#होण्याआधीच
Explore tagged Tumblr posts
gajananjogdand45 · 11 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/speak-in-marathi-in-mothers-village/
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पदवी परीक्षा प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल आज जाहीर झाला. पीसीएम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित तसच पीसीबी भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन्ही विभागाच्या गुणपत्रिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जन्मतारीख आणि अर्ज क्रमांक टाकून विद्यार्थ्यांना आपापला निकाल पाहता येणार आहे. यंदा एमएचटी सीईटीच्या परीक्षेसाठी ६ लाख ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
****
ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून लहान मुलांचं धर्मांतरण करणारा आरो��ी शहनवाज याला आज उत्तरप्रदेश पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आलं. शहनवाजला काल अलिबाग इथून अटक केल्यानंतर आज त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. उत्तरप्रदेश पोलिसांनी ट्रान्झिट रिमांडवर शाहनवाजला ताब्यात घेतलं आहे. धर्मांतर करण्याचं प्रकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी उघड केलं होतं. ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलांना हेरुन त्यांना सुरुवातीला या खेळात हरवलं जायचं, त्यांनंतर धर्मांतराच्या उद्देशाने मन परिवर्तन केलं जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे जगासमोर मोठं संकट उभं राहीलं असून, पर्यावरणाच्या बदलामुळे ऋतुमानात दिवसेंदिवस बदल होत आहेत, उद्रेक होण्याआधीच हे रोखायला हवं, असं अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं आहे. अहमदनगर सायकलिंग असोसिएशन आणि सायकलिंग क्लब यांच्या वतीने पंढरपूर सायकलवारी काढत पर्यावरणाची जनजागृती करण्यात येत आहेत, त्या संदर्भातल्या एका कार्यक्रमात जगताप बोलत होते. वायू प्रदूषण निर्माण करण्याऱ्या वाहनांचा वापर टाळून सायकलचा वापर करणं ही काळाची गरज आहे, असं जगताप म्हणाले.
****
शेतकऱ्यांनी गटशेतीच्या माध्यमातून मिश्र पिकांवर भर देत शेतमालाच्या मूल्यवर्धनावर भर द्यावा, असं मत शेतकरी माझाचे संचालक, लेखक, दिग्दर्शक प्रमोद प्रभूलकर यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या काळवाडी इथं डेक्कन व्हॅली शेतकरी उत्पादक, ग्रामपंचायत, महिला बचत गट आणि शेतकरी माझा यांच्या वतीने किमान हमीभाव या विषयावरच्या चर्चासत्रात प्रभूलकर आज बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांसमोर असलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. त्यासाठी गटशेती हा योग्य पर्याय असल्याचं प्रभूलकर यांनी सांगितलं.
****
छत्रपती शाहू महाराज संस्था प्रशिक्षण आणि मानव विकास -सारथी या संस्थेच्या वतीनं शेतकरी कंपनीच्या लक्षीत गटातील संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रतिनिधिक सभासद यांच्यासाठी विनाशुल्क क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकरी कंपनीशी निगडीत विविध विषयातज्ज्ञाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, साहित्य, क्षेत्रीय भेट इत्यादी बाबींचा समावेश आहे. राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपूर आणि रत्नागिरीत दापोली इथं हे प्रशिक्षण होणार असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना पुढे दोन वर्षे निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र इच्छुकांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सारथी हायफन महाराष्ट्र गव्ह डॉट कॉम तसंच डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू महा एम सी डी सी डॉट कॉम या संकेतस्थळावरून अर्ज भरून सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
‘जागतिक बालकामगार विरोधी दिन’ आज पाळण्यात येत आहे. बालमजुरी विरोधाच्या चळवळीला प्रेरणा देणं हा यामागचा उद्देश आहे. यंदाच्या जागतिक दिनाचे घोषवाक्य, ‘सर्वांसाठी सामाजिक न्याय आणि बालमजुरी संपवा’ असं आहे.
****
अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त हिंगोली इथं सामाजिक न्याय भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज अंमली पदार्थांचं प्रतिकात्मक दहन करुन अंमली पदार्थ विरोधी पंधरवड्याचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्ह्यात वसमत-औंढा तालुक्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या मेळाव्यात नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक विशाल अग्रवाल यांनी उपस्थितांना अंमली पदार्थ विरोधी व्यसनमुक्तीचा संकल्प दिला. नशाबंदी मंडळानं भरवलेल्या व्यसनमुक्ती चित्र प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अवलोकन केलं.
****
जालना जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ.राठोड यांनी व्यसन न करण्याची शपथ दिली. या अभियानांर्तत १२ ते २६ जून या कालावधीत शाळा, महाविद्यालयं, सेवाभावी संस्था, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे.
****
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात लातूर जिल्हा वार्षिक योजनेतून विकासकामांसाठी मिळालेला ३०२ कोटी रुपये निधी पूर्णपणे खर्च झाला आहे. आता २०२३-२४ या आर्थिक वर्षात विकास कामांसाठी मंजूर निधी मागणीचे प्रस्ताव संबंधित विभागांनी जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, असं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. जिल्हा नियोजन समितीच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत पालकमंत्री महाजन बोलत होते. पालकमंत्र्यांनी पीकविमा, नुकसान भरपाई, शासन आपल्या दारी, आदी योजनांचा आढावा घेतला
****
नांदेड जिल्ह्यात येत्या १५ जून रोजी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांचं दमदार स्वागत करण्याची तयारी शाळांनी सुरू केली आहे. हर घर नर्सरी हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येत असून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झाडाचं रोप देऊन स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहि��ी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी दिली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद आणि खाजगी अनुदानित शाळांमधल्या तीन लाख ५३ हजार ५२४ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाणार आहे.
****
सेलू-ढेंगळी पिंपळगाव – मानवत रोड दरम्यान उद्या १३ आणि शनिवार १७ जून रोजी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान १३५ मिनिटे उशिरा धावेल. नांदेड -पुणे एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान ५० मिनिटे, काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान तीन तास दहा मिनिटे, नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान दीड तास उशिरा धावेल. धर्माबाद इथून सुटणारी धर्माबाद मनमाड मराठवाडा एक्सप्रेस गाडी १४ आणि १८ जून रोजी तिच्या नियोजित वेळेऐवजी एक तास उशिरा म्हणजे पहाटे पाच वाजता सुटेल.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
भारत जोडो इफेक्ट; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट म्हणतात, हम सब एकसाथ…
भारत जोडो इफेक्ट; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट म्हणतात, हम सब एकसाथ…
भारत जोडो इफेक्ट; राजस्थानमध्ये गेहलोत-पायलट म्हणतात, हम सब एकसाथ… नवी दिल्लीः काँग्रेसची आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भारत जोडो यात्रा आता काही दिवसांनी राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे राजस्थानमधील राजकारणात आता बदलाचे वारे फिरू लागले आहे. राहुल गांधी आता राजस्थानमध्ये दाखल होण्याआधीच अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी आपल्यात वाद संपवण्याचे संकेत दिले आहेत. या राजकीय…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 3 years ago
Text
मंगलाष्टक होण्याआधीच नवरीला चक्कर, शुद्धीवर आल्यावर म्हणाली की ?
मंगलाष्टक होण्याआधीच न���रीला चक्कर, शुद्धीवर आल्यावर म्हणाली की ?
महाराष्ट्रात नवरदेव उशिरा आला म्हणून विवाह मोडल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र अचानकपणे नवरीचा मूड बदलला म्हणून विवाह मोडल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपुर परिसरात घडलेली आहे. वाजत गाजत आणि नाचत नवरदेव लग्न मंडपात आला मात्र भर मांडवात मुलीने लग्नास नकार दिला त्यामुळे नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले. चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळ कोलारी येथे ही घटना मंगळवारी रात्री घडली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 3 years ago
Text
मंगलाष्टक होण्याआधीच नवरीला चक्कर, शुद्धीवर आल्यावर म्हणाली की ?
मंगलाष्टक होण्याआधीच नवरीला चक्कर, शुद्धीवर आल्यावर म्हणाली की ?
महाराष्ट्रात नवरदेव उशिरा आला म्हणून विवाह मोडल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र अचानकपणे नवरीचा मूड बदलला म्हणून विवाह मोडल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपुर परिसरात घडलेली आहे. वाजत गाजत आणि नाचत नवरदेव लग्न मंडपात आला मात्र भर मांडवात मुलीने लग्नास नकार दिला त्यामुळे नवरदेवाला आल्या पावली परत जावे लागले. चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळ कोलारी येथे ही घटना मंगळवारी रात्री घडली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 3 years ago

rajendrasomani · 3 years ago

nagarchaufer · 3 years ago

nandedlive · 2 years ago
Text
परळीमध्ये जिलेटन कांड्याचा साठा जप्त
Tumblr media
३ आरोपी अटकेत, राखेसाठी स्फोटाची योजना परळी : बीडमध्ये आज सकाळी स्फोटासाठी लागणा-या जिलेटीनच्या कांड्या आणि अनेक वस्तू जप्त करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली. पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक केली. या आरोपींच्या चौकशीनंतर धक्कादायक माहिती समोर आली असून, आरोपींनी राखेसाठी स्फोटाचा प्लॅन आखला होता. विशेष म्हणजे ज्या भागात स्फोट घडवून आणला, त्या परिसराजवळच विद्युत केंद्र आहे. त्यामुळे मोठा विध्वंस होण्याचा धोका होता. अखेर स्फोट होण्याआधीच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने मोठा अनर्थ टळला. बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राला अवैध राख माफियांचे ग्रहण लागले आहे. त्यातूनच परळीच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात स्फोटासाठी लागणा-या जिलेटिनच्या कांड्या, तोटे आणि बॅटरी असे साहित्य जप्त केले. त्यानंतर परळीतील नागरिकांनी मोठी भीती व्यक्त केली असून, अगोदर राखेने श्वास गुदमरत होता. आता भीतीने गुदमरत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सुरक्षा रक्षकामुळे स्फोटाचा कट उधळला बीडच्या परळीतील औष्णिक विद्युत केंद्र असणा-या थर्मलच्या परिसरात राख साठविण्यासाठी स्फोटाचा कट आखण्यात आला होता. हा कट सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे परळी ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. यावेळी पोलिसांनी तात्काळ अ‍ॅक्शन घेत थर्मल परिसरात राखेचे काम करणा-या ३ कामगारांना अगोदर ताब्यात घेतले. १०३ कांड्यांसह अन्य साहित्य जप्त आरोपींकडे १०३ जिलेटीनच्या कांड्या, १५० तोटे, ३ बॅटरी आणि वायर मिळाली आहे. दरम्यान पकडलेल्या ३ आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे परळी परिसरात खळबळ उडाली आहे. अवैध राख वाहतूक थांबवावी राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या परळी शहरात राख माफियांमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या अगोदर असुरक्षित राखेच्या वाहतुकीमुळे अपघात होवून अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत, तर अनेकांना कायमस्वरूपीचे श्वसनाचे आणि डोळ््याचे आजार जडले आहेत. इथले नागरिक राखेची समस्या सोडवा, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. Read the full article
0 notes
marathibatmi11 · 2 years ago
Text
बॉयकॉटवरून अनुराग कश्यप म्हणाला की , ' तुम्ही आधी तरी कुठे .. ? '
बॉयकॉटवरून अनुराग कश्यप म्हणाला की , ‘ तुम्ही आधी तरी कुठे .. ? ‘
बॉलिवूडवर सध्या संक्रांत सुरू असून नवीन चित्रपट रिलीज होण्याआधीच करण्याच्या बॉयकॉट करण्याच्या धमक्या देण्यात येतात त्यामुळे अनेक चित्रपट चित्रपट ��ृहामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याबद्दल नकारात्मकता तयार होत आहे.अशा पार्श्वभूमीवर चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप यांनी वक्तव्य केले असून इंडिया टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत ‘ बॉयकॉट संस्कृती ही सोशल मीडियाची संस्कृती आहे ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ जुलै २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात समारंभपूर्वक निरोप.
·      केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश.
·      न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण होण्याची आवश्यकता न्यायमूर्ती अभय ओक यांच्याकडून व्यक्त.
आणि
·      ‘एक स्टेशन एक उत्पादन’ अंतर्गत हिंगोली रेल्वे स्थानकावर विक्री केंद्राला प्रारंभ.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार या निरोप समारंभाला उपस्थित होते. लोकसभाध्यक्ष बिर्ला यांनी कोविंद यांच्या एकूण कार्यकाळाचा आढावा घेत, त्यांच्या कार्यातून तसंच विचारातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करत, कोविंद यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्मृतिचिन्ह तसंच खासदारांच्या स्वाक्षरी असलेली एक पुस्तिका यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना भेट देण्यात आली.
या वेळी बोलताना राष्ट्रपती कोविंद यांनी, कोविड काळात देशानं केलेल्या कार्याचा उल्लेख करत, सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल समाधान व्यक्त केलं. केंद्र सरकारसह सर्वच घटकांनी केलेल्या सहकार्याचा राष्ट्रपती कोविंद यांनी कृतज्ञतापूर्व उल्लेख केला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या रविवारी संध्याकाळी सात वाजता देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन प्रसारित केलं जाणार आहे. नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा शपथविधी समारंभ येत्या सोमवारी होणार आहे.
****
महान देशभक्त लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना अभिवादन केलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही आ�� लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या गिरगाव चौपाटी इथल्या टिळकांच्या स्मृती स्थळावर, त्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपालांनी टिळकांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. तसंच स्मृतीस्थळ परिसरात वृक्षारोपण केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं आद्य स्मरण हे आपलं कर्तव्य आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी टिळक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकमान्य टिळक यांच्या जयंतिनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे.
****
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरूद्ध केलेल्या आंदोलनादरम्यान रेल्वेच्या २५९ कोटी रूपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं. आंदोलनावेळी रेल्वेच्या सेवांमध्ये बाधा आल्यामुळं गेल्या जून महिन्यात रद्द झालेल्या प्रवासी रेल्वेगाड्यांच्या तिकिटांचे एकशे तीन कोटी रूपये परत केले असल्याचं मंत्र्यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यसमितीची आज पनवेल इथं बैठक होत आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. या सरकारनं तीस दिवस पूर्ण होण्याआधीच इंधन दर कपात, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन, औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांचं संभाजीनगर तसंच धाराशीव असं नामांतर, आदी निर्णया���द्दल सरकारचं अभिनंदन या बैठकीत करण्यात आलं.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३४ लाख ९३ हजार २०९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ६८ लाख १४ हजार ७७१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आयोगाकडे केली होती, त्या पार्शवभूमीवर आयोगानं या दोन्ही गटाला पुरावे सादर करण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.
****
न्यायालयीन कामकाजाचं थेट प्रसारण होण्याची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या विधीज्ञ संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त औरंगाबाद इथं आज विधिज्ञ परिषद घेण्यात आली. या परिषदेत ‘न्याय व्यवस्थेतील तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर न्यायमूर्ती ओक बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्यायालयात काय चालतं हे कळण्याचा अधिकार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी यावेळी केलेल्या भाषणात, जलद गतीने न्यायदानासाठी न्यायाधीशांची संख्या वाढण्याची आवश्यकता व्यक्त केली, सध्या दहा लाख लोकांमागे वीस न्यायाधीश असून ही संख्या वाढली पाहिजे. कॉलेजियम पद्धतीने नावं पाठवूनही वर्ष वर्षभर न्यायाधीशांच्या नियुक्ती होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
स्थानिक उत्पादकांना रेल्वे स्थानकावर आपली उत्पादने विक्री करता यावीत यासाठी केंद्र सरकारने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ‘एक स्टेशन एक उत्पादन’उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान - उमेद आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या वतीनं हिंगोली रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर –
हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या  खाद्यपदार्थां सोबतच हस्तकला, खेळण्याच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, विणकाम, लाकडी खेळणी, जात्यावर बनवलेली घरगुती हळद, मिरची पावडर, मसाले, शेवया, तीळ लाडू सारखे पदार्थ आता रेल्वे स्थानकावर विक्री करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
रमेश कदम, पिटीसी, हिंगोली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
iPhone 14 : आयफोन १४ लॉन्च होण्याआधीच फीचर्स झाले लीक, पाहा काय आहेत फोनची वैशिष्ट्ये
iPhone 14 : आयफोन १४ लॉन्च होण्याआधीच फीचर्स झाले लीक, पाहा काय आहेत फोनची वैशिष्ट्ये
iPhone 14 : आयफोन १४ लॉन्च होण्याआधीच फीचर्स झाले लीक, पाहा काय आहेत फोनची वैशिष्ट्ये Apple ७ सप्टेंबर रोजी आपला iPhone 14 लाइनअप लॉन्च करणार आहे आणि त्यापूर्वी नवीन उपकरणांचे काही फीचर्स समोर आले आहेत. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी व्यतिरिक्त, आयफोन १४ मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध होऊ शकतो. Apple ७ सप्टेंबर रोजी आपला iPhone 14 लाइनअप लॉन्च करणार आहे आणि त्यापूर्वी नवीन उपकरणांचे काही…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
बॉयकॉटवरून अनुराग कश्यप म्हणाला की , ' तुम्ही आधी तरी कुठे .. ? '
बॉयकॉटवरून अनुराग कश्यप म्हणाला की , ‘ तुम्ही आधी तरी कुठे .. ? ‘
बॉलिवूडवर सध्या संक्रांत सुरू असून नवीन चित्रपट रिलीज होण्याआधीच करण्याच्या बॉयकॉट करण्याच्या धमक्या देण्यात येतात त्यामुळे अनेक चित्रपट चित्रपट गृहामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याबद्दल नकारात्मकता तयार होत आहे.अशा पार्श्वभूमीवर चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप यांनी वक्तव्य केले असून इंडिया टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत ‘ बॉयकॉट संस्कृती ही सोशल मीडियाची संस्कृती आहे ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago
Text
बॉयकॉटवरून अनुराग कश्यप म्हणाला की , ' तुम्ही आधी तरी कुठे .. ? '
बॉयकॉटवरून अनुराग कश्यप म्हणाला की , ‘ तुम्ही आ��ी तरी कुठे .. ? ‘
बॉलिवूडवर सध्या संक्रांत सुरू असून नवीन चित्रपट रिलीज होण्याआधीच करण्याच्या बॉयकॉट करण्याच्या धमक्या देण्यात येतात त्यामुळे अनेक चित्रपट चित्रपट गृहामध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याबद्दल नकारात्मकता तयार होत आहे.अशा पार्श्वभूमीवर चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप यांनी वक्तव्य केले असून इंडिया टीव्ही ला दिलेल्या मुलाखतीत ‘ बॉयकॉट संस्कृती ही सोशल मीडियाची संस्कृती आहे ‘ असे म्हटले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago