Tumgik
#मालमत्ता
news-34 · 10 hours
Text
0 notes
6nikhilum6 · 18 days
Text
PCMC : मालमत्तांचे 95 टक्के सर्वेक्षण पूर्ण; अडीच लाख नवीन मालमत्ता कर कक्षेत
एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक ड्राेनच्या सहाय्याने मालमत्ता सर्वेक्षण सुरू असून 95 टक्के सर्वेक्षण पुर्ण झाले (PCMC) आहे. या सर्व मालमत्तांना युपीक आयडी क्रमांक टाकून झाले आहेत. 148 पैकी फक्त 8 गटातील काम बाकी आहे. आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणात तब्बल 2 लाख 54 हजार नवीन मालमत्ता आढळल्या आहेत.  सध्याच्या आणि सर्वेक्षणात आढळलेल्या नवीन अशा सुमारे…
0 notes
airnews-arngbad · 22 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 31.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
नवी दिल्ली इथं जिल्हास्तरीय न्यायिक अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज या संमेलनाना सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत पंतप्रधानांच्या हस्ते या परिषदेत एका नाण्याचं तसंच टपाल तिकीटाचं अनावरण करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वतीनं नवी दिल्लीतल्या भारत मंडपम् इथं आयोजित या दोन दिवसीय संमेलनात प्रारुप आराखडा, समाविष्ट न्यायालयीन कक्ष, न्यायिक सुरक्षा, खटल्यांचं व्यवस्थापन आणि प्रशिक्षणासह जिल्हा न्यायपालिकेच्या मुद्द्यांवर पाच सत्र होणार आहेत. उद्घघाटन कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्‍यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल तसंच अटॉर्नी जनरल आर. व्यंकटरमणी उपस्थित आहेत.
****
राज्यातील आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाकडून राज्यांमधल्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या दुसऱ्या टप्प्याचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम ’२५ जून ते ३० ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात आला. या कार्यक्रमानुसार,  राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसंच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसंच जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये राज्यात १६ लाख ९८ हजार ३६८ मतदारांची संख्या वाढली आहे.
****
राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आठवडाभरात दुध अनुदान जमा होईल, अशी माहिती पुणे दुग��धविकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली आहे. राज्यातल्या सर्व दूध संघांनी शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर तत्काळ भरावी. राज्य सरकारकडून २५६ कोटी रुपये दुग्धविकास विभागाकडे वर्ग झाले आहेत. कागदोपत्री तयारी पूर्ण होताच दुध अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं मोहोड यांनी सांगितलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणूक अतिशय गांभीर्यानं घ्यावी, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पक्षाच्या राज्यस्तरीय महिला आणि युवा पदाधिकारी अधिवेशनात काल ते बोलत होते.
आपण धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या विचारधारेनं पुढं चालला आहे, हेही  पवार यांनी स्पष्ट केलं.
****
लातूर शहर महानगरपालिकेमार्फत वर्षाच्या सुरुवातीला नियमितपणे कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांसाठी देण्यात आलेल्या विविध सवलतींची आज ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे . चालू वर्षात जवळपास २१ हजारांहून अधिक मालमत्ता धारकांनी कर सवलतींच्या लाभ घेतला असून या माध्यमातून लातूर महापालिकेनं २५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी आजही सर्व क्षेत्रीय कार्यालयं सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे
****
१९६५ आणि १९७१ च्या युध्दात सहभागी झालेले आणि समर सेवा स्टार मेडल तसंच पूर्वी स्टार किंवा पश्चिमी स्टार मेडल मिळालं आहे, अशा माजी सैनिकांसाठी युद्ध सन्मान योजना सुरु करण्याचं प्रस्तावित आहे. या युद्धात भाग घेतलेल्या आणि मेडल मिळालेल्या सैनिक, शहीदांच्या पत्नींना केंद्रिय सैनिक बोर्डाकडून एकरकमी १५ लाख रुपये देण्यासंदर्भात युद्ध सन्मान योजना तयार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या युद्धांमध्ये सहभागी परभणी जिल्ह्यातल्या माजी सैनिकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज येत्या ५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या दमणगंगा-अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंग या नदीजोड प्रकल्पाला जलसंपदा विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीनं नुकतीच मान्यता दिली. पुढच्या कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडं पाठवला असून त्यानंतर अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच शासनाकडं पाठवला जाईल, अशी माहिती नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी काल दिली.
****
येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
0 notes
homeloansguide101 · 1 month
Text
0 notes
mhadalottery2023 · 4 months
Text
भेट म्हणून दिलेली मालमत्ता परत घेता येते का? प्रॉपर्टी गिफ्ट देण्याचे नियम जाणून घ्या
मुंबई : तुमच्या प्रियजनांना भेटवस्तू देण्याप्रमाणेच तुम्ही तुमच्या प्रियजनांना किंवा एखाद्या खास व्यक्तीला मालमत्ता भेट देऊ शकता. मात्र कायद्याच्या कक्षेत राहूनच तुम्हाला ही प्रॉपर्टी गिफ्ट द्यावी लागणार आहे. कोणत्याही व्यक्तीला मालमत्ता भेट देण्याबाबत अनेक नियम आहेत. मालमत्तेचा मालक त्याच्या नावावर नोंदणीकृत कोणतीही मालमत्ता किंवा प्रॉपर्टी त्याच्या जवळच्या व्यक्तीला भेट देऊ शकतो किंवा दान करू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/akshaya-tritiya-time-for-child-marriages-too/
0 notes
mdhulap · 6 months
Link
मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार - If there is no Marathi board, double property tax will have to be paid
0 notes
stocknewssmartnews · 10 months
Text
Do You Want To Known Commodity Market Information ?
Tumblr media
कमोडिटी मार्केट हे कच्च्या मालाच्या व्यापाराचे केंद्र आहे, हार्ड (सोने, तेल) आणि मऊ (गहू, कॉफी) श्रेणींमध्ये विभागलेले आहे. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड आणि न्यू यॉर्क मर्कंटाइल एक्सचेंज सारख्या महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्मचे होस्टिंग, ICE Futures U.S. आणि CME ग्रुप सारख्या प्रमुख यूएस एक्सचेंजेसवर गुंतवणूक���ार कंपन्या किंवा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टद्वारे कमोडिटीजमध्ये प्रवेश करतात. कमोडिटी मार्केट्स उत्पादक, ग्राहक आणि सट्टेबाज यांच्यासाठी केंद्रीकृत रिंगण म्हणून काम करतात, द्रव प्रवेश देतात. भविष्यातील उपभोग किंवा उत्पादन हेजिंग करण्यासाठी सहभागी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज वापरतात. मौल्यवान धातू, चलनवाढीचे हेजेज म्हणून पाहिले जातात, पोर्टफोलिओमध्ये विविधता आणतात आणि स्टॉक ट्रेंडचा प्रतिकार करतात, बाजारातील अस्थिरतेदरम्यान गुंतवणूकदारांना आकर्षित करतात. इतर घटक: प्रवेशयोग्यता: एकेकाळी केवळ व्यावसायिकांसाठी, कमोडिटी मार्केट्स आता विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ आहेत, ज्यामुळे सहभाग वाढला आहे. विविधीकरण: कमोडिटीज पोर्टफोलिओ विविधता प्रदान करतात, विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक उघड करून जोखीम कमी करतात. हेजिंग: उत्पादक आणि ग्राहक भविष्यातील किंमतीतील चढ-उतारांपासून बचाव करण्यासाठी डेरिव्हेटिव्ह्जचा वापर करतात, त्यांच्या कामकाजात स्थिरता सुनिश्चित करतात. जागतिक प्रभाव: कमोडिटीच्या किमती भू-राजकीय घटना आणि आर्थिक ट्रेंडसह जागतिक घटकांना प्रतिसाद देतात, ज्यामुळे ते बाजारातील परिस्थितीच्या विस्तृत स्पेक्ट्रमसाठी संवेदनशील बनतात.
0 notes
cinenama · 11 months
Text
का जप्त केली ईडीने 'त्या' तिघांची 11.82 कोटींची मालमत्ता जप्त?
Land Grabbing Case in Goa ED: अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गोव्यातील बेकायदेशीर जमीन बळकावण्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात तिघांविरोधात कारवाई केली आहे. ईडीने एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या 11.82 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या कलमांतर्गत मालमत्ता जप्त केल्या आहेत. आरोपींनी जमीन बेकायदेशीरपणे संपादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 11 months
Text
श्रीमंत आणि सर्वात श्रीमंत ह्यातला फरक.
सर्वात श्रीमंत विरुद्ध श्रीमंत यातला फरक समजावून सांगताना प्रो. देसाई म्हणतात,“सर्वात श्रीमंत माणूस तो नसतो ज्याच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे, परंतु ज्याला सर्वात कमी गरज असते तो.” मीच हा विषय प्रो. देसाई मला काल तळ्यावर भेटले, तेव्हा काढला.मी म्हणालो,“मला वाटतं की, कितीही पैसा किंवा कितीही मालमत्ता असली, तरी आनंदी रहाण्याची परिस्थिती कायमस्वरूपी असू शकत नाही.आनंद हा आंतरिक, तीव्रतापूर्ण आणि…
View On WordPress
0 notes
news-34 · 10 months
Text
0 notes
Text
कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई : शेकापचे नेते आमदार विवेकानंद पाटील यांची मालमत्ता जप्त
https://bharatlive.news/?p=165145 कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई : शेकापचे नेते आमदार विवेकानंद ...
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
शेअर गुंतवणुकीतून शेकडो जणांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास अटक
छत्रपती संभाजीनगर इथं म्हाडाची परवा मंगळवारी संगणकीय सोडत
आणि
अखेरच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बॉब्वेसमोर १६८ धावांचं आव्हान
****
आषाढी एकादशीचा सोहळा येत्या बुधवारी साजरा होत आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर इथं जाऊन वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधांचा तसंच एकूणच यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेतला. आपल्या या दौऱ्यात करकंब इथं मुख्यमंत्र्यांनी संत निळोबाराय यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री दादा भुसे तसंच गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या कोनाकोपऱ्यातून निघालेल्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत. अमरावतीच्या कौंडिण्यपूर इथून रुक्मिणी मातेची पालखी ७०० किलोमीटरचा प्रवास करत, आज पंढरपुरात दाखल झाली. मुक्ताईनगर इथून ३५ दिवसांचा प्रवास करून संत मुक्ताई यांची पालखीही आज पंढरपूर इथं दाखल झाली. ही पालखी बंधू भेटीसाठी १६ तारखेला वाखरी इथं जाऊन, पुन्हा पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्कामी राहणार आहे.
****
दरम्यान, वाखरी इथं संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. यावर्षी शेवटच्या मुक्कामासाठी १२ लाखांपेक्षा जास्त वारकरी येण्याचा अंदाज शासनानं वर्तवला आहे. त्या अनुषंगानं साोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून वाखरी- टाकळी जवळ ५२ एकर परिसरात पालखीतळाची संकल्पना राबवण्यात येत आहे. या ठिकाणी २४ तास आयुर्वेदिक तेलाने पादाभ्यंग करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच मुक्कामी येणाऱ्या दिंड्यांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा उभारण्यात आली आहे.
****
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ राज्य सरकारने जाहीर केली आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला. या योजनेतून राज्यातल्या सर्व धर्मातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा मोफत करता येणार आहे.
****
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेसह आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर १५ जुलै रोजी सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता १४ ॲागस्ट रोजी होणार आहे. तसंच आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरोधात दाखल याचिकेवर १९ जुलैला सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.
****
दिव्यांगत्वाचं बनावट प्रमाणपत्र देऊन प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी राज्य दिव्यांग आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे. खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सुपूर्द केलेली दिव्यांगं प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं आढळल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश आयोगानं दिले होते.
****
शेअर बाजारातल्या गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत, शेकडो जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानं आशिष शहा या व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो ९०० ग्रॅम सोनं आणि २५ लाखांची रोकडही जप्त केली. शहा याच्या चौकशीत त्यानं आत्तापर्यंत जवळपास ४०० ते ५०० जणांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत परवा मंगळवारी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. १ हजार ४९४ गाळे, सदनिका, निवासी भुखंडाचा यात समावेश आहे. फेब्रुवारी-२०२४ च्या जाहिरातीला अनुसरुन ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
भारत- झिम्बाब्वे क्रिकेट टी-ट्वेंटी पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेनं नाणेबाजी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सहा बाद १६७ धावा केल्या. भारतानं या मालिकेत तीन-एक अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा आज अंतिम सामना आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या कार्लोस अल्काराझ यांच्यादरम्यान थोड्याचवेळात सामन्याला सुरुवात होत आहे. नोवाक जोकोविचनं अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसची बरोबरी करत, सातवेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. तर, अल्काराझ सलग दुसऱ्यांदा विम्बडल्डच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सर्वाधिक आठवेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा विक्रम स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नावावर आहे. भारताच्या लिएंडर पेसने पुरुष तसंच मिश्र दुहेरीत एकूण पाच वेळा तर महेश भूपतीने पुरुष तसंच मिश्र दुहेरीत एकूण तीन वेळा तर सानिया मिर्झाने महिला दुहेरीत एकदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
कझाकस्तान इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकं पटकावली आहेत. मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत एकंदर ८० देशांच्या ३०५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आषाढी एकादशीनिमित्त शहरातल्या बालाजी मंदिरात ‘माझा एक लाडू विठ्ठलाला’ हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येतो. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आज या उपक्रमाला भेट देऊन उपक्रम राबवणाऱ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून पंढरपूर इथं पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या लाडूचे वाटप करण्यात येते. यावळी आयोजक मनोज सुर्वे, लक्ष्मीकांत सुर्वे यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.
****
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात कालपर्यंत ६ लाख २८ हजार ३५८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. यात ४ लाख १७ हजार ५०६ हेक्टर शेतजमीनीचा समावेश आहे. केवळ १ रूपयांत विमा काढण्याची मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजुनही विमा काढला नाही त्यांनी विमा भरून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. यासंदर्भात शहरी तसंच ग्राम समित्यांनी शिबिरांचं आयोजन करावं अशा सूचनाही महाजन यांनी दिल्या आहे.
****
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी महाराष्ट्रात इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढवणार असून ३० ते ३५ जागा लढवण्याचा समाजवादी पार्टीचा विचार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा राहणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी दिली. ते आज धाराशिव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
लातूर इथं ‘माझं लातूर, हरित लातूर’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी आज शहरात ‘हरितोत्सव’ उपक्रम घेण्यात आला. यात नागरिकांना विविध प्रकारची रोपे तसंच वृक्ष लागवडीसाठी लागणारे आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं. नागरिकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला
****
अहमदनगर जिल्ह्यात आज श्रीरामपूर बंद आंदोलन करण्यात आलं. गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्यावतीनं हे आंदोलन करण्यात आलं. माजी खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती यात सहभागी झाले होते.
****
पुणे जिल्ह्यात झिका विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात या आजाराचे एकूण २१ रूग्ण आढळले असून यापैकी १९ रुग्ण पुणे जिल्ह्यात, एक रुग्ण कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेर इथं सापडला आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
****
मुंबई शहर आणि उपनगरातत संततधार पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे.
****
0 notes
homeloansguide101 · 2 months
Text
गृह कर्ज उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय
पहिल्यांदाच घर घेणाऱ्यांसाठी एक अतिशय चांगली बातमी आहे. आपल्याकडे औपचारिक उत्पन्नाचा पुरावा नसला तरीही, आपण आता आपल्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळवू शकता. आपण रोजंदारी वर काम करत असाल किंवा अनौपचारिक काम करत असून रोख पगार मिळवत असाल, तरीसुद्धा आपण साध्या गृह कर्जासाठी होमफर्स्ट फायनान्स कंपनी कडे अर्ज करू शकता.
घरांच्या किमती वाढत असताना सध्याच्या काळामध्ये सर्वात खालच्या स्तरावरचे Standard of living ही सर्वात मोठी समस्या आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला “घर” म्हणून एक जागा असावी अशी गरज आहे. तथापि, अनेक लोक कायम रोजगार आणि उत्पन्न नसल्यामुळे या गरजेपासून वंचित आहेत.
“उत्पन्नाचा पुरावा नसणे” म्हणजे काय?
अधिक खोलवर जाण्यापूर्वी, आपण “उत्पन्नाचा पुरावा नसणे” ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे.
आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रामध्ये, लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (कमी-उत्पन्नाचा गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) या श्रेणीमध्ये आहेत, ज्यांच्याकडे अन्न, आरोग्य, शिक्षण, किंवा पायाभूत बँकिंग अशा गोष्टींसाठी दुर्लक्षित ठेवले जाते. त्यांची अंदाजे संख्या सांगायची झाली तर ते अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापैकी अनेक लोकांकडे पडताळणी करता येईल असा उत्पन्नाचा पुरावा नसतो. म्हणजेच, त्यांच्याकडे एक तरी उत्पन्नाचा स्त्रोत असेल परंतु ते त्याला कागदोपत्री सत्यापित करू शकत नाहीत. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते जसे की त्यांच्याकडे रोजगार आहे परंतु त्यांना मोबदला रोख रकमेच्या स्वरूपात दिला जातो किंवा ते असे लहान व्यवसाय करतात जे योग्य पद्धतीने नोंदणीकृत नाहीत.
उदाहरणार्थ एका कंपनीमधील मशीन ऑपरेटर किंवा रिक्षा चालक अशा स्वरूपाची उदाहरणे आहेत. लहान व्यावसायिक आणि व्यवसायांचे मालक जसे की आपल्या भागातील “किराणा दुकानदार” किंवा “पाणीपुरी वाला” ज्याच्याकडे आपण रोज संध्याकाळी जाता, त्यांना सर्व प्रकारच्या आर्थिक गोष्टी मिळू शकत नसतील, सहजपणे मिळू शकतील अशा गृहकर्जाची तर बात सोडाच. जरी त्यांना परतफेड गरज असली तरी ते बाजारात पलब्ध असलेल्या संधी बद्दल अज्ञात असतात.
उत्पन्नाच्या पुराव्याची कमतरता
भारतामध्ये लोकसंख्येचा एक मोठा भाग LIG (अल्प उत्पन्न गट) आणि EWS (आर्थिकदृष्ट्या मागास घटक) यामध्ये मोडतो, जे अनेकवेळ आपल्या देशाच्या पायाभूत बँकिंग द्वारे दुर्लक्षित केले जातात. अंदाजे 15-20 दशलक्ष लोक आर्थिकदृष्ट्या वगळले जातात कारण त्यांच्याकडे प्रमाणित उत्पन्नाचा पुरावा नसतो. याचा अर्थ असा होतो की त्यांच्याकडे उत्पन्न असते परंतु ते त्याला कागदोपत्री प्रमाणित करण्यात मागे पडतात.
हे खालील अनेक कारणांमुळे होऊ शकते:
रोख मोबदला: मनुष्याला रोजगार दिल जातो परंतु तो रोख स्वरूपाचा असतो. एक उदाहरण म्हणून किराणा दुकानात काम करणारा मदतनीस घ्या.
स्वयंरोजगार: असा कोणीतरी जो एक लहान व्यवसाय करतो आणि एक ठराविक रक्कम कमावतो, परंतु त्या उत्पन्नामध्ये सातत्य नसते. उदाहरणार्थ, रिक्षा चालक.
ठराविक कालावधी मधील उत्पन्न: ते वर्षातील एक ठराविक कालावधीमध्ये रोजगार करतात आणि काही रक्कम कमवतात जी त्यांना बाकी वर्षभर पुरते. उदाहरणार्थ, फटाके विक्रेते.
अनेक लहान लहान उत्पन्न: असे जे विविध प्रकारची अनौपचारिक कामे करतात. उदाहरणार्थ, घर कामगार जे विविध घरांमध्ये कामे करतात.
सर्वांसाठी गृह कर्जाची गरज
घर खरेदी करण्यासाठी मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता असते कारण घर ही एखादया व्यक्तीकडे असणारी सर्वात मोठी मालमत्ता असते. अशा मोठ्या गुंतवणूकीमुळे लोकांची बहुतेक बचत संपते, म्हणूनच बहुतेक व्यक्ती घर विकत घेण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेकडून गृह कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकांकडून पैसे कर्ज घेण्याकडे वळतात. या संपूर्ण प्रक्रियेची एक महत्त्वपूर्ण गैरसोय म्हणजे समाजातील सर्व घटकांना असे बँक कर्ज घेता येत नाही.
गैरसमजूत: गृह कर्जाला मंजूरी मिळण्यासाठी उत्पन्नाचे दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य आहे
जरी ते कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असले तरीही कर्जदारांना बाजारातील पर्यायाबद्दल माहिती नाही. त्यांना असे वाटते की कागदपत्रांच्या अभावामुळे ते पारंपारिक बँकेच्या माध्यमातून कधीही गृह कर्ज घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना असे वाटत असते की मालमत्तेच्या खरेदीसाठी वित्तपुरवठा करण्याची ही एकमेव पद्धत आहे. त्यांना हे माहित नाही की होमफर्स्ट फायनान्स कंपनीसारखी परवडणारी गृहनिर्माण वित्तीय संस्था त्यांना मदत करू शकते आणि त्यांना त्यांच्या महत्वाकांक्षा ��त्यामध्ये उतरवण्यास सक्षम करू शकते.
गैरसमजूत अशी आहे की बँकेच्या ठराविक प्रक्रियेमध्ये कर्ज घेणाऱ्या कडून अनेक कागदपत्रे गोळा केली जातात ज्याद्वारे ते कर्ज म्हणून घेत असलेल्या पैशांची परतफेड करण्यास सक्षम आहेत याची खात्री केली जाते.
गैरसमज दूर करण्यासाठी, NBFCs सारख्या संस्था समाजातील विशिष्ट घटकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशा संस्था उत्पन्नाचा कोणताही पुरावा न घेता कर्ज घेतात.
‘कागदपत्रांशीवाय गृहकर्ज’ असे प्रतीत करते की कर्ज घेणाऱ्याकडे मालमत्ता, उत्पन्न, किंवा रोजगार सत्यापन याची कमतरता आहे.
तर्, ही यंत्रणा नक्की कशाप्रकारे काम करते?
वास्तविकत: उत्पन्नाचा पुरावा न देता गृह कर्ज मिळविणे शक्य आहे. होमफर्स्ट येथे हे वास्तविकता आहे. आम्ही ग्राहकांना कागदपत्रांची मोठी यादी किंवा मोठ्या प्रक्रियेसह घाबरवून टाकत नाही, त्यातील बहुतेक ग्राहकांना समजू शकत नाही. त्याऐवजी, आम्ही ग्राहकांना प्रत्यक्ष भेट देतो आणि गृह कर्जाची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांच्या अडचणी ऐकतो.
आमच्या ग्राहकांच्या विश्वासार्हतेचे मूल्यांकन करण्याचा दस्तऐवजीकरण हा एकमेव मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला वाटत नाही की ग्राहक कर्जाची परतफेड करण्यास सक्षम असेल की नाही हे वेतन स्टब निर्णय घेऊ शकतो. पगाराची पावती म्हणजे कागदाचा एक तुकडा आहे जो आमच्या ग्राहकांना किती पैसे मिळतात हे दर्शवितो. तथापि, आमचा आर्थिक उपाय अशा प्रकारे तयार केला गेला आहे की तो कंपनीला ग्राहकांचा हेतू आणि परतफेड क्षमता निश्चित करण्यात मदत करतो.
होमफर्स्ट फायनान्स कंपनी येथे, आमचे ध्येय असे आहे की आमच्या ग्राहकांना त्यांचे घर खरेदी करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या घर खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणे आणि ते त्यांचा हेतु प्रकट करतात तेव्हा पासून ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायला जातील तोपर्यंतची प्रक्रिया सोपी करणे.
0 notes
karmadlive · 1 year
Text
शहरातील ग्रीन झोनमध्ये बांधलेल्या 75 हजार मालमत्ता होणार नियमित; नकाशा पाहणीनंतर प्रशासकांनी घेतला निर्णय
शहराचा नवीन िवकास अाराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीचा ईएलयू (सध्या असलेल्या जमिनीचा) नकाशा सोमवारी मनपा प्रशासकांसमोर सादर करण्यात आला. तेव्हा शहरातील ग्रीन झोनमधील सुमारे ७५ हजार मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाली. त्यानंतर आजूबाजूची १८ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आली. मात्र मागील २० वर्षांत विकास अाराखडा तयार न…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
कर्क राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा! तर ‘या’ राशींच्या नशिबात आज धनलाभ; जाणून घ्या तुमचं राशिभविष्य म्हणतं काय?
Tumblr media
Horoscope | मेष आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त दिवस असू शकतो. यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूला जास्त लक्ष देऊ शकणार नाही. प्रियजनांबद्दल प्रेम आणि विश्वास वाढेल. तुम्ही सर्व क्षेत्रात (Horoscope) चांगली कामगिरी कराल. तर मित्रांनो तुम्ही कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. ज्याचं कारण म्हणजे तुम्ही त्यांना दिलेली आश्वासने (Today’s Horoscope) पूर्ण करणार आहात. त्यासह आज तुमच्या घरी (Horoscope) पाहुणे येऊ शकतात. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. तुमचे बरेचसे प्रयत्न यशस्वी होतील. वृषभ आज कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये घाई करू नका. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कार्य सामान्य गतीने पूर्ण करा. कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर दिवस शुभ आहे. जोडीदाराला करिअरमध्ये यश मिळेल. तुमचे उत्पन्न आणि खर्च यात समतोल ठेवा. धर्मादाय कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. भाऊ-बहिणींसोबत सुरू असलेले मतभेद चर्चेतून संपतील. तुमच्या जोडीदाराच्या शारीरिक तब्येतीबाबत जागरुक राहा, समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.. मिथुन आज तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. कारभार आणि प्रशासनाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. कोणावरही शहाणपणाने विश्वास ठेवा. गुंतवणुकीशी संबंधित बाबींना गती मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ओझ्यातून मुक्तता मिळेल. स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्ही पुढे जाल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कर्क आरोग्याच्या दृष्टीने दिवस थोडा कमजोर असेल. तुमचे वाढते खर्च अडचणीचे कारण बनू शकतात, त्यामुळे बजेट बनवण्याचा प्रयत्न करा आणि धावा. कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार घाईगडबडीत करू नका. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. क्षेत्रात प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत राहाल. जुन्या अडचणी दूर करण्यासाठी नियोजन करावे लागेल. कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतो. सिंह आजचा दिवस तुमच्यासाठी नक्कीच फलदायी असणार आहे. तुमच्या योजनांना गती मिळेल. काही नवीन लोक भेटतील. कामाच्या क्षेत्रातील कोणत्याही कागदपत्रांवर तुम्ही अतिशय काळजीपूर्वक स्वाक्षरी करा. वडिलधाऱ्यांची साथ आणि सहकार्य तुम्हाला भरपूर मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात येणाऱ्या अडचणीतून सुटका मिळेल. कोणत्याही शुभ कार्यक्रमात तुम्ही सक्रिय सहभाग घ्याल. धार्मिक कार्याकडे श्रद्धा आणि विश्वासाने पुढे जाल. कौटुंबिक भावंडांसोबत सुरू असलेले मतभेद बोलणीतून संपतील. कन्या आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी पूर्ण योजना करा. सरकारी कामात धोरण आणि नियमांकडे पूर्ण लक्ष द्या. आर्थिक बाबतीत घाई करणे टाळा. तुमच्या महत्त्वाच्या कामांची यादी बनवा, तरच तुम्ही ती बऱ्याच प्रमाणात करू शकाल. तुमच्या बोलण्यातली सौम्यता तुम्हाला आदर देईल. सर्व जबाबदाऱ्या वेळेवर पार पाडाल. अनोळखी लोकांपासून अंतर ठेवा. दीर्घकाळानंतर तुम्ही जुन्या मित्राला भेटू शकता. तूळ आज तुमचा दिवस सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. भागीदारीत केलेल्या प्रयत्नांचा लाभ मिळेल. काही महत्त्वाच्या बाबी सोडणे टाळावे लागेल. स्थिरतेची भावना बळकट होईल. मालमत्ता खरेदीसाठी आजचा दिवस शुभ राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस कमजोर राहील. वृश्चिक आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. नोकरीत काम करणारे लोक उत्तम कामगिरी करतील, त्यांना बक्षिसेही मिळू शकतात. तर मित्रांनो तुमचे एखादे काम खूप दिवसांपासून राहिले असेल तर ते पूर्ण होईल. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला जाईल. नवीन व्यवसायासाठी नियोजन केल्यास फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. घाईगडबडीत काही करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. धनु आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तुमच्या नातेवाईकांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आवश्यक निर्णय घेताना काळजी घ्या. काही नवीन लोक भेटतील. तुम्हाला मिळालेली चांगली बातमी पटकन कोणाशीही शेअर करू नका. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. व्यवहाराशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला अडचणी येतील. विरोधकांपासून दूर राहिल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. कला कौशल्य देखील सुधारेल. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामांना गती द्याल. कुंभ आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक परिणाम आणणार आहे. प्रवासाची शक्यता निर्माण होत आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. नवीन लोकांपासून अंतर ठेवा. जर तुम्ही कौटुंबिक बाबतीत दोन्ही बाजू ऐकून त्यानंतर काय तो निर्णय घेतल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. विविध क्षेत्रात तुमची सकारात्मकता वाढेल. तुमचे कोणतेही रखडलेले काम वेळेत पूर्ण होईल. मीन आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. काही नवीन संपर्कातून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. महत्त्वाच्या विषयात समजूतदारपणा दाखवून पुढे गेल्यास बरे होईल. जर काही शुभ कार्यक्रम असल्यास वातावरण प्रसन्न राहणार आहे. तुम्ही विधी आणि परंपरांवर भर द्याल. तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांचा विश्वास जिंकू शकाल. सर्वांशी आदर राखा. काही नवीन लोक भेटतील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठी उपलब्धी मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. Read the full article
0 notes