Tumgik
#येण्यापासून
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 05 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०५ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
येत्या नऊ आणि दहा सप्टेंबर ला नवी दिल्लीत होत असलेल्या जी-20 परिषदेची जय्यत तयारी सुरु आहे. ही परिषद ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. परिषदेसाठी भारतात येणाऱ्या प्रतिनिधींसाठी दिल्ली विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
****
दरम्यान, जी-20 च्या राष्ट्र प्रमुखांच्या शिखर परिषदेप्रसंगी नवी दिल्लीतल्या भारतमंडपम् इथं ‘कल्चरल कॉरिडॉर’ हे प्रदर्शन भरणार आहे. यात प्रत्येक देशाकडून राष्ट्रीय महत्त्वाच्या दोन वस्तू मांडण्यात येणार आहेत. या प्रदर्शनात भारतातर्फे ऋग्वेदाचं हस्तलिखित ठेवण्यात येणार आहे; हे हस्तलिखित पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत जतन करण्यात आलं आहे. भांडारकर संस्थेच्या डॉक्टर अमृता नातू आणि बाळकृष्ण जोशी यांना ही ऋग्वेदाची प्रत दिल्लीला नेऊन प्रदर्शनाच्या संयोजकांकडे सुपूर्द केली.
****
माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आज देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं वितरण होणार आहे. तर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत, २०२२-२३ या वर्षीच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचं वितरण देखील आज होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन केलं असून, देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवण्याचं मौलिक कार्य करणाऱ्या तमाम शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली, तरच आरक्षणाचे सर्व प्रश्न सुटतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.  ते आज जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. इतर मागास प्रवर्ग - ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य नाही, ही मर्यादा १५ ते १६ टक्क्यांनी वाढवावी, असं ते म्हणाले. आंतरवाली सराटी इथं लाठीमारीचे आदेश कोणी दिले हे सरकारनेच सांगावं, असं पवार म्हणाले. विशेष अधिवेशन, एक देश एक निवडणुकीच्या मुद्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
****
मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रेतून राज्यातल्या प्रत्येक कुटुंबात, घरा-घरात राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल, असं नियोजन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातून ३५१, आणि नागरी क्षेत्रातून प्रत्येक जिल्ह्याचे ३६, असे राज्यातून एकंदर ३८७ कलश पाठवण्यात येणार आहेत. अमृत कलश यात्रा चार टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात या कलशासाठी माती किंवा तांदुळ संकलनाची मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे.
****
राज्यातल्या  विद्यापीठांसह  सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांचं लवकरच आर्थिक आणि प्रशासकीय लेखापरीक्षण केलं जाणार आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे इथं एका कार्यक्रमात ही माहिती दिली. या परिक्षणासाठी सनदी लेखापरीक्षकांची मदत घेतली जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचा भाग म्हणून आज सातारा जिल्ह्यात वाई, पाचगणी इथं बंद पुकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज स्थापनेची शपथ घेतलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन आज सकाळी शेकडो मोर्चेकरी पायी सातार्याकडे निघाले. या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी पाचवड इथं अडवत महामार्गावर येण्यापासून रोखले. यामुळे तणाव निर्माण झाला असून महामार्गावरील गावात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा झाले आहेत. या आंदोलकांना भेटत निवेदन घेण्यासाठी वरिष्ट महसुली अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ या अभियानामध्ये देशात 'ब वर्ग' नगरपरिषदेमध्ये बीड जिल्ह्यातली अंबाजोगाई नगरपरिषदेनं देशभरात पहिला क्रमांक मिळवला आहे. या यशाबद्ददल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी नगरपरिषदेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा काल सत्कार केला. यापुढेही अंबाजोगाई शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारून आपण सर्वजण आपलं शहर अधिकाधिक स्वच्छ, सुंदर ठेवण्यास सहकार्य कराल, असा विश्वास गुट्टे यांनी व्यक्त केला.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वेमार्गाच्या कामासाठी पूर्णा - हैदराबाद -पूर्णा ही गाडी ११ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तिरुपती ते जालना विशेष गाडीची आजची फेरी तर जालना ते तिरुपती विशेष गाडीची १० सप्टेंबर रोजीची फेरी रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
भाजपाला सत्तेत येण्यापासून अखिलेश रोखू शकत नाही – असदुद्दिन ओवैसी
भाजपाला सत्तेत येण्यापासून अखिलेश रोखू शकत नाही – असदुद्दिन ओवैसी
भाजपाला सत्तेत येण्यापासून अखिलेश रोखू शकत नाही – असदुद्दिन ओवैसी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यात नाही, अशी टीका एआयएमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर ते उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार  ताशेरे ओढले आणि राज्यातील शेतकऱ्यांना भटक्या गुरांचा…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
जातीय तणाव टाळण्यासाठी संपूर्ण राजस्थानमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे
जातीय तणाव टाळण्यासाठी संपूर्ण राजस्थानमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे
उदयपूरमध्ये एका शिंपीच्या हत्येनंतर जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने मंगळवारी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आणि संपूर्ण राज्यात मोबाइल इंटरनेट सेवा निलंबित केली. मुख्य सचिव उषा शर्मा यांनी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले मोबाइल इंटरनेट राज्यभर 24 तास सेवा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) चे कलम 144 लागू करणे – चारपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यापासून प्रतिबंधित करणे…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
घरातून बाहेर पडताच थंड हवेचा झोत येईल, घाम येणार नाही, फक्त हा नेकबँड गळ्यात लटकवा.
घरातून बाहेर पडताच थंड हवेचा झोत येईल, घाम येणार नाही, फक्त हा नेकबँड गळ्यात लटकवा.
नेकबँड फॅन हँड्स फ्री: उष्णता खूप वाढली आहे. घरातून बाहेर पडताच घाम येतो. अशा स्थितीत गार वाऱ्याची झुळूक सुखावणारी असते. जर तुम्हाला सतत थंड हवा मिळत राहिली तर काय होईल? होय, 500 रुपयांनी मिळणार उन्हाच्या झळांपासून सुटका! कडक उन्हातही घाम येण्यापासून वाचवण्यासाठी पोर्टेबल नेकबँड फॅन आला आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात चिकटपणा आणि उन्हापासून दूर राहायचे असेल तर आम्ही तुम्हाला अशा पंख्याबद्दल सांगत…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध तीव्र, भाजप खासदाराने 50 हजारांचा जमाव बोलावला, जाणून घ्या काय आहे 'राज' रथ रोखण्याचा डाव
Raj Thackeray: राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध तीव्र, भाजप खासदाराने 50 हजारांचा जमाव बोलावला, जाणून घ्या काय आहे ‘राज’ रथ रोखण्याचा डाव
मनसे प्रमुख राज ठाकरे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (फाइल फोटो) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी ब्रिजभूषण शरण सिंह (भाजप) यांनी पूर्ण तयारी केली आहे. काल (१० मे, मंगळवार) खासदारांनी ५० हजार उत्तर भारतीयांची बैठक बोलावली आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (ब्रिजभूषण शरण सिंह भाजपमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्येत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
theinvisibleindian · 6 years
Text
आज मंत्रालयात येण्यापासून अडवलं उद्या सरकारमधे येण्यापासूम अडवू, धनंजय मुंडे चा पंकजा मुंडेंना इशारा
आज मंत्रालयात येण्यापासून अडवलं उद्या सरकारमधे येण्यापासूम अडवू, धनंजय मुंढेंचा पंकजा मुंढेंना इशारा @NCPSpeaks @dhananjay_munde #hellomaharashtra
बीड प्रतिनिधी |आज मंत्रालयात येण्यापासून अडवलं उद्या सरकारमधे येण्यापासूम अडवू असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी भाजपा नेत्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना इशारा दिला. धनगर आरक्षणाबाबत पंकजा मुंढे यांनी एका भाषणात आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर मंत्रालयाची पायरी चढणार नाही असे विधान केले होते. मात्र त्याचा विसर पडून त्यांनी आज मंत्रालयाची…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
मराठा आंदोलकांवर दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का?
मराठा आंदोलकांवर दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का?
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १० वर्ष होत असल्यामुळे मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी दडपशाही करायला ते अतिरेकी आहेत का? अशी संतप्त विचारणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मराठा क्रांति मोर्चाच्या आजच्या मुंबईतील संवाद यात्रेच्या अनुषंगाने काल रात्रीपासून राज्याच्या विविध भागात पोलिसांनी मराठा आंदोलनाच्या समन्वयकांना ताब्यात घ्यायला सुरूवात केली होती. सरकारने मुंबईवरील अतिरेकी…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Text
सततच्या तोंड येण्यापासून मिळवा सुटका, असे करा घरगुती उपाय !
तोंडात फोड आल्याने काही सुचेनासं होतं. खाणं दूरच पाणी पिणंही कठिण होऊन बसतं. यावर नेमका काय उपाय करावा हे मात्र अनेकांना माहितीच नसतं. पण यावरील उपाय तुमच्या आसपासच असतात. तोंड आलं की, तोंडाच्या आत आणि जिभेवरही फोड येतात. असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येतं. याचा त्रासही खूप होतो. चला आज आम्ही तुम्हाला यावरील ��रगुती उपाय सांगणार आहोत.
तोंड येणं ही एक साधारण बाब झाली…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·      समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची महाराष्ट्राची जाणीव पुढेही जपली जावी-राष्ट्रपतींचं आवाहन
·      अजित पवार यांच्या सरकारात सहभागाचा निर्णय सर्वसहमतीने-मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा
·      राष्ट्रवादीचा अध्यक्ष मीच-शरद पवार यांचा दावा-पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार यांच्यासह नऊ जणांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब-सदर बैठकीवर अजित पवार यांचा आक्षेप
·      चांद्रयान - तीन चं येत्या चौदा तारखेला श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण
·      जनावरांना महामार्गावर येण्यापासून रोखण्याकरता केंद्राची ‘बाहुबली पशुधन कुंपण’ योजना
·      मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध पाच ग्रंथ पुरस्कारांची घोषणा
·      रेल्वे रुळावर खडीने भरलेला लोखंडी ड्रम ठेवल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
आणि
·      जागतिक युवा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या १८ वर्षाखालील महिला संघाला सुवर्ण पदक
****
समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची महाराष्ट्राला असलेली जाणीव यापुढेही जपली जावी, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपतींचा काल मुंबईत राजभनवात नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. 
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री, यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातलं, तसंच आर्थिक, सामाजिक, संगीत आणि लोककला क्षेत्रातल्या योगदानाचं कौतुक केलं. साखर निर्यातीत जगात देशाचा दुसरा क्रमांक असून, यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचं त्या म्हणाल्या. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं कार्य शासन करत आहे, असं सांगून राष्ट्रपतींनी, राज्यातल्या जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी राष्ट्रपतींनी काल सिध्दीविनायक मंदिराला देखील भेट दिली. सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं. आज राष्ट्रपती मुर्मू शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रपतींनी काल सकाळी नागपूर इथं आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आदिवासी समुहातल्या माडिया, कातकरी आणि कोलाम जमातींचे प्रतिनिधी या���ेळी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षित होऊन पुढे गेलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या. या समाजानं स्वतःचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधतानाच, सामाजिक बांधिलकीतून आपल्या समाज बांधवांचाही विकास केला पाहीजे, असं देखील राष्ट्रपतींनी सांगितलं. देशात आदिवासींच्या सातशे जमातींच्या एक हजारांहून अधिक बोलीभाषा असून, या भाषांचं संवर्धन होणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सरकारमध्ये घेण्याचा निर्णय सर्वसंमतीने झाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते. आपण नाराज असल्याच्या अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात असल्याचं ते म्हणाले. आम्ही बेरजेचं राजकारण करत असून, राज्य सरकारला आता २०० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. ट्रिपल इंजिनच्या या नव्या सरकारच्या माध्यमातून राज्याचा वेगाने विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका होतील, असा विश्वास शिवसेना उपनेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून, पक्षात कोणतीही नाराजी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
****
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचं पक्षातर्फे अभिनंदन केलं. ते भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं महायुती सोबत आल्यामुळे आपल्या महायुतीची ताकद अधिक वाढली असल्याचं आठवले यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपणच अध्यक्ष असून, कोणी काहीही म्हटलं तरी त्याला आपण महत्व देत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर राज्यातल्या बदलत्या नव्या सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी काल दिल्लीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती, त्यानंतर ते बोलत होते. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाशी संपर्क साधणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘किसीने कुछ कहां मुझे मालूम नही। एक बात पक्की है की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का मै प्रेसिडेन्ट हूं। दुसरा, किसी ने अपने नाम का स्टेटमेंट दे दिया, कुछ बात कहीं, वो बात कह सकते है। इसमे कोई सच्चाई नही है। हमारा विश्वास चुनाव आयोग पर है।’’
खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, तसंच राज्य मंत्रिमंडळात सामील झालेल्या नऊ आमदारांना निलंबित करण्याच्या निर्णयाला पक्ष कार्यकारिणीनं या बैठकीत मंजुरी दिली. या बैठकीत आठ ठराव मंजूर झाले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास कार्यकारिणीनं व्यक्त केला. पक्षाच्या सर्व प्रदेश समित्या शरद पवार यांच्या बाजूनं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पी सी चाको, जितेंद्र आव्हाड, फौजिया खान, वंदना चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ नेते या बैठकीला उपस्थित होते.
दरम्यान, शरद पवार यांनी घेतलेल्या या बैठकीवर अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. ३० जून रोजी झालेल्या निवडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आपण आहोत, त्यामुळे अन्य कोणालाही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा अधिकार नसल्याचं, अजित पवार यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
****
पराभवाची भिती सतावू लागल्यानं भारतीय जनता पक्ष केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचं राजकारण करत असल्याचा आरोप, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुंबईत काल पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कोअर कमिटीची बैठक झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भाजपच्या राजकारणावर या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीतल्या फुटीचा महाविकास आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही उलट आघाडी आणखी बळकट झाल्याचं बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. 
****
विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व अकृषी विद्यापीठांनी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करावेत, अशी सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं असतं, त्यानुसार विद्यार्थी प्रवेशाचं नियोजन करतात, म्हणून पदवी परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर होणं आवश्यक असल्याचं पाटील म्हणाले.
****
राज्य शेती महामंडळाकडे असलेल्या शेत जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करावी, या जमिनींवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्ट उभे करण्यासाठी तज्ज्ञ कंपन्यांमार्फत आराखडा तयार करण्याच्या सूचना, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत. काल मुंबईत राज्य शेती महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खंडकऱ्यांच्या जमिनीवरील शर्त कमी करण्याबाबत चर्चा झाली.
****
चांद्रयान - तीन चं प्रक्षेपण येत्या चौदा तारखेला होणार आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी हे यान अवकाशात झेपावेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली. चंद्राच्या भूभागावर अंतराळ यान उतरवण्याची भारताची चांद्रयान-तीन ही अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग, चांद्रभूमीवर रोव्हर फिरणं आणि तिथं वैज्ञानिक प्रयोग करणं ही चांद्रयान-तीन ची प्रमुख उद्दिष्टं आहेत.
****
महामार्ग ओलांडणाऱ्या जनावरांना अटकाव घालण्यासाठी आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी, देशातल्या सर्व द्रुतगती महामार्गांच्या दोन्ही बाजूंना, ‘बाहुबली पशुधन कुंपण’ बसवण्याची सरकारची योजना आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. हे कुंपण आग प्रतिबंधक दर्जाचं असून, देशातले सर्व महामार्ग शाश्वत करण्याच्या आणि वन्य जीव आणि पशुधनाला पोहोचणारी हानी रोखण्याच्या आत्मनिर्भर भारताच्या तत्त्वांशी सुसंगत असल्याचं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
देशभरात स्वच्छता आणि वनराईची चळवळ उभी राहावी, असं मत राष्ट्रीय प्रतिदर्षण सर्वेक्षण विभागाचे सचिव डॉ. जी. पी. सामंता यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत काल `पर्यावरण संरक्षणासाठी कचरा व्यवस्थापन` या विषयावरच्या कार्यशाळेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवी मुंबईत बेलापूर इथल्या राष्ट्रीय प्रतिदर्ष सर्वेक्षण कार्य��लयाकडून स्वच्छता पंधरवडा साजरा करण्यात येत असून, त्यानिमित्त ही कार्यशाळा घेण्यात आली.
****
‘शासनव्यवस्थे’ला ‘सुशासनव्यवस्थे’त बदलण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाची, राज्यात अंमलबजावणी झाली असून, शिंदे- फडणवीस सरकारची गेल्या एका वर्षातली वाटचाल तेजस्वी ठरल्याचं, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विरोधकांनीही आता मोदी यांच्या विकासाभिमुख राजकारणाचा स्वीकार केला असून, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका गटानं राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय, हा त्याचा पुरावा असल्याचं ते म्हणाले. कुटुंब केंद्रीत राजकारणाची परंपरा आता संपुष्टात येऊ लागली असून, भारतीय जनता पक्षानं देशासमोर नव्या राजकारणाचं उदाहरण उभं केलं असल्याचंही उपाध्ये यांनी नमूद केलं.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध पाच ग्रंथ पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार डॉ.भवान महाजन यांच्या, ‘रस्ता शोधताना’ या आत्मपर लेखनासाठी, प्राचार्य म.भि. चिटणीस वाङमयपुरस्कार, विश्वास वसेकर यांच्या ‘काव्यस्व’ या समीक्षाग्रंथासाठी जाहीर झाला आहे. कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कार, अजीम नवाज राही यांना ‘तळमळीचा तळ’ या कवितासंग्रहासाठी, बी रघुनाथ कथा- कादंबरी पुरस्कार, सीताराम सावंत यांच्या, ‘हरवलेल्या कथेच्या शोधात’, या कथासंग्रहासाठी घोषित झाला आहे. कुमार देशमुख नाट्यपुरस्कार, डॉ.विजय देशमुख यांना, `चल ऐश करले` या नाटकासाठी जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही घोषणा केली. येत्या तेरा ऑगस्टला औरंगाबाद इथं या पुरस्कारांचं वितरण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जालना - नांदेड रेल्वेमार्गावर परतूर तालुक्यातल्या सातोना-उस्मानपूर दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर खडीने भरलेला लोखंडी ड्रम ठेवल्याचा प्रकार काल सकाळी समोर आला. देवगिरी एक्सप्रेसच्या चालकाला रुळांवर काहीतरी वस्तू असल्याचं दुरुनच लक्षात आल्यानंतर चालकानं आपत्कालिन ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने प्रसंगावधान राखून, रेल्वेचा वेग कमी केल्यानं, मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी विद्युतीकरणाच्या कामावरचे निरीक्षक अभिषेक श्रीवास्तव यांच्यासह इतर चार कामगारांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
आयर्लंड मध्ये सुरु असलेल्या जागतिक युवा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या १८ वर्षाखालील महिला संघानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. ऐश्वर्या शर्मा, अदिती स्वामी आणि एकता रानी या भारतीय संघानं अमेरिकेच्या संघाचा २१४ - २१२ असा पराभव केला. मानव जाधव आणि ऐश्वर्या शर्मा यांनी मिश्र कंपाउंड प्रकारात मेक्सिकोचा पराभव करुन कांस्य पदक जिंकलं.
****
कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीत सिंधुची प्रतिस्पर्धी जपानच्या नातसुकी निदाइरा हीनं स्पर्धेतून माघार घेतल्यानं सिंधुला पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला. पुरुष एकेरीत काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं ब्राझीलच्या यगोर कोहेल्हो याचा २१ - १५, २१ - ११ असा पराभव केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कुपोषण मुक्ती अभियानाला कालपासून सुरुवात झाली. यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ६७ बाल ग्राम विकास के��द्रा��र २६६ तीव्र कुपोषित बालकांसाठी कुपोषण मुक्ती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या बालकांना आवश्यक औषधोपचारासह, पोषण आहार देण्यात येत आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या केळवंडी शिवारात इथेनॉलच्या टँकरचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं या टँकरनं पलटी होऊन पेट घेतला. यात टँकरमधल्या एकूण सहा जणांपैकी दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. 
****
औरंगाबाद शहर परिसरात काल दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या धोंडराई इथं पावसामुळे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. काल सकाळी ही दुर्घटना घडली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात यापुढे प्रत्येक महापुरुषांच्या जयंती आणि सार्वजनिक उत्सवात डॉल्बीचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ध्वनी प्रदूषण नियंत्रणाबाबत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वतीनं आज आणि उद्या शैक्षणिक धोरण या विषयावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. कुलगुरु डॉ. विलास सपकाळ यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीला विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्र - कुलगुरू, अभ्यासतज्ञ आणि याविषयीचे संबंधित उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 April 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.****
शासकीय योजनांची जत्रा उपक्रम आजपासून सुरू;एकाच ठिकाणी कमीत कमी कालावधीत  विविध योजनांचा लाभ मिळणार
विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन नियमावली जारी
राज्यात काल कोविडचे एक हजार १५२ रुग्ण, चार रुग्णां��ा मृत्यू
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी
मराठवाड्यात विविध कार्यक्रमांतून महामानवाला आदरांजली
आणि
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा २०२३ च्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांत दुसरा क्रमांक
****
"जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’’, हा शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ देणारा उपक्रम राज्यात आजपासून सुरू होत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत चालवण्यात येणाऱ्या या उपक्रमात, नागरिकांना एकाच ठिकाणी कमीत कमी कालावधीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ही जत्रा १५ जून पर्यंत चालणार असून, यात राज्यातल्या सत्तावीस लाख लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तम नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठी जिल्हास्तरावर तसंच तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येकी दोन दिवस शासकीय योजनांशी निगडीत प्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देणार आहेत.
****
विद्यापीठ अनुदान आयोग-युजीसीने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी नवीन नियमावली जारी केली आहे. यात तक्रार निवारण समित्यांची स्थापना आणि सर्व उच्च शिक्षण संस्थांद्वारे लोकपाल नियुक्त करण्याच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्याने तक्रार निवारणासाठी इतर सर्व नियमांचा अवलंब केल्यानंतरच लोकपाल विद्यार्थ्याच्या तक्रार अर्जावर सुनावणी करेल. यासाठी विद्यार्थी तक्रार निवारणासाठी प्रत्येक महाविद्यालयाकडे एक ऑनलाइन पोर्टल असणं आवश्यक असल्याचं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्यात व्याघ्रप्रकल्पाच्या धर्तीवर हत्तीप्रकल्प सुरू करण्यासंदर्भात केंद्र सरकारशी तातडीनं पत्रव्यवहार करण्याच्या सूचना, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ते काल मुंबईत झालेल्या बैठकीत बोलत होते. हत्तींना गावापर्यंत तसंच शेतांपर्यंत येण्यापासून रोखण्यासाठी हत्तींशी संवाद साधून त्यांना नियंत्रित करणारे प्राणी संवादक आनंद शिंदे यांच्या कामांविषयीचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. जंगलातली झाडं कापण्याची परवानगी देताना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि ऑफलाइन परवानगी बंद करण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
****
महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते काल नागपुरात बोलत होते. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पाच वेळा अपमान केला, त्यांची सावरकरांबद्दलची भूमिका बदललेली नाही, सावरकरांवर टीका करावी इतकी गांधी यांची उंची नसतानाही ते वारंवार अपमान करत असल्याकडे बावनकुळे यांनी लक्ष वेधलं.
****
काँग्रेस फक्त भाजपा विरोधात महाआघाडी उभारत नसून, देश वाचवण्याचं काम करत असल्याचं, काँग्रेस प्रदेश समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपुर इथं बोलत होते. महाविकास आघाडीच्या नागपुरातील सभेला काँग्रेसचे सगळे नेते उपस्थित राहतील, सभा होऊ नये यासाठी भाजपने प्रयत्न केले, सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही पटोले यांनी केली. सावरकरांचा जयघोष करणाऱ्या भाजपाने सावरकरांची हिंदू राष्ट्राची संकल्पना काय होती, ते स्पष्ट करावं, असं ते म्हणाले.
****
जमिनीविषयक दावे, फेरफारवर नोंद घेण्यासह खरेदी-विक्रीपासून ते नावनोंदणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया, नागरिकांना आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाद्वारे महसूल, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क आणि भूमी अभिलेख अशा तिन्ही विभागांचं एकत्रित ‘इक्युजे-कोर्ट ॲप 2.0 विकसित करण्यात येणार आहे. पुण्यात राबवण्यात आलेल्या या उपक्रमाची येत्या सहा महिन्यांत राज्यभर अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
****
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबई इथं तीन दहशतवादी घुसल्याची चुकीची आणि खोटी माहिती दूरध्वनीवरून देणाऱ्या व्यक्तीला दहशतवाद विरोधी पथकानं काल अटक केली. यासिन सय्यद असं या व्यक्तीचं नाव असून, त्याला अहमदनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. सय्यद याने सात एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून दुबईहून तीन दहशतवादी आले असल्याची खोटी माहिती दिली. वैयक्तिक वैमनस्यातून ही खोटी माहिती दिल्याचं तपासात निष्पन्न झालं.
****
राज्यात काल कोविडचे एक हजार १५२ रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला. राज्यात सध्या कोविडचे पाच हजार ९२८ सक्रीय रुग्ण आहेत. मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक १३३ सक्रीय रुग्ण आहेत, त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५०, नांदेड २८, लातूर २६, बीड १६, तर हिंगोली जिल्ह्यात सध्या तीन सक्रीय रुग्ण आहेत. परभणी जिल्ह्यात सध्या एकही कोविडचा रुग्ण नाही.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती काल देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
मुंबईत चैत्यभूमी इथं राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. बाबासाहेबांनी विविध विषयांवर केलेलं काम आजही राज्यकारभार करताना कामास येतं, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, इंदू मिल परिसरातलं बाबासाहेबांचं स्मारक येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत काल रेल्वेच्या भारत गौरव पर्यटक गाडी-'आंबेडकर यात्रा', या रेल्वेची सुरूवात करण्यात आली. नवी दिल्ली, महू, नागपूर, वाराणसी, सांची, सारनाथ, नालंदा या मार्गावरील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याशी निगडीत स्थळांचं दर्शन, तसंच भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्राशी संबंधित स्थळांना, या यात्रेमधून भेट देता येणार आहे. सहाशे प्रवासी क्षमता असलेल्या या गाडीत अद्ययावत सोयी आणि सुरक्षा व्यवस्था हे. काल दिल्लीहून निघालेली ही गाडी उद्या सकाळी नागपूर इथं पोहोचणार असून यात्रेकरू पवित्र दीक्षाभूमीला भेट देतील.
****
मध्यप्रदेश सरकारने बाबासाहेबांशी निगडित पाच स्थळांचा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत समावेश केला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महू या बाबासाहेबांच्या जन्मगावी काल ही घोषणा केली. या पाच स्थळांमध्ये जन्मभूमी महू, शिक्षणभूमी लंडन, दीक्षा भूमी नागपूर, महापरिनिर्वाणभूमी दिल्ली आणि मुंबईतल्या चैत्यभूमीचा समावेश आहे. महू इथं बाबासाहेबांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी सर्वसुविधांनी सुसज्ज धर्मशाळा उभारण्याची घोषणाही चौहान यांनी केली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यात आंबडवे या त्यांच्या मूळ गावी अभिवादनाचा शासकीय कार्यक्रम काल प्रथमच घेण्यात आला. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भडकल दरवाजा परिसरात असलेल्या आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष संघटना तसंच नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि टीव्ही सेंटर इथल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केली. भडकल गेट इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी या सुशोभीकरणाचा कामाला मंजूरी दिली असून, या दोन्ही पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी प्रत्येकी पाच कोटी प्रमाणे, एकूण दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं भुमरे यांनी सांगितलं.
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद आणि मराठवाडा मुक्ती संग्राम समितीच्या वतीनं आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालयामध्ये अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकर यांचं मराठवाडा मुक्ती संग्रामामधील अमूल्य योगदान, याबद्दल, मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी भाष्य केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार आणि कार्य' विषयावर ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक एम. आर. कांबळे यांचं व्याख्यान झालं. गुलामी आणि अन्यायी अशा तमोयुगातील कालखंडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात मुक्तीलढयाचं नेतृत्व केलं, असं कांबळे यांनी नमूद केलं. विद्यापीठात आंबेडकर यांच्या तैलचित्राची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
****
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे, आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी रांगोळी, चित्रकला, निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वीज कर्मचाऱ्यांच्या पाल्यांची वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, मशाल फेरी यासारख्या विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
****
जालना जिल्ह्यासह शहरात विविध कार्यक्रमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. मस्तगड इथल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली. संध्याकाळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीनं मिरवणूक काढण्यात आली.
****
नांदेड जिल्हा परिषद, महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं, विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हिंगोली इथले अतिरिक्त कोषागार अधिकारी निळकंठ पाचंगे यांचं व्याख्यान झालं,
शाहीर आनंद कीर्तने आणि ललकारबाबू वानखेडे यांनी प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
****
धाराशिव इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने यांचं, डॉ बाबासाहेबांची पत्रकारिता, या विषयावर व्याख्यान झालं. तेर इथं आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून, आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं.
****
लातूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं, व्याख्यान, भीम गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. समाज कल्याण विभागामार्फत निबंध लेखन, चित्रकला, सुंदर हस्ताक्षर, भीम गीत गायन आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
****
हिंगोली इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्राध्यापक गजानन बांगर यांचं व्याख्यान झालं. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने हिंगोली बस स्थानकात नागरिकांना जात प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भात माहितीपत्रकांचं वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं २०२३ च्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांतर्गत कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत श्रेणीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. या विशेष कामगिरीबद्दल राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक तसंच नागरिकांचं अभिनंदन केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या अंधव्यक्ती आणि डोळस स्वयंसेवकांसाठी दोन दिवसीय स्वयंसिद्धता कार्यशाळा पार पडली. दिग्दर्शक, चित्रकार स्वागत थोरात आणि स्वरूपा देशपांडे यांनी अंधांना यावेळी प्रशिक्षण दिलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर
‘‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया म्हणून प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक, चित्रकार स्वागत थोरात व स्वरूपा देशपांडे यांनी अंधांना प्रशिक्षण दिले. पांढरी काठी वापरणे, वेगवेगळी धान्य ओळखणे, इतर ज्ञानेंद्रियाचा वापर सक्षमतेने करून जीवन सुसह्य बनवणे अशा अनेक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. कायम अंधत्व भोग��ाऱ्या व्यक्तींचे दैनंदिन जीवन सोपे, सुरळीत करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल अग्निशमन सेवा सप्ताहाचं उद्घाटन महापालिकेचे प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात आलं. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत झालेल्या स्फोटात हुतात्मा झालेल्या अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या सप्ताहात अग्निशमन सेवांचे संयुक्त संचलन, व्याख्यानं, प्रात्यक्षिकं, प्रदर्शन आणि हुतात्मा जवानांच्या कुटूंबीयांना आर्थिक मदत म्हणून निधी संकलन, यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ८८ हजार ४५३ कामगारांनी ई श्रम कार्ड साठी नोंदणी केल्यामुळे जिल्हा मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यासाठी चार लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे त्रेचाळीस असंघटित कामगाराच्या नोंदणीचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. मराठवाड्यात आतापर्यंत अडतीस पूर्णांक बारा टक्के ई श्रम कार्ड नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण झालं आहे.
****
काचिगुडा ते रोटेगाव दरम्यान धावणारी रेल्वे आता नगरसोलपर्यंत धावणार आहे. येत्या १७ एप्रिलपासून हा बदल होईल, असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे. ही रेल्वे दररोज पहाटे चार वाजून ५० मिनिटांनी काचिगुडा इथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री नऊ वज���च्या सुमारास नगरसोल इथं पोहोचेल.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा २३ धावांनी पराभव केला. कोलकाता इथं ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात हैदराबाद संघाने निर्धारित २० षटकांत चार बाद २२८ धावा केल्या, मात्र कोलकाता संघ २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात २०५ धावाच करू शकला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 December 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ डिसेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात
कर्नाटकात महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा.
दोषींवर कठोर कारवाई करण्याचं तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण देण्याचं बस्वराज बोम्मई यांचं आश्वासन
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा संसद अधिवेशनात उपस्थित करण्याचं खासदार शरद पवार यांचं महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांना आवाहन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन
राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार जाहीर
राज्यातील सत्ता संघर्षावर आता १३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
आणि
भारत -बांगलादेशमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात होत आहे. हे अधिवेशन २९ डिसेंबपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली, विविध राजकीय पक्षांचे नेते बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, सरकार कुठल्याही मुद्यावर चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी या अधिवेशनात बेरोजगारी, महागाई, भारत-चीन सीमेवरची परिस्थिती तसंच शेतकऱ्यांना किमान हमी भावासह मुद्यावंर सखोल चर्चेची मागणी केली.
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनीही काल संसदेच्या सल्लागार मंडळाची बैठक घेतली. सदनाचं कामकाज सुरळीत चालावं, यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करण्याबाबत बिर्ला यांनी केलेल्या आवाहनाला सर्व पक्षांच्या नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कर्नाटकात बेळगाव जवळ हिरेबागवाडी इथं महाराष्ट्रातल्या काही वाहनांची तोडफोड केल्याच्या घटना काल घडल्या. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करून, या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसंच महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही बोम्मई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्याचे सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई तसंच खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकात प्रवेश बंदी करण्यात आली असून कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल जवळ दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांनी फौजफाटा उभा केला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा पुढे ढकलला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी हा दौरा पुढे ढकलल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
दरम्यान, या नेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखल्यानं घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली. या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना द्यायचे पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली.
दुसरीकडे या मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्याने त्यांचा निषेध करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सीमाभागात शिरण्याचा प्रयत्न केला, त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं.
****
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या अधिवेशन काळात उपस्थित करावा, तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हा विषय मांडावा, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी प्रक्षोभक विधान करून हा वाद सुरू केला, आता त्याला वेगळं स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवार यांनी काल पत्रकार परिषदेत केला. सीमाभागातलं आंदोलन पुढच्या ४८ तासांत थांबवा, अन्यथा आपल्याला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या समर्थनात बेळगावला जावं लागेल, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. दोन राज्यात सीमाप्रश्नावरून होणारा हा वाद देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक असल्याचंही पवार यांनी नमूद केलं.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी संसद भवन परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मुंबईत राज्यपाल भगत भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काल मुंबईत चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं. इंदू मिल इथं बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाट��ल, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांनीही काल चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
विधानभवनाच्या प्रांगणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
दलित बहुजनांना शासनकर्ती जमात बनवण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष मजबूत करणार असा निर्धार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. रिपाइंच्या जाहीर अभिवादन सभेत ते बोलत होते.
दरम्यान, देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी चैत्यभूमी आणि परिसरात मोठी गर्दी केली होती. नागपूर इथंही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दल तर्फे सामुहिक बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
केंद्रीय संचार ब्युरोचं नागपूर इथलं क्षेत्रीय कार्यालय आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "भारताचे संविधान आणि महामानवाचा जीवनप्रवास" या विषयावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. उद्या ८ डिसेंबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील.
****
औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषीकेश कांबळे यांचं ’राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर व्याख्यान झालं. बहुतांश देशांच्या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ही तीन मूल्यं आहेत. बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत ’सामाजिक न्याय हे चौथं मूल्यं समाविष्ट केलं. राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता ही मूल्यंही आंबेडकर यांनीच भारतीय लोकशाहीत रुजवली, असं डॉ कांबळे यांनी नमूद केलं. त्यापूर्वी काल सकाळी विद्यापीठातून समता शांती पदयात्रा काढण्यात आली. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या या पदयात्रेचा भडकल गेट इथं समारोप झाला.
डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन आणि आम्ही मार्गदीप संघाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंटच्या वतीनं भडकल गेट इथं एक वही एक पेन हे अभियान राबवण्यात आलं. नांदेड इथं समाज कल्याण कार्यालयात सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं तसंच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाड्यात सर्वत्र बाबासाहेबांना विविध उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आलं.
****
राज्यातल्या कोणत्याही प्राथमिक तसंच माध्यमिक शाळेत अन्य शाळेतून आलेल्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी शाळा स्थलांतर प्रमाणपत्र- टी सी अभावी प्रवेश नाकारता येणार नाही असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. या संदर्भातला शासननिर्णय जारी करण्यात आला असल्याचं ते म्हणाले. शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्याला वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा आणि अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यानुसारच्या वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा असं या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे २०२१ वर्षासाठीचे मराठीतील उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. ३३ साहित्यिकांचा या पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये जयेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शशिकाम्त्रे पित्रे यांना शाहू महाराज पुरस्कार, सदानंद कदम यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार, अरुण गद्रे यांना महात्मा जोतिराव फुले पुरस्कार, तर विवेक उगलमुगले यांना बालकवी पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
औरंगाबाद च्या महात्मा गांधी मिशन ट्रस्टच्या वतीनं देण्यात येणारा महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार यंदा औरंगाबाद इथल्या ज्येष्ठ स्वातंत्त्र्य सेनानी ताराबाई लड्डा आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांना देण्यात येणार आहे.  ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असून येत्या १३ डिसेंबरला औरंगाबाद इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे.
****
शिवसेनेच्या दोन गटातील सत्ता संघर्षावर काल सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वात पाच सदस्यीय पीठातले एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आता ही सुनावणी १३ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षानं राज्यात असंवैधानिक सरकार सुरू असल्याचा आरोप करत सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र १३ जानेवारीला मुख्य सुनावणीच्या वेळापत्रका संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
२०१७ ते २०२० या कालावधीत औरंगाबाद महानगरपालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी एकशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. तत्कालिन महापौर नंदकुमार घोडेले, भगवान घडामोडे, नगरसचिव आणि अधिकाऱ्यांनी ऐनवेळचे २२० प्रस्ताव विषयपत्रिकेत समाविष्ट करुन हा गैरव्यवहार केला असल्याचं ते म्हणाले. २५ कोटी रुपयांची रस्त्याची कामं गाळे वाटप, अतिरिक्त कामं, अशा नावाखाली २२० प्रस्ताव चर्चेविनाच मंजूर करण्यात आले असं खासदार जलील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि भगवान घडामोडे यांनी आपल्या कार्यकाळात कोणताही भ्रष्टाचार झालेला नसून कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
****
राज्य सरकारनं राबवलेल्या माझी वसुंधरा अभियानात औरंगाबाद महापालिकेला विभागस्तरावर उत्तम कामगिरीसाठी दोन कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालं आहे. जिल्ह्याच्या महसुली तसंच एकूण कामगिरीवरून सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून औरंगाबादचं कौतूक करण्यात आलं आहे. औरंगाबाद विभागात नगरपरिषद गटातून हिंगोलीला दीड कोटी रुपये निधी बक्षीस स्वरूपात जाहीर झाला आहे. पारितोषिकात मिळालेल्या या निधीचा खर्च कसा करावा, यासंबंधीच्या सूचनाही दिलेल्या आहेत.
****
परभणी-पाथरी राष्ट्रीय महामार्गावर पेडगाव इथं आज आणि उद्या मुस्लिम बांधवांच्या वार्षिक इज्तेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतुक  अन्य मार्गे वळवण्यात आली आहे. सेलूकडून मानवतरोड मार्गे येणारी जड वाहनं कोल्हापाटी इथून मानवत - पोखर्णी फाटा - पाथरी - उमरी मार्गे परभणीकडे जातील. गंगाखेड रोड - वसमत रोड - जिंतूर रोडवरुन येणारी वाहनं उमरी फाटा इथून पाथरीकडे वळवण्यात आली आहेत.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज ढाका इथ��� होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत रविवारी झालेला पहिला सामना जिंकून बांगलादेशानं मालिकेत एक-शून्य अश�� आघाडी घेतली आहे. सकाळी साडे अकरा वाजता हा सामना सुरु होईल.
****
कतार मध्ये सुरु असलेल्या विश्वचषक फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगाल, ब्राझिल आणि मोरक्कोचे संघ उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. पोर्तुगालनं काल स्वित्झर्लंडचा ६-१ असा पराभव केला तर स्पेनच्या संघाला पेनल्टी शूट आऊट फेरीत ३-० अशा फरकानं मोरक्कोनं पराभूत केलं. अन्य एका सामन्यात ब्राझिलनं दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. परवा शुक्रवारी ब्राझिल आणि क्रोएशिया यांच्यात उपान्त्यपूर्व फेरीचा सामना होईल.
****
औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राज्य  क्रीडा महोत्सवात काल, बास्केटबॉल स्पर्धेत, अंतिम लढतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं ६६-५९ अशा फरकानं नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ संघाचा पराभव केला. तर मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा पराभव करत सावित्री फुले पुणे विद्यापीठानं विजेतेपद पटकावलं.
महाराष्ट्राची क्रीडादूत नवेली देशमुख हीच्या उपस्थितीत या राज्य क्रीडा महोत्सवाचा आज समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा  होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथे मातोश्री दगडुबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित चार दिवसीय एकोणपन्नासाव्या  कुमार - कुमारी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल मुलींच्या गटात झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर संघानं परभणी आणि पुण्याच्या संघांना पराभूत करत विजेतेपद पटकावलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जगातले सगळ्यात विषारी झाड, हात लावता क्षणीच येतो मृत्यू
जगातले सगळ्यात विषारी झाड, हात लावता क्षणीच येतो मृत्यू
जगातले सगळ्यात विषारी झाड, हात लावता क्षणीच येतो मृत्यू जर एखाद्या व्यक्तीने या फळाचा एक तुकडाही खाल्ला तर तो मरू शकतो. या कारणास्तव, या झाडाच्या संपर्कात येण्यापासून लोकांना रोखण्यासाठी आणि त्याची फळे खाण्यापासून रोखण्यासाठी झाडांच्या सभोवताली फलक लावण्यात आले आहेत. या झाडाची उंची सुमारे ५० फूट असते, त्याची पाने चमकदार आणि अंडाकृती असतात. जर एखाद्या व्यक्तीने या फळाचा एक तुकडाही खाल्ला तर तो…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल व्हिडिओ : आईने मुलाला ट्रकखाली येण्यापासून वाचवले, अपघाताचा व्हिडिओ पाहून आत्मा हादरेल!
व्हायरल व्हिडिओ : आईने मुलाला ट्रकखाली येण्यापासून वाचवले, अपघाताचा व्हिडिओ पाहून आत्मा हादरेल!
अपघाताचा हा व्हिडिओ पाहून आत्मा हादरेल! प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter ही हृदयद्रावक घटना 2019 मध्ये व्हिएतनाममधील गोई नाम दिन्ह येथे घडली होती. हा व्हिडिओ ट्विटरवर पुन्हा व्हायरल होत आहे. व्हिडिओला उत्तर देताना, इंग्लंडचा क्रिकेटर जोफ्रा आर्चरने लिहिले – मदर ऑफ द इयर. पुलावरून उडी मारण्यापासून ते भयंकर बिबट्याचा सामना करण्यापर्यंत… एक आई आपल्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
शिव संपर्क अभियानावरून नारायण राणेंनी सेनेला काढला चिमटा; म्हणाले, शिवसेना म्हणजे…
शिव संपर्क अभियानावरून नारायण राणेंनी सेनेला काढला चिमटा; म्हणाले, शिवसेना म्हणजे…
शिव संपर्क अभियानावरून नारायण राणेंनी सेनेला काढला चिमटा; म्हणाले, शिवसेना म्हणजे… राज्यात भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये जलीली यांनी युतीची ऑफर दिली आहे. जलील यांच्या प्रस्तावानंतर राज्यात राजकारणाची नवी समीकरणे जुळणार का अशी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 02 February 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०२ फेब्रुवारी २०२२ दुपारी १.०० वा. ****
नवा अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणांवर केंद्रीत असून त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणं या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आत्मनिर्भर भारत अर्थसंकल्प या विषयावर ते आज जनतेशी संवाद साधत होते. नव्या संधींचा, नव्या संकल्प पूर्तीचा हा काळ असून, भारत आत्मनिर्भर बनावा आणि याचा पाया एक आधुनिक भारत असावा, असं ते म्हणाले. हर घर नल से जल, प्रधानमंत्री आवास योजना, शिक्षण, कृषी, संरक्षण यासारख्या क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. सरकारनं आकांक्षित जिल्हा अभियान सुरु केलं असून, अशा जिल्ह्यांमध्ये शिक्षण, आरोग्य, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, रस्ते विकास अशा विविध क्षेत्रात काम करण्यात येत असून, या कामाची संयुक्त राष्ट्रसंघाने प्रशंसा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानावर आधारित बनवण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक योजना प्रस्तावित असल्याचं ते म्हणाले. स्टार्ट अप, पीएम किसान सन्मान निधी, डिजिटल शिक्षण, बँकिंग प्रणाली, इंटरनेट सुविधा, फाईव्ह जी सेवा अशा विविध क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.  
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १६७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५७ लाख ४२ हजार ६५९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६७ कोटी २९ लाख ४२ हजार ७०७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
फायजर आणि बायोटेक या औषध निर्माण कंपन्यांनी पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कोविड-19 लसीचा आपत्कालीन वापर करण्याकरता परवानगी मागितली आहे. सहा महिने ते चार वर्ष वयोगटातल्या मुलांना कोरोनाच्या वर्तमान आणि संभाव्य भविष्यातल्या प्रकारांपासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी लसीच्या तीन मात्रा आवश्यक असतील, असं फायझरनं एका निवेदनात म्हटलं आहे. अशी मंजुरी मिळाल्यास, फाइझर-बायोटेक लस ही पाच वर्षांखालील बालकांसाठी उपलब्ध असलेली पहिली COVID-19 लस असेल.
****
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरीतून सूट देण्याचा कालावधी या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत वाढवला आहे. तसेच उप-सचिव स्तराच्या खालील ५० टक्के कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचा कालावधीही, १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवला आहे. दिव्यांग व्यक्ती आणि गरोदर महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाईल. कार्यालयात उपस्थित राहणारे केंद्र सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेगवेगळ्या वेळांचं पालन करावं लागेल, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या प्रत्येक कामगारांना तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळ-ई.एस.आय.सी.चं किमान ३० खाटांचं रुग्णालय उभारण्यात येणार आहे. कामगार मंत्री तथा कमर्चारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली. कर्मचारी राज्य विमा महामंडळच्या प्रादेशिक मंडळाची काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. दहा किलोमीटरनंतर एक या महामंडळाची अट काढण्यात येणार असून आता लोकसंख्या तसंच आवश्यकतेनुसार रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. कोविड काळात ई.एस.आय.सी.च्या रुग्णालयांनी केलेल्या कामाचं त्यांनी कौतुक केलं.
****
महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळांतर्गत खतांचं उत्पादन वाढवण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असे निर्देश कृषी मंत्री दादा भूसे यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते. शेतकऱ्यांना चालू हंगामासह खरीप २०२२ हंगामात अडचण येणार नाही यासाठी खतांचा पुरवठा सुरळीत होईल, असं नियोजन करावं, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे.
****
उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारी अमृत पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करण्यात यावी यासाठी पुढील एक महिन्यात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत. लातूर इथं काल या योजनेच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या अमृत योजनेतून पुढील काळात आणखी चार हजार घरांना नळ जोडण्या देण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
****
परभणी इथले सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांच्या उर्सला यावर्षी कोविड संसर्गामुळे परवानगी दिलेली नाही, असं जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. काल या उर्सनिमित्त संदलला सुरुवात करण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. या दर्ग्याचे धार्मिक आणि पारंपारिक अत्यावश्यक कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
हिजाब घालू देण्याच्या मागणीसाठी मुलींचं कॉलेजमध्ये आंदोलन; मंत्री म्हणाले, ‘असे कपडे घालणे अनुशासनहीनता’
हिजाब घालू देण्याच्या मागणीसाठी मुलींचं कॉलेजमध्ये आंदोलन; मंत्री म्हणाले, ‘असे कपडे घालणे अनुशासनहीनता’
हिजाब घालू देण्याच्या मागणीसाठी मुलींचं कॉलेजमध्ये आंदोलन; मंत्री म्हणाले, ‘असे कपडे घालणे अनुशासनहीनता’ कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील एका सरकारी महाविद्यालयात मुस्लिम मुली हिजाब घालण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन आठवड्यांपासून आंदोलन करत आहेत. येथील सहा मुस्लिम विद्यार्थिनींना कॉलेज व्यवस्थापनाने नियमांचे कारण देत हिजाब परिधान करून वर्गात येण्यापासून रोखले आहे. दरम्यान, कर्नाटकचे शिक्षणमंत्री…
View On WordPress
0 notes