Tumgik
#आठवडा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
साप्ताहिक अंकभविष्य १२ ते १८ डिसेंबर २०२२ : हा आठवडा किती भाग्यशाली आहे ते जन्मतारखेवरून जाणून घेऊया
साप्ताहिक अंकभविष्य १२ ते १८ डिसेंबर २०२२ : हा आठवडा किती भाग्यशाली आहे ते जन्मतारखेवरून जाणून घेऊया
साप्ताहिक अंकभविष्य १२ ते १८ डिसेंबर २०२२ : हा आठवडा किती भाग्यशाली आहे ते जन्मतारखेवरून जाणून घेऊया आठवड्याच्या मध्यात तयार झालेल्या बुधादित्य योगामुळे या आठवड्यात अनेक लोकांच्या भाग्यात वृद्धी होत आहे. १५ डिसेंबर रोजी सूर्य धनु राशीत प्रवेश करत असल्याने धनु राशीमध्ये तयार झालेल्या बुधादित्य योगाच्या शुभ प्रभावाने अनेक लोकांना लाभ होईल. तुमच्या जन्मतारखेवरून हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील जाणून…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित-राज्याच्या प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा 
शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं निधन
आणि
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणीचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश
****
विधान परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्व नऊ तर महाविकास आघाडीच्या तीन पैकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे, शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि भावना गवळी, काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर परळी इथं, तर राजेश विटेकर यांच्या समर्थकांनी परभणी इथं विजयाचा जल्लोष साजरा करत आनंद व्यक्त केला.
****
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित झालं. विधान परिषदेत या अधिवेशन काळात एकूण नऊ विधेयकं तर विधानसभेत एकूण दहा विधेयकं संमत झाली.
****
राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला ते काल विधानसभेत उत्तर देत होते. समाजाच्या प्रत्येक घटकांना लोकोपयोगी योजनांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत, जनतेचं दुःख हलकं करू शकलो याचं समाधान असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
विधान सभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, विविध मुद्यांवरून सरकारवर टीका केली. सदनाबाहेर पत्रकारांशी बोलतांना, राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलं असताना, नव्याने जाहीर केलेल्या योजनांसाठी निधी कुठून येणार, याचं समाधानकारक स्पष्टीकरण सरकारला देता आलेलं नाही, असं दानवे यांनी सांगितलं.
****
१५ वर्षांच्या आतील सर्व वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभेत ही माहिती देण्यात आली.
****
राज्यातल्या शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितलं आहे. ते काल विधान परिषदेत सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. तांबे यांनी, कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.
****
विकास प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन प्रक्रि���ा कायद्यातील सुधारणा अथवा अंमलबजावणीबाबत सुलभता आणण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बोलत होते.
****
इतर मागास प्रवर्गातील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १५ लाख रूपये करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली. वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरवताना त्यामध्ये शेतीमधून मिळणारं उत्पन्न ग्राह्य धरू नये, अशी विनंती करण्यात येईल, असं सावे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटी परिसरात नियोजित एथर एनर्जी या इलेक्ट्रीक दुचाकी प्रकल्प उभारणीसाठी १०० एकर जमिनीचं वाटपपत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतंच प्रदान करण्यात आलं. या माध्यमातून  सुमारे २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ४ हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ५२ हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
२५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना गृह मंत्रालयानं काल जारी केली. आणिबाणी विरोधात लढा दिलेल्या नागरिकांच्या योगदानाचं, हा दिवस स्मरण करून देईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं काल कॅनडात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. तजकरे उजालों के, मुल्के खुदा तंगनिस्त, ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी कुरेशी यांचे ते पती होत. डॉ. दुलारी यांच्यासह त्यांनी औरंगाबादनामा या मराठी आणि द ग्लोरियस औरंगाबाद या इंग्रजी पुस्तकांचं सहलेखन केलं. ऐतिहासिक वास्तुंचा संरक्षित वास्तूंच्या यादीत समावेश करवून घेण्यात रफत कुरेशी यांचा सिंहाचा वाटा होता. कुरेशी यांच्या निधनानं समाजाच्या विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
****
'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेची विभागात पारदर्शक तसंच गतिमान अंमलबजावणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात या योजनेच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते. महिलांची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना गावडे केली.
या योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात परवा ११ जुलैपर्यंत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण ७५ हजार ७०२ महिलांनी तर परभणी जिल्ह्यात १९ हजार ५३० महिलांनी अर्ज भरले आहेत. जालना जिल्ह्यात 'मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण' योजनेतंर्गत सर्वात जास्त अर्ज नोंदणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीनं १५ ऑगस्टला गौरव करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'चे अर्ज भरून घेण्यासाठी आज आणि उद्या विशेष शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिल्या आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगर इथं शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, काल काल जालना शहरातून आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही रॅली जाहीर सभेत विसर्जित झाली.
****
गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशहितासाठी कार्य करावं, असं आवाहन  विद्याभारतीचे शेषाद्री डांगे यांनी केलं आहे. काल धाराशिव इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताची तरुण पिढी कुशल आणि आत्मनिर्भर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
जालना जिल्ह्यात काल भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा  मृत्यू झाला, अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला असून पुढील तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अवयव दानाबद्दल जनजागृती होण्याची गरज छत्रपती संभाजीनगर इथले डॉ अजित भागवत यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात नांदेड इथं मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या अवयव दानातून छत्रपती संभाजीनगर इथं, खासगी रुग्णालयात एकाच दिवशी हृदय आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, त्या पार्श्वभूमीवर काल पत्रकार परिषदेत डॉ भागवत बोलत होते. अवयव प्रत्यारोपण केलेल्या या दोन्ही रुग्णांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली.   
****
महसूल ��र्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता मंजूर करावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने काल लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड इथले कर्मचारी यात सहभागी झाले.
****
नांदेड जिल्ह्यात विद्युत सेवा सुरळीत करण्यासाठी १ हजार २५० कोटी रुपयांचा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी काल नांदेड इथं ही माहिती दिली.
****
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात काल सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं नीरा स्नान सोहळा साजरा झाला. पालखीच्या रिंगण सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा काल माळशिरस तालुक्यात पुरंदरवडे इथं रिंगण सोहळा झाला.
****
0 notes
successtrainings · 1 year
Text
Five-day working week : 28 जुलैपासून बँकमध्ये लागू होणार पाच दिवसांचा आठवडा
Five-day working week : बँक कर्मचाऱ्यांना आता लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांमध्ये आठवड्यातून फक्त पाच दिवस काम आणि दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी प्रस्तावित असून यावर 28 जुलै रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. इंडियन बँकिंग असोसिएशन पुढील आठवड्यात म्हणजे शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बैठकीत याबाबत निर्णय घेईल, असे अहवालात म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
राज्यातील सत्तासंघर्षाचा १५ मेपूर्वी निकाल?
Tumblr media
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नेमका लागणार तरी कधी? गेल्या काही दिवसांपासून हाच प्रश्न राज्यात सर्वाधिक उत्सुकतेचा बनला आहे. १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान, घटनापीठातील एक न्यायमूर्ती न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे १५ मे पूर्वी या सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिना लागतो. पण जास्तीत जास्त किती कालावधी लागेल, याची काही शाश्वती नसते. पण महाराष्ट्राच्या केसमध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने किमान त्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात एखाद्या प्रकरणाचा निकाल येणार हे आदल्या दिवशीच कळते. कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या केसचा निकाल जेव्हा लागेल, त्याच्या एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. मात्र, त्या तारखेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातले एक न्यायमूर्ती पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १४ मेच्या आधी कधीही हा निकाल येणार हे तर निश्चित मानले जात आहे. त्यातच २० मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्याही सुरु होत आहेत. २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुटी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असे कायदेशीर वर्तुळात बोलले जात आहे. Read the full article
0 notes
amol12 · 2 years
Text
व्हेरीकोज व्हेन ऑपरेशन किंवा सर्जरी झाल्यानंतर कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
1) ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला स्टॉकिंग सहा ते सात दिवस 24 तास घालावे लागतील आंघोळीला जाताना तुम्ही स्टॉकिंग म्हणजेच पायाचे सॉक्स काढू शकता आणि तुम्हाला चार ते पाच महिने स्टॉकिंग म्हणजेच पायाचे सॉक्स हे घालावे लागतील तुम्ही ते रात्री काढून झोपू शकता दिवसभर वापरावे लागेल स्टॉकिंग हे खूप महत्त्वाचे आहे
2) ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचे दैनंदिन कामे करू शकता — चालू शकता तुम्हाला आराम करायची गरज नाही पायऱ्या चढणे, व्यायाम करणे, 20 ते 25 मिनिटे चालणे याची गरज आहे,
30 दिवसानंतर तुम्ही जिम जाणे ,धावणे ,ट्रेडमिल देखील करू शकता
3) तुम्हाला मांडीच्या आतल्या बाजूस किंवा पायाच्या मागील बाजूस पूर्वीच्या नसा मध्ये गाठी किंवा काहीतरी आहे असे जाणवेल ही एक ऑपरेशन झाल्यानंतर ची प्रक्रिया आहे आणि तुम्हाला जर हे जाणवत असेल तर ते चांगले आहे याचा अर्थ तुमची प्रक्रिया यशस्वी झाली आहे, दोन आठवड्यात (15–30 दिवस) ते निघून जाईल 4) तुम्ही जेव्हा चालतात तेव्हा तुम्हाला जडपणा जाणवेल यामुळे चालणे थांबू नका, चालल्यामुळे तुम्हाला खूप फायदा आहे
5) तुम्हाला मांडीच्या आतल्या बाजूस काही निळसर, काळे ,लालसर, रंगहीन डाग दिसतील तुम्ही घाबरू नका , दोन आठवड्यात ते निघून जाईल कारण ते ऑपरेशन नंतर दिसतात.
6) तुम्हाला जेवणामध्ये कोणतेही पथ्य नाही पण तुम्ही एक महिना, एक आठवडा, तीन महिने ,सहा महिने ,असं डॉक्टरांसोबत अपरमेंट किंवा भेट घेणे महत्त्वाचे आहे परत हा आजार होऊ नये म्हणून तुम्हाला डॉक्टरांना भेटावे लागेल. 7) जर जखम असेल तर ती हळूहळू बरी होईल फक्त औषधी, नियमित ड्रेसिंग, आणि स्टॉकिंग पायाचे मोजे हे चालू ठेवा.
8) तुमचे काम जास्त वेळ उभा राहण्याची असेल तर तुम्ही अधून मधून पाच-दहा मिनिटं बसायचा प्रयत्न करा जास्त वेळ मांडी घालणं टाळा . 9) दिवसातून दोन या तीन वेळा बेडवर सरळ झोपून भिंतीच्या आधारे पायांना वरती करून पाच मिनिटे ठेवावे यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे रक्त खाली गेलेले वापस जाण्यास मदत होते.
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
प्रेम आणि प्रपोज यांचा फार जवळचा संबंध नाही तरीही आज तो जरा जास्तच येतो...! 
चला हरकत नाही, नक्की प्रपोज करा पणं प्रपोज च्या पलीकडे असलेले जगणे सुंदर कसा करता येईल याचाही विचार नक्की करा...
या सात दिवसांचा आठवडा विलक्षण आकर्षण असतो प्रेमी युगलासाठी नक्की तो असावाही...! पण एक सांगेल माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सातव्या अस्मनात वावरत असताना वास्तवात नात कुठ पर्यंत पोहचले याची काळजी नक्की घ्या..! 
प्रेम करा प्रपोज करा पणं एक हात जोडून विनंती असेल बाळांनो...
तुम्हाला कोणी प्रपोज केला असेल किंवा तुम्ही कुणाला केला असेल उत्तर होकार असो की नकार असो स्टेबल रहा..! सुखात शांत आणि दुःखात ही शांत रहा... कुठलाही नकार हा कायम नकार नसतो म्हणून संयम बाळगा...! तुम्ही असाल नसेल योग्य तर स्वतः मधे असलेल्या उणिवा शोधा कारण तसा नकार मिळतच नाही... किंवा या उलट तिला नाते नको असेल तिला तीच त्याच आयुष्य जगायचे असेल तर ते आनंदाने तो निर्णय स्वीकार करा...
तुम्ही प्रेम घेऊन प्रपोज केला असेल, करणार असेल तर एक नक्की, नकार आला असेल तर तुमच्या त्या प्रेमाची भावना द्वेष होणार नाही तिरस्कार होणार नाही याची काळजी घ्या..! कारण होकार देण्यासाठी जेवढी हिम्मत लागत नाही तेव्हढी नकार देण्यासाठी लागते म्हणून नकार सुद्धा पचवता आले पाहिजे...
प्रेम अलवार पवित्र भावना आहे ती नक्की जपा पणं त्यातून तुमच्या आई वडिलांच्या तुमच्या आयुष्यावर डाग लागेल अस काही त्यातून निष्पन्न करू नका..! प्रेम करा तो आपला अधिकार आहे पणं प्रेम कुणावर किती व कसे करावे हे फार समजून करा..
प्रेमाच्या तळ्यात जर उतरणार असाल तर तळाचा ठाव नक्की घ्या पणं काठावर उभा राहून प्रेम करू नका..! एकतर्फी असेल तर व्यक्त करा पणं अव्यक्त मनात ठेऊन आतल्या मनाला मारू नका...! कारण अव्यक्त मनातले प्रेम द्वेष होण्यास वेळ लागत नाही..! 
पण तुम्ही प्रेम केले असेल आणि त्याने तिने त्याला नकार दिला असेल किंवा अर्ध्यावर थांबले असाल तरीही तुम्हाला तिरस्कार करण्याचा कुठलही अधिकार नाही कारण तुम्ही प्रेम केले होते हे विसरून चालणार नाही...!
याच प्रेमाची दुसरी बाजू जळ जळीत वास्तव आहे हे पणं समजून घ्या...!
प्रेम स्वस्त ही नाही आणि महाग ही नाही ! कारण तुम्ही स्वतःच अस्तित्व सिद्ध केले असेल या दुनियादारीत तर नक्कीच तुमच्या साठी स्वस्त असेल प्रेम भावनेने..! आणि तुम्ही फक्त सौंदर्याच्या बळावर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल मग तुम्ही ती असो की तो नक्कीच चुकता आहे.. सौंदर्याला कोमजण्याचा शाप असतो आणि प्रेमाला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत बहर येत असतो..! म्हणून मनातून जिंकता आले तर तुम्ही प्रेम यशस्वी करू शकता...! वर वर असणारा दिखावा प्रेमाला सुरावत लवकर करेलही आणि लवकर शेवटही ! पण आतून प्रेम येण्यास वेळ लागतोच तो वेळ आज उद्या किंवा कधी कोणी मागितला तर तो वेळ घेऊदा कारण उशिरा घेतलेला निर्णय कदाचित आयुष्यभर सोबत असेल..! 
होकार असो की नकार तो समजून घ्या ! त्या मागच्या पवित्र भावनेला कायम न्याय द्या..! आयुष्य खूप सुंदर आहे ते सजवा..! होईल तेवढे नात्यात विश्वास प्रेम काळजी स्नेह स्वतंत्र स्वातंत्र्य द्या..! तुमचे न���ते तुमचं आयुष्य सुंदर करेल..! तुमचे प्रेम तुम्ही आयुष्यभर काही कारणास्तव जपू शकत नसलं तर ते स्पष्टपणे सांगण्याचे धाडस ठेवा.! नंतर होणार त्रास कदाचित आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो..! 
बाकी ब्रेकअप वैगरे याबद्दल मी बोलणार नाही तो आपणच आपल्यातलं अनेक छोट्या मोठ्या कारणातून मिळवलेला कलंक आहे...! 
प्रेम करा ते जगा ते जपा आणि वाढवा..! तुम्हाला ते आयुष्यभर पुरेल एवढे सुंदर आहे..! बाकी प्रेम सात्विक असेल सुंदर असेल तर तुमच्या प्रेमाचा विजय नक्कीच होईल...! 
बाकी काही करा पणं कधीच कुणाचा द्वेष करू नका मग तो किंवा ती सोबत असो या नसो कारण आपल्याला प्रेमानंतर द्वेष करण्याचा कुठलाच अधिकार नाही..! कारण आपण प्रेम केले होते व्यवहार नाही..! आणि जर प्रेमात असताना आणि नसतांना तुम्ही जर द्वेष करत असाल तर तुम्ही प्रेमच केले नाही मग त्या द्वेषाचे कारण काही असो चुकी कुणाचीही आणि कितीही टोकाची असो द्वेष करू नका. 
करा फक्त प्रेम तुमचा द्वेष करणाऱ्या माणसाचाही आणि आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या माणसाचाही...! 
प्रेम कधी संपत नाही ते फक्त जागा बदलते ती जागा छेडू नका ती अबाधित रहुद्या तुम्ही जगा दुसऱ्याला ही जगू द्या..🤍❤️
-वैभव वैद्य....
0 notes
marathi-katta · 2 years
Text
सामान्यतः सामान्य नामांचेच अनेकवचन होते.
भाववाचक नाम व विशेषनाम शक्यतो एकवचनीच असतात.
काही वेळा भाववाचक नामांचा व विशेषनामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग केला जातो तेव्हा अनेकवचन होते.
एखादी व्यक्ती मानाने, नात्याने, अधिकाराने, वयाने मोठी असेल तेव्हा स्था व्यक्तीबद्दल आदरार्थी अनेकवचन वापरले जाते. मराठीत अनेक आदर्श दर्शक शब्द आहेत.
उदा: राव, रावजी, पंत, शास्त्री, आचार्य, शेट, शेटजी, भाई, दास, जी, बा, साहेब, साब वगैरे..
उदा : श्यामराव, श्रीधरपंत, धनपालशेट, गोविंदजी, दादासाहेब, रायबा, पंडितजी वगैरे.
काही शब्द बहुधा अनेकवचनातच आढळतात. उदा. वडील (बाप)
विपुलता, मुबलकता दाखविण्यासाठी एकवचनाचा वापर करतात.
vachan Badlo in marathi जोडपे, त्रिकूट, आठवडा, शत, सहस्र, लक्ष, कोटी, दशलक्ष हे शब्द असे आहेत की, त्यात अनेकत्वाचा बोध होत असला तरी तेवढ्या संख्येचा एक गट मानून ते एकवचनी वापरले जाते. समूह अनेक मानले तर ते अनेकवचनी होतात.
Also read: Hard Disk Information In Marathi | हार्ड डिस्क व SSD मधला फरक
मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.
एकवचन
नामावरून एकाच वस्तुचा बोध झाला तर त्यास एकवचन असे म्हणतात जसे पान, वही, फळ, दरवाजा, कागद, पेन, वगैरे.
एकवचनी सर्वनामे : मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण, तू
Also Read: BCA Full Form In Marathi | BCA फ्रेशर चा पगार किती आहे ?
अनेकवचन
नामावरून अनेक वस्तूंचा बोध झाला तर त्यास अनेकवचन असे म्हणतात जसे : वह्या, खडे, पाने, पाट्या, घरे, फुले, वगैरे (एक वचन अनेकवचन 100 शब्द मराठी)
अनेकवचनी सर्वनामे : आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, ते, ह्या, त्या.
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
विधिमंडळात विविध संसदीय आयुधांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय - माजी मंत्री बाळासाहेब थोरात
विधिमंडळात विविध संसदीय आयुधांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
नागपूर, दि. 21 : “विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडण्यात येणारे तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, अंतिम आठवडा प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, विविध नियमांन्वये चर्चा, औचित्याचे मुद्दे इत्यादी संसदीय आयुधे अत्यंत महत्त्वाची असून याद्वारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यात दोन्ही सभागृहे महत्त्वाची भूमिका बजावतात”, असे माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे सांगितले. राज्यातील विविध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
��ुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी-प्रधानमंत्री पीक विमा योजना - महासंवाद
सुरक्षित पीक, निश्चिंत शेतकरी-प्रधानमंत्री पीक विमा योजना – महासंवाद
��ेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई आणि नफा मिळावा, या दृष्टीने कमी प्रीमियममध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. 1 ते 7 डिसेंबर, 2022 दरम्यान पीक विमा आठवडा पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर योजनेसंबधी माहितीपर लेख. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना…
View On WordPress
0 notes
marathimajja · 2 years
Text
पिंपरी चिंचवड चा गोल्डमन बिग बॉस 16 च्या घरात
पिंपरी चिंचवड चा गोल्डमन बिग बॉस 16 च्या घरात
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये राहणारा सनी वाघचौरे उर्फ गोल्डन बॉय याची वाइल्ड कार्ड मधून बिग बॉस हिंदी सीजन 16 मध्ये एंट्री होत आहे. अगोदरच चर्चे मध्ये असलेले बीग बॉस आता आणखीच चर्चेत येणार असे दिसत आहे. मनोरंजनाची फुल टू धमाल असलेला बिग बॉस प्रेक्षकांसाठी आणखीनच रंजक बनणार आहे. बिग बॉसच्या सिजन 16 चा 8 वां आठवडा सुरू आहे. त्यात एम सी स्टान नाव असेलाला रॅपर हा देखील करोडो रुपयेचे दागिने…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
साप्ताहिक प्रेम भविष्य १२ ते १८ डिसेंबर :धनु राशीत ३ ग्रहांचा संयोग,मिथुन,कन्यासह 'या' राशीसाठी रोमॅंटिक आठवडा
साप्ताहिक प्रेम भविष्य १२ ते १८ डिसेंबर :धनु राशीत ३ ग्रहांचा संयोग,मिथुन,कन्यासह ‘या’ राशीसाठी रोमॅंटिक आठवडा
साप्ताहिक प्रेम भविष्य १२ ते १८ डिसेंबर :धनु राशीत ३ ग्रहांचा संयोग,मिथुन,कन्यासह ‘या’ राशीसाठी रोमॅंटिक आठवडा या आठवड्यात धनु राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होत असून, ३ ग्रहांचा संयोग तयार होईल. प्रेम आणि नातेसंबंधाचे कारक शुक्र आणि बुधही या त्रिग्रही योगात सहभागी होतील. अशा स्थितीत सूर्य, शुक्र आणि बुध एकत्र आल्याने मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांचे जीवन रोमँटिक बनतील. या दोन राशींव्यतिरिक्त, या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १०० टक्के मतदान-पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू
शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार
छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, इतिहास तज्ज्ञ रफत कुरेशी यांचं निधन
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या आरक्षण शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या शाळांना सुटी
****
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीत १०० टक्के मतदान झालं. सर्व २७४ आमदारांनी गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी पाच वाजेनंतर मतमोजणीला प्रारंभ झाल्याचं वृत्त आहे. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मत मिळवणं आवश्यक आहे.
****
राज्यातल्या शाळा-महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या खाद्य तसंच पेयपदार्थ तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितलं आहे. ते आज विधान परिषदेत सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. तांबे यांनी, कॅफेनचे अतिरिक्त प्रमाण असलेल्या थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणण्याबाबतचा प्रश्न विचारला, यासंदर्भातल्या पदार्थांचे एकूण ३६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं आत्राम यांनी सांगितलं.
****
विकास प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन प्रक्रिया कायद्यातील सुधारणा अथवा अंमलबजावणीबाबत सुलभता आणण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात बोलत होते. सदस्य प्रकाश सोळंके यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यासंदर्भात नवीन प्रारूपावर मागवण्यात आलेल्या हरकतींबाबत पुढील आठवड्यात बैठक घेऊन महिनाभरात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही विखे पाटील यांनी सांगितलं.
****
इतर मागास प्रवर्गातील वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १५ लाख रूपये करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ही माहिती दिली. यासंदर्भात एक महिन्याच्या आत नवी दिल्ली इथं संबंधित विभागासोबत चर्चा करून ही मर्यादा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, वार्षिक उत्पन्न मर्यादा ठरवताना त्यामध्ये शेतीमधून मिळणारं उत्पन्न ग्राह्य न धरण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्यात येईल, असं सावे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्ताव आज सादर झाला, विधान परिषदेत यावर बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, जनतेच्या पैशाचा अपव्यय करून राज्याला अधोगतीला नेण्याचं काम सरकार करत असल्याची टीका केली. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देणारं सरकार, महिला सुरक्षेत मात्र अपयशी ठरल्याचं दानवे म्हणाले. भाजपाचे प्रसाद लाड यांनी चर्चेत सहभागी होत, सरकार राबवत असलेल्या जनतेच्या हिताच्या योजना अधिक गतीनं पुढे नेल्या जातील असा विश्वास व्यक्त केला. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या उत्तर देत आहेत.
****
घरा घरात पाणी, घरा घरात शौचालय, आणि शौचापासून मुक्तीचं स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द असल्याचं, राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री, गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. आज दिल्लीत, केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन तसंच स्वच्छ भारत मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणी साठी केंद्र शासनाकडून आर्थिक निधी मागणी त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या प्रगतीबद्दल केंद्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
२५ जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह मंत्रालयाने जारी केली. २५ जून १९७५ रोजी तत्कालीन केंद्र सरकारने देशात आणिबाणी लागू केल्याची घोषणा केली होती. आणिबाणीच्या विरोधात लढा दिलेल्या आणि अत्याचार सहन केलेल्या नागरिकांच्या योगदानाचं हा दिवस स्मरण करून देईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ रफत कुरेशी यांचं आज कॅनडात अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मुल्के खुदा तंगनिस्त, तजकरे उजालों के ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी कुरेशी यांचे ते पती होत. डॉ. दुलारी यांच्यासह त्यांनी औरंगाबादनामा या मराठी आणि द ग्लोरियस औरंगाबाद या इंग्रजी पुस्तकांचं सहलेखन केलं. महानगरपालिकेच्या हेरिटेज कमिटीला अनेक ऐतिहासिक वास्तू प्रत्यक्ष दाखवून त्या संरक्षित वास्तूंच्या यादीत समाविष्ट करवून घेण्यात रफत कुरेशी यांचा सिंहाचा वाटा होता. कुरेशी यांच्या निधनानं समाजाच्या विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज जालना शहरातून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीत मराठा बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही रॅली जाहीर सभेत विसर्जित झाली.
दरम्यान, उद्या छत्रपती संभाजीनगर इथं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या सिडको भागातल्या वसंतराव नाईक चौक ते क्रांतीचौक या मार्गावर ही रॅली काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर फक्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांनी याबाबतचे पत्रक जारी केलं आहे.  
****
१५ वर्षांच्या आतील सर्व वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती देण्यात आली आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विविध वाहन चालक संघटनांनी ही मागणी केली होती.
****
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात आज सकाळी झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. छत्रपती संभाजीनगरहून जालन्याकडे येत असलेल्या भरधाव ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला असून पुढील तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अवयव दानाबद्दल जनजागृती होण्याची गरज छत्रपती संभाजीनगर इथले डॉ अजित भागवत यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात नांदेड इथं मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या अवयव दानातून छत्रपती संभाजीनगर इथं, खासगी रुग्णालयात एकाच दिवशी हृदय आणि यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या, त्या पार्श्वभूमीवर डॉ भागवत बोलत होते. अवयव प्रत्यारोपण केलेल्या या दोन्ही रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.  
****
बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी उद्या आणि परवा शिबिरांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिल्या आहेत. ते आज याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत बोलत होते. या शिबिरात लाभार्थी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, नगर परिषद क्षेत्रीय वार्ड अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना पाठक यांनी दिल्या.
****
महसूल कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता मंजूर करावा यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश येवते यांनी याबाबत बोलतांना, संघटनेच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, सेनगाव, औंढा, वसमत तहसील कार्यालयातले कर्मचारीही या आंदोलन सहभागी झाल्याची माहिती राज्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप कदम, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष इम्रान पठाण यांनी दिली.
****
संत तुकाराम महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूज इथं पोहोचली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पालखीचं स्वागत केलं. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केल्यानंतर भक्तीमय वातावरणात रिंगण सोहळा पार पडला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या गजल संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. साहित्य क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमानं उद्या सायंकाळी जीवन विकास ग्रंथालयात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गजल गायक भीमराव पांचाळे यांच्याशी रसिकांना थेट संवाद साधता येणार आहे.
****
0 notes
kokannow · 2 years
Text
तीन वाहन चालकांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तीन वाहन चालकांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
आठवडा बाजार दिवशी सार्वजनिक रस्त्यात वाहन लावून वाहतुकीस अडचण निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल सिंधुदुर्गनगरी : कसाल बाजारपेठेत गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी सार्वजनिक रस्त्यात वाहन लावून वाहतुकीस अडचण निर्माण केल्या प्रकरणी तीन वाहन चालकांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.टाटा एंट्रा एम एच ०७ ए जे २९३३ हे वाहन बाजारपेठ रस्त्यात उभे केल्याने पोलीस कॉन्स्टेबल एन एन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
'गम है किसी की प्यार में' 'अनुपमा'साठी डोकेदुखी ठरली, 'ये रिश्ता क्या कहलाता है'ला मिळाले हे स्थान
‘गम है किसी की प्यार में’ ‘अनुपमा’साठी डोकेदुखी ठरली, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ला मिळाले हे स्थान
टीआरपी लिस्ट 34 वा आठवडा 2022: ‘मिसिंग किसी की प्यार में’ ‘अनुपमा’साठी डोकेदुखी ठरली, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ला मिळाले हे स्थान ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
श्रीदेवीने स्वतःच्या मुलीची खिल्ली उडवली तेव्हा तिने जाहीरपणे जान्हवी कपूरची नक्कल केली होती
श्रीदेवीने स्वतःच्या मुलीची खिल्ली उडवली तेव्हा तिने जाहीरपणे जान्हवी कपूरची नक्कल केली होती
श्रीदेवी ही चित्रपटसृष्टीतील एक अशी चमकणारी तारा होती जी आज आपल्यात नसेल, पण तरीही आपल्या अभिनयाच्या जोरावर ती आजही आपल्या हृदयात आहे. अभिनयासोबतच श्रीदेवी एक सहाय्यक पत्नी आणि काळजी घेणारी आई देखील होती. ती आपल्या मुलींबद्दल खूप काळजी घेत असे. आता दिवंगत अभिनेत्रीशी संबंधित एक जुनी घटना समोर आली आहे. वास्तविक, ही घटना पीपल मॅगझिनसाठी आयोजित पत्रकार परिषदेच्या वेळेची आहे. या मॅगझिनच्या कव्हर…
View On WordPress
0 notes
survivetoread · 4 years
Text
Marathi Word of the Day
22nd August 2020
आठवडा
[āṭhavaḍā], noun (masculine), plural आठवडे [āṭhavaḍe]
week
गणेश चतुर्थी या आठवड्यात आहे. gaṇeś caturthī yā āṭhavḍyāt āhe
Ganesh Chaturthi is (during) this week.
Origin: Prakrit अट्ठवाड [aṭṭhavāḍa], from Sanskrit अष्ट [aṣṭa] (eight) + वार [vāra] (day of the week)
Don’t ask me why it is etymologically eight days instead of seven, I don’t know. The modern Marathi word refers to your regular seven-day week, after all.
3 notes · View notes