#एकाच
Explore tagged Tumblr posts
Text
देवळाकडे सायकल ठेवली आणि दुर्बिण गळ्यात अडकवून चालायला सुरुवात केली. डोंगराच्या पायथ्याशी जाई पर्यंत अर्धा तास लागला. अंतर जेमतेम 100 ते 150 मीटर असेल पण तितक्यात खूप पक्षी दिसले. एका पिंपळाच्या झाडावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. त्या खाली अजून एक झाड होत त्याला फळ आली होती. त्यावरही starling, bulbul, barbet असे सगळे होते. आजुबाजुला भातशेती होती. थोडी कापलेली, थोडी अजून कापायची बाकी होती.
थोडं पुढे गेल्यावर एका माडावर बाया सुगरणी च्या घरट्यांचे झोके होते. पंधरा दिवसांपूर्वी गेले होते तेव्हा त्यांचं घरटी बनवण्याच काम चालू होतं. आज त्यामानानं जरा कमी बाया पक्षी दिसले.
डोंगर चढायला सुरवात केली तेव्हा कुणगे (भातशेती) संपून जंगल सुरू झालं. पक्षी दिसायचे कमी झाले पण call येत होतेच. ते call पण थोडे बदलले. Beat you, Malabar whistling thrush chi शीळ असे आवाज यायला लागले.
जंगलातले साग वाऱ्यावर आपली पानं झटकत होते. वाऱ्याबरोबर ती तरंगत खाली येत होती. संपूर्ण वाटेवर जाळीच्या सागपानांची चादर घातल्यासारखी दिसत होती.
या डोंगरात वर एक वाडी (वस्ती) आहे. आज तिथे जायचं ठरवून निघालेले. वाटेत त्याच वाडीतून सकाळी कामाला जाणारी किंवा dairy वर दूध नेणारी माणसं cross होत होती. डोंगरावर पूर्ण चढतीचा रस्ता आहे. वर थोड्या अंतरावर two wheeler जाते आणि तिथून पुढे पुन्हा पायवाट. मोठ्या गाडीचा रस्ता नाही.
वर वाडीत पोचले तेव्हा एक माणूस भेटला, त्याने सांगितलं की या वाडीला डोंगरवाडी म्हणतात आणि इथे 20 22 घरं आहेत. प्रत्येक घराच्या सभोवती आपापली भात शेती आहे त्यामुळे घरं एकमेकांच्या फार जवळ नाहीत.
थोडं पुढे एक पत्र्याची शेड दिसली. आधी वाटल स्मशान भूमी असेल. अजून जवळ गेल्यावर शेडच्या आत घंटा दिसल्या. मग वाटल की मंदिरच असेल, स्मशानात कुठे घंटा असतात. तरी मी तिकडे न वळता सरळ गेले पुढे. पुढे आणखी थोडी घरं दिसली. मग वाटलं की असं घरांच्या मधोमध स्मशान नसावं. परत येताना तिथे जाऊन पाहिलं. ते मंदिर नाही पण छोट देवस्थान होत. मग तिथेच थोडा वेळ बसले. आत दोन पाषाण आहेत. एकावर भरपूर जास्वंदीची फुलं आणि दुसऱ्यावर फक्त 2 3 गुलाब वाहिलेले. पाषाणामागून छोटंसं हिरवं गवत डोकावत होत. तो अजूनही निसर्गातला देव आहे याची साक्ष जणू! निसर्गातला देव आणि देवातला निसर्ग! आजूबाजूला ला��लेल्या टाइल्स पेक्षा डोळ्यांना हे जास्त सुखावणारं होत.
देवस्थानासमोर तुळस होती आणि त्यापुढे एक चाफ्याच झाड. तुळस सुकलेली पण जिवंत होती. तिच्या सुकलेल्या फांदीवर पण एक जास्वंदीच फुल वाहिलं होतं. हे कोकणातल्या तुळशी पूजेचं typical दृश्य आहे. काही फुलं तुळशी वृंदावनावर आणि एक तुळशीला.
हे सगळं बघता बघता मी सोबत आणलेली उकडलेली रताळी खाल्ली.
तितक्यात वरून एक घार उडत येऊन शेजारच्या झाडावर बसली. तसे 2 3 कावळे मोठ्याने ओरडू लागले आणि 2 pond heron पण ओरडत उडाले.
त्याच झाडाखाली देवाच्या बाजूने एक पाण्याचा छोटा झरा वाहतो. तो cross करून एक आजी वर आल्या. कमरेवर एक घमेले - त्यात डोक्याला आणि कमरेला काम करताना बांधायचे टॉवेल आणि एक कोयती (छोटा गोलाकार कोयता). माझी चौकशी करून ती पुढच्या कुणग्यात (शेतजमीन) गेली. डोक्याला, कमरेला बांधून तिनं भात कापायला सुरुवात केली. तिच्या मागोमाग 5 मिनिटांनी एक आजोबा आले. हातात एक पंचा आणि कोयती. त्यांनीही तिच्या सोबत जाऊन भात कापायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते दोघं एकाच लयीत काम करतायत अस वाटायला लागलं. थोडं कापून झालं तस आजोबांनी त्याच्या पेंढ्या बांधल्या. एक पेंढी डोक्यावर घेऊन ते तो झरा पुन्हा क्रॉस करून पलीकडे गेले. जाताना झऱ्याकडच्या झाडाच्या फांदीला त्यांचा डोक्यावरचा भात थोडा अडकला. परत येताना ते ती तेवढी अडकलेली फांदी कोयत्याने तोडून आले.
आणि मग एक एक पेंढी घेऊन जात राहिले. नंतर परत डोक्यावरचा भात झाडात अडकला नाही. आजी कापत होतीच. अशा माझ्या समोर जवळ जवळ 10 फेऱ्या त्यांनी मारल्या आणि एक कोपरा भात कापून झालं. आजींच्या सोबतीला एक दोन बगळे आणि drongo होते. तितक्यात मागच्या मोठ्या आंब्याच्या झाडावरून दोन मलबार pied hornbill उडत आले त्यांना थोडा वेळ बघून मी परत निघाले. येताना उतार असल्याने फार वेळ लागला नाही. वाटेत रस्त्यावरच एक खार दिसली. पटकन हातात घेता आली असती इतकी जवळ होती.
वाटेत जंगलात पडलेली 2 3 सागाची पानं मी मला घेतली, त्यावर चित्र काढायच्या ambitious project सोबत.
अशा प्रकारे आजची सुट्टीची सकाळ सफळ संपूर्ण!
2 notes
·
View notes
Text
Chhattisgarh Road Accident: बालोद येथे ट्रक-बोलेरोची धडक, एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू
https://bharatlive.news/?p=97405 Chhattisgarh Road Accident: बालोद येथे ट्रक-बोलेरोची धडक, एकाच कुटुंबातील 11 जणांचा ...
3 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २९ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संगमावर मध्यरात्री झालेल्या चेंगराचेंगरीत काही भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. संगमावर झालेल्या गर्दीत काही भाविक बॅरिकेड्स ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. महाकुंभमेळ्यात आजच्या मौनी अमावस्येच्या दिवशी अमृतस्नानासाठी भाविकांची फार मोठी गर्दी झाली असून, योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना, आपल्या जवळच्या गंगा घाटावरच स्नान करण्याचं आवाहन केलं आहे. सुरक्षित आणि सोयीस्कर स्नानासाठी अनेक घाट तयार करण्यात आले असून, या घाटांचा वापर करून, एकाच ठिकाणी मोठी गर्दी करणं भाविकांनी टाळावं, असं, त्यांनी सामाजिक माध्यमावरून पाठवलेल्या या संदेशात सांगितलं आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच सर्व जखमी लवकर बरे होण्याची प्रार्थना करत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. स्थानिक प्रशासन सर्व प्रकारची मदत करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे. या महाकुंभमेळ्यात आज सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे तीन कोटी भाविकांनी स्नान केलं, तर आतापर्यंत एकूण सुमारे तेवीस कोटी भाविकांनी अमृतस्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ - 15 या शंभराव्या क्षेपणास्त्राचं यशस्वी प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एन व्ही ए�� झिरो टू हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या या क्षेपणास्त्रानं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं आहे. एनव्हीएस झिरो टू हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आाहे, अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त केला.
प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप आज बिटींग द रिट्रिट कार्यक्रमानं नवी दिल्लीतील विजय चौक इथं होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्री याप्रसंगी उपस्थित राहतील. सेनादल, नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील बँड या समारंभात एकंदर ३० विविध प्रकारचं सादरीकरण करणार आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी ३१ तारखेपासून सुरु होणार आहे. शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल���प संसदेत सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७वा दीक्षांत समारंभ आज राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या एक दिवसाच्या दौऱ्यासाठी राज्यपालांचं आज सकाळी नांदेड इथं आगमन झालं. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे उपस्थित होते.
अहिल्यानगर इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांतकुमार पाटील यांचं आज पहाटे आकस्मिक निधन झालं. डॉक्टर पाटील यांनी मुंबईच्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालक पदाची तसंच तंत्रज्ञान हस्तांकरण प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळली होती. डॉक्टर पाटील यांच्या आकस्मिक निधनामु��े कृषी विद्यापीठामध्ये शोकाकुल वातावरण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
लातूर जिल्ह्यात उदगीर शहरातल्या रामनगरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू ची लागण झाली आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. रामनगर इथल्या एक किलोमीटर परिसरातल्या कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, सहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बीड जिल्हा ग्रंथालयात काल जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातल्या शिरुर कासार इथं ११ आणि १२ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रंथोत्सवात घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची यावेळी मस्के यांनी माहिती दिली.
0 notes
Text
Bandya ani manya एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात,
Manya – जाऊ दे यार,
चल आत्महत्या करू…
Bandya – येडा बिडा झालास कि काय…?
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल…!
0 notes
Text
Pradip ani manya एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात,
Manya – जाऊ दे यार,
चल आत्महत्या करू…
Pradip – येडा बिडा झालास कि काय…?
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल…!
0 notes
Text
62. 'मी' चा त्याग
श्रीकृष्ण उत्तर देतात, मी आधी म्हटल्याप्रमाणे, या जगात मोक्षाचे दोन मार्ग आहेत - ज्ञानी लोकांसाठी ज्ञानाद्वारे आणि योगींसाठी कर्ममार्गाने (3.3). हा श्लोक सूचित करतो की जागृतीचा मार्ग बुद्धीचा वापर करणाऱ्यांसाठी आहे आणि कृतीचा मार्ग मनाचा वापर करणाऱ्यांसाठी आहे.
श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करतात की, केवळ कृती सुरू केल्याशिवाय मनुष्य निष्कर्म प्राप्त करू शकत नाही आणि केवळ त्याग करून सिद्धी प्राप्त करू शकत नाही (3.4).
बलिदानाचा गौरव जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये केला जातो कारण त्याग करणारा काहीतरी करू शकतो जे सामान्य व्यक्ती करू शकत नाही. म्हणूनच राज्याच्या सुखसोयींचा त्याग करण्य���ची आणि युद्धाच्या वेदना टाळण्याची अर्जुनाची दृष्टी आपल्याला आकर्षित करते.
श्रीकृष्ण पण आपल्याला त्यागच करा��ला सांगतो मात्र तो प्रत्येक कृतीतून ‘मी’ वगळण्यावर भर देतो. कृष्णासाठी युद्ध हा फारसा महत्वाचा मुद्दा नाही तर अर्जुनामधील ‘मी’ हा महत्वाचा मुद्दा आहे. कृष्णासाठी, निर्मम आणि निरहंकार हा शाश्वत स्थितीचा मार्ग आहे (2.71).
आपल्या दैनंदिन आयुष्यात, पैसा, अन्न, वस्तू, सत्ता किंवा समाजात ज्याला मूल्य आहे अशा कोणत्याही गोष्टीचा त्याग असू शकतो. ‘मी पैसे कमावले आणि आता मी पैसे दान करतो आहे’ असे म्हणण्यासारखे ते आहे. जोपर्यंत ‘मी’ शिल्लक आहे तोपर्यंत पैसे कमावणे आणि दान करणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
साधारणत: आपण भौतिक वस्तूंच्या त्यागाचे कौतुक करतो त्यामुळे ही संकल्पना समजून घेणे जरा कठीण आहे. निश्चितपणे ही प्रवासाची दुसरी पातळी आहे आणि प्रसिद्धी किंवा तत्सम काही तरी मिळविण्यासाठी हा त्याग केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, श्रीकृष्ण आपल्याला तेथे थांबू देत नाही आणि ‘मी’ चा त्याग करण्याचा अंतिम टप्पा गाठण्याबद्दम आग्रह करतो.
‘मी’ चा त्याग केला की सगळाच आनंद निर्माण होतो, अन्यथा आयुष्य नावाच्या या नाटकाची शोकांतिका बनू शकते.
0 notes
Text
कोपरगाव शहरात गोमांस विक्रेत्यांवर अचानक ‘ सर्जिकल स्ट्राईक ‘
कोपरगाव शहरात गोमांस विक्रेत्यांवर अचानक ‘ सर्जिकल स्ट्राईक ‘
कोपरगाव शहरात गोमांस विक्रेत्यांवर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या पथकाने एकाच वेळी सर्वत्र छापे टाकत तब्बल एक लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने व मांसविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. शनिवारी सकाळी साडेदहा वाजल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली आणि शहरातील संजयनगर , आयेशा कॉलनी , हाजी मंगल कार्यालय परिसर इथे हे छापे टाकण्यात…
0 notes
Text
व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी - महासंवाद
मुंबई, दि. 2 :- आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकासकामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे…
View On WordPress
0 notes
Text
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !
कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय.
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी त���रा म्हणजेच "भामिनी" चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरे�� आवाजाची अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
*संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले*
*"सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.*
*मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.*
*आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे."*
इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक माझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
0 notes
Text
'सेंद्रिय शेती' कशी करावी?
सेंद्रिय शेती कशी करावी? – एक संपूर्ण मार्गदर्शक सेंद्रिय शेती ही आधुनिक काळातील एक शाश्वत व निसर्गस्नेही शेती पद्धत आहे. रासायनिक खतांपासून मुक्त, नैसर्गिक घटकांचा उपयोग करून पीक उत्पादन करणारी सेंद्रिय शेती आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
सेंद्रिय शेती म्हणजे काय? सेंद्रिय शेती म्हणजे रासायनिक खते, कीटकनाशके किंवा कोणतेही कृत्रिम घटक न वापरता केली जाणारी नैसर्गिक शेती. यात प्रामुख्याने कंपोस्ट, गोमूत्र, गांडूळ खत, शेणखत, तसेच जैविक कीटकनाशके यांचा उपयोग केला जातो.
सेंद्रिय शेती करण्याचे महत्त्व आरोग्यासाठी फायदेश��र: सेंद्रिय पिकांमध्ये पोषणमूल्ये अधिक असतात. मातीचे आरोग्य राखते: सेंद्रिय घटकांमुळे मातीतील सजीव घटक जिवंत राहतात. पर्यावरणपूरक: जलप्रदूषण आणि मातीचे नुकसान टाळते. कमी खर्च: रासायनिक खतांपेक्षा नैसर्गिक पर्याय स्वस्त व सहज उपलब्ध होतात.
सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती
जमिनीची निवड आणि तयारी सेंद्रिय शेतीसाठी भुसभुशीत, सेंद्रिय घटकांनी समृद्ध जमीन आवश्यक आहे. कंपोस्ट किंवा शेणखत जमिनीत मिसळून मातीची सुपीकता वाढवावी. जमीन नांगरून योग्य प्रकारे सजीव अन्नद्रव्ये तयार करावीत.
सेंद्रिय खतांचा वापर शेणखत: नैसर्गिकरित्या कुजवलेले शेणखत जमिनीत टाकल्याने पीक निरोगी राहते. गांडूळ खत: गांडुळांद्वारे तयार होणारे खत मातीला पोषक बनवते. कंपोस्ट खत: घरातील व शेतीतील जैविक कचऱ्यापासून बनवलेले खत पीकवाढीस उपयुक्त आहे.
जैविक कीटक नियंत्रण कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी गोमूत्र, दशपर्णी अर्क, निम तेल, हळद आणि सेंद्रिय मिश्रणे वापरावीत. पीक संरक्षणासाठी झाडांवर नैसर्गिक फवारणी करावी.
आंतरपीक पद्धती एकाच शेतात दोन किंवा अधिक प्रकारची पिके एकत्र लावून मातीतील पोषणमूल्ये टिकवून ठेवता येतात. उदा. भाजीपाला व कडधान्ये एकत्र लावणे.
पाण्याचा काटकसरीने वापर ठिबक सिंचन व सेंद्रिय मलमूळ पद्धती वापरून पाण्याची बचत करावी. मातीला ओलावा टिकवण्यासाठी झाडांच्या मुळाशी सेंद्रिय कचरा टाकावा. सेंद्रिय शेतीचे फायदे मातीतील पोषणमूल्ये वाढतात. पिकांना नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते. पाण्याचा वापर कमी होतो. ग्राहकांना रसायनमुक्त व उच्च पोषणमूल्य असलेले अन्न मिळते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो. उत्कृष्ट सेंद्रिय शेतीसाठी काही टिप्स जैविक खते वेळच्या वेळी वापरा. आंतरपीक पद्धतीने मातीचे आरोग्य जपा. नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करून पिकांचे संरक्षण करा. गादीवाफा तंत्राचा उपयोग करून उत्पादन वाढवा. शेवटची महत्त्वाची गोष्ट सेंद्रिय शेती ही केवळ उत्पादनाची पद्धत नाही, तर एक जीवनशैली आहे. आरोग्यदायी अन्न, मातीचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे.
सेंद्रिय शेतीचा स्वीकार करा आणि निसर्गासोबत सुसंवाद साधत शाश्वत विकासाकडे वाटचाल करा!
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणुकदार परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन, रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, योजनेला आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो.
विधिमंडळाचं कामकाज विनाअडथळा चालवत, गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प पाटणा इथं आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत करण्यात आला. काल समारोपाच्या दिवशी या परिषदेनं पाच संकल्प केले. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधानाचं महत्व सांगण्यासाठी देशभरातल्या विधिमंडळांचे सदस्य समाजाच्या सर्व स्तरात जातील, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिषदनेनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. देशातल्या २३ विधिमंडळातले ४१ पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.
राज्यामध्ये कर्करुग्णांचं प्रमाण वाढत असून, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबवावी असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल दिले. २०२५-२६ या वर्षाच्या नियोजनासाठी मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या तसंच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आबिटकर त्यांनी दिल्या.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक २० रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक १८५ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत १३८ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ४४ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आल्याचं, आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.
नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोज��त कार्यक्रमात ते बोलत होते. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देणारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. २०२३-२४ या वर्षाच्या गाळप हंगामासाठी, आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, सर्वोकृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या हे पुरस्कार वितरीत केले जातील.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथी, देवदासी, एचआयव्ही बाधित २० व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आली. अशा व्यक्तींसाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबवण्यात येतात, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन येडगे यांनी यावेळी केलं.
इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. तर, या स्पर्धेत, पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक-जिन, तर लक्ष्य सेनचा सामना जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होईल. याच स्पर्धेत, काल महिला दुहेरीत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंडच्या जोडीचा, तर पुरुष दुहेरीत, सात्विक साइराज रांकि रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने तैवानच्या जोडीचा पराभव केला.
0 notes
Text
Bandya : पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती.
जन्या : का?
Bandya : अरे! त्यानं एकाच दुकानात तीन दिवस चोरी केली. दिवशी त्यानं बायकोसाठी सुंदर साडी चोरली.बाकीचे दोन दिवस रंग बदलून आणण्यासाठी चकरा मारत होता.
😀😀😀😂😂😂😂🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
Pradip : पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती.
जन्या : का?
Pradip : अरे! त्यानं एकाच दुकानात तीन दिवस चोरी केली. दिवशी त्यानं बायकोसाठी सुंदर साडी चोरली.बाकीचे दोन दिवस रंग बदलून आणण्यासाठी चकरा मारत होता.
😀😀😀😂😂😂😂🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३५
रविवारची आळसावलेली सकाळ! चहामागोमाग भरपेट नाश्ताही झाल्याने सुस्ती जरा अधिकच वाढली होती! 'रविवार असल्यामुळे आज अनंतची आंघोळ करण्याची घाई असणार नाहीं' हे ओळखून शुभदा आपली आंघोळ आटपून घेण्यासाठी अनंतला तसं सांगून बाथरूममधे गेली होती आणि अनंत सोफ्यावर निवांत आडवरून 'आज दिवसभरात काय-काय करायचं?' याचा विचार करीत होता, तेवढ्यांत डोअरबेल वाजली. विचारांच्या तंद्रीतच अनंतने दार उघडलं आणि दाराबाहेर पुष्पगुच्छ घेऊन उभ्या असलेल्या केदार आणि एकनाथना बघून चकीतच झाला! "रविवारी भल्या सकाळी तुम्हांला डिस्टर्ब केल्याबद्दल माफ करा, काका!" नजरानजर होतांच मान किंचित झुकवून अभिवादन करीत केदार म्हणाला, "पण आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही!" "आधी आंत तर या!" दिलखुलास हंसून अनंतने त्यांचं स्वागत केलं आणि भिंतीवरील घड्याळाकडे कटाक्ष टाकीत म्हणाला,"आतां दहा वाजायला आलेत;-- म्हणजे सकाळ संपली रे बाबांनो! तरी कसलाही संकोच नको!" आंत आल्यावर दार लोटून घेत एकनाथ म्हणाला "सबनीसकाका घरी असल्यास त्यांना इथेच बोलावता येईल कां? म्हणजे तुम्हां दोघांशी एकत्रच बोलतां येईल!" संभाषणाचे आवाज ऐकून कोण आलं आहे ते बघण्यासाठी शुभदा बाहेर आली तशी चटकन उठून तिला अभिवादन करीत केदार म्हणाला, " गुड मॉर्निंग, काकु! खरं तर काम तुम्हां दोन्ही काकुंकडेच आहे!" "वा रे वा! म्हणजे हे पुष्पगुच्छ खास दोन्ही काकुंसाठी आहेत तर!" शुभदा कांही बोलण्याआधीच अनंत मिस्किलपणे म्हणाला! "नाही, नाहीं!" केदारने घाईघाईने खुलासा केला, "पुष्पगुच्छ तुम्ही आणि सबनीसकाकांसाठी आहेत;-- पण काम मात्र काकुंकडे आहे!" ते ऐकून "मी रजनीला फोन करून दोघांनाही इथे बोलावून घेते" म्हणत शुभदाने लगेच मोबाईलवरून रजनीशी संपर्क साधला!
दहा-बारा मिनिटांत रजनी आणि दिनकर सबनीस हजर झाले! केदार आणि एकनाथना पाहून थोडे चकरावलेले सबनीस म्हणाले, " तुम्ही दोघं आल्याचं वहिनी बोलल्या नाहीत! 'महत्वाचं काम आहे, ताबडतोब या' एवढंच म्हणाल्या!!" "दिनकरराव, या दोघांचं खरं काम दोन्ही काकुंकडेच आहे! 'देखल्या देवा दंडवत' म्हणून त्यांनी आपल्यासाठी पुष्पगुच्छ मात्र आणले आहेत!" अतिशय गंभीर चेहर्याने अनंत करीत असलेली थट्टा ऐकून चहाचा ट्रे घेऊन बाहेर येणारी शुभदा म्हणाली, "अहो, किती चेष्टा कराल त्या बिचाऱ्यांची!" केदार आणि एकनाथच्या हातांत चहाचे कप देत तिने पुस्ती जोडली, " तुम्ही लक्ष देऊं नका रे यांच्याकडे;-- दोन्ही काकुंकडे काम काढलंत ना याचा मत्सर वाटतोय बरं तुुमच्या काकाला!" चहा पिऊन झाल्यावर केदार अनंत आणि सबनीसांना उद्देशून म्हणाला, " काका, मागच्या आठवड्यात तुम्ही आमच्या स्टाॅलचा धंदा वाढावा यासाठी ज्या काही नव्या कल्पना सुचवल्या, त्यावर विचार करून आम्ही 'केदारनाथ स्टाॅल'वर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयी देण्याचं ठरवलं आहे!" त्याचं बोलणं ऐकून एकाच वेळी खुष आणि चकीत झालेले सबनीस म्हणाले , "भले शाब्बास! अवघ्या ८-���० दिवसांत एवढा मोठा निर्णय घेतलांत याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!" "वा,वा! एवढ्या झटपट असा धाडसी निर्णय घेण्याची तुमची धडाडी नक्कीच कौतुकास्पद आहे" चक्क टाळ्या वाजवीत अनंतने आपला आनंद व्यक्त केला, "कधीपासून स्त्री ग्राहकांना खास सोयी देणार आहांत?" "तेच तर सांगायला आलोत, काका!" एकनाथ उत्साहाने म्हणाला,"पण त्याआधी तुमचे आभार मानण्यासाठी आम्ही आणलेले पुष्पगुच्छ स्वीकारा आणि आशिर्वाद द्या!" पुष्पगुच्छ देऊन पायां पडायला वाकलेल्या केदार-एकनाथला अर्ध्यावर थांबवीत अनंत म्हणाला, "खरं तर याची गरज नव्हती,- पण तुमच्या भावनांचा प्रामाणिकपणा आम्हांला कळतो आहे!" दोघांचे हात प्रेमभराने दाबीत सबनीस म्हणाले, "आम्हां सर्वांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत हमेशा असतील याची खात्री बाळगा!"
"काका, येत्या गुरुवारी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयींचा उपक्रम सुरु करायची आमची इच्छा आहे!" केदार सांगू लागला, "---त्यासाठी आमच्या पहिल्या दोन सन्माननीय ग्राहक या दोन्ही काकु असतील असं आम्हीं ठरवलं आहे!" "काकु, तुम्ही प्लीज नाहीं म्हणूं नका!" एकनाथने विनम्रपणे दोन्ही हात जोडून शुभदा आणि रजनीला विनंती केली. त्यांचा हा अनपेक्षित प्रस्ताव ऐकून आश्चर्यचकित झालेल्या दोघींनाही काय बोलावं ते सुचेना! पण कांही क्षणांनी त्या धक्क्यातून स्वत:ला सावरीत शुभदा म्हणाली, " केदार आणि एकनाथ, तुम्ही दिलेला हा बहुमान कुणालाही आवडेल! पण तरीही हा बहुमान तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधा-या महिलेला देणं अधिक योग्य ठरेल असं मला मनापासून वाटतं!"
३० मार्च २०२३
0 notes