Tumgik
#महाराष्ट्र हवामान अहवाल
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 09 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
आजपासून नवी दिल्लीत होत असलेल्या सशस्त्र दलांच्या दुसऱ्या परिवर्तन चिंतन संमेलनाचं अध्यक्षस्थान संरक्षण दलप्रमुख अनिल चौहान भूषवत आहेत. लष्कराच्या तीन्ही सशस्त्र दलांसाठीच्या प्रमुखांसाठी हे महत्वपूर्ण संमेलन असून या संमेलनाचा उद्देश नवीन सुधारणात्मक विचारांचा प्रारंभ करणं हा आहे.
****
नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहीया रुग्णालयात गैरव्यवहार करणाऱ्या ११ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं अटक केली आहे. हे कर्मचारी, वैद्यकीय उपकरणं पुरवठादारांकडून पैसे घेणं, डॉक्टरांची भेट निश्चित करण्यासाठी रुग्णांकडून लाच घेणं तसंच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र बनवणं असे प्रकार करत असल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली. सीबीआयनं १५ ठिकाणी छापे टाकून डॉक्टर्स तसंच पुरवठादारांविरुद्ध कारवाई करत १५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले. अलिकडच्या काळात डॉक्टर्स तसंच वैद्यकीय उपकरणं पुरवठादारांविरुद्ध करण्यात आलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे. गेल्या वर्षी गुन्हे अन्वेषण विभागानं दिल्लीत सफदरजंग रुग्णालयातल्या एका डॉक्टरला यासारख्याच एका गुन्ह्यासाठी अटक केली होती.
****
विमान उड्डाणं रद्द केल्याप्रकरणी नागरी उड्डयन मंत्रालयानं एयर इंडिया एक्सप्रेसला स्पष्टीकरण अहवाल मागितला असून या प्रकरणाचा तातडीनं निपटारा करण्याची सूचना केली आहे. मंत्रालयानं एयर इंडिया एक्‍सप्रेसला नागरी उड्डयन महानिदेशालयाच्या नियमांनुसार प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा सुनिश्चित करण्यासही सांगितलं आहे. आजारी असल्याचं कारण देत अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी सामुहिक रजा घेतल्यामुळं कालपासून एयर इंडिया एक्‍सप्रेसची अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली तर काही उड्डाणांना आज सकाळपर्यंत उशिरा झाला होता.
****
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये तणाव वाढत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या तुटवड्यासंदर्भात येत्या ११ तारखेला होणारं विरोध प्रदर्शन थांबवण्यासाठी पाकिस्तान प्रशासन पंजाब प्रांतच्या सैनिकांना या भागात तैनात करत असल्यानं हा तणाव वाढत आहे.
यूनाइटेड कश्मीर पीपल्स नॅशनल पक्ष आणि संयुक्त अवामी ॲक्शन कमेटीनं शांततेच्या मार्गानं विरोध प्रदर्शन करणाऱ्यांवर कोणतीही जाचक कारवाई करु नये असं पाकिस्तान प्रशासनाला सूचित केलं आहे. हा विरोध दर्शवणाऱ्या आंदोलकांविरुद्ध बळाचा वापर करण्यात आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध प्रदर्शित करण्याचा इशाराही या दोन पक्षांनी दिला आहे.
दरम्यान, पंजाब प्रांतचे फ्रंटियर कोर, रेंजर्स आणि क्विक रिस्पाँस फोर्सचे जवान या भागात तैनात आहेत.
****
भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात लाच प्रकरणी वैभव जाधव या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं सापळा रचून अटक केली. वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडं या तलाठ्यानं २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ठरलेली २० हजार रुपयांची लाच घेताना तलाठी वैभव जाधव याला सापळ्याची शंका आली आणि त्यानं लाच स्वीकारली नाही. मात्र, त्यानंतर आरोपी वैभव जाधव याला पथकानं ताब्यात घेत मोहाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, भंडारा शहरातील मुख्य बाजारपेठेत एका हॉटेलला काल मध्यरात्री आग लागली. अग्निशमन विभागाच्या दोन बंबांद्वारे ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
नागपूर शहर आणि भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. यामुळं रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या धान पिकाचं नुकसान झालं आहे.
****
आज नांदेड इथून सुटणारी हुजूर साहिब नांदेड -अमृतसर सचखंड एक्सप्रेस तिच्या नियमितवेळेपेक्षा ११ तास उशीरानं म्हणजेच रात्री साडेआठ वाजता नांदेड रेल्वेस्थानकाहून अमृतसरला रवाना होईल, अशी माहिती दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.
****
राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं ४३ पूर्णांक सात दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज कोकणात हवामान कोरडं राहणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर इथं तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गारांसह पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. 
****
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान अंदाज 08 ऑगस्ट 2022 या आठवड्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद येथे पावसासाठी लाल पिवळा आणि केशरी इशारा | Maharashtra Weekly Weather Forecast: आज महाराष्ट्रात अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट, जाणून घ्या
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान अंदाज 08 ऑगस्ट 2022 या आठवड्यात मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद येथे पावसासाठी लाल पिवळा आणि केशरी इशारा | Maharashtra Weekly Weather Forecast: आज महाराष्ट्रात अतिवृष्टीबाबत रेड अलर्ट, जाणून घ्या
महाराष्ट्र साप्ताहिक हवामान आणि प्रदूषण अहवाल ०८ ऑगस्ट २०२२: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या आठवड्यातही मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान राज्याच्या विविध भागात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम कोकणात होणार आहे. दरम्यान, मुंबई हवामान केंद्राने राज्यातील विविध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०२ मार्च २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. देशात या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांहून अधिकचं हस्तांतरण करण्यात आलं असून, नवीन ९० लाख पात्र शेतकऱ्यांचा यात समा��ेश झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत किसान ई मित्र हे व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे. यावर मराठीसह इतर सात भाषा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
****
राज्यातल्या आयटीआय संस्थांमध्ये अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे, आणि आदिवासी समाजातून धर्मांतर करून अल्पसंख्यांक आणि आदिवासी अशा दोन्ही सवलतींचा लाभ घेणारे विद्यार्थी असल्याचं निदर्शनास आलं होतं. यासंदर्भातल्या अनियमततेचा अभ्यास करण्यासाठी स्थापन समितीचा अहवाल काल कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मांडला. ही बाब गंभीर असून, त्यासाठी योग्य त्या उपायोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
****
नाशिक इथं काल महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे विभागीय कार्यालयाच्या वतीनं आयोजित मिलेट महोत्सवाचं उद्घघाटन झालं. या महोत्सवात ३७ स्टॉल असून त्यात विविध भागातून तृणधान्य उत्पादक, बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी झाल्या आहे.
****
राज्यात काल मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी गारांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
बीड जिल्ह्यात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती विशेष महापोलिस निरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
****
महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आज बंगळुरू इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना मुंबई इंडियन्सशी संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. काल, झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्सनं गुजरात जायंट्सचा सहा गडी राखून पराभव केला.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·      राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या जिल्ह्यात तातडीनं पंचनामे करुन मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·      हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू;पशूधनासह शेतपिकं आणि फळबागांचं नुकसान
·      धुळे सोलापूर महामार्गावर कन्नड घाटात कार दरीत कोसळून चार ठार तर सात जखमी
आणि
·      जालना इथं विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ;छत्रपती संभाजीनगर इथं आज यात्रेचं औपचारिक उद्‌घाटन
सविस्तर बातम्या
राज्यात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे, तिथे तातडीनं पंचनामे करुन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेआहे. काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
Byte…
गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपिट झालेली आहे, सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर इथं बोलताना त्यांनी, कुठल्याही परिस्थितीत शेतक-यांना मदत करण्याचीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं आश्वासन दिलं.
****
दरम्यान, राज्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विभागात काल सकाळपर्यंत १०७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे ज्वारी, गहू, मका, कपाशी, तूर आदी पिकांसह फळबागांचं नुकसान झालं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आठही जिल्हा प्रशासनाला पिकांसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
या पावसामुळे परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीला पूर आला असून, शेतात पाणी साचलं आहे.
धाराशिव शहर आणि परिसरात आज पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्याने राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात वीज कोसळून ५० शेळ्या-मेंढ्या दगावल्या, तर जिल्हाभरात सात मोठी जनावरं दगावली. भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्वारी आणि फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचं नुकसान झालं.
नांदेड जिल्ह्यात मुदखेड, किनवट आणि नांदेड तालुक्यात एकूण चार जनावरं दगावल्याचं आणि एका घराची अंशत: पडझड झाली असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून तातडीने सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
****
राज्यात पुढच्या दोन दिवसांसाठी मराठवाड्यातल्या जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या तीस तारखेनंतर हे वातावरण निवळणार असून, त्यानंतर थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड घाटात धुक्यामुळे कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. वाहनाच्या पुढच्या काचेवरचं दव पुसण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी अत्याधुनिक १५ वाहनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
राज्यातल्या दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडे पाठवलेला निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय, दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाकडून मदतीची ग्वाहीही पवार यांनी दिली.
****
उत्तराखंड मधल्या उत्‍तरकाशी जिल्ह्यात निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न अथकपणे ��ुरु आहेत. याबाबतची एकूण स्थिती नियंत्रणात असल्याचं, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी सांगितलं आहे.
****
जालना इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. जिल्हा परिषद कार्यालयापासून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संकल्प रथास हिरवा झेंडा दाखवला. आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यावेळी उपस्थित होते. या मोहिमेविषयी माहिती देताना रावसाहेब दानवे म्हणाले,
Byte…
२०१४ ते २०२३ पर्यंत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या देशात विकासाची कोणती कोणती कामं झालीत, गरीबासाठी कोणती कामं झालीत, आणि शेतकरी तरूणांसाठी कोणती कामं झालीत ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेची सुरूवात करण्यात आली आहे. जालन्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन शासनाच्या योजनेची माहिती या संकल्प यात्रेमध्ये दिली जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे. शहरातल्या सिद्धार्थ उद्यानात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे
****
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं ४२५ वं समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडेचारशेव्या जयंतीनिमित्त पैठण इथं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची काल सांगता झाली. एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी सांगतेचं काल्याचं कीर्तन केलं. त्यापूर्वी या सोहळ्यात काल सकाळी गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधल्या एकनाथ मंदिरामध्येही भागवत जयंतीसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
बीड जिल्ह्यत शिरूर कासार तालुक्यातून जाणाऱ्या पैठण - पंढरपूर पालखी मार्गाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काल नागरिकांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केलं. अधिकाऱ्यांनी याबाबतचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा असून येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्येही आपण याबाबत प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली.
****
समन्यायी पाणी वाटप धोरण एखाद्या वर्षापुरते अंमलात न आणता मराठवाड्याच्या शाश्वत पाण्यासाठी ते कायमस्वरुपी राबवावं, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेनं केली आहे. काल लातूर इथं झालेल्या विभागीय बैठकीत ही मागणी करण्यात आली. वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्स्थापनेसाठी आता थेट राष्ट्रपतींचेच दरवाजे ठोठावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ‘साक्षात‘ उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांचं व्याख्यान झालं. माझी कविता ही बाहेरचा आणि आतलाही आवाज ऐकते, म्हणून मी आत आणि बाहेर पाहू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
अंबाजोगाई इथं तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक रविंद्र शोभणे यांनी यावेळी बोलताना, यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या राजकीय आणि सामाजिक विचारात अंतर पडत  असल्याची खंत व्यक्त केली. कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातील चार गुणवंतांना यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. धावपटू अविनाश साबळे याला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल "युवा गौरव" सन्मान प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, आणि पाच हजार रुपये असं या सर्व पुरस्कारांचं स्वरूप आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या जालना-छपरा-जालना विशेष साप्ताहिक गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. जालना ते छपरा या गाडीला २९ नोव्हेंबर ते तीन जानेवारी २०२४ पर्यंत, तर छपरा ते जालना गाडीला एक डिसेंबर ते ०५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
रेल्वेच्या सिकंदराबाद आणि नांदेड विभागात सुरू असलेल्या रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामांमुळे येत्या दोन आणि तीन डिसेंबरपर्यंत काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे चालवत असलेल्या ओखा-मदुराई-ओखा  या विशेष गाडी ला येत्या २९ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभामंडप उभारणीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पाहणी केली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
राज्यात आजही अनेक भागात अवकाळी पाऊस, हिंगोलीत वीज पडून एकाचा मृत्यू
नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
चीनमध्ये पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांमध्ये आरोग्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
आणि
जालना इथं विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात
****
राज्यात आजही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला.
****
नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड, अर्धापूर, कंधार, लोहा आणि हदगाव या पाच तालुक्यांमधल्या बारा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यात सर्वाधिक म्हणजे नव्व्याण्णव मिलीमीटर पाऊस लिंबगाव मंडळात झाला असून, तरोडा ब्याऐंशी पूर्णांक तीस, अर्धापूर सत्त्याहत्तर पूर्णांक पन्नास आणि नांदेड शहर मंडळात अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात सरासरी ३६ पूर्णांक ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे वातावरणातला गारठा कमालीचा वाढला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मुदखेड, किनवट आणि नांदेड तालुक्यात एकूण चार जनावरं दगावल्याचं आणि एका घराची अंशत: पडझड झाली असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
परभणीत पूर्णा नदीला पूर आला असून, शेतात पाणी साचलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अनेक भागात ओढ्यांना, नदीला पूर आला आहे. सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा या सर्व तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारी, तुर, हरभरा, गहू या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्याने राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
जालना शहरासह जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामतल्या शेतीपिकांचं काही प्रमाणात नुकसान झालं. भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्वारी आणि फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचं नुकसान झालं. बदनापूर तालुक्यात वीज कोसळून ५० शेळ्या-मेंढ्या दगावल्या, तर जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये सात मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला.
धुळे जिल्ह्यातल्या धुळयासह शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
वाशीम जिल्ह्यातही काल मध्यरात्रीपासून आज सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे सुमारे ४६२ हेक्टर क्षेत्रावरच्या कपाशी पिकाचं नुकसान झालं असून एका व्यक्तीचा आणि एक्क्याण्णव पशुंचा मृत्यू झाल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
****
पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. आज ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले -
गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपिट झालेली आहे, सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज नागपूर इथं बोलताना त्यांनी, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याचीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं आश्वासन दिलं.
****
राज्यात पुढच्या दोन दिवसांसाठी मराठवाड्यातल्या जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपिटीचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे आणि विजांसह पावसाचा यलो ॲलर्ट हवामान विभागानं दिला आहे. राज्यातलं ढगाळ हवामान येत्या तीस तारखेनंतर निवळणार असून, त्यानंतर थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातल्या कसबे सुकेणे परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन द्राक्षबागांचं मोठं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी कसबे सुकेणे इथं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.
****
चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या उत्तर भागात लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेसंबंधित आजार पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय देशातल्या स्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि सध्यातरी भारतात कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून सगळ्या राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या सुधारित नियमांची आणि मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी आणि इन्फ्लूएंझासदृष आजार असलेल्या रुग्णांचं बारकाईनं निरीक्षण करावं, अशा सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.
****
जालना इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. जिल्हा परिषद कार्यालयापासून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संकल्प रथास हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी २५ वर्षांमध्ये भारताला विकसनशील देशांच्या यादीतून विकसित देशांच्या यादीत नेण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचं दानवे यावेळी म्हणाले. केंद्र सरकारनं २०१४ पासून राबवलेल्या विविध लोकोपयोगी योजना गावगावात पोहचवण्याचं काम या संकल्प यात्रेच्या माध्यमातून होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं उद्या विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्या उपस्थितीत होणार आहे.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा असून येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्येही आपण याबाबत प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली.
****
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं ४२५ वं समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडेचारशेव्या जयंतीनिमित्त पैठण इथं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची आज सांगता झाली. एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी सांगतेचं काल्याचं कीर्तन केलं. त्यापूर्वी या सोहळ्यात आज सकाळी गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडेचारशेव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमधल्या एकनाथ मंदिरामध्येही भागवत जयंतीसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
राज्यातल्या दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडे पाठवलेला निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय, दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची ग्वाहीही पवार यांनी दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या जालना-छपरा-जालना विशेष साप्ताहिक गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. जालना ते छपरा या गाडीला २९ नोव्हेंबर ते तीन जानेवारी २०२४ पर्यंत, तर छपरा ते जालना गाडीला एक डिसेंबर ते ०५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
रेल्वेच्या सिकंदराबाद आणि नांदेड विभागात सुरू असलेल्या रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामांमुळे येत्या दोन आणि तीन डिसेंबरपर्यंत काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत. यात दौंड निझामाबाद गाडी मुदखेड ते निझामाबाद दरम्यान, निझामाबाद पंढरपूर गाडी निझामाबाद ते मुदखेड दरम्यान आणि धर्माबाद मनमाड गाडी धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मराठवाड्यात अनके भागात गारपिटीसह पाऊस 
बारसू रिफायनरी तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, पोलिस बळाचा वापर करून रिफायनरीसाठी सर्वेक्षण न करण्याचं विरोधी पक्षाचं आवाहन
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला
येत्या महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
'पहिले पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ
छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा मुंबई इंडियन्स संघावर ५५ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
मराठवाड्यात अनके भागात काल गारपिटीसह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातल्या डोंगरकडा, वरूड, दांडेगाव, दिग्रस बुद्रुक, या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली, तर वसमत तालुक्यातल्या कवठा, किन्होळा, कुरुंदा या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे तसंच दुकानांचे फलक उडून गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीच्या बागांचं तसंच आंब्याचं मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्यानं शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथं शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड शहर आणि परिसरात काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अर्धापूर, माहूर, हिमायतनगर, किनवट, कंधार, लोहा, हदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस पडला. लोहा तालुक्यात वीज पडून चार जनावरं दगावली.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल वादळी वार्यासह पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, हळद, कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं.
दरम्यान, येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्य विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांसाठी स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना १२ सदस्यांच्या नि���ुक्तीच्या प्रस्तावावर तत्कालिन रजायपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता, सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून आमदारांची नवीन यादी तयार करण्यात येत आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. यावर न्यायालयानं राज्य सरकारला दोन आठवड्यांनी उत्तर देण्यास सांगितलं आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे, असा आरोप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते काल कर्नाटकात विजयापुरा इथं माध्यमांशी बोलत होते. रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात निश्चित झाल्याचं ते म्हणाले. ही ग्रीन रिफायनरी आहे, त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. शांततापूर्ण आंदोलकांशी आपण चर्चा करू, मात्र फक्त राजकारणासाठी विरोध करणाऱ्यांना खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
दरम्यान, राज्य सरकार पूर्णपणे स्थिर असून, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असं फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. २०२४ ची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असून, माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन त्यांनी केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नये, अस आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केलं आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही, सरकारनं आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात सरकारवर टीका केली आहे. सरकार दडपशाही करत असून, सर्वेक्षण थांबवण्याची मागणी त्यांनी केली. प्रकल्प काय आहे हे जनतेला समजावून सांगावं, एक जाहीर सादरीकरण द्यावं आणि अंतिम मान्यता ही भूमिपुत्रांची असावी, अशी महाविकास आघाडी सरकारची अट होती, असं ते म्हणाले. तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे फायदे समजावून सांगण्यासाठी स्थानिकांशी संवाद साधण्याची मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
****
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला असून, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. ते काल मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल काल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञांची समिती नेमून, या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा, असं केसरकर यांनी सांगितलं. तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य आणि मदत लागेल, ते देण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचं अब्दुल सत्तार यांनी आश्वस्त केलं.
****
येत्या महाराष्ट्र दिनापासून नव्या रेती धोरणाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. यासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनानं जाहीर केलेल्या नव्या वाळू धोरणानुसार वाळूचं उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यात येणार असून, सर्वसामान्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाळू मिळणार असल्याची माहितीही, विखे पाटील यांनी दिली. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास सहाशे रुपये, म्हणजेच एकशे तेहतीस रुपये प्रति मेट्रिक टन दरानं वाळू उपलब्ध होईल.
****
'पहिले पाऊल' या शाळास्तर उपक्रमाचा काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी सी फेस शाळेतून या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमातून प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असा विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. इंग्रजी ही केवळ आंतरराष्ट्रीय संवाद साधण्याची भाषा असून, प्रगती करणाऱ्या देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं, हे वास्तव लक्षात घेत, येत्या शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम इंग्रजीसह त्या-त्या राज्याच्या मातृभाषेतूनही शिकवले जाणार असल्याचं केसरकर यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या दोन हजार दोन उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजावंदन कार्यक्रमानंतर पात्र निवडक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण असलेल्या, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतल्या रस्त्यांसाठी, शासनानं सत्तर कोटी रुपयांचा निधी दिला असून, या निधीतून चांगले रस्ते होणार असल्यानं उद्योगांची भरभराट होण���र आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत चिकलठाणा आणि शेंद्रा औद्येागिक क्षेत्रातल्या, विविध विकास कामांचं भूमिपूजन काल सामंत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारं पोषक वातावरण असल्यानं, पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरता शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सामंत यांनी दिली. पालकमंत्री संदिपान भुमरे तसंच सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मराठवाडा लघू उद्योजक आणि कृषी संघटना -मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पाच अभ्यास मंडळाची निवडणूक काल घेण्यात आली. बिनविरोध निवडून आलेल्या १९ सदस्यांसह ४२ जण आता विद्या परिषदेचे सदस्य बनले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी ही माहिती दिली. अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये मराठीसाठी डॉ. सर्जेराव जिगे, हिंदी - डॉ. अपर्णा पाटील, इतिहास - डॉ. हरी जमाले, वनस्पतीशास्त्र - डॉ. अरवि��द धाबे, तर रसायनशास्त्रासाठी डॉ. मोहम्मद आरेफ अली पठाण विजयी झाले.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयातल्या रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याची सूचना, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिली असल्याची माहिती, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून, ते स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत नसल्याकडे  जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात देखील खासदार जलील यांनी याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उस्मानाबाद पंचायत समितीअंतर्गत, २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये झालेल्या २४ कामांमध्ये, आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या निर्देशानुसार नियुक्त चौकशी समितीच्या अहवालात ही बाब नमूद आहे. या कामांवर हजेरीपटांवरील मजूरांची, एकूण ६३ लाख ७७ हजार ७६७ रुपये एवढी मजूरी, त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा न होता, इतर खात्यांवर जमा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच याशिवाय कामांच्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीत, १७ कामांमध्ये मूल्यांकनापेक्षा १९ लाख ४५ हजार रुपये जास्तीचा खर्च झाल्याचं निदर्शनास आलं आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, ही रक्कम त्यांच्याकडून वसूल का करण्यात येऊ नये, असं विचारण्यात आलं आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी देखील निर्देश दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरासह औद्योगिक वसाहतींच्या क्षेत्रात अनेक अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून, त्यांना पोलिसांचं अभय असल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या भागात सुरू असलेल्या गुटखा विक्री, मटका, मुरुम चोरी, बिअर शॉप, रेती व्यवसाय आणि गॅस रिफिलींग अशा अवैध व्यवसायांवर कारवाई करावी, अशा मागणीचं पत्र दानवे यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, संभाजीनगरचे पोलीस आयुक्त तसंच लाललुचपत विभागाच्या महासंचालकांना लिहिलं आहे. या अवैध व्यवसायिकांकडून पोलीस प्रशासन वसुली करत असल्याचा आरोपही दानवे यांनी यात केला असून, त्याबद्दलचे पुरावे सादर करण्याची तयारी दाखवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं मुंबई इंडियन्सवर ५५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं निर्धारित २० षटकात २०७ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला मुंबईचा संघ १५२ धावातच सर्वबाद झाला.
****
चला जाणू या नदीला या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं काल आसना नदी जनसंवाद यात्रेचा  समारोप जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत झाला. नदीची सभ्यता नष्ट होण्यापूर्वी तिथली जैविक सभ्यता नष्ट होत असते, त्यामुळे सभ्यता टिकवण्यासाठी सर्वानी पाऊल उचलण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
****
बीड तालुक्यातल्या कोळवाडी गावानं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेत मराठवाड्यातून प्रथम क्रमांक पटकावला. काल छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर विभागीय आयुक्त यांच्या हस्ते, कोळवाडीचे सरपंच, उपसरपंच, तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामपंचातय सदस्य आणि ग्रामस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये असा हा पुरस्कार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव इथं उद्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात नामांकित कंपनींसाठी मुलाखती घेण्यात येणार असून, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी नायगावच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपस्थित रहावं, असं आवाहन, नांदेडच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 18 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
द्वेषपूर्ण ट्विट्सवर केली जाणारी कारवाई प्रक्रिया अधिक पारदर्शक करणार असल्याचं, ट्विटर या समूह माध्यमाने म्हटलं आहे. पहिली पायरी म्हणून, नियमांचं संभाव्य उल्लंघन करणारी ट्विट्स विशिष्ट प्रकारे चिन्हांकित केली जातील, यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर परिणाम होणार नाही, मात्र नियमांचं उल्लंघन करणारे ट्विट्स म्हणून लक्षात येतील. केवळ ट्विट स्तरावर अशा प्रकारची कारवाई केली जाईल, वापरकर्त्याच्या खात्यावर त्याचा परिणाम होणार नाही, असं ट्विटरनं स्पष्ट केलं आहे.
****
देशात काल कोविड संसर्ग झालेले सात हजार ६३३ नवे रुग्ण आढळले, तर सहा हजार ७०२ रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त झाले. सध्या देशात ६१ हजार २३३ कोविड रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६८ शतांश टक्के इतका आहे.
****
केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य ��िंदे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. शिंदे यांनी काल याबाबत ट्विट करुन माहिती दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांना गेल्या गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला, त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संपूर्ण शिंदे कुटुंबाची कोरोना चाचणी करण्यात आली. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर संदेशातून केलं आहे.
****
विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून जनतेचं जीवन सुखकर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. ठाकूर हे महाराष्ट्रातल्या चार लोकसभा मतदार संघांच्या दौऱ्यावर आले असता, पालघर इथं बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार गेली नऊ वर्ष सेवा, समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करत असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
****
गोव्यात जी 20 अंतर्गत आरोग्य गटाची बैठक सुरू आहे. या अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय तसंच राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी, पणजी इथं जनऔषधी केंद्रांना भेट देऊन आढावा घेतला. जी 20 गटाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. देशभरात नऊ हजाराहून अधिक जनऔषधी केंद्रं रास्त दरात उच्च दर्जाची औषधं उपलब्ध करून देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेसंदर्भात माध्यमांमधून सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. आपण या चर्चांना आजिबात महत्त्व देत नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अजित पवार हे समर्थक आमदारांचा गट घेऊन सत्तेत आल्यास, शिवसेना सत्तेत राहणार नाही, असं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. आज माध्यमांशली बोलताना शिरसाट यांनी, ही बाब स्पष्ट केली. सोळा आमदार अपात्र ठरले, तर अजित पवार भाजपसोबत सत्ता स्थापन करतील, या जर तरच्या विधानांना काहीही अर्थ नसल्याचं शिरसाट त्यांनी नमूद केलं. महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांना ठळक स्थान दिलं जात नसल्याकडे शिरसाट यांनी लक्ष वेधलं.
****
माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ या दोघांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. गुन्हे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सतीश चंद्र हे या विशेष तपास पथकाचे प्रमुख असतील. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच न्यायालयीन आयोग स्थापन केला आहे.
दरम्यान, प्रयागराज जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी इंटरनेट सेवा आणखी दोन दिवस बंद राहणार आहे.
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं हजूर साहिब नांदेड ते तामिळनाडूमधल्या इरोड दरम्यान विशेष गाडीच्या २२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर शुक्रवारी नांदेड इथून दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि, सिकंदराबाद, गुंटूर, रेणीगुंठा, सालेम मार्गे इरोड इथं दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी सकाळी सव्वा पाच वाजता इरोड इथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता नांदेडला पोहोचेल.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनराईजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
हवामान
राज्यात काल मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 July 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ जुलै २०२२ दुपारी १.०० वा. ****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा निरोप समारंभ आज संध्याकाळी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. खासदारांच्या स्वाक्षरी असलेली एक पुस्तिका यावेळी राष्ट्रपतींना भेट देण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या रविवारी देशाला उद्देशून निरोपाचं भाषण करतील. या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे. नवनिवार्चित राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांचा शपथविधी समारंभ येत्या सोन्यमवारी होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित केला होता.
****
आज राष्ट्रीय प्रसारण दिवस आहे. १९२७ मध्ये या दिवशी, भारतीय प्रसारण कंपनी या खासगी कंपनीच्या अंतर्गत तत्कालिन बॉम्बे स्टेशनवरून देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण सुरू झालं होतं. भारतीय प्रसारण सेवा आठ जून १९३६ पासून ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं २०१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ३४ लाख ९३ हजार २०९ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २०१ कोटी ६८ लाख १४ हजार ७७१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या २१ हजार ४११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ६७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर २० हजार ७२६ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख ५० हजार १०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमताचे कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवत आपल्याच गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी  केली होती, त्या पार्शवभूमीवर आयोगानं या दोन्ही गटाला पुरावे सादर करण्यासाठी आठ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग सुनावणी करणार आहे.
****
सत्ताप्राप्तीनंतर भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज पनवेल इथं होणार आहे. राज्यभरातून पक्षाच्या खासदार, आमदारांसह ८०० प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित राहतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
****
न्याय व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर औरंगाबाद इथं आयोजित एक दिवसीय विधीज्ञ परिषदेचं उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे या परषदेत उपस्थित आहेत. न्यायाधीश शिंदे यांचा यावेळी न्यायमूर्ती भुषण गवई यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार ‍निर्मिती कार्यक्रम या योजनांचा लाभ देण्यासाठी उस्मानाबाद इथं, काल उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रस्ताव नोंदणी शिबीराचा शुभारंभ करण्यात आला. २५ ते २९ जुलै दरम्यान जिल्हयातल्या प्रत्येक तहसिल कार्यालयामध्ये या शिबीराचं आयोजन करण्यात येणार आहे. प्रस्ताव नोंदणी केलेल्यांना प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून कर्ज मंजुरी पर्यंत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या एक ऑगस्टपासून मतदार ओळखपत्रासोबत आधार क्रमांक जोडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदारांनी आपला आधार क्रमांक मतदार ओळखपत्रासोबत नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे .
****
तायपेई इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी. कश्यपचं आव्हान संपुष्टात आलं आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात कश्यपला मलेशियाच्या सूंग जू वेन याच्याकडून १२-२१, २१-२२, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ८७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात सध्या १२ हजार ४४५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. धरणाच्या जलविद्युत केंद्रातून एक हजार ५८९, तर उजव्या कालव्यातून ६०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदी पात्रात सोडलं जात आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 May 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० मे २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
·      शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी-खरीप हंगाम २०२२ आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना
·      ओबीसी आरक्षणाबाबत बाठिया समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार न्यायालयात बाजू मांडणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
·      माजी खासदार क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा
·      राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३१६ नवे रुग्ण
·      पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत ९ जणांचा धरणांमध्ये बुडून मृत्यू
·      मराठवाड्यात गेल्या वर्षभरात नऊ हजार ग्राहकांकडून १३ कोटी रूपयांची वीज चोरी
·      सोलापूर- तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्याचा वाटा देण्याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं राज्य सरकारला पत्र
आणि
·      बाराव्या जागतिक महिला मुष्टीयोद्धा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिला सुवर्ण पदक
****
सविस्तर बातम्या
शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी, रोग, किडीचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर, अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेनं सतर्क रहावं, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्याच्या खरीप हंगाम २०२२ आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणारी बियाणं शेतकरी बांधवाना मोफत देणारं, त्यांच्या आरोग्याचा विचार करणारं महाराष्ट्र, हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विकेल ते पिकेल अभियान यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं, आदी सूचना, मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा असून, कृषी विभागानं उत्तम नियोजन केलं आहे, त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे १८ लाख क्विंटल बियाणं आवश्यक असून, महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी संस्थेकडे मिळून, १९ पूर्णांक ८८ लाख क्विंटल बियाणं अपेक्षित आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी या बैठकीत दिली.
दरम्यान, राज्यात पाच जूनला तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल होईल असा अंदाज, भारतीय हवामान विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी या बैठकीत वर्तवला. मराठवाड्यात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल, तसंच एकूणच महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं, होसाळीकर यांनी यावेळी सांगितलं.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात बाठिया समितीचा अहवाल आला की मध्य प्रदेश सरकार जसं सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं राज्य सरकारही जूनमध्ये बाठिया समितीचा अहवाल आल्यानंतर, आपलं म्हणणं न्यायालयात मांडेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मध्य प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही ५० टक्क्यांच्या पुढे जागा न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं, असा सरकारचा प्रयत्न राहील, त्यानुसार कामाला सुरुवात केली असल्याचं ते म्हणाले.
****
कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेन्टरी परीक्षेचा निकाल २३ मे रोजी, तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल आज २० मे रोजी जाहीर होणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ओ ए डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार असल्याचं, संचालनालयानं सांगितलं आहे.
****
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने इतर पक्षासोबत युती आघाडी करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष तसंच त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी स्थानिक पातळीवर संबंधित पक्षाशी चर्चा करून राज्य कार्यकारणी समोर प्रस्ताव ठेवावा असा निर्णय राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली काल औरंगाबाद इथं वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी बैठक झाली. पक्ष यापुढे राज्यात नव्या जोमाने सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी यावेळी सांगितलं.
****
कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्राचं शिष्टमंडळ रवाना झालं आहे. या शिष्टमंडळात या महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या ‘कारखानीसांची वारी’, ‘पोटरा’ आणि ‘तिचं शहर होणं’ या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक यांचा समावेश आहे.
****
वाराणसी इथल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी तीन वाजता सुनावणी निश्चित केली आहे. यावेळी सर्व पक्षांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. यासोबतच वाराणसी न्यायालयातल्या सुनावणीलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
तत्पूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल वाराणसी न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालात संबंधित परिसराचे दीड हजार छायाचित्रं आणि ३२ जी बी मेमरी क्षमतेची आठ मेमरी कार्ड असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, मथुरा इथल्या श्रीकृष्ण जन्म स्थळाच्या बाजुला असलेल्या शाही ईदगाह जमिनीच्या मालकी हक्काची मागणी करणारी श्रीकृष्ण जन्मभूमीन्यास आणि अन्य खाजगी पक्षांची याचिका जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल स्वीकारली आहे.
****
माजी खासदार क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू यांना ३४ वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २७ डिसेंबर १९८८ रोजी पतियाळा इथं गुरनाम सिंग या ६५ वर्षीय वृध्दासोबत झालेल्या हाणामारीत गुरनाम यांचा मृत्यू झाला होता.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले ३१६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८१ हजार ८५८ झाली आहे. काल या संसर्गाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २०१ रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३२ हजार २८२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार ७२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात काल एक रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे.
****
पुणे जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या घटनांत नऊ जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाच महिला तर खेड तालुक्यातील चासकमान या धरणांमध्ये चार विद्यार्थी बुडून मरण पावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात नऊ हजार ग्राहकांकडून १३ कोटी रूपयांची वीज चोरी उघड झाली आहे. त्यांच्याकडून चार कोटी ६१ लाख रूपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. कोणीही वीज चोरी करू नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी केलं आहे.
दरम्यान, महावितरणनं विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकांसाठी, व्याज आणि विलंब आकारात शंभर टक्के माफीची सोय करून पुनर्जोडणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व पात्र ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केलं आहे.
****
सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्याचा वाटा द्यावा, अशी सूचना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेवून सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग राज्याकडून निधीची तरतूद होत नसल्याने रेंगाळत असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं, त्या अनुषंगाने रेल्वे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद रेल्वे स्थानकासाठी १६ डब्यांची पिटलाइन मंजूर केल्याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी, रेल्वे मंत्री वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेवून, त्यांचे आभार मानले.
****
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक असून, यासाठी कायद्याचा धाक असला पाहिजे आणि प्रशासन दक्ष असलं पाहिजे, असं राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्या काल हिंगोली इथं आढावा बैठकीत बोलत होत्या.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर पाच दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद विभागानं यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन ही बंदी आणखी पाच दिवस वाढवली जाऊ शकते, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुल इथं झालेल्या बाराव्या आईबीए जागतिक महिला मुष्टीयोद्धा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीन हिनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. ५२ किलो वजनी गटाल निखतनं अंतिम सामन्यात थायलंडच्या जित्पोंग जुतामस हिच पराभव केला. या स्पर्धेत भारताला तीन पदकं मिळाली आहेत. ५७ किलो वजनी गटात मनीषानं आणि ६३ किलो वजनी गटात परवीन हिने कांस्य पदक मिळवलं आहे. भारताला जागतिक मुष्टीयोद्धा स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून देणारी झरीन ही पाचवी महिला आहे.
****
महिला बचत गटांनी उत्पादनांचं ब्रँडिंग करण्यावर भर द्यावा, असं  आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केलं आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजी��िका अभियानाअंतर्गत शहरातील ६ महिला बचत गटांना प्रत्येकी ४ लाख रुपये कर्ज वाटप गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. कर्ज वाटप प्रक्रियेत लातूर महापालिकेनं  विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
****
��तर मागास प्रवर्ग - ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवा, अन्यथा ओबीसी नेते, मंत्री, आमदार, खासदार यांना राज्यात रस्त्यावर फिरु देणार नसल्याचा इशारा, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या एक जूनला औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
ओबीसी आरक्षण प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल परभणी ते गंगाखेड मार्गावर नृसिंह पोखर्णी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी काल जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बदनापूर, अंबड तालुक्यात काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जवळपास अर्धातास जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद शहर परिसरातही काल सायंकाळी तुरळक पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 19.05.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 May 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ मे २०२२ सायंकाळी ६.१०
****
·      यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा असून, कृषी विभागाकडून खरीप हंगामाचं उत्तम नियोजन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
·      ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकार जूनमध्ये बाठिया समितीचा अहवाल आल्यानंतर आपलं म्हणणं न्यायालयात मांडणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
·      कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ रवाना
·      मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात नऊ हजार ग्राहकांकडून १३ कोटी रूपयांची वीज चोरी उघड
आणि
·      औरंगाबाद महानगरपालिकेत कंत्राटी पदभरतीसाठीच्या निविदेस मंजुरी देतांना कंत्राटदारांकडून कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणुक होणार नाही याची खबरदारी घ्यावी - खासदार इम्तियाज जलिल यांची सूचना
****
यंदा चांगल्या पावसाची अपेक्षा असून, कृषी विभागानं उत्तम नियोजन केलं आहे, त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगाम २०२२ आढावा बैठकीत ते आज बोलत होते. आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणारे बियाणे शेतकरी बांधवाना मोफत देणारं, त्यांच्या आरोग्याचा विचार करणारं महाराष्ट्र, देशातलं पहिलं राज्य असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी, रोग, किडीचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबर, अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी यंत्रणेनं सतर्क रहावं, विकेल ते पिकेल अभियान यशस्वी करण्यासाठी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं, आदी सूचना, मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला यावेळी केल्या.
यंदाच्या खरीप हंगामासाठी १७ पूर्णांक ९५ लाख क्विंटल बियाणं आवश्यक असून, महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी संस्थेकडे मिळून, १९ पूर्णांक ८८ लाख क्विंटल बियाणं अपेक्षित आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी या बैठकीत दिली.
दरम्यान, राज्यात पाच जूनला तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज, भारतीय हवामान विभागाचे कृष्णानंद होसाळीकर यांनी या बैठकीत वर्तवला आहे. मराठवाड्यात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस होईल, तसंच एकूणच महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात बाठिया समितीचा अहवाल आला की मध्य प्रदेश सरकार जसं सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं राज्य सरकारही जूनमध्ये बाठिया समितीचा अहवाल आल्यानंतर, आपलं म्हणणं न्यायालयात मांडेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मध्य प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही ५० टक्क्यांच्या पुढे जागा न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं, असा सरकारचा प्रयत्न राहील, त्यानुसार कामाला सुरुवात केली असल्याचं ते म्हणाले.
****
भारतातली माध्यमं आणि मनोरंजन कार्यक्षेत्र, वर्षाला ५३ अब्ज डॉलर्सची उलाढाल करण्याची अपेक्षा असून, सरकारची धोरणं या उद्योगाला चालना देणारी असल्याचं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे. फ्रान्समध्ये आयोजित कान्स चित्रपट महोत्सवात, इंडिया: द कंटेट हब ऑफ द वर्ल्ड' या चर्चासत्रात ते आज बोलत होते. भारताची कथा अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात सिनेमाची महत्वाची भुमिका असल्याचं ते म्हणाले. भारत सरकारनं ॲनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स कृती दलाची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला असून, डिजिटायझेशनच्या माध्यमातून सिनेमाचा वारसा जपण्यासाठी, अनेक पावलं उचलण्यात आली असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं.
दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्राचं शिष्टमंडळ रवाना झालं आहे. या शिष्टमंडळात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव  सौरभ विजय, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे महाव्यवस्थपकीय संचालक विवेक भिमनवार, तसंच या महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या ‘कारखानीसांची वारी’, ‘पोटरा’ आणि ‘तिचं शहर होणं’ या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक यांचा समावेश आहे.
****
मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षभरात नऊ हजार ग्राहकांकडून १३ कोटी रूपयांची वीज चोरी उघड झाली आहे. त्यांच्याकडून चार कोटी ६१ लाख रूपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती, महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. वीज चोरांविरूद्धच्या या धडक मोहीमेत संशयीत वीज मिटरच्या तपासणीसह, धाडी टाकून वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. कोणीही आकडे टाकून विजेचा वापर करू नये, मिटरमध्ये छेडछाड करू नये, मंजूर भारापेक्षा अधिक भारानं विजेचा वापर करू नये, असं आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांनी केलं आहे.
दरम्यान, महावितरणनं विलासराव देशमुख अभय योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीज ग्राहकांसाठी, व्याज आणि विलंब आकारात शंभर टक्के माफीची सोय करून पुनर्जोडणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. सर्व पात्र ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या विविध विभाग आणि अधिनस्त वार्ड कार्यालयात, कुशल आणि अकुशल कंत्राटी तत्वावर मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी, विविध कंत्राटदारांकडून आलेल्या निविदेस मंजुरी देतांना, कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणुक होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना, खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महानगरपालिकेचे प्रशासक, कामगार उपायुक्त, भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि कर्मचारी राज्य विमा विभागाच्या आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना विविध कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन आणि भत्ते, महगाई, घरभाडे यासह इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी, तसंच सुट्यांच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर देण्याचे आदेश, नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराला द्यावे, असंही खासदार जलिल यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी राज्याचा वाटा द्यावा, अशी सूचना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेवून सोलापूर - तुळजापूर - उस्मानाबाद हा रेल्वे मार्ग राज्याकडून निधीची तरतूद होत नसल्याने रेंगाळत असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं, त्या अनुषंगाने रेल्वे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये १६ डब्यांची पिटलाइन मंजूर केल्याबद्दल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी, रेल्वे मंत्री वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेवून, त्यांचे आभार मानले.
****
कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या एलिमेन्टरी परिक्षेचा निकाल २३ मे रोजी, तर इंटरमिजिएट परिक्षेचा निकाल २० मे रोजी जाहीर होणार आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ओ ए डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार असल्याचं, संचालनालयानं कळवलं आहे.  
****
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणं आवश्यक असून, यासाठी कायद्याचा धाक असला पाहिजे आणि प्रशासन दक्ष असलं पाहिजे, असं राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण यांनी म्हटलं आहे. हिंगोली इथं आढावा बैठकीत त्या आज बोलत होत्या. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी हुंडाबळी अभियानावर जनजागृती करावी, बालविवाह रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना सहभागी करुन घ्यावं, बालविवाह थांबवण्यासाठी कोणत्या पद्धतीने जनजागृती अभियान राबवत आहे, याचा अहवाल द्यावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना यावेळी केल्या. बालविवाह करणाऱ्या कुटुंबाचं समुदपदेशन करुन ते थांबवावेत, यात कसूर करणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, भटजी यांच्यावर गुन्हे दाखल करावे, असं चव्हाण यांनी सांगितलं.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकवा, अन्यथा ओबीसी नेते, मंत्री, आमदार, खासदार यांना राज्यात रस्त्यावर फिरु देणार नसल्याचा इशारा, ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या एक जूनला औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
ओबीसी आरक्षण प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आज परभणी ते गंगाखेड मार्गावर नृसिंह पोखर्णी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
****
औरंगाबाद इथल्या ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक आज पार पडली. अंमली पदार्थांसंदर्भात झालेल्या कारवाईचा आणि अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी यावेळी आढावा घेण्यात आला.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
वाराणसी इथल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात वेळ मागितला, त्यावर न्यायालयाने उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी निश्चित केली आहे. यावेळी सर्व पक्षांना अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. यासोबतच वाराणसी न्यायालयातल्या सुनावणीलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
तत्पूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल वाराणसी न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालात सापडलेल्या पुराव्यांबाबत कोणताही खुलासा करण्यास न्यायालयाच्या आयुक्तांनी नकार दिला आहे.
****
इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात बाठिया समितीचा अहवाल आला की मध्य प्रदेश सरकार जसं सर्वोच्च न्यायालयात गेलं, तसं राज्य सरकारही जूनमध्ये बाठिया समितीचा अहवाल आल्यानंतर आपलं म्हणणं मांडेल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मध्य प्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रातही ५० टक्क्यांच्या पुढे जागा न जाऊ देता ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं, असा सरकारचा प्रयत्न राहील, त्यानुसार कामाला सुरुवात केली असल्याचं ते म्हणाले.
****
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ५९ नव्या वाहनांचं वितरण काल उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रभावीपणे प्रयत्नशील राहिल्यानं देश आणि राज्याच्या महसूलातही मोठी भर पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तीन रुपये ५० पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर आठ रुपयांनी महागला आहे. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर आता एक हजार तीन रुपयांना मिळणार आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १९१ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख ७१ हजार ६०३ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९१ कोटी ७९ लाख ९६ हजार ९०५ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार ३६४ कोविड रूग्णांची नोंद झाली, दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ५८२ रूग्ण बरे झाले. देशात सध्या १५ हजार ४१९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ८९ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना आपल्या सूचना आणि विचार २६ मे पर्यंत माय जी ओ व्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवता येतील. तसंच १८०० ११ ७८०० या क्रमांकावर आपला मेसेज रेकॉर्ड करुनही नागरिकांना विचार मांडता येतील.
****
महावितरणच्या नावे बनावट मॅसेज येत असून, त्या मॅसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद कार्यालयानं केलं आहे. आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज रात्री साडे नऊ वाजता आपला वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, अशा आशयाचा बनावट मॅसेज वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठवण्यात येत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर महावितरणनं एक पत्रक जारी करुन नागरिकांना आवाहन केलं आहे. बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून एखादी लिंक पाठवण्यात आली असेल तर त्याला देखील दुर्लक्ष करावं, असं सांगण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीचं मुख्यद्वार पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या औरंगाबाद विभागानं यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. या कबरीसंबंधी सध्या विवाद सुरु असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २२ मे पर्यंत कबर बंद ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेश द्वारावर दोन सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आलं असून, आगामी काळात परिस्थिती पाहता आणखी पाच दिवस कबर बंद ठेवली जाऊ शकते असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात आज पहाटेपासूनच पाऊस सुरु आहे. कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. डोंगरकडा, वारंगा फाटा, रामेश्वर तांडा, दांडेगाव परिसरातही पाऊस पडला.
नांदेड शहरासह जिल्ह्यातल्या हदगाव इथं आज सकाळी पाऊस झाला. नांदेड शहरात कालपासून ढगाळ वातावरण आहे. या पावसामुळे उन्हाचा कडाका काही प्रमाणात कमी झाला आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, विदर्भातही मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
तापमान अहवाल: दिल्ली, वर, Mp, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा कमाल तापमान अहवाल 7 मे | तापमान अहवाल: शनिवारी बाडमेरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, जाणून घ्या
तापमान अहवाल: दिल्ली, वर, Mp, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानचा कमाल तापमान अहवाल 7 मे | तापमान अहवाल: शनिवारी बाडमेरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद, जाणून घ्या
तापमान अहवाल: गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात आकाश ढगाळ होते आणि हलका पाऊस पडत होता. त्यामुळे तापमानात घट नोंदवण्यात आली. आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 May 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ मे २०२२ दुपारी १.०० वा. ****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आज आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मात्र भोंगे उतरवण्यात आलेल्या ठिकाणी नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. नागरिकांनी हे भोंगे काढण्यासाठी पोलिस ठाण्यांना पत्र द्यावी, तक्रार दाखल करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.  
मुंबईतल्या अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात पोलीस बंदोबस्त आहे, तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद शहरामध्ये मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती इथं हनुमान चालीसा पठण करण्यात आलं.
धुळे इथं मनसे जिल्हाध्यक्ष दुष्यंतराजे देशमुख आणि त्यांचे सहकारी आज सकाळी शिवतीर्थ इथं जमले असताना त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली.
नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन टाळण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून, शहरातल्या अनेक मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सातपूर मध्ये काही कार्यकर्त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं.
पालघरमध्ये मनसेचे शहर अध्यक्ष सुनील राऊत यांच्यासह इतर पाच कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. मात्र आज अखेर त्यांना १२ दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे.  
****
केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यू अहवालावर आधारित सी आर एस म्हणजे नागरी नोंदणी प्रणाली अहवाल २०२० जारी केला आहे. या आकडेवारीमध्ये कोविड-19 आणि इतर कारणांमुळे झालेल्या मृत्यूंचा समावेश आहे. नोंदणीकृत मृत्यूंच्या संख्येत सहा पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्र, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि हरियाणा या काही राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी २०१९ ते २०२० पर्यंत नोंदवलेली मृत्यूची संख्या लक्षणीय असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल चार लाख ७९ हजार २०८ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १८९ कोटी ४८ लाख एक हजार २०३ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार २०५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ८०२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या १९ हजार ५०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  
****
बुलडाणा जिल्ह्यातली प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी जाहीर करण्यात आली आहे. पीक परिस्थिती, पाऊस पाणी, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी ही भविष्यवाणी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या भविष्यवाणीनुसार कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील, त्यांना भावही चांगला मिळेल, असं सांगितलं आहे. पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएलचे प्ले ऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवले जाणार आहेत. यावेळी मैदानात पूर्ण क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश असेल, अशी माहिती, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. पात्रता फेरीचा पहिला सामना आणि बाद फेरीचा सामना २४ आणि २५ मे रोजी कोलकात्याच्या इडन गार्डनवर होईल. तर पात्रता फेरीचा दुसरा सामना आणि अंतिम सामना अमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर २७ मे आणि २९ मे रोजी होईल.
****
हवामान
येत्या दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, वाशिम जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात काही भागांत मात्र उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 May 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ मे २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      कोविड प्रतिबंधक लसीकरणाची सक्ती करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालयाचं स्पष्टीकरण.
·      बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरविरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकार, सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांना निर्देश.
·      अनधिकृत भोंग्यांविरोधातला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा राज्यभरातला महाआरतीचा कार्यक्रम रद्द.
·      बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष पदी काँग्रेसच्या नेत्या सुशीबेन शाह यांची नियुक्ती, बीडच्या प्रज्ञा खोसर सदस्य.
·      दौलताबाद किल्ल्याच्या विकासासाठी ३५ कोटी रुपये मंजूर- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड.
·      राज्यात कोविड संसर्गाचे ९२ नवे रुग्ण.
·      रमजान ईदच्या सणाचा सर्वत्र उत्साह तर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बाजारात गर्दी.
आणि
·      येत्या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त.
****
कोविड प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे माजी सदस्य डॉ.जेकब पुलियेल यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही बाब स्पष्ट केली. लसीकरणानंतरची लसींच्या दुष्परिणामांबाबतची माहिती जाहीर करण्याचे सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. त्यानुसार लसीकरणाच्या दुष्परिणामांची माहिती सार्वजनिक करावी, असे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. शरीराबाबतची स्वायत्तता आणि समग्रता घटनेच्या अनुच्छेद २१ अन्वये संरक्षित करण्यात आल्या आहेत, असं न्यायमूर्ती एल.नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती बी.आर.गवई यांच्या खंडपीठानं सांगितलं. लस न घेणाऱ्यांना सार्वजनिक सुविधांचा वापर करण्यापासून रोखण्याचे आदेश राज्य सरकारांनी मागे घ्यावेत, असंही याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
मुलांच्या लसीकरणाच्या विषयाचा विचार करता, देशातल्या मुलांचं लसीकरण करण्याबाबत केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय, हा जागतिक मानकांना अनुसरून आहे. मुलांसाठीच्या नियामक अधिकाऱ्यांनी यापूर्वीच मान्यता दिलेल्या चाचण्यांच्या टप्प्यांचे मुख्य निष्कर्ष लवकरात लवकर जाहीर करावेत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या बेकायदा होर्डिंग्ज आणि बॅनरविरोधात केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांना दिले आहेत. राज्यभरात राजकीय पक्षांनी लावलेल्या बेकायदेशीर बॅनर्स, होर्डिंग्ज आणि पोस्टर्समुळे सार्वजनिक विद्रुप झाल्याचा दावा याचिकांद्वारे करण्यात आला आहे. यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, कोणते होर्डिंग कायदेशीर आणि कोणते बेकायदेशीर हे कसं निश्चित करणार, तसंच कायदेशीर होर्डिंग्यजमधून किती महसूल मिळतो, याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
****
अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करण्याचा पूर्वनियोजित कार्यक्रम, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रद्द केला आहे. याबाबत एक ट्विट करून राज ठाकरे यांनी, महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. रमजान ईदचा सण मुस्लिम समाजाने आनंदाने साजरा करावा, आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. भोग्यांच्या विषयातली आगामी भूमिका आज ट्विटच्या माध्यमातून जाहीर करणार असल्याचं, त्यांनी सांगितलं आहे.
****
राज्य शासनाचे कृषी पुरस्कार काल नाशिक इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. २०१७, २०१८, आणि २०१९ या तीन वर्षांसाठी, कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९८ शेतकऱ्यांना, यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कृषी पुरस्कारांच्या रकमेत पाचपटीने वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी ५१ लाख रुपयांची तरतूद करावी लागली, परंतू यापुढे या पुरस्कारासाठी पाचपट वाढीव तरतूद केली जाईल, असं त्यांनी जाहीर केलं.
****
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल पूर्ण झाली. मात्र निर्णय लिहून पूर्ण न झाल्यामुळे, आता या प्रकरणी उद्या निर्णय सुनावला जाणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांना ही माहिती दिली. उद्या याप्रकरणी कोणताही युक्तीवाद केला जाणार नाही, थेट निकाल सुनावला जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
****
राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्या सुशीबेन शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्षांसह सात सदस्यांच्या नावांची अधिसूचना महिला आणि बाल विकास विभागाने जारी केली. इतर सदस्यांमध्ये बीड इथल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा खोसर यांचा समावेश आहे.  पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबाद किल्ल्याच्या विकासासाठी ३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. दौलताबाद किल्ल्याचं सुशोभीकरण, लाईटिंग यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पुढच्या आठवड्यात दिल्लीचं पथक येणार असून, एक जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन करणार असल्याचं कराड यांनी सांगितलं. याशिवाय साडेसात कोटी रुपये निधीतून बीबी का मकबरा दुरुस्ती आणि लाईटिंग करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
कोविड रुग्णसंख्येत सध्या वाढ होत असली तरी, ही चौथी लाट म्हणता येणार नाही असं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरनं स्पष्ट केलं आहे. देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या १८९ कोटी २३ लाख ९८ हजार ३४७ मात्रा देण्यात आल्या.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ९२ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७७ हजार ९९३ झाली आहे. काल या संसर्गाने एका रुग्णाचा मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८४४ असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ७० रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २९ हजार १३३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण आज उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, तसंच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना, दानधर्म आणि परोपकाराचं महत्त्व अधोरेखित करणारा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि समृध्दी घेऊन येवो, असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा देताना, सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारं हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, असं म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, यंदाची ईद एकोप्याने, आनंदाने, उत्साहाने साजरी करु या आणि जगाला मानवकल्याण, विश्वबंधुत्वाचा संदेश देऊ या, असं म्हटलं आहे.
दरम्यान, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर काल जालना इथं पोलीस दलाकडून शहरात पथसंचलन करण्यात आलं. ईदच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरात वाहतुकीच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत, नागरिकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन पोलीस प्रशासन तसंच महापालिकेनं केलं आहे.
औरंगाबाद इथं छावणी ईदगाह मैदानावर सकाळी साडे आठ वाजता, पाणचक्की तसंच शहागंज इथं सकाळी नऊ वाजता तर उस्मानपुरा इथल्या जामा मशिदीत साडे नऊ वाजता ईदची विशेष नमाज अदा केली जाणार आहे
****
भारतीय संस्कृतीतला साडे तीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. विविध नव्या उपक्रमांना, व्यवसायाला प्रारंभ तसंच विशेष खरेदीसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे खरेदीदारांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. भगवान परशुराम तसंच महात्मा बसवेश्वर यांची जयंतीही आज साजरी केली जाते. या निमित्तानं शोभायात्रांसह विविध धार्मिक तसंच सामाजिक उपक्रमांचं आयोजन आज सर्वत्र करण्यात आलं आहे.
****
राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह इतर अनेक प्रश्न असतांना राज ठाकरे जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करत असल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते काल हिंगोली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र आणि राज्य शासन यांच्या अपयशाबद्दल आणि विरोधकांच्या दिशाहीन वर्तनाबद्दलही त्यांनी यावेळी टीका केली.
****
२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत मतदारांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याची सूचना, निवडणूक विभागाने केली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातल्या निवडणूक विभागानं याबाबत पत्र जारी केलं आहे. सर्व प्रकारची देयकं, शासकीय वाहनं, घंटागाड्यांमधून प्रत्यक्ष जनजागृतीसह महाविद्यालयं, विद्यापीठं, तसंच गृहनिर्माण संस्था यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं किंवा सामाजिक संपर्काच्या माध्यमातून मतदार नोंदणीसाठी जागृती करावी, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
राज्यात यंदा मार्च-एप्रिल या दोन महिन्यांच्या कालावधीत २५ जणांचा उष्माघातानं मृत्यू झाला, तर ३७४ जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. मृतांची ही संख्या गेल्या आठ वर्षांतली सर्वाधिक असून, नागपूर इथं सर्वाधिक ११ रुग्णांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात चार, अकोला तीन, जालना दोन आणि अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद आणि परभणी इथं प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
****
कृषी विभागामार्फत शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी गावपातळीवर भर दिला जात असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातल्या कासारखेडा इथं प्रगतीशील शेतकरी बाबाराव आढाव यांच्या शेतात काल कृषी विभागाच्या वतीनं, शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम पूर्व तयारी प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गावातील उन्हाळी सोयाबीन लागवड आणि खरीप हंगामासाठी उपलब्ध सोयाबीन बियाणे, याबाबत त्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
धुळे जिल्ह्यात सोनगीर पोलिसांनी गेल्या आठवड्यात शस्त्रसाठा जप्त केल्याप्रकरणी आणखी दोन संशयितांना जालना इथून अटक करण्यात आली. खालीद बासीत, साजीद पठाण अशी त्यांची नावं आहेत. याप्रकरणी जालना इथल्या चार आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईत ८९ तलवारी आणि एक खंजीर अशी ९० धारधार शस्त्रं पोलिसांनी जप्त केली होती. हा शस्त्रसाठा राजस्थानमधून जालन्याला कशासाठी नेला जात होता याचा पोलिस तपास सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. औंढा नागनाथ तालुक्यातल्या राजदरी पाटी इथं काल दुपारी रिक्षा उलटून झालेल्या अपघातात, एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. साहेबराव देवबा बंदुके असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
हिंगोली - कळमनुरी रस्त्यावर खानापूर चित्ता इथं दुसरा अपघात झाला. भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. गजानन पांडुरंग पारखे असं मृत व्यक्तीचं नावं आहे.
****
निझामाबाद-पुणे गाडीला जालना जिल्ह्यात परतूर जवळ पारडगाव इथला थांबा पुन्हा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी पारडगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पाच वाजून ५९ मिनिटांनी थांबेल आणि सहा वाजता सुटेल, असं दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कळमनुरी तालुक्यातल्या पार्डीमोड ते कोंढुर डिग्रस या रस्त्याच्या मागणीसाठी चिंचोर्डी, दिग्रस, कोंढुर या गावातल्या गावकऱ्यांनी ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता अडवून आंदोलन केलं. तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकर�� कामाला सुरू करण्याचं आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
हवामान
येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमधे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २९ एप्रिल २०२२ सकाळी ११.०० वाजता ****
राज्यातल्या इतर मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी राज्य सरकारनं पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे करावी, अशी शिफारस ओबीसी समन्वय मंत्रिमंडळ उपसमितीनं केली आहे. या समितीने काल आपला अहवाल राज्य मंत्रिमंडळासमोर सादर केला.
****
कोरोना साथीचा धोका अद्यापही पूर्णपणे गेलेला नसल्यानं चीनसाठी प्रवासी व्हिसा देणं योग्य ठरणार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनने स्वतःच गेल्या नोव्हेंबर २०२० पासून भारतीयांना बहुतांश प्रकारचे व्हिसा देणं बंद केल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ता अरिन्दम बागची यांनी सांगितलं.
****
आयएनएस विक्रांत बचाव निधी फसवणूक प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनाची मुदत, मुंबई उच्च न्यायालयानं, १४ जूनपर्यंत वाढवली आहे. आयएनएस विक्रांत या नौदलाच्या नौकेची भंगारात विक्री होण्यापासून वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप सोमय्या पिता-पुत्रावर आहे.
****
ग्रामीण भागातल्या महिलांच्या स्वयंसहाय्यता गटांना येत्या आर्थिक वर्षात, पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पतपुरवठा करुन बँकांनी इतिहास घडवावा, असं आवाहन, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केलं आहे. काल मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स बैठकीत ते बोलत होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात, पतपुरवठ्याचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा, या बैठकीत सन्मान करण्यात आला.
****
बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरीटचा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातल्या वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून, दोन जण फरार आहेत.
****
राज्यात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल सर्वाधिक ४५ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी इथं ४३, तर जालना, औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यात काल ४२ अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. विदर्भात २ मे पर्यंत उष्णतेची लाट असेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 01 October 2021 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२१ सकाळी ७.१० मि. ****
गणेशोत्सव साजरा करताना आपण सर्वांनी जबाबदारीचं भान राखलंत, आता नवरात्रोत्सव आणि पाठोपाठ दिवाळीही, साजरी करू या, पण सावध राहून. खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नका. कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे, हे विसरू नका. लसीचे दोन्ही डोस वेळ��वर घ्याच, पण त्यानंतरही काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात, चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. तरीही कोविड-19 ची लक्षणं आढळली तर लगेच विलगीकरणात जा, चाचणी करून घ्या आणि आपल्यामुळे इतरांना बाधा होणार नाही, याचीही काळजी घ्या. कोविड -19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      कोरोना विषाणू संसर्गाशी जिद्दीनं दिलेल्या लढ्याप्रमाणेच स्वच्छ महाराष्ट्र घडवण्यासाठी लढा देण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यातल्या सरपंचांना आवाहन
·      अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरीव मदत करणार, असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार- महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
·      मराठवाड्यात साडे दहा लाख हेक्टर्स क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, १७ तलाव फुटले
·      शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मागणी
आणि
·      राज्यात तीन हजार ६३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण; मराठवाड्यात सहा जणांचा मृत्यू तर १४६ बाधित
****
कोरोना विषाणू संसर्गाशी आपण ज्या जिद्दीनं लढलो आणि त्याचे चांगले परिणाम समोर आले, त्याच ईर्षेनं स्वच्छ महाराष्ट्र घडवण्यासाठी लढा द्यावा, असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्व सरपंचांना केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानातर्गंत, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं, 'सरपंच - पाणी आणि स्वच्छता संवाद' उपक्रमाचं आयोजन केलं होतं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या २७ हजार ८३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना, `स्वच्छता हेच अमृत` हा नवा मंत्र आहे हे ध्यानात ठेवून काम करण्याचं आवाहनही, त्यांनी यावेळी केल. वैयक्तिक स्वच्छता असेल तर रोगराईला वाव मिळणार नाही, त्यामुळे आपलं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गमुक्ती बरोबरच कचरा मुक्त आणि निरोगी गाव अशा अभियानानं आपण पुढं गेलं पाहिजे, भावी पिढीनं सरपंचाची आठवण काढली पाहिजे इतकं चांगलं काम आपण करून दाखवावं, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
****
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरीव मदत करणार असून, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती, महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते काल नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांशी बोलत होते. मराठवाड्यात वीस लाख हेक्टर वरच्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
शासनाच्या नियमाप्रमाणे जे काही मदत करता येईल, ती सर्व मदत सरकार करणार आहे. काही पैसे केंद्र सरकार कडून येणे बाकी आहे. पन्नास हजार कोटी त्याच्यामध्ये ३२ हजार कोटी रुपये हे जीएसटीचे आहे. आणि हे एकदा राज्यात आले. तर निश्चित किंवा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जही घेण्याची परिस्थिती आली तर कर्जही घेवू परंतू हवालदिल झालेला शेतकरी याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने नेते निर्णय घेतील आणि किती हेक्टरने द्यायचे आहे नुकसान त्याची घोषणा येणाऱ्या कॅबिनेट पर्यंत होईल.  
****
मराठवाड्यात दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास १२ लाख चार हजार शेतकऱ्यांच्या दहा लाख ५६ हजारांहून अधिक हेक्टर्स क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे, १७ तलाव फुटले आहेत, तर २९३ ठिकाणी महावीतरणचं नुकसान झालं आहे. सर्वच ठिकाणी मदतकार्य सुरु असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या सुमारे तीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या, दोन लाख ४८ हजार हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचं काम महसूल आणि कृषी विभागानं सुरू केल्याची माहिती, जिल्हा कृषी अधिकारी भास्कर रणदिवे यांनी दिली.
दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेव दानवे यांनी काल जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या बावणे पांगरी, तुपेवाडी आणि अन्य गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची भेट घेऊन त्यांच्याकडून नुकसानीचा आढावा घेत, शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. अतिवृष्टीमुळे जालना, औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातलं खरिपाचं पिके उद्ध्वस्त झालं आहे, अशा परिस्थितीत शासनानं पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण करण्याऐवजी, शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही दानवे यांनी यावेळी केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केला आहे. यात शेती, रस्ते, पूल, तलाव, घरांची पडझड आणि किती जीवित हानी झाली या माहितीचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातल्या दोन लाख ८८ हजार १३७ शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तर दोन लाख ६६ हेक्टर जमीन बाधित झाली आहे. जिल्ह्यातल्या १०९ पुलांची दुरुस्ती करावी लागणार असून, पाच तलाव फुटले आहेत. दोन व्यक्तीसह ११४ जनावरांचा मृत्यू झाला, एक हजार ८७ घरांची पडझड झाली, तर ९३ नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
****
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार रजनी पाटील यांनी काल बीड जिल्ह्यात केज, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी, धारूर, गेवराई या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, मदतीचं आश्वासन दिलं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी जलाशयाची सर्व दारं काल दुपारी बंद करण्यात आली असून, पूर्णा नदीला आलेला पूर हळूहळू ओसरेल असं चित्र दिसत आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून येलदरी जलाशयात पाण्याची आवक कमी झाल्यानंतर पाटबंधारे खात्यानं सर्व दरवाजे बंद केले आहेत.
दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या सावंगी खुर्द इथं पुरात अडकलेल्या सहा जणांची काल सुटका करण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात ९९ टक्क्यांच्या वर पाणीसाठा आहे. धरणातून सध्या ४७ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे. नांदेड जिल्ह्यातल्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी धरणातून सध्या दोन लाख १७ हजार १८१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.
****
राज्यात काल तीन हजार ६३ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ५० हजार, ८५६ झाली आहे. काल ५६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३९ हजार ६७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १२ शतांश टक्के झाला आहे. काल तीन हजार १९८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६३ लाख ७१ हजार ७२८ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९७ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ३६ हजार, ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल १४६ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तीन, बीड जिल्ह्यातल्या दोन, तर नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी ४८ नवे रुग्ण आढळले. बीड ३१, लातूर आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी सात, नांदेड तीन, तर परभणी जिल्ह्यात दोन रुग्ण आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीना तातडीनं कळवण्याचं आवाहन, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलं आहे. यंदा सहा लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरुन आपलं पिक संरक्षित केलं आहे. मात्र नुकसानीची माहिती कळवण्याऱ्यांची संख्या अवघी दोन लाख २७ हजार एवढीच आहे. सरसकट मागणीची दखल सरकार घेईल असा विश्वास व्यक्त करुन खासदार राजेनिंबाळकर यांनी, भरीव मदत पिकविम्याच्या माध्यमातून मिळण्यासाठी आपण कुठेही कमी पडता कामा नये, यासाठी झालेल्या नुकसानीची माहिती तात्काळ भरुन ��ेण्याची गरज असल्याचं सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशा यंत्रणेद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
****
एकोणिसाव्या शतकात आदिवासींनी ब्रिटींशाच्या विरोधात गनिमा कावा युद्ध तंत्राचा वापर केला. आदिवासी जमातीने आपल्या लढ्यातून भारतीयांसमोर एक आदर्श उभा केला असल्याचं मत, पुण्याच्या एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.दिनकर मुरकुटे यांनी व्यक्त केलं आहे.
आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाच्या आझादी का अमृत महोत्सव व्याख्यानमालेत, ‘ब्रिटीशांच्या विरोधात आदिवासींचा विद्रोह’, या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. भारतातल्या आदिवासींनी ज्या पद्धतीनं संघटीतपणे प्रयत्न करुन ब्रिटीश साम्राज्यवादाला विरोध केला याबद्दल माहिती देतांना ते म्हणाले….
ब्रिटीश राजवटीचे पुतळे जाळले जात असत मोठ्या प्रमाणावर आणि मुंडा आदिवासी अगदी उत्साहानं ब्रिटीश राजवटीबद्दलची घृणा उत्पन्न करणार्या अनेक गितांपैकी या गिताकडे आकर्षित होत असत, आणि ते गीत होतं, ‘कटोंग बाबा कटोंग, साहेब कटोंग, रारी कटोंग कटोंग’. त्याचा अर्थ होतो,‘कापा बाबा कापा युरोपियनांना कापा, युरोपियन लोकांनी खांडोळी करा’.‘कटोंग बाबा कटोंग, साहेब कटोंग कटोंग, रारी कटोंग कटोंग’.
आज सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून त्यांचं हे व्याख्यान प्रसारीत होणार आहे. आकाशवाणी समाचार औरंगाबाद या युट्युब चॅनेलवरही श्रोत्यांना हे व्याख्यान ऐकता येईल.
****
हवामान -
येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या काळात उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील तर दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
****
0 notes