Tumgik
#यश चोप्रा आणि शाहरुख खान
marathimajja · 2 years
Text
तो हिरो आहे काय पण करू शकतो - पठाण चा मराठी रिव्ह्यू
प्रजासत्ताक दिन आणि नोकरदार वर्गाला शनिवार रविवार असलेली सुट्टी ही संधी साधून 25 डिसेंबरला प्रदर्शित झालेला पठाण ने आतापर्यंत 633 कोटी चा गल्ला जमविला आहे. यश राज फिल्म प्रस्तुत पठाण ची कथा लेखन आणि दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे आणि प्रदर्शन आदित्य चोप्रा यांनी केले आहे.    आता वळूयात चित्रपटातील कलाकारांकडे प्रमुख भूमिका असलेले शाहरुख खान (पठाण) आणि जॉन अब्राहम (जिम)एक RAW एजंट आहे तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
शाहरुख खानच्या आधी या सुपरस्टारला डरमध्ये 'राहुल मेहरा'ची भूमिका ऑफर झाली होती
शाहरुख खानच्या आधी या सुपरस्टारला डरमध्ये ‘राहुल मेहरा’ची भूमिका ऑफर झाली होती
डरसाठी शाहरुख खान हा मूळ पर्याय नव्हता. यश चोप्राने चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक स्टार दिले, त्यापैकी एक नाव म्हणजे शाहरुख खान. यश चोप्रा आणि शाहरुख खान या जोडीने एकापाठोपाठ अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि याच चित्रपटांमुळे शाहरुख खान रोमान्सचा किंग बनला. शाहरुख खान आणि यश चोप्रा यांच्या मैत्रीची सुरुवात ‘डर’ चित्रपटादरम्यान झाली होती. पण या चित्रपटासाठी शाहरुख खान त्याची पहिली पसंती नव्हती हे फार…
View On WordPress
0 notes
bollywoodpapa · 5 years
Text
शूटिंगच्या वेळी असं काय घडलं कि डर चित्रपटानंतर सनी देओल १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही
New Post has been published on https://www.bollywoodpapa.com/16-year-shahrukh-khan-sunny-deaol/
शूटिंगच्या वेळी असं काय घडलं कि डर चित्रपटानंतर सनी देओल १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही
शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला ह्यांचा ‘डर’ चित्रपट तर तुम्हांला लक्षातच असेल. ह्या चित्रपटाने एका बाजूला शाहरुख खानच्या करिअरला एक नवीन उंची दिली, तर दुसरीकडे बॉलिवूडच्या दोन स्टार्स शाहरुख आणि सनी देओल ह्यांच्या मधील वादाचे कारण सुद्धा हाच चित्रपट बनला. ह्या चित्रपटानंतर सनी देओल शाहरुख खान सोबत तब्बल १६ वर्ष बोलला नाही. सनी देओलला रजत शर्माच्या ‘आप कि अदालत’ ह्या शो मध्ये जेव्हा विचारण्यात आले कि, सनी राग फक्त स्क्रिनवरच नाही तर आम्हांला माहिती पडलं कि खरोखर मध्ये सुद्धा जेव्हा तू ‘डर’ चित्रपट करत होता तेव्हा तुझा इतका धसका होता कि संपूर्ण युनिट अगदी डायरेक्टर पासून ते शाहरुख खान पर्यंत सर्व तुला घाबरत होते. नक्की काय घडलं होतं तेव्हा, ज्यामुळे तुला इतका राग आला होता. ह्यावर सनी देओल हसतच म्हणाला, “ते घाबरत होते कारण त्यांच्या मनातच काहीतरी खोट होती.” ह्यावर स्पष्टीकरण देताना सनी देओल म्हणाला कि, “कधी कधी काही गोष्टी घडत असतात, ज्या मला योग्य वाटत नाहीत. आणि त्यानंतर मग मी बैचेन होतो. आणि तीच गोष्ट ‘डर’ चित्रपटाची शूटिंग करतेवेळी झाली.”
पुढे सनी देओल म्हणाला, ” घडलं असं होतं कि, त्यावेळी एक सीन करायचा होता. शाहरुख मला सुऱ्याने मारतो. त्यावर माझा खूप मोठा वाद झाला होता. माझे म्हणणे होते कि, बघा मी एक कमांडो ऑफिसर असून मी इतका एक्स्पर्ट आहे, इतका फिट आहे. आणि हा मुलगा आहे, हा मला कसे काय मारू शकतो. तो मला मारू शकतो पण जर मी त्याला पाहत नसेल तरच. मी त्याला बघतोय आणि तो मला सुऱ्याने मारतोय तर मी कसला कमांडो राहिलो मग. बरोबर ना. तर त्या गोष्टीवर थोडासा वाद चालू होता. त्यावेळी मला कळत नव्हते कि मी नक्की काय करू. आणि मी काही करू सुद्धा शकत नव्हतो. कारण यश चोप्रा हे वरिष्ठ आहेत आणि मी त्यांचा खूप आदर करतो. त्यामुळे मी त्यांना काही बोलू सुद्धा शकत नाही. त्यावेळी मला इतका राग आला होता आणि मी तेव्हा माझे हात जीन्स मध्ये घातले होते. आणि मला माहितीच नव्हतं कि माझ्या अंगात इतका राग होता कि माझ्या हाताच्या प्रेशरने संपूर्ण पॅन्ट खिस्यापासून फाटली. आणि हि घटना घडली. त्यानंतर मी पाहिलं कि कोणी एका बाजून घाबरून पळू लागलं आहे. तर कुणी दुसऱ्या बाजूला घाबरून पळतोय. उलट मी कोणाला काही करत नव्हतो. मी कोणतेही चुकीचे सुद्धा काही करत नव्हतो. फक्त मलाच माहिती नव्हतं कि मी नक्की काय करत आहे ते.”
नंतर त्यांना विचारण्यात आलं कि त्या घटनेनंतर आतापर्यंत त्यांनी शाहरुख खानशी बोलणं नाही केलं, हे खरं आहे का. त्यावर सनीने सावध उत्तर दिले कि, “गोष्ट अशी नाही कि मी बोलणं नाही केलं. मला माहिती नाही नक्की काय आहे, पण जेव्हा अशाप्रकारच्या घटना होतात त्यानंतर मी नेहमी स्वतःला अश्या गोष्टींपासून बाजूलाच ठेवतो. तसेही मी कुठे सोशिलाईज करतो कि कुणाशी भेटू किंवा कोणाबरोबर बोलू. तर कधी आम्ही भेटलोच नाही, तर बोलण्याचा काही प्रश्नच नाही येत. तसेही मी कोणत्या फंक्शनला नाही जात, पार्टीला नाही जात. आम्ही एकाच फिल्डचे असून देखील मग संपर्क नाही होत.” त्यानंतर त्याला विचारण्यात आले कि म्हणजे एक गोष्ट खरी आहे कि जर तुला कोणावर राग आला असेल तर मग तू त्या व्यक्तीपासून स्वतःला लांबच ठेवतो. त्यावर सानी देओल जोरात हसला आणि म्हणाला, “एखादी गोष्ट, ज्यात काहीच नाही आहे, त्याला बाजूला करा. त्यानंतर ती व्यक्ती काहीच करू शकत नाही.”
सनी ने सांगितले कि, “डर चित्रपटात लोकांना मी आवडलो, लोकांना शाहरुख सुद्धा आवडला. चित्रपटाशी मला फक्त इतकीच समस्या होती कि मला माहिती नव्हतं कि चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेला इतके महत्व होते. मी चित्रपटात नेहमी खुल्या मनाने आणि लोकांवर संपूर्ण विश्वास ठेवून काम करतो. परंतु दुर्भाग्य असे कि काही लोकं आणि अभिनेते असे आहेत ज्यांना विश्वासाने काम करायला आवडत नाही. कदाचित ते अश्या प्रकारेच स्टारडम मिळवू इच्छितात.” खरंतर सनी देओल त्यावेळी खूप मोठा स्टार होता त्यामुळे डायरेक्टर यश चोप्रा ह्यांनी त्याला हि ऑफर दिली होती कि तू राहुल मेहरा किंवा सुनील मल्होत्रा ह्या दोघांपैकी एक भूमिकेची निवड. सनी देओलला वाटले कि त्याच्यासाठी सुनील मल्होत्राची सकारात्मक भूमिका त्याच्यासाठी योग्य राहील. ह्यामुळे त्याने हि भूमिका निवडली.
ह्याअगोदरच्या एका इंटरव्यू मध्ये सनी देओल ने खुलासा केला होता कि, “जेव्हा ‘डर’ चित्रपट बनवला तेव्हा मला ह्या गोष्टीबद्दल सांगितले नव्हते कि ह्या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेला हिरोपेक्षा जास्त दमदार प्रकारे दाखवले जाणार. मी माझ्या चित्रपटाबद्दल अगोदरच निर्मात्यांकडून सर्व गोष्टी जाणून घेतो. परंतु जेव्हा मला माहिती पडलं कि ह्या चित्रपटाचा शेवट काही अश्या प्रकारे होणार आहे तर मी ह्या दगाबाजीच्या गोष्टीने हैराणच झालो होतो. मला खोटं सांगितलं गेलं होतं. आणि सनी देओलला वाटलं कि ह्या सर्व गोष्टी यश चोप्रांसोबत शाहरुखलाही माहिती होत्या. परंतु शाहरुखने कधीच त्याच्या आणि सनी देओलच्या भूमिकेबद्दल कधीच सनी देओलला सांगितले नाही. यश चोप्रा आणि शाहरुख खान दोघांनी भूमिकेबाबत सनी देओलला अंधारातच ठेवले. हेच कारण होते कि ‘डर’ चित्रपटानंतर सनी देओलने शाहरुखसोबत बोलणं बंद केलं. तेव्हापासून ते आजपर्यंत तो १६ वर्ष शाहरुखशी बोलला नाही. त्यानंतर तब्बल १६ वर्षानंतर सुभाष घईंनी एका अँनिव्हर्सरी इव्हेंटमध्ये दोघांची भेट घालून दिले, तेव्हा कुठे दोघांचे बोलणे झाले. ह्याच चित्रपटानंतर सनी देओलने कधीच यश चोप्रा ह्यांच्या चित्रपटातसुद्धा काम केले नाही. बघा सनी देओलने मुलाखत दिलेली तो व्हिडीओ.
youtube
0 notes