Tumgik
#नेतेपदावरून
Text
विरोधीपक्ष नेतेपदावरून मुक्त करा; पक्षाच्या बांधणीनुसार अजितदादांचा ‘या’ पदावर दावा
https://bharatlive.news/?p=106671&wpwautoposter=1687397755 विरोधीपक्ष नेतेपदावरून मुक्त करा; पक्षाच्या बांधणीनुसार अजितदादांचा ...
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी
एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ सुरू आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांचा पाठिंबा घेऊन भाजपसोबत पुढे जाण्याचा विचार केला. भाजपने एकनाथ शिंदे आणि या 50 आमदारांना आपले समर्थन दिले. यानंतर काल एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची; तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. असे असले तरी यानंतरची शिवसेनेची प्रतिक्रिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
·      औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने ठराव करावा लागणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·      एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट; शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी
·      राज्य विधानसभेचं विशेष अधिवेशन आता ३ आणि ४ जुलैला, तर १८ जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन
·      राज्यात कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार २४९ रुग्ण;मराठवाड्यात ७७ नव्या रुग्णांची नोंद
आणि
·      इंग्लंडविरुद्ध पाचव्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऋषभ पंतच्या शतकी खेळीमुळे पहिल्या दिवसअखेर भारताच्या सात बाद ३३८ धावा
****
महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल गोव्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि इतर अपक्षांची भेट घेतल्यानंतर मुंबईकडे निघण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातली सिंचनाखालची जमीन वाढवण्याचा आणि प्रलंबित विकासकामं जलदगतीनं पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यात जलयुक्त शिवार, मेट्रो प्रकल्प यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांच्या फायद्यासाठी काळजीपूर्वक तपासणी करुन मेट्रोचं कारशेड आरेमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आरेमधे मेट्रोच�� कारशेड उभारताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, आणि जनतेचं हित साधलं जाईल, याकडे सरकार लक्ष देईल, असं ते म्हणाले.
****
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार याची दक्षता घेण्याची सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक काल झाली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावं म्हणजे यंत्रणेतले सर्व लोक देखील सतर्क राहतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले.  
****
औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांच्या नामांतराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत नव्याने ठराव करावा लागणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. बहुमत चाचणीची सूचना असताना मंत्रिमंडळाची बैठक घेऊन असा ठराव करणं चुकीचं आहे, त्यामुळे हा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा मंजूर करावा लागणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, नामांतराचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराविरोधी कृती समितीचे अध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी घेतली आहे. काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषद घेत नामांतराच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवला.
****
निवडणूक आयोगानं राईट टू रिकॉल म्हणजे मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची व्यवस्था लागू करण्याची वेळ आलेली आहे, असं शिवसेना पक्षाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत शिवसेना भवनात पत्रकारांशी ते बोलत होते. आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींबाबत मतदार समाधानी नसतील तर त्यांना परत बोलावण्याची संधी मतदारांकडे असली पाहिजे, असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. मेट्रो कारशेड आरेच्या जंगलात उभारण्याचा निर्णय नव्या सरकारनं रेटू नये, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. नव्या सरकारचं अभिनंदन करत, या सरकारकडून जनतेचं भलं व्हावं, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचं शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने नव्याने दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी या आमदारांना कारवाईची नोटीस बजावली आहे, त्यावर निर्णय होईपर्यंत या सर्वांना निलंबित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती. न्यायालयानं यापूर्वी अशाच याचिकेवर घेतलेल्या सुनावणीत सर्व आमदारांना नोटीसचं उत्तर देण्यास ११ जुलैपर्यंत मुदत देत, १२ जुलैपर्यंत कारवाईपासून संरक्षण दिलं आहे.
****
राज्य विधानसभेच्या अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून आता आज आणि उद्याऐवजी आता उद्या आणि परवा हे दोन दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सदस्यांना आज ‍शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येईल. रविवारी पहिल्या दिवशी सभागृहात अध्यक्षाची निवड केली जाईल.
दरम्यान, विधानसभाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांचा अर्ज काल दाखल करण्यात आला. भाजपाकडे १२० आणि आमच्याकडे ५० आमदारांचं पाठबळ आहे, त्यामुळं १७० आमदारांच्या बळावर सरकार बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन या महिन्याच्या अठरा तारखेला सुरू होऊन ऑगस्ट महिन्याच्या बारा तारखेपर्यंत चालणार आहे. या सत्रात एकूण अठरा बैठका होणार असल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली आहे. यात अठरा जुलैला राष्ट्रपती निवडणूक तर सहा ऑगस्टला उपराष्ट्रपती निवडणूक होईल. नवनिर्वाचित राष्ट्रपतींचा शपथविधी पंचवीस जुलैला तर नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींचा शपथविधी अकरा ऑगस्टला होईल.
****
करपद्धती आणि शेअर बाजार व्यवस्थेत सरकारनं केलेले बदल कालपासून लागू झाले. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारनं क्रिप्टोकरन्सीवर एक टक्का उत्पन्न स्त्रोत कर कपात अर्थात टीडीएस लावण्याची तरतूद केली आहे. याशिवाय क्रिप्टोकरन्सीवर तीस टक्के आयकरही लावण्यात आला आहे. पॅन कार्ड आधारपत्राशी जोडण्याचं शुल्कही आता दुप्पट, म्हणजे एक हजार रुपये करण्यात आलं आहे. डॉक्टर, तसंच सामाजिक माध्यमांवरून विक्रीला प्रोत्साहन देणाऱ्यांना एका आर्थिक वर्षात वीस हजार रुपयांहून जास्त नफा झाल्यास त्यावरही दहा टक्के टीडीएस लागेल. आजपासून कोणत्याही विना टॅग डीमॅट खात्यात प्रतिभूती जमा करण्याला परवानगी नसेल.
****
वस्तू आणि सेवा कराच्या उत्पन्नात स्थिरपणे वाढ होत असून, यावर्षीच्या जून महिन्यात या करातून मिळणाऱ्या उत्पन्नात छप्पन्न टक्के वाढ होऊन ते एक पूर्णांक चव्वेचाळीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलं आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतार��मन यांनी म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा कर दिवसाच्या पाचव्या वर्षाच्या समारंभात त्या काल नवी दिल्ली इथे बोलत होत्या.
*****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार २४९ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख ७९ हजार ३६३ झाली आहे. काल या संसर्गानं चार रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ९२९ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल चार हजार १८९ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख सात हजार ४३८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ८३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या २३ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ७७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद तसंच उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी २१, जालना १२, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी १०, तर बीड जिल्ह्यात काल तीन नवे रुग्ण आढळल्याची नोंद आहे.
****
राज्यातील १४ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असं आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आलं आहे. पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सुविधा असलेल्या तंत्रनिकेतनमध्ये हिंगोली, जालना, अंबड, लातूर, आणि नांदेड इथल्या शासकीय तंत्रनिकेतनचा समावेश आहे.
****
ओडिशातल्या जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध रथयात्रेला कालपासून प्रारंभ झाला. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या भावंडांचे रथ परंपरेनुसार काल गुंडिचा मंदिरात पोहोचले. अकरा दिवसानंतर ते पुन्हा स्वगृही परततील. देशविदेशातून भाविक मोठ्या संख्येनं या रथयात्रेत सहभागी झाले आहेत. औरंगाबाद इथंही सिडको परिसरात मोठ्या भक्तीभावाने जगन्नाथाचा रथोत्सव साजरा झाला.
****
आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन मिळावं, यासाठी आषाढ शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच येत्या पंधरा तारखेपर्यंत श्री विठ्ठल रखुमाईचं दर्शन चोवीस तास सुरू राहणार आहे. दररोज एक लाखांहून अधिक भाविकांना सुलभतेनं दर्शन व्हावं, यासाठी मंदिर समितीनं दर्शन रांगेची तसंच पावसापासून बचावासाठी शेड्सची उभारणी केली आहे.
****
आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्तानं जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. जालना-पंढरपूर-जालना ही गाडी जालना स्थानकावरून नऊ जुलैला संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी निघेल तर परतीच्या प्रवासासाठी ही गाडी दहा जुलैला रात्री साडे आठ वाजता पंढरपूरहून निघेल.
औरंगाबाद-पंढरपूर- औरंगाबाद ही गाडी औरंगाबाद स्थानकावरून नऊ जुलैला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी निघेल आणि परतीच्या प्रवासात ही गाडी दहा जुलैला पंढरपूरहून रात्री अकराला निघेल.
नांदेड-पंढरपूर-नांदेड ही गाडी नऊ जुलैला दुपारी तीन वाजता नांदेडहून निघेल तर परतीच्या प्रवासात ही गाडी दहा जुलैला रात्री साडेनऊला पंढरपूरहून निघेल.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या निर्णायक पाचव्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतानं दिवस अखेर ७ गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या. बर्मिंगहॅम इथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची सुरवात अडखळत झाली, मात्र ऋषभ पंतच्या शतकी खेळीमुळे भारतानं काल ३३८ धावांचा पल्ला गाठला, रवींद्र जडेजानंही त्याला साथ दिली. ऋषभ पंत १४६ धावांवर बाद झाला, दिवस अखेर खेळ संपला तेव्हा तर रवींद्र जडेजा ८३ धावांवर होता, तर मोहम्मद शमी नुकताच खेळपट्टीवर आला होता.
गेल्या वर्षी या मालिकेतले ४ कसोटी सामने झाल्यानंतर कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यामुळे पाचवा सामना स्थगित करण्यात आला होता. १० महिन्यांतर हा पाचवा सामना कालपासून सुरू झाला असून, या मालिकेत, भारत २-१ अशा फरकानं आघाडीवर आहे.
****
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिनाच्या स्वरूपात काल राज्यात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
उस्मानाबाद इथं प्रयोगशील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आंब्याचं रोप देऊन सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीनं कृषी उपयोगी साहित्य सेवा केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. या कृषी साहित्य सेवा केंद्रात शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी लागणारं साहित्य अल्प दरात उपलब्ध करून दिलं जाणार आहे, या केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन समितीनं केलं आहे.
नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी शेती उत्पादनात वाढ करावी, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. कृषी दिनाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या कार्यक्रमात काल त्या बोलत होत्या.
बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप, शेतीनिष्ठ शेतकरी यांचा सत्कार आणि जिल्ह्यात घेतलेल्या विविध स्पर्धाचे विजेते विद्यार्थी यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं.
शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान वापरून शेती आणि जोड व्यवसायात विविध प्रयोग करावेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी न होता, आर्थिक संपन्न होईल असं मत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं कृषीसंजीवनी सप्ताहाच्या समारोप सत्रात ते बोलत होते. औरंगाबाद जिल्हा सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगात देशात प्रथम क्रमांकावर असून जवळपास १९० शेतकरी उत्पादन कंपन्या जिल्ह्यात स्थापन झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
****
राज्यातल्या अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतल्या कुटुंबांच्या घरकुलांसाठीच्या रमाई आवास योजनेसाठी राज्याच्या समाज कल्याण आयुक्तालयानं २०२२-२३ या वर्षासाठीचा सुमारे सत्तर कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांना नुकताच वितरीत केला आहे. यात औरंगाबाद विभागाला साडेसोळा कोटी तर तर लातूर विभागाला साडेतेरा कोटी रुपये निधी मिळाला आहे. या योजनेतून तीन लाख रुपयांहून कमी वर्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांना तीनशे तेवीस चौरस फूट बांधकामासाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येतं.
****
0 notes
Text
विरोधीपक्ष नेतेपदावरून मुक्त करा; पक्षाच्या बांधणीनुसार अजितदादांचा ‘या’ पदावर दावा
https://bharatlive.news/?p=106671 विरोधीपक्ष नेतेपदावरून मुक्त करा; पक्षाच्या बांधणीनुसार अजितदादांचा ...
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक; उद्धव ठाकरेंनाच 'ओपन चॅलेंज'
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक; उद्धव ठाकरेंनाच ‘ओपन चॅलेंज’
एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर गट आक्रमक; उद्धव ठाकरेंनाच ‘ओपन चॅलेंज’ Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईनंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आक्रमक झाला असून उद्धव यांच्या निर्णयालाच आव्हान दिलं आहे. Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईनंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आक्रमक झाला असून उद्धव यांच्या निर्णयालाच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवणं बेकायदेशीर, कोर्टात आव्हान देणार; दीपक केसरकरांची माहिती
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवणं बेकायदेशीर, कोर्टात आव्हान देणार; दीपक केसरकरांची माहिती
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंना नेतेपदावरून हटवणं बेकायदेशीर, कोर्टात आव्हान देणार; दीपक केसरकरांची माहिती शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुढे काय केले जाणार याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देखील शिवसेना आणि त्यांच्यातील मतभेद हे कायम आहेत. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरुन हटविल्यानंतर आता…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विश्लेषण : ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाच्या नेतेपदी कोण निवडून येणार? ही निवडणूक कशी होते?
विश्लेषण : ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाच्या नेतेपदी कोण निवडून येणार? ही निवडणूक कशी होते?
विश्लेषण : ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाच्या नेतेपदी कोण निवडून येणार? ही निवडणूक कशी होते? ऑक्टोबरपर्यंत हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यरत राहण्याचा मनसुबा जॉन्सन यांनी जाहीर केला सिद्धार्थ खांडेकर ब्रिटनमध्ये सत्तारूढ हुजूर पक्षाच्या (कन्झर्व्हेटिव्ह किंवा टोरी) नेतेपदावरून पंतप्रधान बोरिस जॉन्सन पायउतार झाले आहेत. नवीन नेतानिवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, डझनावरी नावे पुढे आली आहेत. ऑक्टोबरपर्यंत…
View On WordPress
0 notes