#महाराष्ट्र राज्य मंडळ
Explore tagged Tumblr posts
Text
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ३१ जानेवारी, २०२५ पर्यंत साहित्य पाठविण्याचा कालावधी - महासंवाद
मुंबई दि. 23 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2025 या वर्षासाठी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, अशा नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नवलेखकांनी दि. 1 ते 31 जानेवारी, 2025 या कालावधीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत मुंबई येथे आपले साहित्य पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताचे नवे कॅग अर्थात नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून के. संजय मूर्ती यांनी आज पदाची शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं आयोजित औपचारिक समारंभात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, मूर्ती यांना शपथ दिली. भारताचे चौदावे कॅग गिरीश चंद्र मुर्मू काल सेवानिवृत्त झाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या गयाना दौऱ्यावर असून, ते आज गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करणार आहेत. तसंच तिथल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधणार आहेत. पंतप्रधान गयाना आणि इतर कॅरेबियन देशांच्या क्रिकेटपटूंचीही भेट घेणार असून, गयाना मधल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत. गयानामधल्या भारतीय संस्कृतीवर आधारित सरस्वती विद्यानिकेतन शाळेला देखील पंतप्रधान भेट देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर उपस्थित होते.
****
विकसनशील देशांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहमती दर्शवलेल्या आश्वासनांची पूर्तता विकसित देशांनी करावी, असं आवाहन, भारतानं काल कॉप 29 या हवामानविषयक जागतिक परिषदेत केलं. विकसित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं, त्यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले अनियमित बदल घडून येत आहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका विकसनशील देशांना सहन करावा लागतो. विकसनशील देशांतल्या लोकांचं जगणं आणि आयुष्य, यामुळे धोक्यात येत असल्याचं भारतानं कॉप 29 मधल्या उच्चस्तरीय मंत्री परिषदेत निवेदनाद्वारे सांगितलं.
****
प्रतिरोधक संसर्गासाठी असलेल्या नॅफिथ्रोमायसिन या पहिल्या स्वदेशी प्रतिजैविक औषधाचं अनावरण, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. जगभरात दरवर्षी २० लाखांहून अधिक मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या औषध- प्रतिरोधक असलेल्या न्यूमोनिया आजाराविरूद्ध, नॅफिथ्रोमाइसिनची तीन दिवसीय उपचार पद्धती उल्लेखनीय ठरेल, असं सिंग यांनी यावेळी सांगितलं. मेड इन इंडिया असलेलं नॅफिथ्रोमायसिन अँटीबायोटिक हे जैवतंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिलच्या समर्थनाने विकसित करण्यात आलं असून मिकनाफ या नावाने ते बाजारात आणण्यात आलं आहे. प्रतिजैविक प्रतिकार-एएमआर चा सामना करणारं हे देशातलं पहिलं स्वदेशी विकसित प्रतिजैविक आहे.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीच्या उद्घाटन समारंभात काल प्रसारभारतीच्या ओटीटी मंचाचा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हस्ते प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते. वेव्ज नावाच्या या मंचावर अभिजात आणि समकालीन अशा दोन्ही प्रकारच्या कार्यक्रमांचा संगम झालेला दिसून येईल. रामायण, महाभारत, शक्तिमान अशा पूर्वीच्या लोकप्रिय कार्यक्रमांचा आस्वाद प्रेक्षकांना पुन्हा घेता येईल. भारताच्या भूतकाळाशी सांस्कृतिक आणि भावनिक नातं घनिष्ट करण्याच्या उद्देशानं यातल्या कन्टेन्ट म्हणजे आशयाची निवड करण्यात आली आहे. विविध भाषांमधल्या वाहिन्यांवरच्या बातम्यांबरोबरच मनोरंजन, चित्रपट, दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम आणि खेळ असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम या मंचावर उपलब्ध असतील.
****
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नियुक्त संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतरचा अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केला जाईल, असं समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी सां��ितलं. या समितीनं नऊ ते १४ नोव्हेंबर दरम्यान गुवाहा��ी भुवनेश्वर, कोलकाता, पटना, लखनौचा दौरा करून वक्फ सुधारणा विधेयकाचा अभ्यास केला होता.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होतील असं मंडळानं कळवलं आहे. दहावीच्या परीक्षा १८ मार्च रोजी संपतील तर बारावीच्या परीक्षा चार एप्रिल रोजी संपणार आहेत.
****
चीनमध्ये शेनझेन इथं सुरू असलेल्या चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, मालविका बनसोड यांनी महिला एकेरीच्या आणि लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या उप -उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत आज लक्ष्य सेनचा सामना डेन्मार्कच्या रासमस गेम्के सोबत, पी व्ही सिंधुचा सामना सिंगापूरच्या येओ जिया मिन बरोबर, तर मालविकाचा सामना थायलंडच्या सुपानिडा काटोथोंग सोबत होणार आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना उद्यापासून पर्थ इथं सुरु होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
Text
कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न
शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न झाला. लाइव्ह व्हिडीओ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य. माध्य. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर विभागीय मंडळ, लातूरचे सुधाकर तेलंग व शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग, लातूर चे डॉ. गणपतराव मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/class-10th-12th-exam-time-table-announced/
0 notes
Text
इंग्रजी माऊली | इंग्रजी वैखरी
शूद्रांना उद्धारी मनोभावे ॥
इंग्रजी माऊली | नाही मोंगलाई
नाही पेशवाई । मूर्खशाही ॥
इंग्रजी माऊली । देई सत्य ज्ञान
शुद्राला जीवन । देई प्रेमे ॥
इंग्रजी माऊली शूद्रांना पान्हा पाजी
संगोपन आजी । करतसे ॥
इंग्रजी माऊली तोडते पशुत्व
देई मनुष्यत्व । शूद्रलोका ॥
(संदर्भ - सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
- द टाइग्रेस मिल्क
0 notes
Text
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला ��हे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधारक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्लाइड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ��� इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्स��ॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन्सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल्गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत. पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विका�� विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी क��्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात. लाभ: १०% आरक्षण तसेच ५० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते. लाभ: १००% शिक्षण शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
0 notes
Link
महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2023 का परिणाम 2 जून, 2023 को दोपहर 1:00 बजे घोषित किया गया। परिणाम महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्चतर माध्यमिक शिक्षा मंडळ
0 notes
Text
Sugar Factory Loans| शिंदे फडणवीस सरकारचा धडाकेबाज निर्णय, 'हे' साखर कारखाने ठरणार कर्जासाठी अपात्र
Sugar factory loans| राज्यातील सहकारी साखर कारखाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन्ही हातात हात घालून चालत असल्यासारखे दिसतात. म्हणजे असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांवर जबरदस्त पकड आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकारने साखर कारखान्यांबाबतीत काही निर्णय घेतले आहेत. त्याचा फटका या साखर कारखान्यांना बसू शकतो. तसेच या निर्णयामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. मार्जिन मनी लोन (खेळते भांडवल) मंजुरीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती आणि काही निकष लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम यांच्याकडून महाराष्ट्र शासनातर्फे खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन मंजूर करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळात साखर कारखान्यां वरून सत्ताधाऱ्यांनी विरोधक समोरासमोर येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव तांत्रीक आणि वित्तीय तपासणीसाठी साखर आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या मर्यादेच मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. खेळत्या भांडवलासाठी सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन मंजूरी संदर्भात प्रस्तावावर बैठकीत विचार करण्यात आला. चर्चेअंत��� याबाबत निकष ठरवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. हे साखर कारखाने ठरणार अपात्र यापूर्वी ज्या सहकारी साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) कडून कर्ज घेतले आहे आणि त्याची परतफेड केली नाही अशा कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी अपात्र ठरवण्यात यावे, ज्या सहकारी साखर कारखान्यांनी राष्ट्रीय सहकार विकास निगममार्फत खेळते भांडवली कर्ज घेऊन त्याची परतफेड केलेली नाही अशा कारखान्यांना अपात्र ठरवण्यात यावे, तसेच जे सहकारी साखर कारखाने राज्य शासनामार्फत किंवा बँकेमार्फत खाजगी कंपन्यांकडून भाडेतत्वावर चालवले जातात अशा कारखान्यांना राज्य शासनामार्फत कर्ज उभारणी करण्यासाठी मान्यता देण्यात येऊ नये असे निर्णय या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले. प्रतिक्विंटल 250 रु द्यावे लागणार जर राष्ट्रीय सहकार विकास निगमने सहकारी साखर कारखान्यांना कर्ज दिलं नाही तर अशा सहकारी साखर कारखान्यांचे प्रस्ताव राज्य शासनास प्राप्त होतात. या सर्व कारखान्यांना FACR (Fixed Asset Coverage Ratio) नुसार उपलब्ध कर्ज मर्यादेत राज्य शासनाने राष्ट्रीय सहकार विकास निगमकडे शिफारस करावी आणि अशी शिफारस करताना साखर विक्रीवर किमान 250 रुपये प्रति क्विंटल वसुली देणे सक्तीचे राहणार आहे. या कर्जाच्या आणि त्यावरील संपूर्ण व्याजाच्या परतफेडीकरीता संपूर्ण संचालक मंडळ वैयक्तीक आणि सामूहिकरित्या जबाबदार राहणार आहे. तसंच जर कर्जाची थकबाकी राहिल्यास एका महिन्यात कारखान्याचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार आहे आणि शासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येणार आहे. Read the full article
0 notes
Photo
#WamanMeshram भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा (ओबीसी) वर्ग मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के संयुक्त रुप से 97वें समात संगर दिन (चवदार तालाब सत्याग्रह) के अवसर पर राज्य स्तरीय बहुजन समाज जन जागृती परिषद. दि.20 मार्च 2023, दोपहर 4 से रात 10 बजे तक.(IST) स्थान - रावसाहेब भिलारे मैदान, काकरतळे, महाड, रायगड, महाराष्ट्र. उद्घाटक - मा.प्रदिप लोखंडे (अध्यक्ष, कुणबी समाजोन्नती मंडळ, महाड, पोलादपूर) अध्यक्षता - मा.वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ति मोर्चा, नई दिल्ली. #BanEVM #EVM_हटाओ_लोकतंत्र_बचाओ #BanEVM_SaveDemocracy #BanEVM_SaveFarmers #EVM_हटाओ_किसान_बचाओ_देश_बचाओ https://www.instagram.com/p/Cp9-StqMGrE/?igshid=NGJjMDIxMWI=
#wamanmeshram#banevm#evm_हटाओ_लोकतंत्र_बचाओ#banevm_savedemocracy#banevm_savefarmers#evm_हटाओ_किसान_बचाओ_देश_बचाओ
0 notes
Text
मधुमक्षिका पालकांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई, दि.20 : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या Madhukranti.In/nbb या मधुक्रांती पोर्टलला या वेबसाईटवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्त्रोताचा शोध घेण्याच्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
वाशिम दौऱ्यासाठी पंतप्रधानांचं आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास नांदेड इथल्या श्री गुरूगोविंदसिंगजी विमानतळावर आगमन झालं.त्यानंतर तिथून ते विशेष हेलिकॅप्टरने पोहरादेवीकडे रवाना झाले. यावेळी भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे तसंच माजी खासदार प्रतापराव चिखलीकर, पोलिस महासंचालक बिपीन कुमार सिंग आदींसह जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्थानिक नेत्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज सकाळी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा कालच नियोजित होता मात्र विमानात झालेल्या बिघाडामुळं ते काल येऊ शकले नाहीत.
****
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई ,नाफेड आणि एन सी सी एफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं २०२४-२५ या वर्षात, केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात मुग, उडीद आणि सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी गेल्या एक तारखेपासून पासून सुरु करण्यात आली आहे मात्र, प्रत्यक्षात मुग, उडीद खरेदी येत्या १० तारखेपासून तर सोयाबीन खरेदी येत्या १५ तारखेपासून पासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ११, बीड - १६, धाराशिव - १५, जालना - ११, लातुर - १४, परभणी - ८, हिंगोली - ९, तर नांदेड जिल्ह्यातल्या १४ केंद्रांवर नोंदणी करता येणार आहे. मुगाचा हमीभाव ८ हजार ६६२ रुपये प्रति क्विंटल उडीदाचा ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल तर सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल इतका निश्चित करण्यात आला असून शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करुन घ्यावी असं, आवाहन पणन महासंघानं केलं आहे.
****
हरियाणा इथं विधानसभा निवडणुकीच्या सर्व ९० जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली असून ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालेल. २ कोटी ३ लाखांहून अधिक मतदार १ हजार ३१ उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंत हरियाणात सरासरी १० टक्के मतदान झालं आहे. दरम्यान, हरियाणातील मतदारांनी, विशेषत: युवा ��र्गानं अधिकाधिक संख्येनं आपला पहिला मतदानाचा हक्क आवर्जुन बजावावा. असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समाज माध्यमावरील आपल्या संदेशाद्वारे केलं आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील खोकसा गाव परिसरात काल रात्री पुन्हा एकादा भुकंपाचा सौम्य हादरा बसला. गुजरातमधल्या गांधीनगरच्या भुकंपमापक यंत्रात दोन पूर्णांक दोन रिश्टर स्केल इतकी भुकंपाची तिव्रता नोंदवली गेली असून यामुळं परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली. या परिसरात येणारा आवाज आणि त्यातून जमीनीत कंपने निर्माण होत असल्यानं गावकरी मात्र रस्त्यावर आणि सुरक्षितस्थळी रात्र जागून काढत आहेत.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा उद्या रविवारी छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. शहरातल्या खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेता आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
****
सध्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे द्यायचे नाही, त्याची घोषणा करायचा प्रकार महायुती सरकारनं सुरू केला आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून अतिरिक्त सव्वालाख कोटींची कर्ज मागणी राज्य सरकारनं केली आहे. या घोषणांसाठी त्यांना आठवड्याला पाच ते सहा हजार कोटी खर्च करायचे आहेत. यातून राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती लक्षात येत आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल साताऱ्यात दाखल झाली, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
दरम्यान, येत्या सात ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता इंदापुरात खासदार शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. राज्यस्तरावर काम करणारा नेता आमच्या पक्षात येतोय, याचा विशेष आनंद आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
****
0 notes
Text
महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2022 तारीख वेळ लवकरच येथे महत्वाचे अपडेट तपासा - Msbshse: महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल कधी जाहीर होईल? महत्वाची माहिती येथे वाचा
महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2022 तारीख वेळ लवकरच येथे महत्वाचे अपडेट तपासा �� Msbshse: महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल कधी जाहीर होईल? महत्वाची माहिती येथे वाचा
{“_id”:”628b8db5e1c3f42b0766d499″,”slug”:”maharashtra-board-hsc-result-2022-date-time-soon-check-important-update-here”,”type”:”feature-story”,” status”:”publish”,”title_hn”:”MSBSHSE: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल कधी लागणार? येथे वाचा महत्त्वाची माहिती”,”category”:{“title”:”Education”,”title_hn”:”Education” , “स्लग”:”शिक्षण”}} एज्युकेशन डेस्क, अमर उजाला द्वारे प्रकाशित: देवेश शर्मा अपडेटेड…
View On WordPress
#hsc चा निकाल 2022#hsc निकाल#hsc निकाल 2022 तारीख वेळ#mahresult.nic.in#msbshse#msbshse.co.in#निकाल 2022#परिणाम#बोर्ड निकाल#महाराष्ट्र#महाराष्ट्र hsc निकाल 2022 तारीख#महाराष्ट्र बोर्ड#महाराष्ट्र बोर्ड hsc#महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल#महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल#महाराष्ट्र मंडळ#महाराष्ट्र राज्य मंडळ#महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ#महाराष्ट्राचा एचएससी निकाल 2022#महाराष्ट्राचा निकाल#शिक्षण हिंदी बातम्या#हिंदीमध्ये शैक्षणिक बातम्या
0 notes
Text
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम - तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द
मुंबई दि. १२ : प्रौढ वाङ्मय अनुवादित या प्रकारातील ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकास देण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात येत असून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांनी गठित केलेली परीक्षण समिती प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाने एका शासन निर्णयाद्वारे जाहीर केले आहे. राज्य शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय…
View On WordPress
0 notes
Text
Talathi Bharti 2022: राज्यात ३११० तलाठी पदांसाठी होणार भरती, शासन निर्णय जाहीर
Talathi Bharti 2022: राज्यात ३११० तलाठी पदांसाठी होणार भरती, शासन निर्णय जाहीर
Talathi Bharti 2022: राज्यात ३११० तलाठी पदांसाठी होणार भरती, शासन निर्णय जाहीर Talathi Bharti 2022: तलाठी भरती संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघाच्या मागण्यांसंदर्भात अभ्यास करुन शासनांस व्यवहार्य व अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी नागपूर अन्वये विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. राज्यात तलाठी साझे व मंडळ कार्यालयांसाठी एकूण ३११०…
View On WordPress
#2022#३११०#bharti:#talathi#करियर#जाहीर#जॉब#तलाठी#निर्णय#नौकरी#पदांसाठी#प्रायव्हेट जॉब्स#भरती#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#राज्यात#रोजगार#शासकीय भरती#शासन#शिक्षण#सरकारी नौकरी#होणार
0 notes
Text
प्रकाश कोल्हे यांचा 'ज्ञानदूत' पुरस्काराने सन्मान
प्रकाश कोल्हे यांचा ‘ज्ञानदूत’ पुरस्काराने सन्मान
*शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रकाश कोल्हे ‘ज्ञानदूत’ पुरस्काराने सन्मानित* शिक्षणाचे प्रकाशपर्व सामान्यांच्या जीवनात आणणारे मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेचे संस्थापक श्री प्रकाश सुकदेव कोल्हे यांना २३ व्या इगतपुरी तालुका साहित्य मंडळ, व महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ मुंबई यांच्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात ‘ज्ञानदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात…
View On WordPress
0 notes
Text
ग्रामपंचायत नांदरुख, ग्राम पंचायत आंबडोस व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा सिंधदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने
ग्रामपंचायत नांदरुख, ग्राम पंचायत आंबडोस व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ जिल्हा सिंधदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने
ग्रामपंचायत कार्यालय नांदरुख येथे “मध केंद्र योजने अंतर्गत”जन जागृती मेळावा @मध केंद्र, मधमाश्या पालन योजना@@पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम@@मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम@या अंतर्गत मालवण : २९ सप्टेंबर रोजी मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायत कार्यालय सभागृह येथे मा. साै. राधा वासुदेव वरवडेकर (संरपच ग्रामपंचायत आबडोस) यांच्या अध्यक्षते खाली सपंन्न झाला.यावेळी मेळाव्याचे उद्घाटक…
View On WordPress
0 notes