Tumgik
#कलम ३७०
airnews-arngbad · 9 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या.स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदुर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदुर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे पैसेही दिले.
****
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानात सर्व वयोगटातल्या नागरिकांनी मतदान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ते आज श्रीनगर इथं दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठीच्या प्रचार सभेत बोलत होते. पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी ५९ टक्के मतदान झाल्याने ३५ वर्षांतील सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे, या मतदानाने राज्यातील नागरिकांनी इतिहास रचल्याचंही मोदी यांनी नमुद केलं. 
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तिथं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज रोहतकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जाहीरनामा प्रकाशित केला . हा जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी यापूर्वी एक समिती नेमण्यात आली, या समितीनं सामान्य लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे.
****
बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. प्रशासनाच्या वतीनं विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाणाकडे रवाना झाले आहेत.
****
महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणारा सौर ऊर्जा  प्रकल्प अन्य राज्यात गेला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. समाज माध्यमावरील आपल्या संदेशात त्यांनी नागपुरात येणारा १८ हजार कोटीं रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याचं नमुद केलं आहे. महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे, अशी टिका वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
यवतमाळ-चिखलदरा मार्गावर मेळघाटच्या वळण रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसने पेट घेताच ती थांबवून आधी प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्यांवर गेला आहे. धरणात सध्या सुमारे ६३१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून ६५० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
राज्यात आज तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
****
भारत-बांग्लादेश क्रिकेट संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना चेन्नईतल्या चिदंबरम् स्टेडीयमवर सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सहा धावांवर तर शुभमन गिल शुन्य धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार गडी बाद ११६ धावा झाल्या आहेत.
****
चीन आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेचं पाचव्यांदा जेतेपद मिळवून भारतीय संघ आज मायदेशी परतला.यजमान चीनचा अंतिम फेरीत पराभव करून भारतानं हा चषक पटकावला. गेल्या वर्षी भारतीय संघानं अंतिम फेरीत मलेशियाचा पराभव करून विजय मिळवला होता.
****
चीन खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्यपदक विजेत्या ग्रेगोरिया तुंजूंग वर मात केली. तिनं २६-२४, २१-१९ अशा सरळ सेटमधे ग्रेगोरियाला पराभूत केलं.
काल  इतर सामन्यांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. एकेरीत आकर्षी कश्यप, समीया इमाद फारुखी तर दुहेरीत त्रिसा ज्यॉली आणि गायत्री गोपीचंद तसंच मिश्र दुहेरीत एन सिक्कीरेड्डी आणि बी सुमीत रेड्डी पराभूत झाले.
****s
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कलम 370 हटवल्यापासून एकही काश्मिरी पंडित खोरे सोडला नाही, असे सरकारने संसदेला सांगितले
कलम 370 हटवल्यापासून एकही काश्मिरी पंडित खोरे सोडला नाही, असे सरकारने संसदेला सांगितले
20 जून रोजी, काश्मिरी पंडित श्रीनगरपासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या बडगाममध्ये आंदोलन करत आहेत. (फाइल) दिल्ली: कलम 370 हटवल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा गमावल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 पासून कोणत्याही काश्मिरी पंडिताने खोऱ्यातून स्थलांतर केलेले नाही — असे केंद्र सरकारने आज संसदेत सांगितले. हल्ल्यांची मालिका गेल्या काही महिन्यांपासून केंद्रशासित प्रदेशातील हिंदू आणि शीख अल्पसंख्याक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
काश्मिरी पंडितांवरील हल्ला मोदी सरकारचे अपयश, असदुद्दीन ओवैसी यांची टीका, कलम ३७० हटवण्यावरूनही साधला निशाणा
काश्मिरी पंडितांवरील हल्ला मोदी सरकारचे अपयश, असदुद्दीन ओवैसी यांची टीका, कलम ३७० हटवण्यावरूनही साधला निशाणा
काश्मिरी पंडितांवरील हल्ला मोदी सरकारचे अपयश, असदुद्दीन ओवैसी यांची टीका, कलम ३७० हटवण्यावरूनही साधला निशाणा हिंसाचाराच्या भीतीने काश्मिरी पंडित खोऱ्यातून स्थलांतर करत असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला आहे काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आल्यानंतर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे हे आणखी एक उदाहरण…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Photo
Tumblr media
पाकिस्तानचे तोंड काळेच झाले, अजून किती धोंडे पाडून घेणार? – शिवसेना काश्मीरला विशेष अधिकार देणारे 370 कलम रद्द करण्यात आले पाकिस्तानचा तिळपापड झाला. यानंतर काश्मीर प्रश्नात लक्ष घालण्याचा अधिकारच नसल्याचं सांगितल्यानं संयुक्त राष्ट्रांनी चीन आणि पाकिस्तानला तोंडघशी पाडलं आहे.
0 notes
Text
कश्मीर - राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क!
कश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क!
तुषार उज्वला अविनाश पठाडे
स्वातंत्र्य ही मानवाची उपजत प्रेरणा आहे. एखाद्या व्यक्तीचे किंवा समूहाचे स्वातंत्र्य तुम्ही मर्यादित काळापर्यंत दमन करू शकता पण एकदा का अवकाश मिळाला की दबलेला व्यक्ती आणि समूह बंधनं झुगारून देऊन विद्रोह करायला लागतात. परकीय सत्तेकडून अधिकार स्वकियांकडे येणे एवढा मर्यादित अर्थ स्वातंत्र्यात अभिप्रेत नाही तर स्वकीय सार्वभौम सत्ता असतांनाही काही मूलभूत अधिकार असणं…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
सरदार पटेलांच्या निजामावरील पोलिस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सरदार पटेलांच्या निजामावरील पोलिस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची काश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि १८ : काश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त काल हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी मधून आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years

rahulmarathiblog · 2 years
Text
काश्मीरमध्ये पुन्हा रक्तपात , आधी नाव विचारले अन नाव ऐकताच ..
काश्मीरमध्ये पुन्हा रक्तपात , आधी नाव विचारले अन नाव ऐकताच ..
काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकले आणि नोटबंदी केली म्हणजे दहशतवाद संपेल असे दावे हे निर्णय घेण्याच्या वेळी करण्यात आले होते मात्र त्याचा कुठलाही परिणाम दिसून आलेला नसून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीर पंडित यांच्या हत्येनंतर खळबळ उडालेली आहे. शोपीयान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन भावांवर सफरचंदाच्या बागेत जोरदार गोळीबार केला त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालेला आहे. सुनीलकुमार भट्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

airnews-arngbad · 10 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने तिसऱ्या कार्यकाळातले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात पायाभूत सुविधा, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला तसंच युवावर्गावर लक्ष केंद्रीत करत, सरकारने १५ लाख कोटी रुपयांच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. दळणवळणाच्या सोयीसुविधा तसंच विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांना मंजुरी देण्यासोबतच देशभरात पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय वृद्धी दिसून आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. कालपासून सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाड्यामध्ये देशभरात वृक्षारोपण अभियान वेगाने सुरु असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरु आहे. या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत २६ पूर्णांक ७२ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. यापैकी आठ जागा जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये आहेत आणि १६ जागा काश्मीर खोऱ्यातील ४ जिल्ह्यांमध्ये आहेत. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रशासित प्रदेशात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर काल सर्वत्र गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यभरात काल विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या, मुंबईच्या लालबाग गणपतीचं आज सकाळी विसर्जन झालं, पुणे आणि मुंबईतील मिरवणुका आज सकाळपर्यंत सुरु होत्या.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघं जण पूर्णा नदीमध्ये वाहून गेले. तिघांपैकी एकाचा मृतदेह आज सकाळी बचाव पथकाला सापडला असून अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
****
मुंबईत आज एका रुग्णालयात झालेल्या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. समीर खान असं जखमीचं नाव असून, रुग्णालयात नियमित तपासणी करून परतल्यावर ते आपल्या वाहनात बसण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरू केली. यामुळे समीर खान हे बऱ्याच दूरपर्यंत कारसोबत ओढले गेले. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर तसंच डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या कारने परिसरातल्या इतर अनेक वाहनांना धडका दिल्यानं, त्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, समीर खान यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती
कलम ३७० हटवल्यानंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती
कलम ३७० हटवल्या���ंतर किती काश्मिरी पंडितांची हत्या झाली?; गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी राज्यसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षांमध्ये काश्मिरच्या खोऱ्यात अल्पसंख्यांक समाजातील ३४ जणांचा मृत्यू झालाय. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली. ५ ऑगस्ट २०१९ पासून या वर्षाच्या मार्च जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांकडून चार काश्मिरी…
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
काश्मीरमध्ये पुन्हा रक्तपात , आधी नाव विचारले अन नाव ऐकताच ..
काश्मीरमध्ये पुन्हा रक्तपात , आधी नाव विचारले अन नाव ऐकताच ..
काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकले आणि नोटबंदी केली म्हणजे दहशतवाद संपेल असे दावे हे निर्णय घेण्याच्या वेळी करण्यात आले होते मात्र त्याचा कुठलाही परिणाम दिसून आलेला नसून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीर पंडित यांच्या हत्येनंतर खळबळ उडालेली आहे. शोपीयान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन भावांवर सफरचंदाच्या बागेत जोरदार गोळीबार केला त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालेला आहे. सुनीलकुमार भट्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
कलम ३७० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कलम ३७० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
‘कलम ३७० आणि डॉ. आंबेडकर’ या नावाखाली काही मेसेज वजा छोटेखानी लेख व्हाट्सएप इत्यादी माध्यमातून फिरविले जात आहेत. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला ते लेख इतिहासाची मोडतोड करणारे वाटतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा आणि लिखाणाचा बऱ्याचवेळा लोकांमध्ये गैरसमज निर्माण व्हावेत अशा पध्दतीने वापर केला जातो. असे अनेक मुद्दे आहेत त्यावर कधीतरी क्रमाक्रमाने चर्चा करता येईल.
काल…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
काश्मीरमध्ये पुन्हा रक्तपात , आधी नाव विचारले अन नाव ऐकताच ..
काश्मीरमध्ये पुन्हा रक्तपात , आधी नाव विचारले अन नाव ऐकताच ..
काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकले आणि नोटबंदी केली म्हणजे दहशतवाद संपेल असे दावे हे निर्णय घेण्याच्या वेळी करण्यात आले होते मात्र त्याचा कुठलाही परिणाम दिसून आलेला नसून काश्मीरमध्ये पुन्हा एकदा काश्मीर पंडित यांच्या हत्येनंतर खळबळ उडालेली आहे. शोपीयान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन भावांवर सफरचंदाच्या बागेत जोरदार गोळीबार केला त्यात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झालेला आहे. सुनीलकुमार भट्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathipeople111 · 2 years