#सल्लागार
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 21 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
छत्तीसगढ आणि ओडिशाच्या सीमेवर काल रात्री झालेल्या संयुक्त अभियानात १४ नक्षलवादी मारले गेले. कुल्हाडीघाट आरक्षित वन क्षेत्रात मोठ्या संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगढ आणि ओडिशा पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी संयुक्तपणे हे अभियान राबवलं. घटनास्थळावरुन काल रात्री दोन आणि आज सकाळी १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
या कारवाईमुळे नक्षलमुक्त भारत निर्माण करण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सामाजिक माध्यमावरच्या संदेशात त्यांनी, नक्षलवादाला हा आणखी एक मोठा धक्का असल्याचं नमूद केलं.
****
स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरु असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत भारतीय पॅवेलियनचं उद्घाटन आज झालं. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी संयुक्तपणे या दालनाचं उद्घाटन केलं. त्यानंतर पासवान यांनी कोका कोला चे मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक ब्रॉन यांची भेट घेऊन, अन्न प्रक्रिया उद्योगाला अधिक सक्षम करण्यासह यामध्ये उत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यावर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी उपस्थित होते.
****
येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष दोन चित्ररथ सहभागी होणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुब्रियांतो हे या संचलनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या संचलनात इंडोनेशियाच्या १६० सैनिकांची एक तुकडी आणि १९० जणांचं लष्करी बॅंड पथक सहभागी होणार आहे.
****
महसूल विभागात राबवण्यात येत असलेला शंभर दिवसांसाठीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना शासनाच्या सेवा अधिक जलद गतीनं उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. महसूल विभागाअंतर्गत शंभर दिवसांत घेण्यात येत असलेले कार्यक्रम, योजनांचा आढावा बावनकुळे यांनी घेतला. नागरिकांना महसूल विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन देण्यासाठी पोर्टलचा अधिकाधिक वापर करावा, यामध्ये जमीन पोर्टल, महाखनिज पोर्टल, आपली चावडी, ई चावडी यासारख्या प्रणालींचा वापर करावा असंही त्यांनी सांगितलं. महसूल विभागाचे निर्णय तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याबरोबरच कार्यशाळा आयोजित कराव्यात, नोंदणी आणि मुद्रांक विभागातल्या कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण कराव्यात, क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात नियमित भेटी देऊन योजना, उपक्रमांचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.
****
स्वामित्व योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या मालमत्ता कार्डावर बॅंकांना संबंधित मालकास अर्थसहाय्य देता येते, त्यातून ग्रामिण भागातले लोक आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकतात, याबाबत बॅंकांनी अंमलबजावणी करावी, मालमत्ता कार्ड हे वैध दस्ताऐवज आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हा सल्लागार आणि समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पिक कर्ज योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, जीवनोन्नती अभियान, कृषी अर्थसहाय्य, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय अर्थ सहाय्य, प्रधानमंत्री विश्वकर्मा अशा विविध योजनांतर्गत अर्थसहाय्याबाबत आढावा या बैठकीत घेण्यात आला.
****
जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने बीड ��िल्ह्यातले १३ सरपंच आणि ४१८ ग्रामपंचायत सदस्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले. २०२० पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
****
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त येत्या २५ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करुन मतदार जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मतदारांना शपथ, मतदार ओळख पत्रांचं वाटप, तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचं आयोजन करावं, असे निर्देशही स्वामी यांनी दिले.
****
0 notes
Text
नागपूर हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरला संस्थगित होणार
नागपूर, दि. १८:- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज नियोजनाप्रमाणे वेळेत पूर्ण होणार असल्याने शनिवार, दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीची, तर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषद…
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १०
अनंत,शुभदा आणि सावंतसाहेब यांची भेट जवळजवळ २ तास रंगली! अनंतकडे गुंतवणूकीसाठी लौकरच उपलब्ध होणारी रक्कम लक्षांत घेऊन सावंतसाहेबांनी केवळ विविध पर्याय सुचवले नाहींत तर प्रत्येक पर्यायातले फायदे आणि धोकेही विस्ताराने समजावले! "व्यक्तीशः तुुमची अंतिम शिफारस काय आहे?" असा प्र��्न अनंतने उपस्थित केल्यावर ते स्मित करीत उत्तरले: "मी शेवटी एक व्यावसायिक एजंट आहे! गुंतवणुकीच्या कुठल्याही प्रकारावर मला ठरलेल्या दरानं कमिशन मिळतं! त्यामुळे मी मला जास्त कमिशन देणाऱ्या पर्यायांचा उदोउदो करणार हे गृहीत धरलं जातं! म्हणूनच आर्थिक सल्लागार या नात्यानं मी कुठलीही वैयक्तिक शिफारस करीत नाही!" आपल्या उत्तरानं अनंत गोंधळल्याचं जाणवून त्यांनी अधिक खुलासा केला, "प्रत्यक्षांत रक्कम गुंतवण्यापूर्वी हाती असलेल्या वेळांत मी सुचवलेल्या विविध पर्यायांचा सारासार विचार करा आणि तुम्हांला अपेक्षित असलेल्या मासिक उत्पन्नानुसार योग्य पर्याय निवडा! 'दिसणारा फायदा जेवढा अधिक तेवढा त्या गुंतवणुकीत धोका जास्त' हे कायम ध्यानांत ठेवा! एवढंच नव्हे तर तुमचे कांही निवृत्त झालेले मित्र आणि आप्तेष्ट असतील त्यांचे अनुभवसुद्धां विचारांत घ्या असं मी सुचवीन!" "ठीक आहे, सावंतसाहेब! प्रत्यक्ष रक्कम हातीं येईपर्यंत तुमच्या सर्व ञसुचना लक्षांत ठेवून आम्ही योग्य वाटेल तो निर्णय ठरवूं आणि पुन: तुम्हांला भेंटूं!" असं म्हणून अनंतने त्यांचा साभार निरोप घेतला!
रस्त्याला लागल्यावर मनगटावरील घड्याळात वेळ बघून अनंतने शुभदाला विचारलं, "एक वाजून गेला आहे! आतां घरी जाऊन तू स्वयंपाक करण्यापेक्षा जवळच एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमधे पोटपूजा करुंया कां?" "हो,चालेल!" म्हणत शुभदानं सहमती दर्शवली. वर्दळीचा भाग असल्याने चांगलं रेस्टॉरंटही चटकन् द्रष्टिक्षेपात आलं. एका बाजूचं निवांत टेबल निवडून स्थानापन्न होत अनंत म्हणाला, "शुभदा, मला खुप बरं वाटलं इतक्या मोकळेपणानं तूं मनातल्या सर्व शंका सावंतसाहेबांना विचारल्याबद्दल!" "ते सगळं इतकं छान आणि सविस्तर सांगत होते की माझाही धीर चेपला! त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांचं निरसन किती व्यवस्थित केलं ना!" शुभदा कौतुकानं उद्गारली. "त्यांचा व्यवसायच असा आहे की सर्व शंका फिटल्याखेरीज कुणी त्यांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणारच नाही! 'संपूर्ण शंकानिरसन' हा त्यांच्या व्यवसायाचा पायाच आहे!" "तुमची आणि सावंतसाहेबांची ओळख कशी काय झाली?" शुभदानं कुतूहलानं विचारलं "तूं टवाळी करतेस त्या आमच्या 'खाबू ��्रुुप'च्या रवींद्र पाध्यांनी मी सहज गुंतवणुकीविषयक चौकशी करीत होतो, तेव्हां सावंतसाहेबांचं नांव केवळ सुचवलं नाहीं, तर आमचा परिचयही करून दिला!" तिला खिजवीत अनंत सांगू लागला,"पहिल्या भेटीतच माणूस जाणकार आणि विश्वासार्ह वाटला म्हणून मग आणखी दोन वेळां भेटून थोडी जास्त माहिती विचारली!" "ओह्,म्हणजे तुमच्या 'खाबू ग्रुप'वर अशा उपयुक्त गप्पाही होतात म्हणायच्या तर!" चेष्टेची संधी शुभदानंही सोडली नाही. "तुला खोटं वाटेल शुभदा, पण गप्पांच्या ओघांत सहज जिव्हाळ्याचे विषय निघतात आणि उपयुक्त माहिती कानांवर पडते!आमच्या नग्रुपवरील दोघांनी ऐंशी पार केली आहे;- पण कशी ठणठणीत प्रकृती आहे दोघांचीही! त्यांच्या बोलण्यांत प्रकृती उत्तम राखण्याच्या घरेलु टिप्स हमेशा येतात!" "पण तुम्ही त्या कधी अंमलात आणतांना तर दिसत नाहीं?" "प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, शुभदा! आतां नोकरीनिमित्त होणारे श्रम कमी झाल्यावर, वाढत्या उतारवयात आहार आणि वागण्यांत योग्य ते बदल करावेच लागतील! त्याबाबत येत्या शुक्रवारी दोघां ऐंशीबहाद्दरांचाच सल्ला विचारणार आहे!"
१५ सप्टेंबर २०२२
0 notes
Text
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांचा सत्कार संपन्न
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार असल्याने भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी संलग्न आहे त्याच माध्यमातून सर्वसामान्यांचे सामाजिक धार्मिक आणि राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी काम दोन्ही संघटना एकत्र येऊन करतात त्याच माध्यमातून येत्या विधानसभेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा,तालुका,शहर,ग्राम शाखा पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या…
0 notes
Text
वैज्ञानिक सल्लागार समितीचे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे यशस्वी आयोजन आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेवुन दरवर्षी कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या कार्याचा आराखडा तयार करत असते. शेतकरी, शास्त्रज्ञ व शासन एका व्यासपीठावर येवुन गरजेनुरुप कृती आराखडा तयार करण्यासाठी दर वर्षी कृषी विज्ञान केंद्रात वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात येते. या वर्षीची बैठक कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या प्रत्येक शास्त्रज्ञाने आपापले सादरीकरण सर्व मान्यवरांच्या समक्ष केले व त्यावर मान्यवरांकडून आलेल्या सूचनांप्रमाणे येत्या वर्षामध्ये कशा पद्धतीने आम्ही काम करू याबद्दल खात्री दिली. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक सादरीकरणानंतर आपल्या महत्त्वाच्या सूचना प्रत्येक विषय विशेषज्ञांना केल्या. उपस्थित शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील आपल्या सूचना व अपेक्षा सदर बैठकीत मांडल्या. सदर कार्यक्रमांमध्ये श्री अनिल शिरफुले उपसंचालक आत्मा यांनी वेगवेगळी निदर्शने सांगत कृषी विज्ञान केंद्राबरोबर कृषी विभाग व आत्मा सतत कार्य करण्यासाठी तत्पर राहील अशी ग्वाही दिली. डॉ बी व्ही आसेवार यांनी देखील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांच्यातल्या नात्याबद्दल बोलताना आपण एकमेकांच्या सोबत काम करावं व शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याबद्दल विविध सूचना के��्या.अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना श्री रोहित देशमुख यांनी कृषी विज्ञान केंद्र व संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी ही संस्था शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांसाठी आम्ही तत्पर असल्याचं बैठकीत सांगितलं तसेच कुठल्याही येणाऱ्या सूचनांचा समावेश करून आम्ही आमच्या कार्यपद्धतीत बदल करू अशी खात्री दिली. #agriculture #SAC #meeting #kvksagroli #nanded #farmers #KrishiVigyanKendra
0 notes
Text
UPSC Bharti 2024 | केंद्रीय लोकसेवा आयोग भर्ती 2024
UPSC Bharti 2024 : संघ लोकसेवा आयोगाने 2024 साठी नवीन पदभरती प्रक्रिया जाहिर केली असून, अधिसूचना आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध झाली आहे. उपलब्ध पदांसाठी – सहाय्यक औद्योगिक सल्लागार, शास्त्रज्ञ- बी, सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ आणि विशेषज्ञ ग्रेड III – उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा असे आवाहन केले आहे. UPSC Bharti 2024 :Union Public Service Commission has announced the new recruitment process…
View On WordPress
0 notes
Text
BIS Recruitment 2024 : 107 जागांसाठी भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती - सरकारी नोकरी जाहिरात
भारतीय मानक ब्युरो मध्ये 107 जागांसाठी भरती : BIS Recruitment भारतीय मानक ब्युरो मध्ये सल्लागार म्हणून पात्र आणि अनुभवी लोकांना सरकारी नोकरी मिळण्याचे सुवर्णसंधी आहे या पदांच्या भरतीसाठी उमेदवार 19 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय मानक ब्युरो ने विविध पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आणून अर्ज आमंत्रित केले आहेत. भारतीय मानक ब्युरोच्या या रिक्त पदांवर विविध…
View On WordPress
0 notes
Text
आयपीएल (IPL) माहिती मराठी | IPL History, Team List In Marathi: टीम, संघ मालक संपूर्ण माहिती
Indian Premier League (IPL) History | Winners Teams List, Winners and Runners List of All Seasons, Format, Players, Earning, Profit, Loss | आईपीएल काय आहे, इतिहास, टीम, मालिकांची माहिती, फॉर्मेट, ब्रॅंड, खेळाडू, खेळाडू टीम सूची, कमाई, फायदा संपूर्ण माहिती मराठी | IPL 2023 Team List | इंडियन प्रीमियर लीग 2023
इंडियन प्रीमियर लीग (IPL) (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव TATA IPL म्हणूनही ओळखले जाते) ही पुरुषांची ट्वेंटी20 (T20) क्रिकेट लीग आहे जी भारतात दरवर्षी आयोजित केली जाते आणि दहा शहर-आधारित फ्रँचायझी संघांद्वारे स्पर्धा केली जाते. 2007 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) लीगची स्थापना केली होती. अरुण सिंग धुमाळ आयपीएलचे अध्यक्ष आहेत. ही स्पर्धा दरवर्षी उन्हाळ्यात (मार्च आणि मे दरम्यान) आयोजित केली जाते आणि आयसीसी फ्यूचर टूर्स प्रोग्राममध्ये एक विशेष विंडो असते, याचा अर्थ आयपीएल हंगामात कमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट होतात.
आयपीएल ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे आणि 2014 मध्ये ती सर्व क्रीडा लीगमध्ये सरासरी उपस्थितीनुसार सहाव्या क्रमांकावर होती. 2010 मध्ये, आयपीएल प्रसारित होणारी जगातील पहिली क्रीडा स्पर्धा बनली. YouTube वर थेट. 2022 मध्ये आयपीएलचे ब्रँड मूल्य ₹90,038 कोटी (US$11 बिलियन) होते. ��ीसीसीआयच्या मते, 2015 च्या आयपीएल हंगामाने भारताच्या जीडीपीमध्ये ₹1,150 कोटी (US$140 दशलक्ष) योगदान दिले. डिसेंबर 2022 मध्ये, लीग $10.9 अब्ज मूल्याची डेकाकॉर्न बनली आणि 2020 पासून डॉलरच्या दृष्टीने 75% वाढ नोंदवली, जेव्हा तिचे मूल्य $6.2 अब्ज होते, सल्लागार फर्म D & P Advisory च्या अहवालानुसार. Read more
0 notes
Text
स्वभावाला औषध आहे: बाच फ्लॉवर थेरपीचे महत्व
आपल्या जीवनात अनेकदा भावनिक ताणतणाव आणि मानसिक अस्थिरता येते, जी आपल्या आरोग्यावर आणि स्वभावावर परिणाम करते. अशा वेळेस अनेक जण औषधांचा आधार घेतात, परंतु त्यातून काही जणांना फारसा फायदा होत नाही. यासाठी बाच फ्लॉवर थेरपी ही एक नैसर्गिक आणि प्रभावी पद्धत आहे, जी आपल्या स्वभावातील ताणतणाव आणि नकारात्मक भावना कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. बाच फ्लॉवर थेरपी म्हणजे काय? बाच फ्लॉवर थेरपी ही एक…
View On WordPress
#आरोग्य#डॉएडवर्डबाच#ताणतणाव#नैसर्गिकउपाय#पुष्पऔषध#फुलांचेअर्क#बाचफ्लॉवरथेरपी#भावनात्मकसमस्या#भावनिकआरोग्य#माइंडमास्टर#मानसिकस्वास्थ्य#संवेदनशीलता#समाधान#सल्लागार#स्वभाव#आयुर्वेद
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 January 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम् इथं भारतातील सर्वात मोठं परिवहन प्रदर्शन, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चं उद्घाटन करणार आहेत. सीमांच्या पलीकडे: भविष्यातील ऑटोमोटिव्ह मूल्य साखळी सह-निर्मिती, अशी या प्रदर्शनाची संकल्पना आहे. या एक्स्पोचं उद्दिष्ट संपूर्ण गतिशीलता मूल्य साखळीला एकाच छत्राखाली आणणं हे आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात जागतिक महत्त्वावर विशेष भर दिला जाईल ज्यामध्ये जगभरातले प्रदर्शक आणि अभ्यागत सहभागी होतील.
****
स्वामित्व योजनेअंतर्गत दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५० हजार गावांमधल्या ६५ लाख लाभार्थींना प्रॉपर्टी कार्डचं वितरण आज पंतप्रधानांच्या हस्ते दुरस्थ माध्यमातून होणार आहे. ग्रामीण भारताचा आर्थिक विकास आणि गरजूंना हक्कांची घरं उपलब्ध करुन देणं तसंच ड्रोन सर्वेक्षणाद्वारे घरांची नोंद ठेवणं हा प्रधानमंत्र्यांनी सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय क्रिडा पुरस्कारांचं वितरण होणार आहे. बुद्धिबळपटू डी ��ुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलिट प्रवीण कुमार आणि नेमबाज मनु भाकर यांना खेलरत्न पुरस्कार, नेमबाज स्वप्निल कुसळे आणि पॅरा ॲथलिट सचिन खिलारी यांच्यासह ३५ जणांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्यांमध्ये सुभाष राणा, दीपाली देशपांडे, संदीप सांगवान यांचा समावेश आहे.
****
७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत. २५ आणि २६ जानेवारी रोजी ते भारत दौऱ्यावर येतील.
दरम्यान, प्रजास्ताक दिनाच्या निमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे. सुमारे ४० विमानं कर्तव्यपथावर विविध कसरतींचं प्रदर्शन करतील. यंदा मिग 29, राफेल, सुखोई 30, जग्वार, अपाचे, C-130 आणि C - 17 यासारखी लढाऊ विमानं सादरीकरणात भाग घेतील. याशिवाय हवाई दलाची एक तुकडी सुद्धा कर्तव्यपथावर प्रदर्शन करेल.
****
राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढचा हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होत्या.
****
बारामतीमध्ये अत्याधुनिक दर्जाचं पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार असल्याची घोषणा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. माळेगाव कृषी विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या कृषिक २०२५ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर हे या वर्षीच्या प्रदर्शनाचं आकर्षण आहे. उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा, ऊसाच्या नवीन वाणाची लागवड करावी, असं सांगून पवार यांनी, शेतमालाची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून सहकार्य मिळेल, असं आश्वासन दिलं.
****
मुदत संपल्यानं राज्यातल्या सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण ४४ पंचायती समित्यांवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर यांचा समावेश आहे. या सहा जिल्हा परिषदांच्या अंतर्गत येणाऱ्या ४४ पंचायत समित्यांची मुदतही संपल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नि��डणूक होईपर्यंत प्रशासक म्हणून काम पाहतील.
****
जागतिक हवामा�� बदल रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर इथं काल हवामान बदल २०२५ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एका अॅप ची निर्मिती करणार असल्याचं परिषदेचे संयोजक सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
चीनसोबतच्या संबंधांमध्ये विश्वासार्हतेचा अभाव ही मोठी समस्या असल्याचं, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य जयदेव रानडे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं विवेकानंद व्याख्यानमालेत चिनी महत्त्वकांक्षा भारतीय आणि जागतिक संदर्भ या विषयावर बोलत होते. या व्याख्यानमालेत आज 'न्याय, न्यायपालिका आणि स्वातंत्र्य' या विषयावर आभा सिंह यांचं व्याख्यान होणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर, कडावा कालव्यातली गळती कमी करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत. शेतीसाठी पाण्याचं आवर्तन देतांना जवळपास ६० टक्के पाणी गळतीचं प्रमाण दिसून येत असून, हे प्रमाण २० टक्यांवर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आणि जलसंपदा विभागानं काटेकोर नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलं.
****
विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला असून, आपापल्या गटात दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत.
****
0 notes
Text
प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या सल्लागार मंडळींनी त्यांचाच घात केला
https://bharatlive.news/?p=99544 प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या सल्लागार मंडळींनी ...
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ९
घरी परतणाऱ्या प्रमिला आणि प्रभाकररावांना निरोप देण्यासाठी बाल्कनीमधे धांबलेले अनंत आणि शुभदा त्यांची रिक्षा नजरेआड झाल्यावर आंत आले! डोळ्यांवरची झोपेची झापड दूर करण्याचा प्रयत्न न करता आळस देत अनंत म्हणाला, "शुभदा, पमाताईला भरीस घालून तूं गेला आठवडाभर मला जे कांही खायला घातलं आहे, त्यानं माझं वजन दीड-दोन किलोंनी तरी नक्कीच वाढलं असेल!" "ते काय ते तुम्ही पमाताईंनाच सांगा! स्वयंपाक करणं आणि तुम्हांला वाढणं याबाबत मी कशी त्यांना अडवणार!" ओठांवर येणारं हंसू मोठ्या मुश्किलीनं आवरीत शुभदानं आपल्यावरचा आरोप झटकून टाकला,"उद्यांपासून तुम्ही काय हवं ते आपल्या हातांनी घ्यायचं! मी कसलाही आग्रह करणार नाही!मात्र सकाळी ब्रेकफास्ट आणि दोन वेळचं जेवण वेळच्या वेळी झालं पाहिजे!"
"उद्यांचं उद्यां बघूं;- आतां मला प्रचंड झोंप आली आहे!" बेडरूंममधे जात अनंत म्हणाला, " त्यामुळे १०-१५ मिनिटांत बेड आवरून मी चक्क आडवा होणार आहे! तुझं आटपलं की तूंही झोप. फक्त उद्यां सकाळी आपल्याला L.I.C मधे जायचं आहे याची खुणगांठ मनाशी बांधून ठेव!"
दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेतांना शुभदा म्हणाली,"काल रात्री मलाही झोप येत होती, म्हणून विषय वाढवला नाही! पण आतां सांगा: मला आज तुमच्याबरोबर LIC मधे कां यायचं आहे?" "अग, माझे आर्थिक सल्लागार सावंतसाहेब म्हणाले होते की एकदां वहिनींना ऑफिसांत घेऊन या! म्हणून आज त्यांची अपॉइंटमेंट घघेतली आहे मी,-- सकाळी ११ ची!" "पण माझं काय काम आहे तिथं?" "मला आतां एवढ्यांतच ऑफिसकडून रिटायरमेंट निमित्त सगळा हिशोब पूर्ण होऊन एकरकमी पैसे मिळतील, त्यांची योग्य प्रकारे गुंतवणूक करायला हवी ना? दरमहा नियमित उत्पन्न मिळावं अशा प्रकारे! त्याबद्दलच निवांतपणे सावंतसाहेबांशी बोलून ठरवायचं आहे!" " हो, पण मग तुम्ही जाऊन काय ते बोला आणि ठरवा ना! मी बरोबर येऊन काय करूं?" "शुभदा, अशी कशी ग तूं सगळ्यातून अंग काढून घ्यायला बघतेस? आतां रिटायरमेंट नंतर मी जे जे महत्वाचे आर्थिक निर्णय घेईन त्यांमधे तुझा सहभाग असायलाच हवा असं मला मनापासून वाटतं!" "तुम्हांला वाटणं ठीक असलं, तरी मला या सगळ्या बाबतीत काय समजतं?"
"आजवर समजलं नसेल तर यापुढे तरी समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा ना? आतापर्यंत मी एकट्यानं सगळं निभावून नेलं;- तूं कधी अवाक्षरानं टोकलं नाहींस हा म्हटला तर तुझा मोठेपणा, म्हटला तर बावळटपणाही ठरेल!" "कांहीतरीच काय!" "खरं तर, तुझ्यासारख्या सुविद्य बाईला नवऱ्याचे आर्थिक व्यवहार इत्थंभूत माहीत असायलाच हवेत! आतापर्यंत सगळं निभावून गेलं, म्हणून पुढची हमी काय? मी थोडाच जन्माचा पुरणार आहे--" "काहीतरी अभद्र बोलूं नका हो!" त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडीत शुभदानं दटावलं! "शुभदा, चांगलं घडावं अशी कामना करतांना अनपेक्षित वाईट गोष्टींना तोंड देण्याची मानसिक तयारी ठेवायला हवी! विशेषत: उतारवयात आकस्मिक धक्का बसण्याची शक्यता अधिक!" घ"तुमच्या बोलण्यांत न पटण्यासारखं कांहीच नाहीं! बहुधा त्यामुळेच 'मन चिंती ते वैरी न चिंती' ही म्हण पडली असावी!" शुभदाच्या या कबूलीवर नाटकीय पद्धतीनं कुर्निसात करून अनंत म्हणाला, "तर मग आता झटपट ब्रेकफास्टच्या तयारीला लागा, बाईसाहेब! ११ पर्यंत सावंतसाहेबांकडे पोहोंंचायला हवं!"
८ सप्टेंबर २०२२
0 notes
Text
सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी आझाद ग्रूप व यूवाराज्य यांच्या संयुक्त विद्यामाने दिला जाणारा युवा आयकॉन २०२३ पूरस्काराने सन्मानीत
नांदेड प्रतिनिधी आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य यांच्या संयूक्त विद्यमाने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात येते यावर्षी हे पूरस्काराचे पहिले वर्षे आहे यावर्षी चा आझाद ग्रूप व दैनिक यूवाराज्य चा यूवा आयकॉन २०२३ चा पूरस्कार हॉटेल गणराज पॅलेस नमस्कार चौक नांदेड येथे दि.२/४/२०२३ रोजी हा पूरस्कार सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांना सर्व मान्यवरांच्या शूभहास्ते देवून त्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेतकरी कामगार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सौ आशाताई श्यामसूंदर शिंदे उदघाटक सौ सविता संतोष मू��कूटे प्रमूख पाहूणे म्हणून सेवाभावी संस्था सेलू च्या उपध्याक्षा सौ.सुमनबाई आनंतराव शिंदे माजी छत्रपती शंभूराजे इंग्लीश स्कूल कंधार च्या अध्यक्षा सौ.प्रा डॉ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे व सल्लागार समिती मह्णून यूवाराज्य वृत्तपत्राचे मूख्य संपादक अजित पाटील साहित्यीक धाराशीव शिराळे सहशिक्षक विनोद गवते जिल्हाध्यक्ष प्रभाकर पांडे कार्यकारिणी सदस्य प्रा.दिपक रायफळे विनीत आझाद ग्रूप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर कापसे एकल्व्य हॉस्टेल चे संचालक प्रा.गणेश आनंतराव शिंदे जिया ग्रुप पूणे च्या अध्यक्षा ज्योतीताई कापसे एकल्व्य मूलींचे हॉस्टेल च्या संचालिका ऋतुजा गणेश शिंदे आदिंची उपस्थिती होती. त्यांना हा पूरस्कार देवून गौरविण्यात आल्या बद्दल त्यांचे सर्वत्रीक कौतूक होत आहे व सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांचे त्यांचा मित्र परिवार हितचिंतक विवीध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक जोशी,देशमूख,महाजन,पसारकर,मूळे,पाठक,आौंढेकर,पोटे,बोर्डे,कनकदंडे,भालेराव,नेकलीकर,कूलकर्णी,कान्हेकर परिवार व सामाजीक कार्यातील सहकारी या सर्वानी त्यांचे आभिनंदन केले आहे. Read the full article
0 notes
Text
इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती 2023: 02 पदांसाठी भरती जाहीर
India Security Press Nashik Bharti 2023 - इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती 2023India Security Press Nashik Recruitment 2023 India Security Press Nashik Bharti 2023: India Security Press Nashik (ISP Nashik) ने आयुर्वेदिक सल्लागार, होमिओपॅथी सल्लागार या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.ispnasik.spmcil.com या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक (ISP नाशिक) रिक्रूटमेंट बोर्ड, नाशिक द्वारे फेब्रुवारी 2023 च्या जाहिरातीमध्ये एकूण 02 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी 2023 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट मुलाखत दया. India Security Press Nashik Bharti 2023 - इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती 2023 Read the full article
0 notes
Text
रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील रूग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही, त्यांचे प्राण वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत…
View On WordPress
0 notes
Text
प्रजासत्ताक दिन परेड रिहर्सल 2022 दिल्ली मधील रहदारी निर्बंध mbh
प्रजासत्ताक दिन परेड रिहर्सल 2022 दिल्ली मधील रहदारी निर्बंध mbh
प्रजासत्ताक दिन परेड रिहर्सल 2022: प्रजासत्ताक दिनाच्या परेड रिहर्सलबाबत लोकांना त्रास होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांनी आधीच ट्रॅफिक अॅडव्हायझरी जारी केली आहे. दिल्ली पोलिसांच्या सल्ल्यानुसार, सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी राजपथवर विजय चौक ते इंडिया गेटपर्यंत ��्रजासत्ताक दिन परेड-2022 ची तालीम होईल. यादरम्यान राजपथ-रफी मार्ग, राजपथ-जनपथ, राजपथ-मानसिंग रोड आणि राजपथ-सी-षटकोन या मार्गावर…
View On WordPress
#दिल्ली वाहतूक पोलिस सल्लागार#दिल्ली वाहतूक पोलिसांचा सल्ला#दिल्ली वाहतूक पोलीस#परेड तालीम#पर्यायी मार्ग#प्रजासत्ताक दिन परेड#प्रजासत्ताक दिन परेड तालीम#प्रजासत्ताक दिन परेड रिहर्सलसाठी दिल्ली वाहतूक पोलिसांचा सल्ला#प्रजासत्ताक दिवस#महामार्ग#रस्ते बंद#वाहतूक सल्ला#हे रस्ते टाळा
0 notes