#टेक्नॉलॉजी बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद
केंद्र सरकारने आरक्षण ५० टक्क्यांच्या वर न्यावं तसंच जातीनिहाय जनगणना करावी-शिर्डीच्या प्रचार सभेतून प्रियांका गांधी यांचं आव्हान
मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना जाहीर
****
राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नमो ऍपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या संकल्पनेतून साधलेल्या या संवादात, पंतप्रधानांनी महायुतीच्या कामाबद्दल जनता समाधानी असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाजपा सुरुवातीपासून मध्यमवर्गाच्या आकांक्षांवर लक्ष केंद्रीत करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गाचं योगदान सगळ्यात जास्त असल्याचं लक्षात घेऊन, त्यांच्यावरचा कराचा बोजा कमी केल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
****
केंद्र सरकारने आरक्षणाचं प्रमाण ५० टक्क्यांच्या वर न्यावं, आणि जातीनिहाय जनगणना करावी असं आव्हान काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील साकुरी इथल्या प्रचार सभेत त्या आज बोलत होत्या. दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग आणि बेरोजगारी या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली.
****
��ाज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये हमीभाव तसंच कांद्याला विशेष समिती नेमून योग्य भाव देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असं आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. ते आज अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभेत बोलत होते. देशाच्या विकासात काँग्रेसनं अमूल्य योगदान दिलं असून काँग्रेस नेहमीच शेवटच्या घटकाचा सर्वात आधी विचार करते असं राहुल गांधी म्हणाले.
****
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती चिंताजनक असल्याचं मत काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, सांगली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटील यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
****
येत्या ५ वर्षात मुंबईकरांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव मोठ्या प्रमाणात सुखद होईल, असं आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते.
मनोरंजन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ यावं यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी ची स्थापना करायला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यातली पाहिली संस्था मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा वैष्णव यांनी केली.
****
शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात दापोली मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार योगेश रामदास कदम तसंच गुहागर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारासाठी यांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. राज्यात महायुतीला १७० जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
महाराष्ट्रात राजकीय स्थिरतेसाठी तसंच विकास आणि सुरक्षिततेसाठी महायुती हाच पर्याय आहे. असं मत भारतीय जनता पक्षाचे नेते सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केलं. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुरक्षितेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे चांगलं राज्य असल्यानं इथं गुंतवणूकही वाढत आहे असं सिंह यांनी सांगितलं.
****
विधानसभेत हमी भावाचा कायदा व्हावा, यासाठी आपण आग्रही असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. अकोला जिल्हयातल्या कुरणखेड इथल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. दरम्यान, आज सायंकाळी छत्रपती संभाजीनगर इथं आंबेडकर यांची प्रचारसभा होणार आहे.
****
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मा��ावती यांची उद्या, रविवारी पुण्यातील येरवडा परिसरात सभा होणार आहे. द��पारी १२ वाजता ही महासभा आयोजित करण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रचाराचा अवधी संपत असल्याने, उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. घरोघरी जाऊन प्रचारावर अधिक भर असल्याचं पहायला मिळत आहे.
जालना जिल्ह्यात महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी आज ग्रामीण भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगर इथे आज ऑल इंडिया मजलिस- ए- इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे नेते माजेद हुसेन सहाब यांची पक्षाच्या उमेदवारांसाठी रोशन गेट येथे सभा होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी आज पैठण मतदार संघातील पक्षाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ पैठण तालुक्यातील चिंतेपिंपळगाव येथे सभा घेतली. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी मतदार संघात जनतेशी संवाद साधला.
****
विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात जैवविविधता, सांस्कृतिक-सामाजिक वारशांचं दर्शन, स्तन्यदा-गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा, दिव्यांग तसंच महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचं पाणी तसंच स्वच्छतागृहांची सोय देखील उपलब्ध असणार आहे.
****
स्वीप कार्यक्रमाअंतर्गत राज्यभर मतदार जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. लातूर जिल्ह्यात अभंग, गवळणी, भारुड, गोंधळगीत, पोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जात आहे. जिल्ह्यात १२१ शाळांमधल्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारांपेक्ष��� जास्त पालकांपर्यंत पोहोचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलं.
तुळजापूर इथं ३७ शाळेतील ३७०० विद्यार्थी तसंच ३२१ शिक्षकासह जनजागृती फेरी काढण्यात आली. हातात घोषवाक्याचे फलक घेऊन शहरातील विविध भागातून या फेरीनं जनजागृती केली.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथली एमबीएची विद्यार्थिनी असलेल्या साक्षी वैद्य या नवमतदार तरुणीनेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट – साक्षी वैद्य
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ��कता येईल.
****
निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा चड्डा -बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अनंत भालेराव प्रतिष्ठानचे संजीव कुलकर्णी आणि हेमंत मिरखेलकर यांनी नांदेड इथं ही माहिती दिली. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉ. मीरा बोरवणकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
राज्याचे टपाली मतपत्रिका राज्यसमन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात आलं आहे. सर्व २८८ विधानसभा मतदार संघातल्या टपाली मतपत्रिकांचं संकलन तसंच वितरण या केंद्रातून केलं जात आहे. मतदान झालेल्या सुमारे २२ हजारांहून अधिक तसंच कोऱ्या मतपत्रिकांचं हस्तांतरण या ठिकाणी सुरु असल्याची माहिती, नोडल अधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज या केंद्राला भेट देऊन कामाची पाहणी केली.
****
जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघामध्ये एक हजार ७५५ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर पुरवण्यात आलेल्या असून सर्वच केंद्रावर दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी विशेष दोन स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ही माहिती दिली.
****
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १९ आणि २० नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या राजकीय जाहिरातींचं पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक असल्याचं बीडच्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीकडून सांगण्यात आलं आहे. यासोबतच दूरचित्रवाणी वाहिन्या, दृक-श्राव्य जाहिरातींचे देखील पूर्व प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे.
दरम्यान, राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणाची मुदत उद्या संपत असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितलं आहे. सोशल मीडिया तसंच यू-ट्यूबर्सना मतदानापूर्वी शेवटच्या ४८ तासात प्रचार प्रसारास बंदी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघात एकूण ५३१ मतदारांचं गृहमतदान घेण्यात आलं. यामध्ये ४८५ वयोवृद्ध आणि ४६ दिव्यांगांचा समावेश आहे. ५७६ मतदारांनी गृहमतदानासाठी अर्ज केले होते. अर्जांनुसार गेले दोन दिवस मतदान करण्याची सुविधा प्रशासनाकडून देण्यात आली होती.
****
नांदेड शहरात आज मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीत महापालिकेतील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
****
भूखंड घो��ाळा प्रकरणात मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.
****
0 notes
Text
Vivo देत आहे जोरदार ऑफर, खास लोकांना Free फ्री पाहता येणार World Cup, जाणून घ्या डिटेल्स
Vivo देत आहे जोरदार ऑफर, खास लोकांना Free फ्री पाहता येणार World Cup, जाणून घ्या डिटेल्स
Vivo देत आहे जोरदार ऑफर, खास लोकांना Free फ्री पाहता येणार World Cup, जाणून घ्या डिटेल्स Vivo ऑफर्स: स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपल्या युजर्ससाठी अनेक आश्चर्यकारक ऑफर आणि सूट जाहीर केल्या आहेत. यात स्मार्टफोन डील्ससोबत, तुम्हाला वर्ल्ड कप पाहण्याची संधी देखील मिळू शकते. कसे ? जाणून घेऊया. Vivo ऑफर्स: स्मार्टफोन ब्रँड Vivo ने आपल्या युजर्ससाठी अनेक आश्चर्यकारक ऑफर आणि सूट जाहीर केल्या आहेत. यात…
View On WordPress
#cup#free#vivo#world#आहे#ऑफर#खास#घ्या#जाणून#जोरदार#टेक बातमी#टेक बातम्या#टेक्नॉलॉजी#टेक्नॉलॉजी बातम्या#ट्रेंडिंग बातम्या#डिटेल्स#तंत्रज्ञान बातम्या#देत#पाहता#फ्री#भारत लाईव्ह मीडिया#येणार#लोकांना#वायरल बातम्या
0 notes
Text
रिलायन्स जिओ रिचार्ज 2 जीबी इंटरनेट पॅकच्या किमतीच्या सवलतीने लोक वेडे झाले आहेत मीम्स पहा
रिलायन्स जिओ रिचार्ज 2 जीबी इंटरनेट पॅकच्या किमतीच्या सवलतीने लोक वेडे झाले आहेत मीम्स पहा
जिओ रिचार्ज योजना: अनेक कंपनी नेहमी मोठ्या प्रमाणात १ रुपया सूट ९९९/- , ४९९/- असे विचित्र दर ठेवतात, आता या १ रुपयात मी बंगला बांधणार का असा प्रश्न तुम्हाला मोठा असेल? पण खरेतर हीची ट्रिक आहे. पूर्�� आकडा बघण्याने जेव्हा अशी किंमत आकारली जाते तेव्हा ग्राहकांकडून असा दावा केला जातो. हाच अलिखित नियम पावली आता जिओकडू एकाट ऑफर देण्यात आली आहे. ७५० तुमच्या प्रीकी प्लॅनमध्ये बदल बदल आता जिओला ट्रोल…
View On WordPress
#JIO रिचार्ज योजना#आगामी तंत्रज्ञान बातम्या#आज तंत्रज्ञान बातम्या#जिओ रिचार्ज प्रीपेड योजना#टेक न्यूज टॉप#टेक न्यूज मराठी अपडेट#टेक बातम्या#टेक बातम्या २०२१#टेक बातम्या 2021 अद्यतने#टेक बातम्या दररोज अद्यतने#टेक बातम्या मराठीत#टेक बातम्यांचे मथळे#टेक मराठी बातम्या#टेक-गॅजेट#टेक-गॅजेट न्यूज#टेक्नॉलॉजी न्यूज#ट्रेंडिंग तंत्रज्ञान#तंत्रज्ञान न्यूज#तंत्रज्ञान बातम्या#तंत्रज्ञान बातम्या २०२१#तंत्रज्ञान बातम्या अद्यतने#तंत्रज्ञान बातम्या ट्रेंडिंग#तंत्रज्ञान बातम्या भारत#तंत्रज्ञान बातम्या मथळे#तंत्रज्ञान मराठी बातम्या#तंत्रज्ञानाच्या बातम्या मराठीत#ताज्या तंत्रज्ञान बातम्या#दैनिक टेक बातम्या#नवीन टेक बातम्या#नवीनतम तंत्रज्ञान बातम्या
0 notes
Text
Air India Curtail Operation 5G टेक्नॉलॉजी आजपासून US विमानतळांवर सुरू होणार आहे एअर इंडियाने अनेक उड्डाणे रद्द केल्या आहेत.
Air India Curtail Operation 5G टेक्नॉलॉजी आजपासून US विमानतळांवर सुरू होणार आहे एअर इंडियाने अनेक उड्डाणे रद्द केल्या आहेत.
एअर इंडिया कर्टेल ऑपरेशन बातम्या: आज म्हणजेच बुधवारी एअर इंडियाची विमाने अमेरिकेला जाणार नाहीत. हे घडत आहे कारण अमेरिकेत 5G मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर सुरू होत आहे. एअर इंडियाने ट्विट केले आहे की त्यांची दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, दिल्ली-शिकागो, मुंबई-न्यू जर्सी फ्लाइट बुधवारी चालणार नाहीत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया 5G तंत्रज्ञानामुळे एअरलाइन्सच्या फ्रिक्वेन्सीला बाधा…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 17 November 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आदर्श आचारसंहिता पालनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची भाजप आणि काँग्रेसला नोटीस
राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात, मुंबईत आज महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप बूथ कार्यकर्त्यांशी संवाद
मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना जाहीर
****
विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात आदर्श आचारसंहिता पालनाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं भाजप आणि काँग्रेसला नोटीस बजावली आहे. या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात प्रचारादरम्यान आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल केल्यानंतर, आयोगानं या नोटिसा बजावल्या. उद्या सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही पक्षांनी याबद्दल उत्तर देण्याचे निर्देश आयोगानं दिले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी २२ मे रोजी जारी केलेल्या सूचनांचं पालन करून दोन्ही पक्षांच्या स्टार प्रचारक आणि नेत्यांनी प्रचारादरम्यान सभ्यतेचं पालन करावं असंही या नोटिसीत म्हटलं आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्या असून, उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. मुंबईत आज महाविकास आघाडीची समारोपाची जाहीर सभा होणार असून, या सभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना ��टोले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
तर भाजपच्या वतीने तीन केंद्रीय मंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यासह अनेक वरिष्ठ नेते प्रचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची आज दुपारी पुण्यात प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमो ॲपच्या माध्यमातून, महाराष्ट्रातल्या भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या संकल्पनेतून साधलेल्या या संवादात, पंतप्रधानांनी महायुतीच्या कामाबद्दल जनता समाधानी असल्याचा विश्वास व्यक्त केला. भाजप सुरुवातीपासून मध्यमवर्गाच्या आकांक्षांवर लक्ष केंद्रीत करत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मध्यमवर्गाचं योगदान सगळ्यात जास्त असल्याचं लक्षात घेऊन, त्यांच्यावरचा कराचा बोजा कमी केल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
****
केंद्र सरकारने आरक्षणाचं प्रमाण ५० टक्क्यांच्या वर न्यावं, आणि जातीनिहाय जनगणना करावी असं आव्हान, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी दिलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघातल्या साकुरी इथल्या प्रचार सभेत काल त्या बोलत होत्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे इथं प्रचारसभा घेतली. देशाच्या विकासात काँग्रेसनं अमूल्य योगदान दिलं असून, काँग्रेस नेहमीच शेवटच्या घटकाचा सर्वात आधी विचार करते असं ते म्हणाले.
****
येत्या ५ वर्षात मुंबईकरांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव मोठ्या प्रमाणात सुखद होईल, असं आश्वासन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेला संबोधित करत होते. मनोरंजन क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ यावं यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटीव्ह टेक्नॉलॉजी या स्थापना करायला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, यातली पहिली संस्था मुंबईत सुरू होणार असल्याची घोषणा, वैष्णव यांनी यावेळी केली.
****
महाराष्ट्रात राजकीय स्थिरतेसाठी तसंच विकास आणि सुरक्षिततेसाठी महायुती हाच पर्याय आहे, असं मत भारतीय जनता पक्षाचे नेते सत्यपाल सिंह यांनी व्यक्त केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा आणि सुरक्षितेच्या दृष्टीने महाराष्ट्र हे चांगलं राज्य असल्यानं इथं गुंतवणूकही वाढत आहे असं सिंह यांनी सांगितलं.
****
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रचारसभा झाली. मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि मुस्लिमांचं आरक्षण संसदेत आणि विधानसभेत लोकप्रतिनिधीच वाचवत असतात, हे आरक्षण वाचवण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
जालना जिल्ह्यात महायुतीचे भोकरदनचे उमेदवार संतोष दानवे यांनी काल ग्रामीण भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला.
छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीचे नेते अंबादास दानवे यांनी काल पैठणचे महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ चिंतेपिंपळगाव इथं सभा घेतली. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी जनतेशी संवाद साधला.
लातूर शहर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार ���वन कल्याण यांनी रोड शो केला.
भाजप नेते भागवत कराड यांनी काल धाराशिव इथं माध्यमांशी संवाद साधला. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेलं स्थिर सरकार महायुतीच देऊ शकते, असं त्यांनी नमूद केलं.
****
विधानसभा निवडणुकीत राज्यात मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी राज्यात अनेक ठिकाणी विशेष संकल्पना घेऊन मतदान केंद्र उभारली जात आहेत. यात जैवविविधता, सांस्कृतिक-सामाजिक वारशांचं दर्शन, स्तन्यदा-गर्भवती महिलांसाठी हिरकणी मतदान केंद्र, युवा, दिव्यांग तसंच महिला संचलित विशेष मतदान केंद्र उभारली जात आहेत. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचं पाणी तसंच स्वच्छतागृहांची सोय देखील उपलब्ध असणार आहे.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथली एमबीएची विद्यार्थिनी असलेल्या साक्षी वैद्य या नवमतदार तरुणीनेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे...
बाईट - साक्षी वैद्य
****
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी नागरिकांना येत्या बुधवारी २० नोव्हेंबरला , मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
बाईट - कुलगुरू डॉ मनोहर चासकर
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सांगली जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
स्वीप कार्यक्रमाअंतर्गत राज्यभर मतदार जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. लातूर जिल्ह्यात अभंग, गवळणी, भारुड, गोंधळगीत, पोवाडा अशा पारंपरिक कलाप्रकारांचा अभिनव वापर केला जात आहे. जिल्ह्यात १२१ शाळांमधल्या विद्यार्थ्यांमार्फत १ लाख ३ हजारांपेक्षा जास्त पालकांपर्यंत पोहोचत मतदानाचं संकल्पपत्र भरून घेण्यात आलं.
लातूर इथं काल जिल्हा क्रीडा संकुलात वॉकेथॉन, मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. या ��ॉकेथॉन स्पर्धेपूर्वी युवक, युवती आणि खेळाडूंना मतदार जागृतीची शपथ देण्यात आली.
तुळजापूर इथं ३७ शाळेतील ३ हजार ७०० विद्यार्थी तसंच ३२१ शिक्षकांसह जनजागृती फेरी काढण्यात आली. हातात घोषवाक्याचे फलक घेऊन शहरातील विविध भागातून या फेरीनं जनजागृती केली.
नांदेड शहरात काल मतदान जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीत महापालिकेतील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
****
निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. अनंत भालेराव प्रतिष्ठानचे संजीव कुलकर्णी आणि हेमंत मिरखेलकर यांनी नांदेड इथं ही माहिती दिली. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पन्नास हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात डॉ. मीरा बोरवणकर यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
****
राज्याचं टपाली मतपत्रिका राज्य समन्वय केंद्र छत्रपती संभाजीनगर इथं उभारण्यात आलं आहे. सर्व २८८ विधानसभा मतदार संघातल्या टपाली मतपत्रिकांचं संकलन तसंच वितरण या केंद्रातून केलं जात आहे. मतदान झालेल्या सुमारे २२ हजाराहून अधिक तसंच कोऱ्या मतपत्रिकांचं हस्तांतरण या ठिकाणी सुरु असल्याची माहिती, नोडल अधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी काल या केंद्राला भेट देऊन कामाची पाहणी केली.
****
जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदार संघांमध्ये एक हजार सातशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी व्हीलचेअर पुरवण्यात आल्या असून, सर्वच केंद्रावर दिव्यांग मतदारांना मदत करण्यासाठी विशेष दोन स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मतदारसंघात एकूण ५३१ मतदारांचं गृहमतदान घेण्यात आलं. यामध्ये ४८५ वयोवृद्ध आणि ४६ दिव्यांगांचा समावेश आहे.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ४४७ ज्येष्ठ नागरिक तसंच ६९ दिव्यांग मतदारांनी गृहमतदान सुविधेमार्फत मतदान केलं.
****
बीडच्या केज मतदार संघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण प्रचार करत असताना, त्यांच्या तोंडाला काळं फासत मारहाण केल्याची घटना काल घडली. सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला आहे.
दरम्यान, परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख खोडवा सावरगाव इथं प्रचारासाठी गेले असता, काही लोकांनी घोषणाबाजी केली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग तसंच त��त्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता राष्ट्रपतींकडून व्यक्त
केंद्रीय मंत्रिमंडळाची डिजिटल कृषी योजनेला मंजुरी-मुंबई इंदूर रेल्वेमार्गासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपये निधीलाही मान्यता
मराठवाड्यात पावसाची संततधार कायम; जालन्यात एकाचा नदीत बुडून मृत्यू तर परभणीत शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्या ठार
आणि
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत आज भारताच्या नीतेश कुमारला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक तर योगेश कठुनियाला थाळीफेकमध्ये रौप्य पदक
****
सहकार क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवल्यास, प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढून सहकारी संस्थांचा कायापालट करता येणं शक्य असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या आज कोल्हापूर जिल्ह्यात वारणानगर इथं वारणा महिला सहकारी समुहाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात त्या बोलत होत्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सहकार हे सामाजिक शक्तीचा योग्य वापर करून घेणारं क्षेत्र आहे, मात्र या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेण्यावर राष्ट्रपतींनी भर दिला. बदलत्या काळासोबत सहकार क्षेत्रानंही बदलण्याच्या गरजेकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या –
(राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू)
इस तेजी से बदलते हुये समय में सहकारी संस्थाओं को भी अपने आप को बदलने की आवश्यकता है। उन्हें अधिक से अधिक टेक्नॉलॉजी का उपयोग करना चाहिये। साथ ही मॅनेजमेंट को प्रोफेशनल बनाना चाहिये। ये सदैव ध्यान रखना चाहिये की, कोई भी सहकारी संस्था किस�� के व्यक्तिगत हित और लाभ कमाने का साधन बनकर ना रह जाये। नही तो को ऑपरेटीव्ह का उद्देश्य ही समाप्त हो जायेगा। मेरा मानना है की, सहकारीता समाज मे ही एक शक्ती का सदुपयोग करने का उत्तम माध्यम है। सहकारीता का योगदान देश के विकास में अतुलनीय है।
दरम्यान, तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रपतींचं कोल्हापूर इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी स्वागत केलं. त्यानंतर राष्ट्रपतींनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. उद्या पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला, तसंच मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. परवा चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं आज दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये गुंतवणुकीच्या डिजिटल कृषी योजनेला मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रांच्या बळकटीकरणासाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांची आणि नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. मुंबई-इंदूर दरम्यान तीनशे नऊ किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांच्या निधीलाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा नवा रेल्वेमार्ग २०२८-२९ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित आहे.
****
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार आजही कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात आज पहाटे जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातलं जायकवाडी धरण सुमारे ९० टक्के भरलं असून, धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.
जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्यानं, अनेक रस्त्यांवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत, काही गावांमध्ये पुराचं पाणी वसाहतींमध्ये शिरल्याचं वृत्त आहे.
****
बीड जिल्ह्यात मांजरा धरणाचा पाणीसाठा सुमारे पन्नास टक्के झाला आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या काठावरील परिसराती नागरिकांनी सद्यस्थितीत सतर्कता बाळगण्याचं आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. क्षीरसागर यांनी आज अधिकाऱ्यांसोबत पूरस्थितीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. शहरातला चांदणी चौक ते जुना बाजारवेस पर्यंतचा जुना पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ६१ महसुली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टीने खरीप पिकांचे नुकसान झालं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद आहे. जिल्ह्यातल्या २९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, लघु आणि मध्यम प्रकल्पांच्या जलसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. दरम्यान, घनसावंगी तालुक्यातल्या बाणेगाव इथले शेतकरी शिवाजी विठ्ठल शिंदे यांचा आज सकाळी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात ५२ मंडळांपैकी ५० मंडळांत अतिवृष्टी होऊन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मदत आणि बचावासाठी भारतीय सैन्य दलाची तुकडी दाखल झाली असून, या तुकडीनं सेलू, जिंतूर आणि सोनपेठ तालुक्यांतल्या गावांमधून अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. जिल्ह्यातल्या पूरस्थितीकडे पाहता बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर मिळावं, अशी मागणी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे.
पाथरी तालुक्यात बोरगव्हाण इथे पुरामुळे एका शेतातल्या शेळीपालन केंद्रातल्या सुमारे नव्वद शेळ्या आणि चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाला तर काही शेळ्या आणि शेती साहित्य वाहून गेलं. महसूल विभागानं या घटनेतल्या नुकसानाचा तात्काळ पंचनामा केला. मानवत तालुक्यात वझुर गावात रात्री मुक्कामी असलेली बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. याशिवाय एक मळणी यंत्रही पुरात वाहून गेल्याचं वृत्त आहे. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शेवाळा गावाला पाण्याचा वेढा पडला आहे. गावातल्या दीडशे ते दोनशे घरांमध्ये पाणी शिरलं आहे. कळमनुरी तालुक्यात वसमत ते उमरा फाटा रस्त्यावर कयाधू नदीवरच्या पुलाचा काही भाग पुरामुळे तुटला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणं धोकादायक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या वायरलेस टॉवरवर आज सकाळी साडेअकराच्या सुमाराला वीज कोसळली. यात वायरलेस सेटसह इतर विद्युत साहित्य जळून गेलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
****
लातूर जिल्ह्यातल्या १० पैकी ०६ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. ��ुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. नदीकाठच्या गावांमध्ये विशेष खबरदारी घेण्याच्या आणि सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
****
नांदेड शहरातल्या जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. जुन्या नांदेडमधील संत दासगणू महाराज पुलावरून पाणी वाहत असल्याने, हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
नांदेड शहरात महापालिकेनं विविध प्रभागांमध्ये १५ निवारा केंद्रं उघडली आहेत. अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
****
सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांनी वेळीच तक्रारी कराव्यात, असं आवाहन बीड जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी आज भारताच्या नीतेश कुमारनं बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. याशिवाय योगेश कठुनियानं पुरुषांच्या एफ छपन्न थाळीफेक क्रीडाप्रकारात रौप्य पदक जिंकलं. आजच्या या पदकांमुळे आता भारताची पदकसंख्या नऊवर पोहचली आहे. भारताचा बॅडमिंटन पटू सुहास यतिराजही आज सुवर्णपदकासाठीचा आपला सामना खेळणार आहे.
****
स्मिता वत्स शर्मा यांनी आज भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. स्मिता वत्स शर्मा यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही नियुक्ती झाली आहे.
****
राज्यात आज बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर सह परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात बैलांना सजवून त्यांची पूजा करण्यात आली, तसंच पुरणपोळी खाऊ घालून मिरवणूक काढण्यात आली. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असला तरी मोठ्या उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
यंदाचा बी. रघुनाथ पुरस्कार ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या 'भुईचे लळासे' या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. येत्या ८ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित बी. रघुनाथ स्मृती सोहळ्यात हा पुरस्कार भालेराव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात ‘बी. रघुनाथ आणि परभणीची कविता’ हा मूळ परभणी जिल्ह्यातील कवितांवर आधारित विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक पद्मश्री सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. येत्या २१ सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ४ लाख ९२ हजार प्रौढ पात्र नागरिकांचं उद्यापासून बीसीजी लसीकरण करण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी बीसीजी लसीकरण करून ��्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 12 February 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
रोजगार मेळाव्यातली भरती प्रक्रिया पारदर्शक केली असून त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने ��रती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला त्यांची क्षमता दाखवण्याची समान संधी मिळावी यासाठी नियुक्ती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, देशात युवकांना रोजगार देण्याची प्रक्रिया वेगानं सुरु असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशभरात ४७ ठिकाणी हा मेळावा घेण्यात आला.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाची पायाभरणी केली.
****
नागपूर इथं हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस बल - सीआरपीएफ ग्रुप सेंटर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला. जात, धर्म, पंथ, लिंग यापलीकडे जाऊन गोरगरीब, कष्टकरी, सामान्य जनता या समाज घटकांना सेवा देण्याचं काम शासकीय कर्मचाऱ्यांवर असतं, असंच सेवा कार्य नवनियुक्तांकडून घडावं, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात ११९ जणांना नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली.
****
वैज्ञानिक क्षेत्रात महिला आणि मुलींना उपयुक्त ठरू शकेल अशा स्वाती पोर्टलचं उद्घाटन, विज्ञानविषयक सल्लागार अजय कुमार सूद यांच्या हस्ते काल झालं. सायन्स फॉर विमेन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन - स्वाती या पोर्टलवर विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, आणि वैद्यक या क्षेत्रातल्या माहितीचं आदान - प्रदान करता येईल. महिलांना या क्षेत्रातली माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांचा या क्षेत्रातला सहभाग वाढावा या उद्देशानं हे पोर्टल सुरु करण्यात आलं आहे.
****
पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन आणि संग्रहालय इमारतीचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल झालं. ७२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची ६१ कार्���ालयं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक संग्रहालय तसंच क्रीडा आयुक्त कार्यालय उभारण्यात येणार आहे. या इमारतीमुळे खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळेल. या इमारतीचं काम लवकरात लवकर होण्यासाठी क्रीडा विभाग आणि क्रीडा संघटना यांनी समन्वयानं काम कराण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली.
****
जंतामुळे बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये रक्तक्षयासह पोटाचे विविध आजार होतात. त्या पार्श्वभूमीवर वर्षातून दोनवेळा जंतनाशक गोळी देण्याची विशेष ��ोहीम राज्याच्या आरो��्य विभागाकडून राबवली जाते. त्यानुसार उद्या, १३ फेब्रुवारीला एक ते १९ वर्ष वयोगटातल्या सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल विधिदुत कायदेशीर साक्षरता आणि जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते झालं. सामाजिक समस्यातून घडणारं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधिदुत प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. गावागावात वाढत जाणारे बालविवाह, घरगुती महिला हिंसाचार, बालमजुरी यासारख्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी गावातल्या प्रत्येक नागरिकाने कायद्याची माहिती घेवून काम करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या दिशा उपक्रमाअंतर्गत, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीनं ही कार्यशाळा घेण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या गोरठा इथल्या वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा काशीबाई फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आणि सेवाभावी समाजसेविका डॉ. तरू जिंदल यांना जहीर झाला आहे. वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गोरठा इथं २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या २७ बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुंबईत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात झालेल्या १२८ बालकांच्या तपासणीतून निवडलेल्या या २७ बालकांवर मुंबईच्या बालाजी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
****
गोंदिया जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून, भुरशीटोला परिसरात मका पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
सामुहिक शक्ती आणि सामुहिक संकल्पातून भावी पिढीसाठी साठी कार्य करत राहण्याचा मानस पंतप्रधानांकडून व्यक्त
राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची काँग्रेस पक्षाची राज्यपालांकडे मागणी
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं तिसऱ्या टप्प्यातलं आमरण उपोषण सुरू
आणि
विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नांदेड इथं नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
****
सामुहिक शक्ती आणि सामुहिक संकल्पातून भावी पिढीसाठी साठी कार्य करत राहण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. सतराव्या लोकसभेच्या समारोपानिमित्त आज ते सदनाला संबोधित करत होते. देशाच्या आगामी निवडणुका लोकशाहीचा सन्मान वाढवणाऱ्या असतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ते म्हणाले -
लोकतंत्र और भारत की यात्रा अनंत है। दुनिया जिस प्रकार से भारत की महात्म्य को स्वीकार कर रही है, भारत के सामर्थ्य को स्वीकार करने लगी है, और उसको, इस यात्रा को हमें और सख्ती के साथ आगे बढाना है। चुनाव बहोत दूर नही है। यह लोकतंत्र का सहज, आवश्यक पहलू है। और मुझे विश्वास है, की हमारे चुनाव ही देश की शान बढाने वाली है। लोकतंत्र की हमारी जो परंपरा है, पुरे विश्व को अचंबित करनेवाल अवश्य रहेंगे।
दरम्यान, १७ व्या लोकसभेत आजपर्यंतचं सर्वाधिक ९७ टक्के कामका�� झाल्याचं, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. नव्या संसद भवनात नारीशक्ती विधेयक संमत केल्याबद्दलही बिर्ला यांनी पंतप्रधानांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. संसदेतल्या उपाहारगृहातलं खासदारांसाठीचं अनुदान रद्द करण्यासह, सतराव्या लोकसभेच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांचा अध्यक्ष बिर्ला यांनी आढावा घेतला.
सतराव्या लोकसभेचं आणि या अधिवेशनातलं सदनाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्याची घोषणा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी यावेळी केली.
****
आपल्या सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रभावी धोरणात्मक निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज राज्यसभेत अर्थव्यवस्थेसंदर्भातल्या श्वेतपत्रिकेवरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. भाजपचे सुशील मोदी यांनी या चर्चेला प्रारंभ केला. काँग्रेसचे के सी वेणुगोपाल, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, द्रमुकचे तिरुची शिवा, आदी सदस्यांनी या चर्चेत भाग घेत, आपली मतं मांडली.
****
सॉफ्टवेअर उद्योग तसच स्टार्टअप्सने प्रादेशिक क्षमता आणि गरज यांचा विचार करून आपलं संशोधन, शाश्वत विकासासाठी विकसित केलं पाहिजे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नागपूर इथल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया- एसटीपीआयच्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडवणारं शाश्वत संशोधन केलं पाहिजे, असं आवाहनही गडकरी यांनी केलं. एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव संकेत भोंडवे आदी यावेळी उपस्थित होते.
****
राज्यातल्या गुन्हेगारी घटनांची राज्यपालांनी याची गंभीर दखल घेत, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुंबई इथं राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन, त्यांना याबाबतचं निवेदन दिलं, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, राज्य सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि ताबडतोब विधानसभा निवडणूक घ्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. पोलिसांना कारवाई करायची मोकळीक सरकारनं दिली तर २४ तासाच्या आत सर्व गुंड कारागृहात असतील, असं ते म्हणाले. शिवसेना आमदार अपात्र��ा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं लवकरात लवकर निकाल द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
****
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरुद्ध सक्तवसूली संचालनालय- ईडीने मनी लॉन्ड्रीग - काळा पैसा वैध करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना समन्स जारी होण्याची शक्यता असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणात समीर वानखेडे यांच्या पथकानं अटक केली होती. मात्र याप्रकरणी आर्यनवर गुन्हा दाखल न करण्याबाबत पैसे मागितल्याचा आरोप वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं आजपासून तिसऱ्या टप्प्यातल्या आमरण उपोषणास सुरुवात केली. सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अध्यादेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कायद्यात रुपांतर करायला हवं. मात्र, याबाबतची कोणतीही प्रक्रिया सरकारने अद्याप सुरू केलेली नाही, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. सरकारला कॅबिनेटच्या माध्यमातून विशेष अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दोन दिवसात अधिवेशन बोलावून अध्यादेशात उल्लेख केल्याप्रमाणे सगेसोयऱ्यांबाबतचा कायदा पास करावा, मराठा समाजाच्या ५७ लाख नोंदी सापडल्या, त्यांना तातडीनं प्रमाणपत्र द्यावे, त्यांच्या नातेवाइकांनाही शपथ पत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी जरांगे यांनी केली. नोंदी सापडलेल्यांच्या याद्या ग्रामपंचायतीवर लावाव्यात, प्रमाणपत्र वाटपासाठी शिबिरे घ्यावेत, असं जरांगे यांनी सांगितलं, दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी आमची दारे केंव्हाही खुले आहेत, असं जरांगे म्हणाले
****
अकोला जिल्हा मराठा मंडळाची शंभर वर्षांची वाटचाल गौरवास्पद असून, यापुढेही युवक, महिला, शेतकरी अशा विविध घटकांच्या विकासासाठी कार्य करावं, असं, आवाहन राज्याचे महसूल मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या शताब्दी आणि स्मरणिका प्रकाशन समारंभात ते आज अकोला इथं बोलत होते. आधीच्या पिढीतील व्यक्तींची दूरदृष्टी, समर्पण आणि योगदानातून ही संस्था घडली, परिश्रम आणि त्यागातूनच अशा संस्था घडतात. या कार्याचा विस्तार व्हावा आणि यापुढेही संस्थेने असंच भरीव योगदान द्यावे, असं विखे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अकोट इथं शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. परिसरातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा या रुग्णालया��्वारे प्राप्त होणार असून, रुग्णालयाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून दिला जाईल, असं विखे यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. आज शहरातील अशोकनगर भागात नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसच नागरिकांची आरोग्य तपासणी करत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आलं. यावेळी क्षेत्रीय अधिकारी रमेश चौरे, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, उपअभियंता प्रकाश कांबळे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभ मिळालेल्या लाभार्थांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले.
बाईट - आरती गोवंडे आणि दिलीप हिवरे, जि.नांदेड
****
महावितरणच्या रूफ टॉप योजनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार २० वीज ग्राहकांच्या छतावर वीज निर्मिती होत असून त्या ग्राहकांचं वीजबिल शून्यापर्यंत कमी करण्यात यश आलं, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी दिली आहे. ते आज बुलडाणा इथं बोलत होते. जिल्ह्यात इतर ग्राहकांनी महावितरणच्या रूफ टॉप सोलार योजनेत सहभागी होऊन, घराच्या छतावर वीज निर्मिती करावी, असं आवाहन पाटील यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात मोदी आवास घरकुल योजनेने उल्लेखनीय कामगिरी केली असून, जिल्ह्याने एकूण १३ हजार चारशे ६३ एवढ्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याला दिलेल्या उद्दीष्टापैकी ९९ पूर्णाक ०१ टक्के उद्दीष्ट पूर्ण केलं आहे. दरम्यान, शासनाच्या नवीन निर्णयानुसार विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी दिली आहे.
****
लातूर इथं अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या वतीनं १०० नाट्य संमेलन आणि राज्य शासनाच्या महासंस्कृती महोत्सवाचं येत्या १२ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
नांदेड जिल्ह्यात १५ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या तयारी निमित्त आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. महासंस्कृती महोत्सवाच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या कार्याबाबतही निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी माहिती दिली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
सबका साथ-सबका विकासाची प्रेरणा रामाराज्यातून-सोलापूर इथं घरकुल लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात
विकसित भारत संकल्प यात्रेत पाच कोटींहून अधिक नागरिकांना मोफत आरोग्यसेवांचा लाभ
आणि
देशाच्या विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून व्यक्त
****
सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास या चतु:सूत्रीची प्रेरणा रामाराज्यातूनच घेतली असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी इथं असंघटित कामगारांसाठी बांधण्यात येत असलेल्या तीस हजार घरापैकी पहिल्या टप्यातील १५ हजार २४ घरांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. या योजनेच्या लाभार्थी रिझवाना मकानदार यांन��� पंतप्रधानांच्या हस्ते घराची किल्ली मिळाली, त्यांनी आपल्या भावना या व्यक्त क��ल्या.
देशातल्या सर्वात मोठ्या असंघटीत १५ हजार कामगारांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत असताना आपल्याला अत्यंत आनंद होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेच्या तीन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात दहा हजार रुपये कर्ज मंजुरीचं पत्रही यावेळी प्रदान करण्यात आलं.
केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात भिवंडी-निजामपूर, सांगली, उल्हासनगर तसंच कल्याण डोंबिवली या महापालिका तर शेगाव, सातारा आणि भद्रावती या नगरपालिकेत मंजूर असलेल्या एक हजार २०१ कोटी रुपयांच्या खर्चाच्या पाणी पुरवठा तसंच मलनिस्सारण व्यवस्थापन विकास कामांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं करण्यात आलं.
येत्या २२ तारखेला प्रज्वलित होणारी रामज्योत सर्वांच्या जीवनातून गरीबीचा अंध:कार दूर करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले -
22 जनवरी को जो रामज्योती आप जलायेंगे, वो आप सभी के जीवन से गरीबी का अंधेरा दूर करने की प्रेरणा बनेगी। आपका जीवन खुशीयों से भरा रहे, यही प्रभू राम से मेरी प्रार्थना है। ये राम राज्य ही है, जिसने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास की प्रेरणा दी है।
पंतप्रधानांनी आज बंगळुरू इथं बोईंग इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरच्या नवीन परिसराचं उद्घाटन केलं. गरीब कुटुंबातील मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचे प्रशिक्षण देणाऱ्या बोईंग सुकन्या योजनेला यावेळी सुरूवात करण्यात आली. चेन्नई इथल्या सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं आकाशवाणीच्या नियोजित केंद्राची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य यंत्रणेच्या माध्यमातून होणार आहे. शहरात चणई परिसरात उभारलं जाणारं हे एफएम प्रसारण केंद्र १० किलोवॅट क्षमतेचं असेल.
****
अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येत सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. जगभरातून अयोध्येत येणाऱ्या निमंत्रित पाहुण्यांना राहण्यासाठी टेंट सिटी उभारण्यात आली आहे. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी देव प्रबोधन, औषधी अधिवास, ग्रहता अधिवास, कुंड पूजन आणि अग्निकुंड स्थापना यासारखे अनेक विधी सध्या सुरू आहेत. गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या देखरेखीखाली २१ तारखेपर्यंत हे विधी चालणार आहेत. उद्यापासून २२ तारखेपर्यंत तात्पुरत्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २२ तारखेला १९ वि��ेष मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करणार आहेत. या मुलांची कला आणि संस्कृती, शौर्य, नवोपक्रम, समाजसेवा आणि क्रीडा या प्रकारात असामान्य कामगिरी केल्याबद्दल निवड करण्यात आली आहे. यात ९ मुलं आणि १० मुलींचा समावेश आहे. ५ ते १८ वयोगटातल्या मुलांना हे पुरस्कार देण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ तारखेला राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधणार आहेत.
****
गृह मंत्रालयानं आज राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कागदाचे तिरंगा ध्वज वापरण्यासंबंधी निर्देश जारी केले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम तसंच क्रीडा स्पर्धेदरम्यान वापरलेल्या कागदाच्या ध्वजांची खाजगीरित्या विल्हेवाट लावावी, तसंच या संदर्भात जनजागृती करण्याची आणि जाहिरातींच्या माध्यमातून प्रचार करण्याची सूचना मंत्रालयानं राज्य सरकारांना केली आहे.
****
राज्यात आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे आणि भाजीपाला लागवडीची योजना राबवण्यासाठी तीन लाख त्रेसष्ट हजार रूपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. यात मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यासह राज्यातल्या १३ जिल्ह्यांचा समावेश आहे.
****
सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत पाच कोटींहून अधिक नागरिकांना मोफत आरोग्यसेवांचा लाभ झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आतापर्यंत २ लाखांहून अधिक आरोग्य सेवा शिबीरं आयोजित करण्यात आली असून २ कोटी ६१ लाखांहून अधिक आयुष्मान भारत कार्डे वितरित झाली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
या यात्रेनं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती केली. ही यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात ज्योती नगर, उस्मानपुरा परिसरात पोहोचली आहे.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. नांदेड इथले राजाराम मडावी यांनी आपला अनुभव शब्दांत कथन केला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या मंदिरातील सामुहिक स्वच्छता अ��ियानाअंतर्गत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे यांनी आज जालना जिल्ह्यातल्या राजूर इथल्या गणपती मंदिरात स्वच्छता केली. भाजपा पदाधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभागी होत मंदिर परिसर झाडून पुसून स्वच्छ केला.
****
अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी आज डोंगरगण इथल्या रामेश्वर मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी मंदीर व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांसह विद्यार्थी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
****
लातूर इथल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिर तसंच तीर्थकुंड परिसरात २१ जानेवारीला सकाळी आठ वाजता स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी राम सीता वृ��्षवाटिका साकारण्यालाही प्रारंभ होणार आहे.
****
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं पार पडला. दानवे यांनी यावेळी नागरिकांच्या विविध विषयांवरील समस्या जाणून घेतल्या.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 October 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· गरीबांना पुढे जाण्याची संधी मिळवून देणं हाच खरा सामा��िक न्याय-शिर्डी इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन;राज्यशासनाच्या नमो शेतकरी योजनेला प्रारंभ
· राज्यशासनाच्या मेरी माटी मेरा देश अभियानाचा आज मुंबईत अमृत कलश पूजनाने समारोप
· ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर कालवश;आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणि
· पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंत १८ सुवर्णांसह ८२ पदकांची कमाई
सविस्तर बातम्या
केंद्र आणि राज्य सरकार गरीबांना आणि शेतकऱ्यांना समर्पित असून, देश गरीबीपासून मुक्त करणं आणि गरीबांना पुढे जाण्याची संधी मिळवून देणं हाच खरा सामाजिक न्याय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं काल सुमारे साडे सात हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते.
नीळवंडे धरणाचं लोकार्पण,अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आयुष हॉस्पिटल, महिला आणि बाल रुग्णालयाचं भूमिपूजन, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण, जळगाव ते भुसावळ तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या मनमाड टर्मिनलमधली अतिरिक्त सुविधा, साई बाबा मंदिरातला दर्शन रांग प्रकल्प, मराठवाडा तसंच विदर्भाला कोपरगांवशी जोडणारा महामार्ग प्रकल्प अशा विविध विकास प्रकल्पांचा यात समावेश आहे.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधीच्या सहा हजार वार्षिक मदतीशिवाय राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची अतिरिक्त रक्कम याद्वारे मिळणार आहे.
राज्यातले रखडलेले २६ सिंचन प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, पाणी हा ईश्वराचा प्रसाद आहे, थेंबभर पाणीही वाया घालू नका, असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.
Byte…
मेरे सभी किसान भाई बहनों को मेरी एक प्रार्थना है, ये पाणी परमात्मा का प्रसाद है। एक बुंद भी पाणी बरबाद नही होना चाहिये। पर ड्रॉप मोअर क्रॉप। जितनी भी आधुनिक टेक्नॉलॉजी है, उसका हमे उपयोग करना चाहिये।
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अहमदनगरमधल्या मातीचा प्रतिकात्मक कलश यावेळी पंतप्रधानांना देण्यात आला.
****
मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधून आलेल्या अमृत कलशांचं आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर पूजन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सकाळी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमानंतर संध्याकाळी विशेष रेल्वेने हे कलश दिल्लीसाठी रवाना होतील. परभणी जिल्ह्यातल्या सर्व गावांमधून मातीचं संकलन करण्यात आलेले कलश काल मुंबईला पाठवण्यात आले.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा काल दुसरा दिवस होता. जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होत विविध ठिकाणी सकल मराठा समाजानं साखळी उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलकांनी आंदोलन केलं.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात अनेक कार्यकर्त्यांनी कालपासून साखळी उपोषण सुरू केलं. गेवराई तालुक्यात मादळमोही इथंही ग्रामपंचायत कार्यालयाच्या टॉवरवर चढत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यात दोन य��वकांनीही आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. .
****
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर आज नेरुळ इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सातारकर यांचं काल नेरुळ इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते.
नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर असं मूळ नाव असलेल्या बाबामहाराजांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. प्रारंभी फर्निचरचा व्यवसाय केल्यानंतर त्यांनी कीर्तनाची कौटुंबिक परंपरा स्वीकारली. समाजप्रबोधनासोबतच त्यांनी सुमारे पंधरा लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दिक्षा देत व्यसनमुक्त केलं. संतांच्या अभंगांचं अत्यंत साध्या परंतु ओघवत्या शब्दांत निरुपण आणि त्याला दैनंदिन जीवनातल्या उदाहरणांचे दाखले हे बाबामहाराजांच्या कीर्तनाचं खास वैशिष्ट्य होतं. आपल्या एका कीर्तनात ते म्हणतात...
Byte…
सांगे श्रवणी ऐकावे ठेले |
की नेत्रीचे तेज गेले |
हे नासारंध्र बुझाले |
परिमळु न गे ||
… काय म्हटलं.. की तुम्ही ठरवलं, काही करायचं नाही . सोडून दिलं पण कानांनी ऐकणंय, डोळ्यांनी बघणंय, नाकानं श्वास घेणंय. हे सुटतं का कुणाचं..? तुम्ही शिवी देऊ नका, पण ऐकणं हा जर कानाचं धर्मय, तर काय सुटतं? म्हणून एक सांगतो, सोडायचा प्रयत्न करण्यापेक्षा, आहे त्याच्यात योग्य तऱ्हेने त्याचा वापर कसा करता येईल, याचा प्रयत्न करणं हाच वारकरी संताचं परमार्थ आहे…
विठ्ठल विठ्ठल……..
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल सातारकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
****
मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीनं काल लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी १९ नागरीकांनी मराठा - कुणबी असलेले पुरावे सादर केले. ही समिती आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी काल तीन सुवर्णांसह १८ पदकांची कमाई केली.
गोळाफेकमध्ये सचिन खिलारीनं, नेमबाजीत सिद्धार्थ बाबूने, तर तिरंदाजी मिश्रगटात शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी सुवर्णपदक पटकावलं.
थाळीफेकमध्ये मोनु घंगासनं, गोळाफेकमध्ये भाग्यश्री जाधवनं, तर २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सीमरन वत्सनं, रौप्य पदक जिंकलं.
या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत १८ सुवर्ण, २३ रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण ८२ पदकं मिळवली आहेत.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं इंग्लंडचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ ३४व्या षटकात अवघ्या १५६ धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या संघानं हे आव्हान २६व्या षटकात दोन गडी गमावत पूर्ण केलं. आज या स्पर्धेत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान सामना होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सुरु असलेल्या प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमालेत काल लेखिका, विद्यापीठ अधिसभा सदस्या विनिता तेलंग यांचं व्याख्यान झालं. राष्ट्र उभारणीत महिलांचं योगदान, या विषयावर बोलताना त्यांनी, ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा टप्पा गाठणं अद्याप शिल्लक असल्याचं मत व्यक्त केलं.
****
लातूर शहरातल्या मित्रनगर परिसरात असलेल्या चार मजली इमारतीच्या तळघरात शॉर्टसर्किटनं आग लागली. या आगीत पसरलेल्या धुरामुळे गुदमरुन तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान याच इमारतीत राहणाऱ्या अजरा सय्यद या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गॅलरीच्या लोखंडी पाईपला साडी बांधून त्याच्या आधारे स्वत:सह कुटुंबियांचे प्राण वाचवले.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथं ओबीसीसह वेगवेगळ्या जाती संघटनांनी, काल उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी प्रवर्गात इतर कुठल्याही जातीचा समावेश करू नये, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला विभागातर्फे छाऊ नृत्यनाट्य कला प्रकाराची कार्यशाळा काल सुरू झाली. पश्चिम बंगाल, बिहार, ओडीसा या राज्यात हा कलाप्रकार प्रसिद्ध आहे. चार नोव्हेंबर पर्यंत ही कार्यशाळा कला विभागात सकाळी सात ते दहा वाजेदरम्यान चालेल, असं विभागप्रमुखांनी सांगितलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 15 October 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
क्रीडा हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग-आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समिती अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस आजपासून पूर्णपणे वीजेवर धावणार
आणि
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सात गडी आणि ११७ चेंडू राखून दणदणीत विजय
****
क्रीडा हा भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या १४१ व्या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं भारतात आयोजन व्हावं, अशी इच्छा व्यक्त करत, आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समिती यासाठी भारताला सहकार्य करेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, केंद्रीय युवक कल्याण तसंच क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या सदस्य नीता अंबानी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात भारताच्या वैविध्यपूर्ण परंपरा, कला, नृत्य आणि संस्कृतींचा परिचय करून देण्यात आला. बांद्रा-कुर्ला संकुलात आजपासून तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे.
****
गावातून शहराकडे होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी भविष्यात विज्ञान आणि संशोधन यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, असं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पुणे इथल्या एम आय टी-आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा सहाव्या दीक्षांत सोहळ्यात ते काल बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुमारे ९० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहत होती. मात्र नंतरच्या काळात ग्रामीण भागात फारसा विकास न ��ाल्यामुळे इथून जवळपास ३० टक्के नागरिकांनी शहरी भागात स्थलांतर केलं, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं. देशाचा विकास सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी गावांचा विकास होण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी काल सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायासह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. धम्मचक प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा दसऱ्याच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, केंद्रीय संचार ब्यूरोच्या वर्धा क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं आजपासून १७ ऑक्टोबरपर्यंत चंद्रपूर इथं ''डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास'' या विषयावर आधारीत मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
दलित पँथर गौरव पुरस्कारांचं काल वितरण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या या कार्यक्रमात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते चळवळीतील मान्यवरांना गौरवण्यात आलं.
****
मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपण्यास केवळ दहा दिवस राहीले असून, सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं काल झालेल्या मराठा सामाजाच्या सभेत ते बोलत होते. आपण दिलेल्या मुदतीत सरकारने आरक्षण जाहीर केलं नाही, तर पुढचा निर्णय शेवटच्या दिवशी जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं. या सभेसाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी स्थापन समिती येत्या बुधवारी नांदेड दौऱ्यावर येत आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होईल. जिल्ह्यातल्या नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, सनदी तसंच राष्ट्रीय दस्तावेज दुपारी २ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात समितीकडे सादर करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. परभणी जिल्ह्यात ही समिती नियोजित १६ तारखेऐवजी १९ तारखेला येणार आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. आदिशक्तीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूर इथली रेणुका देवी, धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथली तुळजाभवानी माता, अंबाजोगाई इथली योगेश्वरी देवी यांच्यासह मराठवाड्यातल्या देवी मंदिरांमध्ये होमहवन, भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेसाठी मंदिर व्यवस्थापन समित्यांच्या वतीनं ��ोख व्यवस्था करण्यात आली आहे.
तुळजाभवानी मातेच्या घोरनिद्रेची आज सांगता होऊन, देवी सिंहासनारूढ झाली, दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होऊन नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा भागातल्या तुळजाभवानी मंदिरातही आज पहाटे घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी अनवाणी चालत मंदिराकडे निघालेल्या भाविकांच्या गर्दीने शहर परिसरातले मुख्य रस्ते पहाटेपासूनच फुलून गेले आहेत.
****
जालना - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस आज घटस्थापनेपासून पूर्णपणे वीजेवर धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे आज सकाळी जालना रेल्वेस्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेसला हिरवी झेंडा दाखवून रवाना करतील. जनशताब्दी एक्सप्रेस ही मराठवाड्यातली वीजेवर धावणारी पहिलीच रेल्वे ठरणार आहे.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानवर सात गडी आणि १९ षटकं तीन चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकत, पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ ४३ व्या षटकांत १९१ धावांवर सर्वबाद होऊन तंबूत परतला.
कालच्या सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा या सर्वांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास आलेल्या भारतीय संघाच्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली, मात्र शुभमन आणि त्यानंतर आलेला विराट कोहली दोघंही प्रत्येकी १६ धावांवर बाद झाले. कर्णध��र रोहित शर्मा ८६ धावा करून तंबूत परतला, श्रेयस अय्यरने नाबाद ५३ आणि के एल राहुलने नाबाद १९ धावा करून एकतीसाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आपल्या सात षटकांपैकी एक निर्धाव षटक टाकणारा आणि १९ धावा देत दोन बळी घेणारा जसप्रीत बुमराह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारताने पाकिस्तानवर मिळवलेला हा सलग आठवा विजय आहे.
दरम्यान या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी बांगलादेशसोबत होणार आहे. तर आज इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात सामना होणार आहे.
****
छत्रपती संभाजी नगर महापालिकेतील शाळेत शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थींचा केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांच्या हस्ते काल सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी मध्ये ९०% टक्के पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, ८५ ते ९०% टक्के गुण घेतलेल्या सहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये तर ८० ते ८५ % टक्के गुण घेतलेल्या सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रुपये पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं. ७५ टक्के पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या ५२ विद्यार्थ्यांना तसंच इयत्ता पाचवी आणि आठवी मधील शिष्यवृत्तीस पात्र ठऱलेल्या १२५ विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते विविध बक्षिस देऊन गौरवण्यात आलं.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आज पहाटे प्रवाशांना घेऊन जाणारी मिनी बस आणि ट्रकच्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात ही घटना घडली. नाशिक जिल्ह्यातले हे सर्व प्रवासी बुलडाणा जिल्ह्यातल्या सैलानी बाबा इथून शिर्डीकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातातल्या जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघे पाण्यात बुडल्याचं वृत्त आहे. केज शहराजवळ एका खडी सेंटरच्या खाणीत साचलेल्या पाण्यात तीन बालकं बुडाली, अन्य एका घटनेत शिरूर कासार तालुक्यातील टाकळवाडी इथं एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
****
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज नांदेड इथं पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेच्या शेतकरी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
जी-20 देशांच्या पी-20 बैठकीचा समारोप;अध्यक्षपदाची सूत्रं ब्राझीलकडे सुपूर्द
गावातून शहराकडे होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी विज्ञान आणि संशोधन यांची भूमिका महत्त्वपूर्ण-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी नागपूरला दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी
आणि
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा संघ ४३ व्या षटकांत १९१ धावांवर सर्वबाद;भारतासमोर १९२ धावांचं आव्हान
****
जी-20 देशांच्या संसद अध्यक्षांच्या पी-20 बैठकीचा समारोप आज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भाषणाने समारोप झाला. बैठकीच्या समारोप सत्रात ओम बिर्ला पी-20 परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रं ब्राझीलकडे सुपूर्द केली. दोन दिवसांच्या या बैठकीला काल सुरुवात झाली. कालच्या पहिल्या दिवशी जी-20 देशांच्या संसद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी एक संयुक्त ठराव मंजूर केला, आज दुसऱ्या दिवशी स्त्री पुरुष समानता, महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, तसचं डिजीटल समाजमाध्यमांच्या वापरानं लोकांच्या जीवनात होणारं परिवर्तन या विषयांवर दोन सत्रात चर्चा झाली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या बैठकीचं उद्घाटन होत आहे. आगामी ऑलिम्पिक्स स्पर्धांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. चाळीस वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर दुसऱ्यांदा भारतात ही बैठक होत आहे. यापूर्वी १९८३ मध्ये नवी दिल्ली इथं या समितीची ८६ वी बैठक झाली होती. मुंबईत होणाऱ्या बैठकीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, समितीचे अन्य सदस्य तसंच देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या नामवंत व्यक्ती, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर कालपासून मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रीडा महास���घाच्या प्रतिनिधींसमवेत तसंच क्रीडा क्षेत्रातल्या नामवंतांसमवेत द्विपक्षीय भेटी गाठी घेत आहेत.
****
गावातून शहराकडे होणारं स्थलांतर थांबवण्यासाठी भविष्यात विज्ञान आणि संशोधन यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल, असं प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. पुणे इथल्या एम आय टी-आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा सहाव्या दीक्षांत सोहळ्यात ते आज बोलत होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुमारे ९० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहत होती. मात्र नंतरच्या काळात ग्रामीण भागात फारसा विकास न झाल��यामुळे इथून जवळपास ३० टक्के नागरिकांनी शहरी भागात स्थलांतर केलं, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं. देशाचा विकास सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी गावांचा विकास होण्याची आवश्यकता असल्याचं गडकरी म्हणाले.
****
मराठ�� आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपण्यास केवळ दहा दिवस राहीले असून, सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आज झालेल्या मराठा सामाजाच्या सभेत ते बोलत होते. मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा इतर मागास वर्ग- ओबीसीत समावेश करावा, सारथीमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकचा निधी द्यावा, आदी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या. मुदतीपर्यंत आरक्षण जाहीर केलं नाही, तर पुढचा निर्णय शेवटच्या दिवशी जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं. या सभेसाठी मराठा समाज बांधवांची लक्षणीय गर्दी दिसून आली.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी सकाळपासूनच रांगा लावल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायासह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा दसऱ्याच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, दीक्षाभूमीच्या स्तुपावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान चंद्रपूर इथं दीक्षाभूमी वर "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास" या विषयावर आधारीत मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
जालना - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्सप्रेस उद्या घटस्थापनेपासून पूर्णपणे वीजेवर धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे उद्या सकाळी जालना रेल्वेस्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. जनशताब्दी एक्सप्रेस ही मराठवाड्यातली वीजेवर धावणारी पहिलीच रेल्वे ठरणार आहे.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अहमदाबाद इथं भारत आणि पाकिस्तान संघात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकत, पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे पाकिस्तानचा संघ ४३ व्या षटकांत १९१ धावांवर सर्वबाद होऊन तंबूत परतला. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा या सर्वांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
****
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जी अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आजपासून २० ऑक्टोबरपर्यंत ‘वाचन प्रेरणा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांच्या हस्ते आज करण्यात आलं. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आगामी काळात महाराष्ट्रभर सर्वेक्षण करून पुढच्या पिढीसाठी त्याचा कसा उपयोग करता येईल, याबाबत मुक्त विद्यापीठ विचार करणार असल्याचं कुलगुरुंनी सांगितलं. आपल्या वेतनातील ठराविक हिस्सा चांगली पुस्तकं खरेदी करण्यासाठी वापरावा, असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं. दरम्यान, विद्यापीठाच्या या वाचन प्रेरणा सप्ताहातमध्ये पुस्तक चर्चा, ग्रंथालय भेट असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यानिमित्तानं भरवण्यात आलेलं ग्रंथप्रदर्शन वाचकांसाठी येत्या २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत खुलं राहणार आहे.
****
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात आज वॉक फॉर फ्रीडम या पदयात्रा काढण्यात आली. मानवी तस्करीविरुद्ध समाजामध्ये जागृती व्हावी यासाठी जगभरात एकाचवेळी वॉक फॉर फ्रीडम ही पदयात्रा काढण्यात येते. अहमदनगरमध्ये यंदा पहिल्यांदाच ही पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेत विविध महाविद्यालय आणि शाळांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना मानवी तस्करीविरुद्धची शपथही देण्यात आली.
****
'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व शहरातून आणलेल्या मातीला वंदन करून तयार केलेला अमृत कलश नवी दिल्ली इथं पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.म्��से यांच्या यांच्याकडे आज सोपवण्यात आला. जिल्ह्यातील १० नगर परिषदा आणि ६ नगर पंचायतींमधून ही माती संकलित करण्यात आली आहे.
****
पुणे बंगलोर महामार्गावर कराड जवळील पाचवड फाटा इथं आज दुपारी रस्ता अपघातात तीन जण ठार झाले. कोल्हापुरहून मुंबईकडे निघालेल्या चारचाकीने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एक मृत कोल्हापूर पोलिस दलातील राजवाडा पोलिस ठाण्यातील कर्मचारी आहे.
****
लातूर इथल्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कन्हैयालाल पुरोहीत यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. पुरोहीत यांच्या इच्छे प्रमाणे त्यांचं नेत्रदान तसंच देहदान करण्यात येणार आहे. नेत्रदानाची प्रक्रिया आज सायंकाळी पूर्ण झाली आहे.
****
उद्या जागतिक हात धुवा दिन पाळण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ग्रामीण विभागानं दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गाव, शाळा आणि अंगणवाडीतून हात धुण्याचं प्रात्यक्षिक दिलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तिन्ही परिमंडलाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. ग्राहकांना तत्पर सेवा देण्याबरोबरच थकित वीजबिल वसुलीसही प्राधान्य द्या, असे निर्देश चंद्र यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
दक्षिण मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्गाच्या कामामुळे काचीगुडा ते नगरसोल एक्स्प्रेस १७, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी मुदखेड ते परभणी दरम्यान साडे तीन तास उशिरा धावेल. तर औरंगाबाद ते हैदराबाद एक्सप्रेस १६ ते २२ ऑक्टोबर दरम्यान एक तास १० मिनिटे उशिरा सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्य सरकारने सार्वजनिक प्रकल्प उभारणीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन.
प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १६ टक्के वाढ.
मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन.
आणि
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात अंबाजोगाई बसस्थानक राज्यभरात अव्वल.
****
सार्वजनिक प्रकल्प उभारणीत नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून खर्चात मोठी बचत होत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज पुण्यात विविध प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. देशात अनेक ठिकाणी अल्ट्रा हाय परफॉर्मन्स टेक्नॉलॉजी वापरून काम केल्यामुळे प्रकल्पाचा खर्च निम्म्याहून कमी आला आहे. राज्य सरकारनेही त्यांच्या सार्वजनिक प्रकल्प उभारणीत या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आर्थिक लाभ करून घेण्याचं आवाहन गडकरी यांनी केलं आहे.
गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या प्रकल्पांमध्ये चांदणी चौक उड्डाणपूल, खेड बायपास, पुणे बायपास आणि एकलहरे मार्गांचं चौपदरीकरण, तसंच पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे' मेट्रो कार्ड आदी उपक्रमांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री ��ंद्रकांत पाटील, तसंच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्याच्या विकासकामांतले अडथळे दूर व्हावे या उद्देशानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्प नियंत्रण कक्ष सुरु केला असून तो मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमला पूरक भूमिका बजावत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा १० ऑगस्टपर्यंत सहा लाख ५३ हजार कोटी रुपये इतकं सकल कर संकलन झालं आहे. कर परतावा दिल्यानंतर निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन पाच लाख ८४ हजार कोटी रुपये झालं आहे. ते गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या निव्वळ संकलनापेक्षा १७ टक्क्यांनी जास्त आहे. एक एप्रिल ते १० ऑगस्ट या कालावधीत कर परताव्यापोटी ६९ हजार कोटी रुपये करदात्यांना परत करण्यात आले आहेत. हा परतावा गेल्या वर्षात याच कालावधीत जारी केलेल्या परताव्याच्या तुलनेत ३ पूर्णांक ७३ शतांश टक्क्यांनी अधिक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचे पदक आज जाहीर झाले. दरवर्षी १२ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीर होतात. यंदा १४० पोलिसांना हे पदक प्रदान करण्यात येणार असून, यात केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमधून १५, राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए मधून १२ अधिकाऱ्यांचा, तसंच २२ महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक २०२३ वर स्वाक्षरी केली. हे विधेयक ९ ऑगस्ट रोजी राज्यसभेत एकमताने तर लोकसभेने ७ ऑगस्ट रोजी आवाजी मतदानानं मंजूर केलं होतं.
वैयक्तिक माहिती खासगी ठेवण्याचा व्यक्तीचा हक्क आणि आवश्यक कायदेशीर बाबींसाठी या माहितीचा वापर या दोन्ही उद्दिष्टांमधे समतोल साधणारा हा कायदा असून १४० कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं तो आणला असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार सुधारणा विधेयकावरही राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे.
****
नाशिक इथं मुक्त विद्यापीठात बनावट कागदपत्रांच्या साह्याने पदविका घेणाऱ्या २० विद्यार्थांची चौकशी करण्याचे आदेश विद्यापीठाच्या चौकशी समितीने दिले आहेत. या प्रकरणी बनावट कागदपत्रे पुरवणाऱ्या ४ जणांच्या विरोधात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०२०-२१ कालावधित वेगवेगळ्या ठिकाणच्या २० विद्यार्थ्यांनी पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे बीएससी-एमएलटी आणि डीएमएलटी या पदव्यांचे मुक्त विद्यापीठाच्या नावाचे बनावट गुणपत्रिका, प्रमाणपत्र तयार केल्याचं उघड झालं आहे.
****
राज्य परि��हन महामंडळाच्या नाशिक ते पुणे या ई-शिवाई बससेवेला आजपासून प्रारंभ झाला. आज पहाटे साडे पाच वाजता नाशिकच्या ठक्कर बस स्थानकातून पहिली बस पुण्यासाठी रवाना झाली. एका ज्येष्ठ प्रवाशाच्या हस्ते या बसचं पूजन करण्यात आलं. आजच्या पहिल्या फेरीमध्ये एकूण ३५ प्रवासी होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा' अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपलं घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा, तसच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, शाळा, दुकाने, आस्थापनांनी या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केलं आहे. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तेवत राहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचं स्मरण व्हावं, असं शर्मा म्हणाले.
****
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत औरंगाबाद इथं आज सिडको इथल्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे उद्यानात गृहनिर्माणमंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते मेरी माटी मेरा देश हा उपक्रम घेण्यात आला. महानगरपालिकेच्या प्रत्येक झोन कार्यक्षेत्रात ऐतिहासिक स्थळे किंवा सरोवर या ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचं बोधचिन्ह, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचं नाव, स्थानिक हुतात्म्यांची नावं, मातृभूमीच्या रक्षणाकरता प्राणांची आहुती दिलेल्या शुरवीरांना विनम्र अभिवादन अशी वाक्यं असलेल्या शिलाफलकांचं अनावरण करण्यात आलं. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचं संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचं पालन करू. अशी पंचप्रण शपथ यावेळी नागरिकांना देण्यात आली.
****
देशासाठी बलिदान देणारे शूर स्वातंत्र्यसैनिक आणि देशाचं संरक्षण करणाऱ्या आजी माजी सैनिकांचा सत्कार हा मातृभूमीचा सन्मान आहे, असं, मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा नगरपरिषदेने घेतलेल्या 'मेरी माटी, मेरा देश' अभियानांतर्गत स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिकांचा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. 'मेरी माटी, मेरा देश' हे अभियान लोकचळवळ व्हावी, असं राठोड यांनी म्हणाले. यावेळी दारव्हा इथल्या ३८ माजी सैनिकांचा राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात बीड जिल्ह्यातलं अंबाजोगाई बसस्थानक अव्वल आलं आहे. या अभियानात राज्यभरातल्या ५८१ पैकी ५६० बसस्थानकांचं सर्वेक्षण करण्यात आलं, यापैकी २९१ स्थानकांमध्ये स्वच्छतेचा दर्जा अत्यंत वाईट असून, फक्त २८ बसस्थानकांमध्ये स्वच्छता चांगली राखली जात असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. अंबाजोगाई बस स्थानकाने या सर्वेक्षणात स्वच्छतेचे सगळे निकष पार करत, ९० पैकी ८३ गुण मिळवले आहेत.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथलं बसस्थानकातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इथल्या कर्मचाऱ्यांनी रिकाम्या जागेतला कचरा साफ करून, बाग फुलवली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं शासनाच्या रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा तिसरा हप्ता बँकेत टाकण्यासाठी ५ हजारांची लाच मागणारा वसमत पंचायत समितीचा ग्रामीण कंत्राटी अभियंता राजेश बालाजी नाईक याला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. एका सापळ्याच्या माध्यमातून ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड ही प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी चांगली कर्मभूमी आहे, या मातीतली माणसं प्रामाणिक आणि हाकेला हाक देणारी आहेत. अधिकारी, कर्मचारी, गाव पातळीवर अनेक लोक माझे स्नेहीच नाहीत तर प्रेरणा आहेत, असे भावोत्कट उद्गार जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी काढले आहेत. ठाकूर यांची लातूर इथं जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून, आज त्यांना निरोप देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नांदेड इथून स्नेहाची, आपुलकीची शिदोरी घेऊन मी चालली आहे, मला कायम तुमच्या ऋणातच राहायला आवडेल, असंही ठाकूर म्हणाल्या. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि विविध संघटनेच्या वतीने नुतन मुख्याधिकारी मीनल करनवाल यांचा देखील सत्कार करण्यात आला.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान चौथा टी - ट्वेंटी क्रिकेट सामना आज फ्लॉरिडा इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिज दोन - एकनं आघाडीवर आहे.
****
0 notes
Text
अवघ्या १,११० रुपयांत तुमचा होईल २८,००० रुपये किमतीचा OPPO F21 Pro, पाहा डिटेल्स
अवघ्या १,११० रुपयांत तुमचा होईल २८,००० रुपये किमतीचा OPPO F21 Pro, पाहा डिटेल्स
अवघ्या १,११० रुपयांत तुमचा होईल २८,००० रुपये किमतीचा OPPO F21 Pro, पाहा डिटेल्स Amazon Deal Of The Day: OPPO च्या धमाकेदार स्मार्टफोनवर आश्चर्यकारक सवलत दिली जात आहे. यात २८ हजार रुपयांचा OPPO F21 Pro केवळ १,११५ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कसे ? पाहा डिटेल्स. Amazon Deal Of The Day: OPPO च्या धमाकेदार स्मार्टफोनवर आश्चर्यकारक सवलत दिली जात आहे. यात २८ हजार रुपयांचा OPPO F21 Pro केवळ १,११५…
View On WordPress
#१#११०#२८#०००#f21#oppo#pro#अवघ्या#किंमतीचा#टेक बातमी#टेक बातम्या#टेक्नॉलॉजी#टेक्नॉलॉजी बातम्या#ट्रेंडिंग बातम्या#डिटेल्स#तंत्रज्ञान बातम्या#तुमचा#पाहा#भारत लाईव्ह मीडिया#रुपयांत#रुपये#वायरल बातम्या#होईल;
1 note
·
View note
Text
Jio चा महिनाभराची व्हॅलिडिटी देणारा स्वस्त प्लान, प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटाचाही लाभ
Jio चा महिनाभराची व्हॅलिडिटी देणारा स्वस्त प्लान, प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटाचाही लाभ
Jio चा महिनाभराची व्हॅलिडिटी देणारा स्वस्त प्लान, प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि डेटाचाही लाभ Reliance Jio: या जिओ कॅलेंडर मंथ प्लानमध्ये कंपनीकडून अमर्यादित व्हॉईस कॉलिंग दिले जात आहे. हे कॉल लोकल आणि एसटीडी नंबरवर पूर्णपणे मोफत असतील आणि रोमिंगमध्ये असतानाही ते मोफत काम करतील. यासोबतच ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही मिळतील. २५९ रुपयांच्या प्लानचे रिचार्ज करणारे Jio TV, JioCinema, Jio Security आणि…
View On WordPress
#jio#आणि#कॉलिंग#चा#टेक बातमी#टेक बातम्या#टेक्नॉलॉजी#टेक्नॉलॉजी बातम्या#ट्रेंडिंग बातम्या#डेटाचाही#तंत्रज्ञान बातम्या#देणारा#प्लान#प्लानमध्ये#फ्री#भारत लाईव्ह मीडिया#महिनाभराची#लाभ#वायरल बातम्या#व्हॅलिडिटी#स्वस्त
0 notes
Text
पूर्ण होणार iPhone खरेदीची इच्छा ! अगदी फ्री मिळू शकतो iPhone 12, कसा? पाहा डिटेल्स
पूर्ण होणार iPhone खरेदीची इच्छा ! अगदी फ्री मिळू शकतो iPhone 12, कसा? पाहा डिटेल्स
पूर्ण होणार iPhone खरेदीची इच्छा ! अगदी फ्री मिळू शकतो iPhone 12, कसा? पाहा डिटेल्स iPhone Discounts : iPhone 12 दोन वर्षांपूर्वी 64GB च्या बेस मॉडेलसाठी $६९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. परंतु, व्हेरिझॉनच्या डीलमुळे किंमत खूपच कमी झाली आहे. iPhone Discounts : iPhone 12 दोन वर्षांपूर्वी 64GB च्या बेस मॉडेलसाठी $६९९ च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. परंतु,…
View On WordPress
#12#iphone#अगदी#इच्छा#कसा#खरेदीची#टेक बातमी#टेक बातम्या#टेक्नॉलॉजी#टेक्नॉलॉजी बातम्या#ट्रेंडिंग बातम्या#डिटेल्स#तंत्रज्ञान बातम्या#पाहा#पूर्ण#फ्री#भारत लाईव्ह मीडिया#मिळू#वायरल बातम्या#शकतो#होणार?
0 notes