#चव्हाण-पंकजा
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
42 वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगीत, उद्घाटनाला ‘हे’ ठाकरे! अशोक चव्हाण-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!!
42 वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगीत, उद्घाटनाला ‘हे’ ठाकरे! अशोक चव्हाण-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!!
42 वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगीत, उद्घाटनाला ‘हे’ ठाकरे! अशोक चव्हाण-पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!! जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे 10 व 11 डिसेंबर रोजी 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलमनाचे (Marathwada Sahitya Sammelan) आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर…
View On WordPress
0 notes
indlivebulletin · 10 days ago
Text
मजबूरी या सियासत… केशव प्रसाद मौर्य ने क्यों किया CM योगी के ‘बंटेंगे तो कटेंगे’ नारे से किनारा?
महाराष्ट्र चुनाव में पंकजा मुंडे, अशोक चव्हाण और अजित पवार की पॉलिटिकल मजबूरी तो फिर भी समझ आती है, लेकिन केशव मौर्या ने यूपी के बाद महाराष्ट्र चुनाव में भी बंटोगे तो कटोगे से किनारा कर ये तो जता ही दिया है कि सीएम योगी का नारा उनका अपना व्यक्तिगत नारा है और उसके साथ अनिवार्यतः जाना किसी की कोई मजबूरी नहीं है. महीने भर पहले भी केशव ने इस नारे को पार्टी का नारा बताने से इनकार करते हुए सबका साथ…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.10.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 October 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार यादी जाहीर
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्ह वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
आणि
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा ५९ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. जवळपास सर्वच प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी, वसमत मधून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, तर कळमनुरी मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला.
परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.
जालना विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल तसंच त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांनी, बदनापूर मधून भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बबलू चौधरी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, कन्नड मधून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदयसिंह राजपुत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे, फुलंब्री मधून बसपाचे अमोल पवार, औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पूर्वमधून बसपाकडून तीन अर्ज तर तीन अपक्ष, औरंगाबाद पश्चिम मधून बहुजन समाज पार्टीचे कुणाल दांडगे यांनी, पैठण मतदार संघातून महायुतीकडून शिवसेनेचे विलास भुमरे, तर गंगापूर मधून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी काल उमेदवारी काल अर्ज दाखल केले.
लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, अहमदपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा इथून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लिंगनअप्पा रेशमे, तर औसा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांनी काल अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्ह्यात भूम - परंडा - वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अर्ज दाखल केला. उस्मानाबाद मतदारसंघात बसपाचे सुभाष गायकवाड, तुळजापूर मधून भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसंच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या वतीनं दोन तर एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. उमरगा ��तदारसंघात दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काल काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून, लोकसभेसाठी आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. आठ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, पारनेर मधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी, राहुरी मधून भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी, अकोले इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर किरण लहामटे यांनी, तर अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. 
****
येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील, मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर, ठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे तसंच मनसेचे अविनाश जाधव, महाविकास आघाडीकडून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मधून आदित्य ठाकरे, यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे अशोक उईके, दक्षिण सोलापूर मधून भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख, तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेस पक्षानं ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदार संघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली-नाना पटोले, ब्रह्मपुरी-विजय वडेट्टीवार, तेओसा-यशोमती ठाकूर, संगमनेर -विजय बाळासाहेब थोरात तर पलूस इथून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना उमेदवारी देण्यात  आली आहे, लातूर ग्रामीण धीरज देशमुख, हदगाव माधवराव पाटील, भोकर - तिरुपती कोंडेकर, नायगाव - मिनल पाटील खतगावकर, पाथ्री - सुरेश वरपुडकर, तर फुलंब्री मतदारसंघातून - विलास औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल ४५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये बारामती मतदार संघातून युगेंद्र पवार, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, मुंब्रा-जितेंद्र आव्हाड, तासगाव मधून रोहित आर पाटील तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाड्यात घनसावंगी मतदार संघातून माजी मंत्री राजेश टोपे यांना, वसमत-जयप्रकाश दांडेगावकर, अहमदपूर-विनायक पाटील, उदगीर -सुधाकर भालेराव, भोकरदन-चंद्रकांत दानवे, किनवट-प्रदीप नाईक, जिंतूर-विजय भांबळे, केज-पृथ्वीराज साठे, बदनापूर-रुपकुमार उर्फ बबलू चौधरी, आष्टी मतदार संघातून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काल प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.म्हाविकास आघाडीनं या मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर दिली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, नाशिक जिल्ह्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, नाशिक शहरातल्या चारही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल नाशिकमधल्या काँग्रेस भवनला कुलूप लावून आपला संताप व्यक्त केला.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
 या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह वापरण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेला अर्ज फेटाळण्यात आला. अजित पवार गटाने घड्याळ हे चिन्ह वापरताना, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख प्रत्येक वेळी करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदार जनजागृतीपर कार्यक्रम ��ेण्यात येत आहेत. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे...
 Byte… 
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात काल मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद या कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
****
महिला क्रिकेटमध्ये, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ५९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला ४५व्या षटकात २२७ धावांवर सर्वबाद झाल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ १६८ धावाच करु शकला. या मालिकेतला दुसरा सामना परवा रविवारी अहमदाबाद इथं होणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने सात गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६ धावा झाल्या होत्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया निर्भय तसंच निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं काल एका व्यक्तीकडून बेहिशेबी साडे सात लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. 
****
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं दाना चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं. परिणामी ओडिशाच्या केंद्रपाडा आणि भद्रक जिल्ह्यात सुमारे १२० किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकलं आहे.
****
0 notes
mhlivenews · 10 months ago
Text
छान घडतंय, वेगळ्या गोष्टी आठवण्याची गरज नाही; मेधा कुलकर्णींच्या नाराजीवर राज्यसभेची फुंकर
मुंबई : भारतीय जनता पक्षाने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या २४ तासांत अशोक चव्हाण यांना राज्यसभेची बक्षिसी मिळाली आहे. त्याचबरोबर मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता मात्र भाजपने कापला आहे. भाजपचे सरचिट��ीस विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाचीही चर्चा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?
Tumblr media
मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्या युतीचे सरकार येणार हे आता स्पष्ट झाले आहे. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे देखील स्पष्ट आहे. त्याचबरोबर नव्या सरकारमध्ये कोण मंत्री असणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. कुणाला मिळणार संधी? फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे गटाला १२ मंत्रिपदं मिळणार असे मानले जात आहे. मावळत्या ठाकरे सरकारमध्ये या गटाचे ५ मंत्री होते. शिंदे यांना ५० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना नव्या मंत्रिमंडळात देखील पुरेशी संधी मिळणार हे नक्की आहे. शिंदे गटामधील विदर्भातील आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राठोड हे ओबीसी समाजातील नेते असून ते ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. नव्या मंत्रिमंडळात राठोड यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असे मानले जात आहे. पंकजांचे भवितव्य काय? ओबीसी नेते संजय राठोड हे मंत्री झाले तर भाजपामधील प्रभावशाली ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार का? याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. पंकजा या मराठवाड्यातील भाजपाच्या प्रभावशाली नेत्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा त्यांना वारसा आहे. Read the full article
0 notes
abhay121996-blog · 3 years ago
Text
उद्धव के विरोध का 'पोस्टर बॉय' बने राणे! क्या उस फैसले से फडणवीस ने खुद पैरों पर कुल्हाड़ी मार ली? Divya Sandesh
#Divyasandesh
उद्धव के विरोध का 'पोस्टर बॉय' बने राणे! क्या उस फैसले से फडणवीस ने खुद पैरों पर कुल्हाड़ी मार ली?
मुंबई महाराष्ट्र की राजनीति में नारायण राणे किसी परिचय के मोहताज नहीं है। सियासत की हर गली में उनका नाम मौजूद है। लेकिन मंगलवार के दिन भर जो कुछ भी महाराष्ट्र में घटा उसको लेकर कुछ कयास लगने शुरू हो चुके हैं।
कुछ राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि नारायण राणे ने मंगलवार की घटना के बाद महाराष्ट्र बीजेपी में एक अलग मुकाम बनाया है। वे महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील या अन्य वरिष्ठ बीजेपी नेता से आगे निकल चुके हैं।
राणे का कद फडणवीस से बड़ा वरिष्ठ पत्रकार और राजनीतिक विश्लेषक सचिन परब के मुताबिक केंद्रीय मंत्री नारायण राणे का कद हमेशा से चंद्रकांत पाटील या देवेंद्र फडणवीस से बड़ा ही रहा ह��। खुद इस बात की तस्दीक देवेंद्र फडणवीस के जरिए कई बार हुई है।
फडणवीस ने कई बार यह बात कही है कि उन्होंने नारायण राणे से बहुत कुछ सीखा है। महाराष्ट्र में जब देवेंद्र फडणवीस पहली बार विधायक बने थे उस समय भी नारायण राणे महाराष्ट्र के बड़े नेताओं में शुमार थे।
बीजेपी ने गलती दोहराई सचिन परब के मुताबिक नारायण राणे को बीजेपी में लाकर देवेंद्र फडणवीस ने एक बड़ी मुसीबत मोल ली है। यह बिल्कुल वैसा ही है जैसे महाराष्ट्र की अघाड़ी सरकार में तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ने नारायण राणे को कांग्रेस पार्टी में लाया था और उन्हें राजस्व मंत्री भी बनाया था। ताकि अशोक चव्हाण और अन्य विरोधियों का पत्ता काट सकें। लेकिन बाद में वही राणे, विलासराव देशमुख के लिए सिरदर्द बन गए।
भले ही देवेंद्र फडणवीस के लिए यह नारायण राणे कुछ गलत ना कर रहे हों। लेकिन उनके बयानों से पार्टी और नेताओं दोनों की किरकिरी जरूर हो रही है। इतना ही नहीं देवेंद्र फडणवीस ने जिन नेताओं का पत्ता काटा है। फिर चाहे वह विनोद तावड़े, पंकजा मुंडे या फिर एकनाथ खडसे हों। कहीं ना कहीं फडणवीस के खिलाफ उठने वाले सवाल उनके लिए राहत और सुकून का सबब जरूर होते होंगे।
कम हो रहा है देवेंद्र फडणवीस का कद देवेंद्र फडणवीस का कद विधानसभा चुनाव के बाद से ही कम होना शुरू हो गया था। वैसे भी उनके खिलाफ पार्टी नेताओं में जबरदस्त नाराजगी भी है, जो समय-समय पर जाहिर होती रहती है। जिस तरह से लोगों का जन समर्थन नारायण राणे की जन आशीर्वाद यात्रा को मिल रहा है, वह भी कहीं ना कहीं फडणवीस के खोते जनाधार का संकेत है।
इसके अलावा मंगलवार की घटना ने नारायण राणे को महाराष्ट्र में एक हीरो के रूप में पेश किया है। हालांकि महाराष्ट्र में भले ही फडणवीस का कद कुछ कम हुआ हो लेकिन दिल्ली में फडणवीस का कोई विकल्प नहीं है।
शिवसेना से भिड़ने वाला एकमात्र बीजेपी नेता नारायण राणे को महाराष्ट्र में शिवसेना का धुर विरोधी नेता माना जाता है। उनकी इसी काबिलियत के चलते बीजेपी ने उन्हें अपनी पार्टी में शामिल किया है। इसके पहले बीजेपी में शिवसेना को खुली चुनौती देने वाला दूसरा कोई नेता नहीं था।
राणे का समर्थन बीजेपी की मजबूरी नारायण राणे के बयान को लेकर जिस तरह से पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यह कहा कि वे उनके वक्तव्य का समर्थन नहीं करते लेकिन पार्टी उनके साथ खड़ी है यह बात कहीं ना कहीं बीजेपी की मजबूरी को भी जाहिर करती है।
आने वाले वक्त में भी बीजेपी, नारायण राणे और उनके दोनों बेटों के बयानों को कितना समर्थन देगी, यह भी देखने वाली बात होगी। क्योंकि उनके बयानों का समर्थन करना मतलब पार्टी की किरकिरी कराना होगा।
एक चिंगारी के समान हैं राणे सचिन परब के मुताबिक नारायण राणे बीजेपी के लिए एक चिंगारी के समान हैं। उन्हें बीजेपी में शामिल कराना बिल्कुल वैसा ही है जैसे आग को अपने दामन में ��मेट लेना। अगर, आप आग बुझाने की कोशिश करेंगे तो आपके हाथ जल सकते हैं। वरना दामन का जलना तय है। हालांकि यह भी उतना ही स्पष्ट है कि बीजेपी ने नारायण राणे को शिवसेना के खिलाफ एक मोहरे के रूप में इस्तेमाल करने के लिए अपने साथ जोड़ा है।
मोदी की स्थान पाना सपने के पूरा होने जैसा है महाराष्ट्र के पूर्व राज्य मंत्री और बीजेपी नेता अमरजीत मिश्र ने कहा कि नारायण राणे आज जिस मुकाम पर हैं, वहां पहुंचने का सपना हर राजनेता देखता है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की कैबिनेट में स्थान पाना ही अपने आप में बड़ी बात होती है। नारायण राणे खुद इतने बड़े ओहदे पर हैं कि अब वे किसी के पीछे नहीं हो सकते लोगों को उनके बराबर होना पड़ेगा।
राणे के जाल में फंस गई शिवसेना राजनीतिक विश्लेषकों के मुताबिक बीजेपी ने एक सोची-समझी रणनीति के तहत ठाकरे सरकार को चिढ़ाने के लिए एक मुहिम शुरू की थी जिसके अगुआ थे नारायण राणे। ताकि शिवसेना गुस्से में आकर कोई अलोकतांत्रिक कदम उठाए। कहीं ना कहीं बीजेपी और नारायण राणे अपनी रणनीति में सफल भी रहे। जिसका असर यह हुआ कि शिवसेना ने गुस्से में आकर राणे को गिरफ्तार करने का फैसला किया।
शिवसेना स्टाइल में जवाब शिवसेना को कमजोर करने के लिए राणे ने शिवसेना स्टाइल का सहारा लिया और उनको उन्हीं की भाषा में जवाब दिया। जिस पर खीझकर शिवसेना ने यह कदम उठाया। राणे चाहते थे किसी प्रकार से शिवसेना को विचलित किया जाए। ताकि वह मारपीट जैसी घटनाओं को अंजाम दे।
आमतौर पर सत्ता का स्वभाव होता है कि वह सहनशील हो,भले ही जनता उसे कितना भी उकसाए। इसके अलावा कोंकण में शिवसेना के दबदबे को कम करने के लिए भी यह कदम और जन आशीर्वाद यात्रा जरूरी थी।
सरकार ने होमवर्क नहीं किया अमरजीत मिश्रा ने बताया कि जिस तरह से नारायण राणे को गिरफ्तार किया गया है। उससे यह साफ जाहिर होता है कि सरकार ने गिरफ्तारी को लेकर किसी भी प्रकार का होमवर्क नहीं किया था। जबकि किसी केंद्रीय मंत्री को गिरफ्तार करने के पहले लोकतांत्रिक प्रक्रिया की जानकारी होना बेहद जरूरी है।
जहां तक बात जन आशीर्वाद यात्रा की है तो पूरे देश में यह यात्रा निकाली जा रही है। उसी प्रकार नारायण राणे ने भी कोंकण में यह यात्रा निकाली थी। बीजेपी एक रणनीति के तहत राजनीति करती है जिसके अनुसार केंद्र में नरेंद्र मोदी के नेतृत्व में और महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़ना पहले से तय है।
0 notes
punerichalval · 4 years ago
Text
"माझी बहिण प्रीतम, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली ते फोटो का व्हायरल करत नाही"
"माझी बहिण प्रीतम, पंकजा मुंडे यांच्यासोबतही फिरली ते फोटो का व्हायरल करत नाही"...
बीड | सध्या राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत असून यामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांंचं नाव समोर येत आहे. संजय राठोड यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पूजा चव्हाणच्या प्रकरणात सध्या सोशल माध्यमांवर ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या प्रकरणात समोर येत असलेल्या नवनवीन गोष्टींवरून अनक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र अशातच यावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
...मात्र बीडच्या पालकमंत्री अदृश्य झाल्या आहेत - अशोक चव्हाण
…मात्र बीडच्या पालकमंत्री अदृश्य झाल्या आहेत – अशोक चव्हाण
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे काँग्रेसच्या जन संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेदरम्यान बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळसदृश्य असताना बीडच्या पालकमंत्री मात्र अदृश्य झाल्या आहेत. त्यांच्या या टीकेमुळे बीड भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पंकजा…
View On WordPress
0 notes
mediachannelfan-blog · 6 years ago
Text
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची शेती उद्धवस्त...
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची शेती उद्धवस्त…
बीड | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची शेती उद्धवस्त झाली आहे, असा आरोप परळीतील पांगरी गावातील साहेबराव चव्हाण या शेतकऱ्यानी केला आहे. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनींशी बोलत होते.
पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दुषीत पाण्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतातील उस, कापूस ही पीकं जळली आहे. तसंच या दुषीत पाण्यामुळे पीकांवर परिणाम…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या सर्वबाद २५९ धावा-वॉशिंग्टन सुंदरचे सात बळी
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आणि जयकुमार रावल यांच्यासह जवळपास सर्व पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी दोन उमेदवारी अर्ज तर भाऊ पाटील गोरेगावकर यांनी एक अर्ज दाखल केला. वसमत विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज २८ जणांनी ५८ अर्जांची उचल केली.
परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.
जालना विधानसभा मतदार संघासाठी आज महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, त्यांच्या पत्नी संगीता कैलास गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना विधासनभेसाठी ११ उमेदवारांसाठी २१ नामनिर्देशन पत्राची उचल झाली. घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बदनापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद मध्य मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून बहुजन समाज पार्टीचे कुणाल सुरेश दांडगे यांनी, गंगापूर मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्ह्यात भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले तर दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे सुभाष गायकवाड यांनी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाचे वतीनं दोन तर एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. ८ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी १३ उमेदवारांनी २३ अर्ज घेतले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून, तर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडून तर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर विधानसभा मतदार संघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आ��ला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसच�� छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज अर्ज दाखल केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आज विद्यमान आम���ार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, तर कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर यांनी अर्ज दाखल केला. विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी, ठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय महाविकास आघाडीकडून कळवा -मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे, तर इस्लामपूर मतदातसंघातून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला.
रायगड जिल्ह्यात अलिबाग विधानसभा मतदार संघातील शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे काशिराम पावरा यांनी तर धुळे शहर विधानसभा मतदार संघातून अनुप अग्रवाल यांनी, सिंदखेडा मतदारसंघातून भाजपाचे जयकुमार रावल यांनी, साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मंजुळा गावीत यांनी अर्ज दाखल केले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा- तळोदा मतदारसंघतून भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार, जेष्ठ नेते डॉ विजयकुमार गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. आघाडीने या मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मतदान प्रशिक्षण, मतदानाची शपथ आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, यासोबतच सृजनशील लेखन, वक्तृत्व, रांगोळी, भित्ती चित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट - प्रशांत दामले
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात आज मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
नांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने सात गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६ धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, यशस्वी जैस्वाल सहा आणि शुभमन गील दहा धावांवर खेळत आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि न्यूझीलंड ��रम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज अहमदाबाद इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, ४४ षटकांत सर्वबाद २२७ धावा केल्या. भारताच्या दिप्ती शर्माने ४१ आणि मेली केर हिनं ४२ धावा केल्या.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मुलांना लैंगिक समानतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक, बदलापूर बाललैंगिक अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण
नागपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंक��पॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून म��न्यता
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना अनुदान लागू करण्याचा शासन आदेश जारी
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश
आणी
पुढचे दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार, जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ६३ टक्क्यांवर 
सविस्तर बातम्या
मुलांना लैंगिक समानतेबद्दल शिक्षित आणि संवेदनशील करणं आवश्यक असल्याचं, मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. बदलापूर बालिका अत्याचार प्रकरणी न्यायालयानं स्वत:हून दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. अशा घटना घडल्या की आपण पिडीतांबद्दल बोलतो, मात्र मुलींना नाही, तर मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य शिकवलं, तसंच त्यांना मुलींचा, महिलांचा आदर करायला शिकवलं तरच अशा घटना टाळता येतील, असं सांगून न्यायालयानं, मुलांची मानसिकता बदलणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. अशा कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याची शिफारस करण्याकरता समिती नियुक्त करण्यासाठी काही नावं सुचवण्याची सूचना न्यायमूर्ती रेवती मोहिते आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं केली आहे. मुलांना लिंग समानतेबाबत जागरुक करण्याचं काम या समितीने करावं, असंही पीठानं सुचवलं आहे.
या प्रकरणी प्रसारमाध्यमांनीही पोक्सो कायद्याची माहिती घेत संवेदनशीलपणे वृत्तांकन करण्याची गरज आहे, काही बातम्यांमध्ये शाळेचं नाव आल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. राज्यात पोक्सो कायद्यातल्या सर्व तरतुदींचं कठोरपणे पालन केलं जावं, अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली आहे.  
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यांनी काल पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून, या��ल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. काल लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या वलांडी इथं, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या.
दरम्यान, महिला अत्याचार प्रकरणांच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा वकील संघाच्या वतीनं आज मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्सच्या नागपूर इथल्या विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळेला, मंकीपॉक्स चाचणी प्रयोगशाळा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या मान्यतेनुसार, एम्स नागपूर आता महाराष्ट्रातल्या मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी अधिकृत केंद्र म्हणून कार्य करेल. देशभरातल्या मंकीपॉक्सच्या संशयित प्रकरणांची चाचणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या ३५ प्रयोगशाळांपैकी नागपूरची ही प्रयोगशाळा, महाराष्ट्रात मंकीपॉक्सच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
****
आशा स्वयंसेविका तसंच गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, आणि कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातला आदेश राज्य शासनाने जारी केला. एक एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू होणार असून, यासाठी प्रत्येक वर्षाला एक कोटी पाच लाख रुपये इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी नौदलाचं एक पथक रवाना करण्यात आलं आहे. नौदलानं एका निवेदनाद्वारे काल ही माहिती दिली. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून, त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. काल राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही ते म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं, या अपघाताची चौकशी शासन क��ेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
दरम्यान, धाराशिव इथं काल सकल शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबईत आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. 
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हा प्र��ासनासह सामान्य नागरिकांची मोठी उपस्थिती होती. पोलीस दलानं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी दिली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, परवा पहाटे त्यांचं निधन झालं.  
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच सप्टेंबरला शिक्षक दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होईल.
****
"लाडक्या बहिणी" प्रमाणेच "सुरक्षित बहीण" ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभं असून, गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, दहीहंडीचा उत्सव काल राज्यभरात साजरा झाला. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी एकाहून एक उंच मनोरे उभारले. हा थरार पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय सहभागी झाली होती.
छत्रपती संभाजीनगर इथं गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत, एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत काल पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले असून, हे सिडबॉल काल विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते.
****
बीड जिल्ह्यात मांजरसुंबा बस स्थानकातून मागील तीन दिवसांपासून एसटी बस येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन काल बस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहता आलं नाही, विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे आंदोलन होताच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब एसटी बस उपलब्ध करून दिली.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना आजपासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला ��ाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणा�� आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा ६३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात अहमदनगर तसंच नाशिक जिल्ह्यातल्या पाणलोट क्षेत्रातून सुमारे ७१ हजार ११५ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह-गोविंदांचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी
राजकोट पुतळा दुर्घटनेचा तपास आणि पुतळा पुनर्स्थापनेसाठी नौदलाचं पथक रवाना
महिला अत्याचार प्रकरणी नराधमांना भर चौकात शिक्षा द्यावी-आमदार पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
आणि
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
****
राज्यात आज दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. राज्यभरात सर्वत्र सार्वजनिक मंडळांद्वारे आयोजित दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं एकावर एक थर रचत आहेत. मुंबई शहर तसंच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी मानाच्या दहिहंड्या बांधण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिहंडी उत्सव साजरा होत असल्यामुळे मुंबईत अनेक राजकीय पक्षांनीही भरघोस बक्षीसं ठेवून दहिहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे. महिलांची गोविंदा पथकंही या उत्सवात सक्रीय आहेत. हा थरार पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर इथं कोकणवाडी चौक, गुलमंडी, कॅनॉट प्लेस, टी व्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर चौक, निराला बाजार या ठिकाणी दहिहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आज रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरची वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी आणि पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याची माहिती भारतीय नौदलानं एका निवेदनाद्वारे दिली आहे. या संदर्भात राज्य सरकार आणि तज्ज्ञांच्या सहकार्यानं काम सुरू असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काल कोसळला. त्यापार्श्वभूमीवर नौदलानं आज हे निवेदन जारी केलं आहे.
दरम्यान, हा पुतळा कोसळणं हा अपघात असून त्या जागी १०० फूट उंचीचा पुतळा उभारावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. केसरकर यांनी राजकोट इथं संबंधित ठिकाणाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या ठिकाणी धक्का उभारून सिंधुदुर्गपर्यंत फेरीद्वारे वाहतूक सुरू केली, तर हे स्मारक पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र होऊ शकतं, असंही केसरकर म्हणाले. पुतळा कोसळणं हा एक अपघात आहे आणि त्या दृष्टीनेच सर्वांनी त्याकडे पहावं. या अपघाताची चौकशी शासन करेल, असं आश्वासन केसरकर यांनी दिलं.
****
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असून पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य आणि केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम तज्ञ आणि अनुभवी व्यक्तीला द्यायला हवं होतं, तसंच समुद्रातील खारे पाणी, वाऱ्याचा वेग या सर्व बाबींचा अभ्यास करायला हवा होता, असं नमूद करत, श्रेय घेण्याच्या नादात सरकारने कामाच्या दर्जाकडे लक्ष दिलं नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
****
रत्नागिरीत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोषी व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढून कडक कारवाई करण्याचे निर्देश, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. सामंत यांनी आज पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्याची माहितीही सामंत यांनी पत्रकारांना दिली. प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची स्थापना केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून, त्यात तांत्रिक-वैज्ञानिक तपासाचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.
****
महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना वेदनादायी असून यातल्या नराधमांना भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. आज लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील वलांडी इथं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जन सन्मान पद यात्रेत त्या माध्यमांशी बोलत होत्या. चुकीच्या नॅर���टिव्हमुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीसह भाजपला फार वाईट परिणाम बघायला मिळाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं, मुंडे यांनी सांगितलं.
****
नेपाळ बस अपघातातल्या सात जखमींना विमानाने मुंबई इथं आणण्यात आलं असून, त्यांना उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. या जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसंच आणखी चार जखमींना उद्या नेपाळहून मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत समन्वय ठेवला जात आहे.
****
दिल्ली मद्य धोरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या कैदेत असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. कविता या गेल्या ५ महिन्यांपासून न्यायालयीन कैदेत असून सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून कविता यांची चौकशी पूर्ण झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
****
नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिव देहावर आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारमार्फत पुष्पचक्र अर्पण करत चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलातर्फे हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दिवंगत खासदार चव्हाण यांना अखेरची सलामी देण्यात आली.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे चव्हाण यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद इथं उपचार सुरू होते. उपचारादरम्यान, काल पहाटे त्यांचं निधन झालं. चव्हाण यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी, चव्हाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांचं निधन हे काँग्रेस परिवारासाठी कधीही भरून न येणारं नुकसान असल्याचं म्हटलं आहे.
****
प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचं संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राख��ा जाऊ शकतो, असं छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी म्हटलं आहे. आज देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय  सेवा योजना विभागामार्फत एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत पाचशे झाडं लावण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. निसर्गामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनियमित पाऊस पडत असून, यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत असल्याकडे तेजनकर यांनी लक्ष वेधलं.
****
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. हा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्याचं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या घनशेत या गावी अश्वमेध सामाजिक संस्थेने दिलेल्या ५१ किलो बियाणातून २० हजार सीडबॉल तयार करण्यात आले. हे सिडबॉल आज विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या श्रमदानाने घनशेत इथल्या जंगलात टाकण्यात आले, त्यावेळी कुलगुरू बोलत होते. जागतिक पातळीवर पर्यावरण संवर्धनाची मोठी गरज निर्माण झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं येत्या ३ ऑक्टोबरपासून दुबई इथं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, न्यूझिलंड आणि पाकिस्तानचा समावेश गट अ मध्ये आहे, तर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ब��ंगलादेश आणि स्कॉटलँड यांचा समावेश गट ब मध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक संघ दोन गट सामने खेळेल, ६ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. १७ आणि १८ ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने तर २० ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे.
****
पॅरालम्पिक क्रीडा स्पर्धांना उद्यापासून पॅरिस इथं प्रारंभ होत आहे. ८४ खेळाडूंचं भारतीय पथक पॅरिसला दाखल झालं असून, विविध १२ क्रीडा प्रकारांमध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत. टोक्यो पॅरालम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णांसह १९ पदकं जिंकली होती.
****
अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा टेनिसपटू सुमित नागल याचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेत भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना, युकी भांब्री आणि एन श्रीराम बालाजी यांचे दुहेरीतले सामने व्हायचे आहेत.
****
हवामान
येत्या दोन दिवसात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात आज काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या दरम्यान, नाशिक जिल्ह्यातल्या पावसाचा जोर कमी झाल्यानं, जिल्ह्यातल्या धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं जात आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
परळी वैजनाथ इथं राज्यस्त��ीय कृषी महोत्सवाचं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते उद्‌घाटन
महिलांना सुरक्षा देण्यासाठी राज्यसरकार सक्षम-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन-बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ
राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरमधल्या सर्व महाविद्यालयामध्ये महिलांना स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार
उजनी पर्यटन आराखड्याच्या २८० कोटी रुपयांच्या कामांना राज्यशासनाच्या उच्च अधिकार समितीची मान्यता
आणि
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रॉस कंट्री स्पर्धेत आखाडा बाळापूरच्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद
****
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्‌घाटन झालं, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार पंकजा मुंडे, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या उद्‌घाटन सोहळ्यापूर्वी परळी नगरीतून मान्यवरांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
नमो कृषी सन्मान योजनेचा चौथा हप्ता या उद्‌घाटन सोहळ्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. भावांतर योजनेअंतर्गत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासही या कार्यक्रमातून प्रारंभ झाला.
यापुढे कांदा निर्यात बंदी केली जाणार नाही, अशी थेट घोषणा करण्याची वेळ आली असल्याचं, अजित पवार यांनी नमूद केलं. सोयाबीन, कापूस, कांदा, ऊस या सर्वच पिकांच्याबाबतीत सरकार सकारात्मक असल्याचं पवार यांनी नमूद केलं.
फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात नद्यांचं समुद्रात वाहून जाणारं ५० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या योजनेला लवकरच मान्यता दिली जाणार असल्याचं सांगितलं. कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेत बीडच्या हक्काचं पाणी पोहोचवलं जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, यांचीही यावेळी भाषणं झाली.
या पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, कृषी विद्यापीठ दालन, परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, आधुनिक कृषी अवजारं प्रदर्शन, स्वयंसहाय्यता महिला बचत गट निर्मित वस्तू पदार्थांची विक्री तसंच प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
****
दरम्यान, चौहान यांचं आज दुपारी नांदेड इथल्या श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळावर आगमन झालं. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी त्यांचं स्वागत केलं.
या महोत्सवासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आज दुपारी लातूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी उपस्थित महिला आणि मुलींनी पवार यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
****
महिलांना सुरक्षा देण्यासाठी राज्यसरकार सक्षम असून अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज रत्नागिरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यात बोलत होते. बदलापूरच्या घटनेचं राजकारण करणं गैर आहे, मात्र विरोधकांना त्याचा विसर पडला, असं मुख्यमंत्री म्हणाले. काल बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेलं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता वाढल्यामुळेच या योजनेविषयीचे बोर्ड या आंदोलनात नाचवण्यात आले, मात्र महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर त्यांचे पैसे अर्थव्यवस्थेत येऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, यासाठीच सरकारनं अतिशय शुद्ध मनानं ही योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
दरम्यान, हे आंदोलन पूर्वनियोजित असण्याच्या शक्यतेची पोलीस पडताळणी करत आहेत. आंदोलनासाठी करण्यात आलेले काही फोनकॉल्स आणि व्हाईस रेकॉर्डिंग्स पोलिसांच्या हाती लागली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत तीनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अडुसष्ट जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांतर्गत २८ जणांना आज न्यायालयासमोर हजर केलं असता, त्यापैकी २२ जणांना न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
****
दरम्यान, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत न्यायालयानं २६ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आरोपी अक्षय शिंदेंचं वकीलपत्र घेण्यासही वकिलांनी नकार दिल्याचं वृत्त आहे.
****
कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूर इथून रेल्वे सेवा आज सुरळीत झाली, मात्र इंटरनेट सेवा अद्याप बंद आहे, समाजमाध्यमांवरून अफवा पसरवण्याला आळा घालण्यासाठी कलम १६३ लागू करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विरोधी पक्षांच्या वतीनं येत्या चोवीस तारखेला ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी ही माहिती दिली. ते आज महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
****
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर तसंच बीड इथं झालेल्या निदर्शन��त, आंदोलकांनी बांगड्या फोडून सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं एक उपाय म्हणून राज्यातल्या सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि मुंबई उपनगरमधल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये पुढच्या महिन्यापासून स्व-संरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईत एका समारंभात ही माहिती दिली. शाळा आणि महाविद्यालयांमधल्या महिला शौचालयांमध्ये महिला कर्मचारीच नियुक्त करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही लोढा यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेला सलग दुसऱ्या वर्षी जागतिक स्तरावरचं ए प्लस मानांकन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं अभिनंदन केलं आहे.
****
राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज नितीन पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काल भाजपानं रायगडचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. या दोघांनीही आपाआपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
****
रास्त भाव दुकानदारांचं कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावा, अशा सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी दूर होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरण सुरू ठेवणार असल्याचंही भुजबळ यांनी सांगितलं.
****
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरातल्या उजनी पर्यटन आराखड्याच्या २८० कोटी रुपयांच्या कामांना राज्यशासनाच्या उच्च अधिकार समितीने मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला होता. उजनी धरणाचे पात्र ९० किलोमीटर लांबीचे असून, या धरणात अक्वॉटिक टुरिझम तसंच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकतं, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात आज आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत नारायणराव वाघमारे महाविद्यालयानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. सेनगावच्या तोष्णीवाल महाविद्यालयानं दुसरा तर परभणी जिल्ह्यातल्या राणीसावरगावच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयानं तिसरा क्रमांक मिळवला.
****
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त परभणीची अंधश्रद्धा निर्मूलन ��मिती आणि ज्ञानोपासक महाविद्यालय यांच्यातर्फे संयुक्तपणे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा आज परभणी इथे पार पडला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकात्मतेची भावना निर्माण करून त्यातून राष्ट्राचा विकास घडवण्याची प्रेरणा नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकांमधून मिळेल, असा विश्वास प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.दि.भा जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेनुसार ‘स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल’ या प्रकल्पाअंतर्गत आज हर्सुल इथं मनपा केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त ‘मैत्र जीवांचे’ हे व्याख्यान घेण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीत २९२ जागांसह एनडीएला बहुमत-इंडिया आघाडीला २३३ जागांवर विजय
मध्यप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि दिल्लीसह सात राज्यात भाजपला तर मणिपूर आणि चंदीगडसह पाच राज्यांत काँग्रेसला निर्भेळ यश
इंदूरचे भाजप उमेदवार दहा लाखांहून अधिक मतांनी विजयी तर वायव्य मुंबईत रवींद्र वायकरांचा अवघ्या ४८ मतांनी निसटता विजय
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १७ जागा-१३ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
औरंगाबादहून संदिपान भुमरे विजयी तर बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे तसंच लातूरमधून सुधाकर श्रृंगारे पराभूत
परभणीत संजय जाधव आणि उस्मानाबादेत ओमराजे निंबाळकर यांनी जागा राखली तर  हिंगोलीत नागेश आष्टीकर तसंच नांदेडमधून वसंत चव्हाण यांचा विजय
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा आयर्लंडशी सामना
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बहुमत मिळवलं आहे. देशात लोकसभेच्या एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला. एनडीएवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल भाजप नेत्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीला यावेळी कमी जागा मिळाल्या असून, काँग्रेससह विरोधी पक्षांनी मात्र गेल्यावेळेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजय झाला.
****
केरळमध्ये भाजपला प्रथमच एका जागेवर विजय मिळाला. मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, त्रिपुरा, अरूणाचल प्रदेश तसंच अंदमानात भारतीय जनता पक्षानं एकहाती विजय मिळवला, तर पंजाब आणि तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्ष १६, भाजप तीन; आसाम - भाजप नऊ, काँग्रेस तीन; छत्तीसगड - भाजप १०, काँग्रेस एक; हरियाणा भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी पाच; झारखंड भाजप आठ, झारखंड मुक्ती मोर्चा तीन, काँग्रेस दोन; ओडिशा भाजप १९, काँग्रेस आणि बीजू जनता दल प्रत्येकी एक; कर्नाटक भाजप १७, काँग्रेस नऊ, धर्मनिरपेक्ष जनता दल दोन; तेलंगणा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ, एमआयएम एक; राजस्थान - भाजप १४, काँग्रेस आठ; गुजरात - भाजप २५, काँग्रेस एक; बिहार - भाजप आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १२, लोकजन शक्ती पक्ष पाच, काँग्रेस तीन तर राजद चार; उत्तर प्रदेश - समाजवादी पक्ष ३७, भाजप ३३, काँग्रेस सहा; पश्चि�� बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेसनं २९, काँग्रेस एक तर भाजपनं १२ जागा जिंकल्या आहेत.
काश्मीर - नॅशनल कॉन्फरन्स दोन, भाजप दोन; दादरा नगर हवेली - भाजप एक, अपक्ष एक; गोवा - भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक; मेघालयात काँग्रेस आणि व्हाईस ऑफ पीपल्स पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. तामिळनाडूत द्रमुक २२, काँग्रेस नऊ तर माकप आणि भाकप प्रत्येकी दोन जागांवर विजयी झाले.
काँग्रेसनं केरळमध्ये सर्वाधिक १४ तर पंजाबात सर्वाधिक सात जागा जिंकल्या. शिवाय, मणिपूरच्या सर्व दोन तसंच चंदीगड, लक्षद्वीप, नागालँड, तसंच पुड्डुचेरी इथल्या प्रत्येकी एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. आम आदमी पक्षाला पंजाबात तीन जागांवर समाधान मानावं लागलं.
****
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शिवराजसिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे, अनुरागसिंह ठाकूर, तेजस्वी सूर्या, कंगना राणावत, हेमा मालिनी, आदी दिग्गजांचा विजय झाला, तर स्मृती इराणी, मेनका गांधी, भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या विद्यमान मंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार, सुजय विखे पाटील, नवनीत राणा, उज्ज्वल निकम आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
मध्य प्रदेशात इंदूर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार शंकर लालवाणी यांनी १२ लाखावर मतं मिळवत, दहा लाख आठ हजार मताधिक्यानं विजय संपादित केला, मात्र याच मतदार संघात वरीलपैकी कोणी नाही-नोटा या पर्यायाला सुमारे दोन लाख १८ हजार मतदारांनी पसंती दिली.
****
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडीनं ३० जागा जिंकल्या, तर महायुतीला फक्त १७ जागाच मिळवता आल्या. २०१९ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीनं राज्यात ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. त्यात भाजपाला २३, तर शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँगेसला चार, तर काँगेसला फक्त एक जागा जिंकता आली होती. पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतून १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते, यंदा शिंदे यांचे सात सहकारी निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनील तटकरे हे एक खासदार अजित पवार यांच्यासोबत गेले होते, तटकरे यांचा यावेळीही विजय झाला. गेल्या वेळी एका जागेवर समाधान मानावं लागलेल्या काँग्रेसला, १३ जागा मिळून तो राज्यातला पहिल्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला आहे. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत पाच खासदार राहिले होते, ही संख्या आता नऊ झाली आहे. शरद पवार यांच्याकडेही फक्त ३ खासदार राहिले होते, ती संख्या आता आठ झाली आहे.
****
विदर्भात नागपूर मधून नितीन गडकरी, रामटेक श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर, यवतमाळ - वाशिम संजय देशमुख, गडचिरोली-चिमूर नामदेव किरसान, अमरावती बळवंत वानखेडे, वर्धा अमर काळे, बुलडाणा प्रतापराव जाधव, तर अकोला इथून अनुप धोत्रे विजयी झाले.
****
धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव, जळगाव मधून स्मिता वाघ, रावेर इथून रक्षा खडसे, दिंडोरी - भास्कर भगरे, नाशिक राजाभाऊ वाजे, तर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून गोवाल पाडवी यांचा विजय झाला.
****
सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे, माढा मधून धैर्यशील मोहिते, सांगली इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, मावळ श्रीरंग बारणे, पुणे मुरलीधर मोहोळ, बारामती सुप्रिया सुळे, शिरुर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, तर शिर्डी इथून भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला.
****
रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे, सिंधुदूर्ग-रत्नागिरीतून नारायण राणे, पालघर हेमंत सावरा, भिवंडी सुरेश म्हात्रे, कल्याण श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के विजयी झाले.
****
उत्तर मुंबई मतदारसंघातून पियुष गोयल, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, तर दक्षिण मुंबई मतदारसंघातून अरविंद सावंत यांचा विजय झाला.
वायव्य मुंबईतून शिवसेना महायुतीचे रविंद्र वायकर यांचा फेरमोजणीत अवघ्या ४८ मतांनी विजय झाला. वायकर यांना चार लाख ५२ हजार ६४४, तर महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांना चार लाख ५२ हजार ५९६ मतं मिळाली.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील काल झाली. आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकूण १७५ जागांपैकी तेलगु देसम पक्ष १३५, वायएसआर काँग्रेस ११, तर भाजपनं आठ जागांवर विजय मिळवला.
ओडिशा विधानसभेच्या एकूण १४७ जागांपैकी भाजप ७८, बिजू जनता दल ५१, तर काँग्रेसनं १४ जागा जिंकल्या.
****
मराठवाड्यात आठ पैकी सात मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर महायुतीला एकमेव औरंगाबादची जागा जिंकता आली.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेना महायुतीचे संदिपाम भुमरे यांनी एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील यांचा एक लाख ३३ हजार ५५७ मतांनी पराभव केला. भुमरे यांना चार लाख ७४ हजार ४३४, सय्यद इम्तियाज यांना तीन लाख ४० हजार ८७७, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख ९१ हजार ८७० तर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांना सुमारे ६९ हजारावर मतं मिळाली.
बीड लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली. अन��क फेऱ्यांमध्ये परस्परांवर कुरघोड्या करत, अखेरीस सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर सहा हजार ५५३ मतांनी विजय मिळवला. मुंडे यांना सहा लाख ७७ हजार ३९७, तर सोनवणे यांन��� सहा लाख ८३ हजार ९५० मतं मिळाली.
जालना लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला, काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांच्यावर सुमारे एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळवला. दानवे यांना चार लाख ९७ हजार ९३९, तर काळे यांना सहा लाख सात हजार ८९७ मतं मिळाली.
परभणी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार महाविकास आघाडीचे संजय जाधव यांचा एक लाख ३४ हजार ६१ मतांनी विजय झाला. जाधव यांना सहा लाख एक हजार ३४३, तर महायुतीचे महादेव जानकर यांना चार लाख ६७ हजार २८२ मतं मिळाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी एक लाख आठ हजार ६०२ मतांनी विजय मिळवला. आष्टीकर यांना चार लाख ९२ हजार ५३५, तर महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांना तीन लाख ८३ हजार ९३३ मतं मिळाली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी विद्यमान खासदार भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना पाच लाख २८ हजार ८९४, तर चिखलीकर यांना चार लाख ६९ हजार ४५२ मतं मिळाली.
लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी ६१ हजार ९०० मतांनी विजय मिळवला. काळगे यांना सहा लाख नऊ हजार २१, तर विद्यमान खासदार सुधार श्रृंगारे यांना पाच लाख ४७ हजार १२० मतं मिळाली.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा तीन लाख २९ हजार ८४६ मताधिक्यानं विजय झाला. त्यांना सात लाख ४८ हजार ७५२, तर महायुतीच्या अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ मतं मिळाली.
****
जनतेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला असून, भारतीय इतिहासातली ही ऐतिहासिक घटना असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
‘‘देशवासियों ने भाजपा पर एनडीए पर पूर्ण विश्वास जताया है। आज की ये विजय दुनिया के सबसे बडे लोकतंत्र की जीत है, ये भारत के संविधान पर अटूट निष्ठा की जीत है, ये विकसित भारत के पर्व की जीत है।’’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी मताने हरल्या गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला कदाचित ते कारण पण असू शकेल, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, काही त्रुटी राहिल्या त्या दूर करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला संपूर्ण बहुमत प्रदान केलं असून, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, असं भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, आणि ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळालं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
या निकालानंतर सामान्य माणसाने आपली ताकत दाखवून दिली असून, आम्ही इंडिया आघाडी म्हणून सत्तेचा दावा करणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आणखी काही जागांची अपेक्षा होती, उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या निवडणुकीलाच आम्ही आव्हान देण्याचा विचार करत असल्याचंही ठाकरे म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्तदि ली आहे.
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस पक्षानेही काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. देशाने दिलेला कौल हा लोकशाहीचा, जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निकालाबद्दल पक्ष कार्यकर्ते तसंच जनतेचे आभार मानले.
‘‘जो देश मे चुनाव के रिज़ल्ट आएं हैं, मैं तो पहले कहूंगा ये जो रिज़ल्ट है, जनता के रिज़ल्ट हैं, और ये जनता की जीत है, और लोकतंत्र की जीत है।’’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे
‘‘मेरे माइंड मे था के हिंदुस्तान की जनता अपने संविधान के लिए एक साथ खडे होकर लड जाएंगे और ये सच साबित हुवा। मुझे भरोसा था और मै हिंदुस्तान की जनता से, इंडिया गठबंधन पार्टनर्स से, काँग्रस पार्टी के हमारे सब नेताओं और कार्यकर्ताओं से दिलसे धन्यवाद करना चाहता हूं। आपने संविधान को बचाने का पहला और सबसे बडा कदम ले लिया है।’’
काँग्रेस नेते राहुल गांधी
दरम्यान, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं शरद पवार तसंच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी- एनडीएचीही आज दिल्लीत बैठक होणार असून, केंद्रीय मंत्र���मंडळाचीही आज बैठक बोलावण्यात आली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. काल या स्पर्धेत नेदरलँड्सनं नेपाळचा सहा गडी राखून, तर अफगाणिस्ताननं युगांडाचा १२५ धावांनी पराभव केला.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 04 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत. एकूण ५४२ पैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून, २३० जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास १९ ��ागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
उत्तरप्रदेशात भाजपला ३४ तर समाजवादी पक्षाला ३५ जागांवर सध्या आघाडी आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला १४, भाजपला ११ तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे. तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला पाच जागांवर आघाडी आहे.
पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे. हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक ९ जागांवर भाजप आघाडीवर आहे.
मध्यप्रदेशात सर्व २९ जागांवर, गुजरातमध्ये २६ पैकी २५ जागांवर, उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर तर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत.
दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येतं आहे. कर्नाटकात भाजप १६, काँग्रेस १० तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेशात तेलगूदेशम पक्ष सर्वाधिक १६ जागांवर, तमिळनाडूत द्रविड मुनेत्र कळघम सर्वाधिक २१ जागांवर, केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदार संघात आघाडीवर आहेत.
गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी २० जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी २७ जागांवर आघाडी मिळवली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात नोटा ला एक हजार ५९५ मतं मिळाली आहेत.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पंकजा मुंडे आघाडीवर आहेत. जालना मधून महाविकास आघाडीचे कल्याण काळे, हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणी मधून महाविकास आघाडीचे संजय जाधव, लातूर मधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे, उस्मानाबाद मधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, तर नांदेड मधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.
नंदुरबार मधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी, धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे, जळगाव मधून महायुतीच्या स्मिता वाघ, रावेर मधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत.
बुलडाणा मधून महायुतीचे प्रतापराव जाधव, रामटेक मध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे, नागपूर मधून महायुतीचे नितीन गडकरी, यवतमाळ मधून महायुतीचे संजय देशमुख, भंडारा-गोंदिया मधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे, वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे, अमरावती मधून महायुतीच्या नवनीत राणा, अकोला मधून महाविकास आघाडीचे अभय पाटील, गडचिरोली - चिमुर मधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान, तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून, भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
दिंडोरी मधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून, भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. नाशिक मधून महावि���ास आघाडीचे राजाभाऊ वाजे, पालघर मधून महायुतीचे हेमंत सावरा, भिवंडी मधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे, कल्याण मधून महायुतीचे श्रीकांत शिंदे, तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहेत.
रायगड मधून महायुतीचे सुनिल तटकरे, मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे, पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ, बारामती मधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे, शिरुर मधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे, अहमदनगर मधून महायुतीचे सुजय विखे पाटील, तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत.
सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे, माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते, सांगली मधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील, सातारा महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे, कोल्हापूर मधून शाहू महाराज छत्रपती, हातकणंगले मधून महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील, तर रत्नागिर�� - सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत.
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल किर्तीकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत. 
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान;लातूर तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातल्या केंद्रांवर मतदान पथकं रवाना
पाचव्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली;सातव्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दडवलेली मोठ्या प्रमाणावर स्फोटकं पोलिसांकडून हस्तगत
आणि
मतदार जनजागृतीसाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर केंद्रीय संचार ब्यूरोचं चित्र प्रदर्शन
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान होणार आहे. या टप्प्यात दहा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ९३ मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांसह राज्यातल्या सोलापूर, माढा, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदूर्ग या ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार १२५ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान साहित्यासह सर्व पथकं आज रवाना झाली. यामध्ये साडे आठ हजार अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांना मतदान साहित्य वाटपाच्या कामकाजाची जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पाहणी केली. मनावर कोणतेही दडपण न घेता ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सर्व कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने हे कर्तव्य पार पाडणार असल्याची भावना व्यक्त केली, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात २ हजार १३९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेसाठी लागणारे प्रत्येकी २ हजार ३५४ बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटसह इतर साहित्य घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांची पथकं आज रवाना झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतदारसंघात महिला कर्मचाऱ्यांकडून चालवली जाणारी सहा, दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून चालवली जाणारी सहा मतदान केंद्रं, तर आठ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. तरुण कर्मचाऱ्यांकडून दहा मतदान केंद्रांचं संचालन होणार असून ५४ मतदान केंद्र हे मॉडेल मतदान केंद्र असणार आहेत. तर बुरखाधारी महिला मतदारांसाठी, परदानशीन मतदान केंद्रांची संख्या दोनशे एक आहे. दरम्यान, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दिव्यांग आणि ८५ वर्षे वयोगटातल्या तसंच त्यापुढच्या ४ हजार ३९३ मतदारांपैकी तीन हजार ९८९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
****
निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात प्रचारानं वेग घेतला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
बीड लोकसभा मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे प्रचारासाठी, उद्या भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, अंबाजोगाई इथं सभा होणार आहे. शहरातल्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर उद्या दुपारी ही सभा होईल. याशिवाय पंतप्रधान मोदी यांची अहमदनगर इथं, महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी प्रचार सभा होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे.
तर निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या टप्प्यात सात राज्यांमधल्या ५७ मतदारसंघात २५ मे रोजी मतदान होणार आहे. उद्या अर्जांची छाननी होणार असून, नऊ मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.
****
नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, आणि महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना पाठिंबा जाहीर केला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्यु��िस्ट पक्षाचे उमेदवार जे पी गावित यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिला आहे.
दिंडोरी लोकसभा मतदार संघातून हरिचंद्र चव्हाण यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना पाठिंबा दिला आहे.
****
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. या टप्प्यात आठ राज्यांमधल्या ५७ मतदारसंघात उद्यापासून ते १४ मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. १५ मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. सातव्या टप्प्यात एक जून रोजीमतदान होणार आहे.
****
नीट अर्थात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवा असून, या अफवेवर उमेदवार किंवा त्यांच्या पालकांनी विश्वास ठेवू नये, असं राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीएनं म्हटलं आहे. काल ही परीक्षा झाली, परीक्षा होण्यापूर्वीच राज्यस्थानच्या माधोपूर इथं प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवा सामाजिक माध्यमांवर पसरल्या होत्या, यात कोणतंही तथ्य नसल्याचं एनटीएनं आज स्पष्ट केलं.
****
देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचं योगदान लक्षणीय असून, तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट गाठताना, त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनानिमित्त एका चर्चासत्राच्या उदघाटना प्रसंगी ते आज बोलत होते. व्यवस्थापन लेखापालांनी सायबर सुरक्षेतले धोके कमी करण्यासाठी प्रभावी आणि परवडणारी प्रणाली विकसित करण्याची आवश्यकता बैस यांनी व्यक्त केली.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या टिपागड डोंगरावर नक्षलवाद्यांनी दडवून ठेवलेली शक्तिशाली स्फोटकं पोलिसांनी हस्तगत केली आहेत. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी ही स्फोटकं, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स शोधून काढत नष्ट केले. या ठिकाणाहून गन पावडर, ब्लँकेट आणि औषधीही हस्तगत करण्यात आल्याचं नीलोत्पल यांनी सांगितलं.
****
अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा तालुक्यातल्या सोलामुह इथल्या एकाच कुटूंबातल्या ४ जणांचा पंजाबमध्ये जालंदर नजिक अपघाती मृत्यू झाला तर २ जण जखमी झाले. हे कुटूंब काल जम्मू इथल्या वैष्णोदेवीचं दर्शन करून जालंदर इथं परतत असतांना, त्यांच्या चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यात पोलिसांनी मध्यप्रदेशातून आलेल्या एका बसमधून एक लाख रुपयांचा गांजा जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात���ल नगावबारी परिसरात तैनात असलेल्या एका पथकाने ही कारवाई केली. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरु असल्यची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली
****
बीड लोकसभेसाठी निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास हे परवा ८ मे रोजी निवडणूक लेखांची दुसरी तपासणी करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ही तपासणी होणार असल्याची माहिती, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाच्यावतीने कळवण्यात आली आहे. दरम्यान, या मतदार संघात आज निवडणूक निरीक्षक अजीमुल हक यांच्या समक्ष सहा विधानसभा निहाय मतदान केंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ करण्यात आली.
बीड लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी दोन हजार ३५५ केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी ११ केंद्रांवर दिव्यांग तर २२ मतदान केंद्रांवर युवा मतदान अधिकारी कर्मचारी असणार आहेत.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी लोकसभेचं मतदान होणार आहे. यासाठी पी एम एस २४ हे ॲप प्रशासनानं तयार केलं आहे. या ॲप मुळे प्रशासकीय व्यवस्थापनेत सुलभता येणार असून अधिकारी कर्मचारी यांच्या श्रमाची आणि वेळेची बचत होणार आहे
****
मतदार जनजागृतीसाठी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय आणि दक्षिण मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन येत्या बुधवारपर्यंत सर्व नागरिकांसाठी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत खुलं राहणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचं निवारण करण्यासाठी उद्या ७ मे रोजी पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी ११ ते दुपारी दीड या वेळेत हि अदालत होणार आहे.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या तिची नियोजित वेळ सकाळी साडेनऊ ऐवजी दुपारी तीन वाजता सुटणार आहे. तसंच ही गाडी येत्या १० मे पर्यंत पर्यायी मार्गानं धावणार असल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे.
****
0 notes