Tumgik
#होतो
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Ice Water Facial: काय आहे पद्धत आणि त्वचेला कसा होतो फायदा
Ice Water Facial: काय आहे पद्धत आणि त्वचेला कसा होतो फायदा
Ice Water Facial: काय आहे पद्धत आणि त्वचेला कसा होतो फायदा त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसण्यासाठी महिला अनेकदा फेशियल करून घेतात. पण पार्लरमधील हे फेशियल खर्चिक ठरते. तसंच यातील केमिकलयुक्त क्रिम्सचादेखील कधी कधी वाईट परिणाम होत असतो. त्वचेला नुकसानही पोहचते. तुम्हाला जर नैसर्गिकरित्या आपल्या चेहऱ्यावरील उजळपणा वाढवायचा असेल, चेहऱ्यावर तजेलदारपणा हवा असेल तर आईस वॉटर फेशियलचा तुम्हा आधार घ्यायला…
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
कोणत्या मंत्राचा जाप केल्याने काल सुद्धा नतमस्तक होतो पहा आज
दुपारी 1:00 वास्ता लाइव्ह आमच्या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
4 notes · View notes
kamlakar-das · 3 months
Text
Tumblr media
कबीर परमात्मा ने बोलले आहे की माणूस जन्म हा खूप कष्टाने प्राप्त होतो या जन्माला संसारामध्ये गुंतून संसाराच्या साऱ्या कृती करून नष्ट करायचे नसून सतभक्ती सद्गुरु आणि सतलोक प्राप्तीसाठी मिळालेला वापर करायचा असतो. म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मिळालेली ही एक अनमोल संधी असते
3 notes · View notes
survivetoread · 1 year
Text
Natalia Lafourcade - De todas las flores (Marathi Translation)
नाताल्या लाफुरकादे - दे तोदास लास फ्लोरेस (सगळ्या त्या फुनलांमधून)
आपण लावलेल्या सगळ्या त्या फुलांमधून राहिलं फक्त एकच जिवंत रोज सकाळी ते विचारतं कधी येशील त्यांच्यासाठी गायला
आपण पाहिलेल्या सगळ्या त्या चंद्रांच्या राहिल्यात फक्त काहीच आठवणी आपण हसलो तेव्हाच्या आपण एकमेकांकडे होतो तेव्हाच्या नशेत दिशाविना माद्रिदच्या रस्त्यांमध्ये ग��लो आपण नाचलो तेव्हाच्या आपण हरवलो तेव्हाच्या आपल्या त्या गाण्यात जे आपल्या जुन्या जगात आपण समजायचो आपल्यात वाटलेल्या गुलाबी बुगनविलांच्या बागात
आपण लावलेल्या सगळ्या त्या फुलांमधून राहिलं फक्त एकच जिवंत रोज सकाळी ते विचारतं कधी येशील त्यांच्यासाठी गायला
लुप्त होणारे ते चंद्र ज्यांनी आपल्याला पाहिलं पवित्र अश्रू गळणार्‍या सागरांच्या वर तुझ्या कुरवाळण्यासारखेच गोड तसेच कडू सकाळी स्वादिष्ट, पहाटे व्यूह तुझ्या कुरवाळण्यासारखेच गोड तसेच कडू उतरत जात आहे माझ्या छातीत ही सगळी खिन्नता या गुलाबी बुगनविलांच्या बागात तुझ्या सोबतीशिवाय
आपण पाहिलेल्या सगळ्या त्या चंद्रांच्या राहिल्यात फक्त काहीच आठवणी आपण हसलो तेव्हाच्या आपण एकमेकांकडे होतो तेव्हाच्या नशेत दिशाविना माद्रिदच्या रस्त्यांमध्ये गेलो आपण नाचलो तेव्हाच्या आपण हरवलो तेव्हाच्या आपल्या त्या गाण्यात जे आपल्या जुन्या जगात आपण समजायचो आपल्यात वाटलेल्या गुलाबी बुगनविलांच्या बागात ज्यात आपण हरवून गेलो त्या गुलाबी बुगनविलांच्या बागात
9 notes · View notes
shayriara · 2 years
Text
#Words
लिखने की तलब होतो कमबख्त शब्द रूठ जाते हैँ
अनजानी स्याही मे डूब कर कही मुँह छुपा जाते हैँ
बड़ी तड़पन होती हैँ कृष्णा जब कुछ लिख नहीं पाते
एक अजीब सी बैचेनी मे उलझाकर ये स्वयं ही रूठ जाते हैँ..
Likhne ki talab hoto kambakht shabd rooth rooth jaate hai
Anjaani syaahi me doobkar kahi muh chhupa jaate hai
Badi tadpan hoti hai Krishna jb kuch likh nhi paate
Ek azib si baicheni me uljhaakr ye swayam hi rooth jaate hai...
-Krishna sharma (कृष्णा शर्मा)
16 notes · View notes
avinashbhondwe · 1 year
Text
गप्पा आज
आज गप्पा मारताना जास्ती मजा आली म्हणजे असं झालं की आम्ही जरा जेवायला बाहेर आलो होतो आणि नेहमीच्या वेळेपेक्षा जरा जास्तीच मजा आली टेक्नॉलॉजी आणि मग सगळेच सुटले प्रत्येक जण एवढा बिझी असतो की वेळ मिळत नाही त्या��ुळे रेग्युलर सतत भेटत राहणं हे फार महत्त्वाचं असतं आणि ज्या काही चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी घडतात त्याच्याबद्दल समजून घेणे खूप आवश्यक असतं या सगळ्या बाबतीत भेटत राहू आणि बोलत राहू जे काही…
View On WordPress
5 notes · View notes
sameeroak · 2 years
Text
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं... समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्‍ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, समोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes · View notes
gop-al · 2 years
Text
आपला दृष्टीकोन भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते. कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे. रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ��ी गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून…. जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes · View notes
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
prashantmmodi · 2 years
Text
Tumblr media
सातारी कंदी पेढा
मिथक आणि वास्तव
भारतामध्ये पेढा बऱ्याच ठिकाणी उत्पादित होतो, प्रत्येक ठिकाणची पेढा बनविण्याची पद्धत आणि खासियत वेगळी आहे. त्यामुळेच पेढ्याला ठिकठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात.
मथुरेचे पेढे, सातारी कंदी पेढे, राजस्थानमधील चिवाला येथील पेंडा, धारवाडी पेढा, कुंथलगिरी येथील पेढा, गुजरात भुज येथील पेढा, नरसोबाची वाडी येथील पेढा, जेजुरी येथील पेढा अशी काही खास ठिकाणे आहेत.
सातारी कंदी पेढा आणि मथुरा, कुंथलगिरी, नरसोबाची वाडी येथील पेढ्यांमध्ये साम्य आढळते. तरीही भाजणीची उत्कृष्ट पद्धत आणि फिक्केपणा तसेच मर्यादित गोडवा यामुळे सातारी कंदी पेढाच भारतामध्ये वरचढ आहे असे आपण नक्कीच म्हणू शकतो.
सातारी कंदी पेढा हा खमंग भाजणीचा, खरपूस भाजलेला, मर्यादित गोडव्याबरोबरच वेलचीचा निसटता स्वाद देतो.
कंदी भाजणीमुळे तोंडात पटकन विरघणारा पेढा हे सातारी कंदी पेढ्याचे वैशिष्ट्य.
कंदी पेढा नाव कसे पडले याला काही आख्यायिका आहेत, कोण म्हणते ब्रिटिशांनी दिले, कोण म्हणते करंडीत मिळायचा त्यामुळे , कोण म्हणते कंदमुळे असलेल्या रानातून भागातून खवा यायचा त्यामुळे ..वगैरे वगैरे...
या सर्व आध्यायिका धांदात चुकीच्या आहेत.
पेढ्याच्या खरपूस भाजणी लाच कंदी भाजणी म्हणतात ..
पेढा तयार होताना जी खरपूस भाजणी असते तिलाच कंदी नावाने ओळखलं जातं.
'कंदी भाजणीचा पेढा' अशी तुळजाराम मोदी यांची पूर्वी एअर इंडियाच्या विमानांमध्ये जाहिरात असायची.
भाजणीमुळे जो मंद सुगंध पसरतो त्यावरून कंदी भाजणीची चाचणी लक्षात येते.
कंदी भाजणी हे एक कौशल्य आहे, प्रतिभा आहे. हे कौशल्य, ही प्रतिभा संपादन करणं प्रत्येकाला जमणे केवळ अशक्य. म्हणूनतर प्रत्येक दुकानातील पेढ्याच्या चवीमध्ये फरक आहे.
खवा भाजणे, प्रमाणात साखर घालणे, ती विरघळली कि इलायची पेरणे हे कोणीही करू शकते, त्याला फार काही ज्ञान लागत नाही.. पण हीच कंदी भाजणी असा गैरसमज करून घेत अर्धवट ज्ञान घेऊन असंख्य कंदी पेढ्याचे व्यापारी तयार झालेत.
मात्र अस्सल कंदी भाजणी घेणे मोजक्याच पारंपरिक आणि खानदानी घराण्यांना जमते..
पुर्वी तुळजाराम मोदी, नारायणराव लाटकर, बी. एम. लाटकर, बाळप्रसाद मोदी, राजाराम मोदी हे स्वतः भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन, देवपूजा करून सोवळ्यातच दूध घोटवायचे .. त्याचा खवा बनवायचे, तदनंतर लगेच तो खवा मुस्त्याने घोटवत अस्सल कंदी पद्धतीने भाजत कुंदा मारायचे..
यानंतरच गडी लोकांना म्हणजेच कामगारांना कारखान्यात प्रवेश असायचा, त्यांचे काम फक्त पेढे हातावर वळत गोलाकार बनवून ताटात लावून दुकानामध्ये विक्रीला पाठवायचे असे.
असाच आणि असाच नियम होता.
नंतरच्या पिढीने उदार धोरण स्वीकारत मोजक्या विश्वासहार्य लोकांना ही भाजणी कशी असते याचे ज्ञान दिले...आणि कंदी भाजणीचे रहस्य हळहळू जगजाहीर झाले.
कोणत्याही पदार्थाला भौगोलिक परिस्थिती सुद्धा तितकीच महत्वाची आणि आवश्यक असते.. तशीच कंदी पेढ्याला सातारचे आल्हाददायक वातावरण पण लाभले..
आणि म���हणूनच कंदी पेढ्याला सातारी कंदी पेढा हे नाव मिळाले आणि सातारी कंदी पेढा जगातल्या खवैयांच्या जिभेवर रुळला.
पुर्वी कंदी पेढा बनविताना उत्पादक स्वतःच खवा बनवायचे, त्यासाठी सुरवातीला साताऱ्याच्या डोंगराळ भागातून दूध यायचे, नंतर कोल्हापूर बॉर्डर वरून यायचे .. आजही सातारा आणि कोल्हापूर येथे दुधाचा दर्जा तुलनेने सर्वोत्कृष्ट आहे.
काळ बदलला, कंदी पेढा बनवायचे अर्धवट टेक्निक जगजाहीर झाल्याने बरेचजण या व्यवसायात उतरले .. तयार खवा घेऊन पेढा बनवू लागले तिथेच चव बदलायला सुरवात झाली.
अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनविणे सोपे असते तर साताऱ्यात आजपर्यंत एकच कै. तुळजाराम मोदी यांना मिठाई शास्त्रज्ञ म्हणून त्या काळच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेले नसते. असो..
(मोदी-लाटकर याबद्दल परत कधीतरी माझ्या शब्दात मांडेन)
कच्या मालाचा दर्जा घसरला आणि साहजिकच फिनिश गुड्स वरती परिणाम झाला.
परराज्यातील लोकांनी सुद्धा या व्यवसायामध्ये उदरनिर्वाहासाठी प्रवेश केला. मात्र त्याचा दर्जा टिकविण्यात त्यांना रस नसल्याने केवळ आर्थिक उन्नत्तीसाठी पेढ्यांमध्ये साखरी पेढा, दोन नंबर अशा क्वालिटी आल्या. त्यामुळे चवीचा दर्जा अजून खालावत गेला. आतातर मैदा पण मिसळतात काही जण.. असो..
कंदी पेढ्यांचे उत्पादक ते कंदी पेढ्यांचे व्यापारी हा साताऱ्याच्या कंदी पेढ्याचा प्र���ास कडू आहे. दुर्दैवी आहे.
ग्राहक पण याला काही प्रमाणात जबाबदार आहेत.. वाटायचे तर आहेत म्हणून दोन नंबरची क्वालिटी डिमांड ग्राहकांनीच निर्माण केली.. दोन नंबर पेढा निर्माण झाला अन वाटणारे आणि खाणारेपण मूळ चव विसरले 🤦🏻
फारच अति झालंय म्हणून आता साताऱ्याचा कंदी पेढा जीआय मानांकनाखाली आणणे आवश्यक आहे. मात्र ज्यांनी कंदी पेढ्याचा धंदा मांडलाय ते याला साथ देत नाहीत ही शोकांतिका आहे.
असो.. इतर कोणाबद्दल मी सध्या तरी बोलणार नाही .. माझ्याबद्दल इतकंच सांगेन कि माझ्याकडे अस्सल कंदी भाजणीचा पेढा बनतो, अजूनही लाकडाच्या, कोळशाच्या ताव्यावर भाजला जातो, चाचणी पारंपरिक पद्धतीने होते, खवा स्वतःचा आहे (बाहेरचा बिलकुल नाही), हायजिन मेंटेन असते, कंदी भाजणीची मूळ चव जपणे हा माझा धर्म आणि कर्तव्य आहे.
ही कंदी पेढ्याची चव अनुभवायला जरूर या.
येणे शक्य नसल्यास मला 91455-00012 ला मेसेज करा मी तुम्हाला पोच करेन. (अर्थातच विनामूल्य).
ही पोस्ट लिहण्यास सातारकरांनी मला टॅग केले, मेसेज केले, हक्काने सांगितले, समक्ष भेटून सांगितले .. (पाठपुरावाचं केला जणू.. 😀)..
या बहुमानाबद्दल आभार न मानता ऋणी राहणे मी पसंत करेन.
फेसबुक सातारा या व्यासपीठाचे अत्यंत प्रामाणिकपणे आभार.
टीप:- जीआय मानांकनासाठी छत्रपती उदयनराजे यांनी पुढाकार घेतला असून युवानेते संग्राम बर्गे त्यासाठी मेहनत घेत आहेत. त्यांना आपल्याच साताऱ्याचे श्रीधर पारुंडेकर, महेश निकम टेक्निकल करस्पॉन्डन्स पूर्ण करण्यासाठी साथ देत आहेत. आई जगदंबा हे कार्य पूर्णत्वाला नेवो 🙏🏻🕉.
कंदी पेढ्याच्या विक्रेत्यांना मी एवढच विनंती करेन कि दर्जा ठेवा .. ग्राहकांनी पण दर्जा बघावा .. 🙏🏻
याआधी आपल्या साताऱ्याचे राजेंद्र पाटील आणि पुणेस्थित आंतरराष्ट्रीय फूड एक्सपर्ट डॉ. उदय पोतदार यांनी कंदी पेढ्याविषयक अभ्यासपूर्ण पोस्ट केल्या आहेत .. त्याची लिंक कमेंट मध्ये देईन.
वरील पोस्ट माझ्या वैयक्तिक प्रत्यक्ष अनुभव, घेतलेली मेहनत, तिचा कस आणि आपल्या सर्वांनी दिलेली प्रेरणा यातून निर्माण झालेली आहे.
गोडवा वाढवूया..
प्रशांत मोदी (लाटकर)
जगप्रसिद्ध सातारी कंदी पेढ्याचे उत्पादक :-
मोदी'ज् नारायण पेढेवाले
विसावा नाका मारुती मंदिराशेजारी,
विसावा नाका, सातारा
91455-00012
वरील फोटो श्री नरेंद्र जाधव यांनी माझ्या कारखान्यात काढला आहे.
हाच फोटो कित्येक व्यापारी वापरतात. 🤦🏻😀
कृपया शेअर करा .. कॉपी पेस्ट करा
2 notes · View notes
mukundhingne · 2 days
Text
"The birth of compassion comes from sensitivity…!"
“दयाबुद्धीचा जन्म हा संवेदनशीलतेतून होतो…!“ Feeling pity, compassion, or empathy for someone indicates that you are sensitive. Because only sensitive people possess compassion. As long as seeing the suffering of others makes us feel concerned for them and urges us to lend a helping hand, our sensitivity is actively functioning. When the pain of others no longer affects us in the slightest, we…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
उभं राहण्याचे हे फायदे माहीत आहेत का ? हृदयरोगाचा धोका होतो कमी
उभं राहण्याचे हे फायदे माहीत आहेत का ? हृदयरोगाचा धोका होतो कमी
उभं राहण्याचे हे फायदे माहीत आहेत का ? हृदयरोगाचा धोका होतो कमी नवी दिल्ली – ज्याप्रमाणे अन्न खाल्यामुळे आपल्या शरीराला विविध पोषक तत्वं मिळतात, संगीत ऐकल्याने मनाला आराम मिळतो, त्याप्रमाणेच व्यायामाचेही (exercise) आहे. व्यायाम केल्याने आपल्या शरीराला फायदा होतो, हे सर्वांनाच माहीत आहे. पण उभं राहिल्यानेही (standing) आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात, हे तुम्ही कधी ऐकलं आहे का ? आपल्यापैकी अनेक…
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 3 days
Text
सागरा प्राण तळमळतो.
कोकणात आता मे महिना चालू झाला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे. भर पावसात मी एकदा समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. भर पावसात कोकणातल्या समुद्रावर छत्री किंवा रेनकोट पुरा पडत नाही. एवढा वारा असतो. पण मे महिन्यात मात्र जेव्हा शहरात खूप उकाडा असतो अशावेळी समुद्रावर साधे कपडे घालून वाऱ्याची मजा घ्यायला खूप उत्साह येतो. काल मी चौपाटीवर वाळूत बसलो होतो. आणि माझ्या मनात विचार आला, माझा समुद्राच्या,…
0 notes
Text
42. अहंकार टाळा     
श्रीकृष्ण ने पाहिले की अर्जुन ‘अहम कर्ता’ म्हणजेच अहंकाराच्या भावनेने भारावून गेला होता आणि हेच त्याच्या दुःखाचे कारण होते. श्रीकृष्ण अर्जुनाला अहंकार तोडण्यासाठी आणि आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुसंगत बुद्धीचा वापर करण्याचा सल्ला देतात (2.41).
अहंकाराची अनेक रूपे आहेत. गर्व हा अहंकाराचा एक छोटासा भाग आहे. जेव्हा एखादी व्यक्ती यश/विजय/नफ्याच्या आनंदाच्या ध्रुवीयतेतून जाते तेव्हा त्या अहंकाराला अभिमान म्हणतात आणि जेव्हा एखादी व्यक्ती अपयश/पराजय/नुकसानाच्या दुःखाच्या ध्रुवतेतून जाते तेव्हा त्या अहंकाराला उदासीनता, दुःख, राग म्हणतात. जेव्हा आपण इतरांना आनंदी पाहतो तेव्हा तो मत्सर असतो आणि जेव्हा आपण इतरांना दुःखी पाहतो तेव्हा ती सहानुभूती असते.
आपण भौतिक गोष्टी जमा करत असतो तेव्हा आणि जेव्हा त्यांचा त्याग करत असतो तेव्हा, अशा दोन्ही वेळेस अहंकार असतो. हा अहंकार संसारामध्ये कर्म करण्यासाठी आणि संन्यास घेण्यासाठीही प्रेरित करते. तो विनाश आणि निर्मिती अशा दोन्ही बाबींना कारणीभूत ठरतो. तो ज्ञानातही आहे आणि अज्ञानातही.
स्तुतीमुळे अहंकार वाढतो आणि टीका दुखावते, ज्यामुळे आपण इतरांच्या फसवणुकीला बळी पडतो. थोडक्यात, आपल्या बाह्य वर्तनावर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येक भावनेमागे कोणत्या ना कोणत्या अर्थाने अहंकार असतो. अहंकार आपल्याला यश आणि समृद्धीकडे घेऊन जातो असे वाटेल, परंतु ते तात्पुरते नशेत राहण्यासारखे आहे.
‘मी’ आणि ‘माझे’ हा अहंकाराचा पाया आहे आणि दैनंदिन संभाषणात आणि विचारांमध्ये या शब्दांचा वापर टाळून आपण अहंकाराला बऱ्याच अंशी कमकुवत करू शकतो.
जेव्हा आपण एका ध्रुवाशी किंवा दुसर्‍या ध्रुवाशी ओळखतो तेव्हा अहंकाराचा जन्म होतो. म्हणून, श्लोक 2.48 मध्ये, श्रीकृष्ण अर्जुनला कोणत्याही भावनेची ओळख न करता मध्यभागी राहण्याचा सल्ला देतात जिथे अहंकाराला जागा नाही. लहान मुलाप्रमाणे भूक लागल्यावर खा; थंड असताना उबदार कपडे घाला; आवश्यक असल्यास लढा; गरज असेल तेव्हा भावना उधार घ्या.
0 notes
arunpangarkar2 · 9 days
Text
आदर्श अर्थ वितरण प्रणाली चळवळ तथा गरिबी निर्मूलन चळवळ
0 notes
weepingsuitgiver · 12 days
Text
0 notes