#बॅडमिंटन बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 22 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २२ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दावोस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणुकदार परिषदेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख २५ हजार ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं, हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन, रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली, रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५ हजार मेगा वॅट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.
मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल, निमलष्करी दल, दिल्ली पोलिस, विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. अर्थमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, योजनेला आठ पूर्णांक दोन दशां�� व्याजदर दिला जातो.
विधिमंडळाचं कामकाज विनाअडथळा चालवत, गुणवत्तापूर्ण चर्चा घडवून आणण्याचा संकल्प पाटणा इथं आयोजित ८५ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत करण्यात आला. काल समारोपाच्या दिवशी या परिषदेनं पाच संकल्प केले. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधानाचं महत्व सांगण्यासाठी देशभरातल्या विधिमंडळांचे सदस्य समाजाच्या सर्व स्तरात जातील, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी परिषदनेनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. देशातल्या २३ विधिमंडळातले ४१ पीठासीन अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते.
राज्यामध्ये कर्करुग्णांचं प्रमाण वाढत असून, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबवावी असे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल दिले. २०२५-२६ या वर्षाच्या नियोजनासाठी मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याच्या तसंच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना आबिटकर त्यांनी दिल्या.
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक २० रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक १८५ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत १३८ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक ४४ रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदवण्यात आल्याचं, आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे.
नेत्रदानातून अनेक दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळू शकते, त्यामुळे अधिकाधिक जणांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड- नॅब या संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ही संस्था छापखाना, बोलकी पुस्तकं, प्रशिक्षणं अशा उपक्रमांद्वारे अंध, तसंच दृष्टिबाधितांना आशा आणि सक्षमीकरणाची हमी देणारी आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीनं देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा काल संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. २०२३-२४ या वर्षाच्या गाळप हंगामासाठी, आंबेगावच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, सर्वोकृष्ट ऊ�� विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या हे पुरस्कार वितरीत केले जातील.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या तृतीयपंथी, देवदासी, एचआयव्ही बाधित २० व्यक्तींना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल डिजिटल रेशन कार्ड वितरीत करण्यात आली. अशा व्यक्तींसाठी शासनाच्यावतीने अनेक योजना राबवण्यात येतात, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन येडगे यांनी यावेळी केलं.
इंडोनेशियात जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पीव्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टीएल एन्गुयेनशी होणार आहे. तर, या स्पर्धेत, पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जचा सामना कोरियाच्या जिओन ह्योक-जिन, तर लक्ष्य सेनचा सामना जपानच्या ताकुमा ओबायाशी याच्या विरुद्ध होईल. याच स्पर्धेत, काल महिला दुहेरीत भारताच्या तनिशा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीने थायलंडच्या जोडीचा, तर पुरुष दुहेरीत, सात्विक साइराज रांकि रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने तैवानच्या जोडीचा पराभव केला.
0 notes
Text
सिंगापूर ओपन: भारतीय बॅडमिंटनपटू मिथुन मंजुनाथ अश्मिता चालिहा पलटवार, पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनीही बाजी मारली
सिंगापूर ओपन: भारतीय बॅडमिंटनपटू मिथुन मंजुनाथ अश्मिता चालिहा पलटवार, पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉय यांनीही बाजी मारली
भारताच्या मिथुन मंजुनाथ आणि अश्मिता चालिहा यांनी बुधवार, १३ जुलै २०२२ रोजी सिंगापूरमध्ये त्यांच्या अनुभवी प्र��िस्पर्ध्यांचा पराभव करून उलथापालथ केली. त्याच वेळी, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मिथुन मंजुनाथने देशबांधव आणि जागतिक चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांतचा पराभव केला. एक तास चाललेल्या पुरुष…
View On WordPress
#अश्मिता चालिहा#किदंबी श्रीकांत#क्रीडा बातम्या#पीव्ही सिंधू#प्रणय एच.एस#बॅडमिंटन बातम्या#भारत बातम्या#भारतीय शटलर#भारतीय शटलर्स#मिथुन मंजुनाथ#सायना नेहवाल#सिंगापूर ओपन#सिंगापूर ओपन 2022#सिंगापूर ओपन 2022 मध्ये भारतीय#सिंगापूर ओपन बॅडमिंटन#सिंगापूर बातम्या
0 notes
Text
World Badminton Championship जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कधीपासून आहे, भारतातील कोणते खेळाडू सहभागी होत आहेत, काय आहे वेळापत्रक, जाणून घ्या
World Badminton Championship जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कधीपासून आहे, भारतातील कोणते खेळाडू सहभागी होत आहेत, काय आहे वेळापत्रक, जाणून घ्या
World Badminton Championship जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कधीपासून आहे, भारतातील कोणते खेळाडू सहभागी होत आहेत, काय आहे वेळापत्रक, जाणून घ्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप: वेळापत्रक काय आहे 22-23 ऑगस्ट: पहिली फेरी 24 ऑगस्ट – दुसरी फेरी 25 ऑगस्ट – तिसरी फेरी 26 ऑगस्ट – उपांत्यपूर्व फेरी 27 ऑगस्ट – उपांत्य फेरी 28 ऑगस्ट – अंतिम टोकियो- जपानमध्ये यावेळी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप-2022 चे आयोजन…
View On WordPress
#badminton#championship#world#आहे#आहेत’’;#कधीपासून#काय?#कोणते#क्रिकेट#क्रीडा#खेळ बातम्या#खेळाडू#घ्या#चॅम्पियनशिप#जागतिक#जाणून#टेनिस#बॅडमिंटन#भारत लाईव्ह मीडिया#भारतातील#मराठी खेळ अपडेट्स#राष्ट्रीय खेळ बातम्या#वेळापत्रक#सहभागी#स्पोर्ट्स#स्पोर्ट्स अपडेट मराठी#हॉकी#होत
0 notes
Text
लक्ष्य सेनने इतिहास रचला, ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
लक्ष्य सेनने इतिहास रचला, ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप: जागतिक चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता भा��तीय स्टार लक्ष्य सेनने गुरुवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाच्या अँडर अँटोन्सेनचा सरळ गेममध्ये पराभव करून ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या वर्षी जानेवारीमध्ये इंडिया ओपनचे विजेतेपद पटकावणाऱ्या आणि गेल्या आठवड्यात जर्मन ओपनचा उपविजेता ठरलेल्या अल्मोराच्या 20 वर्षीय…
View On WordPress
#ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप#ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप#क्रीडा बातम्या#लक्ष्य सेन#लक्ष्य सेन bwf#लक्ष्य सेन आजचा सामना#लक्ष्य सेन प्रशिक्षक#लक्ष्य सेन रँकिंग#लक्ष्य सेन रॅकेट#लक्ष्य सेन वय#लक्ष्य सेन विकिपीडिया#लक्ष्य सेन सामना
0 notes
Link
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.****
स्वामित्व योजनेअंतर्गत गाव पातळीवर जमिनीच्या मालकी हक्कांविषयी संपूर्ण माहिती देणाऱ्या ई प्रॉपर्टी कार्ड वितरणाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात देशभरातल्या दहा रा��्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजाराहून अधिक गावांतल्या ६५ लाख ई-प्रॉपर्टी कार्डस् पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत. जमीन मालकाला त्याच्या जमिनीची कायदेशीर सनद मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात तसंच प्रत्येक तालुका मुख्यालयात हा कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. जिल्ह्यात ९२५ गावांपैकी ७२७ गावांमध्ये या योजनेअंतर्गत मालमत्तांची मोजणी पूर्ण झाली असून, एक लाख १३ हजार प्रॉपर्टी कार्डसचं वितरणही करण्यात आलं आहे.
****
पर्यटन विभागाने पर्यटन धोरण २०२४ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पर्यटन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना काल ते बोलत होते.
केरळच्या धर्तीवर राज्यातही वैद्यकीय पर्यटनासाठी पर्यटन विकास करून राज्यातील आयकॉनिक पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर विभागाने भर द्यावा, श���वसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणं, सभा मंडप आणि स्कायवॉक पंढरपूर ही कामं प्राधान्यानं करावीत आदी सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
****
शेतीसाठीच्या पाण्याची तूट वाढत असल्यामुळं शहरांनी आता पाण्याचं संवर्धन आणि शुद्धीकरण करून पाणी वापरणं आवश्यक आहे; त्यातून ४० टक्के जमीन सिंचनाखाली येऊ शकते, असं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यात केलं. नदी जोड प्रकल्पाबाबत यशदा इथं आयिजित कार्यशाळेनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना तसंच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार" प्रदान करण्यात येतो. २०२३-२०२४ या वर्षाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचं आवाहन क्रीडा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडूंनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर येत्या २६ जानेवारीपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर ��रण्याचं आवाहन क्रीडा विभागाने केलं आहे.
****
गरीब तसंच गरजू व्यक्तींना राज्य शासनाच्या वतीने सवलतीच्या दरात शिवभोजान थाळी उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेसाठी डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीकरिता ५० कोटी, ८२ लाख १२ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने काल निर्गमित केला.
****
कोल्हापूर मधल्या श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखान्याची कामं जलद गतीने पूर्ण करावीत. तसंच या कामांच्या दर्जात कोणतीही हयगय होता कामा नये, असे निर्देश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी दिले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरातील नूतनीकरण कामांबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
****
लातूर इथं जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय आणि जिल्हा पशुचिकित्सालयात काल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला.
या उपक्रमादरम्यान परिसर स्वच्छता, कचऱ्याचं व्यवस्थापन, झाडांची छाटणी, तसंच कार्यस्थळ स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महागामीच्या वतीनं आयोजित शार्ङ्गदेव महोत्सवात आज सकाळच्या सत्रात बंगळुरूचेअर्जुन भारद्वाज यांचं भारतीय आणि ग्रीको-रोमन नाटक, भुवनेश्वरच्या पद्मश्री इलियाना सितारिस्टी यांचं योद्ध्यांचं नृत्य,आणि बडोद्याच्या अरुपा लाहिरी यांचं इतर कथांचा मागोवा: स्मृती आणि इतिहास यावर प्रात्यक्षिकासह व्याख्यान झालं, तर सायंकाळच्या सत्रात, सुखद मुंडे आणि समुहाचं पखावज वादन, प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांचं ख्याल गायन, आणि पार्वती दत्ता यांचं कथक नृत्यप्रकारात घरघरिका याबाबत सादरीकरण होणार आहे.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधुचा इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस् टुनजुंग हिनं पराभव केल्यामुळं तिचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
मोबिलिटी क्षेत्रातलं अभूतपूर्व परिवर्तन आणि झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे विकसित भारताचा प्रवास अधिक जलद होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं भारतातलं सर्वात मोठं परिवहन प्रदर्शन, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. भारत ग्रीन तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक वाहनं, हायड्रोजन इंधन आणि जैवइंधनांच्या विकासावर भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर्षी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोने आणखी विस्तार साधला असून, देश वाहन उद्योगाच्या भविष्याकडे सकारात्मक पाऊल टाकत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
या एक्स्पोचं उद्दिष्ट संपूर्ण गतिशीलता मूल्य साखळीला एकाच छत्राखाली आणणं हे आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात जागतिक महत्त्वावर विशेष भर दिला जाईल ज्यामध्ये जगभरातले प्रदर्शक आणि अभ्यागत सहभागी होतील.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रिडा पुरस्कारांचं वितरण झालं. बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलिट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनु भाकर यांना खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नेमबाज स्वप्निल कुसळे आणि पॅरा ॲथलिट सचिन खिलारी यांच्यासह ३५ जणांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर प्रशिक्षक सुभाष राणा, दीपाली देशपांडे, संदीप सांगवान यांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ॲथलिट सुचा सिंह आणि पॅरा जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या चंदीगढ विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आझाद चषक प्रदान करण्यात आला.
****
डिजीटल कौशल्य क्षेत्रात कॅनडा आणि जर्मनीला मागे टाकत भारतानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. क्यू एस वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्सने हा अहवाल जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी या कामगिरीबद्दल समाजमाध्यमावरील संदेशात आनंद व्यक्त केला. गेल्या दशकात सरकारने देशातल्या तरुणांना स्वावलंबी बनण्यास आणि रोजगार निर्मितीत सक्षम बनवणाऱ्या कौशल्यांनी सुसज्ज करण्याचं काम केलं आहे. देश समृद्धी आणि युवा सक्षमीकरणाच्या दिशेने प्रवास करत असताना हा अहवाल प्रसिद्ध होणं समाधानकारक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत ८४१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. येत्या २० तारखेपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून, आठ फेब्रुवारीला मतमोजणी होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठाच्या शार्ङ्गदेव महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. महागामीच्या वतीनं आयोजित या तीन दिवसीय महोत्सवात दररोज सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या सादरीकरणात यंदा ज्योती हेगडे यांचं रुद्र वीणा वादन, दशावतार प्रयोग, सुखद मुंडे आणि समूहाचं पखावज वादन, प्रसिद्ध गायक भुवनेश कोमकली यांचं ख्याल गायन, आदी सादरीकरणांसह दररोज सकाळी दहा वाजता शार्ङ्गदेव प्रसंग या व्याख्यानमालेसह, शार्ङ्गदेव प्रवाह या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवात शार्ङ्गदेव स्पंदन हे प्रदर्शनही पाहता येणार आहे. महोत्सवाचं हे १६ वं वर्ष आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावाची निर्घृण हत्या ��ाल्याचं उघडकीस आलं आहे. अजय आणि भरत भोसले हे आष्टी तालुक्यातल्या हातवळण या मूळ गावचे असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित चार जणांना ताब्यात घेतलं असून, हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं सांगितलं आहे.
****
भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या भंडारा - गडचिरोली समृद्धी महामार्गाला या परिसरातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या मार्गाच्या बांधकामाकरता जमिनीचं भूसंपादन करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली, मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही अधिसूचना जारी केली असून, या निर्णयामुळे शेतकरी भूमिहीन होतील, अशा आशयाचं पत्र या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधुचा सामना आज इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस् टुनजुंग हिच्याशी होणार आहे. सिंधुनं काल झालेल्या सामन्यात जपानच्या मनामी सुईझू हिचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. याच स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाइराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनेदेखील उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा १९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग असेल.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १५ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई इथं नौदलातल्या आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वागशीर या तीन लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत आज होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदनमोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
नौदलाच्या क्षमतांचा विचार करता पंधरा जानेवारी हा दिवस विशेष दिवस ठरेल, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या एका संदेशात म्हटलं आहे.या तीन अग्रणी युद्धनौकांचा नौदलात समावेश झाल्यामुळे संरक्षण क्षेत्रात जगात अग्रणी राहण्याच्या तसंच आत्मनिर्भर होण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळकटी मिळणार असल्याचं पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
आज सत्त्याहत्तरावा भारतीय लष्कर दिन साजरा केला जात आहे. फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांनी जनरल फ्रान्सिस रॉय बुचर यांच्याकडून १५ जानेवारी १९४९या दिवशी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल हा साजरा केला जातो.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दिनानिमित्त लष्कराला शुभेच्छा दिल्या असून, लष्कराच्या अमूल्य त्यागाबद्दल देश लष्कराचा कृतज्ञ आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. भारतीय लष्कर हे निर्धार,व्यावसायिकता आणि समर्पणाचं प्रतीक आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराचा गौरव केला आहे.आपल्या सीमांचं रक्षण करण्यासोबतच भारतीय लष्करानं नैसर्गिक संकटांच्या काळात नागरिकांना मदत करत अत्यंत मोलाची भूमिका बजावली आहे, असं सांगत,भारतीय लष्करातल्या कर्मचा-यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं कल्याण, यासाठी आपलं सरकार प्रतिबद्ध आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
या दिनाच्या निमित्तानं आज पुण्यामध्ये राज्याचा मुख्य संचलन सोहळा होत आहे.
'राष्ट्ररक्षा' हेच सर्वोच्च ध्येय मानून, आपले सर्वस्व त्यागून लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबांच���या समर्पणाला वंदन,अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
मकर संक्रांतीच्या पुण्य पर्व काळात प्रयागराज इथं आयोजित महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी लोकांनी अमृत स्नान केलं आहे. दरम्यान, जगातल्या सर्वात भव्य अशा या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत असून, प्रतिबंधित क्षेत्रात बळजबरीनं प्रवेश करणा-या नऊ ड्रोन्सना निष्क्रीय करण्यात आल्याचं वृत्त आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे. यावेळी यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मूकपट कालियामर्दन चं विशेष प्रदर्शन होणार आहे, तर रात्री नऊ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल इथं लिटील जाफना या चित्रपटानं या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.
****
महापारेषणच्या ऐरोली इथल्या राज्य भार प्रेषण केंद्राला देशातलं सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र आणि ओपन ऍक्सेस, या दोन राष्ट्रीय पुरस्कांरांनी गौरवण्यात आलं आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल या केंद्राला हे पुरस्कार मिळाले आहेत. इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेनं देशभरातल्या विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले आहेत.
****
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात एक लाख २० हजार पात्र लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांनी ही माहिती दिली. ऑनलाइन नोंदणी झालेल्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी विजयी सुरुवात केली. महिला एकेरीत पी व्ही सिंधु, पुरुष एकेरीत किरण जॉर्ज, पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रॅंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने, तर मिश्र दुहेरीत ध्रूव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीने विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 09 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०९ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ओडिशामधल्या भुवनेश्वर इथं अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उद्घाटन झालं. जगभरातल्या भारतीय समुदायातल्या नागरीकांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा मंच संधी उपलब्ध करुन देतो. यंदा या परिषदेत ५० देशांमधल्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे. या परिषदेचा समारोप उद्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. अनिवासी भारतीय दिवस आज साजरा होत असून, “भारतीय समुदायाचं विकसित भारतासाठीचं योगदान” ही या वर्षीची संकल्पना आहे.
आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथं झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीने वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपतीमध्ये एक लाख २० हजार टोकन वाटपासाठी ९५ कक्ष सुरु केले आहेत. त्यातल्या रामानयडू शाळेजव��च्या कक्षामध्ये काल ही दुर्घटना घडली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. नायडू आज दुपारी तिरुपतीला भेट देऊन आढावा घेणार आहेत.
जम्मू आणि श्रीनगरला जोडणारा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस या नवीन मार्गावर चालेल, प्रवाशांचा प्रवास अनुभव वाढेल, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे.
उच्च शिक्षणातील सकल नोंदणीचं प्रमाण पुढील दहा वर्षात ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मोठी जबाबदारी शिक्षणक्षेत्रातल्या सर्व घटकांवर मोठी जबाबदारी असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते काल बोतल होते. या समारंभात दहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, तर २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते झालं.
शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते काल मुंबईत बोलत होते.
सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन नक्षलवादी महिलांनी काल गडचिरोलीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो, आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी त्यांची नावं आहेत. शामला पुडो ही एटापल्ली तालुक्यातल्या गट्टेपल्ली इथली रहिवासी असून, २००२ मध्ये ती चामोर्शी दलममध्ये सहभागी झाली. तिच्यावर २१ चकमकी, सहा जाळपोळ, आणि इतर १८, अशा एकूण ४५ गुन्ह्यांची नोंद आहे. काजल वड्डे २०१८ पासून भामरागड दलममध्ये कार्यरत होती, तिच्यावर एकूण आठ गुन्ह्यांची नोंद आहे.
ऊसतोड कामगारांसाठी कारखाना परिसरात साक्षरता वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी सर्व साखर कारखान्यांना दिले होते. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या ९६ सहकारी आणि ९३ खाजगी अशा १८९ साखर कारखान्यांच्या परिसरात साक्षरता वर्ग सुरू झाले आहेत. यात आत्तापर्यंत ४ लाख ९२हजार निरक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.
नागपूरमध्ये १२ ते १४ जानेवा��ी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचं उद्घाट�� केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर मोरकरंजा गावाच्या शिवारात पोलिसांनी सापळा रचून गुजरातमधे दारुची तस्करी करणाऱ्या एका वाहनाला ताब्यात घेऊन, सात लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विसरवाडी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी प्रविण नथ्थू पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात म्हसदी इथं पोलिसांनी एका वाहनासह ७७ लाख २० हजार रुपये किंमतीचा बनावट मद्यसाठा जप्त केला. हा मद्यसाठा बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशानं म्हसदी गावातल्या जयेश गुंजाळ यानं आणला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार त्यांनी ही कारवाई केली.
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचे ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांच्या जोडीचा पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीन च्या जोडीने त्यांचा १३ - २१, २०-२२ असा पराभव केला. दरम्यान, या स्पर्धेत काल एच एस प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी आपापल्या गटात उप उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या खेळाडुवर तर मालविकानं मलेशियाच्या खेळाडुवर मात केली.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
अंमली पदार्थ विरोधातल्या लढाईत सहभागी होण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्राकडून जारी
देशभरात वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासंदर्भात केंद्र सरकारची विशेष योजना
गुजरातमध्ये कार आणि ट्रकच्या अपघातात पालघरच्या तीन तरुणांचा मृत्यू
आणि
मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच
****
अंमली पदार्थाच्या विरोधात लढणं हीच आजच्या काळातली देशभक्ती असून, या लढाईत सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वतीने नशा मुक्त नवी मुंबई अभियानाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. अंमली पदार्थांचे व्यवहार आज सामाजिक संपर्क माध्यमांवरूनही होत असल्याचं दिसून येत आहे, अशा व्यवहारांची माहिती मिळाल्यास, ८८ २८ ११२ ११२ या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले –
आज जो आपल्याला टोल फ्री नंबर सांगितलेला आहे, हा टोल फ्री नंबर याकरता आहे, की आपल्यापैकी कोणालाही कुठेही अशा प्रकारची शंका आढळली, तर आपण त्यानंबरवर सांगितलं पाहिजे. आपली आयडेंटीटी कुठेही डिस्क्लोज होणार नाही. हे खरंय की आपण, स्वतः कदाचित ड्रग पेडलरशी लढू शकणार नाही. पण त्या लढाईमध्ये आपण एक सैनिकाचं काम करू शकतो. इन्फॉर्मरचं काम करू शकतो. ती एक अत्यंत मोठी समाजाची सेवा असेल. आजच्या काळामध्ये ड्रग ॲडिक्शनच्या विरूद्ध लढणं ही खऱ्या अर्थानं देशभक्ती आहे.
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, सिने अभि��ेता आणि या उपक्रमाचा दूत जॉन अब्राहम, नवी मुंबई पोलीसचे आयुक्त मिलिंद भारंबे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तरुणांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचं आवाहन करतांनाच, नशेच्या आग्रहाला निर्धाराने नाही म्हणायचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. ते म्हणाले –
एक ॲडिक्ट हा स्वतःच जीवन तर बरबद करतोच, पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बरबाद करतो. अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बरबाद करतात. हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बरबाद करतात. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे. हा मागासलेलाय, बुरसटलेलाय अशा प्रकार हीनवू शकतात. पण त्यावेळी आपण नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरुकिल्ली आहे.
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातला शासन आदेश केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्याकडे आज सुपूर्द केला. सामंत यांनी नवी दिल्लीत आज शेखावत यांची भेट घेतली, ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे, आणि राज्य सरकारनं नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर सदर शासननिर्णय शेखावत यांनी सामंत यांच्याकडे सुपूर्द केला.
सामंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती देतांना, प्राकृत भाषेतल्या संशोधनासाठी सहाय्याची विनंती केंद्राकडे केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले –
मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे, त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे. मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना, आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं, ते आज अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय. प्राकृत भाषेला जो, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्या प्राकृतवर महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतंय. त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्यालादेखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.
दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यात तसंच विदेशातही मराठी भाषेचं जतन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली. ते म्हणाले –
आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्र शासनाने माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना आंतरराष्ट्रीय मराठी मंच स्थापन केलेला आहे. तोही अधिक सक्रीय करण्याची प्रक्रिया यानिमित्तानं सुरू होऊ शकेल असं मला वाटतं. सतरा देशांमध्ये आपले प्रतिनिधी आहेत. ते अजून वाढवून कसं त्यांना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामावून घेता येईल, या��ाही विचार मंत्रीमहोदयांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेता येईल.
****
देशभरात वाहन चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतुक आणि राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक योजना जाहीर केली आहे. अशी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत केली जाणार आहे. देशात प्रशिक्षित वाहन चालकांची संख्या कमी असल्याने, अधिकाधिक चालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यावर सरकारचा भर असेल, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अपघातातल्या जखमींवर उपचारासाठीच्या कॅशलेस योजनेला केंद्र सरकारनं आजपासून सुरुवात केली. गडकरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली, ते म्हणाले –
ॲक्सिडेंट होने के बाद तुरंत चौबीस घंटे के अंदर जैसे ही पुलिस मे इन्फर्मेशन जायेंगी, वो डॉक्टर जो होगा उसको, वो जो पेशंट ॲडमिट होगा, उसको सात दिन तक ट्रीटमेंट का खर्चा या मॅगझिमम देड लाख रूपये हम तुरंत देंगे उसकी ट्रीटमेंट के लिये। बादमें हीट ॲन्ड रन व्हिक्टीम जो है, उसमें भी मृत्यू होती है, तो हम दो लाख रूपये देंगे।
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सात कलमी कृती कार्यक्रमाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक शासकीय कार्यालयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते आज विविध विभागांच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात वाळूची अनधिकृत वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, तसंच महिलांची कामाच्या ठिकाणी, कुटुंबात आणि सार्वजनिक ठिकाणच्या सुरक्षेबाबत सर्व्हेक्षण करून उपाययोजना राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
****
गुजरातमध्ये अंकलेश्वर परिसरात कार आणि ट्रकच्या अपघातात पालघरच्या तीन तरुणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. पालघर तालुक्यातले हे तरुण राजस्थानात अजमेर शरीफ दर्गा इथं दर्शनासाठी गेले होते. अजमेरहून पालघरकडे परतत असताना आज सकाळी हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या एच. एस. प्रणॉयने मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यफेरीत त्याची लढत चीनच्या फेंग लीसोबत होणार आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कस्ट्रो तसंच आद्या वरियथ आणि सतीश करुणाकरन या जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिला एकेरीत मालविका बनसोड हिने स्पर्धेची दुसरी फेरी गाठली, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनीही महिला दुहेरीच्या अंतिम सोळामध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र, लक्ष्य सेनचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
औद्योगिक तसंच व्यावसायिक कामगारांची २८ वी आणि ��हिलांची २३ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा येत्या ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. पुरुष शहरी, पुरुष ग्रामीण आणि महिला अशा तीन गटात या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
****
सुमारे १० लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. शामला उर्फ लीला झुरु पुडो आणि काजल उर्फ तिम्मी मंगरु वड्डे अशी या दोघींची नावं आहेत.
****
तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवात आज देवीची विशेष रथ अलंकार महापूजा करण्यात आली. यासंदर्भातल्या आख्यायिकेनुसार भगवान सूर्यनारायणांनी त्रिलोक भ्रमणासाठी देवीला आपला रथ दिला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून रथ अलंकार महापूजा मांडली जाते.
****
एचएमपीव्ही या श्वसनविकाराबाबत घाबरण्याचं कारण नाही. याचा सामना करण्यासाठी बीड जिल्हा आरोग्य विभाग तयार असल्याचं, बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी म्हटलं आहे. धाराशिव जिल्ह्यातही याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असल्याचं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष तसंच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.एल हरिदास यांनी सांगितलं आहे.
****
आमदार सुरेश धस यांनी दिव्यांगांच्या बाबतीत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी केली आहे. ते आज बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी कारवाई न झाल्यास, मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाना समोर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा आठवले यांनी दिला. परभणी इथं सर्व पक्षीय मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत धस यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे.
****
परभणी इथं वातुक सुरक्षा सप्ताानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी आज जनजागृती फेरी काढली. हातात वाहतुक सुरक्षेचे संदेश देणारे फलक हाती घेतलेले विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले.
****
बीड इथले पोलीस शिपाई अनंत मारोती इंगळे यांनी, राहत्या घराजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आहे, आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत काल समारोप. • महायुती सरकारमध्ये खातेवाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिं���े यांची माहिती. • विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या बनावट चित्रफितप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. • फेंगल चक्रीवादळामुळं राज्यात मराठवाड्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट. आणि • सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधु आणि लक्ष्य सेननं पटकावलं विजेतेपद, महिला दुहेरीतही भारतीय खेळाडूंना जेतेपद.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या ५९ व्या अखिल भारतीय परिषदेची सांगता झाली. सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांमध्ये व्यत्यय आणणाऱ्या डिपफेकच्या संभाव्य गुन्ह्यांबद्दल तसंच डिजिटल फसवणूक, सायबर-गुन्हे आणि एआय तंत्रज्ञानामुळं निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. याचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी पोलीस नेतृत्वाला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आकांक्षी भारत या भारताच्या दुहेरी एआय शक्तीचा उपयोग करून आव्हानाचं संधीत रूपांतरित करण्याचं आवाहन केलं. तसंच ��्मार्ट पोलिसिंगचा मंत्र विस्तारून पोलिसांना व्यूहात्मक, सावध, अनुकूलक्षम, विश्वासार्ह आणि पारदर्शक बनण्याचं आवाहन केलं. शहरी पोलिसिंगमध्ये घेतलेल्या पुढाकारांचे कौतुक करून, प्रत्येक उपक्रम एकत्रित करून देशातील १०० शहरांमध्ये संपूर्णपणे लागू करावा असं त्यांनी सुचवलं. समारोप सत्रात पंतप्रधानांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांनी सन्मानित केले.
महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा सुरु आहे. लवकरच सर्व चर्चा मार्गी लागून जनतेसाठी काम करणारं सरकार स्थापन होईल, असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी काल सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळ गावी माध्यमांशी संवाद साधला. सरकारमध्ये खातेवाटपावरून मतभेद नाहीत. तसंच मुख्यमंत्रीपदाविषयी आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केल्याचं शिंदे म्हणाले. एक बैठक आमची अमितभाईंच्या बरोबर झालेली आहे. दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची. आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक-बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा. या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, एवढी मेजॉरिटी दिली. आता चांगलं सरकार स्थापन व्हावं ही जी अपेक्षा जनतेची आहे, ती आम्ही पूर्ण करणार. आणि जनतेबरोबर आम्ही उत्तरदायीत्व आहोत. त्यामुळे आता विरोधकांना काही काम राहिलं का?
ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवरही एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. अपयश आल्यानंतर विरोधकांनी आता ईव्हीएमचा मुद्दा पुढं केला असल्याचं शिंदे म्हणाले. ई व्ही एम ची चर्चा चालू आहे. झारखंड मध्ये ते जिंकले आणि त्याच बरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले, तेव्हा काही ई व्ही एम चांगलं होतं? आत्ता पण लोकसभेत त्यांचा एक माणूस जिंकलाय पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंड मध्ये असेल, यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळालंय. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प्रेम दिलंय. लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिलंय. लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय. या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटीनं आलंय.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीमधल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागानं गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केल��� होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाजमाध्यमावरच्या निवेदनातून दिली. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र हे स्वतंत्र यंत्र असून, त्याला कोणत्याही नेटवर्क, वाय - फाय किंवा ब्लूटूथला जोडता येत नाही, त्यामुळं या यंत्रासोबत छेडछाडीची कोणतीच शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयानंही अनेक वेळा या यंत्रांवर विश्वास व्यक्त केला असल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे. दरम्यान, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या बाराशे वरुन जास्तीत जास्त १५०० पर्यंत वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक काल मुंबईत पार पडली. या बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची, मुख्य प्रतोदपदी आमदार रोहित पाटील यांची, तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. विधीमंडळ पक्षाचा नेता या बैठकीत ठरवण्यात आलेला नाही. अधिवेशन काळात विधीमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यात येईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागानं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीमेचा तिसरा टप्पा पूर्ण केला. या मोहिमेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्रानं चांगली कामगिरी करत २० लाख डिजीटल जीवन प्रमाणपत्राचं उद्दिष्ट साध्य केल्याचं कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
दूध उत्पादकांना अनुदान देण्यासाठी राज्यसरकारकडून २६७ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे; त्यानंतर आता ऑक्टोबर अखेरपर्यंतचं अनुदान वितरित केलं जाणार असल्याची माहिती पुणे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली. यासाठी संबंधित संस्थांनी तातडीनं प्रस्ताव सादर करावेत असं ते म्हणाले.
देशात एड्सनं होणाऱ्या मृत्यूची संख्या ७९ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर एचआयव्ही संसर्गात २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये ४४ टक्क्यांनी घट झाल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. नड्डा यांच्या उपस्थितीत इंदोर इथं जागतिक एड्स दिनानिमित्त काल मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याप्रसंगी ते बोलत होते.
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअस��ी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाच डिसेंबरपर्यंत राज्याच्या बहुतेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि महिला दुहेरी प्रकाराचं विजेतेपद पटकावलं. पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं सिंगापूरच्या खेळाडूवर २१-६, २१-७ असा विजय मिळवला. तर, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात सिंधुनं चीनच्या वू ल्यु यू हिचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत मात्र भारतीय जोडगोळीला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.
दक्षिण आफ्रिकेतील डर्बनमध्ये ११ व्या कॉमन वेल्थ कराटे स्पर्धेत सोलापूरच्या कुमारी आर्या साईनाथ यादव हिनं रौप्य पदक पटकावलं. ३९ देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत आर्यानं ५३ किलो वजनीगटात रौप्य पदक पटकावलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्याचं अभिनंदन केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २५ ते २८ डिसेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सहा रंगमंचावरून एकूण ३६ कलाप्रकारांचं सादरीकरण या स्पर्धेत होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या कांचन वाडी परिसरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात काल विधी पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरता कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट -२०२५ घेण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी ही परिक्षा काल पार पडली. ४५० विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी तर १२१ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा दिली.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य शिवराज नाकाडे यांचं काल लातूर इथं निधन झालं. ते ९१ वर्षाचे होते. १९९४ ते १९९९ या काळात ते विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल लातूर जिल्ह्यातील गंगापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या सातारा परिसरातील खंडोबा अर्थात मार्तंड भैरव यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. ८०० वर्षा पेक्षा अधिक काळाची या यात्रेची परंपरा असून या यात्रेत राज्यभरातून लोखा भक्त प्रतिवर्षी सहभागी होतात. येत्या सात ते नऊ डिसेंबर दरम्यान दर्शनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदि�� देवस्थानांकडून चोख व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती देवस्थानचे सचिव साहेबराव पळसकर यांनी दिली आहे.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप
महायुती सरकारमध्ये खातेवाटपाची चर्चा लवकरच पूर्ण होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्या बनावट चित्रफितप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
फेंगल चक्रीवादळामुळं राज्यात मराठवाड्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट
आणि
सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधुने पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद, महिला दुहेरीतही भारतीय खेळाडूंना जेतेपद
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुवनेश्वर इथं आयोजित पोलीस आणि गुप्तवार्ता संघटनांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पोलिसदल आणि सुरक्षेसंबंधीच्या विविध बाबींवर विचार मांडले तसंच काही सूचना केल्या. पंतप्रधान मोदी तीन दिवसीय अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज सलग दुसऱ्या दिवशीही सहभागी झाले होते. या ��रिषदेत राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी आव्हानांवर उहापोह करण्यात आला. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचे आव्हान या विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली. देशभरातील २०० पेक्षा अधिक अधिकाऱ्यांची या परिषदेला उपस्थिती होती.
****
महायुतीमध्ये सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा सुरु आहे. लवकरच सर्व चर्चा मार्गी लागून जनतेसाठी काम करणारं सरकार स्थापन होईल, असं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी आज सातारा जिल्ह्यात दरे या आपल्या मूळ गावी माध्यमांशी संवाद साधला. सरकारमध्ये खातेवाटपावरून मतभेद नाहीत. तसंच मुख्यमंत्रीपदाविषयी आपली भूमिका गेल्या आठवड्यातच स्पष्ट केल्याचं शिंदे म्हणाले.
एक बैठक आमची अमितभाईंच्या बरोबर झालेली आहे. दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची. आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक-बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा. या जनतेने आम्हाला भरभरून दिलेलं आहे. जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली, एवढी मेजॉरिटी दिली. आता चांगलं सरकार स्थापन व्हावं ही जी अपेक्षा जनतेची आहे, ती आम्ही पूर्ण करणार. आणि जनतेबरोबर आम्ही उत्तरदायीत्व आहोत. त्यामुळे आता विरोधकांना काही काम राहिलं का?
****
ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवरही एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. अपयश आल्यानंतर आता ईव्हीएमचा मुद्दा पुढे केल्याचं शिंदे म्हणाले.
ई व्ही एम ची चर्चा चालू आहे. झारखंड मध्ये ते जिंकले आणि त्याच बरोबर लोकसभेमध्ये ते जिंकले, तेव्हा काही ई व्ही एम चांगलं होतं? आत्ता पण लोकसभेत त्यांचा एक माणूस जिंकलाय पोटनिवडणुकीमध्ये. त्यामुळे कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये असेल, झारखंड मध्ये असेल, यामध्ये विरोधी पक्षाला देखील यश मिळालंय. त्यामुळे लाडक्या बहिणींचा मोठा सहभाग या विजयामध्ये आहे. आणि लाडक्या भावांना त्यांनी भरभरून प���रेम दिलंय. लाडक्या भावांनी आम्हाला प्रेम दिलंय. लाडक्या शेतकऱ्यांनी दिलंय. या सर्वांच्या एकजुटीच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेजॉरिटीनं आलंय.
****
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचा दावा करणारी एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत आहे. या ध्वनिचित्रफितीतल्या व्यक्तीविरोधात मुंबई पोलीसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं समाजमाध्यमावरच्या निवेदनातून दिली.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीने आपल्या ध्वनीचित्रफितीत इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये फेरफार करून ते हॅक केल्याचा केलेला दावा खोटा आणि तथ्यहीन असल्याचंही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र हे स्वतंत्र यंत्र असून, त्याला कोणत्याही नेटवर्क, वाय-फाय किंवा ब्लूटूथला जोडता येत नाही, त्यामुळं या यंत्रासोबत छेडछाडीची कोणतीच शक्यता नाही. सर्वोच्च न्यायालयानंही अनेक वेळा या यंत्रांवर विश्वास व्यक्त केला असल्याचं निवडणूक कार्यालयानं म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात माळशिरसमधल्या मारकडवाडी गावानं केलेली फेरमतदानाची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅटवर होणारं मतदान योग्य आहे की नाही, याची मॉकपोलव्दारे चाचणी देान्ही बाजूच्या उमेवारांच्या उपस्थितीत झाली. त्यावरचे आक्षेप त्याचवेळी नोंदवायचे होते, असं आयोगानं म्हटलं आहे. निकाल लागून दोन आठवडे झाल्यामुळे फेरमतदानही घेता येणार नाही, असा खुलासाही त्यांनी केला आहे.
****
तेलंगणात, मुलुगु जिल्ह्यात आज सकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत किमान सात नक्षलवादी ठार झाले. या नक्षल्यांमध्ये राज्य समितीचा सचिव आणि इतर दोन राज्य समिती सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांचे खबरे असल्याचं सांगून त्यांनी दोन आदिवासींना ठार मारल्यानंतर काही वेळातच ही चकमक झाली.
****
सरकारनं केलेल्या उपाययोजनांमुळं २०१०च्या तुलनेत २०२३ मध्ये एड्स संक्रमणांचं प्रमाण ४४ टक्क्यांनी कमी झालं आहे, तर एड्स रुग्णांच्या मृत्यूमध्ये ७९ टक्क्यांनी घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दिली. नड्डा यांच्या उपस्थितीत इंदोर इथं मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. २०३० पर्यंत एचआईवी निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
हवामान विभागानं आज तामिळनाडूसाठीही रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारी भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसनी घट होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रिवादळाचा प्रभाव पुढील पाच ते सहा तासात कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. काल रात्री तामिळनाडू आणि पुद्दुचेरी किनारपट्टीवर कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान या चक्रीवादळानं धडक दिली. त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी इथं जोरदार पाऊस झाला. याचा परिणाम बस, रेल्वे आणि विमान सेवांसह सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाला होता. ही वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
****
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. तिनं आज लखनऊमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात चीनच्या वू ल्यु यू हिचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. त्यापूर्वी भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी चीनच्या जोडीचा २१-१८, २१-११ असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात लक्ष्य सेनचा मुकाबला सिंगापूरच्या खेळाडूशी होत आहे.
****
नंदुरबार जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या ३३ रुग्णवाहीकेचे आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. याव्यतिरीक्त शासनाकडून नर्मदा नदी काठावरील अतिदुर्गम भागातील गावांसाठी बोट अँम्ब्युलन्स आणि अजून नवीन २२ रुग्णावाहीकांची मागणी केली असल्याचं गावित यांनी सांगितलं.
****
जातीपातींना शास्त्रात स्थान नाही, तरीही जातीभेद सुरूच आहेत, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. ते आज नागपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. आपली संस्कृती एका भाषेपुरती आणि जातीपुरती मर्यादित नाही, ती सर्वांची आहे, मात्र गेल्या दीडशे वर्षात संकुचित वृत्ती वाढत आहे, असं भागवत म्हणाले. फक्त आपल्यापुरतं पाहायची वृत्ती योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
****
हिंगोली जिल्ह्याला इसापूर धरणातून रब्बी हंगामासाठी तीन पाणीपाळ्या तर उन्हाळी हंगामात चार पाणीपाळ्या देण्याच्या नियोजनास पाटबंधारे विभागानं मान्यता दिली. उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर डावा कालवा तसंच इसापूर उजवा कालवा आणि त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल, असं विभागानं कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. २५ ते २८ डिसेंबर दरम्यान विद्यापीठ परिसरात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. एकूण ३६ कलाप्रकारांचे सहा रंगमंचावरून सादरीकरण होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०१ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषेदचा समारोप • महायुती सरकारचा शपथविधी पाच डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार • राज्य विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चर्चेची निवडणूक आयोगाची तयारी • पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल आणि • राज्यात थंडीची लाट आणखी दोन दिवस राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज ओडिशाच्या भुवनेश्वर इथं पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेचा समारोप होत आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलिस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, राष्ट्रीय सुरक्षा दल - एनएसजी, गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल - एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित आहेत. या परिषदेत अंतर्गत सुरक्षा, सायबर क्राईम, नक्षलवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांमुळे निर्माण होणारी आव्हानं, ड्रोनचे नवीन धोके आणि दहशतवादाचा सामना यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या परिषदेत विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलिस पदकंही प्रदान करण्यात येणार आहेत.
राज्यात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार आहे. भारतीय जनता प��्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ट्विट करून ही माहिती दिली. पाच डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होती, तरीही काँग्रेस पक्षाने याबाबत उपस्थित केलेल्या वाजवी मुद्यांवर परवा तीन डिसेंबरला चर्चेला येण्याचं आमंत्रण केंद्रीय निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेबाबत शंका उपस्थित करणारं पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिलं होतं. त्यावर दिलेल्या अंतरिम उत्तरात आयोगानं, मतदानाच्या टक्केवारीत काहीही विसंगती नसल्याचं स्पष्ट करत, संबंधित माहिती मतदान केंद्रांच्या तपशिलासह सर्व उमेदवारांना उपलब्ध होती आणि ती पडताळून पाहणंही शक्य होतं, असं नमूद केलं. मतदानाच्या आकडेवारीबाबत खुलासेवार प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलेलं आहे, असंही आयोगानं म्हटलं आहे.
देशात संसदीय लोकशाहीचं पालन नीट होत नसल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता पसरली असून देशात हे प्रथमच घडत असल्याचं पवार म्हणाले. मतदान यंत्राबद्दल काही शंका आहेत, मात्र याबद्दल ठोस पुरावा नाही. काही जणांनी पुनर्मोजणीची मागणी केली आहे, मात्र यातून काही निष्पन्न होईल, अशी आशा नसल्याचं, पवार यांनी सांगितलं.
नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषीकेश उर्फ बंटी शेळके यांना प्रदेश काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबाबत आपल्याला निलंबित का करू नये, असं यात म्हटलं असून, यासंदर्भात २ दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश शेळके यांना देण्यात आले आहेत. दोन दिवसांत उत्तर न दिल्यास, याबाबत आपलं काहीही म्हणणं नाही, असं समजून थेट कारवाई करण्यात येईल, असं याबाबतच्या पत्रात म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाने खचून जाऊ नये, उलट दुप्पट शक्तीने मोठी ताकद उभी करण्याचं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या पक्ष पदाधिकाऱ्यांना केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं, जिल्ह्यातल्या विविध विधानसभा मतदार संघातल्या पक्ष पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. संघटनात्मकरित्या मोठी ताकद उभी करुन पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसू नका असं दानवे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
सर्पदंशाची प्रकरणं अधिसूचित रोगांच्या श्रेणीत समाविष्ट करण्याची सूच��ा केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी केली आहे. याबाबत त्यांनी काल सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव तसंच अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिलं असून, त्यात ही सूचना केली आहे. सर्पदंश हा गंभीर विषय असून, २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण निम्म्यावर आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं नोव्हेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून पाळण्यात येतो. या दत्तक महिन्यानिमित्त हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी, आखाडा बाळापूर इथलं पोलिस ठाणं, बसस्थानक, उपजिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मुल दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. दरम्यान, सोडून दिलेल्या, अनाथ बालकांसंदर्भात माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली यांना संपर्क करावा, असं आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केलं आहे.
स्वामिनाथन् आयोगानुसार शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा भाव ठरवला गेला पाहिजे, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलन कार्यकर्त्या आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयक मेधा पाटकर यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी भवनात शेतकरी कष्टकरी कार्यकर्त्यांबरोबर पाटकर यांनी काल संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. शेतकरी कुटुंबाच्या श्रमांची दखल, या शेत मालाच्या भावामध्ये धरली जावी, श्रमाचं मूल्य , श्रमाची प्रतिष्ठा जोपासली जावी असं या म्हणाल्या. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्याची गरजही पाटकर यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच आत्मक्लेष उपोषणाच्या समर्थनार्थ काल छत्रपती संभाजीनगर इथं श्रमजीवी संघटनेच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. बाबा आढाव यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन या उपोषण आंदोलनाची सांगता केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल आढाव यांची उपोषणस्थळी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यावेळी कुणीही मतदान यंत्रावर शंका घेतली नाही, असं सांगत विरोधकांनी केलेले सर्व आरोप पवार यांनी फेटाळून लावले.
सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत अव्वल मानांकित पी.व्ही सिंधूनं काल अंतिम फेरीत प्रवेश केला. उपान्त्य फेरीत तिनं उन्नती हुडा हिला अवघ्या ३५ मिनिटांत २१- १२, २१ - ०९ असं पराभूत केलं. अंतिम फेरीत सिंधुची लढत थायलँडच्या वू लुओ यू हिच्याशी होणार आहे. ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांनी थायलँडच्या बेनियपा एमसार्�� आणि नुन्ताकाम एमसार्ड या जोडीला नमवलं. पुरुष गटाच्या उपान्त्य फेरीत लक्ष्य सेन ने जपानच्या शोगो ओगावा याचा २१ -८ आणि २१ - १४ अशा गुणफरकाने पराभव केला. अंतिम फेरीत आता त्याचा सामना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांनी चीनच्या झोऊ झी होंग आणि यांग जिया यी जोडीवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली असून, पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गारवा जाणवत आहे. येत्या दोन दिवसांत काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. विदर्भातही पारा घसरला असून, अमरावती जिल्ह्यात काल सकाळी बारा अंश सेल्सिअस, धारणी-चिखलदरा इथं नऊ अंश सेल्सिअस तर नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात काल सकाळी सात अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली,
५३ वी आंतरजिल्हा आणि ८६ वी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेत २५ जिल्ह्यांमधील एक हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होत आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं दिल्ली इथं होणाऱ्या ९८ वाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारनं पुण्याहून विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हे साहित्य संमेलन होणार आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेलं फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीजवळच्या कराईकल आणि महाबलीपुरम्च्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टी आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. चेन्नईत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विमान उड्डाणांवर परिणाम झाला आहे. वादळी वारे आणि पावसाचं पाणी साचल्याने अनेक विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं आहे.
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामाला गती आली आहे. या मार्गापैकी धाराशिव-तुळजापूर या पहिल्या टप्प्यात आठ किलोमीटर अंतराचं काम वेगात सुरू आहे. या मार्गावर लहान-मोठे एकूण ५० पूल असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर १०६ मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताचे नवे कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित औपचारिक समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, मूर्ती यांना शपथ दिली. भारताचे चौदावे कॅग गिरीश चंद्र मुर्मू काल सेवानिवृत्त झाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गयाना दौऱ्यावर असून, ते आज गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करणार आहेत. तसंच तिथल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. पंतप्रधान गयाना आणि इतर कॅरेबियन देशांच्या क्रिकेटपटूंचीही भेट घेणार असून, गयाना मधल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत. गयानामधल्या भारतीय संस्कृतीवर आधारित सरस्वती विद्यानिकेतन शाळेला देखील पंतप्रधान भेट देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य ��ुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.
****
विकसनशील देशांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहमती दर्शवलेल्या आश्वासनांची पूर्तता विकसित देशांनी करावी, असं आवाहन, भारतानं काल कॉप 29 या हवामानविषयक जागतिक परिषदेत केलं. विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं, त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले अनियमित बदल घडून येत आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना सहन करावा लागतो. विकसनशील देशांतल्या लोकांचं जगणं आणि आयुष्य, यामुळे धोक्यात येत असल्याचं भारतानं कॉप 29 मधल्या उच्चस्तरीय मंत्री परिषदेत निवेदनाद्वारे सांगितलं.
****
प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. जगभरात दरवर्षी २० लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध- प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल, असं सिंग यांनी यावेळी सांगितलं. मेड इन इंडिया असलेलं नॅफिथ्रोमायसिन अँटीबायोटिक हे जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या समर्थनाने विकसित करण्यात आलं असून मिकनाफ या नावाने ते बाजारात आणण्यात आलं आहे. प्रतिजैविक प्रतिकार-एएमआर चा सामना करणारं हे देशात��ं पहिलं स्वदेशी विकसित प्रतिजैविक आहे.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीच्या उद्घाटन समारंभात काल प्रसारभारतीच्या ओटीटी मंचाचा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हस्ते प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते. वेव्ज नावाच्या या मंचावर अभिजात आणि समकालीन अशा दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांचा संगम झालेला दिसून येईल. रामायण, महाभारत, शक्तिमान अशा पूर्वीच्या लोकप्रिय कार्यक्रमांचा आस्वाद प्रेक्षकांना पुन्हा घेता येईल. भारताच्या भूतकाळाशी सांस्कृतिक आणि भावनिक नातं घनिष्ट करण्याच्या उद्देशानं यातल्या कन्टेन्ट म्हणजे आशयाची निवड करण्यात आली आहे. विविध भाषांमधल्या वाहिन्यांवरच्या बातम्यांबरोबरच मनोरंजन, चित्रपट, दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम आणि खेळ असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम या मंचावर उपलब्ध असतील.
****
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नियुक्त संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतरचा अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला जाईल, असं समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सांगितलं. या समितीनं नऊ ते १४ नोव्हेंबर दरम्यान गुवाहाटी भुवनेश्वर, कोलकाता, पटना, लखनौचा दौरा करून वक्फ सुधारणा विधेयकाचा अभ्यास केला होता.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होतील असं मंडळानं कळवलं आहे. दहावीच्या परीक्षा १८ मार्च रोजी संपतील तर बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपणार आहेत.
****
चीनमध्ये शेनझेन इथं सुरू असलेल्या चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, मालविका बनसोड यांनी महिला एकेरीच्या आणि लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उप -उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत आज लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेम्के सोबत, पी व्ही सिंधुचा सामना सिंगापूरच्या येओ जिया मिन बरोबर, तर मालविकाचा सामना थायलंडच्या सुपानिडा काटोथोंग सोबत होणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्यापासून पर्थ इथं सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
भ्रष्टाचार हा एक आजार असून तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. विश्वास हा समाजाचा पाया असून भ्रष्टाचारामुळे समाजातील विश्वास कमी होतो, असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेसारखे उपक्रम शासनातर्फे राबवले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
नवी दिल्लीत आज पासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवाला सुरुवात होत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा यांचा अभ्यास करणारे शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. याचबरोबर लष्कराच्या शौर्य गाथा प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी होणार आहे. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या लष्करी परंपरांचं संवर्धन आणि प्रसार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातल्या प्रचारसंभांना आजपासून सुरुवात झाली. आज पहिली सभा धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांजरापोळ गोशाळा इथं सुरू झाली आहे. त्यानंतर दुपारी नाशिक इथं तपोवन परिसरात मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सुरक्षा व्यवस्था चोख आहे. तपोवनासह सुमारे ११ मार्गांवरील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महायुतीततल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते या सभांना उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजपनेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांगली इथं सभा सुरू आहे. त्यानंतर ते सातारा जिल्ह्यात कराड इथं जाहीरसभा घेणार आहेत. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात तीन प्रचारस��ा होणार आहेत. यात परंडा, धाराशिव आणि उमरगा इथले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे डॉक्टर तानाजी सावंत, अजित पिंगळे आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं प्रचार सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज लातूर इथं तीन सभा होणार आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहर तसंच निलंगा आणि गंजगोलाई इथं या सभा होणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं आजपासून १६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीनं रेल्वेनं ४७६ गाड्यांचं नियोजन केलं आहे. रेल्वे विभागातर्फे आतापर्यंत चार हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माह��ती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या चार तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.
नांदेड बिदर महामार्गावर एकुर्का रोडवर टेम्पो आणि कारच्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली. कारमधील सर्वजण कपड्यांच्या खरेदीसाठी उदगीर इथं जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. यात आई, दोन विवाहीत मुली आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसी यानं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरे स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रांड मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर त्यानंतर अॅलेक्सी सरानावर विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्र�� साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या किरण जॉर्जने आपलं स्थान निश्चित केलं आहे. आज सकाळी उपांत्यपूर्व फेरीत त्याने जपानच्या खेळाडूचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. तत्पूर्वी, काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत जॉर्जने तैवानच्या खेळाडूचा पराभव केला.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 17 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या ��हकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदी नायबसिंह चैनी यांचा आज सलग दुसऱ्यांदा शपथविधी होणार आहे. पंचकुलामधल्या शालिमार मैदानावर हा शपथविधी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. चैनी यांनी काल राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. चैनी यांच्या शपथविधीसाठी सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद आज चंडीगडमध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राष्ट्रीय विकासाशी संबंधित मुद्यांवर परिषदेत चर्चा होणार आहे.
****
नागरिकत्व कायद्याचं कलम सहा ए संवैधानिक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित हे कलम आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आसाम करार हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवर राजकीय उपाय असल्याचं नमूद केलं.
दरम्यान, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आहे. न्यायमूर्ती खन्ना येत्या ११ नोव्हेंबरला सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारतील.
****
बिहारमधल्या सिवान आणि सारन जिल्ह्यात मद्य सेवनामुळे २५ जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सेवन केलेलं मद्य विषारी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, सारनमध्ये आठ आणि सिवानमध्ये दहा दारू विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं सिवानचे पोलिस अधिक्षक अमितेश कुमार यांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘रणांगण विधानसभेचं’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक अजून जाहीर झालं नसल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे. या परीक्षांच्या तारखा प्रकाशित झाल्याची बातमी काही ठिकाणी प्रसारित झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे मंडळानं हा खुलासा केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात उप-उपान्त्यपूर्व फेरीत भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा सामना आज चीनच्या हान यू हिच्याशी होणार आहे. पहिल्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सामना अर्ध्यावर सोडून दिल्यामुळे सिंधूला पुढे चाल मिळाली होती.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा खेळ आज दुसऱ्या दिवशी सुरु झाला, मात्र काही वेळानंतर पावसामुळे खेळ पुन्हा थांबवावा लागला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारताच्या तीन बाद १३ धावा झाल्या आहेत.
****
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं चक्रीवादळ आज सकाळी आंध्र प्रदेशच्या टाडा गावाजवळ पोहोचलं. दुपारपर्यंत आंध्र प्रदेशमध्ये या वादळाचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूजवळ चेन्नईपासून ३२० किलोमीटर वर समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याचा परिणाम म्हणून तामिळनाडूमध्ये आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढच्या तीन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तापमानात घट झाल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे.
****
0 notes