#मंत्रिमंडळात
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
राज्यातील शाळा होणार अनुदानीत; राज्य मंत्रिमंडळात शाळांविषयी झाला महत्वपूर्ण निर्णय…
राज्यातील शाळा होणार अनुदानीत; राज्य मंत्रिमंडळात शाळांविषयी झाला महत्वपूर्ण निर्णय…
राज्यातील शाळा होणार अनुदानीत; राज्य मंत्रिमंडळात शाळांविषयी झाला महत्वपूर्ण निर्णय… मुंबईः राज्यातील शाळांसाठी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील शाळांना 1100 कोटींचे अनुदान देणार…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
१८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाला प्रारंभ-नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ
देश चालवण्यासाठी एकमताची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून साठवणुकीवर मर्यादा
पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल
आणि
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना
****
१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनं सुरु झालं. लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली.
एच. डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान, जुएल ओराम, सर्वानंद सोनोवाल, के. राम मोहन नायडू, जी किशन रेड्डी, सी आर पाटील, डॉ. जितेन्‍द्र सिंह, सुरेश गोपी, सुकांता मुजूमदार आदी मान्यवरांनी आपापल्या मातृभाषेतून, दुर्गादास उके तसंच बासुरी स्वराज यांनी संस्कृतमधून सदस्यत्वाची शपथ घेतली.
महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात समावेश असलेले प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, तसंच रक्षा खडसे यांनी मराठीतून शपथ घेतली.
भाजप खासदार राधामोहनसिंह तसंच फग्गनसिंह कुलस्ते यांना तालिका अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली.
दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी मेहताब यांना लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून शपथ दिली. तीन जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून रोजी निवडणूक होणार असून, २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.
****
दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
सरकार चालवण्यासाठी बहुमत लागतं मात्र देश चालवण्यासाठी एकमताची गरज असते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या १० वर्षात आपल्या सरकारने ��र्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून, यापुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं, पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
****
गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा ३ हजार टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी १० टन, तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरता १० टन आणि त्यांच्या आगारांकरता ३ हजार टन इतकी ही मर्यादा आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सर्व व्यापारी आणि दुकानदारांसाठी येत्या ३१ मार्च २०२५ पर्यंत ही मर्यादा लागू राहील, असं चोप्रा यांनी सांगितलं. गव्हाचे दर स्थिर रहावेत यासाठी सरकार गरजेनुसार या साठा मर्यादेचा आढावा घेईल, असं ते यावेळी म्हणाले.
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. यामध्ये लातूर इथून अटक केलेल्या दोन शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, अतिरिक्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल झाली. एकंदर ८१३ विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिल्याची, तर साडेसातशे विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे.
****
१२व्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतूक केलं. नागरिकांना देशात आणि देशाबाहेरही सुलभपणे पारपत्रं मिळावी याकरता डिजीलॉकर, पासपोर्ट पोलीस ॲप अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचंही जयशंकर यांनी सांगितलं.
****
यंदाच्या हज यात्रेदरम्यान तेराशे यात्रेकरुंचा उष्णतेच्या संबंधीत विविध कारणांनी मृत्यू झाला. सौदी अरबस्तानाकडून ही माहिती देण्यात आली. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक लोक वयोवृद्ध तसंच सहव्याधी असलेले होते, मात्र बहुतांश मृत्यू उष्णतेमुळेच झाल्याचं, या ��ृत्तात म्हटलं आहे.
****
पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ८ जणांना ��टक करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित चित्रफितीत दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणी राज्यसरकार तसंच पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सेंट लूसिया इथल्या डॅरेन सॅमी मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता हा सामना सुरू होईल. सुपर ८ मध्ये भारतानं आत्तापर्यंत अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा पराभव केला आहे. दरम्यान, आज सकाळी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुइस पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजवर मात केली.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. यावेळी जन सुविधा, पर्यटन, सिंचन, आरोग्य, जलयुक्त शिवार आणि शाळेच्या खोल्यांचे बांधकाम या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यात अपुरी राहिलेली कामं तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या मुख्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बैठकीत बोलतांना, नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामपंचायती आणि नगरपरिषदेचं उत्पन्न वाढवावं, तसंच पावसाळा लक्षात घेऊन वृक्ष लागवडीवर भर द्यावा अशा सूचनाही यावेळी स्वामी यांनी केल्या. या बैठकीला वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद या नगरपरिषदेचे तसंच फुलंब्री, सोयगाव या नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
****
बीड जिल्ह्यात शेतात आढळणाऱ्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज असून जिल्ह्यासाठी ४ हजार १५० किलो मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाचा साठा राज्यस्तरावरून प्राप्त झाला आहे. गरजू शेतकऱ्यांसाठी सदरील कीटकनाशक संबंधित तालुका कृषी अधिकारी ��संच नजीकचे तालुका बीज गुणन केंद्र आणि शासकीय फळरोपवाटिका याठिकाणी उपलब्ध असल्याचं, कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
लातुर इथं आज, भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर घेण्यात आलं. यावेळी या शिबिरात सहभाग नोंदवलेल्या अंदाजे अडीच हजार युवक-युवतींना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दहावी बारावी नंतर प्रत्येकानं आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या ध्येयाकडं आत्मविश्वासानं वाटचाल करावी, असं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केलं. तर या शिबीराची विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी मदत होईल, असं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण महामंडळामार्फत संत भगवान बाबा ऊसतोड मुलांचे शासकीय वसतीगृह नाळवंडी नाका इथं कार्यरत आहे. या वसतीगृहात प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क करून प्रवेश अर्ज घ्यावे, असं आवाहन बीडचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त आणि संत भगवान बाबा वसतीगृहाचे गृहपाल यांनी केलं आहे.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जून या सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड शहरात समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
मंत्रिमंडळात गेल्यानंतर शरद पवारांशी समझोत्याची चर्चा..#sharadpawar #aji...
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? या नेत्याने सांगितली तारीख
अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जूनला सरकारची सूत्र हाती घेतली होती. त्यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर मंत्रिमंडळ पहिला विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसांनी झाला होता. त्यानंतर अनेक दिवस खातेवाटपही झाले नव्हते. खातेवाटप झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. कारण मंत्रिमंडळात २८…
Tumblr media
View On WordPress
0 notes
cinenama · 2 years ago
Text
गोवा मंत्रिमंडळ फेरबदलाचा मुहूर्त ठरला...
पणजी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील जागा जिंकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्‍या फर्मागुढी-फोंडा येथील 16 एप्रिल रोजीच्या जाहीर सभेनंतर मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा रंगली आहे. मिळालेल्‍या नव्या माहितीनुसार, 10 म��पूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होऊ शकतात. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच तसे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी आज आपला सुवर्णमहोत्‍सवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
बंडखोर आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ
Tumblr media
मुंबई : २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार उलथून काँग्रेस आणि धजदमधून भाजपमध्ये उडी घेऊनतल्यानंतर मंत्रिमंडळात सामील झालेल्या ११ बंडखोर आमदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. ११ बंडखोर आमदारांच्या स्थावर मालमत्तेत आणि वारसांमध्ये मोठी वाढ झाली असून, बहुतांश नेत्यांनी या मालमत्ता आपल्या पत्नींच्या नावावर नोंदवल्या आहेत, अशी माहिती समोर येत आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी २०१८ मध्ये निवडणूक लढवली तेव्हा त्यांची जंगम मालमत्ता १.११ कोटी रुपये होती, ती आता २.७९ कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे त्यांची स्थावर मालमत्ता जी ५२ लाख ८१ हजार रुपये होती, ती आता एक कोटी ६६ लाख ६० हजार ४८० झाली आहे. २०१८ मध्ये सुधाकरच्या पत्नीची स्थावर मालमत्ता एक कोटी १७ लाख ६३ हजार ८७१ रुपये होती. आता ते केवळ पाच वर्षांत १६ कोटी १० लाख चार हजार ९६१ रुपये झाले आहे.
Tumblr media
२०१८ मध्ये १८ लाख ९३ हजार २१७ रुपये असलेली महेश कुमठळ्ळी ��ांची मालमत्ता आता एक कोटी ३३ लाख ३२ हजार ८१९ रुपये झाली आहे, तर सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांची संपत्ती जी २०१८ मध्ये ६७.८३ लाख रुपये होती, ती आता ५.४६ कोटी रुपये झाली आहे. यापूर्वी पत्नीची संपत्ती जाहीर न केलेल्या अनेक नेत्यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना शपथपत्र सादर केले आहे. त्यापैकी एक बी. ए. बसवराजू यांनी घोषित केले आहे, की त्यांच्या पत्नीकडे ५६.५७ लाख जंगम मालमत्ता आणि २१.५७ कोटी स्थावर मालमत्ता आहे. २०१८ मध्ये ३.१२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असलेले कृषिमंत्री बी. सी. पाटील यांच्याकडे आता २०२३ मध्ये १९.६० कोटी रुपयांचे व्यावसायिक संकुल आणि घर आहे. कॅबिनेट मंत्री बनल्याने वाढ कॅबिनेट श्रेणीचा दर्जा आणि पगारवाढ यामुळे मालमत्तेत वाढ झाल्याचे नेत्यांनी सांगितले आहे. एवढ्या प्रमाणात मालमत्तेत वाढ झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. Read the full article
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्र राजकीय संकट: ठाकरे सरकारने शिंदे गटातील मंत्र्यांना अपूर्ण शिक्षा दिली, जबाबदारी घेतली, मंत्रीपद घेतले नाही
महाराष्ट्र राजकीय संकट: ठाकरे सरकारने शिंदे गटातील मंत्र्यांना अपूर्ण शिक्षा दिली, जबाबदारी घेतली, मंत्रीपद घेतले नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिमा क्रेडिट स्रोत: ट्विटर (सीएमओ महाराष्ट्र) एकनाथ शिदे हे नगरविकास मंत्री आहेत, त्यांचे खाते उद्योगमंत्री सुभाष देसाई सांभाळतील. गुलाबराव पाटील यांच्याकडे परिवहन मंत्र�� अनिल परब, कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे शंकरराव गडाख, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे संजय बनसोडे यांची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
Narayan Rane Education Details: केंद्रीय मंत्री नारायण राणे कितवी शिकलेयत? जाणून घ्या
Narayan Rane Education Details: केंद्रीय मंत्री नारायण राणे कितवी शिकलेयत? जाणून घ्या
नारायण राणे शिक्षण तपशील: भारत सरकारचे केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांपैकी ते एक आहेत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. नारायण राणे हे आज भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांमध्ये आहेत. पण त्यांची राजकीय कारकीर्द…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ' ह्या ' मंत्र्याला कोरोनाची लागण
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण
पुण्यातील पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते त्यानंतर अवघ्या काही दिवसात संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच सरकारमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
ज्या अजित पवारांवर टीका केली, तेच मंत्रिमंडळात; एकनाथ शिंदे आता काय करणार?
https://bharatlive.news/?p=109020 ज्या अजित पवारांवर टीका केली, तेच मंत्रिमंडळात; एकनाथ शिंदे आता काय ...
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिकबातम्या
दिनांक११जून२०२४सकाळी७.१०मि.
****
केंद्रीयमंत्रिमंडळाचंखातेवाटपजाहीर-ज्येष्ठमंत्र्यांकडेपूर्वीचीखातीकायम
रक्षाखडसेयांच्याकडेयुवकव्यवहारआणिक्रीडामंत्रालयतरमुरलीधरमोहोळयांच्याकडेसहकारआणिहवाईवाहतूकखात्याचीजबाबदारी
राष्ट्रवादीकाँग्रेसपक्षराष्ट्रीयलोकशाहीआघाडीचाअभिन्नभाग-अजितपवारयांचा��िर्वाळा
आणि
परभणीतसंचलातूरजिल्ह्यातढगफुटीसदृश्यपाऊस
****
पंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्यानेतृत्वाखालीलकेंद्रीयमंत्रिमंडळाचंखातेवाटपकालजाहीरकरण्यातआलं. नरेंद्रमोदीयांच्याअखत्यारितकार्मिक, लोकतक्रारआणिनिवृत्तीवेतन, अणुऊर्जाविभाग, अंतराळविभाग, धोरणनिर्मितीसंबंधीचेमुद्देआणिकोणत्याहीमंत्र्याकडेसोपवलानसलेलाविभागअसणारआहे. खातेवाटपाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून...
‘‘राजनाथसिंह यांच्याकडे संरक्षण, अमित शाह यांच्याकडे गृह आणि सहकार, नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रालय आणि कंपनी व्यवहार तर एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा सोपवण्यात आली आहे.
अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वेमंत्रालय कायम ठेवण्यात आलं असून, माहिती आणि प्रसारण तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभारही त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गेल्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री असलेले एल. मुरुगन यांच्याकडे हेच खातं ठेवण्यात आलं आहे.
पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे शिक्षण मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. जगत प्रकाश नड्डा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंबकल्याण तसंच रसायनं आणि खत मंत्रालय ही दोन खाती देण्यात आली आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री  शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कृषी आणि ग्रामीण विकास, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्याकडे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालय, तर हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल यांच्याकडे गृहनिर्माण,नागरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्याकडे सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग, तर आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे बंदरे-नौवहन आणि जलमार्ग  मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाच राज्यमंत्र्यांना स्वतंत्र पदभार देण्यात आला आहे. यात खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे, त्यांच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र पदभार तसंच आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुण्यातून प्रथमच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि हवाई वाहतूक मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 
याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे दूरसंचार आणि ईशान्य विकास
किरेन रिजीजू - संसदीय कामकाज, आणि अल्पसंख्याक विकास
राजीव रंजन सिंह - पंचायती राज तसंच मत्स्य-पशू संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय
जुएल ओराम - आदिवासी कल्याण
चिराग पासवान- अन्न प्रक्रिया उद्योग
जी किशन रेड्डी- कोळसा आणि खनिकर्म
मनसुख मांडवीय - श्रम आणि रोजगार
भूपेंद्र यादव- पर्यावरण तर राम मोहन नायडू यांच्याकडे नागरी उड्डयन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.’’
****
शेतकऱ्यांच्याकल्याणासाठीआपलंसरकारवचनबद्धआहे, अशीग्वाहीपंतप्रधाननरेंद्रमोदीयांनीदिलीआहे. कालपंतप्रधानपदाचाकार्यभारस्वीकारल्यानंतरतेबोलतहोते. प्रधानमंत्रीकिसानसन्मानयोजनेचा१७वाहप्तापंतप्रधानांनीकालजारीकेला. याअंतर्गत९कोटी३०लाखशेतकऱ्यांच्याबँकखात्यात२०हजारकोटीरुपयेनिधीथेटजमाहोणारआहे.
**
पीएमआवासयोजनेअंतर्गतदेशभराततीनकोटीघरंउभारलीजाणारआहेत. केंद्रीयमंत्रिमंडळाच्याकालझालेल्यापहिल्याबैठकीतहानिर्णयघेण्यातआला. याघरांमध्येशौचालय, घरगुतीवापराचागॅस, वीजजोडणीतसंचनळजोडणीउपलब्धअसणारआहे. यायोजनेअंतर्गतदेशभरातगेल्यादहावर्षांतचारकोटी२१लाखघरांचीउभारणीकरण्यातआलीआहे.
****
राष्ट्रवादीकाँग्रेसपक्षएनडीए-राष्ट्रीयलोकशाहीआघाडीचाअभिन्नभागअसल्याचानिर्वाळा, पक्षाचेराष्ट्रीयअध्यक्षअजितपवारयांनीदिलाआहे. राष्ट्रवादीकाँग्रेसपक्षाचा२५वावर्धापनदिनकार्यक्रमाततेबोलतहोते. केंद्रीयमंत्रीपदावरूनकाहीहीनाराजीनसल्याचंत्यांनीस्पष्टकेलं. स्वतंत्रप्रभाराच्याराज्यमंत्रिपदाचाप्रस्तावएनडीएकडूनमिळालाहोता, मात्रआपणतोसध्यानाकारत, एनडीएसोबतचकामकरतराहणारअसल्याचंपवारयांनीसांगितलं. राष्ट्रवादीकाँग्रेसपक्षस्थापनेसहपक्षविस्तारासाठीयोगदानदि��ेल्यासर्वांप्रतीअजितपवारयांनीकृतज्ञताव्यक्तकेली.
दरम्यान, राष्ट्रवादीकाँग्रेसशरदचंद्रपवारपक्षाचेअध्यक्षशरदपवारयांच्याउपस्थितीतकालपुणेतसंचअहमदनगरइथंहीपक्षाच्यावर्धापनदिनानिमित्तकार्यक्रमपारपडले.
****
मुंबईक्रिकेटअसोशिएनचेअध्यक्षअमोलकाळेयांचंअमेरिकेतन्यूयॉर्कइथेनिधनझालं. भारतपाकिस्तानसामनापाहातअसतानाकाळेयांनाहृदयविकाराचाझटकाआला. त्यांनातत्काळरुग्णालयातहलवण्यातआलं, मात्रत्यादरम्यानत्यांचंनिधनझालं.
****
केंद्रीयमाध्यमिकशिक्षणमंडळ-सीबीएसईनेआपलाअभ्यासक्रमतसंचशैक्षणिकसाहित्याबद्दलप्रसारितहोणाऱ्याअफवांबाबतसावधराहण्याचंआवाहनविद्यार्थीतसंचपालकांनाकेलंआहे. यासंदर्भातमंडळाच्यासंकेतस्थळावरदिलीजाणाऱ्यासूचनांवरलक्षद्यावं, असंहीयाबाबतच्यावृत्तातम्हटलंआहे.
****
वैद्यकीयअभ्यासक्रमाच्याप्रवेशासाठीघेण्यातआलेल्यानीटयापात्रतापरीक्षेत गैरप्रकार झाल्याचाआरोपकरत, या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्याचीतसंच निकालाचं फेरमूल्यांकन करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.असे गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असंही पटोले यांनीम्हटलंआहे.
****
खरीपहंगामातशेतकऱ्यांनाआवश्यकप्रमाणातबियाणेआणिखतांचापुरवठातसंचप्रत्येकपात्रशेतकऱ्यालापीककर्जमिळण्याचीदक्षताघेण्याचेनिर्देशउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीसर्वविभागीयआयुक्तांनादिलेआहेत. तेकालयासंदर्भातल्याआढावाबैठकीतदूरदृश्यप्रणालीच्यामाध्यमातूनबोलतहोते. खते-बियाण्यांच्याअभावीकुठंहीपेरण्यांनाविलंबहोऊनये, याचीदक्षताघेण्याचीसूचनापवारयांनीकेली.
****
यंदाच्याखरीपहंगामासाठीबॅंकांनीशेतकऱ्यांनापीककर्जनूतनीकरणाचंमहत्त्वपटवूनदेत, पीककर्जवितरणालाप्राधान्यद्यावं, असेनिर्देशछत्रपतीसंभाजीनगरचेजिल्हाधिकारीदिलीपस्वामीयांनीदिलेआहेत. जिल्ह्याच्यावार्षिकपतआराखड्याचंप्रकाशनकालस्वामीयांच्याहस्तेझालं, त्यावेळीतेबोलतहोते. जिल्ह्यातयंदाच्याआर्थिकवर्षासाठी२३हजार१६२कोटीरुपयांचापतआराखडामंजूरकरण्यातआलाआहे.
****
मराठवाड्यातपरभणीतसंचलातूरजिल्ह्यातकालढगफुटीसदृश्यपाऊसझाला. मानवततालुक्यातमानोलीशिवारातझालेल्यायापावसानेओढ्यालापूरआला, त्यातदोनमहिलावाहूनगेल्या. यापैकीएकामहिलेलावाचवण्यातयशआलं, तरसुनितालव्हाळेनावाच्यामहिलेचारात्रीउशीरापर्यंतशोधलागूशकलानाही.
लातूरशहरासहजिल्ह्यातजळकोट, उदगी��, चाकूर, अहमदपूरतालुक्यातकालमुसळधारपाऊसझाला.जळकोटतालुक्यातल्याअनेकभागातढगफुटीसदृश्यपाऊसझाला,परिणामीनदीशेतशिवारातपाणीसाचलंआहे. प्रशासनानेजिल्ह्यातीलनागरिकांनासतर्कराहण्याचंआवाहनकेलंआहे.
जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात काल सायंकाळी जोरदारपाऊसझाला. पहिल्याच पावसात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं या भागात पाझर तलाव शंभर टक्के भरले आहेत. शेतांमध्ये सर्वत्र पाणी साचलंआहे.
छत्रपतीसंभाजीनगरजिल्ह्यातहीकालजोरदारपाऊसझाला.
दरम्यान, शहरालापाणीपुरवठाकरणारीमुख्यजलवाहिनीफुटल्यानं, जालाननगरभागातकाहीदुकानंतसंचघरांमध्येपाणीशिरुननुकसानझालं.
****
मराठासमाजाच्यामागण्यामान्यकेल्यानाहीत,तरआगामीविधानसभानिवडणुकीचेनिकालअनपेक्षितलागतीलअसाइशारामराठाआरक्षणआंदोलनाचेनेतेमनोजजरांगेयांनीदिलाआहे. जालनाजिल्ह्यातआंतरवालीसराटीइथंउपोषणालाबसलेलेजरांगेकालवार्ताहरांशीबोलतहोते. मराठाआरक्षणालाविरोधकरणाऱ्यांनाविरोधकरु, तसंचविधानसभानिवडणुकीतसर्वजातीधर्माचे२८८उमेदवारउभेकरु, असंतेम्हणाले.
****
छत्रपतीसंभाजीनगरइथंअखिलभारतीयब्राह्मणमहासंघाच्यावतीनंदहावीतसंचबारावीपरीक्षेतउत्तीर्णझालेल्यागुणवंतांचाकालगौरवकरण्यातआला. समर्थनगरइथल्याश्रीराममंदिरातकालदुपारीझालेल्यायाकार्यक्रमातसुमारेदीडशेविद्यार्थ्यांनामान्यवरांच्याहस्तेस्मृतिचिन्हदेऊनगौरवण्यातआलं.
****
धाराशिवइथंशासकीयवैद्यकीयमहाविद्यालयाच्यानेत्रविभागाच्यावतीने१०जूनते१६जूनयाकालावधीतराष्ट्रीयअंधत्वनियंत्रणकार्यक्रमाअंतर्गतदृष्टीदिनसप्ताहराबवलाजातआहे. डॉ.रामचंद्रलक्ष्मणभालचंद्रयांच्यास्मृतीप्रित्यर्थअसलेल्यायासप्ताहालाकालपासूनप्रारंभझाला.
****
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ' ह्या ' मंत्र्याला कोरोनाची लागण
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण
पुण्यातील पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते त्यानंतर अवघ्या काही दिवसात संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच सरकारमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ' ह्या ' मंत्र्याला कोरोनाची लागण
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण
पुण्यातील पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते त्यानंतर अवघ्या काही दिवसात संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच सरकारमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ' ह्या ' मंत्र्याला कोरोनाची लागण
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण
पुण्यातील पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते त्यानंतर अवघ्या काही दिवसात संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच सरकारमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
जगातील भारतीय वंशाच्या ४ शक्तीशाली व्यक्ती
Tumblr media
लंडन : लंडनचे नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी निवड झाली. भारतीय वंशाच्या व्यक्ती जगात भारी असून, आज जगातील शक्तीशाली देशांतील ४ व्यक्ती उत्तम नेतृत्व करीत आहेत. त्यामध्ये ऋषी सुनक यांच्यासह कमला हॅरिस, प्रविंद जगन्नाथ आणि अ‍ँटोनियो कोस्टा यांचा समावेश आहे. ऋषी सुनक भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. १९० खासदारांचे समर्थन सुनक यांना मिळाले आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर होते. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. २०१५ मध्ये सुनक यांनी राजकारणात प्रवेश केला. यॉर्कशरच्या रिचमंड येथून त्यांनी विजय मिळवला होता. ब्रेक्झिटचे समर्थक म्हणून त्यांना ओळखलेजाते. त्यामुळेच त्यांना मोठी संधी मिळत गेल्याचे बोलले जाते. जॉन्सन यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते, त्यांनीच जॉन्सन यांच्या विर��धात राजीनामासत्र सुरू केले होते. आज ते पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत. अवघ्या ७ वर्षांत त्यांनी फार मोठी झेप घेतली. कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अध्यक्ष झाले. त्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती महिला विराजमान झाली, त्या कमला हॅरिस आहेत. भारतीय वंशाची व्यक्ती अमेरिकेचा उपराष्ट्रपती होण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. त्या भारतीय वंशाच्या आहेत. चेन्नईत राहणा-या त्यांच्या आजोबांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. प्रविंद जगन्नाथ आणखी एक भारतीय प्रविंद जगन्नाथ हे जगातील महान नेत्यांपैकी एक आहेत. प्रविंद सध्या मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची पदे भूषविल्यानंतर प्रविंदकुमार जगन्नाथ यांची मॉरिशसच्या पंतप्रधानपदी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यांचा जन्म ला कॅव्हर्न येथे एका भारतीय कुटुंबात झाला. अँटोनियो कोस्टा गोवा येथे मोझांबिक आणि अंगोला या पोर्तुगीजांच्या महत्त्��ाच्या आणि दीर्घकाळ टिकलेल्या वसाहती होत्या. त्यामुळे तेथील मोझांबिक आणि अंगोलाशी गोवन लोकांचा संबंध येत असे. गोव्यातील लोक मोठ्या संख्येने आफ्रिकेत स्थलांतरित झाले आहेत. अँटोनियो यांचे आजोबा लुईस अफोन्सो मोझांबिकमध्ये होते. ४५१ वर्षाच्या पोर्तुगाल-गोवा संबंधांमुळे हजारो गोवन नागरिक पोर्तुगालमध्येही स्थायिक झाले. Read the full article
0 notes
rajendrasomani · 2 years ago
Text
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ' ह्या ' मंत्र्याला कोरोनाची लागण
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळातील ‘ ह्या ‘ मंत्र्याला कोरोनाची लागण
पुण्यातील पूजा राठोड आत्महत्या प्रकरणात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते त्यानंतर अवघ्या काही दिवसात संजय राठोड यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून जाहीर केलेले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर प्रथमच सरकारमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes