#सिंधूचा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 28 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:18.10.2024 रोजीचे दुपारी:01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावरची चर्चादेखील होणार आहे. राष्ट्रपती मलावीमधल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू यांनी मलावीमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारताबाहेर राहणाऱ्या आपल्या देशवासियांचं कल्याण ही आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारतीयांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा, कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जगभरातल्या आमच्या भागीदारांसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. मलावीमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधला दुवा असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी, मलावीच्या समाज आणि अर्थव्यवस्थेत भारतीयांच्या योगदानाचं कौतुक केलं.
****
झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होत आहे. या टप्प्यात ४३ जागांसाठी येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आजपासून २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल, आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यात सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या मंगळवारी २२ तारखेला निवडणूक अधिसूचना जारी होणार असून, त्यादिवसापासून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघा अंतर्गत नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि वि��िध पथकांचे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. तसंच निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्थिर निगराणी पथकं आणि भरारी पथकांनी निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी दक्ष रहावं, कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास तातडीने कार्यवाही करून, त्याबाबतचा अहवाल संबंधित नोडल अधिकार्यांना यांना सादर करावा, आदी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. जिल्ह्यात मद्याची आणि इतर अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. गोवा राज्याच्या सीमेवर नऊ आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर एक, असे एकूण १० आंतरराज्य चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात १८ स्थायी सर्वेक्षण पथकं आणि १० भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. 
****
सिंधुदूर्गचे माजी आमदार राजन तेली यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रगोरिया मारिस्का तुनजुंग हिच्याशी होणार आहे. सिंधुनं काल  चीनच्या हान यू हिचा १८-२१, २१-१२, २१-१६ असा पराभव केला. इतर सर्व भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.
****
नवी दिल्लीत पार पडलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं दोन रौप्य आणि दोन कांस्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली आहे. चार पदकांसह भारत पदकतालिकेत ९ व्या क्रमांकावर राहिला.
****
आसाममधल्या तामूलपुर या छोट्या गावातल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातल्या सहा तलवारपटूंची ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
****
बंगळुरु इथं ��ारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघानं आतापर्यंत ३१७ धावांची आघाडी घेतली आहे. संघानं आतापर्यंत ७ बाद ३६३ धावा केल्या. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत संपुषटात आलं आहे.
****
महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात काल दक्षिण अफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात आज शारजाह इथं खेळला जाणार आहे.
****
आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस मुदखेड-नांदेड-मुदखेड दरम्यान आज अशतः रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे. ही रेल्वे अदिलाबाद इथून सकाळी आठ वाजता निघून ११ वाजून ५५ मिनिटांनी नांदेड इथं पोहाचते तसंच नांदेड इथून तीन वाजून पाच मिनिटांनी निघते.
दरम्यान, नरसापूर - नगरसोल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात आजपासून करण्यात आलेला बदल रद्द करण्यात आला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
CWG 2022: पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’; राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले पहिले सुवर्ण
CWG 2022: पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’; राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले पहिले सुवर्ण
CWG 2022: पीव्ही सिंधूचा ‘गोल्डन स्मॅश’; राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले पहिले सुवर्ण PV Sindhu Gold Medal: बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. PV Sindhu CWG 2022 Final: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये २८ जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years ago
Text
इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव, लक्ष्य सेनही स्पर्धेबाहेर
इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा पराभव, लक्ष्य सेनही स्पर्धेबाहेर
पीव्ही सिंधू लक्ष्य सेन इंडोनेशिया मास्टर्स 2022: इंडोनेशिया मास्टर्स 2022 बॅडमिंटन स्पर्धेतील भारताची मोहीम पीव्ही म्हणून संपुष्टात आली. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी शुक्रवारी इस्टोरा स्टेडियमवर आपापल्या उपांत्यपूर्व फेरीतील सामने गमावले. बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूला अवघ्या ३३ मिनिटे चाललेल्या लढतीत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
संपूर्ण इंग्लंड: नाही. 11 लक्ष सेनने जागतिक क्रमवारीत बाजी मारली. अँडर्स अँटोन्सेन; पीव्ही सिंधूचा सहाव्या क्रमांकाच्या खालच्या शटलरकडून पराभव; सायनानेही निराशा केली - ऑल इंग्लंड: ११व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्याला बाहेरचा रस्त�� दाखवला; पीव्ही सिंधूचा सहाव्या क्रमांकाच्या खाली असलेल्या शटलरने पराभव केला, सायनानेही निराशा केली
संपूर्ण इंग्लंड: नाही. 11 लक्ष सेनने जागतिक क्रमवारीत बाजी मारली. अँडर्स अँटोन्सेन; पीव्ही सिंधूचा सहाव्या क्रमांकाच्या खालच्या शटलरकडून पराभव; सायनानेही निराशा केली – ऑल इंग्लंड: ११व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवला; पीव्ही सिंधूचा सहाव्या क्रमांकाच्या खाली असलेल्या शटलरने पराभव केला, सायनानेही निराशा केली
ऑल इंग्लंड 2022: ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील पुरुष एकेरीच्या दुसर्‍या सामन्यात इंडोनेशियाच्या पाचव्या मानांकित अँथनी सिनिसुका गिटिंगविरुद्ध किदांबी श्रीकांतला सुरुवातीच्या आघाडीचे भांडवल करण्यात अपयश आले. जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने गुरुवारी, १७ मार्च २०२२ रोजी बर्मिंगहॅममध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील अँडर अँटोन्सेनचा सरळ गेममध्ये पराभव केला. यासह…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ विजयी, थोड्याच वेळात सिंधूचा सामना होणार सुरु
Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ विजयी, थोड्याच वेळात सिंधूचा सामना होणार सुरु
Tokyo Olympics 2020 Live Updates : भारताने शनिवारी दुसरं पदक निश्चित केलं. आजही भारताजवळ धनुर्विद्या आणि शूटिंगमध्ये पदक जिंकण्याची संधी असेल. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचा आजचा नववा दिवस आहे. शुक्रवारचा दिवस देशासाठी पदकाची भेट घेऊन आला. शुक्रवारी भारताचे दुसरे पदक निश्चित झाले आहे. महिला बॉक्सर लोव्हलिना बोर्गोहेनने 69 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठून भारताला पदक देण्याचं काम करणार आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूलाचा जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव
बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूलाचा जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव
इंडोनेशिया ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. यामागुचीने सिंधूचा 15-21, 16-21 असा पराभव केला. सिंधूने हा मुकाबला अवघ्या 51 मिनिटांमध्ये गमावला. जगातील क्रमांक 4 ची बॅडमिंटनपटू यामागूचीचा बीडब्ल्यूएफ दौऱ्यात सिंधूविरुद्धचा हा पाचवा विजय आहे. यापूर्वी दोघी 14 वेळा आमनेसामने आल्या. यात सिंधू 10-4 अशी आघाडीवर होती.
महिला एकेरी अंतिम…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 29 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, ��भ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायबसिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. चैनी यांच्या शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंडीगडमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे.
****
नागरिकत्व कायद्याचं कलम सहा ए संवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित हे कलम आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय उपाय असल्याचं नमूद केलं.
दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील.
****
बिहारमधल्या सिवान आणि सारन जिल्ह्यात मद्य सेवनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सेवन केलेलं मद्य विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, सारनमध्ये आठ आणि सिवानमध्ये दहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सिवानचे पोलिस अधिक्षक अमितेश कुमार यांनी सांगित���ं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘रणांगण विधानसभेचं’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणी प्रसारित झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात उप-उपान्त्यपूर्व फेरीत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा सामना आज चीनच्या हान यू हिच्याशी होणार आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा खेळ आज दुसऱ्या दिवशी सुरु झाला, मात्र काही वेळानंतर पावसामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या तीन बाद १३ धावा झाल्या आहेत.
****
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेशच्या टाडा गावाजवळ पोहोचलं. दुपारपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये या वादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूजवळ चेन्नईपासून ३२० किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्या��ा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमानात घट झाल्याची नोंद ��वामान विभागानं केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर होणार
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवरांचं भवितव्य मतयंत्रात बंद
दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींसह दिग्गजांनी बजावलं मतदानाचं कर्तव्य
आणि
मलेशिया मास्टर्स बॅटमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पी.व्ही सिंधूचा प्रवेश
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या छत्रपती संभाजीनगर, लातुर, पुणे, नागपूर, मुंबई, को��्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांनी मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवार, २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल जाहीर केलेल्या अधिकृत सहा संकेतस्‍थळावर पाहता येईल असं राज्य मंडळ सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्‍प्‍यातील ८ राज्यांमध्ये ५८ जागांसाठी आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झालं. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील १४, हरियाणा दहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधल्या प्रत्येकी आठ, दिल्ली सात, ओडिशा सहा, झारखंड चार आणि जम्मू काश्मीरमधील एका मतदारसंघाचा समावेश आहे. त्याशिवाय ओडिशा विधानसभेच्या ४२ जागांसाठीही आज मतदान पार पडलं. हरयाणातील कर्नाल आणि उत्तरप्रदेशातल्या गैनसरी या विधानसभा मतदारसंघातही आज पोटनिवडणूक घेण्यात आली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, मनेका गांधी, मनोहर लाल खट्टर, संबित पात्रा, मनोज तिवारी आणि काँग्रेसचे दीपेंद्र सिंह हुड्डा, कुमारी शैलजा, राज बब्बर, कन्हैय्या कुमार, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव आणि पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांच्यासह अनेकांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं.
सहाव्या टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७.७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुमारे ७७.९९ टक्के, उत्तर प्रदेश ५२.०२, झारखंड ६१.४१, बिहार ५२.२४, जम्मू काश्मिर ५१.३५, दिल्ली ५३.७३, हरियाणा ५५.९३ तर ओडिशामध्ये ५०.६० टक्‍के मतदान झालं आहे.
****
राजधानी दिल्लीमध्ये अनेक मान्यवरांनी आज मतदानाचं कर्तव्य बजावलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मतदानाचा अधिकार बजावला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्ली राज्य सरकारमधल्या मंत्री आतिशी यांनी आज मतदान केलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मंत्री हरदीप पुरी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, गृह सचिव अजय भल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी, काँग्रेसचे उदित राज, कन्हैय्या कुमार यांनीही मतदानाचा अधिकार बजावला.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातही आज मतदान होत आहे. दरम्यान, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी बिजबेहरामध्ये धरणे दिले. पीडीपी कार्यकर्��्यांच्या आणि पोलिंग एजंटच्या अटकेविरोधात त्यांनी हे आंदोलन केलं आहे. मेहबुबा या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात २० उमेदवार रिंगणात आहेत. अनंतनाग आणि दक्षिण काश्मीरमधील इतर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री कोणतेही कारण नसताना त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पोलिंग एजंटना अटक करण्यात आल्याचा आरोप पीडीपी अध्यक्षांनी केला.
****
मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या नालेसफाईची आज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी पाहणी केली. मुंबईच्या पश्चिम उपनगरातली नालेसफाई अद्याप समाधानकारक झाली नसल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
छत्तीसगडच्या बेमेटारा येथील दारुगोळा कारखान्यात आज भीषण स्फोट झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं असून, प्रशासनाकडून मृतांची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. या स्फोटानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले असून, त्‍यांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचं दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. असे व्हिडिओ राज्यातील लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे असं राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं कळवलं आहे.
****
बीड लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ मे रोजी पार पड��ी. याचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्या अनुषंगाने मतमोजणीच्या कामासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, याचा आढावा दररोज घेतला जात आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी मतमोजणीची पूर्ण तयारी केली आहे. सकाळी ८ पासून पोस्टल मतदानाच्या माध्यमातून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या कामी जवळपास हजारो कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे.
****
विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव पेंढारकर यांच्या पार्थिवावर नागपूर इंथल्या अंबाझरी घाट येथे आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विको समूहाचे कर्मचारी, नातेवाईक आणि कुटुंबीयांसह नागपूरमधील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. काल ८५ व्या वर्षी त्यांचं नागपुरात निधन झालं होतं.
****
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान तिफण-२०२४ या ट्रॅक्टरचलीत भाजीपाला पूनर्लागवड यंत्रे या विषयावरील स्पर्धेचे उद्घाटन आज भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ. सी.आर. मेहता यांच्या हस्ते करण्यात आलं. तिफण या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळून त्यातून नविन स्वयंचलीत यंत्रांची निर्मिती विद्यार्थ्यांकडून होत आहे. ही स्पर्धा म्हणजे देशामधील कृषि अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन मेहता यांनी केले.
****
अहमदनगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी आणि सुपा परिसरात आज प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, ही मोहीम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानं राबविण्यात येत असून, छोट्या व्यावसायिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार निलेश लंके यांनी केला आहे. तसेच आदर्श आचारसंहिता असताना पालकमंत्र्यांनी प्रशासनाची बेकायदेशीररित्या बैठक घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
****
केदारनाथमध्ये काल झालेल्या हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर केस्ट्रेल एव्हिएशन कंपनीच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक विभागानं तपास पूर्ण होईपर्यंत केदारनाथ घाटीमध्ये कंपनीच्या हेलिकॉप्टरचं उड्डाण होणार नसल्याचं बंदी आदेशात म्हटलं आहे.
****
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकत्ता हायकोर्टाचा अवमान केल्याचा आरोप करत धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलतर्फे आज निषेध करण्यात आला. कोलकत्ता उच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिलेले हजारो दाखले रद्द करण्याचा आदेश दिला. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान करत या निर्णयाचा विरोध केला, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला.
****
धुळे जिल्हा पोलिसांनी १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणाऱ्या वाईन शॉपवर कारवाई सुरु केली आहे. पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने धुळे शहरातील परवाना धारक मद्य विक्रेत्यांवर लक्ष ठेवून अल्पवयीन मुलांना दारु विक्री करणाऱ्या दोन वाईन शॉपवर आज गुन्हे दाखल केले आहेत.
****
भारताच्या परकीय चलन गंगाजळीनं १७ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४ पूर्णांक ५४९ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवत ६४८ पूर्णांक ७ अब्ज डॉलर्सच्या नव्या सार्वकालिक उच्चांकावर झेप घेतली आहे. परकीय चलनातल्या वाढीचा हा सलग तिसरा आठवडा आहे.
****
क्‍वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिटन स्पर्धेत भारताची ऑलिंपिक विजेती खेळाडू पी.व्ही. सिंधू हिने थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा १३-२१, २१-१६, २१-१२ अशा फरकानं पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या झी-यी -यांग हिच्याशी उद्या होणार आहे.
****
आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम मैदानावर उद्या सायंकाळी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात हा सामना होणार आहे.
****
पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणानंतर यवतमाळ शहरात वाहतूक पोलिसांनी सुसाट गाड्या चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दररोज दोन ड्राईव्ह पोलिस घेत आहे. अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात दुचाकी, चारचाकी वाहने देण्याचे प्रमाण वाढले आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
पी.व्ही. सिंधूचा नवा विक्रम, सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूची उल्लेखनीय कामगिरी
पी.व्ही. सिंधूचा नवा विक्रम, सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूची उल्लेखनीय कामगिरी
पी.व्ही. सिंधूचा नवा विक्रम, सिंगापूर ओपन स्पर्धेत सिंधूची उल्लेखनीय कामगिरी भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेत पी. व्ह��. सिंधू विजयी ठरली आहे. सिंधूने चीनच्या वान्ग झी हिचा पराभव केला आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सिंगापूर ओपन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू विजयी ठरली आहे. सिंधूने चीनच्या वान्ग…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १७ जुलै २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे व्हावं यासाठी राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर केंद्र सरकारनंही दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे.
****
देशात गेल्या २४ तासात कोविडचे नवे २० हजार रूग्ण आढळले. तर १७ हजार रूग्ण काल या संसर्गातून मुक्त झाले. सध्या देशात कोविडच्या सक्रीय रूग्णांची संख्या एक लाख ४३ हजार असून १९९ कोटी ९८ लाख कोविड मात्रांचं लसीकरण झालं आहे. दरम्यान, केरळमध्ये काल मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराची लक्षणे असलेला एक युवक आढळला असून त्याला केरळच्या वैद्यकीय महाविद्यालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. केरळच्या विमानतळावर देखील चाचणी केंद्र स्थापन करण्यात आलं आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी काल धनखड यांच्या नावाची घोषणा केली.उपराष्ट्रपती पदाची निवडणूक येत्या सहा ऑगस्टला होणार आहे.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. दोन्ही संघांनी मालिकेमध्ये एक - एक अशी बरोबरी साधली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामना सुरू होईल.
****
सिंगापुर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिलांच्या अंतिम फेरीत आज भारताच्या पीं. व्ही. सिंधूचा सामना चीनच्या की वांग झी यी हिच्याशी होणार आहे. काल उपांत्य फेरीत तिनं जपानच्या सएना कावाकामी हिचा २��-१५, २१-७ असा दोन सरळ सेटमध्ये परा��व केला होता.
****
हवामानात सुधारणा झाल्यामुळं कालपासून स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा आज सकाळपासून सुरळीत सुरू झाली. ८ हजार ६०५ यात्रेकरू पहलगाम आणि बालताल या मार्गावरून आज सकाळी या यात्रेसाठी रवाना झाले. खराब हवामान आणि पावसामुळं काल ही यात्रा स्थगित करण्यात आली होती.
****
मुंबई उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. यात उच्च न्यायालयातल्या औरंगाबाद खंडपीठातल्या किशोर संत यांच्या नियुक्तीचा समावेश आहे. दरम्यान, उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाची संख्या आता ६३ झाली आहे.
//*********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव नामांतर करण्याचा राज्य मंत्र��मंडळाचा पुन्हा निर्णय
·      नामांतराच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची टीका
·      पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीची उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर
·      संसदेचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३८२ रुग्ण, मराठवाड्यात १६२ बाधित
·      अन्नधान्य आणि खाद्य पदार्थांवर प्रस्तावित पाच टक्के वस्तू आणि सेवा कराच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या बंदला संमिश्र प्रतिसाद
आणि
·      सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश तर इंग्लंडविरुद्ध आज भारताचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना
****
औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचं नामांतर धाराशिव करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल पुन्हा नव्यानं घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परीषदेत याबाबत घोषणा केली. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले………..
मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये औरंगाबादचं शहराचं जे नाव आहे ते छत्रपती संभाजीनगर असं याठिकाणी करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. त्याच���रोबर उस्मानाबाद शहराचं नाव जे आहे ते धाराशिव करण्याबाबतचा देखील मोठा निर्णय शासनानं या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. हे निर्णय अतिशय महत्वाचे होते. आणि ते आम्ही रितसर पूर्ण १६५ आमदारांचं बहुमत या सरकारला प्राप्त आहे. त्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत.
यापूर्वीच्या सरकारनं अल्पमतात असताना नामांतराचा निर्णय घेतला होता, मात्र यावर कोणताही आक्षेप येऊ नये, नियमानुसार हा निर्णय व्हावा, कायदेशीर पेच निर्माण होऊ नये, म्हणून आधीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असं मुख्यमंत्री म्हणाले. आता पूर्ण बहुमतात असलेल्या सरकारनं नामांतराचा निर्णय घेतला असून, लवकरच राज्य विधानसभेच्या अधिवेशनात याबाबतचा ठराव मंजूर करुन तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.    
****
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं `लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ` असं नामकरण करण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
****
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल औरंगाबादमध्ये शहर नामांतराच्या निर्णयाबद्दल जल्लोष केला. टीव्ही सेंटर परिसरातल्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावेळी मिठाई वाटप करण्यात आली. ऐतिहासिक औरंगाबाद शहराला नामांतराची नाही तर विकासाची गरज असल्याची प्रतिक्रीया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं नेहमी महापुरुषांच्या नावाचा वापर स्वार्थी राजकारणासाठी केला असल्याचं नामांतराच्या निर्णयावरुन दिसून येतं, असा आरोप त्यांनी सामाजिक संपर्क माध्यमातील संदेशाद्वारे केला आहे. औरंगाबादच्या जनतेला आंतरराष्ट्रीय स्थापत्य संस्था तसंच आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा हा दररोज हवा आहे, खेळाचं  विद्यापीठ जे पुण्याला पळवलं ते पाहिजे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या नामांतरामुळं सामान्य जनतेला त्यांचं पारपत्र, आधार कार्ड आणि शैक्षणिक कागद पत्रावरचं नाव बदलण्यासाठी त्रास सहन करावा लागणार असल्याची टीकाही खासदार जलील यांनी केली आहे.
****
नामांतराचा निर्णय घेतला असला तरी केंद्राकडून लवकरात लवकर याला मंजुरी मिळवावी, असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. नामांतराचं श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकारनं आधीच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, असा आरोप खैरे यांनी केला.
दरम्यान, शिवसेनेनं नामांतराचा निर्णय जाहीर होण्याआधी हा निर्णय तातडीनं घ्यावा या मागणीसाठी काल औरंगाबादमध्ये निदर्शनंही केली होती.
****
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण -`एमएमआरडीए`ला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबवण्यासाठी ६० हजार कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उभारण्यास तसंच शासन हमीस काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात १ लाख ७४ हजार ९४० कोटी रुपये किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल्वे प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे `कोस्टल रोड` आणि `शिवडी- वरळी कनेक्टर` इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले आहेत.
****
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं उपराष्ट्रपतीपदासाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काल धनखड यांच्या नावाची घोषणा केली. भाजप संसदीय मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अध्यक्ष नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत परवा मंगळवारपर्यंत आहे. मतदान सहा ऑगस्टला होणार आहे. पक्षानं यापूर्वी राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे.
****
संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावं, असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं आहे. नवी दिल्लीत बोलाव��ेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते काल बोलत होते. लोकहिताच्या मुद्यांवर विधायक चर्चा व्हावी याकरता, सर्वसदस्यांचं योगदान महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, काँग्रेसचे नेते अधिररंजन चौधरी, द्रमुक नेते टी आर बालू आणि वायएसआर काँग्रेसचे मिथुन रेड्डी बैठकीला उपस्थित होते.
राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे तर केंद्र सरकारनंही दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नांदेड शहर आणि परिसरातल्या रस्ते, पूल, नवीन इमारती, रस्त्यांची दुरुस्ती याबाबत मुंबईमध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सध्या पावसाळ्याच्या दृष्टीनं शहरातील रस्त्यांची कामं महत्वाची आहेत, परिसरातील विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरवा त्यानुसार कामं करण्याच्या सूचना केल्या. विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संबधित विभागांना दिले.
****
परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या राज्यातल्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरता शिष्यवृत्ती निवडीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत येत्या वीस जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत
वाढवण्यात येत असल्याचं शासनां म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३८२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख १७  हजार २०५ झाली आहे. काल या संसर्गानं आठ जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार २३ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ८५३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ५३ ह��ार ६६१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९६ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १५ हजार ५२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात बी ए फोर आणि बी ए फाईव्हचे एकूण ३५ तर बी ए टू पाँईट सेव्हन्टी फाईव्हचे आठ नवे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत.
आतापर्यंत राज्यात बी ए फोर आणि बी ए फाईव्हचे एकूण ११३ रुग्ण आढळले आहेत तर बी ए टू पाँईट सेव्हन्टी फाईव्हचे ४० रुग्ण आढळले आहेत.
****
मराठवाड्यात काल १६२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबादमध्ये सर्वाधिक ५३, लातूर २२, जालना २१, हिंगोली २०, उस्मानाबाद १९, बीड १४, आणि नांदेड जिल्ह्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे.
****
अन्नधान्य आणि खाद्य पदार्थांवर उद्यापासून प्रस्तावित पाच टक्के वस्तू आणि सेवा कर- `जीएसटी`च्या विरोधात देशभरातले किराणा आडत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापाऱ्यांच्या वतीनं काल बंद पाळण्यात आला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्स देखील या संपात सहभागी झाले होते. औरंगाबाद, जालना, मुंबई, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे यासह अनेक ठिकाणी काल व्यवहार बंद होते. अन्नधान्यावरील जीएसटी रद्द न केल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवणार असल्याचं महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष लालित गांधी यांनी कोल्हापूर इथं झालेल्या निदर्शनात सहभागी होतांना सांगितलं.
दरम्यान, आंदोलनाची पुढील  दिशा ठरवण्यासाठी येत्या २४ तारखेला औरंगाबाद इथं व्यापाऱ्यांची महापरिषद होणार आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयात नऊ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. यात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील जेष्ठ वकिल किशोर संत यांचा समावेश आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशाची संख्या आता ६३ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या ऐतिहासिक वारशांचं संवर्धन व्हावं, या उद्देशानं या ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांमध्ये जिल्ह्यातल्या तरुणींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचं तसंच तरुणींना यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत काल दौलताबादच्या देवगिरी किल्ला आणि परिसरात स्वच्छता करण्यात आली. या अंतर्गत आज कन्नड तालुक्यातल्या अंतूर किल्ल्याच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून तरुणींसाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
****
भारतीय बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधूनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत काल तिनं जपानच्या सएना कावाकामी हिचा २१-१५, २१-७ असा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि निर्णायक सामना आज मँचेस्टर इथं होणार आहे. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून यजमान इंग्लंड संघानं मालिकेमध्ये एक - एक अशी बरोबरी साधली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सामना सुरू होईल.  
****
बीडमधील वेदशास्त्रसंपन्न धुंडिराज महाराज पाटांगणकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. मूळचे शिक्षक असणारे धुंडिराज महाराज यांचं आयुर्वेदाचा गाढा अभ्यास होता. संत जनीजनार्दन संस्थान थोरले पाटांगणचे ते प्रमुख विश्वस्त होते. आज सकाळी साडेनऊ वाजता मोंढा भागातील अमरधाम स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्य��ंस्कार करण्यात येणार आहेत.
****
भारतीय कृषि क्षेत्राच्या विकासामध्ये भारतीय कृषी संशो��न परिषद - `आयसीएआर`चा मोलाचा वाटा  असल्याचं औरंगाबादचे कृषि विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी म्हटलं आहे. संस्थेचा चौऱ्याण्णवावा वर्धापन दिन काल औरंगाबादच्या कृषि विज्ञान केंद्रात साजरा करण्यात आला, त्यावेळी देशमुख बोलत होते. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये प्रयोगशिल असणं गरजेचं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. डॉ. किशोर झाडे, कृषि सहाय्यक रामेश्वर ठोंबरे, शास्त्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं या उपक्रमांतर्गत दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे मार्गदर्शन झालं.
****
अमरावती जिल्ह्यातले प्रगतिशील शेतकरी आणि दोन लक्ष पक्ष्यांचं कुक्कुटपालन चालवणारे रवींद्र मेटकर यांना काल दिल्ली इथल्या कार्यक्रमात भारत सरकारतर्फे बाबू जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पाच रुपये रोजंदारीपासून त्यांनी कामाची सुरुवात केली होती. मेटकर हे आज दररोज सुमारे एक लाख तीस हजार पेक्षा अधिक अंडी विकतात.
****
नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ज्या भागात शेत पिकांचं नुकसान झालं आहे, त्यांचे तातडीनं पंचनामे करावेत अशा सूचना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काल नाशिक जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. दूरुदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी काल पुरामुळं झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी गंगाधरन डी. तसंच अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 July 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ जुलै २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार
·      संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक
·      राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका, आहे त्या टप्प्यावर ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याच��� निर्णय
·      मंकी पॉक्स आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे दोन हजार ३७१, मराठवाड्यात १५१ बाधित
·      श्री तुळजाभवानी दानपेटी लिलाव अपहारप्रकरणी गुन्हे दाखल न केल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाची राज्य शासनाला नोटीस
·      भंडारदऱ्याला सहलीसाठी गेलेल्या औरंगाबादच्या दोन तरुण वकिलांचा ओढ्याच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू
आणि
·      सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश
****
औरंगाबाद शहराचं संभाजीनगर तसंच उस्मानाबाद शहराचं धाराशीव असं नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीमध्ये घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. औरंगाबादच्या आमदारांनी मुंबईत शक्तीप्रदर्शन करत त्यांचा सत्कार केला, त्यावेळी शिंदे बोलत होते. गेल्या सरकारनं अल्पमतात असताना मंत्रिमंडळाच्या अनधिकृत बैठकीत शहरांच्या नामांतरासह अन्य दोनशे निर्णय घेतले. हे आपण राज्यपालांना सांगितलं होतं, असं ते म्हणाले. पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण सिंचन योजनाही पुढच्या बैठकीत आणणार असून, त्याद्वारे पंचवीस हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येईल, समुद्रात जाणारं पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. आपल्याला सरकार लोकभिमुख करायचं असून, सोबत आलेला एकही आमदार पडणार नाही याची जबाबदारी आपण घेतली आहे, यातला एकही आमदार पडला तर आपण राजकारण सोडून निघून जाऊ, असं शिंदे यावेळी म्हणाले. आमदार संजय शिरसाट यां��्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनीही गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आपला सत्कार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आमदार अब्दूल सत्तार यांच्या पुढाकारानं हे शक्तीप्रदर्शन आणि सत्कार झाला. आमदार सत्तार तसंच आमदार संदीपान भुमरे यांचं भाषण यावेळी झालं.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशीव केलं जाईल, आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जाईल, अशी माहिती, काल मुंबईत माध्यम प्रतिनिधींना दिली. यापुर्वीच्या सरकारनं बहुमत गमावलं तेंव्हा मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हे निर्णय जाहीर केले होते. त्याआधी अडीच वर्षे निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे बहुमत असलेलं आपलं सरकार नामांतराचे हे निर्णय घेईल, लवकरच मंत्रिमंडळाचाही विस्तार होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
****
राज्यातलं सरकार एकेक करून आधीच्या सरकारचे सगळे निर्णय बदलत असून, हे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सरकार आल्यानंतर नवं काय करतांय हे दाखवलं असतं तर आपण त्यांचं अभिनंदन केलं असतं, मात्र त्याऐवजी पूर्वीच्या सरकारनं घेतलेले एकेक निर्णय रद्द करणं यावरच आपण मोठं काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न, राज्याच्या दृष्टीनं चांगला नाही, असं पवार म्हणाले. संसदेत विरोधक सभात्याग केल्यानंतर परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर जाऊन निदर्शनं करतात, त्यावरही बंदी आणलेली आहे. हे सहन करणार नसून, सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात यावर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. महापालिकेसह आगामी सर्व निवडणुका तिनही पक्षांनी एकत्र लढाव्या असं आपलंही मत आहे. पण, शिवसेना आणि काँग्रेसशी चर्चा करून सहमतीनं निर्णय घ्यावा लागेल, असं पवार म्हणाले.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. येत्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी देखील उद्या सभागृहातल्या सर्वपक्षीय सदस्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्याचं आवाहन या बैठकीत सर्व सदस्यांना करण्यात येणार आहे.
****
येत्या अठरा तारखेपासून सुरू होणारं विधिमंडळाचं अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. संसदीय कार्य विभागानं विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केल्यानंतर हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं. अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल, असंही सचिवालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बाभळी उच्च पातळी बंधाऱ्याची सात दारं काल सकाळी उघडण्यात आली असून, त्यातून ३१ हजार ६२३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदी ��ात्रात पाणी सोडलं जात आहे. जिल्ह्यातल्या धर्माबाद, बिलोली, ऊमरी या तालुक्यात काल हलक्या स्वरूपाचा झाला.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या नाथसागर धरणात ४० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, धरणाचा पाणीसाठा ६२ टक्क्यापर्यंत गेला आहे.
****
राज्यात मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन तसंच वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याच्या कारणावरुन राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका, आहे त्या टप्प्यावर ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामधून २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था तसंच ज्या संस्थांची निवडणूक घेण्याबाबत न्यायालयानं आदेश दिले आहेत, अशा संस्था वगळण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश काल राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं काल जारी केले.
****
मंकी पॉक्स आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल मार्गदर्शक सूचना जारी केल्या. नागरिकांनी परदेशातून आलेल्या, त्वचा अथवा जननेंद्रियांवर जखमा असणाऱ्या तसंच आजारी व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा. उंदीर, खार असे छोटे सस्तन प्राणी आणि वानर प्रजातींसारख्या जंगली जनावरांचा संपर्क टाळावा असं यात म्हटलं आहे. आफ्रिकेमधल्या जनावरांपासून बनवण्यात आलेल्या उत्पादनांचा उपयोग करू नये, आरोग्य सेवा आस्थापनांमधल्या आजारी व्यक्तींच्या अथवा संसर्गित प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या वापरातल्या साहित्याशी संपर्क टाळावा असं या मार्गदर्शक सूचनांमधे म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे दोन हजार ३७१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८० लाख १४  हजार ८२३ झाली आहे. काल या संसर्गानं १० जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार १५ एवढी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८४ शतांश टक्के आहे. काल दोन हजार ९१४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७८ लाख ५० हजार ८०८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९५ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १६ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल १५१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात औरंगाबादमध्ये सर्वाधिक ५७, जालन्यात ४४, उस्मानाबाद २६, लातूर १४, बीड आठ तर नांदेड जिल्ह्यात दोन रुग्णांचा समावेश आहे.
****
राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नसल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केलं. राज्यात केवळ दोन मंत्र्यांच्या सरकारनं घेतलेल्या अनेकविध निर्णयांवर त्यांनी यावेळी तीव्र टीका केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री तुळजाभवानी देवस्थानात दानपेटी लिलावात झालेल्या अपहाराप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं शिफारस केल्यानंतरही पाच वर्षांत गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत, असा प्रश्र्न उपस्थित करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं, राज्य शासनाला नोटीस बजावली आहे. वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटी लिलावात, आठ कोटी ४५ लाख ९७ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नऊ लिलावदार, पाच तहसिलदार, एक लेखापरिक्षक आणि एक धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर, वि��िध कलमांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस, राज्य गुन्हे अन्वेषण खात्यानं चौकशी अहवालाद्वारे शासनाला केली आहे. पाच वर्षे गुन्हे दाखल करण्यासाठी पुरेशी नाहीत का, असा प्रश्नही न्यायालयानं शासनाला विचारला आहे. राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य गृह सचिव, पोलीस महासंचालक, तसंच विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद आणि पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांना या नोटीसद्वारे, येत्या २२ ऑगस्ट पर्यंत म्हणणं मांडायला सांगितलं आहे. हिंदू जनजागृती समितीनं या संदर्भातली याचिका दाखल केली आहे.
****
अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांवरील प्रस्तावित वस्तु आणि सेवा कर- जीएसटीच्या विरोधात देशभरातले किराणा आडत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व्यापारी आज बंद पाळणार आहेत. मुंबईत झालेल्या चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड च्या बैठकीत या बंदला, औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सनं जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
****
राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होतर. सध्या राज्यात अनुसूचित जाती १३ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, बाठिया आयोगानुसार इतर मागासवर्ग १८ टक्के, असं एकूण ३८ टक्के आरक्षण आहे. आरक्षणाबाबत न्यायालयात विविध निर्णयात ५० टक्के मर्यादेचा उल्लेख करण्यात येतो, त्यामुळे उर्वरित १२ टक्क्यातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, आरक्षण देता येईल, असं पाटील म्हणाले.
****
जालना जिल्ह्यात अकरा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी काल ही कारवाई केली. पोलिस मुख्यालयासह अन्य चार पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्तव्यात कसूर करण्यासह अनधिकृतरित्या गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली.
****
देशातल्या शैक्षणिक संस्थांची मानांकनं काल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केली असून, विविध प्रकारातल्या उत्कृष्टता क्रमवारीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठ तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यासह २२ संस्थांनी यात स्थान मिळवलं आहे. आयआयटी मुंबई एकूण मानांकनात तिसऱ्या स्थानावर आहे. आयआयटी चेन्नई सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था ठरली आहे. मुंबईची रसायन तंत्रज्ञान संस्था अठ्ठाविसाव्या क्रमांकावर आहे. महाविद्यालय गटात पुण्याचं फर्ग्युसन, आणि मुंबईची निर्मला निकेतन आणि सेंट झेवियर ही महाविद्यालयं पहिल्या १०० क्रमांकांमधे आहेत.
****
राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट परीक्षेत ��ुंबईच्या मीत शहा यानं देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीत शहा यांचं तसंच शहा कुटुंबियांचंही अभिनंदन केलं आहे. मीत यांनी घवघवीत यश मिळवणं हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने घेतलेल्या सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा इथं सहलीसाठी गेलेल्या औरंगाबादच्या दोन तरुण वकिलांचा ओढ्याच्या पुरात वाहून मृत्यू झाला, तर एक जण या अपघातातून वाचला, अकोले तालुक्यातल्या कोल्हार घोटी रस्त्यावरील वारंघुशी ते पेंडशेत दरम्यान काल संध्याकाळी या तिघांची कार ओढ्यात वाहून गेल्यानं ही दुर्घटना घडली. ॲडव्होकेट आशिष पालोदकर आणि ॲडव्होकेट रमाकांत देशमुख अशी मृतांची नावं असून, अॅडव्होकेट अनंता मगर हे या अपघातातून बचावले. आशिष पालोदकर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते प्रभाकर पालोदकर यांचे चिरंजीव होत.
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरातून १ हजार एकशे तेवीस रक्ताच्या पिशव्यांचं संकलन करण्यात आलं. शासकीय जिल्हा रूग्णालय आणि जिजाई रक्तपेढी यांच्या मदतीनं हे शिबिर घेण्यात आलं.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली.
****
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल भायखळा इथल्या शिवसेनेच्या शाखेला भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या मोटारीवर काल हल्ला झाल्याप्रकरणी ठाकरे तिथं गेले होते. शिवसेनेचे कार्यकर्ते स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यास सक्षम आहेत, असं ते यावेळी म्हणाले.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने चीनच्या हान युईला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र दुसरीकडे सायना नेहवाल आणि पुरुष गटात एचएस प्रणॉय यांना पराभवाचा सामना करावा लागला. सिंधूने काल महिला एकेरीत तीन पैकी दोन सेट जिंकत हा विजय मिळवला.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी नगर पालिकेचा मुख्याधिकारी उमेश कोठीकर याला सिमेंट रस्त्याचं देयक काढण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांमार्फत चाळीस हजार रुपयांची लाच घेत��ना काल पकडलं. कंत्राटदाराची सिमेंट रस्त्याची आठ लाख रुपयांची रक्कम पालिकेला देणं बाकी होतं, ही रक्कम देण���यासाठी मुख्याधिकारी कोठीकर यानं लाचेची मागणी केली होती.
जालना सहकारी संस्थेतले जिल्हा विशेष लेखा परिक्षक सेवादास कांबळे आणि उपलेखापरिक्षक राजेश परिहार यांना नऊ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली. प्रोव्हिजनल पेन्शन बिल आणि ग्रॅच्युइटी बिल मंजुर केल्याचा मोबदला म्हणून आणि राहीलेलं जीआयएस बिल मंजुर करण्यासाठी या वर्ग एक च्या अधिकार्यांनी तक्रारदाराकडून ही लाच मागितली होती.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०९ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
भारताची जैव अर्थव्यवस्था गेल्या आठ वर्षात आठ पटींनी म्हणजेच दहा अब्ज डॉलर्सवरुन ८० अब्ज डॉलर्स इतकी वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत प्रगती मैदान इथं आज ‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शन- २०२२���चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. गेल्या काही वर्षात अटल इनोवेशन मिशन, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत जी कामं करण्यात आली, त्यांचा लाभ जैवतंत्रज्ञान क्षेत्राला देखील मिळाला असून, स्टार्ट अप इंडियाची सुरुवात झाल्यानंतर जैवतंत्रज्ञानात गुंतवणूक करणार्यांची संख्या नऊ टक्क्यांनी वाढली असल्याचं पंतप्रधान म्हणाले. लोकसंख्या, वैविध्यपूर्ण हवामान क्षेत्र, प्रतिभावान मानवी भांडवल, देशात व्यवसाय करण्यासाठी सुलभता, सतत वाढणारी जैवतंत्रज्ञान सामग्रीची मागणी, आणि देशातली जैवतंत्रज्ञान क्षेत्रातली प्रगती, यामुळे भारताकडे जैवतंत्रज्ञान क्षेत्रातली संधी म्हणून पाहिलं जातं, असं पंतप्रधानांनी नमूद केलं.      
जैवतंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक परिषद यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप नवोन्मेष- आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल’ अशी या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
****
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. शरद पवार यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला, तो विश्वास मी सार्थ करेन, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सहावे उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यात महाविकास आघाडीचे सहा, तर भाजपचे सहा उमेदवार आहेत. २० जून ला ही निवडणूक होणार आहे.
****
दहा टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचा वापर केल्यामुळे देशाच्या परकीय चलनात ४१ हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचं पर्यावरण, वनं आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी सांगितलं आहे. एका ऑनलाइन कार्यक्रमाला ते काल संबोधित करत होते. भारताने निर्धारित कालावधीच्या पाच महिने आधीच दहा टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य नुकतंच गाठलं आहे. देशाची इंधन आयात आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असल्याचं चौबे यांनी म्हटलं आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, असंही ते म्हणाले.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १५ लाख ४३ हजार ७४८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९४ कोटी ५९ लाख ८१ हजार ६९१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात क���ल नव्या सात हजार २४० कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तीन हजार ५९१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ३२ हजार ४९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माधयमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपली आवेदनपत्रं दहा ते १७ जून या कालावधीत ऑनलाईन भरावीत असं शिक्षण मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
भारताच्या लक्ष्य सेननं इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्यनं आज सकाळी झालेल्या सामन्यात डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा २१-१८, २१-१५ असा पराभव केला.
तर महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूने डेन्मार्कच्या लिन क्रिस्टोफरसनचा १८-२१, २१-१५, २१-११ असा पराभव केला. आज उपउपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंगशी होणार आहे.
मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि बी. सुमित रेड्डी यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार आहे.
समीर वर्मा आणि आकर्षि कश्यप यांचं पहिल्या फेरीतच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
****
हरियाणामध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं काल दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कास्य पदकं पटकावली. कुस्ती, अॅथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, भारत्तोलनामधल्या पदकांचा यात समावेश आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २२ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्याच्या आपल्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला. ते आज पुण्यात जाहीर सभेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘समान नागरी कायदा’ आणावा, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा करावा तसंच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी त्यांनी केली. औरंगाबादमध्ये दहा दिवसांतून एकदा प��णी येतं. तसंच राज्यातल्या विविध शहरांच्या नागरी समस्या, उसाचा प्रश्र्न याकडे त्यांनी यावेळी कक्ष वेधलं. मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. राज्यात सत्ताधाऱ्यांनी नामांतराच्या मुद्द्यांसह विविध विषयांचं निवडणुकीसाठी राजकारण केलं. `एमआयएम`ला मोठं करण्याचं राजकारण करण्यात आलं, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.
****
देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख ३७ हजार ३८१ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी २८ लाख ६६ हजार ५२४ मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या दोन हजार २२६ रूग्णांची नोंद झाली. या संसर्गाच्या ६५ रुग्णांचा काल उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार २०२ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.
****
आज जैवविविधता दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे. जैवविविधता हे महत्त्वाचं संसाधन असून यावर आपलं भविष्य अवलंबून असल्याचं राष्ट्रपतींनी या संदर्भातल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. जैवविविधता जपण्यासाठी आणि खंडित झालेल्या परिसंस्था पुनर्संचयित करण्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक रितीनं प्रयत्न केले पाहिजेत, असं आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी केलं.
****
केरळमध्ये येत्या पाच दिवसांत विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात मोसमी पाऊस येत्या बारा जून ते पंधरा जून या कालावधीत संपूर्ण राज्यभर कार्यरत होईल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी गावाजवळ ��ंदुरबार - डहाणू बसचा भीषण अपघात आज टळला. नंदुरबारहून नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगानं येणाऱ्या वाहनानं हुलकावणी दिल्यानंतर बसचालकानं प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या बाजुला मातीत उतरवत अपघात टाळला, यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.  
****
उच्चतम गुणवत्ता यामुळं सांगलीच्या हळदीनं सांगलीचं नाव सातासमुद्रापार नेलं आहे. सांगली जिल्ह्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी 'पिंक सिटी'च्या धर्तीवर आता 'यलो सांगली सिटी' ची संकल्पना साकारण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या संकल्पनेसाठी पुढाकार घेतला आहे. सांगली महापालिकेच्या इमारतींपासून या मोहिमेस सुरुवात होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थॉमस आणि उबेर चषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावणाऱ्या भारतीय बॅडमिंटन संघातील खेळाडुंची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. ‘आपण हे करू शकतो’ ही खेळाडुंची भावना देशाची एक नवी शक्ती म्हणून नावारुपाला आली असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. सरकार खेळाडुंना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पतंप्रधानांनी दिली. पंतप्रधानांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल खेळाडुंनी यावेळी त्यांचे आभार मानले. यावेळी खेळाडुंनी आपले अनुभव सांगितले.  
****
थायलंड इथं सुरू असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला उपांत्यंफेरीत पराभवाचा सामना करावा लागला. दोन वेळा ऑलिंपिक विजेत्या चीनच्या चेन यू फेईकडून सिंधूचा १७-२१, १६-२१, असा सरळ सेटमध्ये पराभव झाला.
****
भ्रमणध्वनीसाठी मनोरा उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याची बतावणी करणाऱ्या व्यक्ती, यंत्रणा आणि कंपन्यांपासून जनतेनं सावध राहण्याची सूचना दूरसंचार विभागानं केली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
देशात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९२ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १५ लाख ३२ हजार नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९२ कोटी १२ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या दोन हजार ३२३ रूग्णांची नोंद झाली. या संसर्गाच्या २५ रुग्णांचा काल उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ३४६ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १४ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.
****
भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरातल्या गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिलं असून गेल्या आर्थिक वर्षात भारतामध्ये त्र्याऐंशी अब्जांहून अधिक अमेरिकी डॉलरची; थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. ही आतापर्यंतची विक्रमी परदेशी गुंतवणूक असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. वर्ष २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात देशात झालेल्या परदेशी
गुंतवणुकीमध्ये पंच्च्याऐंशी टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या चार आर्थिक वर्षात भारतात ३०१ अब्जांपेक्षा जास्त अमेरिकी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. तर आर्थिक वर्ष २००३-०४ पासून आतापर्यंत देशात झालेल्या परदेशी गुंतवणुकीनं वीस पट वृद्धी नोंदवल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षात देशात झालेल्या परदेशी गुंतवणुकीमधला ३८ टक्के वाटा कर्नाटक राज्याचा असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि नवी दिल्लीचा क्रमांक आहे.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ३१ वी पुण्यतिथी. यानिमित्त दहशतवाद विरोधी दिन पाळण्यात येत आहे. दहशतवादाचे संपूर्ण जगावर प्रतिकुल परिणाम होत असून, दहशतवाद हा मानवतेसाठी आणि वैश्विक शांततेसाठी घातक असल्याचं उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू यांनी एका संदेशात म्हटलं आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी लोकांनी संकल्प करावा, असं आवाहन नायडू यांनी आपल्या संदेशात केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक संपर्क माध्यमाती�� संदेशाद्वारे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली अ��्पण केली आहे.
****
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांना दिल्लीच्या वीरभूमी इथं श्रद्धांजली वाहिली. प्रियंका गांधी ��णि पक्षाच्या इतर नेत्यांनीही राजीव गांधी यांनी श्रद्धांजली अर्पण करत अभिवादन केलं.
****
पुणे इथल्या लाल महालात लावणी चित्रित केल्या प्रकरणी तिघांविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांचा यात समावेश असून रखवालदार राकेश सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. पवित्र वास्तूचं पावित्र्य भंग केलं म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सोळा एप्रिल रोजी हे चित्रीकरण करण्यात आलं होतं. संभाजी ब्रिगेडनं या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं दादर ते तेलंगणातल्या काझीपेठ दरम्यान उन्हाळी विशेष साप्ताहिक रेल्वेच्या बावीस फेऱ्या जाहीर केल्या आहेत. या गाडीची पहिली फेरी येत्या २५ तारखेला काझीपेठ इथून सुरू होणार आहे. ही गाडी नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे दादर इथं पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी दादरहून निघून त्याच मार्गे काझीपेठला पोहोचेल.
****
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचं या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आलं असून, सर्वेक्षणानंतर महानगरपालिका क्षेत्रात एकूण ५१४ इमारती धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. ही यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. यातल्या अधिक जीर्ण झालेल्या ६१ इमारतींची विज आणि पाणी जोडणी खंडीत करण्यात येईल, असंही यात नमूद करण्यात आलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी १०७ गावांतील संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापना मार्फत आवश्यक ते साहित्य पुरविण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या १०७ बाधित गावातील पूर आराखडे तयार करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घेण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बँकॉक इथं सुरु असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्य पूर्व सामन्यात सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची चा २१ - १५, २० - २२, २१ - १३ असा पराभव केला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीनच्या चेन यू फेई हिच्यासोबत होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०८ एप्रिल २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज सात वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे आणि इतर घटकांनीही पुढे येऊन राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे कर्जदारांच्या प्रमाणापैकी ६८ टक्के लाभार्थी असलेल्या महिला उद्योजकांना लाभ झाल्याचं आणि ‘आकांक्षित जिल्ह्यांतून’ लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं आहे.
****
आर्मी ऑडिनन्स कॉर्प्स चा २४७ वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. आठ एप्रिल १७७५ ला ऑडिनन्स मंडळाची स्थापना झाली होती. मोठ्या आणि गुंतागुंतीच्या दस्ताऐवजाचं व्यवस्थापन करणं आणि लष्कराला दळणवळण सहाय्य देण्याचं काम कॉर्प्सकडे सोपवण्यात आलं आहे.
****
राज्यात कापूस, सोयाबीन आणि गळीत धान्याच्या उत्पादकतेत वाढ आणि मूल्यसाखळी विकासासाठी धोरण निश्चित करण्यात येत असल्याचं, कृष���मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. काल मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अर्थसंकल्पात या पिकांसाठी विशेष कृती योजना घोषित करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. विदर्भ आणि मराठवाड्यात या दोन्ही पिकांच्या लागवडीचं प्रमाण लक्षणीय आहे.
****
वाशिम जिल्ह्यामध्ये खासगी बस आणि टँकरच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत. पुण्याहून यवतमाळला जाणारी एक खासगी बस आणि टँकर दरम्यान वाशिम शहराजवळ अकोला - नांदेड महामार्गावर काल सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना उपचारांसाठी अकोला इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
****
कोरिया खुल्या बॅडिमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फोरीत पोहोचले आहेत. पुरुष एकेरीत उपान्त्यपूर्व फेरीत श्रीकांतचा सामना कोरियाच्या वानहो सन बरोबर, तर महिला एकेरीत सिंधूचा सामना थायलंडच्या बुसानन हिच्याबरोबर होणार आहे.
****
मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
0 notes