#टेक मराठी बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
रिलायन्स जिओ रिचार्ज 2 जीबी इंटरनेट पॅकच्या किमतीच्या सवलतीने लोक वेडे झाले आहेत मीम्स पहा
रिलायन्स जिओ रिचार्ज 2 जीबी इंटरनेट पॅकच्या किमतीच्या सवलतीने लोक वेडे झाले आहेत मीम्स पहा
जिओ रिचार्ज योजना: अनेक कंपनी नेहमी मोठ्या प्रमाणात १ रुपया सूट ९९९/- , ४९९/- असे विचित्र दर ठेवतात, आता या १ रुपयात मी बंगला बांधणार का असा प्रश्न तुम्हाला मोठा असेल? पण खरेतर हीची ट्रिक आहे. पूर्ण आकडा बघण्याने जेव्हा अशी किंमत आकारली जाते तेव्हा ग्राहकांकडून असा दावा केला जातो. हाच अलिखित नियम पावली आता जिओकडू एकाट ऑफर देण्यात आली आ��े. ७५० तुमच्या प्रीकी प्लॅनमध्ये बदल बदल आता जिओला ��्रोल…
View On WordPress
#JIO रिचार्ज योजना#आगामी तंत्रज्ञान बातम्या#आज तंत्रज्ञान बातम्या#जिओ रिचार्ज प्रीपेड योजना#टेक न्यूज टॉप#टेक न्यूज मराठी अपडेट#टेक बातम्या#टेक बातम्या २०२१#टेक बातम्या 2021 अद्यतने#टेक बातम्या दररोज अद्यतने#टेक बातम्या मराठीत#टेक बातम्यांचे मथळे#टेक मराठी बातम्या#टेक-गॅजेट#टेक-गॅजेट न्यूज#टेक्नॉलॉजी न्यूज#ट्रेंडिंग तंत्रज्ञान#तंत्रज्ञान न्यूज#तंत्रज्ञान बातम्या#तंत्रज्ञान बातम्या २०२१#तंत्रज्ञान बातम्या अद्यतने#तंत्रज्ञान बातम्या ट्रेंडिंग#तंत्रज्ञान बातम्या भारत#तंत्रज्ञान बातम्या मथळे#तंत्रज्ञान मराठी बातम्या#तंत्रज्ञानाच्या बातम्या मराठीत#ताज्या तंत्रज्ञान बातम्या#दैनिक टेक बातम्या#नवीन टेक बातम्या#नवीनतम तंत्रज्ञान बातम्या
0 notes
Text
EV टेक स्टार्टअप Electrifuel ला IAN कडून ₹1.8 कोटी गुंतवणूक प्राप्त झाली आहे
EV टेक स्टार्टअप Electrifuel ला IAN कडून ₹1.8 कोटी गुंतवणूक प्राप्त झाली आहे
EV टेक स्टार्टअप Electrifuel ला IAN कडून ₹1.8 कोटी गुंतवणूक प्राप्त झाली आहे स्टार्टअप फंडिंग – विद्युत इंधन: इलेक्ट्रिक वाहने (EV) टेक स्टार्टअप्सचे युग सुरू झाले आहे आणि… स्टार्टअप फंडिंग – विद्युत इंधन: इलेक्ट्रिक वाहने (EV) टेक स्टार्टअप्सचे युग सुरू झाले आहे आणि हे क्षेत्र आगामी काळात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. दिल्ली-एनसीआर आधारित…
View On WordPress
#electrifuel#ian#आजची अपडेट#आताची मोठी बातमी#आहे#कडून#कोटी#गुंतवणूक#गुन्हेगारी बातम्या#झाली#टेक#ट्रेंडिंग बातम्या#ठळक बातम्या#ताज्या बातम्या#दैनिक मराठी#न्यूज अपडेट मराठी#न्यूज फ्लॅश#प्राप्त#बातम्या#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी भाषिक बातम्या#मराठी समाचार#महत्वाची बातमी#महाराष्ट्र बातमी#मोठ्या बातम्या#राजकीय बातम्या#राज्यस्तरीय बातम्या#ला
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 July 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जुलै २०२१ सायंकाळी ६.१०
****
राज्यात कोविड-19शी संबंधित निर्बंध शिथील जरी झाले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम आहे. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका - तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी ४१ कोटी ५४ लाख ७२ हजारांहून अधिक लसीकरण
** राज्यात कोरोना प्रतिबंधक लसिकरणानं चार कोटींचा टप्पा ओलांडला
** कोरोना विषाणू संसर्गाचे बीडमध्ये २३८ नवे रुग्ण तर औरंगाबादमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू
आणि
** जायकवाडी धरणातला पाणीसाठा साडे पस्तीस टक्क्यांवर
****
देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसींच्या ४१ कोटी ५४ लाख ७२ हजार ४५५ मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. यात आज सकाळी सात वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये लसींच्या ३४ लाख २५ हजार ४४६ मात्रा देण्यात आल्या. या संसर्गाचे तीन कोटी तीन लाख ९० हजार ६८७ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. संसर्गमुक्तीचा दर सातत्यानं वाढत असून आता तो ९७ पूर्णांक ३६ शतांश टक्के झाला आहे. सध्या देशात चार लाख सात हजार १७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या संसर्ग तपासणीसाठी आतापर्यंत ४४ कोटी ९१ लाख ९३ हजार २७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्रानं राज्य सरकार तसंच केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसीच्या आतापर्यंत ४३ कोटी २५ लाख मात्रा उपलब्ध करून दिल्या आहेत. केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांकडे अजून ८८ लाख मात्रा शिल्लक असुन या व्यतिरिक्त ५३ लाख मात्रा लवकरच दिल्या जाणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं ४ कोटीचा टप्पा पार केला आहे. काल राज्यभरात १ हजार ४८२ लसिकरण सत्रांच्या माध्यमातून १ लाख ८९ हजार ७३३ नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशीच्या ४ कोटी १ लाख ८ हजार ५७४ मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज २३८ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक ५७ रुग्ण आष्टी तालुक्यात आढळले असून त्या खालोखाल बीड ३७, पाटोदा ३६, गेवराई ३३, शिरुर २१, केज १४, धारुर १३, अंबाजोगाई ११, वडवणी नऊ आणि माजलगावमधल्या सात रुग्णांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीत आज दोन कोविड बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात कोविड संसर्गानं आतापर्यंत तीन हजार ४७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ५६ झाली असून एक लाख ४३ हजार २९१ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारनं आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करावी, या मागणीच्या अनुषंगानं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मागील दोन दिवस नवी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि याबाबत चर्चा केली. राज्यांना केवळ सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार देऊन उपयोग नाही, तर सोबतच आरक्षणाची ५० टक्के मर्यादाही शिथील करण्यात यावी, अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम राहिली तर मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य होणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करून ही आरक्षण मर्यादा शिथील करावी, अशी शिफारस करणारा ठराव राज्य विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झाला होता. त्याबाबतच्या प्रयत्नांचा पुढला भाग म्हणून चव्हाण यांनी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली.
****
आठ राज्यांमधल्या १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून निवडक शाखांमध्ये प्रादेशिक भाषांमधून अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याच्या निर्णयाचं उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पुन्हा एकदा स्वागत आणि समर्थन करत कौतुक ��ेलं आहे. नव्या शिक्षण धोरणाच्या अनुशंगानं अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू, कन्नड, गुजराती, मल्याळम, बंगाली, आसामी, पंजाबी आणि ओडिया या अकरा प्रादेशिक भाषांमध्ये `बी. टेक.` अभ्यासक्रमांना परवानगी दिली याबद्दल आपण आनंद व्यक्त करतो, असं त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमांवरच्या संदेशाद्वारे नमुद केलं. अधिकाधिक शैक्षणिक संस्थांनी, विशेषत: तंत्रविषयक आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थांनी प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलणं आवश्यक असून असे प्रयत्न विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतील, असंही उपराष्ट्रपती नायडू यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय मंत्रालयांसह विविध संबंधित सहभागींचा सल्ला घेऊन जनगणनेचं वेळापत्रक निश्चित करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे. या वर्षीची जनगणना राबवण���याची सरकारची इच्छा २८ मार्च २०१९च्या भारतीय राजपत्रात सूचित करण्यात आली होती. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे हे काम प्रलंबित ठेवण्यात आलं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी २९ पूर्णांक २० शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हाभर आज पावसाच्या सरी कोसळत आहेत. हा पाऊस पिकांसाठी तसंच जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी उपयुक्त असल्याचं शेतीतज्ञ नमुद करत आहेत. औरंगाबाद शहर आणि परिसरातही आज सकाळपासून अधुनमधुन पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, पैठण तालुक्यातल्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं ४८५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात दाखल होत आहे. धरणाचा साठा सध्या ३५ पूर्णांक ५९ टक्के असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली आहे. परभणी शहरासह पूर्णा, गंगाखेड, पालम, सोनपेठ, जिंतूर, मानवत, पाथरी आणि सेलू शहरासह तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरु आहे. जालना जिल्ह्यातही शहरासह भोकरदन, बदनापूर, अंबड आणि घनसावंगी तालुक्यात आज दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काही भागात शेतामध्ये पाणी साचले तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसानं आज जोरदार हजेरी लावली. आज दुपारी कळमणुरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं बेलकी इथल्या ओढ्याला पूर आला. यामुळे बेलथर, कसबे धावंडा, गोटेवाडी, बेलकी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून या गावा��चा संपर्क तुटल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं जोर धरला असुन जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात भंडारदरा, पाचनई आणि कुमशेत या भागात संततधार सुरू आहे. तर उर्वरित जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर आलं आहे. काल दिवसभरात नदीच्या पाणी पातळीत सुमारे तीन फुटांनी वाढ झाली होती. पुढील काही दिवस जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
येत्या डिसेंबर पर्यंत राज्यातल्या इतर मागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज धुळे इथं एका पत्रकार परिषदेत दिला. राज्यातल्या आघाडी सरकारला हे आरक्षण द्यायचं नाही. २०२२ मध्ये राज्यातल्या ८५ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आरक्षणाशिवाय घेण्याचा या सरकारचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. सरकारनं अजुनही या संदर्भातली माहिती गोळा करण्याचं काम सुरु केलेलं नाही, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
****
परभणी शहरासह जिल्हाभरात `ईद-उल-अजहा` म्हणजेच `बकरी ईद`चा सण कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे साध्या पध्दतीनं साजरा करण्यात आला. ईदच्या नमाजचं घरांमध्येच पठण करण्यात आलं. देशातून या संसर्गाचं संकट नष्ट व्हावं यासाठी यावेळी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. शहरातल्या `शेक हँड` संस्थेतर्फे ईदनिमित्त गरजू महिलेला शिलाई यंत्र वितरित करण्यात आलं. औरगाबाद शहरासह जिल्ह्यातही ईदच्या नमाजचं पठण घरातच करण्यात आलं. सणाच्या पार्श्र्वभूमीवर संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातल्या छावणी ईदगाह परिसर आणि चौका - चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 November 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. **** **** ** आंदोलनांदरम्यानच्या घटनांची जबाबदारी, आणि हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्यांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश ** येत्या ११ डिसेंबरपासून नागपूर इथं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन ** राज्यात वनशेती उपअभियान राबवण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय ** ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप ** स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं स्पष्टीकरण आणि ** नांदेड- लातूर रस्त्यावरच्या अपघातात सात ठार, चौदा जखमी **** **** आंदोलनांदरम्यान होणारा हिंसाचार आणि सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. अशा विध्वंसक घटनांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी, तसंच हिंसाचारांच्या घटनांमधल्या पिडीतांना नुकसान भरपाई देण्यासाठी, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये न्यायालयं स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. याचबरोबर अशा घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर खटला भरण्यासाठी तस��च त्यांच्यावर नागरी दायित्व निश्चित करण्याचे काम संबंधित उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार एक किंवा त्याहून अधिक जिल्हा न्यायाधिशांकडे सोपवण्याची सूचनाही स���्वोच्च न्यायालयानं केली आहे. आंदोलना दरम्यान नुकसान झाल्यास संबंधित संघटना किंवा राजकीय पक्षाच्या प्रमुखाविरूद्ध अथवा सार्वजनिक किंवा खाजगी नुकसानीस जबाबदार असलेल्यांविरूद्ध गुन्हेगारी कारवाई करण्यासही न्यायालयानं अनुकुलता दर्शवली आहे. ** येत्या ११ डिसेंबर पासून नागपूर इथं राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असल्याची माहिती विधीमंडळ कार्य मंत्री गिरीष बापट यांनी काल मुंबईत दिली. २२ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालेल, या अधिवेशनात १३ नवीन विधेयकं आणि ११ अध्यादेश सादर केले जातील, असं ते म्हणाले. ** केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत राज्यात वनशेती उपअभियान राबवायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतीतल्या उत्पादनासह वृक्ष लागवड वाढवणं हा या योजनेचा उद्देश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी कृषी पंपांना दिलेल्या बारा तासांच्या थ्री फेज वीज पुरवठ्यापोटी महावितरणला अनुदान द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. विविध वस्तू आणि सेवांप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व बाबींची खरेदीही केंद्र शासनानं विकसित केलेल्या गव्हर्नमेंट- इ - मार्केटप्लेस - जीईएम या वेबपोर्टलच्या माध्यमातून करायलाही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राबवलेल्या विविध योजनांची दखल सरकारनं घेतली असून, त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढवण्यासाठी उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार द्यायचा निर्णयही कालच्या बैठकीत झाला. **** गोवा पणजीत काल ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप झाला. या महोत्सवात फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘वन ट्वेन्टी बीटस पर मिनिट’ या चित्रपटानं सुवर्णमयूर पटकावला. चीनचे दिग्दर्शक वुईवून कू यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा, फ्रेंच अभिनेता नेहूल पर्झ बिस्कार्त याला उत्कृष्ट अभिनेत्याचा तर केरळच्या पार्वती टी. के. हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘टेक ऑफ’ या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला तर ‘डार्क स्खूल’ या चित्रपटासाठी बोलिव्हियन दिग्दर्शक किरो रुसो यांना रुपेरी मयूर पुरस्कार देण्यात आला. चिनचे विवियन क्यू यांना अँगल्स वियर व्हाईट या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परीषद -आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय कॅनडाच्या अटोम इग्वोयन ��ांना इफ्फी २०१७ जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना 'इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह चित्रपट सृष्टीतले नामवंत मान्यवर यावेळी उपस्थित होते. *** स्वतंत्र मराठवाड्याला काँग्रेसचा विरोध असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी औरंगाबाद इथं विभागीय पातळीवर काल बैठक झाली, या बैठकीनंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे हीच आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आघाडी सरकारच्या काळात ज्या लोकांना योजनांचा लाभ मिळाला त्यांच्या जाहीराती आणि फोटो दाखवून हे सरकार श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केली. **** राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यंदा जेष्ठ कलावंतर मधुकर नेराळे यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. तमाशा क्षेत्रात दीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** **** लातूर जिल्ह्यात काल पहाटे झालेल्या रस्ते अपघातात सात जण जागीच ठार तर १४ जण जखमी झाले आहेत. लातूर- नांदेड महामार्गावर टायर फुटल्यानं कोळपा गावानजीक रस्त्यालगत उभ्या असलेल्या टृकवर पंढरपूरहून नांदेडकडे जाणारी एक जीप भरधाव वेगानं येऊन आदळली, त्याचवेळी ही जीप नांदेडकडून येणाऱ्या अन्य एका जीपला धडकून त्यांची समोरासमोर टक्कर झाली. एका टेंपोला ओलांडून पुढे जायच्या प्रयत्नात मोटारीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा विचित्र अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. ** सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर तहसीलदारांना मागण्यां��ं निवेदन देण्यात आलं. **** स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. नांदेड इथं महापौर शिला भवरे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण समितीच्या वतीनं औरंगाबाद इथं परिसंवाद घेण्यात आला. युवकांचे भवितव्य या विषयावर आयोजित या परिसंवादात अनेक तरुण तरुणींनी आपले विचार मांडले. **** न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी डाव्या लोकशाही आघाडीनं केली आहे. काल औरंगाबाद इथं सुभाष लोमटे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली. यासंदर्भात राष्ट्रपतींना विभागीय आयुक्तांमार्फत तर सरन्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामार्फत निवेदन पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. *** परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या मसला या गावात येणारी बस रस्त्यांवरच्या खड्यांमुळं बंद करण्यात आल्यामुळे काल या गावातल्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदाराच्या दालनात शाळा भरवली. या बसनं गावातले विद्यार्थी शिक्षणासाठी गंगाखेड इथं ये जा करतात. तहसीलदार आसाराम छडीदार यांनी आगार प्रमुखांना बस सुरू करण्याचे तसंच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीनं रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना येत्या ७ डिसेंबरपासून कृषी पंपांसाठी रात्रपाळीत केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात बदल केला जाणार असून आता दिवसाही काही तास कृषी पंपांसाठी वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. ऐन हिवाळ्यात रात्रपाळीतल्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. ***** अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या अल्पवयीन मु��ीच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातल्या दोषी आरोपींना आज जिल्हा सत्र न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. *****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 November 2017 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा. ******* मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्याचे पशूसंवर्धन आणि दुग्धोत्पादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्दबातल ठरवली आहे. खोतकर यांनी जालना मतदार संघातून २०१४ साली विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांनी या निवडणुकीसाठीचं नामनिर्देशन पत्र वेळ उलटून गेल्यानंतर दाखल केल्याची तक्रार, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी एका याचिकेद्वारे खंडपीठात केली होती. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं खोतकर यांची आमदार पदी झालेली निवडणूक रद्द करण्याचे निर्देश दिले. या निवडणुकीत खोतकर अवघ्या २९६ मतांनी विजयी झाले होते. **** संसदेचं हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. हे अधिवेशन पाच जानेवारी पर्यंत चालणार असून, २५ आणि २६ डिसेंबर रोजी नाताळ निमित्त अधिवेशनाला सुट्टी राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीमुळे संसदेचं अधिवेशन उशीरा घेण्यात येत असल्याचं कुमार यांनी सांगितलं. **** फसवणूक आणि अनैतिक पद्धतीनं काम करणाऱ्या रुग्णालयांवर धडक कारवाई करण्यासाठी राज्य सरकारांनी वैद्यकीय आस्थापना कायद्याची अंमलबजावणी करा��ी असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. गुरुग्राम इथल्या फोर्टीस रुग्णालयानं वैद्यकीय उपचारांसाठी अवाजवी रक्कम उकळल्याच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या खाजगी रुग्णालयांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करावी असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव प्रिती सुदान यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, रुग्णालयांतली गैरकृत्यं आणि उपचारांसाठीच्या अवाजवी खर्चासंदर्भात वाढलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधलं. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायला हवी तसंच वाजवी दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायला हव्यात असं सुदान यांनी म्हटलं आहे. **** वनेतर क्षेत्रात बांबूच्या लागवडीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं भारतीय वन विधेयक २०१७ सुधारणा अध्यादेश जारी केला आहे. या सुधारणा अध्यादेशानुसार वनेतर क्षेत्रात लागवड केलेल्या बांबूला वृक्ष या संज्ञेतून वगळण्यात आलं आहे. यामुळे व्यावसायिक हेतूनं बांबूची वाहतूक करण्यासाठी आता ‘ट्रान्झिट पास’ ची गरज भासणार नाही. भारतीय वन कायदा १९२७ नुसार बांबूचा समावेश वनोपज लाकूड या गटात करण्यात आला होता. या तरतुदीमुळे वनेतर क्षेत्रात बांबूची लागवड करतांना शेतकऱ्यांना बंधनांना सामोरं जावं लागत होतं. **** उत्तर प्रदेशातल्या चित्रकूट जिल्ह्यात माणिकपूर रेल्वे स्थानकानजीक वास्को द गामा - पाटणा एक्सप्रेसचे १३ डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. दुर्घटनाग्रस्त रेल्वेमधल्या प्रवाशांना विशेष गाडीनं पाटणा इथं पोहोचवण्याची व्यवस्था केल्याचं उत्तर मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितलं. रेल्वे विभागानं मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये आणि जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. **** गोव्यात पणजी इथं सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानं युनेस्कोच्या गांधी पदकासाठी यंदा नऊ चित्रपट नामनिर्देशित केले आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी आणि दृकश्राव्य संवाद परिषदेच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवडलेल्या या नऊ चित्रपटांमधे क्षितिज - अ होरायझन, मानुसंगदा, पूर्णा, रेल्वे चिल्ड्रन, आणि टेक ऑफ, या पाच भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, या महोत्सवात इंडियन पॅनोरामा विभागात आज प्रसाद ओक दिग्दर्शित कच्चा लिंबू आणि दिपक गावडे दिग्दर्शित इडक हे दोन मराठी चित्रपट दाखवले जाणार आहेत. **** जालना शहरातील नवीन जालना आणि जुन्या जालन्याला एकत्र जोडणाऱ्या कुंडलिका नदीवरच्या लोखंडी पुलाच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात राज्यशासनानं एक कोटी रुपयांच��� निधी मंजूर केला आहे. नगरविकास खात्यामार्फत याबाबतच पत्र नगरपालिकेला प्राप्त झालं आहे. मागच्या महिन्यात विकास परिषद आणि सिमेंट रस्त्यांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना इथं आले असता, सुमारे सव्वाशे वर्ष जुन्या या ब्रिटिशकालीन पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकड़े केली होती. लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. **** हाँगकाँग सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा उपान्त्यपूर्व फेरीचा सामना आज जपानच्या अकाने यामागुची विरुद्ध होणार आहे. सायना नेहवाल आणि एच एस प्रणयचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान नागपूर इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज पहिल्या दिवशी शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या २७ षटकात दोन बाद ४७ धावा झाल्या होत्या. इशांत शर्मा आणि रविचंद्रन अश्विननं प्रत्येकी एक गडी बाद केला. *******
0 notes