#वायुगळती
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर इंथल्या राजभवनात हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी होत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आज सकाळपासूनच संभाव्य मंत्र्यांना शपथविधीसाठी भ्रमणध्वनीद्वारे राज्य नेतृत्वाकडून कळविण्यात येत असल्याचं वृत्त आहे. राज्य सरकारमधील सहभागी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनाही त्यांच्या नेतृत्वांनी मंत्रीपदाची शपथ घेण्याविषयीची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये तब्बल ३३ वर्षांनंतर मंत्रीमंडळ विस्ताराचा कार्यक्रम होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीमध्ये मुख्य सचिवांच्या चौथ्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. तींन दिवस होणाऱ्या या संमेलनाला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सुरुवात झाली. राज्यांच्या मदतीनं साधलेल्या विकासचं मूल्यमापन करणं आणि कार्यान्वित करणं, हा या संमेलनामागचा उद्देश आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित भागीदारीला सशक्त करणं तसंच सहकारी संघराज्यवाद, जलद आर्थिक वृद्धी आणि विकासामध्ये योग्य ताळमेळं हे या संमेलनातील चर्चेचे विषय आहेत. या संमेलनात सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ सहभागी झाले आहेत.
राज्यभरात उद्यापासून कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र म्हणजेच कुसुम ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे. आरोग्य विभागाकडून होणाऱ्या नियमित तपासणीत गेल्यावर्षी वीस हजार नवे कुष्ठरूग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारनं २०२७ सालापर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचं उद्दीष्ट निश्चित केलं असून, ते साध्य करण्यासाठी कुष्ठरुग्णांचा शोध घेतला जात आहे. आशा स्वयंसेविका तसंच पुरूष स्वयंसेवकांच्या मदतीनं प्रत्यक्ष सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इंथल्या श्री योगेश्वरी देवी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची आज सांगता होत आहे. सकाळी आठ वाजता होम हवनास सुरुवात झाली असून, दुपारी साडेबारा वाजता पूर्णाहुतीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता देवीच्या पालखीची मिरवणूक अंबाजोगाई शहरातून काढण्यात येणार आहे. या नवरात्र महोत्सवामध्ये जवळपास दहा हजाराहून अधिक भाविक मंदिरामध्ये आराध बसले होते, अशी माहिती योगेश्वरी मंदिर समितीचे सचिव अशोक लोमटे यांनी दिली.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं महामार्गावर ‘राजमार्ग साथी’ या नावानं नवीन गस्ती वाहनांना सुरुवात केली आहे. ही वाहनं आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज असून यामुळे वाहतूक कोंडी कमी व्हायला आणि प्रवास सुरक्षित व्हायला मदत होणार आहे. यात बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी, रस्त्यांवरचे खड्डे आणि इतर अडथळे शोधायलाही मदत होणार आहे.
राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढत आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक नीचांकी तापमान ४ पूर्णांक ६ डिग्री सेल्सिअस नोंदलं गेलं. उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरे कडून येणार थंड वारे तसेच आपल्या भागात असलेले कोरडे वातावरण यामुळं पारा खाली जात असल्याचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे हवामान विभाग प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांनी सांगितलं. कडाक्याच्या थंडीचा रबी पिकांना फायदा होत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव- चिखली मार्गावर अमडापूर नजीक दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिल्याने दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले. घटनेनंतर अज्ञात वाहनाचा चालक फरार झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या जयगड तालुक्यातल्या वायुगळती प्रकरणी जिंदाल कंपनीच्या दोन व्यवस्थापक आणि दोन अभियंते अशा चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयगड पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. नियमित देखभाल-दुरुस्तीचं काम करताना निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, बाधित सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर ��हे.
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दी वर्षाला कालपासून सुरुवात झाली. आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच सामाजीक आशयही वृद्धिंगत करण्यात त्यांच्या चित्रपटांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. केवळ भारतातच नव्हे तर विशेषत्वानं रशियासह जगभरातल्या चित्रपट रसिकांनी राज कपूर यांच्या चित्रपटांना अखंड दाद दिली.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघानं ७० षटकात ३ बाद २३४ अशी आश्वासक सुरुवात केली आहे. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर यजमानांचे तीन गडी ७५ धावांवर बाद झाले होते. सामन्याचा पहिला दिवस तेरा षटके वगळता पावसामुळे वाया गेला. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.
जळगाव शहरातील फातेमा नगरात अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उद्धस्त करीत पोलिसांनी व्यावसायिक आणि घरगुती अवैध ३४ गॅस सिलेंडर जप्त केले आहेत.
0 notes
Text
विशाखापट्टणमजवळील औद्योगिक परिसरात गॅस गळती, 50 रुग्णालयात दाखल
विशाखापट्टणमजवळील औद्योगिक परिसरात गॅस गळती, 50 रुग्णालयात दाखल
विझाग: आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील ब्रँडिक्स स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील पोशाख उत्पादन युनिटमध्ये गॅस गळतीमुळे आज किमान 50 कामगार आजारी पडले. गॅस गळतीनंतर कामगारांनी मळमळ आणि उलट्या झाल्याची तक्रार केली. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार कामगार – सर्व महिलांवर SEZ येथील वैद्यकीय केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. “ब्रॅंडिक्सच्या आवारात…
View On WordPress
0 notes
Text
वायुगळतीमधील आपत्तीग्रस्त पंधरे कुटुंबाला अन्नधान्यासह आर्थिक मदत
वायुगळतीमधील आपत्तीग्रस्त पंधरे कुटुंबाला अन्नधान्यासह आर्थिक मदत
प्रशासन व व्यावसायिकाने दिला ‘मदतीचा हात’ चार जखमींवर अद्याप उपचार सुरू रोख रकमेसह अन्नधान्याची मदत तलाठी संघटनाही मदतीला धावली अर्जुनी-मोरगाव, दि.20 : तालुक्यातील ताडगावटोली येथे एका घरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. यात घरातील साहित्याचे नुकसान व चार जखमींवर आताही उपचार सुरू आहे. या आपत्तीग्रस्त पंधरे कुटुंबाला प्रशासन व व्यावसायिकाने मदतीचा हात दिला. सोमवारी उपविभागीय अधिकारी…
View On WordPress
0 notes
Photo
ह्युसंग इंडिया कंपनीत वायू गळतीने कामगाराचा गुदमरून मृत्यू करमाड : डीएमआयसी परिसरातील ह्युसंग इंडिया कंपनीत बॉयलरची दुरुस्ती करताना वायुगळती झाल्याने कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला .
0 notes
Text
विशाखापट्टणममध्ये विषारी वायुगळती; ८ जणांचा मृत्यू
विशाखापट्टणममध्ये विषारी वायुगळती; ८ जणांचा मृत्यू
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील एलजी पॉलिमर इंडस्ट्री या औषधाच्या कंपनीत रसायन वायू गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ८ जण ठार तर शेकडो जणांवर याचे दुष्परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्याने जवळपासची अनेक गावे रिकामी केली गेली आहेत. ही घटना विशाखापट्टणममधील आरआर वेंकटापुरम गावात घडली आहे. वायु गळतीचा परिणाम सुमारे १ ते १.५ किमीच्या…
View On WordPress
0 notes