#महाराष्ट्र कोविड 19
Explore tagged Tumblr posts
Text
महायुति या महा विकास अघाड़ी - महाराष्ट्र में महिला सुरक्षा की तस्वीर अपरिवर्तित
कोविड-19 महामारी के कारण लगाए गए देशव्यापी लॉकडाउन के दौरान भी महाराष्ट्र में महिलाओं के खिलाफ अपराधों की संख्या में कमी नहीं आई। राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) के आंकड़ों के अनुसार, उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली महा विकास अघाड़ी सरकार के कार्यकाल के दौरान, महाराष्ट्र में हर दिन औसतन 109 महिलाएं अत्याचार का शिकार हुईं। दुर्भाग्य से, स्थिति आज भी जस की तस बनी हुई है। बदलापुर के एक स्कूल…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या क��रोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर;नागरिकांना खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली.
धाराशीव इथल्या लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.
आणि
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेला धावण्याचे संकेत.
****
देशभरातल्या कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार चोपन्नवर पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड 19 चा हा जे एन वन उपप्रकार वेगानं पसरणारा असला तरी त्यानं गंभीर आजार होत नाही आणि रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तरीही, लोकांनी मास्क वापरण्यासह कोविड प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत, पण आपण अपेक्षा करू या की, फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिसाव्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला नागपूर इथे एका महारॅलीच्या आयोजनासह साजरा होणार असून, या मेळाव्याच्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे आणि रॅलीचं घोषवाक्य-है तय्यार हम, असं आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून पाळली जात आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. संसदेतल्या घटना भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातही आज अनेक खासदार, मंत्री आणि नेत्यांनी वाजपेयी आणि मालवीय यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सहायक आयुक्त संजय ���ुरडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं धाराशीव इथे आज, लोकसेवा समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथे उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करण्याचा प्रकल्प चालवणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले कृषी संशोधक विद्यासागर कोळी यांना यावेळी लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सद्भावनेतून सत्कार घडवण्याचा अटलजींचा कार्यभाव समाजामध्ये रुजावा या उद्देशानं निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या लोकसेवकांना लोकसेवा पुरस्कार दिला जातो, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री डांगे यांनी या पुरस्कार वितरणाच्या वेळी केलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं उद्या 'वीर बाल दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना, श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी ��ांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देण्याच्या उद्देशानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले आहेत. जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल आणि या गाडीची जालना इथली नियमित वेळ सकाळी पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटं असेल, असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागात फिरत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आज रामनगर आणि मुकूंदवाडी परिसरात या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे यांनी आपले अनुभव कथन केले.
बाईट - कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे, जि.परभणी
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या बेंद्री या गावात पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी आज स्वागत केलं.
मुंबईत भांडूप इथे या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना महिलांच्या रांगा लागल्या होत्या आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेनं केंद्र सरकारच्या योजनांची माहिती समजावून घेत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यावेळी खासदार मनोज कोटक यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जेबापूर ग्रामपंचायतीतही आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
****
0 notes
Text
महाराष्ट्र कोरोना अपडेट: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढला तणाव, गेल्या 24 तासात संसर्गाचे 2,369 नवीन रुग्ण आढळले; ५ रुग्णांचा मृत्यू झाला
महाराष्ट्र कोरोना अपडेट: महाराष्ट्रात कोरोनाचा वाढला तणाव, गेल्या 24 तासात संसर्गाचे 2,369 नवीन रुग्ण आढळले; ५ रुग्णांचा मृत्यू झाला
केरळ आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ हजार ३६९ नवे रुग्ण आढळले आहेत. 1,402 रुग्णांनी व्हायरसवर मात केली आहे ही दिलासादायक बाब आहे. आता राज्यात 25 हजार 570 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना विषाणू (कोरोनाविषाणू) प्रकरणांना पुन्हा एकदा वेग आला आहे. त्याच वेळी, एकट्या महाराष्ट्रात कोरोनाचे 2,369 नवीन रुग्ण आढळले…

View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशभरातल्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारावर;नागरिकांना खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली.
धाराशीव इथल्या लोकसेवा समितीचे लोकसेवा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.
आणि
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेला धावण्याचे संकेत.
****
देशभरातल्या कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या चार हजार चोपन्नवर पोहोचली आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एका रुग्णाचा या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोविड 19 चा हा जे एन वन उपप्रकार वेगानं पसरणारा असला तरी त्यानं गंभीर आजार होत नाही आणि रुग्ण कोणत्याही गुंतागुंतीशिवाय बरे होत आहेत, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तरीही, लोकांनी मास्क वापरण्यासह कोविड प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोना परिस्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष असून, नागरिकांनीही मागच्या साथीचा अनुभव लक्षात घेत योग्य ती काळजी घ्यावी, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
पहिल्यांदा तर पॅनिक होण्यासारखी स्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण परिस्थितीकडे आपण लक्ष ठेवून आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेऊन यासंदर्भात काय काय काळजी घेतली पाहिजे, त्यासंदर्भातले आदेश दिले आहेत. जी सुसज्जता असली पाहिजे, त्याच्याकडे देखील आपण लक्ष ठेवून आहोत. आणि मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याकरता आपण तयार आहोत, पण आपण अपेक्षा करू या की, फार या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही. जनतेला आवाहन हेच असेल की, आपला पुर्वानुभव हा लक्षात घेता, आणि हा किती गतीने वाढतो, आणि कसा बेमालूमपणे वाढतो, हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. आणि म्हणून ज्या काही मिनीमम प्रिकॉशन्स या ठिकाणी घ्यायच्या आहेत, त्या सर्वांनी घ्याव्यात एवढीच आमची विनंती असणार आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या एकशे अडोतिसाव्या स्थापना दिवसाचा मेळावा येत्या अठ्ठावीस तारखेला नागपूर इथे एका महारॅलीच्या आयोजनासह साजरा होणार असून, या मेळाव्याच्या मैदानाला भारत जोडो मैदान असं नाव देण्यात आलं आहे आणि रॅलीचं घोषवाक्य-है तय्यार हम, असं आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज नागपूर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सुशासन दिवस म्हणून पाळली जात आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांचीही आज जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. संसदेतल्या घटना भवनाच्या मध्यवर्ती सभागृहातही आज अनेक खासदार, मंत्री आणि नेत्यांनी वाजपेयी आणि मालवीय यांच्या प्रतिमांवर पुष्पांजली वाहिली.
राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली वाहिली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
अटलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.
वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं धाराशीव इथे आज, लोकसेवा समितीच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या लोकसेवा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या बुधोडा इथे उपेक्षित निराधार मुलांचं संगोपन करण्याचा प्रकल्प चालवणारे शरद झरे, परंडा इथल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून स्मशानभूमीचं नंदनवन करणारे जगन्नाथ साळुंखे आणि लातूर जिल्ह्यातल्या मुरुड इथले कृषी संशोधक विद्यासागर कोळी यांना यावेळी लोकसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सद्भावनेतून सत्कार घडवण्याचा अटलजींचा कार्यभाव समाजामध्ये रुजावा या उद्देशानं निरपेक्ष भावनेनं काम करणाऱ्या लोकसेवकांना लोकसेवा पुरस्कार दिला जातो, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विद्याभारतीचे क्षेत्रीय मंत्री शेषाद्री डांगे यांनी या पुरस्कार वितरणाच्या वेळी केलं.
****
नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं उद्या 'वीर बाल दिना' निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. नागरिकांना, विशेषत: लहान मुलांना, श्री गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या अतुलनीय शौर्य गाथांची माहिती करून देण्याच्या उद्देशानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान येत्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल. या कार्यक्रम मालिकेचा हा १०८ वा भाग असेल.
****
जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडी येत्या तीस तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजप कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले आहेत. जालना रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला असून, रेल्वे स्थानकावर यासाठीची आवश्यक तयारी दिसून येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता जालना रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीची सुरूवात केली जाईल आणि या गाडीची जालना इथली नियमित वेळ सकाळी पाच वाजून पाच मिनिटं तर छत्रपती संभाजीनगरहून सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटं असेल, असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
विविध शासकीय योजनांची माहिती देणारी विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या विविध भागात फिरत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं आज रामनगर आणि मुकूंदवाडी परिसरात या यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या.
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती देत आहेत. परभणी इथले कमलाजी लोखंडे आणि पार्वती बोबडे यांनी आपले अनुभव या शब्दांत कथन केले...
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातल्या बेंद्री या गावात पोहोचलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं नागरिकांनी आज स्वागत केलं.
मुंबईत भांडूप इथे या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्ज्वला योजना, आरोग्य तपासणी यांच्या दालनांना महिलांच्या रांगा लागल्या होत्या आणि स्थानिक नागरिक उत्सुकतेनं केंद्र सरकारच्या योजनांची माहिती समजावून घेत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यावेळी खासदार मनोज कोटक यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या जेबापूर ग्रामपंचायतीतही आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाच्या योगदानावर अधिक संशोधन होण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त; महाराष्ट्र दौरा आटोपून राष्ट्रपतींचं दिल्लीकडे प्रस्थान.
राज्य विधिमंडळाचं १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान ��ुंबई इथं पावसाळी अधिवेशन.
काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचं भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडून खंडन.
आणि
शाळांनी भू-वारसा स्थळांच्या सहली आयोजित कराव्यात - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं आवाहन.
****
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं योगदान फार मोठं असून त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत राजभवनातल्या भूमिगत बंकरमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्यलढ्यातल्या क्रांतिकारकांच्या दालनांपैकी आदिवासी क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती बोलत होत्या. या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पांजली अर्पण करून, राष्ट्रपतींनी अभिवादन केलं.
त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पाद्यपूजा केली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष आणि सदस्य उपस्थित होते. संस्थानच्या वतीनं साईबाबांची मूर्ती देऊन राष्ट्रपती तसंच राज्यपालांचं स्वागत करण्यात आलं. शिर्डीहून राष्ट्रपतींनी वायूदलाच्या विमानाने दिल्लीकडे प्रस्थान केलं.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मोदी आडनावाच्या वक्तव्यावरील शिक्षेवरील पुनर्विचार याचिका गुजरात उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. राहुल गांधी यांना या संदर्भात सुनावलेल्या दोन वर्ष तुंरूगवासाच्या शिक्षेला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेत सुरत सत्र न्यायालयानं गांधी यांना दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. यानंतर गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आलं आहे.
****
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान मुंबई इथं होणार आहे. विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.
****
येत्या ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान “महाराष्ट्र विधानपरिषद शतकोत्तर महोत्सव” साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. आज झालेल्या महाराष्ट्र विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या��िषयावर चर्चा झाली. १९२१ ते २०२१ हा महाराष्ट्र विधान परिषद शतकपूर्तीचा कालखंड मानला जातो. मात्र कोविड-19 मुळे हा महोत्सव साजरा करणे शक्य न झाल्यामुळे यंदा या महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं. माजी विधानपरिषद सदस्यांचा परिसंवाद, वरिष्ठ सभागृहाचे महत्व या विषयावर कार्यशाळा, विधानपरिषदेत मांडण्यात आलेली महत्त्वाची विधेयकं, ठराव, प्रस्ताव यांचं पुस्तक स्वरुपात संकलन, शतकपूर्ती कालावधीतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित “एक दृष्टिक्षेप” या पुस्तिकेचं प्रकाशन यासारख्या विविध उपक्रम तसंच कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात येणार आहे.
****
विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोऱ्हे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
****
बुलढाणा जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात सामील झाले. त्यांनी आज अधिकृतरित्या पाठिंबा देण्याचं जाहिर केलं. शिंगणे हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. त्या आज परळी इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. अशा प्रकारच्या बातम्यांमुळे एखाद्याची विश्वासार्हता संपते, त्याची कारकीर्द संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे माध्यमांनी खात्री करुन बातम्या द्याव्या, असं त्या म्हणाल्या. चुकीचं वृत्त देणाऱ्या माध्यमाविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेली अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. यात्रा मार्गावरील हवामान सुधारल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू करण्यात येईल, असं प्रशासनानं सांगितलं आहे. काल संध्याकाळपर्यंत ८५ हजार भाविकांनी श्री अमरनाथच्या पवित्र शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. दरम्यान, उत्तराखंडमधल्या चमोली इथं डोंगरावरून दगड पडल्यानं बद्रीनाथ महामार्गही बंद आहे. गेल्या दहा दिवसांत हा महामार्ग चौथ्यांदा बंद झाला आहे.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजाजवळ नुकत्याच झालेल्या खासगी बस जळीत कांडाच्या तपासात संबंधित बसचालक अपघातावेळी मद्यधुंद असल्याचं न्यायवैद्यक अहवालातून समोर आलं आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषण ��हवालानुसार, बसचालक शेख दानिशच्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा ३० टक्के अधिक अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे, तर बसचालकाच्या मद्यपानामुळे घडला होता का, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. ३० जूनला मध्यरात्री ही बस दुभाजकाला धडकून पेटल्यामुळे २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
****
यंदा आषाढी यात्रेनिमित्त २५ जून ते ५ जुलै दरम्यान राज्य परिवहन महामंडळातर्फे पाच हजार विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. यामधून ८ लाख ८१ हजार ६६५ प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, २७ कोटी ८८ लाख रुपये इतकं उत्पन्न झाल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. यात्रेसाठी औरंगाबादसह मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
****
विद्यार्थ्यांना भू-वारसा स्थळांविषयीची माहिती व्हावी यासाठी जास्तीत जास्त शाळांनी भू-वारसा स्थळांची सहली काढाव्यात असं आवाहन केंद्रीय कोळसा आणि खनिज राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. केंद्रीय खनिज मंत्रालय आणि भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्यावतीनं औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा इथं आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भू वारसा स्थळांच्या जनजागृती मोहीमेअंतर्गत ‘अजिंठा लेणी एक भू वारसा स्थळ’ हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी दानवे बोलत होते.
राज्यात अजिंठा- वेरूळ लेणी, लोणार, महाबळेश्वर मधील पाचगणी पठार, अहमदनगर जिल्ह्यात निघोज आणि गडचिरोली जिल्ह्यात वडधम ही भू वारसा स्थळे असून या ठिकाणी शैक्षणिक सहल काढून त्यांच्या विषयी सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून द्यावी असं दानवे यावेळी म्हणाले. प्रस्तावित जालना - जळगाव १७४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी लवकरच भू संपादन प्रक्रिया सुरू होईल असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिलं. अजिंठा लेणीमुळे गावातल्या शेतकऱ्यांना विहीर, विंधन विहीर घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी होणाऱ्या पाण्याच्या समस्येकडे अब्दुल सत्तार यांनी यावेळी लक्ष वेधले. जालना जळगाव रेल्वे मार्ग सिल्लोडसह परिसरातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणार असल्याचा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
****
सामुहिक सेवा केंद्र धारकांनी पीक विमा नोंदणी करताना अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार किंवा तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन कृषी आयुक्त, सुनील चव्हाण यांनी केलं आहे. क���ही सामुहिक सेवा केंद्र धारकांनी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेतल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्याचं विभागानं प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. मिलिंद दुसाने यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. याआधीचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांना कार्यालयाच्या वतीनं निरोप देण्यात आला. त्यांची सिंधुदूर्ग इथं जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बदली झाली आहे.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी मुदखेड तालुक्यातल्या शाळांना भेटी दिली. शिक्षकांचे पाठ निरीक्षण, शालेय पोषण आहाराची पाहणी, सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, शालेय मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आदी उपक्रमांची पाहणी बिरगे यांनी यावेळी केली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
आधुनिक जगातल्या सर्वच समस्यांवर प्राचीन बुद्ध तत्त्वज्ञानाच्या आधारे मात करता येणं शक्य होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज पहिल्या जागतिक बौद्ध परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भगवान बुद्धांच्या शिकवणीने प्रेरित होऊन भारत जागतिक कल्याणासाठी नवनवीन पुढाकार घेत असून, आपल्या सरकारने भगवान बुद्धांच्या मूल्यांचा सातत्यानं प्रसार केला असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सांस्कृतिक मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्यातून या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन केलं असून, समकालिन आव्हानांना प्रतिसाद - तत्वज्ञान ते व्यवहार, असा या परिषदेचा विषय आहे.
***
मोदी आडवानावरुन केलेल्या टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना, सुरत न्यायालयानं सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची गांधी यांची याचिका, न्यायालयानं फेटाळून लावली आहे. २०१९ साली निवडणूक प्रचारादरम्यान मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याच्या विरोधात मोदी समाजाने गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यांवर सुरत सत्र न्यायालयानं त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली असून, त्यांची खासदारकी देखील रद्द झाली आहे. याप्रकरणी राहुल गांधी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
देशात वाढत्या कोविड संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी के मिश्रा यांनी काल एक उच्चस्तरीय बैठक घेतली. आरोग्य पायाभूत सुविधा, औषधांचा पुरेसा साठा, लसीकरण आदी मुद्यांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. आरोग्य सचिव डॉ. राजेश भूषण यांनी कोविड 19 स्थितीची माहिती दिली. देशात महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थान, या आठ राज्यांमध्ये, कोविडचा संसर्ग वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या आठ राज्यांमध्ये असलेल्या सक्रिय रुग्णांपैकी अधिक रुग्ण घरातच विलगीकरणात राहून उपचार घेत असल्याची माहिती भूषण यांनी दिली.
***
दरम्यान, देशात गेल्या २४ तासात नव्या १२ हजार ५९१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. २९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दहा हजार ८२७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६५ हजार २८६ सक्रीय रुग्ण आहेत.
रा��्यात काल अकराशे नवीन रुग्ण आढळले, चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अकराशेहून अधिक रुग्ण कोरोनामुक्तही झाले. सध्या राज्यात सहा हजार १०२ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यातले ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत असून, केवळ ४८ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं.
***
राज्यभरातल्या गावकऱ्यांवर होणारे बिबट्यांचे हल्ले थोपवण्यासाठी, ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली बफर क्षेत्रात सीतारामपेठ इथं, आभासी भिंत उभारण्याचा प्रयोग केला जाणार आहे. ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उभारल्या जाणार असलेल्या या आभासी भिंतीमुळे, वाघांच्या आगमनाचे इशारे मिळणार आहेत. त्यामुळे मानव - वन्यजीव संघर्षाची तीव्रता रोखण्यासाठी मदत होणार आहे. ही संरक्षण प्रणाली वन गावांचं संरक्षण करण्यासाठी वापरली जाणार असून, असा प्रयोग करणारा ताडोबा, हा देशातला पहिलाच व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. यानंतर उमेदवारांची अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल. उद्या निवडणूक चिन्हांचं वाटप होणार असून, २८ एप्रिलला मतदान होणार आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री आणि लासूर स्टेशन इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी ही निवडणूक होत आहे.
***
परभणी जिल्ह्यात वरपुड आणि तामसवाडी ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. तहसीलदार गणेश चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल ते दोन मे दरम्यान नामनिर्देशन पत्रं सादर करता येणार आहेत, तर आठ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. १८ मे रोजी मतदान आणि १९ मे रोजी मतमोजणी होणार आहे. वरपूड इथल्या प्रभाग क्रमांक एक, तीन आणि तामसवाडी इथल्या प्रभाग क्रमांक एकमधल्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.
***
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ८५५ ग्रामपंचायतींमध्ये ३० जूनपर्यंत जनसुरक्षा योजनेसाठी सर्वेक्षण मोहिम सुरु झाली आहे. या मोहिमेअंतर्गत गावातल्या प्रत्येक पात्र व्यक्तीचा, पंतप्रधान सामाजिक सुरक्षा विमा योजना, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेत समावेश होणार आहे. सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीतल्या सर्व विषयाचे तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी, या सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत.
//**************//
0 notes
Text
Date – 17 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
***
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्यशासन तत्पर-मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार.
जायकवाडीसह पाच मोठ्या धरणांमधला गाळ काढण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरू होणार.
प्रधानमंत्री आवास योजना घोटाळाप्रकरणी छत्रपती संभाजीनगरात ईडीचे छापे.
आणि
मुंबईतल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर १८९ धावांचं आव्हान.
****
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासाठी राज्यशासन तत्पर असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतीच्या नुकसानाचे ता��डीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी काल पाऊस तसंच गारपीट झालेल्या नांदेड आणि नाशिक इथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं असून, दोन्ही ठिकाणी पंचनामे सुरू झाले असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, या आश्वासनाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले -
मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री. तिथे पंचनामे सुरू आहेत. नाशिकच्या कलेक्टरशी बोललो, तिथेही पंचनामे सुरू आहेत. आणि त्याचाही अहवाल ते पाठवतायत. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान आता गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहणारच आहोत. आणि त्यामुळे हे सगळे नियम, निकष डावलून आपण त्यांना पूर्वीदेखील मदत केलेली आहे. आणि आजही आपण मदत करतोय. त्यामुळे बिलकुल काळजी करू नका. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.
****
राज्यात जायकवाडीसह पाच मोठ्या धरणांमधला गाळ तसंच वाळू काढण्याची प्रक्रिया महिनाभरात सुरू केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत ही माहिती दिली. उजनी धरणाच्या अनुषंगानं रणजीत मोहितेपाटील यांनी हा मुद्दा मांडला होता, त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी, एक ते दीड महिन्यात निविदा पूर्ण करून गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, या प्रक्रियेदरम्यान जैव विविधतेला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
****
अमरावती मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. या टेक्सटाईल पार्कमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोठा लाभ होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले -
आता या ठिकाणी हा टेक्सटाईल पार्क आल्यामुळे असं अपेक्षित आहे की दहा हजार कोटींची गुंतवणूक एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना इनडायरेक्ट असा तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्धी येईल. हा पार्क आल्यामुळे जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना देखील याचा फायदा मिळेल. या पार्कमुळे जे काही कापूस उत्पादक शेतकरी आहेत, त्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील एक मोठी महत्वाची मदत होणार आहे. आणि म्हणून मी माननीय पंतप्रधान महोदयांचे मनापासनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आभार मानतो.
****
राज्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या विषयी बेकायदेशीर सावकारांच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्यात येते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य उमा खापर�� यांनी या संदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.
नवीन सावकारी कायदा लवकरात लवकर लागू करण्याबाबत सरकारच्या भूमिकेबाबत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न विचारला होता. यासंदर्भात नेमलेल्या विद्या चव्हाण समितीचा अहवाल मागवून त्या शिफारसींचा अभ्यास करून, योग्य ती कार्यवाही करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. खासगी सावकारी बंद झाली पाहिजे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली.
****
राज्यात एच थ्री एन टु आणि कोविड-19 याबाबत आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, ताप आणि कणकण अंगावर काढू नये तसंच ४८ तासाच्या आत डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषध घेऊ नये असं आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नागरिकांना केलं आहे. विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये मास्क वापरावा आणि सामाजिक अंतर राखण्याच्या सूचनाही सावंत यांनी जनतेला केल्या आहे.
****
दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का कायदा लागू करण्यासाठी विचार करण्यात येईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बागडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यासाठी अन्न औषध प्रशासन विभागासोबत बैठक घेऊन एक हेल्पलाईन सुरु करण्यात येईल असं ही विखे पाटील यांनी सांगितलं.
****
राज्याच्या सहकार मंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरभरती करण्यासाठी परवानगी दिली होती. २९ नोव्हेंबर, २०२२ रोजी सहकार मंत्रालयाकडून तसे लेखी आदेशही काढण्यात आले. राज्यातील कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला अर्धन्यायिक म्हणजेच-क्वासी ज्युडीशीयल निर्णय बदलण्याचा किंवा संबधित खात्याच्या मंत्र्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही असं न्यायालयानं यावेळी सष्ट केलं.
****
परभणी जिल्ह्यातील पाथरी नगरपरिषदेंतर्गत गृहनिर्माण संस्थेच्या जागेवर वाणिज्य इमारत बांधल्यानं गृहनिर्माण कायद्याचा भंग झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात येणार असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ��ज विधानपरिषदेत सांगितलं. सदस्य प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील तसंच बाबाजानी दुराणी यांनी सहभाग घेतला.
****
प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घोटाळाप्रकरणी छत्रपती संभाजीनगरात सक्तवसूली संचालनालय - ईडीनं आज छापे घातले. महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील कोट्यावधी रुपयांची घरं बांधण्यासाठी ज्या निविदा दाखल करण्यात आल्या होत्या, त्या निविदांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि हेराफेरीचा आरोप आहे. महानगरपालिकेनं यासंदर्भात शहरातील सिटीचौक पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली असून १९ जणांविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन ईडीनं यात हस्तक्षेप करुन संपूर्ण कागदपत्रं ताब्यात घेतली होती. या प्रकरणाशी संबंधीत कागदपत्रांची तपासणी ईडीचे अधिकारी करत आहेत.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यात येत्या ३१ मार्च ते एक एप्रिल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात उपसमितीची बैठक घेण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्रामात नांदेड जिल्ह्याचं योगदान हे अपूर्व आहे. यात उमरी इथला लढा असो, कल्लाळी इथला संघर्ष असो, नांदेडचा झेंडा सत्याग्रह असो, ताडी झाडासाठी प्रातिनिधीक अंदोलन असो, या सर्व प्रत्येक घटना मराठवाड्याच्या मुक्तीसाठी मोलाचा टप्पा ठरलेल्या आहेत. या योगदानाला अधोरेखित करण्यासह हुतात्म्यां प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जिल्हा पुढे सरसावेल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया मुंबईत सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं १८८ धावा करत, भारतासमोर १८९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी बोलावलं. मात्र मिशेल मार्श वगळता पाहुण्या संघाचा एकही फलंदाज आज समाधानकारक खेळ करू शकला नाही. मार्श ८१ धावांवर बाद झाला. मोहम्मद शमी तसंच मोहम्मद सिराजनं प्रत्येकी तीन बळी घेतले, रवींद्र जडेजाने दोन तर कप्तान हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताची सुरवातही अडखळत झाली आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद २८ धावा झाल्या होत्या.
****
छत्रपती संभाजीनंगर इथं करमाड-बदनापूर दरम्यान उद्या घेण्यात येणाऱ्या तीन तासांच्या लाईन ब्लॉक मुळे काही गाड्या उशिरा धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क विभागाद्वारे ही माहिती देण्यात आली आली आहे.
****
0 notes