Tumgik
#हटवल्यानंतर
airnews-arngbad · 9 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं. 
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा  प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल  इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
nashikfast · 2 years
Text
प्रतापगडावर  शिवप्रताप दिन  उत्साहात 
सातारा :   छत्रपती शिवाजी महाराजांच्या युक्ती आणि शौर्याचे प्रतीक म्हणून ओळख असलेला 363 वा शिवप्रताप दिन किल्ले प्रतापगडावर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बुधवारी साजरा झाला. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटवल्यानंतर हा शिवप्रताप दिन मोठ्या आनंदात आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये प्रथमच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गरज संपल्यानंतर…”
भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गरज संपल्यानंतर…”
भाजपाच्या संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “गरज संपल्यानंतर…” नितीन गडकरींना भाजपाच्या संसदीय मंडळात स्थान न दिल्यामुळे विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. भाजपाकडून केंद्रीय संसदीय मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. संसदीय मंडळामधून नितीन गडकरी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. नितीन गडकरींना भाजपाच्या संसदीय मंडळात स्थान न दिल्यावर राजकीय…
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाचा हटवलेला "तो" बॅनर पुन्हा लावला
उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधाचा हटवलेला “तो” बॅनर पुन्हा लावला
नगरपंचायत कडे बॅनर ची “फी” भरून बॅनर नियमानुकुल, सिंधुदुर्गात उदय सामंत समर्थक शिवसैनिकांकडून आक्रमक भूमिका कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणारा लावलेला बॅनर नगरपंचायत ने हटवल्यानंतर या संदर्भात रीतसर नगरपंचायत कडे फी भरल्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा बॅनर लावण्यात आला. कणकवली शहरात लावलेल्या या बॅनर मुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कलम 370 हटवल्यापासून एकही काश्मिरी पंडित खोरे सोडला नाही, असे सरकारने संसदेला सांगितले
कलम 370 हटवल्यापासून एकही काश्मिरी पंडित खोरे सोडला नाही, असे सरकारने संसदेला सांगितले
20 जून रोजी, काश्मिरी पंडित श्रीनगरपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या बडगाममध्ये आंदोलन करत आहेत. (फाइल) दिल्ली: कलम 370 हटवल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा गमावल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 पासून कोणत्याही काश्मिरी पंडिताने खोऱ्यातून स्थलांतर केलेले नाही — असे केंद्र सरकारने आज संसदेत सांगितले. हल्ल्यांची मालिका गेल्या काही महिन्यांपासून केंद्रशासित प्रदेशातील हिंदू आणि शीख अल्पसंख्याक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
गेल्यावेळेपेक्षा मोठं सीमोल्लंघन होणार - पंकजा मुंडे
गेल्यावेळेपेक्षा मोठं सीमोल्लंघन होणार – पंकजा मुंडे
[ad_1]
बीड : 2014 मध्ये सुद्धा अमित भाई शाह इथे आले होते, त्यानंतर सीमोल्लंघन झालं,  आता यावेळी त्यापेक्षा सुद्धा मोठं सीमोल्लंघन होणार असा विश्वास भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. आज दसऱ्यानिेमित्त सावरगड येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. अनुच्छेद 370 हटवल्यानंतर पंकजा यांनी त्यांचे अभिनंदन केले. माझ्या भागातील लोकांना कोयता उचलायला लागू नये म्हणून आमचं प्रयत्न सुरु असल्याचे त्या…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
‘अब की बार उस पार’ गिरीराज सिंह यांनी केले पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचे विधान
‘अब की बार उस पार’ गिरीराज सिंह यांनी केले पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचे विधान
जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर आता ‘अब की बार उस पार’, असे म्हणत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचे विधान एका ट्विटमध्ये केले आहे.
यावर गिरीराज सिंग यांच्यावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. तुम्हाला सीमेपलिकडे जाण्यासाठी कोणी थांबवले आहे? असा सवाल काँग्रेस आणि राजदने केला आहे. केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी गिरीराज सिंग…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने तिसऱ्या कार्यकाळातले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात पायाभूत सुविधा, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला तसंच युवावर्गावर लक्ष केंद्रीत करत, सरकारने १५ लाख कोटी रुपयांच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. दळणवळणाच्या सोयीसुविधा तसंच विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांना मंजुरी देण्यासोबतच देशभरात पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय वृद्धी दिसून आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. कालपासून सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाड्यामध्ये देशभरात वृक्षारोपण अभियान वेगाने सुरु असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरु आहे. या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत २६ पूर्णांक ७२ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. यापैकी आठ जागा जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये आहेत आणि १६ जागा काश्मीर खोऱ्यातील ४ जिल्ह्यांमध्ये आहेत. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रशासित प्रदेशात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर काल सर्वत्र गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यभरात काल विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या, मुंबईच्या लालबाग गणपतीचं आज सकाळी विसर्जन झालं, पुणे आणि मुंबईतील मिरवणुका आज सकाळपर्यंत सुरु होत्या.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघं जण पूर्णा नदीमध्ये वाहून गेले. तिघांपैकी एकाचा मृतदेह आज सकाळी बचाव पथकाला सापडला असून अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
****
मुंबईत आज एका रुग्णालयात झालेल्या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. समीर खान असं जखमीचं नाव असून, रुग्णालयात नियमित तपासणी करून परतल्यावर ते आपल्या वाहनात बसण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरू केली. यामुळे समीर खान हे बऱ्याच दूरपर्यंत कारसोबत ओढले गेले. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर तसंच डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या कारने परिसरातल्या इतर अनेक वाहनांना धडका दिल्यानं, त्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, समीर खान यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई आहेत.
****
0 notes
nashikfast · 2 years
Text
दिवाळीच्या लज्जतदार फराळाला महागाईचा तडका !
दिवाळीच्या लज्जतदार फराळाला महागाईचा तडका !
*आचारींकडून फराळ बनवून घेण्याकडे गृहिणींचा कल* मालेगाव – अमोल अहिरे – कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर सर्वच सण-उत्सव धूमधडाक्यात साजरे होत असतांना सर्वात मोठ्या दिवाळ सणाच्या उत्साहावर महागाईने वक्रदृष्टी टाकली आहे. विशेषतः खुसखुशीत, चमचमीत, खमंग फराळाला महागाईचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपलेली असतानाही विशेषतः ग्रामीण भागातील गृहिणींचा आचारींकडून फराळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Vasant More : मनसेच्या शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे या पक्षाच्या वाटेवर?
Vasant More : मनसेच्या शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे या पक्षाच्या वाटेवर?
Vasant More : मनसेच्या शहराध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरे या पक्षाच्या वाटेवर? MNS नेते वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. MNS नेते वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी राज्यसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांमध्ये काश्मिरच्या खोऱ्यात अल्पसंख्यांक समाजातील ३४ जणांचा मृत्यू झालाय. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली. ५ ऑगस्ट २०१९ पासून या वर्षाच्या मार्च जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून चार काश्मिरी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नितीन गडकरींचा पुन्हा भाजपला घरचा आहेर, संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर पहिल्यांदाच बोलले
नितीन गडकरींचा पुन्हा भाजपला घरचा आहेर, संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर पहिल्यांदाच बोलले
नितीन गडकरींचा पुन्हा भाजपला घरचा आहेर, संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर पहिल्यांदाच बोलले Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान
“…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान
“…तर त्यांचा फोटो पुन्हा लावू” उद्धव ठाकरेंचा फोटो कार्यालयातून हटवल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं विधान औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यालयातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. बंडखोर आमदारांनी सुरुवातीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १९ जुलै २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या दुसऱ्या दिवशी सामूहिक विनाशकारी शस्त्रं आणि त्यांचं आदानप्रदान (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध) सुधारणा विधेयक २०२२ राज्यसभेसमोर मांडलं जाणायची शक्यता आहे. तर लोकसभेत भारतीय अंटार्क्टिक विधेयक २०२२ वर चर्चा होणार आहे.
****
प्रधानमंत्री केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेअंतर्गत देशातल्या केंद्रीय विद्यालयांत २२० मुलांना प्रवेश दिला आहे. ही योजना कोरोना महामारीदरम्यान पालक गमावलेल्या मुलांची सर्वसमावेशक काळजी घेते आणि त्यांना सुरक्षा पुरवते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या नवनिर्वाचीत नऊ न्यायाधीशांना आज शपथ देण्यात आली. औरंगाबाद खंडपीठातले विधिज्ञ किशोर संत, वाल्मिकी एस ए मेनेझेस, कमल खाटा, शर्मिला देशमुख, अरुण पेडणेकर, संदीप मारने, गौरी गोडसे, राजेश पाटील आणि आरिफ सालेह यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
****
केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर परिस्थितीत आमूलाग्र आणि सकारात्मक बदल होत असल्याची माहिती, जम्मू-कश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी दिली. ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत्त होते. राज्यात दगडफेक आणि खुलेआम बंदुका घेऊन फिरत हत्या करण्याचे प्रकार तब्बल ७० वर्षांनंतर बंद झाले आहेत. तसंच लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीविना निवडणुका पार पडणार असून, खऱ्या अर्थानं लोकशाही स्थापन होईल, असा विश्वास कविंदर यांनी व्यक्त केला.
****
केरळमध्ये काल मंकीपॉक्सचा आणखी एक रुग्ण आढळून आला. ३१ वर्षाचा हा रुग्ण १३ मे रोजी दुबईहुन भारतात आला आहे. देशात मंकी पॉक्सच्या रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे.
****
जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातल्या सुकी नदीपात्रात काल सायंकाळी  अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सुकी धरणाचा जलप्रवाहाच्या विळख्यात हे पर्यटक अडकले होते. जिल्हा प्रशासन आणि धुळे इथल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीनं हे बचाव कार्य राबवलं.
//*********//
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक; उद्धव ठाकरेंनाच 'ओपन चॅलेंज'
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक; उद्धव ठाकरेंनाच ‘ओपन चॅलेंज’
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक; उद्धव ठाकरेंनाच ‘ओपन चॅलेंज’ Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईनंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आक्रमक झाला असून उद्धव यांच्या निर्णयालाच आव्हान दिलं आहे. Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईनंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आक्रमक झाला असून उद्धव यांच्या निर्णयालाच…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
जिनेव्हात आजपासून जागतिक व्यापार संघटनेच्या १२व्या मंत्रिस्तरीय परिषदेला प्रारंभ होत आहे. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लस, अन्नधान्य सुरक्षा आणि मासेमारीसह अन्य महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. जागतिक व्यापार संघटनेकडून जागतिक स्तरावर व्यापार वाढावा याकरीता उपाययोजना करण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आणला होता. मात्र गत चार वर्षात कोविड आणि अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे यात मोठे बदल झाले आहेत. विविध देशांतील व्यापार संबंधीचे वादविवाद सोडवण्या संबंधीचे नियम आणि कायदे अधिक कडक करणे तसंच त्यात आवश्यक बदल करण्याबाबतही परिषदेत चर्चा होऊ शकते.
****
केंद्र सरकारला शांततामय आणि विकसित जम्मू काश्मीर हवं असून, सर्वच आघाड्यांवर जम्मू काश्मीरचा सर्वांगीण विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असं, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. जम्मूच्या संमेलन केंद्रात ते वार्ताहरांशी बोलत होते.
२०१९ साली केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर, या भागात विकासाचे मार्ग खुले झाले आहेत. आता इथं प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी १०० टक्के प्रभावीपणे सुरु झाली आहे. सरकारला या ठिकाणी सामाजिक स्थैर्य निर्माण करायचं आहे असं आठवले म्हणाले.
****
नॉर्वेत सुरु असलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या ग्रॅण्ड मास्टर प्रज्ञानानंद यानं अ गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यानं ९ फेऱ्यांमध्ये साडे सात गुण मिळवले. भारताचा अन्य आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू मास्टर व्ही प्रणीतला त्यानं पराभूत केलं. इस्त्राईलचा मास्टर मार्सेल एफ्रोईम्स्की आणि स्वीडनचा जंग मिन सेओ या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी प्रज्ञानानंद याचं या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. चेन्नईच्या या बुद्धीबळपटूनं जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ला २ वेळा पराभूत करत आणि आता नॉर्वे मध्ये विश्वविजेतेपद मिळवत देशाला गौरवित केलं असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
७५ मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील खरीप पूर्व आढावा बैठक कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादमध्ये पार पडली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काही ठिकाणी पेरणीला सुद्धा सुरवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादन क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पिकाची उत्पादकता वाढावी यासाठी राज्य सरकारनं हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती, धीरज कुमार यांनी दिली.
****
नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणात दिल्लीतल्या तिहार कारागृहातून ताब्यात घेतलेल्या दोघा जणांना न्यायालयानं १५ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे दोघे मध्य प्रदेशातल्या उज्जैनचे रहिवासी आहेत. आता संजय बियाणी हत्या प्रकरणात आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता ९ कोटी ३३ लाख रुपयांच्या नांदुरी पाणीपुरवठा योजनेचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल भूमीपूजन करण्यात आलं. या गडावर सरासरी ७५ हजार भाविक दररोज येतात तसंच सण आणि उत्सव यांचा विचार करून गडावर मुबलक पाणीपुरवठा होईल अशा प्रकारची योजना राबवण्यात येत असल्याचं मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं. गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही पाटील यावेळी म्हणाले.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख ४ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९५ कोटी ७ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
0 notes