#भारत वेस्ट इंडिज
Explore tagged Tumblr posts
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:18.10.2024 रोजीचे दुपारी:01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मलावीचे राष्ट्राध्यक्ष लॅझरस चकवेरा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही देशांमध्ये विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळ स्तरावरची चर्चादेखील होणार आहे. राष्ट्रपती मलावीमधल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. दरम्यान, काल संध्याकाळी राष्ट्रपती मुर्मू यांनी मलावीमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारताबाहेर राहणाऱ्या आपल्या देशवासियांचं कल्याण ही आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारतीयांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा, कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी आम्ही जगभरातल्या आमच्या भागीदारांसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. मलावीमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधला दुवा असल्याचं सांगून राष्ट्रपतींनी, मलावीच्या समाज आणि अर्थव्यवस्थेत भारतीयांच्या योगदानाचं कौतुक केलं.
****
झारखंडमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना आज जारी होत आहे. या टप्प्यात ४३ जागांसाठी येत्या १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आजपासून २५ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २८ तारखेला अर्जांची छाननी होईल, आणि ३० ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. राज्यात सर्वच राजकीय आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबतच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या मंगळवारी २२ तारखेला निवडणूक अधिसूचना जारी होणार असून, त्यादिवसापासून २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
****
विधानसभा निवडणुकीसाठी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघा अंतर्गत नियुक्त करण्यात आलेले सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विविध पथका��चे नोडल अधिकारी यांच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला. तसंच निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. स्थिर निगराणी पथकं आणि भरारी पथकांनी निवडणूक काळात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी दक्ष रहावं, कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास तातडीने कार्यवाही करून, त्याबाबतचा अहवाल संबंधित नोडल अधिकार्यांना यांना सादर करावा, आदी सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सज्ज झालं आहे. जिल्ह्यात मद्याची आणि इतर अंमली पदार्थाची वाहतूक होऊ नये म्हणून तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. गोवा राज्याच्या सीमेवर नऊ आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर एक, असे एकूण १० आंतरराज्य चेकपोस्ट कार्यान्वीत करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात १८ स्थायी सर्वेक्षण पथकं आणि १० भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ७९८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.
****
सिंधुदूर्गचे माजी आमदार राजन तेली यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रगोरिया मारिस्का तुनजुंग हिच्याशी होणार आहे. सिंधुनं काल चीनच्या हान यू हिचा १८-२१, २१-१२, २१-१६ असा पराभव केला. इतर सर्व भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.
****
नवी दिल्लीत पार पडलेल्या आय एस एस एफ जागतिक नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं दोन रौप्य आणि दोन कांस्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली आहे. चार पदकांसह भारत पदकतालिकेत ९ व्या क्रमांकावर राहिला.
****
आसाममधल्या तामूलपुर या छोट्या गावातल्या खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रातल्या सहा तलवारपटूंची ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुढच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
****
बंगळुरु इथं भारत आणि न्यू��ीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत आज तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघानं आतापर्यंत ३१७ धावांची आघाडी घेतली आहे. संघानं आतापर्यंत ७ बाद ३६३ धावा केल्या. भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत संपुषटात आलं आहे.
****
महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात काल दक्षिण अफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. दुसरा उपांत्य सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात आज शारजाह इथं खेळला जाणार आहे.
****
आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस मुदखेड-नांदेड-मुदखेड दरम्यान आज अशतः रद्द करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयानं कळवलं आहे. ही रेल्वे अदिलाबाद इथून सकाळी आठ वाजता निघून ११ वाजून ५५ मिनिटांनी नांदेड इथं पोहाचते तसंच नांदेड इथून तीन वाजून पाच मिनिटांनी निघते.
दरम्यान, नरसापूर - नगरसोल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात आजपासून करण्यात आलेला बदल रद्द करण्यात आला आहे.
****
0 notes
Text
आज ‘करा किंवा मरा’
https://bharatlive.news/?p=117239 आज ‘करा किंवा मरा’
गयाना; वृत्तसंस्था : भारत आणि वेस्ट इंडिज ...
0 notes
Text
विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला- लवकरच मोठी इनिंग खेळणार आहे
विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला- लवकरच मोठी इनिंग खेळणार आहे
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज रोहित शर्मा विराट कोहली T20 मालिका: टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात बुधवारपासून कोलकातामध्ये टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. रोहितने माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॉर्मबद्दलही सांगितले. त्याने कोहलीच्या खराब फॉर्मबद्दलच्या चिंता फेटाळून लावल्या आणि सांगितले की जर त्याच्याशी संबंधित गोष्टी…
View On WordPress
#कोलकाता#कोलकाता T20 सामना#भारत वेस्ट इंडिज#भारत वेस्ट इंडिज T20 सामना#भारत वेस्ट इंडीज T20 मालिका#भारतीय कर्णधार रोहित शर्मा#भारतीय क्रिकेट संघ#रोहित शर्मा#विराट कोहली
0 notes
Text
दक्षिण आफ्रिकेवर इंग्लंडची मालिका जिंकल्यानंतर अद्यतनित केलेले WTC गुण सारणी: दुसर्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेची पकड दुसर्या स्लिप-अप नंतर कमकुवत झाली | क्रिकेट बातम्या
दक्षिण आफ्रिकेवर इंग्लंडची मालिका जिंकल्यानंतर अद्यतनित केलेले WTC गुण सारणी: दुसर्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेची पकड दुसर्या स्लिप-अप नंतर कमकुवत झाली | क्रिकेट बातम्या
केनिंग्टन ओव्हल येथील निर्णायक तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 9 गडी राखून पराभव करत पाहुण्यांविरुद्धची तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लंडने दुसऱ्या ���ामन्यात चांगले पुनरागमन करण्यापूर्वी प्रोटीज संघाने पहिली कसोटी एक डाव आणि १२ धावांनी जिंकली होती आणि त्यावर एक डाव आणि ८५ धावांनी शिक्कामोर्तब केले होते. दुसऱ्या सामन्यातील पराभवामुळे पाहुण्या दक्षिण…
View On WordPress
#इंग्लंड#ऑस्ट्रेलिया#क्रिकेट#दक्षिण आफ्रिका#न्यूझीलंड एनडीटीव्ही स्पोर्ट्स#पाकिस्तान#बांगलादेश#बांगलादेश u19#भारत#वेस्ट इंडिज#श्रीलंका
0 notes
Text
#INDvsWI: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 59 धावांनी जिंकला, सोशल मीडियावर चाहत्यांनी विजयासाठी अशाच काहीशा शुभेच्छा दिल्या...!
#INDvsWI: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 59 धावांनी जिंकला, सोशल मीडियावर चाहत्यांनी विजयासाठी अशाच काहीशा शुभेच्छा दिल्या…!
रोहित ब्रिगेडने शनिवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात 59 धावांनी विजय नोंदवला. संघाच्या या विजयावर भारतीय चाहते खूप आनंदी दिसत आहेत. ट्विटरवरही #INDvsWI टॉप ट्रेंडिंग आहे. यावर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. टीम इंडियाने चौथा T20 सामना जिंकला प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात 5 सामने T20 मालिका या सामन्यातील चौथा सामना आज म्हणजेच 6…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
'भारताच्या विजय झाला आणि पाकिस्तानला आनंद झाला'
‘भारताच्या विजय झाला आणि पाकिस्तानला आनंद झाला’
World Cup 2019मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज सामन्यात भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. भारतीय संघ सध्या 11 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या विजयानं पाकिस्तानला फायदा झाला आहे.
वेस्ट इंडिजचा संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. भारतीय संघ…
View On WordPress
0 notes
Text
भारत-वेस्ट इंडिज दरम्यान आज लढत
भारत-वेस्ट इंडिज दरम्यान आज लढत
हैद्राबाद: भारत-वेस्ट इंडिज यांच्यात आज पहिला टी-२० सामना सायंकाळी ७ वाजता हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर होणार आहे.
असे असणार संघ : भारत : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार. वेस्ट-इंडिज :कायरन पोलार्ड (कर्णधार), ऑलन , किंग, दिनेश रामदिन, कोट्रेल, लुइस, रूदरफोर्ड, हेटमायर,…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०९ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी होणाऱ्या या समारोहात भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानपदाची शपथ देतील.
या शपथविधी सोहळ्यात मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, पीयूष गोयल, रक्षा खडसे यांच्यासह सहकारी पक्षांचे प्रफुल्ल पटेल, प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांना आमंत्रण आल्याचं वृत्त आहे.
या कार्यक्रमाचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी पावणे ७ वाजल्यापासून केलं जाणार आहे, त्यामुळे संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी साडे ६ वाजता प्रसारित केलं जाईल
****
ईनाडू समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांच्या पर्थिवावर आज हैद्राबाद इथं त्यांनी उभारलेल्या रामोजी फिल्म सिटी मध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्याचं काल हैदराबाद इथं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. रामोजी राव यांनी तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम तसंच हिंदी भाषेत सुमारे ६० चित्रपटांची निर्मिती केली होती. रामोजी राव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
राज्यात हवामान खात्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आज सकाळी मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री आठ वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघानं युगांडाच्या संघाचा १३४ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडीजने दिलेल्या १७४ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना युगांडाचा संघ १२व्या षटकात सर्वबाद ३९ धावा करू शकला.
****
0 notes
Text
रवि शास्त्री ही बने रह सकते हैं के कोच
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड इस महीने में टीम इंडिया के कोच का चयन करेगा । बोर्ड ने कपिल देव की अध्यक्षता वाली ३ सदस्यीय सलाहकार समिति को नया कोच चुनने की यह जिम्मेदारी सौंपी है । वर्तमान कोच रवि शास्त्री को कोच चयन के लिए होने वाले इंटरव्यू में सीधे एंट्री मिली है । सूत्रों की माने तो वर्तमान कोच रवि शास्त्री ही टीम इंया के कोच बने रह सकते हैं । उन्हें अगले दों सालों तक अपने कार्यकाल का एक्सटेंशन मिल सकता है । क्रिकेटर से कॉमेंटेटर बने और फिर कोच बने शास्त्री का कार्यकाल आगामी २०२० टी२० वर्ल्ड कप तक बढ़ाया जा सकता है । अब से लेकर २०२१ तक भारत को दो टी२० चैंपियनशिप में हिस्सा लेना है, जिसमें वेस्ट इंडिज दौरे से ही टेस्ट चैंपियनशिप की शुरुआत हो चुकी होगी । इसके बाद २०२० से आईसीसी की वनडे चैंपियनशिप की शुरुआत भी हो जाएगी । ऐसे में फिलहाल शास्त्री को यह जिम्मेदारी दी जा सकती है कि वह टीम इंडिया के लिए आगे की रणनीति तैयार करे । Read the full article
0 notes
Text
होऊ दे खर्च! इंग्लंड ते वेस्ट इंडिज प्रवासावर BCCLने इतके कोटी खर्च केला
होऊ दे खर्च! इंग्लंड ते वेस्ट इंडिज प्रवासावर BCCLने इतके कोटी खर्च केला
होऊ दे खर्च! इंग्लंड ते वेस्ट इंडिज प्रवासावर BCCLने इतके कोटी खर्च केला India vs West Indies: भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. इंग्लंडवरून खेळाडू थेट वेस्ट इंडिजमध्ये पोहोचले. India vs West Indies: भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. इंग्लंडवरून खेळाडू थेट वेस्ट इंडिजमध्ये पोहोचले. Go to Source
View On WordPress
#“ते#bcclने#sports news#इंग्लंड#इंडिज#इतके#केला#कोटी#क्रीडा#खर्च#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#दे#प्रवासावर#भारत लाईव्ह मीडिया#वेस्ट#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या#होऊ
0 notes
Text
विराट कोहली शून्यावर आऊट, त्यानंतर सोशल मीडियावर युजर्स ट्रोल झाले, हे मीम्स व्हायरल होत आहेत
विराट कोहली शून्यावर आऊट, त्यानंतर सोशल मीडियावर युजर्स ट्रोल झाले, हे मीम्स व्हायरल होत आहेत
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज विराट कोहली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये ���ेळवला जात आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारताच्या पहिल्या तीन विकेट लवकर पडल्या. माजी कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे मीम्स शेअर केले जात…
View On WordPress
#अहमदाबाद#अहमदाबाद वनडे#टीम इंडिया#भारत वि वेस्ट इंडिज#भारत वि वेस्ट इंडीज#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघ#भारत वेस्ट इंडिज#विराट कोहली#विराट कोहली अहमदाबाद#विराट कोहली आउट व्हायरल मीम्स#विराट कोहली टीम इंडिया#विराट कोहली बाद#विराट कोहली बाहेर व्हायरल मीम्स#सोशल मीडिया प्रतिक्रिया
0 notes
Text
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: फ्लोरिडा क्राउड बेर्सर्क गेला, सॅमसनने सलाम करून प्रतिसाद दिला. पहा | क्रिकेट बातम्या
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: फ्लोरिडा क्राउड बेर्सर्क गेला, सॅमसनने सलाम करून प्रतिसाद दिला. पहा | क्रिकेट बातम्या
फ्लोरिडामध्ये जमावाला सलाम करताना संजू सॅमसन.© ट्विटर भारताचा कर्णधार रोहित शर्मा गोल्फ कार्ट चालवतानाचा एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर खूप प्रशंसा मिळवत आहे. पाच सामन्यांच्या T20I मालिकेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा विजय साजरा करताना चाहत्यांचे मनोरंजन केले. व्हिडिओमध्ये, रोहित शर्मा रविवारी पाचवा आणि शेवटचा T20I सामना जिंकल्यानंतर फ्लोरिडा येथील लॉडरहिल क्रिकेट ग्राउंडवर त्याच्या…
View On WordPress
#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#भारत#राजस्थान रॉयल्स#वेस्ट इंडिज विरुद्ध भारत 2022 एनडीटीव्ही स्पोर्ट्स#संजू विश्वनाथ सॅमसन
0 notes
Text
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला - सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली 'रन मशीन'ची समस्या
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या ��ॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला – सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली ‘रन मशीन’ची समस्या
भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. तो म्हणतो की विराट कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. तो म्हणाला की खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाजाच्या फॉर्ममध्ये काय अडथळा आणत आहे याची मला जाणीव आहे. गावस्कर म्हणाले की, त्यांचा सल्ला कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यास…
View On WordPress
#इंड विरुद्ध इंजी#क्रिकेट बातम्या#टीम इंडिया#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोर आज#विराट कोहली#विराट कोहली क्रिकेट बातम्या#विराट कोहली फॉर्म#विराट कोहली ब्रेक#विराट कोहली भारतीय क्रिकेट#विराट कोहली सुनील गावस्कर यांची मुलाखत#विराट कोहलीचा फॉर्म#विराट कोहलीची कारकीर्द#सुनील गावस्कर#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशविरोधी कारवाया करणाऱ्या पीएफआय संघटनेच्या १४ ठिकाणांवर एनआयएचे छापे, कोल्हापूर, नाशकातही कारवाई, मालेगावातून एक संशयित ताब्यात.
औरंगाबाद इथल्या महाआरोग्य शिबिरामध्ये विक्रमी साडेतीन लाख नागरिकांची तपासणी, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा.
ठाण्यातल्या महापालिका रुग्णालयात घडलेली दुर्घटना दुर्दैवी, रुग्णांच्या जीवाशी हेळसांड करणाऱ्यांना कठोर शासन करणार - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती.
आणि
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा टी-ट्वेंटी सामना थोड्याच वेळात.
****
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन हा आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा समारोप असेल. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची पूर्ण रंगीत तालिम आज लाल किल्ल्यावर झाली. यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येनं पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. देशभरातून विविध व्यवसायातील सुमारे एक हजार ८०० विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आलं आहे. शासनाच्या जनभागीदारीच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या विशेष पाहुण्यांमध्ये ६६० हून अधिक गावांचे ४०० पेक्षा अधिक सरपंच, शेतकरी उत्पादक योजनेचे २५० प्रतिनिधि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे प्रत्येकी ५० ला��ार्थी, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातले ५० श्रमयोगी यांचा यात समावेश आहे. दरम्यान, मंत्रालयातही आज स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगीत तालीम झाली.
****
धार्मिक विद्वेष पसरवित देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेच्या विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने आज छापे मारले. पाच राज्यांमधील १४ ठिकाणी एनआयएने ही कारवाई केली. राज्यातील कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले. या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे. एनआयएनं या कारवाईत डिजीटल साहित्य तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
****
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. औरंगाबद इथं महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी बोलत होते. राज्यशासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, तळागाळातल्या गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असं फडणविस यांनी सांगितलं.
ते म्हणाले -
महाआरोग्य शिबीर हे लाखो लोकांना जर आरोग्य सेवा देत असेल तर मी निश्चितपणे त्याला येईल म्हणून सांगितलं. आणि आज साडेतीन लाख पेशंटस्चं या ठिकाणी स्क्रिनिंग करण्याचा विक्रम हा या महाआरोग्य शिबीराने केलाय. आणि यापैकी ज्यांना ज्यांना इंटरव्हेंशनची आवश्यकता आहे, त्यांच्याकरता कितीही महाग उपचार असले तरीदेखील ते सगळे उपचार शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना निरोगी करेपर्यंत सगळ्या प्रकारचे उपचार या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, त्यासाठी बजेटमध्ये सहा पटीने वाढ करण्यात आली आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी म्हणाले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगर पालिका आयुक्त जी. श्रीकांत आणि मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांक���त डॉक्टर्स उपस्थित होते.
****
ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून अशाप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे. ते पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. नेमकं काय घडलं याची माहिती आम्ही घेत आहोत, रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का ही बाब अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असं सावंत म्हणाले.
****
माजी मुख्यमंत्री, विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरीकांसाठी इंडियन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडियन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १४ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात २०० पेक्षा अधिक रूग्णालयांचा सहभाग असल्याची माहिती लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
दरम्यान, विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लातूरच्या बाभळगाव चौक ते पोलीस मुख्यालय रस्त्यावर दुतर्फा ९०० विलास वृक्षांचे रोपण ग्रीन लातूर वृक्ष टीमकडून करण्यात आले. वड, उंबर, पिंपळ, पारसी पिंपळ, कडुलिंब, आकाश मोगरा, बहावा, बेल, नादुर्गी, तामन, शिवण, शाल्मली, पांगारा अशा विविध प्रजातींची ९०० मोठी झाडे लावण्यात आली. जिल्ह्यात सव्वा लाख लहानमोठी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे कार्य ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून सुरू आहे.
****
बीड जिल्ह्यात मुलींचे बालविवाह थांबविण्याचा एक भाग म्हणून जनजागृतीसाठी उद्या विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली निघेल. ही रॅली छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, कारंजा रोड, बलभीम चौक, टिळक रोड, माळी वेस या मार्गावरून जाईल. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.
****
मेरी माटी मेरा देश अभियांनातर्गत जालना महानगरपालिकेत आज केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ध्वज वंदना करत अमृत कलशच अनावरण करण्यात आलं. चमन परि��रात बचत गटातर्फे ध्वज विक्री स्टॉलचं उदघाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानतंर आरोग्य विभागातर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी स्टॉलचंही उद्घाटनही दानवे यांनी केलं. आमदार कैलास गोरंट्याल, महापालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
हत्तीबेट पर्यटन स्थळांना राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास केला जाईल, असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी केलं. लातूरच्या हत्ती बेट इथल्या ३ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज बनसोडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हत्ती बेट जिल्ह्यातलं पहिलं 'ब' दर्जाचं पर्यटन स्थळ आहे. या लेणीचा विकास वेरुळ-अजिंठा लेणींच्या धर्तीवर करावयाचा असून विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
****
काकासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचं हे १३ वं वर्ष आहे.
दरम्यान, अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त मुंबईच्या वरळी इथल्या आचार्य अत्रे स्मारक समितीच्या वतीनं आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ५ टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज फ्लोरिडातल्या लॉडरहिल इथं होणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले असून मालिकेत दोन्ही संघांची सध्या २-२ अशी बरोबरी आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल.
****
जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या मार्गिकेच्या कामांमुळे मध्य रेल्वे विभागानं काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द केल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे,
आज आणि उद्या नांदेड - मुंबई आणि परतीची मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस आज आणि उद्या नगरसोल ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर उद्या आणि परवा मुंबईहून नांदेडकडं येणारी तपोवन एक्सप्रेस नगरसोल ते नांदेड दरम्यान धावेल.
सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस आज आणि उद्या १४ तारखेला मार्ग बदलून धावणार आहे. त्यामुळं परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी ही स्थानकं वगळण्यात आली आहेत. उद्या आणि परवा १५ तारखेला मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आल्यानं मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी या स्थानकांदरम्यान ही गाडी धावणार नाही.
****
0 notes