#यश चोप्रा मुलगा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थयी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फील्ड यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करयाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान, आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे.
****
कोलकाता आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधीनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत, कामावर रुजू व्हावं, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
****
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे, ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा अशी हाक भाजपानं दिली आहे. भाजपचे प्रदेशा��्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून,  या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण मिळावं, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महीला घरून शेताकडे निघाली असतांना विहिरीत पडून तिचा मूत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातलाच आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या घराजवळ खेळताना पुलावरून नदीपात्रात पडला, वाहत्या पाण्य्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचा मूत्यू झाला. तर तीसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका १४ वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई कनिष��ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत नऊ सुवर्ण पदकं पटकावली. भारताच्या अनिशाने थाळीफेक प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निरु पाठकनं देखील सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
ब्रुसेल्स इथं आजपासून सुरु होणार्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहे. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
शाहरुख खानच्या आधी या सुपरस्टारला डरमध्ये 'राहुल मेहरा'ची भूमिका ऑफर झाली होती
शाहरुख खानच्या आधी या सुपरस्टारला डरमध्ये ‘राहुल मेहरा’ची भूमिका ऑफर झाली होती
डरसाठी शाहरुख खान हा मूळ पर्याय नव्हता. यश चोप्राने चित्रपटसृष्टीला एकापेक���षा एक स्टार दिले, त्यापैकी एक नाव म्हणजे शाहरुख खान. यश चोप्रा आणि शाहरुख खान या जोडीने एकापाठोपाठ अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि याच चित्रपटांमुळे शाहरुख खान रोमान्सचा किंग बनला. शाहरुख खान आणि यश चोप्रा यांच्या मैत्रीची सुरुवात ‘डर’ चित्रपटादरम्यान झाली होती. पण या चित्रपटासाठी शाहरुख खान त्याची पहिली पसंती नव्हती हे फार…
View On WordPress
0 notes
bollywoodpapa · 5 years ago
Text
शूटिंगच्या वेळी असं काय घडलं कि डर चित्रपटानंतर सनी देओल १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही
New Post has been published on https://www.bollywoodpapa.com/16-year-shahrukh-khan-sunny-deaol/
शूटिंगच्या वेळी असं काय घडलं कि डर चित्रपटानंतर सनी देओल १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही
शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला ह्यांचा ‘डर’ चित्रपट तर तुम्हांला लक्षातच असेल. ह्या चित्रपटाने एका बाजूला शाहरुख खानच्या करिअरला एक नवीन उंची दिली, तर दुसरीकडे बॉलिवूडच्या दोन स्टार्स शाहरुख आणि सनी देओल ह्यांच्या मधील वादाचे कारण सुद्धा हाच चित्रपट बनला. ह्या चित्रपटानंतर सनी देओल शाहरुख खान सोबत तब्बल १६ वर्ष बोलला नाही. सनी देओलला रजत शर्माच्या ‘आप कि अदालत’ ह्या शो मध्ये जेव्हा विचारण्यात आले कि, सनी राग फक्त स्क्रिनवरच नाही तर आम्हांला माहिती पडलं कि खरोखर मध्ये सुद्धा जेव्हा तू ‘डर’ चित्रपट करत होता तेव्हा तुझा इतका धसका होता कि संपूर्ण युनिट अगदी डायरेक्टर पासून ते शाहरुख खान पर्यंत सर्व तुला घाबरत होते. नक्की काय घडलं होतं तेव्हा, ज्यामुळे तुला इतका राग आला होता. ह्यावर सनी देओल हसतच म्हणाला, “ते घाबरत होते कारण त्यांच्या मनातच काहीतरी खोट होती.” ह्यावर स्पष्टीकरण देताना सनी देओल म्हणाला कि, “कधी कधी काही गोष्टी घडत असतात, ज्या मला योग्य वाटत नाहीत. आणि त्यानंतर मग मी बैचेन होतो. आणि तीच गोष्ट ‘डर’ चित्रपटाची शूटिंग करतेवेळी झाली.”
पुढे सनी देओल म्हणाला, ” घडलं असं होतं कि, त्यावेळी एक सीन करायचा होता. शाहरुख मला सुऱ्याने मारतो. त्यावर माझा खूप मोठा वाद झाला होता. माझे म्हणणे होते कि, बघा मी एक कमांडो ऑफिसर असून मी इतका एक्स्पर्ट आहे, इतका फिट आहे. आणि हा मुलगा आहे, हा मला कसे काय मारू शकतो. तो मला मारू शकतो पण जर मी त्याला पाहत नसेल तरच. मी त्याला बघतोय आणि तो मला सुऱ्याने मारतोय तर मी कसला कमांडो राहिलो मग. बरोबर ना. तर त्या गोष्टीवर थोडासा वाद चालू होता. त्यावेळी मला कळत नव्हते कि मी नक्की काय करू. आणि मी काही करू सुद्धा शकत नव्हतो. कारण यश चोप्रा हे वरिष्ठ आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करतो. त्यामुळे मी त्यांना काही बोलू सुद्धा शकत नाही. त्यावेळी मला इतका राग आला होता आणि मी तेव्हा माझे हात जीन्स मध्ये घातले होते. आणि मला माहितीच नव्हतं कि माझ्या अंगात इतका राग होता कि माझ्या हाताच्या प्रेशरने संपूर्ण पॅन्ट खिस्यापासून फाटली. आणि हि घटना घडली. त्यानंतर मी पाहिलं कि कोणी ��का बाजून घाबरून पळू लागलं आहे. तर कुणी दुसऱ्या बाजूला घाबरून पळतोय. उलट मी कोणाला काही करत नव्हतो. मी कोणतेही चुकीचे सुद्धा काही करत नव्हतो. फक्त मलाच माहिती नव्हतं कि मी नक्की काय करत आहे ते.”
नंतर त्यांना विचारण्यात आलं कि त्या घटनेनंतर आतापर्यंत त्यांनी शाहरुख खानशी बोलणं नाही केलं, हे खरं आहे का. त्यावर सनीने सावध उत्तर दिले कि, “गोष्ट अशी नाही कि मी बोलणं नाही केलं. मला माहिती नाही नक्की काय आहे, पण जेव्हा अशाप्रकारच्या घटना होतात त्यानंतर मी नेहमी स्वतःला अश्या गोष्टींपासून बाजूलाच ठेवतो. तसेही मी कुठे सोशिलाईज करतो कि कुणाशी भेटू किंवा कोणाबरोबर बोलू. तर कधी आम्ही भेटलोच नाही, तर बोलण्याचा काही प्रश्नच नाही येत. तसेही मी कोणत्या फंक्शनला नाही जात, पार्टीला नाही जात. आम्ही एकाच फिल्डचे असून देखील मग संपर्क नाही होत.” त्यानंतर त्याला विचारण्यात आले कि म्हणजे एक गोष्ट खरी आहे कि जर तुला कोणावर राग आला असेल तर मग तू त्या व्यक्तीपासून स्वतःला लांबच ठेवतो. त्यावर सानी देओल जोरात हसला आणि म्हणाला, “एखादी गोष्ट, ज्यात काहीच नाही आहे, त्याला बाजूला करा. त्यानंतर ती व्यक्ती काहीच करू शकत नाही.”
सनी ने सांगितले कि, “डर चित्रपटात लोकांना मी आवडलो, लोकांना शाहरुख सुद्धा आवडला. चित्रपटाशी मला फक्त इतकीच समस्या होती कि मला माहिती नव्हतं कि चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेला इतके महत्व होते. मी चित्रपटात नेहमी खुल्या मनाने आणि लोकांवर संपूर्ण विश्वास ठेवून काम करतो. परंतु दुर्भाग्य असे कि काही लोकं आणि अभिनेते असे आहेत ज्यांना विश्वासाने काम करायला आवडत नाही. कदाचित ते अश्या प्रकारेच स्टारडम मिळवू इच्छितात.” खरंतर सनी देओल त्यावेळी खूप मोठा स्टार होता त्यामुळे डायरेक्टर यश चोप्रा ह्यांनी त्याला हि ऑफर दिली होती कि तू राहुल मेहरा किंवा सुनील मल्होत्रा ह्या दोघांपैकी एक भूमिकेची निवड. सनी देओलला वाटले कि त्याच्यासाठी सुनील मल्होत्राची सकारात्मक भूमिका त्याच्यासाठी योग्य राहील. ह्यामुळे त्याने हि भूमिका निवडली.
ह्याअगोदरच्या एका इंटरव्यू मध्ये सनी देओल ने खुलासा केला होता कि, “जेव्हा ‘डर’ चित्रपट बनवला तेव्हा मला ह्या गोष्टीबद्दल सांगितले नव्हते कि ह्या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेला हिरोपेक्षा जास्त दमदार प्रकारे दाखवले जाणार. मी माझ्या चित्रपटाबद्दल अगोदरच निर्मात्यांकडून सर्व गोष्टी जाणून घेतो. परंतु जेव्हा मला माहिती पडलं कि ह्या चित्रपटाचा शेवट काही अश्या प्रकारे होणार आहे तर मी ह्या दगाबाजीच्या गोष्टीने हैराणच झालो होतो. मला खोटं सांगितलं गेलं होतं. आणि सनी देओलला वाटलं कि ह्या सर्व गोष्टी यश चोप्रांसोबत शाहरुखलाही माहिती होत्या. परंतु शाहरुखने कधीच त्याच्या आणि सनी देओलच्या भूमिकेबद्दल कधीच सनी देओलला सांगितले नाही. यश चोप्रा आणि शाहरुख खान ��ोघांनी भूमिकेबाबत सनी देओलला अंधारातच ठेवले. हेच कारण होते कि ‘डर’ चित्रपटानंतर सनी देओलने शाहरुखसोबत बोलणं बंद केलं. तेव्हापासून ते आजपर्यंत तो १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही. त्यानंतर तब्बल १६ वर्षानंतर सुभाष घईंनी एका अँनिव्हर्सरी इव्हेंटमध्ये दोघांची भेट घालून दिले, तेव्हा कुठे दोघांचे बोलणे झाले. ह्याच चित्रपटानंतर सनी देओलने कधीच यश चोप्रा ह्यांच्या चित्रपटातसुद्धा काम केले नाही. बघा सनी देओलने मुलाखत दिलेली तो व्हिडीओ.
youtube
0 notes