#शिक्षण हिंदी बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
कांदा निर्यातीसाठी किमान मूल्याची अट रद्द-गहू साठवणुकीच्या मर्यादेतही कपात
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकरी नोंदणीसाठीच्या संकेतस्थळाचं लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर
आणि
आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
****
कांदा निर्यातीसाठीची किमान मूल्याची अट केंद्र सरकारनं रद्द केली आहे. कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी प्रतिटन साडे पाचशे अमेरिकी डॉलर मूल्य मर्यादा होती, ही मर्यादा हटवल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारातल्या संधीचा लाभ घेता येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, गव्हाची साठेबाजी तसंच दरवाढ रोखण्यासाठी वितरण व्यवस्थेतले घाऊक तसंच मोठ्या विक्रेत्यांसाठी साठवणुकीची मर्यादा तीन हजार मेट्रिक टनांवरून दोन हजार मेट्रिक टन करण्यात आली आहे. पुढच्या ३१ मार्चपर्यंत ही मर्यादा लागू असेल.
****
मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचं लोकार्पण ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मुंबईत झालं. सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्या��ा उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं. योजनेची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं आणि भित्तीपत्रकाचं प्रकाशनही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी झालं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुंबई डब्बेवाला, चर्मकार संघटना आणि प्रियंका होम्स रियल्टी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. डब्बेवाला आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत पंतप्रधान आवास योजनेतून बारा हजार घरं परवडणाऱ्या दरात उभारली जाणार असून, म्हाडाच्या माध्यमातून ती मंजूर केली जाणार आहेत.
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील दोन हजार ३० सदनिकांच्या संगणकीय सोडतीसाठी येत्या १९ सप्टेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याच दिवशी रात्री बारा वाजेच्या आत अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा अर्जदारांना करता येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव तसंच लातूर दौऱ्यावर येत आहेत. परांडा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडे ११ वाजता मुख्यमंत्र्यांचं लातूर विमानतळावर आगमन होईल, तिथून हेलिकॉप्टरने ते परांड्याकडे प्रस्थान करतील. सायंकाळी सव्वा चार वाजता लातूर मार्गे ते विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. परांडा इथं होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी केलं आहे.
****
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं उपोषणास बसलेल्या राजश्री उंबरे यांच्यावतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राजश्री उंबरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वेरूळ इथल्या शहाजी राजे स्मारकाबाबत बैठक घेण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना निर्देश दिले.
****
हिंदी राजभाषा दिवस आज साजरा होत आहे. हिंदी राजभाषा घोषित झाल्याच्या ७५व्या वर्षानिमित्त आज नवी दिल्ली इथं राजभाषा हीरक महोत्सवी समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या समारंभाचं उद्घाटन होईल. हिंदी राजभाषादिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांचं देशाला उद्देशून संबोधन आज सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित हो��ार आहे.
****
अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर हे शहर आता श्री विजयपुरम म्हणून ओळखलं जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. ऐतिहासिक चोल साम्राज्याचा नौदल तळ या ठिकाणी होता, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक क्रांतिकारक इथं बंदिवासात होते, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारचा ध्वज भारतीय भूमीवर प्रथम इथंच फडकावला होता, याकडे शहा यांनी या संदेशातून लक्ष वेधलं आहे.
****
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचं उत्पादन आणि विक्रीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्यानं, या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबवण्याचे तसंच फिरती पथकं तैनात करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले आहेत.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं उद्या धनखड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरचंही धनखड यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ ते १५ तारखेदरम्यान संविधान महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे काल राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे आणि आमदार आशिष शेलार यांच���या नेतृत्वात मुंबईत आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वात, हिंगोली इथं आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात तर जालना इथं भास्कर दानवे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. राज्यात जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर यासह अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात आली.
दरम्यान, राहुल गांधी यांना धमकी प्रकरणाविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने काल राज्यभर भाजपविरोधात आंदोलन करण्यात आलं. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलतांना, राहुल गांधी यांनी आरक्षण बंदींबाबत कोणतंही विधान केलं नसल्याचा दावा केला.
****
परदेशात गणेशोत्सव कस�� साजरा होतो, याबाबत माहिती आपण जाणून घेत आहोत. ब्रिटनमध्ये साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत जयश्री काशिद यांनी माहिती दिली:
“मातीच्या मूर्ती लंडनमध्ये मिळतात. त्यातल्या बऱ्याच मूर्ती भारतातून आलेल्या असतात. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने अर्थ समजावून जयश्री दंडवते काकू अनेक वर्षापासून पूजा सांगत आहे. दूरवरुन लोक दर्शनाला येत असल्याने प्रसाद हा जेवणासारखा असतो. पूर्णपणे वर्गणीतून हा उत्सव साजरा केला जातो. लंडनपासून अर्ध्या तासावर असलेल्या साऊतंड सी या समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी एक दिवस स्थानिक प्रशासन परवानगी देते. त्या दिवशी आसपासच्या भागातील शेकडो लोक किनाऱ्यावर जमतात. त्यामुळे भारतातच चौपाटीवर विसर्जन सुरु आहे की काय असं एक क्षण वाटून जातं.’’
****
आशियायी हॉकी चषक अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघानं आतापर्यंत चीन, जपान, मलेशिया आणि कोरियाला हरवत उपांत्यफेरी गाठली आहे.
****
लष्करात भरतीचं आमिष दाखवून विविध राज्यातल्या शंभराहून अधिक तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीतल्या एकाला अहमदनगर इथ अटक करण्यात आली आहे. ही टोळी प्रत्येक युवकाकडून सुमारे सात ते आठ लाख रुपये उकळत असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं आज सकाळी दहा वाजता उद्घाटन होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रीय संचार ब्युरो यांच्यावतीनं आयोजित या प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असं आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवी प्रदान सोहळा परवा सोमवारी विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. धनाजी जाधव, कुलगुरु प्रा. ए. लक्ष्मीकांत यांनी ही माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं वाळूजनजीक शिवराई फाट्यावर काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन ��णांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दीड महिन्याच्या मुलासह त्याची आई आणि आजीचा समावेश आहे
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 17 जून रोजी Mahahsscboard.in येथे अधिकृत अद्यतने तपासा - महाराष्ट्र एसएससी निकाल: महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे, मंत्री यांनी माहिती दिली
महाराष्ट्र एसएससी निकाल 2022 17 जून रोजी Mahahsscboard.in येथे अधिकृत अद्यतने तपासा – महाराष्ट्र एसएससी निकाल: महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे, मंत्री यांनी माहिती दिली
एज्युकेशन डेस्क, अमर उजाला द्वारे प्रकाशित: देवेश शर्मा अद्यतनित गुरु, 16 जून 2022 04:13 PM IST बातम्या ऐका बातम्या ऐका MSBSHSE महाराष्ट्र SSC निकाल 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) द्वारे शुक्रवार, 17 जून रोजी महाराष्ट्र SSC निकाल 2022 जाहीर केला जाईल. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल महाराष्ट्र मंडळातर्फे दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. बोर्डाने…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
NCP MLC दावा: शाळा बंद, मुलींची लहान वयात लग्ने यामुळे मुलांना शेतात काम करावे लागले
NCP MLC दावा: शाळा बंद, मुलींची लहान वयात लग्ने यामुळे मुलांना शेतात काम करावे लागले
एज्युकेशन डेस्क, अमर उजाला द्वारे प्रकाशित: देवेश शर्मा अपडेटेड सोम, 17 जानेवारी 2022 12:09 PM IST सारांश औरंगाबादमधील एका आमदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – फोटो: सोशल मीडिया बातम्या ऐका बातम्या ऐका औरंगाबादमधील एका आमदाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. कुपवाडा इथं दोन, त�� तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं सांगीतलं आहे.
****
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यस्त वेळअपत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले. खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
४४ व्या ‘प्रगती’ बैठकीत महाराष्ट्रासह ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७६ हजार ५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.
****
देशभरातल्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र सुधारणांच्या दृष्टीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला प्रतिसाद मिळत असल्याचं, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. बाजारपेठेतल्या गरजा, मागणीशी सुसंगता असणारा अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात २४६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी, तर उत्कृष्ट कामगिरीसाठी नऊ पदवीधर विद्यार्थांना सुवर्ण पदक प्रदान करण्यात आलं.
****
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी आपल्याला साडेतेराच्या आर्थिक विकास दरानं पुढे जावं लागेल. यामुळे आपण केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही, तर आपल्या सर्व समस्याही दूर होतील, असं ते म्हणाले.
****
का��ग्रेसच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्री हे महाराष्ट���राच्या दौऱ्यावर असून, त्यांनी काल राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
****
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक लाभ देण्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तूंचं वाटप सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
आदिवासी क्षेत्रातल्या म्हणजेच पेसा क्षेत्रातल्या भरतीसाठी नाशिकसह राज्यातल्या शेकडो आदिवासींनी काल नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढला. आदिवासी भरती होणार नाही तोपर्यंत आंदोलनं सुरुच राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला. पंचवटीतील तपोवन इथून जिल्हाधिकारी कार्यालय आणि तेथून आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मेार्चात तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने काल शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि ६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
ब्राझीलच्या रिओ दि जानेरिओ इथं झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली. बंगळुरूच्या दक्ष तयालियानं सुवर्ण पदक जिंकलं, तर पुण्याच्या आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराबादच्या बनिब्रता माजी आणि बिहारच्या पाणिनी, या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकं जिंकली.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात खेळणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून, अर्थ मंत्रालय यामाध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
देशात खरीप पिकांच्या पेरणीमध्ये या वर्षी लक्षणीय प्रगती झाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र एक हजार ६५ लाख हेक्टरपेक्षा जास्त असून, तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे एक हजार ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी झाली होती. कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
****
भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सात टक्के दराच्या आधारे बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात २०२४-२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा अंदाज सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत जाईल असं म्हटलं आहे.
****
वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या पाच शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.
****
राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून काल ठाणे इथल्या ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधित पांडे यांनी खोट्या गुन्ह्याच्या धमक्या देणं, पैसे वसुल करणं आणि खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुनामिया यांनी केला आहे.
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाश��क्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं; त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेली अनेक दशकं मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माहेरचा आहेर, मानाचं कुंकू, आज झाले मुक्त मी; अशा मराठी चित्रपटात, तसंच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ या ��ाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.
****
पेरूमधील लीमा इथं सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे जय कुमार, नीरु पाठक, रिहान चौधरी आणि संद्रामोल साबू यांनी काल ४ बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारांत पात्रता फेरी पार केली आहे. यासह भारतीय संघ २० प्रतिस्पर्धी संघांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारतील. ३५ वर्षीय जय शाह, हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.
****
राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
****
गुजरात मध्ये देखील मुसळधार पाऊस होत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरा भागात होत असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 March 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मार्च २०२४ दुपारी १.०० वा.
****
उत्तर अरबी समुद्रामध्ये चाचेगिरी करणाऱ्या ३५ सोमाली चाच्यांना घेऊन भारतीय नौदलाचं आयएनएस कोलकाता हे जहाज आज सकाळी मुंबईत दाखल झालं. या चाच्यांना मुंबईत यलो गेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हे जहाज एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी कारवायांसाठी तैनात करण्यात आलं होतं. आयएनएस कोलकाता जहाजाने प्रक्षेपित केलेल्या ड्रोनचा वापर करून सशस्त्र समुद्री चाच्यांच्या हालचालींची पुष्टी केली होती. सुमारे ४० दिवस चाललेल्या या कारवाईनंतर या चाच्यांनी आत्मसमर्पण केलं.
****
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणात, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या कोलकातासह अन्य ठिकाणच्या मालमत्तांवर, सक्तवसुली संचालनालय - ईडीनं आज छापे मारले. सीबीआयनं लोकपालाच्या निर्देशानुसार मोईत्रा यांच्याविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला होता. 
****
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजलीवाहण्यासाठी आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या तीन महान क्रांतीकारकांना२३ मार्च १९३१ रोजी फासावर चढवण्यात आलं होतं. यानिमित्त आज विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ���्विट संदेशाच्या माध्यमातून या तिघांना आंदरांजली वाहिली असून, देश त्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करत असल्याचं म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारने कांद्यावरची लावलेली निर्यात बंदी पुन्हा अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. याआधी कांदा निर्यात बंदी ३१ मार्चपर्यंत लागू करण्यात आली होती.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रदान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजप लक्षद्वीप इथं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी ही माहिती दिली.
****
अमरावतीची लोकसभेची जागा भाजपा उमेदवार लढवणार हे निश्चित झालं  असून, लवकरच चर्चेअंती उमेदवाराचं नाव घोषित करण्यात येईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार शहरातल्या एसबीओए शाळेच्या वतीने मतदान जनजागृती विषयक तीन स्तरीय उपक्रम राबवले. शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक फेरी काढण्यात आली, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फलकांनी सगळ्यांचं लक्ष ���ेधून घेतलं होत. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेमधून मतदान जागृती विषयी पालकांना आवाहानात्मक पत्रं लिहिली. तसंच शाळेच्या वतीने मतदान जागृती विषयक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.
****
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाची बैठक काल नागपुरात गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थिती, तसंच भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक आर्थिक बाजारातल्या अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेनं डिजिटल पेमेंट, ग्राहक शिक्षण आणि जागरूकता यांमध्ये केलेल्या प्रगती संदर्भात या बैठकीत चर्चा झाली. बँकेच्या वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाला देखील यवेळी मंजुरी दिली असल्याचं आर बी आयनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे.
****
उद्या होळी तसंच परवा सोमवारी रंगांची उधळण करणारा धुलीवंदनाचा साजरा केला जाणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजी नगर शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध रंगांची विक्री करणारी दुकानं सजली आहेत. नैसर्गिक रंग तसंच विविध आकाराच्या  आकर्षित करणाऱ्या पिचकारी खरेदी वर ग्राहकांचा अधिक भर असल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात सगळी दुय्यम निबंधक तसंच सह जिल्हा निबंधक कार्यालयं २९ ते ३१ मार्च रोजी सुरू राहणार आहेत. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन सह जिल्हा निबंधक अधिकारी एस. डी. कल्याणकर यांनी केलं आहे.
****
पिंपरीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या १४व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघ आणि हरियाणाच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघांमध्ये आता अजिंक्यपदासाठी लढत होणार आहे.
****
स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत उपान्त्य फेरीचा सामना आज किंदांबी श्रीकांत आणि तैवानच्या लिन चुन यी यांच्यात होणार आहे. काल झालेल्या सामन्यात श्रीकांतनं तैवानच्या खेळाडुचा २१ - १०, २१ - १४ असा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची अधिक सक्षमतेनं वाटचाल-उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
एक लाखावर उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वाटप
लातूर इथं येत्या २४ तारखेला ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन
नांदेड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस-अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू
आणि
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद
****
देशाच्या अमृत काळात नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल, असं प्रतिपादन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. काल गोंदिया इथं मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटी रूपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातल्या प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ४७ ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
****
संतांचं सान्निध्य असणारी महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे, भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते, असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आळंदी इथं सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवात ते काल बोलत होते. त्यापूर्��ी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली.
****
भारतीय संस्कृती आणि विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचवण्याचं कार्य वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांमार्फत होत असल्याची भावना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. संस्थेतल्या ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी पाच कोटी रुपये निधी दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
****
सरकारने कापूस पणन महासंघाची खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काल मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्य��� जिल्हा समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. कापसाला सात हजार २०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला असताना, खुल्या बाजारात मात्र सहा हजार ३०० रुपये दरानं कापूस विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश शेतकऱ्यांना तातडीनं देण्यात यावे, सीसीआयच्या अटी रद्द कराव्यात, अशा मागण्या वडेट्टीवार यांनी सरकारकडे केल्या आहेत.
****
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक टन इतकं ऊस गाळप झालं असल्याचं, साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. राज्यातले चार साखर कारखाने बंद झाले असून, अवेळी पावसामुळे उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल असा अंदाज कार्यालयानं व्यक्त केला आहे.
****
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गतच्या शिपाई पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. यात मराठीसह गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, उर्दू, आणि कोंकणी आदी भाषांचा समावेश आहे. येत्या २० फेब्रुवारी ते सात मार्च दरम्यान देशभरातल्या १२८ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या गुरूवारी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर दुपारी साडे चार वाजता ही सभा होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी म���ख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर इथं जनसंवा�� दौऱ्यावर येत आहेत. याअंतर्गत ते गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथं जनतेशी संवाद साधणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षातर्फे सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियाना’ अंतर्गत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर गावातल्या नागरिकांशी संवाद साधला. शिक्षक, चर्मकार समाज आणि बॅडमिंटन गटाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मागण्या आणि संकल्पना जाणून घेतल्या.
****
लातूर इथं येत्या २४ तारखेला मराठवाड्यातल्या युवकांसाठी ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयानं काम करण्याच्या सुचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या  मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश विखे पाटील यांनी यावेळी दिले.
छत्रपती संभाजीनगर इथं राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही विखे पाटील यांनी काल संबोधित केलं. ग्रेड पे बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं.
****
नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तसंच अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मुदखेड तालुक्यातल्या पिंपळकौठा इथं वीज पडल्यानं दत्ता वाघमारे या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या उमरी, हिमायतनगर, भोकर, मुदखेड आणि किनवट तालुक्यात रबी पिकांचं मोठ नुकसान झालं. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतकार्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
****
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २२ फेब्रुवारीपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. काल बीड इथं झालेल्या धनगर समाजाच्या इशारा सभेत ही माहिती देण्यात आली. येत्या १७ तारखेला अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी अभिवादन करुन मुंबईकडे जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि उपचारही घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशीप - एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलं. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीनं विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
‘‘या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निकालामुळे यंदा हे विद्यालय राज्यात नंबर वन ठरलं आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे या विद्यालयाचं राज्यभरात कौतुक होत आहे. सराव मेहनत नियमितपणे केल्यास हमखास यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हेच यावरून सिद्ध होतं.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी रवी उबाळे -बीड
****
क्रिकेट
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियन संघानं दिलेल्या दोनशे त्रेपन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना, भारतीय संघ ४४ व्या षटकांत १७४ धावांवर सर्वबाद झाला.
****
स्वयंसहायता समूहातल्या महिलांना सशक्त-स्वावलंबी करणं हे केंद्र शासनाचं ध्येय असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचा काल कराड यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
नांदेड शहरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप होत आहे. शहरातल्या नंदीग्राम सोसायटी भागात या यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. दरम्यान काल वामननगर चौक आणि गोकुळनगर चौक इथं विकसित भारत संकल्प यात्रेनं जनजागृती केली.
****
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात चांदापूर इथं काल दहावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. निवृत्त न्यायमूर्ती बाबुराव तिडके यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करुन या परिषदेला सुरुवात झाली.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल-उपराष्ट्रपतींकडून विश्वास व्यक्त
कापूस खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत-विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक ऊस गाळप
आणि
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २५४ धावांचं आव्हान
****
देशाच्या अमृत काळात नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला आहे. गोंदिया जिल्ह्यात धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटी रूपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातल्या प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनखड यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. धनखड यांनी यावेळी गोंदियातील नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
****
संतांचं सान्निध्य असणारी महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते, असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आळंदी इथं सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवात ते आज बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गोविंददेव गिरी महाराज, बाबा रामदेव, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
****
समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असून भारतीय संस्कृती आणि विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचवण्याचं कार्य संस्थेतल्या विद्यार्थ्यांमार्फत होत असल्याची भावना उप��ुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांच्या हस्ते आज आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्थेच्या 'बंकटस्वामी सदन' विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण करण्यात आलं. संस्थेतल्या ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
****
सरकारने कापूस पणन महासंघाची खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईत आज झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. कापसाला सात हजार २०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला असताना खुल्या बाजारात मात्र सहा हजार ३०० रुपये दरानं कापूस विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश शेतकऱ्यांना तातडीनं देण्यात यावे, सीसीआयच्या अटी रद्द कराव्यात, अशा मागण्या वडेट्टीवार यांनी सरकारकडे केल्या आहे.
****
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गतच्या शिपाई पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. यात मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोंकणी या भाषांचा समावेश असल्याचं मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. येत्या २० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान देशभरातल्या १२८ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरूवारी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी साडे चार वाजता शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
*****
दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या १२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातल्या जनतेशी ते संवाद साधणार आहेत.
****
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक टन इतके ऊस गाळप झालं असल्याचं साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. यात ४२ साखर कारखान्यांचे पाच लाखांपेक्षा अधिक आणि एकूण तीन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. राज्यातले चार साखर कारखाने बंद झाले असून अवेळी पावसामुळे उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल असा अंदाज कार्यालयानं व्यक्त केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भरलेल्या राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आलं. विखे पाटील यांनी यावेळी केलेल्या भाषणात ग्रेड पे बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. संघटनेच्या स्मरणिकचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशीप - एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीनं विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे या विद्यालयाचं राज्यभरात कौतुक होत आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि उपचारही घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
****
नाशिक शहरात विकसित भारत संकल्प यात्रा दुसऱ्या टप्प्यात अंबड गावाजवळ असलेल्या चुंचाळे या कामगार वसाहतीत पाहोचली. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. यावेळी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या उज्वला फुंडकर या भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेनं आपलं मनोगत व्यक्त केलं.
बाईट - उज्ज्वला फुंडकर, जि.नाशिक
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दक्षिण आफ्रिका इथं सुरु असलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघानं पन्नास षटकात सात गडी बाद दोनशे त्रेपन्न धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघाच्या सहाव्या षटकात एक बाद १५ धावा झाल्या होत्या.
****
नांदेड जिल्ह्यातल्या २७ ��ालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुंबईत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात झालेल्या १२८ बालकांच्या तपासणीतून निवडलेल्या या २७ बालकांवर मुंबईच्या बालाजी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
राज्यात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी ठरल्यानं कुपोषणासह बालमृत्यू कमी होण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येतो. या आधारे नांदेड जिल्ह्यात ४५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून दोनवेळा अंगणवाडीतल्या आणि एक वेळा शाळेतल्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
****
यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यात अचानक गारपीट, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. आमदार अशोक उईके यांच्यासह तहसीलदार मीरा पागोरे तसंच महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी केली. सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागपूर, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातही अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताची महात्काकांक्षी सौर मोहिम आदित्य एल - वन हे उपग्रह आज पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-वन पॉईंटवर अर्थात त्याच्या नियुक्त कक्षेत पोहोचणार आहे. आदित्य-एल वन एकदा या "पार्किंग स्पॉट" वर पोहोचलं, की ते पृथ्वीप्रमाणेच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास सक्षम असेल. या सोयीच्या बिंदूपासून ते ग्रहण आणि भूतकाळातही सूर्याला सतत पाहण्यास सक्षम असेल आणि वैज्ञानिक अभ्यास करू शकेल, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं. हे यान दोन सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं होतं.
****
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, संमेलन अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, यावेळी उपस्थित आहेत.
तत्पूर्वी सकाळी पुणे शहरातून नाट्यदिंडी काढण्यात आली. यामध्ये नाट्यकर्मींसह मान्यवर उपस्थित होते.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना यानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्रकार दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या महाराष्ट्र हिंदी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार स सो खंडाळकर सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. 
****
राज्यातल्या जे एन - वन विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. यामध्ये पुण्यातले ९१, ठाण्यात पाच, बीडमध्ये तीन, छत्रपती संभा��ीनगर आणि नांदेडमध्ये प्रत्येकी दोन, तर कोल्हापूर, अकोला, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सोलापूर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. पुणे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर आर. बी. पवार यांनी ही माहिती दिली.
****
राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत तसंच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात नवी दिल्लीत होणार्या राष्ट्रीय परिषदेच्या पुर्वतयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. विभागानं यासंदर्भात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याची सूचना पाटील यांनी केली.
****
ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आज अनामप्रेम मराठवाडा दिव्यांग शिक्षण प्रकल्प संस्थेच्या वतीनं अंध, दिव्यांग, मुकबधीर महिलांना साडी आणि किराणा वाटप करण्यात आलं. ५९ दिव्यांग महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून लातूरच्या दयानंद सभागृहात काल नशामुक्त भारत अभियान आणि संविधान जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातल्या शिक्षकांनी दर गुरुवारी विद्यार्थ्यांना स्वच्छता, व्यसनमुक्ति आणि व्यक्तिमत्वाचे धडे द्यायचे आहेत, तसंच माझी शाळा - सुंदर शाळा हा उपक्रमही राबवायचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक काल अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्राहकांमध्ये आपले अधिकार आणि हक्कांबद्दल सजग करण्यासाठी जनजागृती करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यात नऊ महिन्यात १३ हजार ८०६ जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. जिल्हातल्या सर्व संबंधित महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं केलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या कसोटी संघाच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं २-० अशी आघाडी घेतल्यानं ऑस्ट्रेलियाला पुन्हा पहिल�� स्थान मिळालं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 13 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण;लोकसभेत आज दोन तरुणांची घुसखोरी;लातूरच्या तरुणाचा समावेश
राज्यातल्या आरोग्य विभागाच्या विविध प्रश्नावरून विधानसभेत विरोधक आक्रमक
ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
आणि
केंद्रीय पथकाकडून आज छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव जिल्ह्यात नुकसानाची पाहणी
****
संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्ष पूर्ण झाली. हा दहशतवादी हल्ला मोडून काढताना धारातिर्थी पडलेल्या हुतात्म्यांना आज देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. संसद भवन परिसरात आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
दरम्या��, लोकसभेत आज दोन तरुणांनी घुसखोरी केल्यानं, सदनात एकच गदारोळ झाला. शून्य प्रहराचं कामकाज सुरु असतांना प्रेक्षक दीर्घेतून उभ्या असलेल्या दोघांनी सभागृहात खासदारांच्या बाकांवर उडी मारली, काही खासदारांनी या दोघांना पकडून सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. या दोघांसह संसद भवन परिसरात असलेल्या त्यांच्या साथीदारांनाही सुरक्षा रक्षकांनी अटक करून पुढील तपासासाठी दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केलं. यापैकी एक तरूण लातूर जिल्ह्यातला असल्याचं समोर आलं आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले. चौकशीच्या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल, तसंच संसदेची सुरक्षा अधिक चोख करण्यात येईल, असंही बिर्ला यांनी सांगितलं आहे.
****
विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेतल्या घुसखोरीबाबत माहिती दिली.
यापैकी दोघांनी प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसंच त्यांनी सभागृहातील बाकांवर उड्या मारून अध्यक्षांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तसेच सभागृहात स्मोक कँडल पेटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संसदेत गोंधळ घालणाऱ्या तरूणाचं नाव सागर असल्याचं समोर आलं आहे. तर संसदेबाहेर स्मोक कँडल पेटवणारा अमोल शिंदे हा तरूण महाराष्ट्रातील लातूरचा असल्याचं समोर येत आहे. तसेच त्याच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंग असल्याचं समोर येत आहे. अजून पुढचा तपास त्याठिकाणी चालू आहे.
या घुसखोरांपैकी अमोल शिंदे या लातूर जिल्ह्यातल्या झरी इथल्या तरुणाच्या घरी पोलिस दाखल झाले असून त्याच्या कुटुंबियांची कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेनंतर गावात तणावाचं वातावरण आहे.
****
राज्यातल्या आरोग्य विभागातल्या विविध प्रश्नावरून विरोधकांनी विधानसभेत आज आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार प्रणिती शिंदे यांनी आरोग्य विभागातले विविध प्रश्न उपस्थित केले. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड इथल्या उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. राज्यात आरोग्य व्यवस्था ढासळल्याचा आरोप करत, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी दिलेल्या उत्तरावर समाधान न झाल्यानं, विरोधकांनी सभात्याग केला.
****
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधानसभेत काल सुरू झालेली चर्चा आज पुढे सुरू झाली. आशिष शेलार, राजेश टोपे, नाना पटोले, छगन भुजबळ, भास्कर जाधव आदी मान्यवर सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेत, आपली मतं मांडली.
****
राज्यातील हलाल उत्पादनांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. हलाल प्रमाणपत्रावर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली असून महाराष्ट्रातही अशी बंदी आणावी अशी मागणी शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली, या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिले.
****
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ रक्तपेढयांमध्ये रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र-ॲलिकॉट मशीन येत्या महिन्याभरात बसवण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. राज्यात ३१ रक्तपेढ्यांपैकी सध्या फक्त ८ रक्तपेढ्यांध्ये तसंच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रुग्णालयांपैकी फक्त ३ ठिकाणी ॲलिकॉट यंत्र उपलब्ध आहे.
****
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. खतरनाक, हमाल दे धमाल, थरथराट, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, आदी मराठी चित्रपटांसह नायक, सिंघम यासह अनेक हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्राचं अपरिमित नुकसान झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
****
डॉ. मोहन यादव यांनी आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तर छत्तीसगढचे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय यांनी आज शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे इतर ज्येष्ठ नेते, यावेळी उपस्थित होते.
****
संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भात केंद्रीय पथकाने आज छत्रपती संभाजीनगर, धाराशिव तसंच सोलापूर जिल्ह्यात पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात मोहहिरा, बोनवाडा, खांबखेडा, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर तसंच धनवट या गावात पाहणी करून, पथकाने कापूस, तूर आणि मका पिकांचं झालेलं नुकसान जाणून घेतलं.
धाराशिव तालुक्यातल्या ताकविकी आणि करजखेडा या गावात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. खरीप हंगामात सोयाबीन पेरणी, खर्च, जनावरांच्या चाऱ्याची सोय यासंदर्भात या पथकाने माहिती घेतली.
सोलापूर जिल्ह्यात या पथकाने माळशिरस तालुक्यात सुळेवाडी इथं शेती पिकाची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या नियोजित क्रीडा विद्यापीठासाठी कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. क्रीडा विद्यापीठ अनुषंगिक बाबींची शिफारस करणं, क्रीडा विद्यापीठ अंतर्गत अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी शिफारस करणं अशी या समितीची कार्यकक्षा असणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रा धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या ७१ गावांमध्ये पोहोचली असून, गावागावात नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जनजागृती या माध्यमातून होत आहे. गु��हाळ्ळी गावात नागरिकांनी आपल्याला मिळालेल्या लाभांची माहिती दिली.
बाईट - सचिन गोडखे आणि
****
विकसित भारत संकल्प यात्रा आज लातूर जिल्ह्यात अहमदपूर, औसा, चाकूर, जळकोट, निलंगा तालुक्यातल्या विविध गावांमधून मार्गक्रमण करत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल परिसरात आज ही यात्रा पोहोचली. नागरिकांनी केंद्र सरकार च्या विविध योजना जाणून घेतल्या.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात निमटोक इथं या यात्रेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य विषयक आणि कृषी विषयक माहितीत ग्रामस्थांनी विशेष रस दाखवला.
****
'विकसित भारत संकल्प यात्रा' उद्या परभणी जिल्ह्यात येणार आहे. जिल्ह्यातील वागदरा, मालेवाडी, बनवस, गिरधरवाडी, सूरपिंपरी, तामसवाडी, चारठाणा, धनेगाव आणि निपाणी टाकळी या गावात यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात आज रस्ता अपघातात दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले. माजलगाव रस्त्यावर भेंडेखुर्द फाट्याजवळ आज पहाटे हा अपघात झाला. हे सर्वजण प्रवास करत असलेल्या चार चाकी गाडीने ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या सर्व विभागात कार्यरत असलेल्या यंत्रसामुग्री तसंच वाहनांचं आज दिमाखदार पथ संचलन करण्यात आलं. महानगरपालिकेची कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता शहरवासियांना माहिती व्हावी, या उद्देशाने प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे पथसंचलन करण्यात आलं.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या नव्या इमारतीचं येत्या रविवारी २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं.  नवी दिल्ली इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम वेळेआधी पूर्ण झालं आहे. या इमारतीसाठी राबणाऱ्या कामगारांचा सत्कार पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं.  
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात आज सिडनी इथं द्विपक्षीय बैठक झाली. उभय नेत्यांनी भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि बळकट करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं. संरक्षण, सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, शिक्षण, स्थलांतर आणि दोन्ही देशांच्या लोकांमधले संबंध या विषयांवर सहकार्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
***
जम्मू-काश्मीरमधील पाकल दुल प्रकल्पाच्या क्रूझर वाहनाला किश्तवाडमध्ये झालेल्या अपघातात सात जण ठार तर दोन जखमी झाले आहेत. कामगारांना घेऊन जाणारे एक क्रूझर वाहन रस्त्यावरून घसरलं आणि धरण प्रकल्पाच्या जागेजवळ खोल दरीत पडल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे. जखमींना किश्तवाड आणि डोडा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
                                    *** राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या झारखंड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी आज देवघर येथील बाबा वैद्यनाथ धाम मंदिरात दर्शन घेतलं. यानंतर राष्ट्रपती रांचीला रवाना झाल्या. त्या रांची इथल्या परमवीर चक्र पुरस्कार विजेते अल्बर्ट इक्का यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि राजभवनात आदिवासी समाजातील लोकांशी संवाद साधतील. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राजधानी रांची इथं झारखंड उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होणार आहे.                                      ***
हिंदी सिनेमा आणि मालिकेतील अभिनेते नितिश पांडे यांचं काल नाशिक जिल्ह्यात इगतपुरी इथं निधन झालं. ते ५१ वर्षांचे होते. पांडे हे इगतपुरी इथं एका हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले असता ते एका खोलीत बेशुद्धाअवस्थेत आढळून आले. त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असून पुढील तपास सुरु असल्याचं इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सांगितलं आहे. पांडे यांनी बधाई हो, ओम शांती ओम, दबंग - २, खोसला का घोसला आदी चित्रपटांत तसंच अनुपमा या लोकप्रिय मालिकेत भुमिका साकारली होती. 
***
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरच्या मागणी विरोधात उद्या अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी इथं शेतकरी जागर मंचाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतकरी जागर मंचाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची मागणी करू नये तसंच शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याचे निर्देश दिले होते, मात्र बँकांकडून हे निर्देश पाळले जात नसल्यानं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या मोर्चाची शासनानं दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मंचाच्या वतीनं देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
हज यात्रेसाठी जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांना सोसावा लागणारा अतिरीक्त खर्च कमी करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी, केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री स्मृती ईराणी, अल्पसंख्याक केंद्रीय सचिव, हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य अल्पसंख्याक मंत्री यांच्याकडे जलील यांनी एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. या पत्रात विमान कंपन्यांच्या कारभाराबाबत देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 
***
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारी चित्रफीत टाकण्यात आल्याच्या निषेधार्थ आज औरंगाबाद इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरातल्या क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. भाजपचे ��ार्यकर्ते राजू वानखेडे, हर्षवर्धन कराड यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी निषेधाचे फलक झळका��त घोषणाबाजी केली.
                                    *** नवी मुंबईतील खारघर इथं सिडकोनं उभारलेल्या गोल्फ कोर्सचं रूपांतर आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स मध्ये करण्यात येत आहे.
//************//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 15 March 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १५ मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परदेशात केलेल्या वक्तव्याच्या मुद्द्यावरुन झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं. लोकसभेत के��द्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हा मुद्दा उपस्थित करताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहाच्या मधोमध येऊन गदारोळ केला. अदाणी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय ��मिती गठित करण्याची मागणी करत हे सदस्य गोंधळ घालू लागले, त्यामुळे सभागृह अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज स्थगित केलं. सभागृह हे चर्चेसाठी आहे एकमेकांच्या चुका काढण्यासाठी नाही असं सांगून अध्यक्षांनी सदस्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. तर गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याची मागणी गोयल यांनी केली आहे.
***
विधानसभा सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आज सहा पैकी केवळ एका लक्षवेधीवर चर्चा झाली, इतर लक्षवेधी पुढे ढकलण्याची नामुष्की आली. मंत्र्यांच्या अनुपस्थितीचे प्रकार वारंवार होत असल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. मंत्री व्हायला पुढे - पुढे करता मग सभागृहात का उपस्थित रहात नाही असा सवाल करुन मंत्र्यांना विधीमंडळाच्या कामकाजात कोणताच रस नाही, विधीमंडळाची प्रतिष्ठा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत असल्याचा आरोप पवार यांनी केला. तसंच संसदीय कार्यमंत्री सुध्दा सभागृहात कायमच अनुपस्थित असतात, त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावे, असंही पवार म्हणाले.
***
किसान सभा मोर्चा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी यावं असा पवित्रा माजी आमदार जे. पी. गावित यांनी घेतला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी गावित यांच्या नेतृत्वात किसान मोर्चा नाशिकहून मुंबईच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. सरकारनं किसान सभेसोबतची आजची नियोजित बैठक काल रात्री उशिरा रद्द केली, त्यामुळे आज आंदोलकांनी बैठकीला जाण्यास नकार दिला. संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीला सरकारनं प्राधान्य दिलं, पण शेतकऱ्यांच्या वेदनेकडे बघायला सरकारला वेळ नाही, अशी नाराजी गावित यांनी व्यक्त केली आहे. चर्चा झाली नाही तर पालघर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करून सरकारचा निषेध करु, तसंच त्यापुढेही बोलणी केली नाही, तर मुंबई बंद करणार असल्याचा इशारा आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.
***
राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज सकाळी पुन्हा सुनावणी सुरु झाली. या सुनावणी दरम्यानस राज्यपालांच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादा दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या काही कृतींबाबत आक्षेप नोंदवले.
***
अहमदनगर जिल्ह्यात एन्फ्लूएंझा विषाणूची लागण होऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या  एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या विषाणूचा राज्यातला हा पहिला बळी असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं. हा तरुण छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असून अहमदनगरच्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गेल्या आठवड्यात तो अलिबागला फिरण्यासाठी गेला होता, तिथून ��ल्यानंतर तो आजारी पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते समीर खख्खर यांचं आज निधन झालं. ते  सत्तर वर्षांचे होते. काल त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ या लोकप्रिय मालिकेतील खोपडी या व्यक्तिरेखेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.‘पुष्पक’,‘शहेनशाह’,‘रखवाला’, ‘दिलवाले’, ‘राजा बाबू’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात श्रीक्षेत्र पैठणमध्ये आज सकाळी प्रथा आणि परंपरेनुसार गोदावरी नदीचं वाळवंट आणि यात्रा मैदान भागात शेकडो दिंड्यातील फडांवर काल्याचं कीर्तन करून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं कालाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी सूर्यास्तसमयी नाथ समाधी मंदिरात नाथ वंशजांच्या हस्ते तर संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीनं नाथ मंदिर महाद्वारा बाहेरील परिसरात दहीहंडी फोडून या सोहळ्याची सांगता होणार आहे.
***
बीड इथं नेहरू युवा केंद्राच्यावतीनं एक दिवसीय जिल्हा युवा उत्सवाचं आयोजन काल करण्यात आलं. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते या उत्सवाचं उद्घाटन झालं. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त युवकांमध्ये देशभक्तीची भावना आणि मूल्य जोपासणं, राष्ट्र शक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृद्धिंगत् करणं आणि युवा कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून देणं या उद्देशानं या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
//************//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकलपीय अधिवेशनाच्या पहिला टप्प्याचा आज समारोप होत आहे. दुसरा टप्पा १३ मार्चला सुरु होणार आहे. 
राज्यसभेत आज विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. कामकाज सुरु होताच आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समितीने दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. विरोधी पक्षनेते मलिकार्जुन खरगे यांनी दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर केलेली टिप्पणी काढून टाकण्याचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस, आप आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी समुहाच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती चौकशीची मागणी करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज आधी काही वेळासाठी, त्यानंतर १३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं.
***
२०२४-२५ पर्यंत संरक्षण निर���यात पाच अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळूरूमध्ये आज १४ व्या ‘एरो इंडिया शो’चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारत लवकरच जगातला सर्वात मोठा संरक्षण उत्पादन देश बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात संधी निर्माण होतील, असं पंतप्रधान म्हणाले.
द रन वे टू अ बिलियन अपोर्च्युनीटी, अर्थात लक्षावधी संधींकडे नेणारा मार्ग, अशी यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. पाच दिवसांच्या या हवाई प्रदर्शनात उपस्थितांना स्वदेशी संरक्षण सा��ग्री, तंत्रज्ञान आणि लढाऊ विमानं पाहण्याची संधी मिळणार आहे. 
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९८वा भाग असेल. कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जी ओ व्ही किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
***
राज्यातल्या सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलींना, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. मुलींना कराटे, मुष्टियुद्ध, किक-बॉक्सींग आदी प्रकार शिकवण्यात येणार असून, ३१ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत.
***
येत्या दोन वर्षात राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे आणि त्यात काम करणारे शिक्षक, कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी स्वमालकीच्या शासकीय इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यात काल शासकीय मुलींच्या वसतीगृह, आश्रमशाळांचं लोकार्पण आणि विविध विकास कामांचं भुमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. पुढील वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या वर्गांत मराठी, हिंदी, इंग्रजी या अनिवार्य भाषांसोबतच, स्थानिक आदिवासी बोली भाषेतून शिक्षण देण्याची योजना असल्याचं गावित यांनी सांगितलं.
***
औरंगाबाद - जळगाव महामार्गावर हर्सुल इथं रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढण्यास आज सकाळी सुरुवात झाली. अपर तहसिलदार विजय चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी याठिकाणी उपस्थित आहेत. या कारवाईसाठी या मार्गावरील वाहतूक १६ फेब्रुवारीपर्यंत, हर्सूल टी पॉइंट इथून आंबेडकर नगर, पिसादेवी रोड मार्गे, सावंगी बायपास अशी वळवण्यात आली आहे. सिल्लोड - फुलंब्रीकडून हर्सुलकडे येणारी वाहतूकही याच मार्गाने वळवण्यात आली आहे.
पैठण इथंही संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा महोत्सवाच्या अनुषंगानं यात्रा मैदानवरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
***
औरंगाबाद इथं काल राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलन पार पडलं. भटक्यांचं भावविश्व आणि ने��ॉडिक ट्राईब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या या संमेलनाचं उद्धाटन, साहित्यिक विजया मारोतराव यांच्या हस्ते झालं. भटक्या-विमुक्तांसाठी आयोग, इतर मागास वर्गीयांची जातीनिहाय जनगणना आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
***
ओखा- रामेश्वरम -ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस तीन फेऱ्यासाठी सालेम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. १४, २१ आणि २८  फेब्रुवारीला, ओखा इथून सुटणारी गाडी ओखा ते सालेम अशी धावेल. १७ आणि २४ फेब्रुवारी तसंच तीन मार्चला रामेश्वरम इथून सुटणारी गाडी, रामेश्वरम ते सालेम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून, ती सालेम ते ओखा अशी धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
��्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला वर्ध्यात प्रारंभ
राज्य सरकार कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, तर 'एक राष्ट्र-एक भाषा' ही घोषणा मुळीच मान्य नसल्याची संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची स्पष्टोक्ती  
विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी
विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय, भारतीय जनता पक्ष- महायुतीचाही पोटनिवडणूक पूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्धार   
भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना युती विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसा करणार
मराठा समाजाच्या तरुणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून आरक्षण देण्यासंदर्भातला शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडून रद्द
जालना जिल्ह्यात आभासी चलनाच्या फसवणूक प्रकरणात चार संशयितांना अटक
आणि
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, आतापर्यंत १३ सुवर्ण, १७ रौप्य, १२ कांस्य पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई
****
राज्य सरकार कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. वर्धा इथं आयोजित शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. समाजात होणाऱ्या विकास कामांचा उल्लेख साहित्यकांनी आपल्या रचनांमध्ये करण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्‍याचे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्‍याक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, स्‍वागताध्‍यक्ष दत्‍ता मेघे यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ हिंदी कवी आणि समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, आमदार डॉ. विश्‍वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्षा प्राध्यापिका उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची यावेळी उपस्थिती होती. सरकारनं चुकीचं काम केलं तर साहित्यिकांना कान धरण्याचा अधिकार असल्याचं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले…
‘‘सर्व सामान्यांच्या हिताचं जपणूक करणारं राज्य सरकार असलं पाहिजे. आणि म्हणून आ��्ही जेंव्हा आम्ही चांगले निर्णय घेऊ नक्की त्या ठिकाणी आपण आमच्या पाठीवर शाबासकीची थाप जेंव्हा द्याल, आणि साहित्यिकांकडून जेंव्हा ही थाप मिळते तेंव्हा आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. आपण चांगलं काम करु लागतो आणि जेंव्हा सरकारकडून राज्यकर्त्यांकडून एखादा चुकीचा निर्णय झाला तरी देखिल आपल्याला वरिष्ठांना कान धरण्याचा देखिल अधिकार आहे.’’
ग्रामीण भाषा, बोली भाषा संवर्धनासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. राज्यातल्या थोरामोठांच्या यशोगाथा अधिक व्यापक स्वरूपात पुढे आणता येतील का, चांगल्या परदेशी साहित्याचा अनुवाद केला जाऊ शकेल का, अशा मुद्यांकडे त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा देण्याची मागणी मान्य करण्यात आल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
'एक राष्ट्र-एक भाषा' ही घोषणा आम्हास मुळीच मान्य नाही, असं संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितलं. एक राष्ट्राला विरोध नाही, मात्र प्रादेशिक भाषा आणि भाषिक संस्कृतीतून राष्ट्रीय ऐक्य साधता येईल, असं ते म्हणाले. राज्यघटनेनं हिंदी ही संघराज्याच्या व्यवहारासाठी निवडलेली भाषा आहे, म्हणून महाराष्ट्रात व्यावहारिक भाषा म्हणून मराठीला वगळून हिंदी वापरता येणार नाही. हिंदी ही केवळ एकटी राष्ट्रभाषा नसून, देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांनाही राष्ट्रभाषांचा दर्जा प्राप्त असल्याचं ते म्हणाले. तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या, सामर्थ्यशाली एकराष्ट्रीयत्त्व निर्माण करण्याचा उद्देश सफल करण्याकरता प्रादेशिक मातृभाषांची वाढ करणारं साहित्य कसं निर्माण होईल, या वक्तव्याकडे बोट दाखवत चपळगावकर यांनी, सर्व प्रादेशिक भाषांत प्रसिद्ध होणारं साहित्य मराठीमध्ये, आणि मराठीतलं साहित्य सर्व भाषांमध्ये अनुवादित होण्यावर भर दिला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमावादाच्या पार्श्वभूमीवर पाटसकर निवाड्याप्रमाणे दोन भाषिक राज्यांच्या सीमा आखल्या जाव्यात, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. दररोजच्या व्यवहारात प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या मराठीचा अभिमान बाळगावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. वाढती असहिष्णूता, बदलतं सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव या विषयांवर आपली भूमिका संमेलनाध्यक्ष या नात्यानं न्यायमूर्ती चपळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केली.
****
विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा तीन हजार ३८२ मतांनी विजय झाला. लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मतं, तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मतं मिळाली. विजयासाठीचा कोटा पूर्ण होण्यासाठी तब्बल ३० तास मतमोजणीची प्रक्रिया चालली. राज्यातल्या विधान परीषदेच्या पाच जागांपैकी तीन जागां��र महाविकास आघाडी, एका जागेवर भाजप तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
दरम्यान, औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजय मिळवणारे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विक्रम काळे यांनी, काल औरंगाबाद मधल्या विविध शाळांना भेट देऊन शिक्षकांशी संवाद साधत, निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. शिक्षकांच्या हक्कासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.  
****
विधानसभेची कसबा आणि चिंचवड मतदारसंघांची पोटनिवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं काल जाहीर केला. कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार हे आज जाहीर करु असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले –
‘‘महाविकास आघाडीची तिनही पक्षांची आमची बैठक झाली. पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी - चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघ जे रिक्त झालेले आहेत, त्या ठिकाणचा दोन्ही जागांचा आढावा तिन्ही पक्षांच्या वतीने घेतला. त्याबाबतीतली अतिशय सकारात्मक चर्चा आमची झाली. आमचे मित्र पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि इतर जे आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. आणि आमचा अंतिम निर्णय याबाबतीतला सगळे मिळून घोषित करु.’’
****
विद्यमान आमदारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यातल्या इतर जागांवर विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केले होते. त्यामुळे या जागा बिनविरोध करण्याचा प्रश्न नाही, असं जयंत पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय निवड समिती विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करेल, त्यानंतर सोमवारी कसबा आणि चिंचवड मतदार संघातले उमेदवार अर्ज दाखल करतील, असं आमदार चंद्रकात पाटील यांनी सांगितलं. ते काल पुण्यात बोलत होते. कसबा विधानसभेची पोटनिवडणूक, महायुतीतल्या सर्व घटक पक्षांनी पूर्ण ताकदीनं लढवण्याचा निर्धार काल झालेल्या घटक पक्षांच्या बैठकीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या दोन्ही जागा बिनविरोध व्हाव्यात अशी सर्वांची भूमिका आहे. यासाठी विरोधी पक्षांना पत्र पाठवली असून त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा असल्याचं, पाटील म्हणाले.
****
विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीला पराभव पत्करावा लागला, त्या पराभवाची कारणमिमांसा करून सुधारणा केली जाईल, तसंच राज्य सरकार जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.  काल वर्धा इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले –
‘‘ज्या काय जागा यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत, त्याची कारणमिमांसा केली जाईल आणि नक्की त्याच्यावर विचार करुन सुधारणा केली जाईल. जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील आपला तो विभाग काम करत आहे. त्याच्यावर विचार नक्की सुरु आहे.’’
****
मराठा समाजाच्या तरुणांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल - ईडब्ल्यूएस गटातून नोकर भरतीमध्ये राज्य सरकारकडून देण्यात आलेली विशेष संधी आणि त्याबाबत काढलेले सर्व शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय लवाद - मॅटनं रद्द ठरवले आहेत. त्यामुळे या शासन निर्णयांच्या आधारे शासकीय सेवेत झालेली भरती बेकायदा ठरणार आहे. त्याचबरोबर २६ जून २०२२, १४ जुलै २०२२ आणि २३ जुलै २०२१ रोजी जाहीर झालेली उमेदवारांची अंतिम यादी देखील लवादाने रद्दबातल ठरवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या चार आठवड्यात आर्थिक मागास प्रवर्गातल्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करावी, अन्य प्रवर्गातली निवड यादी आहे तशीच ठेवावी, असे निर्देशही लवादानं दिले आहेत.
****
येत्या मार्च मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेची प्रवेशपत्रं, महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन, या संकेतस्थळावर सोमवार सहा फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून शाळेच्या स्कूल लॉगिन मधून डाउनलोड करून घेता येणार आहेत. ही प्रवेशपत्रं शाळांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत, अशी सूचना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही वेगळं शुल्क शाळेला घेता येणार नाही. प्रवेशपत्रामध्ये माध्यम किंवा विषय यात काही दुरुस्त्या असतील तर संबंधित शाळेने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्याच्या फोटो, स्वाक्षरी, नाव, जन्मतारीख आणि जन्म स्थळासंदर्भातील दुरुस्त्या या शाळा स्तरावरच करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची असल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात क्रिप्टो करन्सी - आभासी चलनाच्या जीडीसी कॉईन फसवणूक प्रकरातल्या हस्तकासह चार संशयितांना, जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल पुणे इथून ताब्यात घेतलं. संशयितांकडून चार महामगड्या गाड्या, तीन लॅपटॉप, संगणक, नऊ महागडे मोबाईल, असा एकूण दोन कोटी ४४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून जीडीसी काईनमध्ये गुंतवणूक करण्याचं सांगून या आरोपींनी अनेकांची फसवणूक केली असून, पोलिसांनी त्यांच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झालेल्या नातेवाइकांची विविध बँकामधली खाती गोठवली आहेत. या प्रकरणाच्या तपासात आतापर्यंत पाच कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम निष्पन्न झाल्याची माहिती जालना आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक बी.डी. फुंदे यांनी दिली.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची मागणी, उस्मानाबादमधल्या मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे संयोजक युवराज नळे यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशाच्या इतिहासात हा एक मोठा स्वातंत्र्य लढा असून, नवीन पिढी या लढ्याच्या इतिहासापासून अनभिज्ञ आहे, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात या योगदानाचा इतिहास समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. या विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिलीप मालखेडे यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबतचा आदेश काल जारी केला.
****
मध्य प्रदेशात सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. राज्याच्या खेळाडुंनी या स्पर्धेत आतापर्यंत १३ सुवर्ण, १७ रौप्य, १२ कांस्य पदकांसह एकूण ४३ पदकं जिंकली आहेत.
नेमबाजीमध्ये काल मिश्र दुहेरीत १० मीटर एअर रायफल प्रकारात राज्याच्या ऐश्वर्या आणि रणवीरनं सुवर्ण पदक जिंकलं. त्यांनी पश्चिम बंगालच्या अभिनव आणि स्वाती चौधरीचा पराभव केला.
महाराष्ट्राच्या मुलांनी योगासन प्रकारातल्या अखेरच्या दिवशी काल कलात्मक दुहेरी प्रकारात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं.
जिम्नॅस्टिक प्रकारात राज्याच्या आर्यन दवंडेला ऑल राऊंड प्रकारात कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
ॲथलेटिक्समध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत वसईच्या ईशा जाधवने सुवर्ण पदक पटकावलं, तर उंच उडी प्रकारात कोल्हापूरच्या अनिकेत माने यानं कांस्य पदक जिंकलं. भालाफेक प्रकारात शिवम लोहकरेने आणि शंभर मीटर शर्यतीत ऋषी देसां यांनी रौप्य पदक जिंकलं.
राज्याच्या पुरुष खो खो संघानं काल दिल्लीला ३८-२८ असं पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं. सलग पाचव्यांदा राज्याला हा बहुमान मिळाला आहे. महिलांच्या खो खो संघाला अंतिम सामन्यात ओडिशाकडून पराभव झाल्यानं, रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
ग्वाल्हेरमध्ये झालेल्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या नाईशा कौरला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
****
खरीप २०२२ च्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना देण्यात येणारे २०० कोटी रुपये पुढील आठवड्यात अपेक्षित असल्याचं, उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील  यांनी सांगितलं आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य सरकारच्या हप्त्याची रक्कम जमा झाली असून, पुढील तीन  ते चार दिवसात केंद्र सरकारचा हिस्सा प्राप्त होणं अपेक्षित आहे. ही रक्कम मिळताच उर्वरित पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना खरीप २०२२ ची नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार असल्याचं, भारतीय कृषी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी सांगितल्याची माहिती आमदार पाटील  यांनी दिली.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत काल शहरात कुष्ठरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 February 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.
ग्रंथ दिंडीनं शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाला प्रारंभ.
मुंबईवर हल्ला करण्याच्या धमकीच्या ई मेलनंतर प्रमुख धार्मिक स्थळं, पंचतारांकित हॉटेल्स, आणि महत्वाच्या ठिकाणच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ.
विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा विजय.
आणि
गव्हाचं तयार पीठ साडे एकोणतीस रूपये प्रति किलो दरानं विक्री करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
****
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना ‘राज्य अतिथी’चा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वर्धा इथं आयोजित शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी आज त्यांनी ही घोषणा केली. राज्य��चे शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी आणि समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, खासदार, जिल्ह्यातील आमदार, तसंच आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापिका उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी समाजाला भेडसावणारे मुद्दे, त्याविषयी वाटणारी तळमळ आणि सामाजिक जाणीव यातून एक उत्तम आणि जबाबदार साहित्यिक जन्मला येतो अशी भावना व्यक्त केली. राज्य सरकार कायम साहित्यिक मंडळींच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत त्यांनी, समाजात होणाऱ्या विकास कामांचा उल्लेख साहित्यकांनी आपल्या रचनांमध्ये करण्याची अपेक्षा व्यक्त केली. सरकारनं चुकीचं काम केलं तर कान धरण्याचा अधिकार असल्याचं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले –
सर्व सामान्य लोकांच्या हिताचं जपणूक करणारं राज्य सरकार असायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही जेंव्हा आम्ही चांगले निर्णय घेऊ नक्की त्या ठिकाणी आपण आमच्या पाठीवर शाबासकीची थाप जेंव्हा द्याल आणि साहित्यिकांकडून जेव्हा ही थाप मिळते तेंव्हा आणखी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. आपण चांगलं काम करू लागतो आणि जेंव्हा सरकारकडून, राज्यकर्त्यांकडून एखादा चुकीचा निर्णय झाला तरी देखील आपल्याला वरिष्ठांना कान धरण्याचा देखील अधिकार आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी आपल्या मनोगतात विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. नुकत्याच शासन आयोजित साहित्य संमेलनाबाबत बोलताना, असं आयोजन स्वायत्त संस्था यांच्या मार्फत व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
तत्पूर्वी, आज सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीमध्ये विठ्ठल-रुखमाई, विविध संत, छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा आदी महापुरुषांच्या वेशभूषेत विविध शाळांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर संमेलनस्थळी अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देणारा ई मेल राष्ट्रीय तपास यंत्रणा-एन आय ए ला प्राप्त झाल्यानंतर मुंबईतली प्रमुख धार्मिक स्थळं, पंचतारांकित हॉटेल्स, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी स्थळं आदी ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तालिबान या दहशतवादी संघटनेच्या नावानं हा धमकीचा इ-मेल पाठवण्यात आला आहे. यामध्ये मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत एनआयएनं मुंबई पोलिसांना माहिती दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालिबानचा प्रमुख नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानंतर मेल करण्यात आल्याचा दावा इ-मेलमध्ये करण्यात आला आहे.
****
विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचा ३ हजार ३८२ मतांनी विजय झाला. महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांनी ४६ हजार ३४४ मतं घेतली तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना ४२ हजार ९६२ मतं मिळाली. विजयासाठीचा कोटा पूर्ण होण्यासाठी तब्बल ३० तास मतमोजणीची प्रक्रिया चालली.
राज्यातील विधान परीषदेच्या पाच जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडी, एका जागेवर भाजप तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.
****
राज्यातील कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवता यावीत या उद्देशानं राज्य शासन आणि जपानच्या वाकायामा स्टेटमधल्या वाकायामा प्रीफेक्चर कुस्ती महासंघ यांच्यात आज मुंबईत एक सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील मल्लांना तांत्रिक दृष्ट्या सक्षम करणं तसंच ऑलिम्पिक सारख्या विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याच्या हेतुनं तंत्रज्ञानाचं आदान-प्रदान करण्यासाठी या सामंजस्य कराराची मदत होणार असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं.
****
देशातल्या दोन हजार रेल्वे स्थानकांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकानं सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. नवी दिल्लीत आज त्यांनी ही माहिती दिली. ही दुकानं २४ तास खुली राहतील आणि प्रवाशांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करतील, असं ते म्हणाले.
****
गव्हाचं तयार पीठ साडे एकोणतीस रूपये प्रति किलो दरानं विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं, घेतला आहे. येत्या ६ फेब्रुवारीपासून विविध किरकोळ विक्री केंद्रांवर साडे एकोणतीस रूपये किलो दरानं नागरिकांना कणीक उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ- नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघ - एनसीसीएफच्या केंद्रांवर तयार पीठाची विक्री केली जाईल. केंद्रीय बाजारामध्ये यापूर्वीच याच दरानं पीठ विक्री सुरू झाली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी, अन्न अर्थव्यवस्थेतील चलनवाढीच्या दृष्टीनं देशातल्या विविध केंद्राद्वारे केल्या जाणाऱ्या विक्रीचा आढावा घेतला. भारतीय अन्न महामंडळाच्या केंद्रातून नाफेड आणि एनसीसीएफ तीन लाख मेट्रीक टन गहू विक्रीसाठी घेतील असा निर्णयही या संबंधीच्या बैठकीत घेण्यात आला.
****
देशात २९ जानेवारीपर्यंत ३२ कोटी १२ लाख आयुष्मान भारत आरोग्य खाती उघडण्यात आल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात आज त्यांनी ही माहिती दिली. भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत २३ कोटी आयुष्मान कार्ड बनवण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही योजना १० कोटी ७४ लाख कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुरक्षा प्रदान करते.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत आज औरंगाबाद शहरात कुष्ठरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. स्वामी समर्थ प्राथमिक विद्या मंदिर आणि मातोश्री जीवाबेन पटेल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी यावेळी कुष्ठरोग प्रतिज्ञा घेतली. चेहरा लालसर चकाकणारा, तेलकट गुळगुळीत असणे, अंगावर फिकट पाढूंरका लालसर बधीर चट्टे असणे आदी लक्षणे दिसल्यास उपचार घेण्याचं आवाहन डॉ.अभय धानोरकर यांनी केलं.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची मागणी उस्मानाबादमधील मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समितीचे संयोजक युवराज नळे यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशाच्या इतिहासात हा एक मोठा स्वातंत्र्य लढा असून नवीन पिढी या लढ्याच्या इतिहासापासून अनभिज्ञ आहे, त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात या योगदानाचा इतिहास समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
****
औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्याकडे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
काळाच्या ओघातही भारतीय संस्कृती अबाधित - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
वायुसेनेच्या विमानांना मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये अपघात.
इतर मागास प्रवर्गातल्या नागरिकांसाठी घरकुल योजना प्रस्तावित - मंत्री अतुल सावे यांची माहिती.
आणि
आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद.
****
काळाच्या ओघात जगातल्या अनेक संस्कृती नष्ट झाल्या, पण भारतीय संस्कृती अबाधित राहिली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थानमधल्या भिलवाडा जिल्ह्यात मालसेरी डुंगरी इथं भगवान देवनारायण यांच्या एक हजार एकशे अकरावा अवतार महोत्सव झाला, त्यावेळी मोदी बोलत होते. भारताच्या हजारो वर्षांच्या या प्रवासात सामाजिक शक्तीची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरून मन की बात कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ९७ वा भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसार��त करण्यात येणार आहे. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.
****
मध्य प्रदेशातल्या मुरैना इथं आज पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास भारतीय वायुसेनेची सुखोई-३० आणि मिराज-२००० ही दोन लढाऊ विमानं कोसळली. ग्वालियर इथल्या वायुसेनेच्या प्रशिक्षण केंद्राची ही विमानं प्रशिक्षण सरावादरम्यान अपघातग्रस्त झाली. वायूसेना प्रमुखांनी या संदर्भातली माहिती संरक्षण मंत्र्यांना दिली आहे. मुरैना इथल्या अपघातातले दोन वैमानिक सुखरुप असून एकाचा मृत्यू झाला आहे. हवाई दलानं या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. राजस्थानातल्या भरतपूर इथंही एक विमान आज अपघातग्रस्त झालं. हे विमान हवाई दलाचं आहे की लष्कराचं हे अद्याप निश्चित झालेलं नाही. या विमानाचा आकाशातच स्फोट झाला, असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
****
थोर स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं संसद भवनात अभिवादन कार्यक्रम झाला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि इतर खासदार यावेळी उपस्थित होते. लाला लजपतराय देशप्रेम, समर्पण आणि बलिदानाचं प्रतीक होते. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या अभिवादनपर संदेशात म्हटलं आहे. शिक्षण, आरोग्य, संस्कार आणि समाज जागरणासाठी समर्पित लाला लजपतराय केवळ ‘पंजाब केसरी’ नव्हते तर खऱ्या अर्थानं ‘हिंद केसरी’ होते, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात त्यांना अभिवादन करताना नमुद केलं.
****
जी-ट्वेंटी समुहाच्या स्टार्टअप गटाच्या दोन दिवसीय बैठकीला आज हैदराबादमध्ये सुरूवात झाली. केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, जी-२० शेर्पा अमिताभ कांत, स्टार्टअप-२० चे अध्यक्ष चिंतन वैष्णव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, डीपीआयआयटीचे सचिव अनुराग जैन तर जी-२० चे १८० प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. २० सदस्य   देश आणि नऊ विशेष आमंत्रित देश याशिवाय स्टार्टअप आणि गुंतवणूकदार या बैठकीला उपस्थित आहेत.
****
इतर मागास प्रवर्गातल्या नागरिकांसाठी घरकुल योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ते म्हणाले –
अनुसूचित जातीच्या मंड��ींना रमाई योजनेच्या माध्यमातून घरं मिळतात. व्ही जे एन टी च्या लोकांना यशवंतराव चव्हाण या योजनेतून घरं मिळतात. त्याच पद्‌धतीने बऱ्याच दिवसांपासून ओ बी सी ची मंडळी आमच्या मागे होती की आम्हाला पण घरं मिळाली पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही याच्यावर विचार करून प्रस्ताव तयार करतो आहोत की या माध्यमातून त्यांना मिळावी असा आमचा त्याच्यातला प्रयत्न आहे.
****
राज्यातल्या तीन पदवीधर तर दोन शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सांगता आज झाली. या निवडणुकीतल्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता पक्षाचे किरण पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे आणि प्रदीप सोळुंके यांच्यात तिरंगी लढत होत आहे. काळे हे सलग चौथ्यांदा आमदार होण्यासाठी निवडणूक रिंगणात आहेत. औरंगाबाद इथं आज मुकुंदवाडी आणि चिकलठाणा इथं काळे यांच्या प्रचारासाठी फेरी काढण्यात आली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांनी शक्ती पणाला लावली. मंत्री, खासदार, आमदार अन्य नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या. परवा, सोमवारी या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात २२२ मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. मतमोजणी दोन फेब्रुवारीला होणार आहे.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांना पुण्याच्या डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं आदर्श खासदार पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. माजीमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते हा पुरस्कार काल पुणे इथं प्रदान करण्यात आला. संसदेतल्या अधिवेशनात विविध चर्चांतील सहभाग, सभागृहात परिणामकारकरीत्या प्रश्न उपस्थित करून त्याचा केलेला पाठपुरावा, सभागृहात मांडलेली खासगी विधेयकेतील चर्चा या मुद्यांच्या आधारे त्यांना निवडण्यात आलं. मुद्देसूद भाषण, तरुणांना वैचारिक मार्गदर्शन आणि आपल्या मतदारसंघातील विविध सामाजिक आणि लोकोपयोगी कामं या निकषांवरही ‘आदर्श खासदार’ या पुरस्कारासाठी इम्तियाज जलील यांची निवड करण्यात आल्याचं संयोजकांनी सांगितलं. 
****
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून मध्य रेल्वेनं ‘मागणीनुसार रेल्वे’ या श्रेणीमध्ये मुंबई ते सिकंदराबाद दरम्यान एका विशेष रेल्वेची एक फेरी घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे आज मध्यरात्रीनंतर १२ वाजून २० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणार असून मनमाड, औरंगाबाद, नांदेड मार्गे सिकंदराबादला उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता पोहोचणार आहे.
****
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक कादंबरीकार आशा बगे यांना जाहीर झाला आहे. आशा बगे यांच्या ‘भूमी’ या कादंबरीला २००६ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या ७ कादंबऱ्या आणि १२ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. नाशिकच्या कालिदास कला मंदिरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मृतिदिनी १० मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दहा दिवसांपूर्वी एका प्राचार्यांना मारहाण केल्या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यासह महाविद्यालयातल्या पाच अधिकाऱ्यांसह इतर सुमारे चाळीस जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करुन पाच हजार रुपयांचं नुकसान केल्याचं या संदर्भातल्या फिर्यादीत नमुद करण्यात आलं आहे. या प्राचार्याविरुद्ध महिला प्राध्यापिकांनी आपल्याकडे गाऱ्हाणं मांडलं होतं. हा गुन्हा खोटा आहे, असं बांगर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
****
धुळ्याचे माजी आमदार प्राचार्य सदाशिवअण्णा माळी यांच्या पार्थीव देहावर आज धुळ्यामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. माळी यांचं काल रात्री निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून १९७२ ते १९७८ या काळात कुसुंबा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
****
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या २६व्या औद्योगिक आणि व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्ल्यू. संघानं ग्रामीण विभागात सलग चौथं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईत झालेल्या या स्पर्धेत बँक ऑफ बडोदानं शहरी विभागात अजिंक्यपद मिळवलं. एकवीसाव्या महिलांसाठीच्या राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेत पश्चिम रेल्वे संघ अजिंक्य ठरला. ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे स्पर्धेतले सर्वोत्तम खेळाडू ठरले. विजेत्या संघांना कामगार कल्याण चषक आणि रोख ५० हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आलं तर उपविजेत्या संघाला चषक आणि रोख ३५ हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं.
****
0 notes