून मोठी कमाई देशातील मोठी लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. वैज्ञानिक शेतीमुळे शेतकरी स्वावलंबी होत आहेत. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठीही ते प्रभावी ठरते. शेतकरी आपल्या शेतातील माती इत्यादी तपासल्यानंतरच शेतीमध्ये किती प्रमाणात खते टाकायची हे ठरवत आहेत. ठिकठिकाणी कृषी विज्ञान केंद्रे उघडण्यात आली असून शेतातील माती इत्यादीचे आरोग्य प्रयोगशाळांमध्ये तपासले जात आहे. अशा परिस्थितीत कृषी, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, वनीकरण, फलोत्पादन, अन्न आणि गृहविज्ञान अशा कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेऊन तुम्ही तुमचे करिअर वाढवू शकता. कृषी क्षेत्रातील विपणन आणि व्यवस्थापन क्षेत्रातही चांगले करिअर करता येते. हे विशेष अभ्यासक्रम आहेत - कृषी भौतिकशास्त्र - शेती व्यवसाय - वनस्पती पॅथॉलॉजी - वनस्पती प्रजनन आणि आनुवंशिकी - वृक्षारोपण व्यवस्थापन येथून कोर्स करा - भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली - भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था - राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था - अलाहाबाद कृषी संस्था - इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ - जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ - भारतीय कृषी संशोधन संस्था योग्यता काय आहे? तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कृषी शास्त्रज्ञ होण्यासाठी बीई किंवा डिप्लोमा इन अॅग्रिकल्चर करावे लागते. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी संबंधित विषयात स्पेशलायझेशन असावे. कृषी क्षेत्रात भरपूर नोकऱ्या तरुणांना दरवर्षी कृषी क्षेत्रात रोजगाराच्या सर्व संधी मिळतात. ICAR भारतीय कृषी संशोधन परिषदेत दरवर्षी नोकरीची संधी उपलब्ध असते. UPSC कृषी तज्ञाच्या नियुक्तीसाठी परीक्षा घेते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही शेतीशी संबंधित इतर क्षेत्रातील नोकऱ्या शोधू शकता. अनेक कंपन्या कृषी पदवीधरांना नोकऱ्या देतात. हे पदवीधर शेतकर्यांना बँकेतील किसान क्रेडिट कार्ड, कर्ज आदी कामात मदत करू शकतात. शेतीचा अनुभव असलेली व्यक्ती बँकेत फील्ड ऑफिसरच्या नोकरीसाठी चांगली मानली जाते. Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
��िनांक – २४ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
कैद्यांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी.
विविध क्षेत्रांच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास घडवण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त-कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांचं प्रतिपादन.
मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांची कोरोना काळातल्या व्यवहारांचीही चौकशी करावी -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आव्हान.
आणि
सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी मतदारसंघनिहाय जनजागृती करण्याचं निवडणूक विभागाच्या सूचना.
****
न्यायालयीन कोठडीत कैद्यांचे होणारे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं, केंद्र सरकार, सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना, मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. न्यायालयीन कोठडीत कैद्��ांकडून आत्महानी होते, ती कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बहुसंख्य कैद्यांचे नैसर्गिक मृत्यू आत्महत्यांमुळे होतात, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे. या पार्श्वभूमीवर, या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कारागृहातल्या कैद्यांना त्यांच्या नातलगांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्सऐवजी, स्मार्टकार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात या सेवेचा प्रारंभ, अपर तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झाला. येरवडा कारागृहातल्या या सुविधेचा आढावा घेऊन, राज्यातल्या इतर कारागृहात या सुविधेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, गुप्ता यांनी यावेळी दिली.
****
येत्या काळात विविध क्षेत्रांच्या गरजा ओळखून त्यानुरूप विद्यार्थ्यांची कौशल्यं विकासित करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरेल, असं प्रतिपादन कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळं राष्ट्रीय आकांक्षेनुसार देशाला विकासाच्या शिखरावर नेणारी संशोधक आणि व्यावसायिकांची पिढी घडेल असं सांगत, विद्यार्थ्यांनी फक्त ‘नोकरी शोधणारे’ न होता ‘नोकऱ्या निर्माण करणारे’ व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या दीक्षांत समारंभात २४९ संशोधकांना आचार्य पदवी, गुणवंतांना ��१९ सुवर्णपदकं, २३ रौप्यपदकं आणि २५ रोख पारितोषिकं, तसंच ४६ हजार १४४ विद्यार्थ्यांना पदवी आणि २३६ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देश विकासाच्या वाटेवर असून जगात भारताची प्रतिमा उंचावली असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वने, श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या कार्यासंदर्भात ते आज चंद्रपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. देशात २०१४ पूर्वी ९१ हजार किलोमीटर महामार्ग झाले होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात ५४ हजार किलोमीटर महामार्ग तयार झाल्याचं यादव यांनी सांगितलं. या काळात देशात १११ नवे जलमार्ग तयार झाले. २०१४ पूर्वी देशात फक्त ५ मेट्रो धावत होत्या, २०१४ नंतर १५ शहरात मेट्रो सुरू केल्या, तसंच गेल्या नऊ वर्षात नवीन ७०० रुग्णालयं सुरू केल्याची माहिती यादव यांनी दिली.
****
कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे. मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे आव्हान दिलं. कोरोना काळात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू होता. त्यानुसार सर्व काही उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. पाटण्यातल्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याबद्दल भाजपने केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. समान नागरी कायदा लागू करताना तसंच तपासणी करतानाही समान निकष लावा. केवळ विरोधकांच्या नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या आरोपांचीही केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
****
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं अमृत अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांना केंद्रीय अमृत अभियान पथकानं आज भेट दिली. या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेनं कोपरखैरणे आणि ऐरोली इथल्या सी टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलजलप्रक्रिया केंद्र उभारली आहेत. या पाण्याच्या वापराविषयीची माहिती पथकानं यावेळी घेतली.
****
वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्न रुग्णालयांना उपलब्ध सुविधा आणि मासिक कामगिरीच्या आधारावर पहिल्यांदाच मानांकन दिलं आहे. त्यानुसार अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आणि संलग्न सर्वोपचार रुग्णालयाला गोल्ड श्रेणीत स्थान मिळालं आहे. या यादीत अकोला जीएमसी अर्थात सामान्य वैद्यकीय परिषदेला सहावं स्थान मिळालं आहे.
****
परकीय व्यापार महा��ंचालनालय अर्थात डीजीएफटीनं भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्र��न निर्यात धोरण शिथिल केलं आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्यात सुलभीकरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे. या धोरणात बदल केल्यामुळं भारताला जागतिक पटलावर ड्रोन उत्पादक म्हणून चालना मिळेल तसंच स्टार्ट-अप आणि नवीन ड्रोन उत्पादक व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या चार हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी आता १० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार १० जुलै संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील, तर रात्री १२ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करता येणार आहे.
****
येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी नागरिकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती व्हावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम- २०२४, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांची प्रथमस्तरीय तपासणी’ या विषयावर यशदा इथं सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेत देशपांडे मार्गदर्शन करत होते. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या तंत्रज्ञानाविषयी वस्तुनिष्ठ माहिती होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये शिबीरं आणि प्रश्नमंजूषा आयोजित करावी. प्रचार प्रसिद्धीसाठी निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती देणारे छोटे-छोटे भाग करुन चित्रफिती तयार कराव्यात आणि समाजमाध्यमांचा वापर करावा अशा सूचना देशपांडे यांनी यावेळी दिल्या.
****
येत्या २६ जून रोजी येणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं जनजागृती सप्ताह पाळण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी नाशिक पोलीस आयुक्तालय आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. पंचवटी परिसरातून निघालेल्या या सायकल फेरीचा पोलिस कवायत मैदानावर समारोप झाला. यावेळी उपस्थितांनी आपलं शहर, राज्य आणि देश अंमली पदार्थ मुक्त करण्याची ��पथ घेतली.
****
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं बनावट आणि बेकायदेशीर दारूसाठा कंटेनरसह ३१ लाख ४९ हजार ५६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
0 notes
Text
टेस्ला सरकार तुम्हाला व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठ हवी असल्यास प्रथम येथे प्लांट लावा आणि रोजगार निर्माण करा
टेस्ला सरकार तुम्हाला व्यवसायासाठी भारतीय बाजारपेठ हवी असल्यास प्रथम येथे प्लांट लावा आणि रोजगार निर्माण करा
नवी दिल्ली. अमेरिकन ई-कार निर्माता टेस्ला भारत सरकारकडून आयात शुल्कात कपात करण्याची सातत्याने मागणी करत आहे, परंतु सरकारनेही त्याला साफ नकार दिला आहे आणि प्रथम उत्पादन कारखाना सुरू करण्याची अट घातली आहे. सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाने म्हटले आहे की टेस्लाला कोणतीही कर सूट मिळविण्यापूर्वी भारतात उत्पादन सुरू करावे लागेल. केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर म्हणाले, टेस्ला आपल्या बाजारपेठेसाठी…
View On WordPress
#आयात कर#ई कार#उत्पादन करणारा कारखाना#एलोन मस्क#जड उद्योग मंत्रालय#टेस्ला#नोकरी निर्माण करा#मोदी सरकार
0 notes
Text
*शाळेचा माझा पहिला दिवस*
आज दहा ऑगस्ट.माझा शाळेमध्ये हजर होण्याचा पहिला दिवस आज सुध्दा ते दिवस आठवला की अंगावर शहारा आणि तेवढीच हुरहुर वाटणारा तो दिवस.
आदल्या दिवशी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेच्या ऑर्डर दिल्या. मला ऑर्डर मिळाली.जावली पंचायत समितीकडून आता महाबळेश्वर तालुक्यात असलेले आरव हे ठिकाण जेथून चगदेव, सिंधी, यासारखी सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत किंवा सध्या पेपरमधे येत असतात.त्यांच्या जवळ असलेले हे आरव हे ठिकाण माझ्यासारखेच अनेक शिक्षकांना त्या भागातल्या ऑर्डर मिळालेल्या होत्या. आदल्या दिवशी अधिकार्यानी शिवसागर जलाशयांमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची मिटिंग हॉलमध्ये घेतली आपला प्रवास कुठून कसा होणार आहे याची पुसटशी कल्पना दिली कसे द्यावे ते सांगितले त्यावेळेस अंगावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
दुसरे दिवशी आमच्याच आळीतील श्री गोरख शिंदे या माझ्या बंधूला घेऊन आमचा प्रवास शाळा सर करण्यासाठी सुरू झाला एकतर घरात अठरा पगड दारिद्र्य त्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नव्हता एका पोत्यामध्ये एक महिन्यावर पुरेल एवढी चटणी कडधान्य रॉकेल स्टो हे साहित्य घेतला ऑर्डर घेतली कपडे घेतले झोपण्यासाठी दोन चादर घेतल्या. अन् शाळेच्या दिशेने प्रवास सुरू झाला लिंबाचीवाडीतून सकाळी लवकरच निघालो कारण सकाळी साडे न��ची बामनोली एस.टी सातारा डेपोतून हलते असे सांगण्यात आले होते त्यामुळे बंधु व मी प्रवासाला लागलो. एसटीनेच स्टॅंडवर पोचलो. माझ्यासारखे अनेक शिक्षक माझ्यासारखाच बाडा बिस्तार घेऊन स्टॅंडवर आलेली होती. आम्ही सर्वांनी बामणोली एस.टी वाट पहिली.आम्ही सर्वजण एसटीमध्ये बसलो अन् प्रवाशांना लागला
यापूर्वी जावळीच्या जंगलाच्या संदर्भात पुस्तकात वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभव कधीच घेतला नव्हता एसटीने सातारा सोडला हळुहळु ती कास पठाराला लागली. कांसच्या जवळ आली. जशी पुढे जाऊ लागली तसेच दोन्ही बाजूला असलेले घनदाट जंगल सतत पडणारा पाऊस या गोष्टी पाहून खरंतर मनामध्ये भीतीच वाटत होती कधी आपलं गाव येणार असं वाटतं पण एस्टीचा अखंड प्रवास चालत होता एक एक व्यक्ती एक एक शिक्षक कालपासून आपली गावं आली की उतरत होते सर्वांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होते मला पण वाटत होतं . जंगलातच कुठेतरी आपलं पण गाव असेल पण कुठलं काय एसटी बामनोली मध्ये आली आणि आमच्या पैकी राहिलेले काही एक शिक्षक एसटीने बामणोलीत मध्ये उतरलो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो परिसर पाहिला. उतरत्या छपराची घर लाल दगड आणि वेगळीच भाषा बोलणारी माणसं. आम्हांला वाटल लवकर पुढला प्रवास सुरू होणार आहे किंवा येथेच पुढे चालत आपल्या शाळेच्या गावात जायाचं असेल पण कशाचं काय एका शिक्षकांनी सांगितले आता सोडा आपली भाकरी अन् खायला सुरुवात करा तीनला लाँच त्या वेळी पुढचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत बसा. खरं पाहिलं तर आम्ही बामणोली पर्यंत येईपर्यंत भिजलो नव्हतो. पण एसटीतून उतरल्यापासून सतत पडणारा पाऊस यामुळे बऱ्यापैकी अंगांमध्ये थंडी भरायला सुरुवात झाली होती. छत्रीने अंग मोडायला सुरुवात केली होती सर्व काडया मोडायला मोडल्या होत्या. आता ते पोत्याला साहित्य चादर कपडे या सर्वांनी भिजायला सुरुवात केली होती काय करावे सुचत नव्हते असे करतच ३ वाजले.कोणीतरी आवाज दिला लॉन्च आली आणि आम्ही त्या समुद्रासारख्या दिसणाऱ्या शिवसागराच्या ठिकाणी पोहोचलो.लाँचमध्ये प्रथमच चढत होतो. लाँच म्हणजे काय असते ती गोष्ट प्रथमच पाहत होतो. बरेच नवे संबोध आज मिळत होते. तसाच गप्प लाँच वर चढलो. एका कोपऱ्यात जाऊन बसलो. आता पाण्यातून प्रवास सुरू झाला होता. लॅांन्चा धडधड आवाज येत होता. जुने प्रवासी गप्पा मारत होते. लांन्चावाला नवी शिक्षकांच्या ओळखी करून घेत होता. कोण कोठे उतरणार आहे याची खात्री करत होता. आम्ही मात्र गप्प होतो.मी मात्र शांत होतो. मला वाटाय��े त्या कुठल्यातरी पाण्याच्या किनाऱ्यावर आपलं गाव दिसेल त्या गावा उतरायचं आणि लगेच गावात गेल्यानंतर प्रमुखाची गाठ भेट घ्यायची आणि चित्रपटाप्रमाणे प्रवास सुरू करायचा. पण कशाचं काय लाँच सोळशी खोऱ्यांमध्ये गेली तिथून पुन्हा माघारी आली. पुन्हा शिंदी खोऱ्यांमध्ये घुसली. अशी गरज करत करत पुढे ती जात होती आता मात्र मी रडकुंडीला आलो होतो. मी आणि माझ्या सारखे एक शिक्षक तेवढेच राहिलेलो होतो. सांयकाळचे सहा वाजायला आले होते तरी सुध्दा गावचा पत्ता नव्हता. रात्र पडत चालली होती मी खूप घाबरलो तो चारी बाजूला दिसणारे पाणी जंगल. काय करावे ते कळत नव्हते माझे बंधू गोरख शिंदे सुद्धा घाबरलेले दिसत होते. आता ह्या असल्या अंधारात आम्हाला मोरणीला उतरवण्यात आले. आणि मला सांगण्यात आले की येथुन पुढे एक किलोमीटर अंतरावर आरव हे गाव आहे तुम्ही या जंगलातून उत्तरेला चालत जा. अशा रात्रीत परिसर नवा .रात्र, परिसराचा अंदाज नाही बॅटरीचा चांगली चालत नव्हती. वेगवगेळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. सापांची भीती होती. अशा परस्थितीत डोक्यावर बोझा. बंधु जवळ पिशवी .सर्व तोलत पुढे जात होतो. सर्व कपडे भिजले होते. काही सुचत नव्हतं जंगलातून पुढे जात होतो तो काळाकुट्ट अंधार होता कुठे घराचा किंवा कशाचा पत्ता लागत नव्हता. बराच वेळ चालतोय तरी गाव दिसत नव्हती काका म्हणाला बघ बाबा माघारी फिरू या पहिल्या गावात जाऊया. काय करावे ते सुचत नव्हते. सूचन्याचे ते वय सुध्दा नव्हते एकोणीस वर्षी सर्व्हिसला लागलो होतो. काय करावं ते कळत नव्हतं शिक्षक म्हणजे काय तेच मुळात समजत नव्हतं. काकाला म्हटले थोडा कड काढूया पुढे जाऊया तेवढ्यात जंगलांमध्ये जाळ दिसला अन् जाळच्या दिशेने जात राहिलो. आज कळते की जाळ म्हणजे त्या घरांमध्ये जनावरे अथवा थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेली लाकडांची भट्टी त्याला एक विशिष्ट नाव आहे आज मी विसरलोय खरं. शेवटी त्या घरांमध्ये पोहोचलो. घरात पोहोचलो आणि विचारलं गावाचं नाव काय? आणि ती व्यक्ती म्हटली *आरव* .-----
एवढा लेखनाचा प्रपंचा कशासाठी तर आज नोकरीला लागून *अठ्ठावीस वर्षे पूर्ण* झाली. पण आज सुद्धा तो नोकरीचा पहिला दिवस आठवला की ते दिवस आठवले शिवाय राहत नाहीत
----- श्री. कचरनाथ शिंदे
2 notes
·
View notes
Text
लातूर जिल्हा प्रशासनाकडून आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद - महासंवाद
लातूर जिल्हा प्रशासनाकडून आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद – महासंवाद
लातूर जिल्ह्याचा डि.एन.ए.नव निमिर्तीचा, जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल – जिल्हाधिकारी लातूर,दि.28 (जिमाका):- भारताचे येणारे दशक हे कौशल्याधारित सेवा उद्योगाचे असणार आहे. युवकांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात करुन कष्टाची तयारी ठेवावी. श्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो, हे लक्षात घेवून नवनव्या वाटा निर्माण करा. लातूरचा डि. एन. ए. नव निर्मितीचा आहे. जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल अशी…
View On WordPress
0 notes
Text
लातूर : जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर : जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.
लातूर : जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल – जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. लातूर :- भारताचे येणारे दशक हे कौशल्याधारित सेवा उद्योगाचे असणार आहे. युवकांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात करुन कष्टाची तयारी ठेवावी. श्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो, हे लक्षात घेवून नवनव्या वाटा निर्माण करा. लातूरचा डि. एन. ए. नव निर्मितीचा आहे. जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी…
View On WordPress
#‘लातूर#Adventure#आताची बातमी#कराल#जिथे#जिल्हाधिकारी#ट्रेंडिंग बातमी#तिथे#नोकरी#न्यूज अपडेट मराठी#पृथ्वीराज#फ्रेश बातमी#बातम्या#बी.पी.#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्राची बातमी#रेगुलर अपडेट#लातूरचा#लौकीक#वाढवाल#वायरल बातमी
0 notes
Text
लातूर जिल्हा प्रशासनाकडून आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद - महासंवाद
लातूर जिल्हा प्रशासनाकडून आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद – महासंवाद
लातूर जिल्ह्याचा डि.एन.ए.नव निमिर्तीचा, जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल – जिल्हाधिकारी लातूर,दि.28 (जिमाका):- भारताचे येणारे दशक हे कौशल्याधारित सेवा उद्योगाचे असणार आहे. युवकांनी अधिकाधिक कौशल्य आत्मसात करुन कष्टाची तयारी ठेवावी. श्रमाला कोणताही शॉर्टकट नसतो, हे लक्षात घेवून नवनव्या वाटा निर्माण करा. लातूरचा डि. एन. ए. नव निर्मितीचा आहे. जिथे नोकरी कराल, तिथे लातूरचा लौकीक वाढवाल अशी…
View On WordPress
0 notes
Photo
🚫 *चौथी चूक* 🚫
*अतिरिक्त लोकांना कामावर ठेवणे*
नमस्कार मी प्रसाद एरंडे,
आपण केलेल्या कंमेंट्स आणि इमेल्स पाहून खूपच छान वाटले.आपण पहिल्या तीन लेखांना दिलेला प्रतिसाद पाहून असे वाटते की जे मी मांडत आहे ते तुम्हा सर्वांबरोबरही घडले आहे. आणि आपल्या सर्वांचा प्रवासही एकच आहे.
व्यवसाय ��रत असताना ज्या पहिल्या तीन चुका मी केल्या त्यावरचे लेख तर तुम्ही वाचलेच असतील असे समजून मी माझी चौथी चूक तुमच्या समोर मांडत आहे. आणि ती म्हणजे " अतिरिक्त लोकांना कामावर ठेवणे ".
प्रत्येक बिझनेसमॅनचे स्वप्न असते की आपला व्यवसाय हा मोठा व्हायला पाहिजे.आणि त्यासाठी तो खूप प्रयत्न करत असतो. आता कोणताही व्यवसाय मोठा करायचा म्हणजे त्याला योग्य भांडवल व योग्य प्रकारचे कामगार मिळणेही आवश्यक असते. माझ्याकडे योग्य प्रमाणात भांडवल तर होतेच परंतु योग्य कामगार निवडणे यात माझी चूक होत होती.
कंपनीमध्ये जास्त लोक असतील तर जास्त काम होईल आणि जास्त नफा होईल असे मला वाटत होते. परंतु मी चुकीचा विचार करत होतो. जास्त लोकांपेक्षा कमी पण योग्य लोक असणे गरजेचे असते असे माझे ठाम मत आहे.
मी जेव्हा सॉक्स मॅनुफॅक्चरिंग कंपनी चालवत होतो तेव्हा अतिरिक्त लोकांमुळेच मला भांडवल कमी पडू लागले तसेच आज जी मी Advertising and Marketing कंपनी चालवत आहे. यामध्येसुद्धा सुरुवातीचे काही महिने मला त्रास सहन करावा लागला.
ज्या पद्धतीने मी विचार करतो तसे माझ्या लक्षात आले की प्रत्येक कामगार हा एक चांगले काम शोधत असतो आणि प्रत्येक व्यावसायिक हा एक चांगला कामगार शोधत असतो. परंतु जसजसे भारतीय व्यवसाय आणि Technology बदलत आहे तसतशी कामगारांची कामाची पद्धत व व्यावसायिकाची व्यवसायाची पद्धत बदलत आहे.
उदाहरणार्थ :- जर आपण १९९० च्या आधीचा विचार केला तर आपले आजोबा हे एकाच कंपनीत आयुष्यभर काम करायचे. जेव्हा ते सुरुवातीला कंपनीत काम करायचे, तेव्हा ते कोणाच्या तरी ओळखीने कामाला लागायचे आणि हळूहळू त्यांचा त्या कामाचा अनुभव वाढायचा आणि मग ते कंपनी मध्ये चांगल्या पदावर काम करायचे.
१९९० नंतर ज्या लोकांना काम मिळाले ते त्यांना अधिकतर शैक्षणिक गुणवत्तेवर मिळू लागले व त्यांनीही हळूहळू अनुभव घेवून आपली पात्रता सिद्ध करून चांगली पदे घेतली.
परंतु २०१० पासून भारतामध्ये technology चांगल्या प्रमाणात विकसित झाली आणि आता काम व कामगार यांच्यात तफावत निर्माण झाली.
एकाच कंपनीत आयुष्य घालवणे तसेच एकाच कंपनीत पुढची पदे मिळवणे अशी आजच्या कामगारांची मानसिकता नाही तसेच त्यांची गरजही नाही. Technology च्या दुनियेत जर तुमच्याकडे योग्य कौशल्य असेल तर प्रत्येक महिन्यात तुमच्या पगारात खूप मोठी वाढ होते. अशा परिस्थितीमुळे प्रत्येक व्यावसायिकाने या गोष्टीचा विचार नक्की केला पाहिजे की आज जी व्यक्ती माझ्याकडे काम करते ती आयुष्यभर माझ्याकडे काम करेलच असे अजिबात नाही.
जोपर्यंत तुम्ही त्याला योग्य ज्ञान, पुरेसे पैसे आणि कामाचा आनंद देत आहात तोपर्यंतच तो तुमचा कामगार अन्यथा तो लगेच दुसरी नोकरी बघेल. मी असे म्हणत नाही की ते तुमच्याकडे बांधून राहतील. त्यामुळे कोणताही व्यवसाय लोकांशिवाय होत नाही हे जरी मला मान्य असले तरी त्याच काही विशिष्ट लोकांवरच तुमचा व्यवसाय अवलंबून आहे असेही नाही.
बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे तुमचे हत्ती, राजा, राणी, घोडा, प्यादे हे आपल्या कामात ओळखा आणि त्याचप्रमाणे त्यांना काम व कामाचा मोबदला द्या आणि जर अतिरिक्त लोक की ज्यांच्याकडे कौशल्य कमी आहे पण त्यांची अपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना आपल्याबरोबर घेऊ नका कारण ते कधीही त्यांचे कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करणार नाहीत तर त्यांच्या अपेक्षा तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. आज मी १४ वर्ष व्यवसाय करीत आहे. कोणत्याही कामगाराबद्दल माझे मनापासून वाईट मत नाही परंतु एक गोष्ट नक्की त्यांच्यामुळेच माझ्या या चुका लक्षात आल्या आहेत. आणि त्याच लोकांना परत परत माझ्या बरोबर घेऊन मी पुन्हा त्याच चुका करणार नाही. आशा करतो मी केलेल्या चुकांमधून तुम्हाला काहीतरी फायदा होईल. जर आपल्याला माझा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये किंवा [email protected] यावर आपले मत कळवा.
धन्यवाद
प्रसाद एरंडे.
0 notes
Text
नांदेडात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन | संपूर्ण देशभरातून सहभागी होणार विविध संस्था ..
टेक्नोफेस्ट एक्सपो साठी डिजिटल इंडीया चे विशेष सहकार्य मिळणार
नांदेड – प्रतिनिधी येथील पोर्टल ईन्फोसिस् या तंत्रज्ञानाशी निगडीत आघाडीच्या संस्थेच्या वतीने येत्या एप्रिल महीन्याच्या पहील्या आठवड्यात टेक्नोफेस्ट एक्सपो चे आयोजन करण्यात आले असून यात शिक्षण, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील एक्सपो आणि प्रदर्शनांचे आयोजन. तज्ज्ञांद्वारे प्रकल्प आधारित रोमांचक शिक्षण सत्रे, ज्ञान आणि अनुभव सादर करण्यासाठी क्रॉस बॉर्डर नेटवर्किंग प्लॅटफॉर्म, असा कर्तृत्वाची ओळख करून देणार व्यापक व्यासपीठ या ठिकाणी लाभणार असल्याचे प्र��िपादन आयोजक श्री बाल��जी गायकवाड यांनी केले आहे.. तंत्रज्ञानाशी निगडीत स्पर्धेचे आयोजन व्दारे तंत्रज्ञानातील कौशल्य सादर करण्याची संधी निर्माण करून आम्ही तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये रस निर्माण करण्यासाठी प्रेरित करण्याचा हा आमचा एक प्रयत्न असून संधींचा महासागर शोधण्यासाठी तयार असलेल्या महत्त्वाकांक्षी मनांसाठी टेक्नोफेस्ट एक सशक्त व्यासपीठ आहे .. टेक्नोफेस्ट हा विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील सर्वात मोठा एक्स्पो ठरणार आहे या अंतर्गत
अर्डिनो चॅलेंज,ड्रोन चॅलेंज,रोबोट चॅलेंज व सर्व तंत्रज्ञानावरील आधारीत विविध प्रोजेक्टस् चे सादरीकरण या ठिकाणी होणार आहे, या सादरीकरणातून विविध फेऱ्यानंतर अंतिम विजेते घोषित करण्यात येणार आहेत .. टेक्नोफेस्ट एक्सपो साठी नांदेड जिल्हयातील सर्व शाळा आमंत्रित असून त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील इंजिजिरींग,कॉम्प्युटर, आर्टिफिशिअल इंटलिजन्स्, रोबोटिक्स्,ड्रोन, सॉफ्टवेअर कंपनीज्, तंत्रज्ञानाशी निगडीत व्यावसायिक संस्था यांचा सहभाग असणार आहे अशी माहीती पोर्टल ईन्फोसिस् च्या वतीने देण्यात आली आहे.. टेक्नोफेस्ट चे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट हे आहे की माहीती व तंत्रज्ञान क्षेत्रात स्वारस्य असलेल्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसोबत अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी तंत्रज्ञानाच्या ज्ञानावर आधारित विविध कौशल्ये सादरीकरणासाठीचे चे व्यापक व्यासपीठ निर्माण करणे हा आहे . टेक्नोफेस्ट एक्स्पो हा उद्योग, शैक्षणिक, सरकारी आणि राज्य संस्थांमधून येणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करणारा ठरेल तसेच राज्यातील सर्वात मोठ्या टेक्नोफेस्ट प्रदर्शनात दहा हजांरापेक्षा जास्त अभ्यागतांसमोर शैक्षणिक आणि तंत्रज्ञान नवकल्पना, उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्याची ही संधी असणार आहे. स्पर्धेसाठी पारीतोषिकाचे स्वरुप हे प्रत्येक गटातून ��्रथम,व्दितीय,तृतीय अशा प्रकारे असेल त्याबरोबरच सहभागी संस्थामधून सर्वात उत्कृष्ट सादरीकरणास इंटेलिजन्स् अवार्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.. सहभाग व अधिक माहीती साठी संपर्क: विविध शाळा,संस्था,महाविद्यालय आदींनी व व्यावसायिक प्रतिष्ठांन आदींनी https://technofest.in/ लिंकवर क्लिक करा किंवा ८६६८६७१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे रोबोटीक्स् .. तंत्रज्ञान काळाची गरज ..
आज जग हे अटोमोशन, ईलेक्ट्रिक कार व आणखी आधुनिक तंत्रज्ञानाकडे चालले आहे. फक्त सर्वसाधारण इंजिनिअरींग डिग्री करून पुरेसे नाही तर अद्ययावत शिक्षण जसे कि Robotics, Internet of Things (IoT), Artificial Intelligence (AI), Python, C, C++ programming, Virtual Reality (VR) हि काळाची गरज बनलेली आहे. औद्योगीक क्षेत्रातील प्रगती पाहता पुणे मुंबई,बेंगलोर,चैनई सारख्या ठिकाणचे पालक (मुख्यतः कंपनीत नोकरी करणारे) जागरुक असल्यामुळे या सर्व कौशल्य विकासा कडे वैयक्तिक लक्ष देतात. शाळेत असल्यापासूनच मूलांच जडण घडण सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने करतात आणि तेंव्हा कुठे हिच शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या रोबोटिक स्पर्धेत विविध प्रकारची पारितोषिक सुद्धा मिळवतात, आधुनिक जीवन हे यंत्रामुळे जास्त सोयीचे आणि -सुखकारक होत आहे. दैनंदिन जीवनात हे तंत्रज्ञान अत्र वस्त्र निवारा याबरोबरीने महत्त्वाचे होत चालले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण वापरत असलेला स्मार्टफोन आणि इंट���नेट. याच्याही पुढे जावून इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), Artificial Intelligence (AI), रोबोटिक्स, ड्रोन, ॲड्रॉइड अॅप्स आदी प्रणाली आपल्या प्रगतीच्या नवनवीन वाटा घेऊन येत आहेत. सभोवतालचे जग बदलत आहे आणि येणाऱ्या दशकामध्ये व्हर्चुअल रियालिटी (VR), Augmented Reality (AR), AI आणि IoT यावर आधारित अर्थव्यवस्थेची उभारणी होणार आहे. किंबहुना अशी अर्थव्यवस्था असणारे देश हे जास्त प्रभावी आणि बलशाली असतील. तंत्रज्ञानातील प्रगतीची गती पाहता शिक्षण क्षेत्रामध्ये काळानुरूप तसेच मुळातून बदल करायचा असेल तर ज्ञानासोबत प्रत्यक्ष यंत्र बनवून पाहणे या बाबीवर शालेय शिक्षणापासून भर दिला गेला पाहिजे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञान उपयोग आणि उपयुक्तता
ड्रोन’ हा ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यांचा नव्या संदर्भातील उपयुक्त आविष्कार. विशेष संशोधनापोटी ‘ड्रोन’ची निर्मिती झाली व त्याचे बहुविध उपयोग सर्वांना लक्षात आले व तेही अल्पावधीत! त्यामुळेच ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा केवळ प्रयोग न ठरता, त्याचे उपयोग व्यक्तीपासून व्यवसायापर्यंत व शेतीपासून शासनव्यवस्थेपर्यंत सर्वत्र उपयोगात येत असून, त्यामध्ये ज्या पद्धतीने वाढ झाली ते पाहणे अर्थातच लक्षणीय ठरते.आता हेच बघा ना, दिल्लीजवळच्या गुरुग्राम येथील ‘स्काय मोबिलिटी’ या कंपनीने आपल्या ग्राहकांची साधने व वस्तू विविध ठिकाणी पोहोचविण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत सुमारे १५०० तास ‘ड्रोन’ तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीपणे केला आहे. कंपनीचा हा प्रायोगिक प्रयत्न होता व त्याला अपेक्षेहून अधिक यश प्राप्त झाले, हे विशेष! कंपनीने या दरम्यान महत्त्वाचे कागदपत्र व दस्तावेज वैद्यकीय अहवाल, कोरडी वनौषधी, काही विशेष सामान यांची वाहतूक यशस्वीपणे करण्याचा शुभारंभ व्यावसायिक स्वरुपात केला. ‘ड्रोन’चा वापर प्रशासनिक स्तरावर होण्याचा अन्य यशस्वी प्रयोग टपाल खात्यातर्फे गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातही करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या कच्छच्या सुमारे ४६ किलोमीटर वाळवंटी प्रदेशात टपाल वाहतूक ‘ड्रोन’द्वारे करण्यात आली. ‘ड्रोन’ला या परिसरात वापराची परवानगी यावर्षी जूनमध्येच देण्यात आली, हे यासंदर्भात उल्लेखनीय. मुख्य म्हणजे, याठिकाणी वापरण्यात आलेले ‘ड्रोन’ पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे होते. या ‘ड्रोन’ची निर्मिती विशेषत: कृषीविषयक कामासाठी ‘लो-टेक वर्ल्ड एव्हिशन’ या ‘स्टार्ट अप’ कंपनीद्वारे करण्यात आली.भारतीय रेल्वेनेसुद्धा आपल्या कामकाजाला ‘ड्रोन’च्या उड्डाणाची जोड दिली आहे. रेल्वेने आपल्या प्रकल्प व्यवस्थापन व विशेषत: पूल निरीक्षण या जटिल कामांसाठी ‘ड्रोन’चा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रेल्वे व अधिकार्यांच्या मते अद्ययावत व वेगवान तंत्रज्ञान हे ‘ड्रोन’ आधारित कार्यपद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे व त्याचा रेल्वे प्रशासन आणि कामकाजाला कमी वेळ व श्रमात मोठा फायदा होत आहे. ‘ड्रोन’ तंत्रज्ञानचा उपयोग शेतीपासून वस्तूपुरवठा, निगराणी, दळणवळण या विविधकामी होऊ शकतो, हे सिद्ध झाले. दिल्ली-पानीपत या सुमारे १२० किलोमीटर लांबीच्या क्षेत्रात आपल्या पाईपलाईनची निगराणी व निगा राखण्यासाठी ‘इंडियन ऑईल’ने ‘ड्रोन’चा वापर सुरु केला, हा पथदर्शी प्रयत्न यशस्वी ठरल्याने त्याचे अनुकरण केले जाऊ लागले. शेतकर्यांच्या समूहशेतीपासून खाण कंपन्यांपर्यंत ‘ड्रोन’चा वापर केला जाऊ लागला व त्याचा वाढतच गेला. आर्डीनो तंत्रज्ञान Arduino: एक विहंगावलोकन Arduino काय आहे?
Arduino ही एक तंत्रज्ञान ��हे ज्याने टेक समुदायामध्ये अधिक रुची निर्माण केली आहे आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसेसच्या भविष्याबद्दल बर्याच संभाषणात ते दिसले आहे. Arduino एक तंत्रज्ञान आहे जे स्मार्ट डिव्हाइसेस अधिक प्रवेश करण्यायोग्य आणि प्रचलित आहे, प्रोटोटाइप आणि डिझाइनर, प्रोग्रामर आणि प्रासंगिक वापरकर्ते एकत्रित प्रयोग करून. या इंद्रियगोचर बद्दल अधिक जाणून घ्या आणि हे तंत्रज्ञान उद्योगासाठी महत्त्वाचे का आहे. Arduino प्लॅटफॉर्म आश्चर्यजनक अष्टपैलू आहे, आणि मायक्रोकंट्रोलर विकास सह प्रारंभ करण्यासाठी शोधत असलेल्या वापरकर्त्यांना बरेच पर्याय प्रदान करते. प्लॅटफॉर्मच्या इन आणि बहिष्कारांची जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काही नमुना प्रकल्पांचा प्रयत्न करणे. नवीन पातळीवरील प्रकल्प आपल्याला मंच, आयडीई आणि प्रोग्रामिंग भाषेसह स्वतःला परिचित करण्यास अनुमती देतात. हे प्रकल्प कल्पनांना Arduino प्लॅटफॉर्म काय सक्षम आहे याबद्दल काही संकेत प्रदान करणे आवश्यक आहे, त्यासाठी केवळ तंत्रज्ञानाची मूलभूत समज आवश्यक आहे. या कल्पनांनी स्वतःचे प्रोटोटाइप प्रकल्प तयार करण्यापूर्वी एक चांगला प्रारंभ बिंदू प्रदान केला पाहिजे. Arduino शिल्ड Arduino प्लॅटफॉर्मची अष्टपैलुता ही त्याच्या सर्वात मोठ्या मालमत्तेपैकी एक आहे, आणि Arduino शील्ड हे ज्याद्वारे साध्य करता येते त्यापैकी एक आहे. Arduino shields मॉड्यूलर ऍड-ऑन मुळ Arduino प्लॅटफॉर्मला विस्तारित करते जे त्याची क्षमता कनेक्टिव्हिटी, सेंसर, आणि आऊटपुट्सचे क्षेत्र आहे, इतरांदरम्यान. येथे आपण Arduino ढाल संकल्पना, आणि बर्याच ढाल प्रकारांची अनेक उदाहरणे पाहू शकता, हे स्पष्ट करताना की Arduino शील्ड इतके महत्त्वाचे का आहे अधिक » Arduino उॉनो Arduino विकास सह उडी घेत मध्ये स्वारस्य त्या साठी, एक निर्णय awaits; बर्याच संख्येतील अरडिनो आकृत्या अस्तित्वात आहेत, कारण बहुतेक अनुप्रयोगांची संख्या अलीकडे, तथापि, एक वर्णन, Arduino Uno सुरुवातीला साठी अब्राहम facto मानक निवड म्हणून उदयास आली आहे. इतर विशिष्टतांव्यतिरिक्त Arduino Uno कसे सेट करते ते शोधा आणि हे Arduino च्या जगाशी परिचय करून देण्यासाठी एक ठोस व्यासपीठ का प्रतिनिधित्व करते? इंटरमिजिएट / अॅडव्हान्स अर्डिनो प्रोजेक्ट आयडियाज काही मूलभूत प्रकल्प पूर्ण केल्यानंतर, आपण या प्लॅटफॉर्मची मर्यादा ताणून त्यांचे परीक्षण करणार्या Arduino प्रकल्पांसाठी काही प्रेरणा शोधत असाल. या ��रम्यानचे आणि प्रगत Arduino प्रकल्प विविध प्रकारच्या शिष्टाचार स्पॅन की मनोरंजक अनुप्रयोग तयार करण्यासाठी RFID, टेलीमेट्री, प्रणोदन, वेब APIs , आणि अधिक महत्वाची तंत्रज्ञान जसे प्लॅटफॉर्म एकत्र. जर आपण आपल्या Arduino प्रयोगांना रोबोटिक्स किंवा कनेक्टेड डिव्हाइसेसच्या जगात विस्तारित करण्यास इच्छुक असाल तर हे पाहण्यासाठीचे एक ठिकाण आहे. विज्ञान प्रदर्शनांचे फलित काय?
विज्ञान प्रदर्शन भरवणे हे महत्वाचे आहे कारण हे तरुण पिढीला विज्ञानाच्या मार्गाकडे नेते म्हणजेच या प्रकारच्या प्रदर्शनामुळे तरुणांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण होते आणि जर मुलांच्यामध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारची विज्ञानाविषयाची माहिती जाणून घेण्यास आवडते तसेच ते नवी नवीन गोष्टी करण्यास प्रोत्साहित होतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची विज्ञान प्रदर्शन भरवणे गरजेचे असते.. त्यामुळे ज्या मुलांना आवड आहे ती काहीतरी नवीन कल्पना घेवून स्पर्धेमध्ये किंवा प्रदर्शनामध्ये येतात आणि त्यामुळे वेगवेगळ्या कल्पना मिळतात तसेच लोकांना देखील वेगळ्या प्रकारची माहिती मिळते आणि माहिती घेणाऱ्या व्यक्तीला ते चांगल्या प्रकारे समजू शकते तसेच त्यांना ते समजावून घेन्यासाठी मनोरंजक देखील वाटेल कारण विज्ञान प्रदर्शनामध्ये संबधित प्रकल्पाची पातेक्षित दाखवली जातात… विज्ञान - तंत्रज्ञानावर आधारलेलं प्रदर्शन.. विज्ञान हा एक पद्धतशीर मार्ग आहे ज्यामध्ये ज्ञान मिळविण्यासाठी आणि कौशल्य सुधारण्यासाठी निरीक्षण आणि प्रयोग यांचा समावेश आहे; तंत्रज्ञान हे विज्ञानाचा व्यावहारिक अनुप्रयोग आहे जे जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. विज्ञान हा एक पद्धतशीर अभ्यास आहे आणि तंत्रज्ञान त्यातूनच बाहेर पडते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालतात म्हणजेच वैज्ञानिक प्रगती नेहमीच तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतर होते आणि नंतरचे केवळ आधीचेच निहितार्थ असते. सहभाग व अधिक माहीती साठी संपर्क विविध शाळा,संस्था,महाविद्यालय आदींनी व व्यावसायिक प्रतिष्ठांन आदींनी https://technofest.in/ लिंकवर क्लिक करा किंवा ८६६८६७१७१६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे टिम पोर्टल ईन्फोसिस .. डॉ.संतोष खमितकर, मा.संचालक स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, बालाजी गायकवाड, पोर्टल ईन्फोसिस, न��ंदेड, गजेंद्र ढोले, एमआयटी कॉलेज, वसमत, डॉ.दत्ता अंबेकर, न्युट्रीशनिस्ट, लातूर, महेंद्रसिंह गौर, सिंग अडव्हऱटायझिंग, नांदेड, वेदांत अवचार, नांदेड , मारोती सवंडकर, नांदेड , मिलिंद राजूरकर, संगणक अभियंता, नांदेड, कु.नक्षत्र गायकवाड,नांदेड , कु.अश्विनी पाटील, नांदेड Read the full article
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
भावी पिढ्या��साठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन.
राज्य सरकारच्या ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेला प्रारंभ.
छत्रपती संभाजीनगर नामकरणाविरोधात खासदार इम्तियाज जलील यांचं साखळी उपोषण.
आणि
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अव्वल.
****
भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनच्या स्वच्छ सुजल शक्ती सन्मान २०२३चं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भारतात शाळेत जाणाऱ्या मुलींचा वेळ पाणी आणण्यात जात होता आता मात्र हे चित्र बदलत चालल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात जलस्रोतांची शाश्वतता या संकल्पनेसह जलशक्ती अभियान - पावसाचे पाणी साठवा या मोहिमेचं उद्घाटनही राष्ट्रपतींनी केलं. जलशक्ती से नारी शक्ती या विषयावरची ध्वनिचित्रफीत आणि एका टपाल तिकीटाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. जलशक्ती मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही या कार्यक्रमात करण्यात आला.
****
देशाचा विकास, वारसा आणि मूल्य संवर्धनात युवकांनी योगदान देण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी केलं आहे. युवा उत्सव-इंडिया@2047चं पंजाबमधल्या रोपड इथं ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात दीडशे जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये ३१ मार्चपर्यंत युवा उत्सव आयोजित होणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातल्या १६ जिल्ह्यात आजपासून ३१ मार्चपर्यंत या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन केलं जाणार आहे.
****
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अंत्योदय साधण्यासाठी प्रशासनाचा चेहरा मानवी असण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा ���ांधी राष्ट्रीय रोजगार, ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र आणि शासनाच्या १७ विभागांच्या योजनांचं अभिसरण करून तयार करण्यात आलेल्या ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात आज ६४ लाख कामगार २७ हजार ग्राम पंचायतींच्या माध्यमातून काम करत असून त्यांच्या माध्यमातून ८ लाखांपेक्षा अधिक शाश्वत संपदा निर्माण होत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मनरेगा सुविधा संपन्न कुटुंब आणि ग्रामसमृद्धी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासनाने करावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नोकरी करण्यापेक्षा शेती केली तर मोठा लाभ होईल असे सांगून ‘काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात तयार करा’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने दरमहा दरडोई पाच किलो धान्य देणारी योजना थांबवण्यात आली आहे. आता या शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रतिलाभार्थी दीडशे रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातल्या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२३ पासून हा निर्णय लागू होणार आहे.
****
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे उपोषण करण्यात येत आहे. औरंगाबादचं नामांतर करण्याऐवजी नवीन शहर वसवून त्याला छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं, असं आवाहन खासदार जलील यांनी केलं. ते म्हणाले –
(खासदार इम्तियाज जलील)
आमचं एकच म्हणणं आहे की औरंगाबादचं नाव होतं ते औरंगाबादच ठेवायला पाहिजे. आणि समजा सरकारला असं वाटत असेल नाही कोणाचं नाव द्यायचं आहे, तर एक नवीन शहर उभारा. आणि त्या शहराला तुम्ही तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, आमचं काही म्हणणं नसणार. तुम्ही एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर उभारा आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या.
****
कांद्याचे भाव घसरल्यानं पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नगर- पुणे महामार्गावर सुपा चौकात आज सकाळी रस्ता रोको करत आक्रोश आंदोलन केलं. सरकारनं कांद्याच्या निर्यात धोरणामध्ये तातडीनं बदल करावेत तसंच नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही महसूल प्रशासनाचे अधिकारी आंदोलनाकडं आले नाहीत म्हणून लंके यांनी महसूल प्रशासनाचा निषेध केला. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं सांगत लंके यांनी सरकारनं यावर योग्य निर्णय घेतला नाही तर पुन्हा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
****
गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात १५ मार्��ला पुढील सुनावणी होणार आहे. वर्ष २००२ मध्ये घडलेल्या या प्रकरणातील दोन आरोपी हर्षद सोलंकी आणि मफत गोहील गेल्या १० वर्षांपासून कारागृहात आहेत. १३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. या दोन आरोपींबाबत निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र निकालाचं वाचन पूर्ण न झाल्याने आता १५ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा चौथा नामविस्तार दिनाचा सोहळा सोमवार ६ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली. सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचं उद्घाटनही यावेळी होणार आहे.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याकडून शैक्षणिक क्षेत्रात करण्यात आलेल्या अभिनंदनीय कामगिरीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना अवर सचिव सुनिल शिंदे आणि अपर मुख्य सचिव तसंच विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडून प्रशस्ती पत्र देण्यात आलं आहे. नीति आयोगाचे मिशन संचालकांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, नोव्हेंबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यानं शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान मिळवलं असून तीन कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळण्यास उस्मानाबाद जिल्हा पात्र ठरल्याचं म्हटलं आहे.
****
आज छत्रपती संभाजीनगर इथं स्व मग्न मुलांसाठी काम करणाऱ्या आरंभ या संस्थेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगानं आरंभ सक्षम पुरस्कार देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये चाळीसगाव इथं दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंदीप संस्थेच्या संस्थापक मनिषा निकम, नाशिक इथं प्रबोधिनी दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील शिक्षकेतर कर्मचारी सुजाता बलकवडे आणि दिव्यांग मुलांचं संगोपन करुन त्यांना सक्षम बनवणाऱ्या स्वाती रेवणकर यांना स्मृती चिन्ह, पाच हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना, स्व मग्न मुलांसाठी सहानुभूतीची नाही तर मदतीची गरज असल्याचं मत पोलीस उपायुक्त अपर्णा गित्ते यांनी व्यक्त केलं.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त आज जालना जिल्हा कृषी विभागाच्या वतीनं शहरातून मिलेट दौड काढण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय ते गांधी चमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह जिल्हा प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या सं��्येनं सहभाग घेतला. मानवी आहारात तृणधान्याचा समावेश अत्यंत महत्त्वाचा असून, या पिकांचं कमी होत असलेलं क्षेत्र वाढवणं गरजेचं असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी रणदिवे यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं.
****
आज ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणतर्फे लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. परिमंडल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय लाईनमन दिना निमित्त आज धुळे जिल्ह्यातल्या निजामपूर इथं आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते लाईनमन बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीज ग्राहकांना तसंच कृषी पंपांचा विज पुरवठा सुरळीत सुरु रहावा यासाठी वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे लाईनमन हे खरे वीज योध्दा आहेत असे गौरवोद्गार यावेळी आमदार गावीत यांनी काढले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग रायासिंग घुनावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं.
****
0 notes
Text
चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी उमेदवाराच्या विजयासाठी मुळशी येथे झालेली प्रचार सभा
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचार सभेमध्ये विरोधकांवर हल्ला चढवून बीजेपी सरकारच्या विविध योजना आणि निर्णयांची माहिती दिली.
खूप वेळा परिस्थितीमुळे माणसांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात आणि परिस्थितीची गरज म्हणून लोक स्वतःला बदलतात. भारतीय जनता पार्टीच्या आगामी निवडणुकांमधील यशासाठी महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या बाबतीतही असेच काही घडत आहे. अतिशय शांत आणि गंभीर व्यक्तिमत्व असणारे दादा पाटील आजकाल अतिशय आक्रमक होताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी मुळशी येथे एक प्रचार सभेला उपस्थिती लावली आणि त्या वेळी बीजेपी सरकारच्या वेगवेगळ्या योजना, कार्ये आणि निर्णयांची माहिती लोकांना करून दिली तसेच काँग्रेस सरकार वरही टीका केली.
महसूल मंत्र्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रभावशाली नेतृत्व आणि वेगवेगळ्या योजना आणि निर्णयांची स्तुती करून केली. त्यांनी 2014 मध्ये असणाऱ्या गुजरात पॅटर्न या परिस्थितीची आठवण करून दिली. तसेच त्यांनी हेही नमूद केले की गुजरात पॅटर्न हा संपूर्ण देशभरात स्तुत्य होता. पाच वर्षात त्यांनी देशामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत, यामध्ये शेतकरी,कामगार, स्त्रिया, विद्यार्��ी यांचा समावेश आहे. देशातील प्रत्येक खेडेगावाला या योजनांचा काहीना काही प्रकारे उपयोग झाला आहे. ताजे उदाहरण म्हणून त्यांनी आयुष्यमान भारत या योजनेचा उल्लेख केला. या योजनेमुळे पाच लाख रुपये इतके मूल्य असणारे आरोग्यविषयक फायदे, औषधे अथवा उपचार खर्च पात्र असणाऱ्या कुटुंबाला आता मिळू शकतील.
महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी अजून एक स्वयंसिद्ध उदाहरण उज्वला योजनेचे दिले. त्यांनी असे सांगितले की देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांना स्त्रियांच्या समस्या समजणार नाहीत, ते त्या विषयी अनभिज्ञ राहतील असा आरोप केला होता आणि याचे मूळ त्यांच्या वैवाहिक आयुष्याची निगडित होते. परंतु मोदीजींनी असे सिद्ध केले की स्त्रियांच्या समस्यांविषयी ते किती जागृत आहेत. त्यांनी खेड्यातील महिलांना मोफत गॅस सुविधा उपलब्ध करून दिली आणि ज्यामुळे महिलांच्या सुविधा आणि आरोग्य विषयक जाणिवा यामध्ये भर पडलेली आहे. आतापर्यंत सात करोड महिलांना मोफत गॅस जोडणीचा फायदा झाला आहे, तसेच 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत तोपर्यंत श्री नरेंद्र मोदीजी यांची अशी योजना आहे की भारतातील प्रत्येक महिलेकडे स्वतंत्र गॅस सुविधा उपलब्ध झालेली असेल आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची गरज पडणार नाही. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी महिलांशी निगडीत दुसरी योजना जिच्यामुळे गरोदर महिलांना फायदा झाला आहे आणि त्यांना विश्रांती, औषधे आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध होऊ शकेल हीदेखील स्पष्ट केली. तसेच त्यांनी असंघटित क्षेत्रातील नोकरांसाठी व कामगारांसाठी निर्माण करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनांबद्दल भाष्य केले. थोडक्यात श्री. मोदी यांनी बदलत्या आणि विकसित भारताची व्याख्या आणि चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
अनुभवी आणि तज्ञ कृषि मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी खिलाडूवृत्तीने तरुण आणि हुशार माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची देखील स्तुती केली. ते असे म्हणाले की 2014 च्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात एका नवीन नेतृत्वाचा उदय झाला. या तरुण आणि हुशार व्यक्तीने महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन दिशा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांच्या कर्तृत्वाने त्याने ते सिद्ध केले. आज आमच्या कार्यकाळाची पाच वर्षे पूर्ण होत असताना जवळपास सर्व धरणांचे प्रकल्प,पाणीपुरवठ्याचे प्रकल्प आणि वाहतूक रस्ते यांची कामे प्रगतीपथावर आहेत किंवा पूर्णत्वास गेलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये 2 दोन मोठे मैलाचे दगड पार झाले आहेत ज्यामध्ये मराठा आरक्षण प्रक्रियेचा समावेश होतो. ही 1968 पासून प्रलंबित असणारी प्रक्रिया आमच्या सरकारने अतिशय उत्��म रीतीने हाताळून यश मिळवले आहे. तीन महिन्यांमध्ये न्यायालय निकाल जाहीर होतील आणि 16 टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीसाठी मराठा समाजाला लागू झाले आहे.
फडणवीस सरकारचे दुसरे मोठे यश धनगर समाज आरक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने टी आय एस एस अहवालाची मदत घेतली आणि धनगर आणि धनगड या दोन समाजांमधील असणारा गोंधळ चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी काँग्रेस सरकारने अशा पद्धतीचा पद्धतशीर दृष्टिकोन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कधीच वापरला नव्हता. न्यायालयीन अंतिम निकाल हाती येईपर्यंत महाराष्ट्र शासन धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व सुविधा देण्यास बांधील आहे. यामध्ये आश्रम शाळा, ट्युशन फी, वसतिगृहे इत्यादींचा समावेश होतो. सद्य सरकारने या दोन गोष्टींमध्ये मिळवलेले यश कोणीच भविष्यात विसरू शकत नाही.
प्रचार सभेमध्ये बीजेपीला मत द्या असे आवाहन करताना श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढच्या काही वर्षांच्या योजना आणि त्यांचे भविष्य याविषयी भाष्य केले. त्यांनी असे मत मांडले की सर्व कामांची पूर्वतयारी आता झालेली आहे आणि उर्वरित कार्य, यामध्ये योजनांची योग्य रीतीने अंमलबजावणी व त्याचा फायदा शेतकरी, मजूर, स्त्रिया यांना होऊ शकेल यावर भर दिला जाईल. त्यांनी असेही सांगितले की बीजेपी सरकारला जर दोन तृतीयांश मतांनी यश मिळाले तर देशाच्या सुरक्षेसाठी काही निर्णय घेतले जातील. हे निर्णय संविधानाच्या कलम 370 शी निगडीत असतील. ज्याची दुरुस्ती अथवा रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल आणि त्यामुळे भारतीयांना काश्मीरमध्ये व्यवसाय, नोकरी अथवा जमिनींचे व्यवहार सहज रीतीने करता येतील.
भाषणाचा समारोप करताना त्यांनी लोकांना असे आवाहन केले की बीजेपीच्या उमेदवार सौ. कांचनताई कुल यांना विजयी करा आणि मी आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आपणाला राहिलेल्या कामांच्या पूर्ततेची ग्वाही देतो.
0 notes
Photo
अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत तत्परता दाखवता मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही ? – छत्रपती उदयनराजे भोसले पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवते मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही दाखवत असा सवाल भोसले यांनी केला आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे. - सरकार मराठा मुद्दा हाताळताना अपयशी ठरले आहे. आंदोलन हिंसक होण्यास सरकारच जबाबदार आहे. - मराठा आंदोलनातील मृतांना चार लाखाची मदत आणि घरातील एका व्यक्तीला नोकरी मिळण्याचे आश्वासन सरकार देते आहे याचा अर्थ मराठ्यांनी नोकऱ्या मिळवण्यासाठी आत्महत्या करायच्या का? - मुक मोर्चे सरकारने गांभीर्याने न घेतल्यानेच आंदोलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. - २५ वर्षे मराठा आरक्षणाचा प्रश्न लोंबकळत ठेवला आहे म्हणून तेव्हा पासून आज पर्यंतचे राज्यकर्ते दोषी आहेत. - सरकार अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत तत्पर आहे मग मराठा आरक्षणासाठी का नाही? मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आणखी तीन महिने असाच रखडून राहण्याची शक्यता उदयनराजेंनी बोलून दाखवली. मराठा समाज मला नेतृत्व करा म्हणतो आहे म्हणून आम्ही मराठा आरक्षण परिषद स्थापन करून पुढील रणनीती आखणार आहे असल्याचे यावेली उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
#उदयनराजे भोसले#मराठा आंदोलन#मराठा आरक्षण#मराठा क्रांती मोर्चा#maratha arakshan#maratha kranti morcha#pune news#Satara news#Udayanraje Bhosle
0 notes
Photo
श्रृंखला ०१ *स्वयंसेवक के लिए*.... #महाव्रती कर्मयोगी प्रचारक *सोहनसिंह जी* *आधुनिक युग के राष्ट्र ऋषि* *पुण्य-प्रसूता भारत माता ने अपनी कोख से अनेक लाल जने हैं ,जो समय-समय पर ध्रुवतारा बन समाज,धर्म व देश को दिशा देते रहते हैं । उन्हीं में से एक लाल मा सोहनसिंह जी थे,जो अपनी पढ़ाई पूरी कर नोकरी करके राष्ट्र-कार्य को प्राथमिकता देते हुए डॉ हेडगेवार के पथ के अनुगामी बने ।* उनके बारे मेने बहुत कुछ सुन रखा था , प्रत्यक्ष दर्शन करने पर मैं श्रद्धा से नतमस्तक हो गया । यूँ तो सोहनसिंह जी के सामने जाने में एक अनजाना-सा भय और संकोच मन में सदा बना रहता था, परंतु निकट बैठते ही वध् डर दूर हो जाता था । *वे ऊपर से जितना कठोर दिखते थे ,उससे भी कहीं अधिक कोमल हृदय थे । वे एक परिवार के मुखिया ,बड़े बुजर्ग के समान सदैव सही सलाह देते थे । उनके मार्गदर्शन में किया हर कार्य सफल हुआ है ।* एक कठोर तपस्वी की भांति अपने को तिल-तिल जलाकर उन्होंने अनेक कार्यकताओं का निर्माण किया । भूख , भय , बाधा उनको राष्ट्र-कार्य से डिगा नहीं सकी । *वे बातों -बातों में बड़ी सरलता से दायित्व-बोध करा देते थे । वर्ष 2008 की बात है । मैं उन दिनों विश्व हिंदू परिषद्, दिल्ली का अध्यक्ष था । दिल्ली में रामसेतु आंदोलन चल रहा था। उन्होंने मुझे के��व-कुञ्ज बुलाकर पूछा कि कार्यक्रम कैसे-कैसे होगा? क्या सोच है, क्या योजना है?* मैं साधारण बुद्धि का आदमी ,क्या योजना बताता । रामजी का काम है ,वे सब करा लेंगे , तब उन्होंने मेरा मार्गदर्शन किया । उनके बताये सुझाव व दिशा-बोध ने मुझे बहुत कुछ सिखाया मुझे लगा साक्षात् हनुमान जी सब बता रहे हैं । *और में यंत्रवत सब करता चला गया । वे इस आधुनिक युग के ऋषि थे । एक कुशल संगठक,एक अच्छे शिल्पकार,जिन्होंने अनेक ऐसी मूर्तिया गढीं ,जो माँ भारती की सेवा में आज भी लगी हैं ।* --------- *ओमप्रकाश सिंघल* (अंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष,विश्व हिंदू परिषद्) (at Ajmer)
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 November 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून वाटचाल करा; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपालांचं आवाहन.
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयकडून २५ जणांविरोधात गुन्हा दाखल.
जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यात ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्घाटन.
आणि
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याचा विचार सुरू - आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत.
****
अनेक भाषा अवगत करा मात्र, मातृभाषेचा अभिमान बाळगून पुढील वाटचाल करा, असं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी ते बोलत होते. ध्येयासाठी झपाटून कामाला लागाल तरच आयुष्यात यशस्वी व्हाल, इतिहासातून प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांचा आदर्श ठेवला तर संस्कार निर्माण होतील, परिणामी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असं मत राज्यपालांनी व्यक्त केलं. देशाला विश्वगुरु करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं –
सबसे पहले जब यहां से निकलेंगे, हम इस युनिव्हरसिटी से बाहर जायेंगे, तो आज यहां से संकल्प कर के जायेंगे की हम इस देश को विश्वगुरू बनाना है। देश को सर्वश्रेष्ठ बनाना है। चारों ओर वर्ल्ड क्लास सडक बन रही है। वर्ल्ड क्लास एअरपोर्ट बन रहे है। इसके लिए इच्छाशक्ती, संकल्पशक्ती, देश आगे बढ रहा है।
परम सुपर संगणकाचे जनक विजय भटकर यावेळी उपस्थित होते. जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश हे जसं आव्हान आहे तशी ती संधी असल्याचं भटकर यांनी नमूद केलं. संगणक, बायोटेक्नॉलॉजी, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान असे आधुनिक विषय मराठीतून शिकवणं गरजेचं असल्याचं मत विजय भटकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना यावेळी मानद डी. लिट. पदवी कुलपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
पवार यांनी यावेळी बोलताना, मराठवाड्यात साखरेवर संशोधन करणारी राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक संस्थ�� जालना इथं उभारण्यात येणार असून येत्या सहा महिन्यात या कामाला गती मिळणार असल्याची माहिती दिली.
तर गडकरी यांनी यावेळी केलेल्या भाषणातून विद्यार्थ्यांना नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बनण्याचं आवाहन केलं. आत्मनिर्भर भारत घडवण्यात तसंच भारताला सुपर इकोनॉमिक पावर बनवण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.
****
सुमारे २३ हजार कोटी रुपये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयने मुंबईतल्या एका खासगी कंपनी, तसंच कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकासह २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड असं या कंपनीचं नाव असून, या आरोपींनी २८ बॅंकांच्या समूहाची २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार भारतीय स्टेट बँकेनं केली होती. त्या तक्रारीच्या आधारे संबंधित कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक, संचालक, हमीदार, यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या अवमानकारक विधानाबाबत खासदार राहुल गांधी जाहीरपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. आज मुंबईत शिवाजी पार्क इथं शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ खासदार शेवाळे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला, त्यावेळी शेवाळे बोलत होते. शिवसेनेला सावरकरांविषयी खरोखरच आदर असेल तर त्यांनी त्वरित महाविकास आघाडीतून बाहेर पडायला हवं, असं शेवाळे म्हणाले.
****
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटलं आहे. खासदार सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं.
****
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे. लक्ष्मीबाईंनी देशासाठी दिलेलं अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. साम्राज्यवादाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा कायम प्रेरणादायक राहील असं मोदी यांनी म्हटलं आहे.
****
तरुणांना भारतीय वायुसेनेकडे आकर्षित करण्याचा उद्देशाने आज नागपूर इथं भारतीय वायुसेने कडून एअर फेस्ट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. वायुसेनेच्या वैमानिका��नी यावेळी चित्तथरारक हवाई कवायती सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. हवाई कवायती बघण्यासाठी नागपुरातील सुमारे ५ हजार नागरिक यावेळी सहभागी झाले होते.
****
५३ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीचं उद्या गोव्यात दिमाखदार सोहळ्यानं उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात ७९ देशातले २८० चित्रपट दाखवले जाणार आहेत. महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून पणजी शहर चित्रपटप्रेमींनी गजबजू लागलं आहे.
****
विकास कामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं, असं केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जल जीवन मिशन अंतर्गत जालना जिल्ह्यातल्या ७० गावांमधल्या ६६ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्घाटन आज जालना इथ दानवे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय योजनांचा फायदा घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी गावाचा सर्वांगिण विकास करावा, तसंच शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्याच्या माध्यमातून आथिक उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, असा सल्ला दानवे यांनी यावेळी दिला. या पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक कुटुंबाला ५५ लीटर पाणी दररोज मिळणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
माता सुरक्षित तर घर सुरक्षित ही राज्य शासनाची योजना देशभर राबवण्याच्या विचार सुरू असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे. ते आज परांडा इथं बोलत होते. केंद्र सरकारने या अभियानाचं कौतुक केलं असून आता केंद्र सरकार हे अभियान देशपातळीवर राबवण्याचा विचार करत आहे. राज्यात या अभियानास मिळालेला प्रतिसाद पाहता देशपातळीवर हे अभियान तेवढ्याच प्रमाणावर राबवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक पथक राज्यात अभ्यासासाठी पाठवत असल्याचं सावंत म्हणाले.
या अभियानाच्या माध्यमातून साडेतीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी केल्यानंतर राज्यातील सर्व महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सरकारी कार्यालयातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचं सावंत यांनी सांगितलं. तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उपचारांवर भर दिला जाणार आहे. आजारांचे निदान झालेल्या अधिकाऱ्यांना चांगले उपचार देण्याचे प्रयत्न केले जातील. ज्या महिलांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात उपचार केले जातील, असं सावंत यांनी सांगितलं.
ग्रामीण भागात होणारं पहिलं महाआरोग्य शिबिर २७ नोव्हेंबरला परांडा इथं आयोजित करण्यात आलं असून, यामध्ये राज्यभरातून सहा लाख नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. सावंत यांनी परांडा इथं या शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. परंडा शहरातल्या मुख्य रस्त्याच्या कामाचं भूमिपूजनही सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात आज पहाटेपूर्वी दोन वाजून सात ��िनिटांनी भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात होता. २ पूर्णांक ४ इतकी रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे परिसरात कोणतेही नुकसान झालं नाही. परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
शरद साखर कारखान्याच्या माध्यमातून मंत्री संदिपान भुमरे यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला असून, या व्यवहाराचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड ��सीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशासमोरचं प्रमुख उद्दीष्ट आधुनिक आणि आत्मनिर्भर बनण्याचं - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
** आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्याची गृह विभागाची सूचना
** राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू
आणि
** मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमयपुरस्कार डॉक्टर प्रकाश पवार यांना तर नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार प्राध्यापक दिलीप जगताप यांना जाहीर
****
देशाचं प्रमुख उद्दीष्ट स्वतःला आधुनिक आणि आत्मनिर्भर बनवण्याचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे निर्माण परिस्थितीमध्ये नवी विश्र्व व्यवस्था उभी रहात आहे आणि भारताला स्वयं प्रेरणेनं वेगानं पुढं जायचं असल्याचं त्यांनी आज उत्तराखंडमध्ये मसुरी इथं लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीच्या ९६ व्या अभ्यासक्रम समारोप प्रसंगी नमुद केलं. पंतप्रधान दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी एकवीसाव्या शतकातल्या भारताच्या लक्ष्यांना समोर ठेवावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नोकरी करताना सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेचा सिद्धांत असायला हवा आणि त्यांनी जर या दोन सिद्धांतांचं पालन केलं तर काम ओझं वाटणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले. सर्वांचे प्रयत्न खूप महत्वपूर्ण असून याचा नेहमी सकारात्मक उपयोग होतो. समस्या सोडवण्यासाठी आव्हानांना ओळखण खूप आवश्यक असतं, असंही मोदी यावेळी म्हणाले.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे सुमारे दोन हजार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. राज्यातलं या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक १ दशांश टक्के झालं आहे. राज्यात काल २३७ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ४५५ रुग्णांनी या आजारावर मात केली. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७१हजार ८०३ जणांना या संसर्गाची लागण झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २१ हजार ९६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ४३ हजार सातशे एकोणसाठ रुग्ण दगावले आहेत. राज्यात या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचा दर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.
****
होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीबाबत गृह विभागानं आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हा उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र अथवा गर्दी न करता स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरा करावा, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण साजरा करताना प्रशासकीय नियमांचं पालन आवश्यक असल्याचं याद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. होळी सणानिमित्तानं काही भागात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनानं उपाययोजना कराव्यात. नियमांचं तंतोतंत पालन होईल याकडे सर्वोतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी, असंही गृह विभागानं म्हटलं आहे.
****
रस्त्यावर आणि अन्य ठिकाणी विक्री केले जाणारे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रातून बांधून द्यायला अन्न आणि औषध प्रशासनानं मनाई केली आहे. तळलेले पदार्थ, मिठाई, बेकरी उत्पादनं वर्तमानपत्रात बांधून दिली, तर ही शाई या पदार्थांना लागते आणि ती तशीच पोटात जाते. या शाईमुळे कर्करोगासारखा घातक आजारही होऊ शकतो, म्हणून प्रशासनानं या विरोधात कडक पावलं उचलली आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमयपुरस्कार “भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय” या ग्रंथासाठी डॉ.प्रकाश पवार यांना तर नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार नाटककार म्हणून मराठी रंगभूमीवरील लक्षणीय कामगिरीसाठी प्रा. दिलीप जगताप यांना जाहीर झाला आहे. प्रसिद्धी साहित्यिक डॉ.सतीश साळुंके यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. येत्या रविवारी परिषदेच्या डॉ. ना.गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार असल्याचं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या गुलमंडी इथं सामाजिक उपक्रमांद्वारे आज होलीका दहनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अनाथ बालकांसोबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं उद्या धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं प्रियदर्शनी इंदिरानगरमध्ये महापालिकेच्या केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात आज पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटवण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात आली.
****
परभणी शहरातल्या जुन्या पेडगाव आणि वसमत मार्गावरच्या बाल गृहातल्या अनाथ मुलांना होळीचा सण चांगल्या प्रकारे साजरा करता यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे या दोन्ही बालगृहांत नैसर्गिक कोरड्या रंगाचं वाटप करण्यात आलं. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाल गृहातल्या या अनाथ मुलांसोबत होळी साजरी करणार आहेत.
****
औरंगाबादमध्ये काल एका व्यावसायिकाचे सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आरोपींनी कट रचून शहरातल्या मालमत्ता खरेदी विक्री व्यावसायिक अशोक पाटील यांच्या कार्यालयातून चार सोन्याच्या साखळ्या काल चोरल्या होत्या.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शाळा, विद्यार्थी आणि पालक यांनी समन्वय साधून गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, असं आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. परभणी इथं आज शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी पंचायत आणि शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी टाकसाळे बोलत होते. शैक्षणिक गुणवत्ता वाढीची प्रक्रिया प्रभावी ठरण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थांना नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून लोकसहभागातून शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 March 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· मराठा समाजाबाबतच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं उपोषण मागे
· नागपूर जिल्ह्यातील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता जप्त
· कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यानं राज्यात भारनियमन लागू करण्याचे ऊर्जामंत्र्याचे संकेत
· राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची तर मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे यांची नियुक्ती
· राज्यातकोविड संसर्गाचे ४०७ नवे रुग्ण, मराठवाड्यात दोन जणांचा मृत्यू तर ३३ बाधित
आणि
· महाशिवरात्रीनिमित्त वेरुळच्या घृष्णेश्वर, परळीच्या वैद्यनाथ आणि औंढ्याच्या नागनाथ ज्योर्तिलिंग मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
****
मराठा समाजाबाबत केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्यानंतर, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपलं उपोषण काल मागे घेतलं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी काल उपोषण स्थळी जाऊन संभाजीराजे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी केलेल्या सर्व १५ मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यानंतर खासदार संभाजी राजे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.
सारथीचे कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येतील, तसंच रिक्त पद १५ मार्च २०२२ पर्यंत भरण्यात येतील, आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव १५ मार्च २०२२ पर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला, चालू आर्थिक वर्षातील २० कोटी आणि पुरवणी मागणीद्वारे अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कर्जावरील व्याज परताव्याबाबत शासन धोरण ठरवेल, जिल्हा स्तरांवरच्या वसतिगृहांचं उद्घाटन गुडीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिकेची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्याबाबत, १५ दिवसाच्या आत सर्वोच्च न्यायालयात अर्ज करण्यात येईल, मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीबाबत गृहमंत्रालयाकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेण्यात येईल, आणि मराठा आंदोलनात मृत पावलेल्याच्या वारसदारांना कागदपत्रांची पुर्तता करून नोकरी देण्यात येईल, आदी निर्णय शासनानं घेतल्याचं, मंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातल्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची बेकायदेशिर लिलावातील १३ कोटी ४१ रूपयांची मालमत्ता, सक्तवसुली संचालनालय- ईडीनं जप्त केली आहे. ईडीनं काल ट्.विट करुन ही माहिती दिली. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लिलावात हा साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकला गेला होता. अहमदनगर जिल्ह्यातले राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हा साखर कारखाना विकत घेतला होता. या कारवाईत ईडीनं साखर कारखान्याच्या मालकीची ९० एकर शेत जमिन आणि जवळपास साडेचार एकर अकृषिक जमिनही जप्त केली आहे.
****
राज्यातल्या औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं, राज्यात भारनियमन करावं लागू शकतं, असे संकेत, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. अकोला जिल्ह्यातल्या बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी आणि घोटा इथल्या वीज उपकेंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात सध्या सहा लाख ७५ हजार मेट्रिक टन कोळसा शिल्लक आहे. राज्यातल्या सात वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये, रोज एक ते दीड लाख मेट्रिक टनापर्यंत कोळसा लागतो, मात्र तुटवडा झाल्यास भारनियमन होऊ शकतं तसंच ग्राहकांनी वीज देयकं त्वरीत भरावीत अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, काल जळगाव इथं वार्ताहरांशी बोलतांना, आपली भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, त्यांच्याबाबत आपण सुरुवातीच्या काळात जे वाचलं होतं, त्यावरून समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे गुरू आहेत अशी आपल्याला माहिती होती. मात्र इतिहासातील काही तथ्यं मला सांगण्यात आली आहेत. आपण ती तथ्यं तपासून घेऊ असं ते म्हणाले.
****
राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार श्रीवास्तव यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलेली आहे. मावळते मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती काल नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
****
सध्या राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून काम पाहणारे संजय पांडे यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काल गृह विभागाने याबाबतचे आदेश जारी केले.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४०७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ६५ हजार ७०५ झाली आहे. काल चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ७०१ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ९६७ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ११ हजार ३४३ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ०४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात काल ओमायक्रॉन संसर्गाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
मराठवाड्यात काल ३३ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. तर औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात ११ नवे रुग्ण आढळले. औरंगाबाद सात, उस्मानाबाद चार, लातूर पाच, जालना तीन, परभणी दोन, तर नांदेड जिल्ह्यात एका नव्या रुग्णाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
महाशिवरात्र आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथलं घृष्णेश्वर मंदीर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ मंदीर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे. वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदीराच्या गाभाऱ्यात, भाविकांना दर्शन घेता येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातल्या सर्व धार्मिक, प्रार्थनास्थळ तसंच महापुरुषांचे पुतळे, आदि ठिकाणी जवळून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यास परवानगी दिली आहे. पर्यटन स्थळांवर पर्यटकांना ऑनलाईनबरोबरच आता ऑफलाईन तिकीट विक्री करण्याचे निर्देशही, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र, या पर्यटनस्थळांवर कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या व्यक्तीनांच प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, महाशिवरात्री निमित्तान घृष्णेश्वर मंदीरात देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास तीन ते चार लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार औरंगाबादहून कन्नड - धुळे कडे जाणारी सर्व जड वाहनं, दौलताबाद - माळीवाडा - कसाबखेडा फाटा मार्गे जातील आणि फुलंब्री मार्गे खुलताबादला येणारी सर्व वाहनं औरंगाबाद मार्गे वळवण्यात आली आहेत.
महाशिवरात्री निमित्त नांदेड जिल्ह्यातल्या मरळक, काळेश्वर आणि गंगणबीट इथल्या शिवमंदिरात पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
****
गोरगरीबांना उच्च शिक्षण���च्या संधी मिळाव्यात यासाठीच नांदेड इथं शैक्षणिक संस्था उभारण्यावर भर दिला, आणि नांदेड हे शिक्षणाच्या दृष्टीनं महत्वाचं केंद्र साकारु शकलो, असं मत, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात, डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलासह इतर विविध कामांचं भूमिपूजन, काल चव्हाण यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. नांदेड महानगरच्या गरजा लक्षात घेऊन वैद्यकीय सेवा-सुविधाही भक्कम करण्यावर भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना-नांदेड या १७८ किलोमीटर द्रुतगती महामार्गाचा पालकमंत्री राजेश टोपे यांनी काल जालना इथं आढावा घेतला. जिल्ह्यात महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या संयुक्त मोजणी दरम्यान येणाऱ्या अडचणी जाणून घेत शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रतवारीनुसार अधिकचा दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातल्या जालना, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या २९ गावांमधून जाणाऱ्या ६६ पूर्णांक चार किलोमीटर लांबीच्या महामार्गाच उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांनी पालकमंत्र्यासमोर सादरीकरण केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं, सुगंधित सुपारी आणि गुटखा बनवण्याचं साहित्य असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काल रात्री ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सदर ट्रक चालक आणि क्लिनरला अटक केली आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा ‘लोटू पाटील नाट्य पुरस्कार’ प्रसिद्ध रंगकर्मी दिलीप जगताप यांना, आणि ‘यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार’, ‘भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय’, या पुस्तकासाठी, डॉ. प्रकाश पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या २० मार्च ला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं ही घोषणा केली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूरला तालुक्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी, तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीनं, काल नांदेड - हिंगोली रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्यावेळी विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आमदार संतोष बांगर यांनी भेट देत तालुका निर्मितीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासान दिलं. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती.
****
विज्ञान व्यक्तीच्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला आहे. या विज्ञानाचा हेतू विश्वकल्याण असल्याचं प्रतिपादन, आरोग्य क्षेत्रातले संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या वतीनं औरंगाबाद इथल्या विवेकानंद महाविद्यालयात आयोजित ‘विज्ञान प्रसार महोत्सवाचा' समारोप, काल राष्ट्रीय विज्ञान दिनी, डॉ. बावस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. संपूर्ण आठवडाभर घेण्यात आलेल्या विविध विज्ञानकेंद्री स्पर्धांच्या विजेत्यांना, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस प्रदान करुन गौरवण्यात आलं.
****
परभणी तालुक्यातल्या दुधना नदीवरच्या हिंगला गावाजवळच्या अर्धवट पुलाचं बांधकाम पुर्ण करण्याची मागणी, प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं आहे. पुलाचं बांधकाम सुरू असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून नदीपात्रातून प्रवास करावा लागत असल्याचं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****
0 notes