Tumgik
#कॉलेजमध्ये
sindhuprabhat · 8 months
Text
Tumblr media Tumblr media
0 notes
news-34 · 11 months
Text
0 notes
Text
चंद्रपूर : रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक; मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल
https://bharatlive.news/?p=146488 चंद्रपूर : रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक; मेडिकल कॉलेजमध्ये ...
0 notes
nandedlive · 1 year
Text
‘ओयो रुममध्ये हनुमानाची आरती…’; महिला आयोगाने मुलींना सुनावलं
Tumblr media Tumblr media
नवी दिल्ली | हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होणाऱ्या अत्याचारांवरील आरोपांविषयी बोलताना रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी मुलांनी सुनावलं आहे. रेणू भाटिय हरियाणाच्या एका कॉलेजमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या घटनांवर त्यांनी मुलींना सुनावलं. ओयो रुममध्ये मुली हनुमानाची आरती करायला तर जात नाहीत. अशा ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईट प्रसंग घडू शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे, असं भाटिया म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनवलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळे महिलांशी संबंधित प्रकरणे सोडवताना आयोगाचे हात बांधले गेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यात बदल करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलंय. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; दिव्यांगांना पदोन्नतीसाठी चार टक्के आरक्षण देण्यालाही मंजुरी.
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन.
जी एन साईबाबा याच्या सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल.
आणि
छत्रपती संभाजीनगर इथं २१ ते २३ एप्रिल दरम्यान शेक्सपिअर महोत्सवाचं आयोजन.
****
राज्यातील शेती पंपांना दिवसा अखंडित आणि खात्रीशीर वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. राज्यातल्या ४५ लाख कृषी वीज ग्राहकांना याचा लाभ होणार आहे. वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी ७०० कोटी रुपयांचा स्वतंत्र फिरता फंड देखील स्थापन करण्यात येईल. चालू वर्षासाठी या करता १०० कोटी रुपये निधी, हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येणार आहे. या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अकृषी करण्याची गरज राहणार नाही. तसंच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना ३० वर्षांपर्यंत सर्व कर आणि शुल्कांतून सूट देण्यात येणार आहे.
केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नतीसाठी, चार टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाच्या १७ मे २०२२च्या आदेशाप्रमाणे, राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांना, गट - ड ते गट - अ च्या निम्नस्तरापर्यंत, पदोन्नती आरक्षण लागू करण्यात येणार आहे.
राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती काम करेल. आतापर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव, तांत्रिक तसंच वित्तीय तपासणीसाठी साखर आयुक्तांकडे पाठवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावांना अर्थसंकल्पात केलेल्या तरतूदीच्या मर्यादेपर्यंतच मंजूरी देण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यातील अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. थकबाकीची रक्कम पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यांमध्ये दरवर्षी १ जुलै रोजी देण्यात येईल. त्यानुसार २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षांचे हप्ते आणि २०२३-२४चा हप्ता एकत्रितपणे १ जुलै, २०२३ रोजी देण्यात येईल. थकबाकीची रक्कम देण्यासाठी ९००कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.
****
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी संवाद साधला, त्यानंतर ते बोलत होते. सर्वांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचं आवाहनही महाजन यांनी केलं. ते म्हणाले –
मागच्या वेळी जसा धोकादायक होता हा व्हेरिएंट, तसा यावेळी नाही. पण यासंदर्भामध्ये अधिक काळजी घेण्याचीसुद्‌धा आवश्यकता आहे. घाबरण्याचं अजिबात कारण नाही. आम्ही आता सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये यासंदर्भातले सर्व कर्मचारी आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना मास्क कंपलसरी केलेला आहे. ज्यांना याची लक्षणं असतील, त्यांनी सुद्‌धा बाहेर वावरताना, खरं म्हणजे घरातच आपण क्वारंटाईन झालं पाहिजे, घरात असतांना किंवा बाहेर असतांना आपण सगळ्यांनी मास्क वापरला पाहिजे की जेणेकरून याचा पुन्हा प्रसार आपल्या माध्यमातून होणार नाही. ज्यांनी व्हॅक्सिनेशन केलेलं नसेल, अजूनही त्यांनी व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे. यावेळेला याचा परिणाम कमी का आहे, तर या व्हॅक्सिनेशनमुळे.
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागानं २५ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कार्यरत केली आहेत. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी सुविधा उपलब्ध असून एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालय ३० हजारांहून अधिक कोविड चाचण्या करू शकतात. या बैठकीत महाजन यांनी शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा घेतला.
****
शासकीय कारभार जलदगतीनं आणि पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती टपाल केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यभरातील सामान्य नागरिक त्यांची निवेदनं आणि टपाल घेऊन मंत्रालयात येत असतात, तसंच क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांद्वारेही टपाल प्राप्त होत असतात. त्याचं जलद गतीनं वाटप होऊन पुढील कार्यवाहीसाठी त्या-त्या विभागांकडं ते टपाल पोचण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आलं आहे.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय क्वाँटम मिशनला मंजुरी दिली आहे. या मिशनच्या माध्यमातून क्वाँटम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर्थिक वृद्धीला गती मिळेल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षापासून २०३०-३१ पर्यंतच्या काळासाठी या योजनेकरता सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या चोऱ्या थांबवण्यासाठी चलचित्र संशोधन विधेयकाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात हे विधेयक सादर केलं जाणार आहे.
****
दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक जी एन साईबाबा याच्या सुटकेचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी घेत, उच्च न्यायालयानं एक स्वतंत्र पीठ स्थापन करून यावर पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून गडचिरोली न्यायालयानं साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती शिक्षा रद्द करत, साईबाबा याच्या सुटकेचे आदेश दिले होते. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज रद्दबातल ठरवला आहे.
****
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या डॉ. अविनाश कौर महाजन यांनी ‘कोविड या आजाराचे मानसिक स्थितीवर होणारे परिणाम’ या विषयावर आधारित शोधनिबंधाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. या शोधनिबंधासाठी त्यांना विद्यावेतनही मंजूर झालं आहे. डॉ. अविनाश कौर महाजन यांच्या या कामगिरीबाबत महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं अखिल भारतीय साहित्य परिषद आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं २१ ते २३ एप्रिल दरम्यान शेक्सपिअर महोत्सव घेण्यात येणार आहे. या महोत्सवात दासू वैद्य लिखीत “मेळा” ललित लेख संग्रहाचं अभिवाचन, शेक्सपिअरच्या साहित्य कृतींवर आधारीत कार्यक्रम “शेक्सपिअर दर्शन”, आणि “आम्ही कबाडाचे धनी”, हा इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ कला अकादमीच्या सभागृहात दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
****
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येत्या २१ एप्रिल रोजी मानसोपचार विभागातर्फे स्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी १० ते २ या कालावधीत हे शिबिर होणार आहे. या आजारामुळं येणाऱ्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रीया आणि या प्रमाणपत्राचे फायदे यावर यावेळी मार्गदर्शन केलं जाणार आहे. स्वमग्नता असलेल्या मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असं आवाहन या वैद्यकीय महाविद्यालयातर्फे करण्यात आलं आहे.
****
धाराशिव तालुक्यात कोंड इथं एका महिलेनं तीन लहान अपत्यांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. कांचन उर्फ राणी बबन बनसोडे असं या महिलेचं नाव असून, तिच्या अपत्यांची वयं अनुक्रमे १४, १० आणि सात वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक कारणावरून या महिलेने हे पाऊल उचलल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
येत्या अठ्ठावीस तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या टपाल विभागात विमा एजंट पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. यासाठी अठरा ते पन्नास वयोगटातले दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र असतील.
****
0 notes
marathibatmi11 · 2 years
Text
माझीच म्हणत प्रेयसीच्या वर्गात नाचवला कोयता , पोलिसांना समजलं अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीला तिच्या बावीस वर्षीय प्रियकराने कोयत्याच्या धाकावर धमकावल्याचा प्रकार वडाळा येथे उघडकीला आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, करण पगारे ( वय 22 ) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. तक्रारदार मुलगी आणि आरोपी हे चेंबूर परिसरात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
माझीच म्हणत प्रेयसीच्या वर्गात नाचवला कोयता , पोलिसांना समजलं अन..
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आलेली असून एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीला तिच्या बावीस वर्षीय प्रियकराने कोयत्याच्या धाकावर धमकावल्याचा प्रकार वडाळा येथे उघडकीला आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, करण पगारे ( वय 22 ) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. तक्रारदार मुलगी आणि आरोपी हे चेंबूर परिसरात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
भोसला कॉलेजमध्ये शिवस्तुती,पोवाड्याद्वारे अभिवादन
नाशिकः भोसला मिलीटरी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आपल्या भाषण,शिवस्तुती आणि पोवाड्याचे सादरीकरण करून अभिवादन केले. सुरवातीला प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. रयतेच्या राजा असलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यातून एक आदर्श समाजाला घालवून दिला. त्यांचा आदर्श,कार्य डोळ्यासमोर ठेवूनच आपण सारेजण वाटचाल करत आहोत, राजांचे विचार हे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
पुणे ब्रेकिंग..' तू कॉलेजपासून माझी फेवरेट ' म्हणताच विवाहिता पळत सुटली
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून ‘ तू जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हापासून माझी फेवरेट होती आणि मला तू खूप आवडायची ‘ असे म्हणत एका तरुणाने महिलेसोबत गैरवर्तन केलेले आहे. सोमवारी नऊ तारखेला दुपारी हा प्रकार घडलेला असून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, मोहन गंगाधर साळवे ( वय 24 राहणार तळेगाव दाभाडे ) असे अटक केलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sindhuprabhat · 8 months
Text
Tumblr media
0 notes
kokannow · 2 years
Text
सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाने जागतिक पर्यटन दिन सप्ताह सांगता समारंभ
सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाने जागतिक पर्यटन दिन सप्ताह सांगता समारंभ
मालवण : स.का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या आय क्यू ए सी, एनसीसी विभाग, अकाउंटन्सी विभाग व बिजनेस इकॉनॉमिक्स विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सुरुवातीला प्रा. बी. एच. चौगुले यांनी २७ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या पर्यटन सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला.या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
कॉलेजमध्ये रागाने का बघितलेस? असे म्हणत तरुणाने कोयत्याने मारले
https://bharatlive.news/?p=139440&wpwautoposter=1694666129 कॉलेजमध्ये रागाने का बघितलेस? असे म्हणत तरुणाने कोयत्याने मारले
पुणे : ...
0 notes
Text
कॉलेजमध्ये रागाने का बघितलेस? असे म्हणत तरुणाने कोयत्याने मारले
https://bharatlive.news/?p=139440 कॉलेजमध्ये रागाने का बघितलेस? असे म्हणत तरुणाने कोयत्याने मारले
पुणे : ...
0 notes
Text
मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखा घातल्याने गोंधळ, विद्यार्थिनींना प्रवेशापासून रोखले; विरोधानंतर परवानगी
https://bharatlive.news/?p=115127&wpwautoposter=1691051779 मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखा घातल्याने गोंधळ, विद्यार्थिनींना ...
0 notes
Text
मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखा घातल्याने गोंधळ, विद्यार्थिनींना प्रवेशापासून रोखले; विरोधानंतर परवानगी
https://bharatlive.news/?p=115127 मुंबईतील कॉलेजमध्ये बुरखा घातल्याने गोंधळ, विद्यार्थिनींना ...
0 notes
Text
पुण्यातील कॉलेजमध्ये ख्रिश्चन धर्माची प्रार्थना केल्यामुळे प्राचार्यांना मारहाण Video Viral
https://bharatlive.news/?p=110084 पुण्यातील कॉलेजमध्ये ख्रिश्चन धर्माची प्रार्थना केल्यामुळे ...
0 notes