#प्रवासावर
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
भाषा ही सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा-अभिधम्म दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
लॉरेन्स बिष्णोई टोळीतल्या निशाणेबाजाला हरियाणातल्या पानिपत इथून अटक
रेल्वे प्रवासासाठीचं आरक्षण आता १२० ऐवजी ६० दिवसआधी करता येणार
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसकडून रविंद्र वसंत चव्हाण यांना उमेदवारी
आणि
न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या सर्व बाद ४६ धावा- विराट कोहलीसह पाच खेळाडू शून्यावर बाद
****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, अस�� त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित, नागरिकत्व कायद्याच्या कलम ‘६ अ’ ची घटनात्मक वैधता, सर्वोच्च न्यायालयानं आज चार एक अशा बहुमतानं कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आसाम करार, हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवरचा राजकीय उपाय होता, असं निरीक्षण न्यायालयानं हा निर्णय देताना नोंदवलं. १९८५ मध्ये आसाम करारानंतर कलम ‘६ अ’ समाविष्ट करण्यात आलं होतं. २०१९ साली आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी साठी हे कलम आधारभूत मानलं गेलं होतं. कलम ‘६ अ’ ने आसामसाठी एक विशेष तरतूद तयार केली, ज्याद्वारे १ जानेवारी १९६६ पूर्वी बांगलादेशातून आलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना त्या तारखेपर्यंत भारताचे नागरिक मानलं गेलं.
****
दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आज नाशिक ते दिल्ली ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. एक हजार ६०० मेट्रिक टन कांदा घेऊन निघालेली ही विशेष रेल्वे गाडी, येत्या २० ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून, त्यानंतर हा कांदा दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज ही माहिती दिली. लखनौ, वाराणसी आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये देखील लवकरच कांदा एक्स्प्रेस गाड्या रवाना होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
****
मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आणखी एका निशाणेबाजाला हरियाणातील पानिपत इथून अटक केली आहे. सुखा असं आरोपीचं नाव असून, त्याच्यावर अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. बिष्णोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा धमक्या दिल्या गेल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार अस���्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
गेल्या जून महिन्यात राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.
****
रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हणजे सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता येतं, या निर्णयाचा सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देश तसंच राज्यांच्या विकासासाठी, जनहितासाठी अनेक निर्णय घेतले असून प्रवक्त्यांनी सरकारची कामं तसंच पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जोपर्यंत प्रवक्ते आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार नाही तोवर ते तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत, याकडे त्रिवेदी यांनी लक्ष वेधलं.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागास सहकार्य करावं असं आवाहन आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची, किंवा रोख रकमेचे वाटप होत असल्याची किंवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय मिळाल्यास माहिती १८-००-२३३-०३५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ९४ ० ३३ ९० ९८ ० या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसने रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडण��क होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहण��, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्व���यारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसेच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी दिली.
****
वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिरसाठ यांनी महापालिकेत १५ वर्ष नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कसोटी क्रिकेट क्रमवारीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या पहिला डावात अवघ्या ४६ धावात तंबूत परतला. भारताची ही देशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरुच शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण ५ खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. या कसोटीचा हा दुसरा दिवस आहे. पावसामुळं काल पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. आजचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या तीन बाद १८० धावा झाल्या होत्या.
****
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली.
****
धाराशिव नगरपालिकेतील विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील कचरा संकलन आणि त्यावर प्रक्रिया करून बायोमायनिंग प्रकारच्या प्रक्रियेला कार्यान्वित कण्याअच्या प्रकल्पात हा ��ोटाळा झाला होता, भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वारंवार पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशावरून विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज अश्विनी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या पक्षकरांची तडजोड पात्र दिवाणी तसंच फौजदारी अपीलं उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी आहे. संबधीत पक्षकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
होऊ दे खर्च! इंग्लंड ते वेस्ट इंडिज प्रवासावर BCCLने इतके कोटी खर्च केला
होऊ दे खर्च! इंग्लंड ते वेस्ट इंडिज प्रवासावर BCCLने इतके कोटी खर्च केला
होऊ दे खर्च! इंग्लंड ते वेस्ट इंडिज प्रवासावर BCCLने इतके कोटी खर्च केला India vs West Indies: भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. इंग्लंडवरून खेळाडू थेट वेस्ट इंडिजमध्ये पोहोचले. India vs West Indies: भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर दाखल झाला आहे. इंग्लंडवरून खेळाडू थेट वेस्ट इंडिजमध्ये पोहोचले. Go to Source
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
"हे काय नौटंकी आहे, मोदीजी?": मनीष सिसोदिया यांनी परदेशी प्रवासावर बंदी घालण्याचा आरोप केला
“हे काय नौटंकी आहे, मोदीजी?”: मनीष सिसोदिया यांनी परदेशी प्रवासावर बंदी घालण्याचा आरोप केला
सीबीआयने शुक्रवारी मनीष सिसोदिया यांच्या घराची झडती घेतली होती नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज एका ता��्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि आरोप केला की, मद्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध लुकआउट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आले आहे, जेव्हा ते “फिरते आहेत. दिल्लीत मुक्तपणे. श्री. सिसोदिया यांनी…
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
कणकवली - कोल्हापुर एसटी फेरी सुरू करा!
कणकवली – कोल्हापुर एसटी फेरी सुरू करा!
कणकवली���ील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची विभाग नियंत्रकांकडे मागणी विभाग नियंत्रकां कडून सकारात्मक प्रतिसाद एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यावर दोन महिने उलटून गेले. यामुळे एसटी प्रवासावर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. संपात सहभागी झालेले काही चालक-वाहक कामावर रुजू झाले असल्याने जिल्हा अंतर्गत एसटी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार-उदीम हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
granddreamerkingdom · 3 years ago
Text
‘जगातील 13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे सक्तीने क्वारंटाईन होणार’
‘जगातील 13 देशांमधून येणाऱ्या प्रवाशांचे सक्तीने ��्वारंटाईन होणार’
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमीक्रॉन नं जगभरात अनेक देशातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. या व्हेरिएंटमुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमीक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने लोकांमध्ये पसरत असल्याचं WHO चं म्हणणं आहे. या व्हेरिएंटचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य विभागाने राज्यातील टास्क फोर्स, जिल्हाधिकारी आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.09.2024   रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी 
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकीय तसंच प्रशासकीय आढावा बैठका
नांदेड जिल्ह्यात नेरली इथं दुषीत पाणी प्यायल्याने पंधरा मुलांसह दोनशे जणांना विषबाधा
जागतिक पर्य��न दिन विविध कार्यक्रमांनी साजरा -रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
आणि
मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश
सविस्तर बातम्या
मंकी पॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव-प्रसारावर लक्ष ठेवणे, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा तसंच विलगीकरणाच्या सोयी उपलब्ध करुन देणे, या बाबींकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
दरम्यान, शासनानं यकृताच्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज या आजारावरील सुधारित मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशिक्षण पुस्तिका जारी केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजनही यावेळी होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.  आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानं काल विविध राजकीय पक्षांसोबत तसंच ठाणे, पुणे, पालघर आणि मुंबईसह विविध जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. उर्वरित विभागांचा आढावा आज घेतला जाणार आहे.
भाजपा आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे सूचना मांडल्या आहेत. मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशीचा असू नये, प्रत्यक्षात बदली झालेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा अशा सूचनांचं पत्र शेलार यांनी आयोगाकडे सादर केलं आहे.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्ठ नेते रोहिदास चुडामण पाटील यांचं काल धुळे इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. विविध मंत्रिपद भुषवलेल्या रोहिदास पाटील यांनी काँग्रेस पक्षातही अनेक पदं भुषवली. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
राजस्थानचे राज्यपाल ह���िभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा छत्रपती संभाजीनगर इथं काल पार पडला. ��ागडे यांनी नुकतेच ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं, त्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. बागडे यांच्या जीवन प्रवासावर आधारित 'माझा प्रवास' या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
जागतिक पर्यटन दिन काल साजरा झाला. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेचे निकाल काल जाहीर केले. विविध आठ श्रेणींमध्ये ३६ गावांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या कर्दे गावाला जाहीर झाला आहे. गावाचे सरपंच सचिन तोडणकर यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या...
कर्दे गावाने फक्त कोकणची जी संस्कृती आहे, ग्रामीण जीवन आहे, ते प्रेझेंट केलं होतं आणि त्या प्रेझेंटेशनला नॅशनल लेव्हला मान्यता मिळाली. आणि निश्चितपणाने आम्हाला सगळ्या कोकणवासीयांना गौरव आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं लोकार्पण पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल दूरदृश्यप्रणालीव्दारे झालं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं ‘शाश्वत पर्यटन - एक सहयोग पूर्ण वाटचाल’ या विषयावर काल कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ.शिवकुमार भगत, पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालिका जयदेवी पुजारी स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, पर्यटन मंत्रालयाच्या सहाय्यक संचालिका मालती दत्त यांनी ग्रामीण पत्रकारांशी संवाद साधत पर्यटन वाढीसाठी सहायक बाबींवर चर्चा केली.
दरम्यान, वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तेर इथं काल हेरिटेज वॉक घेण्यात आला. यात सहभागी नागरीकांनी त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, तीर्थकुंड, चैत्यगृह यासह दिवंगत रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
****
नांदेड जिल्ह्यात नेरली कुष्ठधाम इथं सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीतील दुषीत पाणी प्यायल्याने पंधरा मुलांसह दोनशेहून जास्त गावकऱ्यांना विषबाधा झाली असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या रुग्णांना मध्यरात्री नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घटनेची माहिती घेत आरोग्य यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
****
कानपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेशदरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिला दिवसाचा खेळ पाऊस आणि पुरेशा प्रकाशाअभावी लवकर थांबवण्यात आला. बांगलादेशनं दिवसअखेर तीन बाद १०७ धावा केल्या आहेत.
****
मकाऊ खुल्या बॅडमिंटन महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात त्रिशा आणि गायत्री जोडीने तैवानच्या जोडीचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला. आज उपांत्य फेरीत या जोडीचा सामना तैवानच्या अन्य एका जोडीशी होईल.
दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत किदाम्बी श्रीकांतचा पराभव झाला.
****
लातूर जिल्ह्यातील वाडी-तांड्याच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी बोलीभाषेत शिक्षणासाठी विशेष वर्ग घेतले जाणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी ही माहिती दिली. मुरुड इथं बंजारा बोलीभाषा-मराठी प्रमाणभाषा कृति पुस्तिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी त्यांच्या मातृभाषेतील शिक्षण उपयुक्त ठरत असल्याने, हा निर्णय घेतल्याचं सागर यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पुढील ३० वर्षांसाठी तयार केलेल्या जलनितीचा मसुदा छत्रपती संभाजीनगर एम सी डॉट ओआरजी या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या जलनिती बाबत आपले आक्षेप आणि सूचना लेखी स्वरुपात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ६० दिवसांच्या आत दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातला सीना कोळेगाव सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. धरणाचे १७ दरवाजे उघडून तीस हजार घनफूट प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे चौदा हजार ६७२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्गसुरू आहे.
****
0 notes
digimakacademy · 5 years ago
Text
आर्थिक स्थिती नाजूक; या कंपनीने केली १० टक्के कर्मचारी कपात!
आर्थिक स्थिती नाजूक; या कंपनीने केली १० टक्के कर्मचारी कपात!
[ad_1]
नवी दिल्ली: करोना संसर्गामुळे विमान वाहतुकीला मोट्या प्रमाणावर फटका बसला आहे. लॉकडाउनमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय ��िमान प्रवासावर परिणाम झाला आहे. यामुळे आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे कारण देत इंडिगो या खासगी विमान कंपनीने १० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती कंपनीचे सीईओ रोणोजोय दत्ता यांनी दिली आहे.
एक प्रकारचे आर्थिक वादळ आल्यासारखे झाले असून या वादळात तग…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ पुन्हा पावसाचे संकट; जम्मूहून यात्रेकरूंची तुकडी निघणार नाही; प्रवासावर पुन्हा बंदी
Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ पुन्हा पावसाचे संकट; जम्मूहून यात्रेकरूंची तुकडी निघणार नाही; प्रवासावर पुन्हा बंदी
Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ पुन्हा पावसाचे संकट; जम्मूहून यात्रेकरूंची तुकडी निघणार नाही; प्रवासावर पुन्हा बंदी ढगफुटीनंतर अनेक तंबू आणि सामुदायिक किचन चिखल आणि ढिगाऱ्याच्या कचाट्यात सापडले होते. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मुंबईः दरवर्षी मोठ्या उत्साहात होणाऱ्या अमरनाथ यात्रेला…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
भारताच्या स्वातंत्र्यापासून रुपयाचा प्रवास, प्रति डॉलर ४ वरून जवळपास ८० पर्यंत
भारताच्या स्वातंत्र्यापासून रुपयाचा प्रवास, प्रति डॉलर ४ वरून जवळपास ८० पर्यंत
4 ते 80 पर्यंत: भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या रुपयाच्या प्रवासावर एक नजर नवी दिल्ली: भारत आपले स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे आणि पुढील २५ वर्षांमध्ये आपल्या लोकांसाठी एक लवचिक आर्थिक वृद्धी साकारण्याच्या मार्गावर आहे – ज्याला सरकार देशाचा “अमृत काल” म्हणते. अर्थव्यवस्थेचे इतर पैलू बाजूला ठेवून, 1947 पासून भारतीय चलन रुपयाने इतर जागतिक बेंचमार्क समवयस्कांच्या तुलनेत कशी कामगिरी केली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
इंग्लंडमध्ये घातक कोरोना, दिल्लीत तातडीची बैठक, विमान प्रवासावर पुन्हा संकट?
इंग्लंडमध्ये घातक कोरोना, दिल्लीत तातडीची बैठक, विमान प्रवासावर पुन्हा संकट?
​नवी दिल्ली​ ​: भारतात ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवांवर बंदी आणली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूनचे नवे रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
webnewswala · 4 years ago
Text
वडिलांची वर्षभराची कमाई फक्त अमेरिका प्रवासावर खर्च
वडिलांची वर्षभराची कमाई फक्त अमेरिका प्रवासावर खर्च
गुगल सीईओ सुंदर पिचाई यांनी एका विद्यापीठाच्या व्हर्चुअल पद्वीदान समारंभाला संबोधित करताना आपल्या आयुष्यातील किस्से सांगितले. नुकतेच झालेल्या या सेरेमनीचे संभाषण आता समोर आले आहे.
ही ग्रॅजुएशन सेरेमनी युट्यूबवर “Dear Class of 2020” या शीर्षकासह लाइव्ह स्ट्रीम करण्यात आली. यामध्ये पिचाई यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच आशावादी राहण्याचा सल्ला दिला. आपल्या संघर्षाची आठवण करताना पिचाई म्हणाले, “मी 27…
View On WordPress
0 notes
thebusinesstimes · 5 years ago
Text
सिंगापूर एयरलाईन्स म्हणतेय, 'फ्लाय विथ केअर'
सिंगापूर एयरलाईन्स म्हणतेय, ‘फ्लाय विथ केअर’
मुंबई : सध्याच्या कोविड-१९ आरोग्य आणीबाणीमुळे प्रवासावर सर्वप्रकारचे निर्बंध आले आहेत. जगातील बहुतांश देशांनी टाळेबंदी करून कोविड -१९ वर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता कित्येक देशांनी राज्यांतर्गत, देशांतर्गत तसेच राष्ट्रांतर्गत दळणवळण सेवा सुरु केली आहे. सिंगापूर एअरलाईनने देखील आपली सेवा सुरु केली असून, कोविड -१९ नंतरचा प्रवास अनुभव एकूणच बदललेला असणार हे संपूर्णतः लक्षात घेत आपल्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, AurangabadDate – 03 October 2023Time 7.10 AM to 7.25 AMLanguage Marathiआकाशवाणी औरंगाबादप्रादेशिक बातम्यादिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ सकाळी ७.१० मि.****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरात अभिवादन
पीक विम्याची २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न-कृषीमंत्री धनंजय मुंडे
नांदेड शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज नांदेड दौऱ्यावर
आणि
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरात काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केलं, तसंच सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. राजभवन परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा इथं गांधीजींचं वास्तव्य राहिलेल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
****
केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते काल मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग विभागाच्या खादी महोत्सवाचं उद्घाटन झालं. गांधीजींच्या विचारांची अंमलबजावणी करण्याचं काम खादी आणि ग्रामोद्योग विभाग करत असल्याचं, राणे यां��ी नमूद केलं.
****
मराठवाड्यातही सर्वत्र गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं.
‘‘छत्रपती संभाजीनगर इथं शहागंज परिसरात असलेल्या गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी, काल सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीनं शहरातल्या प्रोझोन मॉलमध्ये महात्मा गांधी यांच्या जीवन प्रवासावर आधारित चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात शंभरहून अधिक चित्रांचा आणि माहितीचा समावेश करण्यात आला आहे. ’’
‘‘जालना महापालिकेतल्या स्‍वच्‍छता विभागात उत्‍कृष्‍ट काम करणाऱ्या २२ महिला आणि पुरुष सफाई कामगारांचा, काल गांधी जयंती निमित्त सत्‍कार करण्यात आला.’’
‘‘नांदेड महानगरपालिकेच्यावतीनं गांधीजयंतीनिमित्त स्वच्छता फेरी काढण्यात आली. मनपा आयुक्त डॉ. महे��कुमार डोईफोडे यांनी उपस्थितांना स्वच्छता शपथ दिली.’’
‘‘हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गांधीजी आणि शास्त्रीजींना अभिवादन करण्यात आलं. नायब तहसिलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.’’
****
पीक विम्याची २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. नागपूर जिल्ह्यात २३ सप्टेंबरला झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसात नुकसान झालेल्या शेतीची, काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. विविध गावांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कृषीमंत्र्यांनी आपला ताफा अनेक ठिकाणी थांबवून पहाणी केली, तसंच भेटीसाठी आलेल्या शेतकरी बांधवांची निवेदनं स्वीकारून शेतकऱ्यांना मदतीबाबत आश्वस्त केलं.
****
बिहार राज्यसरकारने केलेल्या जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल काल प्रसिद्ध झाला. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबध्द कार्यक्रम महायुती सरकारने जाहीर करावा, अशी आग्रही मागणी, विधा��सभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
****
नांदेड इथल्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३० सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या सुमारे चोवीस तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये १२ प्रौढ रुग्णतर बारा नवजात अर्भकं होती. प्रौढ रुग्णामध्ये चौघांना हृदयविकार, एक रुग्ण विषबाधा, एक रुग्ण जठरव्याधी, दोन रुग्ण मूत्रपिंड व्याधी, एक प्रसूती गुंतागुंत, तीन रुग्ण अपघात आणि इतर आजार तर चार अर्भकं अंतिम अवस्थेत खाजगी रुग्णालयातून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचं, रुग्णालय प्रशासनाने कळवलं आहे.
रुग्णालयात अत्यावश्यक औषध साठा उपलब्ध असून, डॉक्टरांसह इतर कर्मचारी चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसात अत्यवस्थ रुग्ण विशेषत: अंतिम अवस्थेतील रुग्ण मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्याचं अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘डॉक्टर्स वगैरे सर्व 24 तास कार्यरत आहेत. डॉक्टर्स आणि औषधाची कुठलीही कमतरता नसून, या सर्वांना शर्थीचे प्रयत्य करूनही त्यांचे मुळातच आजार हे गंभीर स्वरुपाचे असल्याने त्यांचे मृत्यू झाले आहेत.’’
डॉ. एस. आर. वाकोडे
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी संदर्भात बोलताना, या ठिकाणी सहा जिल्ह्यातून दररोज दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सक्षम पथकासह दर्जा आणि सुविधांची वाढ होण्याची गरज व्यक्त केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे आज नांदेडमध्ये येत आहेत. ते शासकीय रुग्णालयास भेट देऊन घटनेची माहिती घेणार आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्याबाबत, ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट संग्रहालयासोबत सामंजस्य करार केला जाणार आहे. या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार काल लंडनला रवाना झाले. आज या करारावर स्वाक्षरी होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने काल तीन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली. पदकतालिकेत१३ सुवर्ण, २४ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६० पदकांसह भारत सध्या चौथ्या स्थानावर कायम आहे.
‘‘महिलांच्या स्टिपलचेस प्रकारात भारताच्या पारुल चौधरीने रौप्यपदक तर प्रितीने कांस्य पदक पटकावलं. स्पीड स्केटिंग प्रकारात महिला तसंच पुरुष संघांनी कांस्य पदकं पटकावली. टेबल टेनिस मध्ये महिला द���हेरीत सुतीर्था मुखर्जी आणि अयहिका मुखर्जी जोडीचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानं, कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एडापल्ली एनसी सोजनने रौप्य पदक जिंकलं.’’
‘‘दरम्यान, या स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धा प्रकारात सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, कृषिमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांच्यासह अनेकांनी अविनाशचं अभिनंदन केलं आहे. अविनाशच्या या कामगिरीबद्दल त्याचे वडील मुकुंद साबळे आणि आई वैशाली साबळे यांनी या शब्दात आपला आनंद व्यक्त केला:’’
‘‘काल जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक त्याने मिळवल्यामुळे मला मोठा भरपूर आनंद वाटतो. आपल्या मुलाने अविनाशने देशात एकदम नाव उंचावले. अविनाशने भरपूर कष्ट करुन या देशामध्ये नाव उंचावले, म्हणून खूप आनंद वाटतोय. भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय त्यानी, त्याचा सगळ्यांना आनंद आहे.’’
****
मेरी माटी मेरा देश अंतर्गत नाशिक जिल्ह्यात सुरगाणा इथं काल अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या कलशातली माती दिल्लीतल्या अमृतवाटिकेत नेली जाणार असल्यानं सर्वांना अभिमान वाटेल, असं मत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात राजनोली, पिंपळघर, कोनगांव आणि पिंपलस या गावांतही अमृत कलश यात्रा काढण्यात आली, दोनशे पेक्षा अधिक नागरिक यात सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीनं काल विविध मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. शिक्षकांकडून करून घेतली जाणारी अशैक्षणिक कामं बंद करावीत, शाळांचे खाजगीकरण करू नये यासाख्या विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.
****
नांदेड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल सात गावठी पिस्तूलासह ११६ जिवंत काडतुस हस्तगत केली. याप्रकरणी चौघांना अटक क���ण्यात आली, ही गावठी पिस्तूल हैद्राबाद इथं विक्रीसाठी नेत असल्याची माहिती समोर आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल झालेल्या बैठकीत, व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन भ��से यांनी दिलं, त्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलाव बंद आंदोलन मागे घेतलं.
****
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
अबब! मुख्यमंत्र्याच्या विमानप्रवासावर 'एवढा' खर्च
अबब! मुख्यमंत्र्याच्या विमानप्रवासावर ‘एवढा’ खर्च
मुख्यमंत्र्यांच्या विमानप्रवासावर कोट्यावधी रूपये खर्च झाला असून सध्या याचीच चर्चा सुरू आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या विमान प्रवासावर कोट्यावधी रूपये खर्च झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर, चॉपर, खासगी जेट विमानाच्या वाहतुकीसाठी तब्बल ५७ कोटी ६२ लाख १८ हजार रुपये खर्च आला आहे. माहिती अधिकारात ही माहिती नितीन यादव यांना…
View On WordPress
0 notes
healthandfitness146 · 6 years ago
Text
BHIM अॅप ऑफर : विमान प्रवासावर मिळणार ५ हजारांची सूट !
BHIM अॅप ऑफर : विमान प्रवासावर मिळणार ५ हजारांची सूट !
BHIM अॅपद्वारे घरगुती विमान प्रवासाचं तिकीट बूक केल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2wXmR6v
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Free Train Journey:  काय सांगता,  खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 5 वर्षात मोफत रेल्वे प्रवासावर 64 कोटींचा खर्च
Free Train Journey:  काय सांगता,  खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 5 वर्षात मोफत रेल्वे प्रवासावर 64 कोटींचा खर्च
Free Train Journey:  काय सांगता,  खासदारांच्या फुकट प्रवासासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 5 वर्षात मोफत रेल्वे प्रवासावर 64 कोटींचा खर्च Crore Spend over MP Rail Journey: एकीकडे फुकट्या प्रवाशांवर दातओठ खात कारवाईचा आसूड उगवणा-या रेल्वे खात्याची खासदारांच्या फुकट प्रवासावर मात्र दातखिळी बसली आहे. देशातील खासदार आणि माजी खासदारांनी गेल्या पाच वर्षांत मोफत रेल्वे प्रवासाचा भरपूर फायदा उचलला आहे.…
View On WordPress
0 notes