#विशाखापट्टणम
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व शैक्षणिक संस्थांना मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे. पुण्यात आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं, हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. विशेषतः समाजातल्या वंचित घटकांना लक्षात घेऊन आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचना देखील त्यांनी केली. या दीक्षांत समारंभात ११ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांपैकी आठ मुली असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, विद्यापीठाचे कुलपती शां.ब.मुजुमदार यावेळी उपस्थित होते.
****
दरम्यान, आज मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला.
****
‘विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्��त ई-सेवा वितरण’ या विषयावरील दोन दिवसीय ई-गव्हर्नन्स परिषदेला आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध पुस्तिका आणि प्रबंधांचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीनं विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.
धुळे विभागातल्या नऊ आगारात कर्मचारी संपात सहभागी झाल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. वाशिम आगारातून सकाळपासून बससेवा पूर्णपणे बंद असल्याने अनेक प्रवासी बस स्थानकावरुन परतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी च्या संपामुळे चाकरमानी, तसंच शाळकरी मुलांची गैरसोय होत आहे. सावंतवाडी डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद असून, कणकवली सह अन्य ठिकाणी या बंदचा संमिश्र परिणाम पाहायला मिळत आहे.
गोंदिया जिल्ह्यातही पोळ्याचा पाडवा म्हणजे मारबत उत्सवावर एसटी बंदचा परिणाम दिसून आला. दर वर्षी गोंदिया आगारातून जादा बस सोडल्या जातात, मात्र आज सकाळपासून बस बंद आहेत. भंडारा जिल्ह्यात मात्र बससेवा सुरळीत सुरू आहे. मारबत उत्सवामुळे ठराविक वेळेवर एस टी बसेस सोडल्या जात आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृती समितीच्या सदस्यांसोबत उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये, असं आवाहन, राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी, तर मंठा, परतूर तालुक्यात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
दरम्यान, जालना शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी इथल्या संत गाडगेबाबा जलाशयात पाण्याची आवक सुरु आहे. हे जलाशय १२ फूट इतका भरला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपूर एक्स्प्रेस, शिर्डी - काकीनाडा एक्स्प्रेस, विशाखापट्टणम - नांदेड तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस आणि नांदेड - विशाखापट्टणम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय युवा परिषद आणि नांदेड इथल्या पीपल्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या नांदेड इथं एक दिवसीय प्रादेशिक भाषा आंतरराष्ट्रीय युवा परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे आणि प्रा.डॉ.अविनाश कदम मार्गदर्शन करणार आहेत. “मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाची आव्हाने” हा परिषदेचा विषय आहे.
****
0 notes
muthoot1 · 7 months ago
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे :
मुथूट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुष्ट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मोल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर ०१, ०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हेसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम अस���न, ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे. 
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मघट एक्प्रिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस यांनी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता आणि विश्वास या मुख्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या मूल्यांकन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुकूट पप्पाचन पुपची मोल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे. मोल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खासियत आहे. देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता. २०१५ मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईट केंद्रासह मुट एक्झिम हळूहळू मुंबई, बंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एलांकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव, विशाखापट्टणम आणि म्हेसूर येथे विस्तारले आहे. मुट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवून देण्यास सुलभता आणतात.
१८८७ मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आणि ग्राहकांसाठी दर्जे दार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्वपूर्ण संस्था आहे मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात -आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सव्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे ३०,००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील ५२०० पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची उडठ शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविते.
Publication Name: Gavkari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
rojgarmelava · 2 years ago
Text
HPCL मुंबई भरती 2023: विविध 65 रिक्त पदांची भरती जाहीर
HPCL मुंबई भरती 2023 - HPCL Mumbai Bharti 2023 HPCL Mumbai Bharti 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील एक आघाडीचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. कंपनी मुंबई आणि विशाखापट्टणम येथे असलेल्या रिफायनरीजसह पेट्रोलियम उत्पादनांचे शुद्धीकरण, साठवण, वितरण आणि विपणन यात गुंतलेली आहे. HPCL कडे भारतभर पसरलेली झोनल आणि प्रादेशिक कार्यालये, टर्मिनल्स, पाइपलाइन नेटवर्क्स, विमान सेवा केंद्रे, LPG बॉटलिंग प्लांट्स आणि अंतर्देशीय रिले डेपोचे विशाल नेटवर्क आहे. एचपीसीएल रिफायनरी विभाग मुंबई रिफायनरीमध्ये शिकाऊ कायदा, 1961 आणि नियमांच्या तरतुदीनुसार एकूण 65 शिकाऊ उमेदवारांना नियुक्त करण्याचा प्रस्ताव देत आहे. प्रस्तावित अप्रेंटिसशिप प्रोग्राममध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी यांसारख्या अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थींसाठी 40 पदांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल शाखेतील तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थींसाठी 25 पदे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार 16-03-2023 आणि 20-03-2023 दरम्यान NATS पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. HPCL मुंबई भरती 2023 - HPCL Mumbai Bharti 2023 Read the full article
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
देशाला मिळाली आठवी वंदे भारत ट्रेन
Tumblr media
हैदराबाद : वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेकडून सेवेत दाखल होणा-या आठवी वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दूरदृश्य प्रणाली��्वारे हिरवा झेंडा दाखवल��. सिकंदराबाद आणि विशाखापट्टणम दरम्यान धावणारी ही वंदे भारत रेल्वे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना जोडेल. यात एकाच वेळी १,१२८ प्रवाशी प्रवास करु शकतील. यात आठव्या वंदे भारत ट्रेनमध्ये १४ एसी चेअर कार आणि दोन एक्जीक्यूटिव एसी चेयर बोगी असतील. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि तेलंगाणाचे राज्यपाल टी. सौंदर्यराजन सिकंदराबाद स्टेशनवर उपस्थित होते. सोमवार पासून नियमीत धावणारी ही रेल्वे सुमारे ७०० किमी अंतर पार कलेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तर तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबेल. असा करेल प्रवास रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम- सिकंदराबाद एक्स्प्रेस (२०८३३) सकाळी पाच वाजून १५ मिनिटांनी विशाखापट्टणम स्टेशनवरुन रवाना होईल. दुपारी दोन वाजून १५ मिनिटांनी सिकंदराबाद येथे पोहचले. तर सिकंदराबाद – विशाखापट्टणम- एक्स्प्रेस (२०८३४) तीन वाजता सिकंदराबाद स्थानकातून रवाना होईल आणि रात्री साडेअकरा वाजता विशाखापट्टणम येथे पोहचेल. Read the full article
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
विशाखापट्टणमजवळील औद्योगिक परिसरात गॅस गळती, 50 रुग्णालयात दाखल
विशाखापट्टणमजवळील औद्योगिक परिसरात गॅस गळती, 50 रुग्णालयात दाखल
विझाग: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील ब्रँडिक्स स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील पोशाख उत्पादन युनिटमध्ये गॅस गळतीमुळे आज किमान 50 कामगार आजारी पडले. गॅस गळतीनंतर कामगारांनी मळमळ आणि उलट्या झाल्याची तक्रार केली. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार कामगार – सर्व महिलांवर SEZ येथील वैद्यकीय केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. “ब्रॅंडिक्सच्या आवारात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
IND vs SA: टीम इंडियाने हॅट्ट्रिक पुढे ढकलली, तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा वाईट पराभव केला
IND vs SA: टीम इंडियाने हॅट्ट्रिक पुढे ढकलली, तिसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा वाईट पराभव केला
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20, विशाखापट्टणम: विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 मध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. यासह पाच सामन्यांची मालिका २-१ अशी बरोबरीत आली आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. भारताने प्रथम खेळून 20 षटकांत 5 गडी गमावून 179 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचा…
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years ago
Text
विशाखापट्टणममध्ये विषारी वायुगळती; ८ जणांचा मृत्यू
विशाखापट्टणममध्ये विषारी वायुगळती; ८ जणांचा मृत्यू
विशाखापट्टणम :  आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील एलजी पॉलिमर इंडस्ट्री या औषधाच्या कंपनीत रसायन वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ८ जण ठार तर शेकडो जणांवर याचे दुष्परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्याने जवळपासची अनेक गावे रिकामी केली गेली  आहेत. ही घटना विशाखापट्टणममधील आरआर वेंकटापुरम गावात घडली आहे. वायु गळतीचा परिणाम सुमारे १ ते १.५ किमीच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीला वाचविण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश
ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीला वाचविण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश
ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीला वाचविण्यात रेल्वे कर्मचाऱ्यांना यश Twitter आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील दुव्वाडा स्टेशनवर एक विद्यार्थिनी ट्रेनमधून उतरताना घसरून ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. समोर मृत्यू पाहून विद्यार्थिनी जोरजोरात रडू लागली. मात्र, सुदैवाने ट्रेन लगेचच थांबली आणि मुलीची यशस्वी सुटका झाली.   सायन्स कॉलेजमध्ये…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' लहानपणापासून सांभाळलं पण ' , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
‘ लहानपणापासून सांभाळलं पण ‘ , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
सोशल मीडियावर सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे उपलब्ध माहितीनुसार, वारा प्रसाद असे आरोपीचे नाव असून तो एका रुग्णवाहिकेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या 19 वर्षीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
' लहानपणापासून सांभाळलं पण ' , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
‘ लहानपणापासून सांभाळलं पण ‘ , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
सोशल मीडियावर सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे उपलब्ध माहितीनुसार, वारा प्रसाद असे आरोपीचे नाव असून तो एका रुग्णवाहिकेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या 19 वर्षीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 February 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
माजी राष्ट्रपीत रामनाथ कोविंद यांच्या अध्यतेखालील एक देश एक ��िवडणूक समितीनं काल नवी दिल्लीत राजनैतिक पक्ष आणि अन्य संबंधित घटकासोबत चर्चा केली. या बैठकीत जनता दल संयुक्तच्या वतीनं राजीव रंजन सिंह आणि पक्षाचे महासचिव संजय कुमार झा यांनी देशात एक निवडणूक घेण्यासाठी समर्थन दर्शवलं. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या शिष्टमंडळातल्या श्रीहरी बोरीकर, डॉक्टर सीमा सिंह आदींनी देखील यासाठी सहमती दर्शवली.
****
राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान महाराष्ट्र भूषण पुरस्कार यासह अन्य पुरस्कार येत्या २२ फेब्रुवारीला मुंबईत वरळी इथं होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येईल. यासोबतचं राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
****
विशाखापट्टणम इथं उद्यापासून पन्नास हून अधिक देशांच्या नौदलांचा सांघिक अभ्यास - `मिलन`  सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारी पर्यंत हा अभ्यास सुरु असेल. मजबूत नौदल, सुरक्षित सागरी वाहतूक हा यावर्षीचा विषय असून या अंतर्गत पानबुडी सुरक्षा, हवाई सुरक्षा, युद्ध कौशल्य आदींचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये भारतीय नौदलाच्या २० युद्धनौका आणि ५० विमानं सहभागी होतील, असं नौदलानं म्हटलं आहे. 
****
आशिया चषक सांघिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं आज प्रथमच विजेतेपद मिळवलं आहे. मलेशियामधे या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघानं थायलंडचा तीन- दोन असा पराभव केला. आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिनं पहिल्या एकेरीच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर सहज विजय नोंदवत संघाला एक-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. ट्रेसा जॉली आणि गायत्री पुलेला यांनी नंतर दुहेरीची लढत जिंकून संघाला दोन-शून्य अशी आघाडी मिळवून दिली होती. भारतीय संघाला त्या नंतरच्या दोन सामन्यांत मात्र पराभव स्वीकारावा लागला होता. अनमोल खरब हिनं पाचव्या निर्णायक सामन्यात ��्रतिस्पर्धी खे‍ळाडूवर मात करत भारतीय महिला संघाचा विजय निश्चित केला.
****
भारतानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी राजकोट इथं चार बाद ३७४ धावा केल्या असून भारताकडे सध्या ५०० धावांची आघाडी आहे. यशस्वी जैस्वाल १९३ धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी, उपाहाराला खेळ थांबला तेंव्हा भारताच्या चार बाद ३१४ धावा झाल्या होत्या. दरम्यान, घरगुती कारणामुळं या सामन्यातून बाहेर पडलेला फिरकीपटू आर. अश्विन आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज असल्याचं क्रिकेट मंडळानं म्हटलं आहे. 
****
दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या नाशिक इथल्या गोदावरी नदीची ‘गोदा आरती’ आता कायमस्वरूपी होणार आहे. या उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी ११ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. याबद्दलची कार्यवाही जलद होण्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे. या गोदा आरतीसाठी अकरा ठिकाणं तयार करण्यात येणार आहेत. भाविकांना बसण्याची व्यवस्था,  तसंच दिवे आणि विद्युतीकरणाची अन्य कामं इथं वेगानं करण्यात येतील, असं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे.
****
शिवजयंतीनिमित्त महासंस्कृती महोत्सवात नांदेड इथं नंदगिरी किल्ल्यावर कालपासून सुरू छायाचित्र प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येनं भेट देत आहेत. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यातली प्रेक्षणीय स्थळं, जीवनशैली, निसर्ग, स्थापत्यकला, पर्यटन विषयांवरची छायाचित्र ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमांतर्गत उद्या  आयटीआय इथं रांगोळी स्पर्धा आणि प्रदर्शन होणार आहे.
****
गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सहकार भारतीतर्फे उद्या मुंबईतल्या चेंबूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय महाअधिवेशन होत आहे. देशाचे गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात देशभरातील प्रतिनीधी सहभागी होतील तसंच सहकार भारतीचे राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असून त्यांचं मार्गदर्शन देखील आयोजित करण्यात आलं आहे. 
****
नंदुरबार जिल्ह्यात नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात ट्रक अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्या��ं आज अपघात झाला. ��ा अपघातात ट्रक चालकाचा मृत्यु झाला आहे.
****
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
' लहानपणापासून सांभाळलं पण ' , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
‘ लहानपणापासून सांभाळलं पण ‘ , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
सोशल मीडियावर सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे उपलब्ध माहितीनुसार, वारा प्रसाद असे आरोपीचे नाव असून तो एका रुग्णवाहिकेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या 19 वर्षीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
' लहानपणापासून सांभाळलं पण ' , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
‘ लहानपणापासून सांभाळलं पण ‘ , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
सोशल मीडियावर सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे उपलब्ध माहितीनुसार, वारा प्रसाद असे आरोपीचे नाव असून तो एका रुग्णवाहिकेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या 19 वर्षीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
' लहानपणापासून सांभाळलं पण ' , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
‘ लहानपणापासून सांभाळलं पण ‘ , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
सोशल मीडियावर सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे उपलब्ध माहितीनुसार, वारा प्रसाद असे आरोपीचे नाव असून तो एका रुग्णवाहिकेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या 19 वर्षीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या T20 साठी सर्व तिकिटे विकली गेली, हा सामना विशाखापट्टन येथे होणार आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या T20 साठी सर्व तिकिटे विकली गेली, हा सामना विशाखापट्टन येथे होणार आहे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तिसरा T20I विशाखापट्टणम: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला मागील दोन सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाचा कर्णध��र ऋषभ पंत आणि संघ व्यवस्थापन या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतात. या सामन्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विशाखापट्टणम येथे…
View On WordPress
0 notes
shaharvarta11 · 2 years ago
Text
' लहानपणापासून सांभाळलं पण ' , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
‘ लहानपणापासून सांभाळलं पण ‘ , मुलीचा खून करून सेल्फी व्हिडीओमध्ये बाप म्हणतोय की..
सोशल मीडियावर सध्या एक वेगळेच प्रकरण चर्चेत आलेले असून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका नराधम बापाने पोटच्या मुलीची हत्या केलेली आहे आणि त्यानंतर स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे उपलब्ध माहितीनुसार, वारा प्रसाद असे आरोपीचे नाव असून तो एका रुग्णवाहिकेच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या 19 वर्षीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes