Tumgik
#बोलतं;
shrikrishna-jug · 8 months
Text
सर्जनशीलता.
मी श्री समर्थांना म्हणालो,“सर्जनशील असण्यात तुम्हाला कसं वाटतं?”मी काही तरी प्रश्न विचारून, एखादा विषय घेऊन त्यांना बोलतं करावं,याची जणू ते वाटच पहात होते. ते म्हणाले,“माझा सर्जनशील प्रक्रियेवर विश्वास आहे.जी प्रक्रिया काही तरी सुंदर,उपयोगी परिणितीतयेऊन घडली जाते.मी जरी त्याबद्दल साशंक असलो, तरी त्यातून प्रेरणा घेतो, सर्व शक्यता विचारात घेतो आणि अशा निर्णयाला येतो की,प्रगती थांबली पाहिजे परंतु…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
खा.शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा क्षेत्राचे विद्यापीठ : छगन भुजबळ
खा.शरद पवार म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, संस्कृती, क्रीडा क्षेत्राचे विद्यापीठ : छगन भुजबळ
पवार साहेबांना देशात आणि राज्यात संविधानावर अभिप्रेत शासन हवंय; त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा – छगन भुजबळ वाचाळवीरांना आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आवरावे छगन भुजबळ यांचे आवाहन मुंबई :- खा.शरदचंद्र पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण, विकास, शिक्षण, कला, संस्कृती, क्रीडा, साहित्य, शेती या विषयांचे चालत बोलतं विद्यापीठ आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं!
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं!
boAt Xtend Talk Watch : हे घड्याळ चक्क तुमच्याशी बोलतं; हवामान, ट्राफिकची माहिती देतं! boAt Xtend Talk Watch : ‘बोट’ने भारतात नवीन बजेट स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Xtend Talk मध्ये ब्लूटूथ कॉलिंगशी संबंधित नवीन वैशिष्ट्य आहे. स्मार्टवॉच अॅलेक्सा सपोर्टसह येते जेणेकरुन वापरकर्ते घड्याळाशी बोलू शकतील. boAt Xtend Talk Watch : ‘बोट’ने भारतात नवीन बजेट स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Xtend Talk…
View On WordPress
0 notes
Text
दशरथपुत्र रामाला पुरुषोत्तम राम बनवणाऱ्या अनेक घटनांपैकी अहिल्याउद्धार हा रामायणातील एक महत्वाचा प्रसंग!
अहिल्या आणि गौतमऋषी समर्पित भावनेनेने सहजीवन जगत होते.अतिमोहक आणि लावण्यवति अहिल्येची अभिलाषा देवराज इंद्राच्याही मनात जागृत झाली. एकदा गौतम ऋषी साधनेसाठी एकांतवासात गेलेले पाहून त्याने डाव साधला.गौतमऋषीचच रूप घेऊन तो तिला सामोरा आला .पती परतल्याच्या आनंदात अहिल्या इंद्रालाच पती समजून त्यात ती रममाण झाली.(काही ठिकाणी सामंताचं रूप आणि संपत्ती पाहून अहिल्या स्वतः पथभ्रष्ट झाली असाही उल्लेख आहे.)
गौतम ऋषी परतले.सगळा गोंधळ लक्षात आला.शापाच्या भयाने इंद्र /सामंत लगेच पळून गेला.अहिल्या अनावधानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागू लागली.ऋषी कोपले आणि तू शीळा हो असा शाप दिला.तीच शीळा रामाच्या पदस्पर्शाने पुनित होऊन परत अहिल्या झाली.
ऋषी कोपले.शिव्या शाप दिले,अकांडतांडव करत अहिल्या किती व्याभिचारी आणि पापी आहे हे आजूबाजूच्या आश्रमवासियांनाही ओरडून सांगितलं.तिचा त्याग करून हिमालयात तपश्चर्येसाठी निघून गेले.
आत्मभान आलेली अहिल्या झाल्याप्रकाराने पश्चातापाच्या अग्नीत होरपळून निघाली.कुणाशी बोलेनाशी झाली .आश्रमातून बाहेर पडत नव्हती.एकाच जागी बसून जगू लागली.आजूबाजूचे आश्रमवासी तिला अन्न पाणी देत पण बोलत मात्र नसत.जितकं शरीराला जरूरी तितकं सेवन करून परत दगडासारखं निश्चल बसून रहाणं हेच तिचं जीवन झालं.ना तिने आपल्या वागण्याची कुणाला सफाई दिली ना तिला धिक्कारलेल्या लोकांना शाप दिले.
राम आले.शिलावत् असलेल्या अहिल्येला बोलतं केलं. स्वतः रामानेच पुढाकार घेतल्याने बाकीचे आश्रमवासीही बोलू लागले.आता तिच्या मनात ना काम होता ना क्रोध ना कोणती इच्छा,एकदम निर्विकार !वर्षानुवर्षे एकटीनेच काढल्याने मन परमात्म्यात आपोआपच गुंतुन निर्मळ झालं होतच.वाळीत टाकलेल्यांना आपलंसं करून रामाने समाजापुढे नवा आदर्श ठेवला होता.
इकडे गौतम ऋषी हिमालयात गेले.वर्षानुवर्षे तप करण्यात घाल���ली.पण दैनंदिन कामे करतानाही मनाच्या एका कोपऱ्यात अहिल्येचा अप्रमाणिकपणा आणि त्यामुळे येणारा क्रोध धुमसतच होता.विश्वामित्रांसेबत राम लक्ष्मण त्यांच्या भेटीला आले.थोडी धर्म,न्याय यावरील चर्चा झाली.
राम म्हणाले,”मुनिवर्य आपण इतक्या दुर कोणती सिद्धी प्राप्त करण्या साठी आलात?”
“सिद्धी…?ती तर मी कुठेही तप केलं तर मला मिळू शकते.अहिल्येमुळे झालेला मनस्ताप विसरण्यासाठी मी इतक्या दूर आलोय .”
राम म्हणाले ,” मग आता आपण साध्वी अहिल्येचा परत स्वीकार करून सहजीवनास प्रारंभ करावा.”
“ते कदापिही शक्य नाही ,रामा!”
“महात्मन् जे विसरण्यासाठी आपण सर्व सोडून इतक्या दूर आलात….ते साध्य नाही झालं?”
“ त्या व्यभिचारिणीचं नावही माझ्या समोर काढू नकोस ! तिचं अप्रामाणिक वर्तन मी कधीच विसरू शकणार नाही ,अशक्यच ते !”
“मुनिवर,मातेने तर तिची चुक नसतानाही,तिच्यासोबत धोका झालेला असुनही ,न केलेल्या पापाचं प्रायश्चित्त घेतलं,एकांतवास स्वीकारून,मनातून ती गोष्ट ,तुम्ही दिलेला शाप आणि क्रोध सगळं त्या विसरल्या,ना त्यांनी स्वतःचं स्थान सोडून परिस्थिती पासून पलायन केलं ना कुणाला दोष दिला.अजाणता का होईना आपल्याकडून चुक झाली हे मान्य करून ,पश्चाताप करून स्वतःला सुधारलं आणि आपण इतक्या दूर येऊन,स्थळ,परिस्थिती सगळं मागे सोडून,अजून मनातला क्रोध संपवू शकला नाहीत.मग हिमालयात येण्याचा फायदाच काय? आपण मातेइतके परमात्म्यात एकाग्र झालेले दिसत नाहीत,इतकी शांतता असुनही ! इतके दिवस हउनही तुम्ही तिला क्षमा करणं तर सोडाच,पण मनातला क्रोधाग्नि मात्र विझू दिला नाहीत.”
ऋषींना भान आलं आणि आश्रमात परतून सर्वांसमक्ष प्रेमाने अहिल्येचा स्वीकार करून पुर्ववत सहजीवन सुरू झालं!
मनातला राग ,लोभ द्वेष, विषण्णता,ईर्ष्या ,असुया,क्रोध ,तिरस्कार कधीही बाह्य जगत बदलून,संन्यास घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीपासून दूर राहून कधीही निघत नाही,कारण ह्या सगळ्या भावना निपजत असतात मनातच! आपलं मन तर कुठेही गेलं तरी आपली सोबत सोडणारच नसतं !! उलट काही घटनांचं तर दूर गेल्यावर जास्त चिंतन चालू असतं मनात आणि जास्त तीव्रतेने या भावना आपल्याला छळू लागतात.
स्थळ ,सोबत ,कार्य बदलण्यापेक्षा एखाद्या व्यक्तींबद्दलचे,घटनेबद्दलचे मनातील नकारात्मक विचार काढून टाकले तरच आनंदाची,सहजतेची,स्वीकारभावाची अनुभुति आपण घेऊ शकू !
रश्मी.
0 notes
aajlatur · 6 years
Photo
Tumblr media
वेगळा प्रयोग, पत्रकाराने केलं पत्रकाराला बोलतं #AajLatur #Share #ProudLaturkar #Comment #MH24 #LaturNews
0 notes
dipthebond007 · 8 years
Text
Incomplete Mahabaleswar Trip
मी तसा जास्त बोलणारा प्राणी नाही, मला कमी बोलायला आवडतं. त्यामुळे स्वतःहून  कुणाशी ओळख वगैरे करण्याच्या फंदात मी पडत नाही. अनोळखी व्यक्तींपासून मी जरा दूरच राहतो. का कुणास ठाऊक, पण नाही आवडत मला कुणाशीही स्वतःहून बोलायला.  अगदी सुरुवातीपासुनच, म्हणजे लहान होतो तेंव्हापासूनची हि सवय. होय सवयच म्हणावी लागेल आता.
त्याची अन माझी ओळख कशी झाली आणि कधी आम्ही घनिष्ट मित्र झालो हे काही आठवत नाही. एवढं मात्र आठवतंय कि, ज्यावेळी मी रवी ला भेटायला अमरापूरला जायचो त्यावेळी हा हि तिथे असायचा. रवी माझा जवळचा मित्र जो माझा वर्गमित्र होता आणि नंतर जिवलग मित्र बनला.  या दोघांचं काय बोलणं चालायचं मला काही कळायचं नाही. सर्व डोक्यावरून जायचं.  अगदी तासनतास काय गप्पा मारायचे त्यांनाच ठाऊक. मला वाटायचं कि पूर्ण गावाची चिंता करण्याचे काम यांच्याकडेच आहे. मी मात्र त्यांच्या सोबत असतांना खुंटीला बांधलेल्या बोकडासारखा कधी रवीकडे तर कधी त्याच्याकडे पहायचो व नुसतीच मान हालवायचो, कधी उत्सुक्तेने, कधी प्रश्नार्थक नजरेने तर कधी काही समजल्याच्या अविर्भावात. ते त्यांच्या गप्पांमध्ये एव्हढे रंगलेले असायचे कि माझे अस्तित्व हे शुण्याप्रमाणे असल्यागत व्हायचे. मलाच कधी कधी गळ्यातून चित्र विचित्र आवाज काढून किंवा बळेच खोकून त्यांचे लक्ष वेधून घ्यावे लागायचे. ज्यावेळी कथा, कादंबर्या, चित्रपट, गाणी आणि टेक्नोलॉंजी असे विषय निघायचे त्यावेळीच मला संधी मिळायची तोंड उघडण्यासाठी, अन जसे कि मी सांगितले मी जास्त बोलत नाही त्यामुळे माझे विषय लवकर संपायचे आणि मग मला पुन्हा गप्प बसण्याशिवाय पर्याय नसायचा व मी पुन्हा एक उत्तम श्रोता बनायचो. असो ! कदाचित त्यांच्या या अघळ पघळ बोलण्यामुळेचं मला पण थोडे फार बोलण्याचे कौशल्य प्राप्त झाले असेल नाहीतर हा जो आज मी इतकं बोलायला लागलो ते काय उगाचंच का!
त्याचा मित्र परिवार खूप मोठा, लहानांपासून तर अगदी मोठ्यांपर्यंत. त्याचं बोलणही सगळ्यांशी आपुलकीचं त्यामुळे कुणीही त्याला आपला अगदी जवळचा मित्रच समजतो आणि तो तसा आहेही. सर्वांशी अगदी सलोख्याने आणि प्रेमाने वागणारा एक आदर्श मित्र. त्यामुळे जर कुणीही म्हणाले कि महेश माझा जवळचा मित्र आहे तर तो आहे, त्यात काही दुमत नसेल. होय ! इतक्यावेळ मी महेश बद्दलच बोलत होतो. महेश मला दोन इयत्तेने जेष्ठ आहे. पण आम्ही समविचारी असल्यामुळे मला तसे कधी जाणवले नाही.
इतरवेळी शांत असणारा मी त्याच्यासोबत मात्र तासनतास गप्पा मारत असे. आम्हाला बोलण्यासाठी विषयांची कमतरता भासत नसत. आमच्यासोबतचे इतर मित्र वैतागून जायचे, अन म्हणायचे कि इतकं काय बोलता तुम्ही. कित्तेकदा असे झालेय कि मी आणि महेश बोलत बसलोय आणि बऱ्याच जणांनी आम्हाला जाता येता विचारलंय कि, तुम्ही अजून इथचं बोलतं बसलात काय? घरून पन्नास ते साठ वेळा फोन यायचा, कधी येतोय घरी विचारायला. पण आमचे बोलणे काही केल्या संपत नसायचे. नंतर नंतर तर घरी सांगायची गरज पडत नसे कि मी कुठे चाललोय किंवा कुणा सोबत आहे. घरचे समजून जायचे कि एकतर रवी सुट्टीला आला असेल म्हणून आपला मुलगा उशिरा घरी येतोय किंवा मग महेश सोबत असेल.
जर एखाद्याची चेष्टा आम्ही (मी आणि महेश) करायची ठरवली तर समोरचा एकदम त्रस्त होऊन जात असे. अर्थातच आम्ही फक्त गंमत म्हणून टांग खेचायचो. कुणालाही दुखः पोहचवण्याचा आमचा कधीही उद्देश नसायचा आणि समोरचा चिडत असेल तर मग थोडीशी चेष्टा करण्यात काय वाईट आहे. यावरूनच एक किस्सा मला आठवतोय. माझा अजून एक घनिष्ट मित्र आहे नितीन (मूळ नाव बदललेले आहे फक्त त्याला वाईट वाटू नये म्हणून) जो महेशचा पण जवळचा मित्र आहे. मी जेंव्हा पतसंस्थेत नोकरी करत होतो तेंव्हा नितीन पुण्याला नोकरीला होता. तो महिन्यातून एकदा तरी दोन दिवसांसाठी पुण्याहून गावाकडे यायचा. तो गावी आल्यावर आम्ही दोघे कित्तेकदा एकत्र अमरापुरला महेशला भेटण्यासाठी जायचो. त्यावेळीही आम्ही (म्हणजे मी आणि महेश )त्याची किंवा तो आमची हलकी फुलकी चेष्टा करायचो. पण त्यावेळी त्याने कधी राग धरला नाही, महेश आणि मला तर आमची चेष्टा केल्याचा काहीचं फरक पडत नसे. कारण आम्ही ते हसण्यावारी घ्यायचो आणि मैत्री म्हटलं कि चेष्टा मस्करी आलीचं.
नंतर काही वर्ष्यानी नितीनचे लग्न झाले आणि त्याचे गावाकडच्या मित्रांमध्ये बसने उठणे कमी झाले. याला अनेक करणे असतील, लग्न म्हणजे जबाबदारी. दोन कुटुंब एकत्र येतात, अनेक गोष्टी असतात, मला सर्वच माहिती आहेत असे नाही. आणि अश्यावेळी सहाजिकच मित्रांऐवजी घरच्यांना आणि घरातील नवीन व्यक्तीला जास्त वेळ देणे गरजेचे असते. आम्हाला या सर्व गोष्टी कळत नव्हत्या असे नाही पण आपला मित्र कितीही विवंचनेत असो वा आनंदात असो, चेष्टा, मस्करी करणे गरजेचे असते, जास्त गंभीर राहून सर्व प्रश्न सुटत नाहीत, तसे ते चेष्टेनेही सुटत नाहीत पण हसून खेळून त्याला सामोरं जाता येतं. मस्करी मित्र ���रणार नाहीत तर कोण करणार हे ब्रीद वाक्य समजून आम्ही त्याप्रमाने आमचा मैत्रीचा आहेर आम्ही त्याला वेळो वेळी देत राहिलो. पण त्याने कधीही या गोष्टीचा त्रास होत असल्याची कबुली दिली नाही व आम्हीही समजत गेलो कि तो समंजस आहे त्यामुळे आपण केलेली मस्करी तो गंभीरतेने घेणार नाही. आमचा उद्देश नेहमीच सात्विक होता. तसा तोही काही कमी नव्हता आम्हा दोघांना कधी कधी तो भारी पडायचा. तो राजा हरिश्चंद्र आंनी आम्ही ऋषी विश्वामित्र असे काही नव्हते. तोही चांगलीच परतफेड करायचा. अश्या या आमच्या मजेशीर मैत्री मध्ये फक्त चेष्टा, मस्करी एव्हढेच नाही तर इतर कोणत्याही परिस्थिती मध्ये एकमेकांच्या सोबत उभे राहण्यास आम्ही तत्पर असायचो, आत्ता हि तसेच आहोत. आम्हाला पुसटशी देखील कल्पना नव्हती कि आमच्या या नेहमीच्या खेळीमेळीच्या स्वभावाने  तो इतका त्रस्त होईल आणि एकदिवस असं काही करेल कि आमच्या सततच्या चेष्टा, मस्करी करण्याला खुंट बसेल, अन तसे झालेही.    
काही वर्ष्यांनी मी ही नोकरी करण्यासाठी पुण्याला आलो. मला पुण्यात येऊन २ वर्षे झाली असतील तेंव्हाची हि गोष्ट आहे. खूप दिवस झाले होते मी, महेश आणि नितीन एकत्र आलो नव्हतो. त्यामुळे आम्ही एकत्र कुठे तरी बाहेर जाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. जेथे आम्हाला एकमेकांशी खूप काही बोलतं येईल आणि जास्त वेळ सोबत व्यतीत करता येईल. एक प्रकारची छोटीशी सहलचं. साहजिकच मला ठरवायचे होते कि कुठे जायचे. मी पुष्कळ विचार करून आणि विविध मार्गांनी माहिती काढून, एक स्थळ निवडले. मी लगेच नितीनला फोन केला आणि विचारले, अरे नितीन! “महाबळेश्वरला जाण्यासंबंधी तुझा काय विचार आहे”. वाह! मस्त स्थळ निवडलंय, माझी काही हरकत नाही आणि तसेही आपल्याला ४ दिवस सुट्टी आहे. एक मुक्काम करावा लागला तरी चालेल, नितीन उत्तरला.
“छान! मग मी लगेच महेशला कळवतो. मी म्हणालो.  “ ठीक आहे सांगून टाक आणि महेशला सांग कि १ दिवस अगोदर ये पुण्याला. नितीन म्हणाला.
मी लगेच महेशला कळवले कि आपण महाबळेश्वर ला जातोय तर तू तयारीला लाग. तुझी गावाकडची कामे उरकून घे आणि लवकर पुण्याला ये. महेश ने ही संमती दर्शविलीआणि आमचे महाबळेश्वरला जायचे निश्चित झाले. मी तर जाम खुश होतो कि किती छान झालं, आता सगळे पुन्हा एकत्र येऊन मस्त धमाल करू, हिंडू, फिरू, छान छान फोटोज काढू. निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेऊ. अन याहीपेक्षा मला आम्ही तिघे एकत्र भेटणार याचा आनंद जास्त होत होता.
महाबळेश्वरला जाण्यासाठी शनिवार निश्चित झाला होता. महेश शुक्रवारीच पुण्याला पोहचला होता. मी त्यावेळी होस्टेलमध्ये राहत होतो. संध्याकाळी आम्ही नितीनला फोन केला, ��कडल्या तिकडल्या गोष्टी बोलून झाल्यावर आमच्या नेहमीच्या गमतीदार स्वभावानुसार आम्ही फोनवरच त्याची गमंत करायला लागलो. यात काहीही नवीन नव्हते सगळे नेहमीप्रमाणेच. मी आणि महेश दोघेही अविवाहित आणि नितीनचे लग्न झालेले म्हणून नेहमी प्रमाणे महेशने नितीनला विचारले, “अरे नितीन ! पण तू वहिनींना विचारले का महाबळेश्वरला जाऊ का नको म्हणून?” नितीन म्हटला हो सांगितले मी , तू नको काळजी करूस. हो पण, परवानगी घेतलेले चांगले असते, नाही का? , महेश ने पुन्हा चिमटा घेतला. असं बऱ्याच वेळ महेश त्याची खेचत होता आणि मी आपला ऐकत होतो आणि मध्ये मध्ये महेशला वेगवेगळ्या कल्पना देत होतो. शेवटी फोन ठेवण्या अगोदर महेश पुन्हा म्हणाला, “अरे ऐक न नितीन, वहिनींना म्हणा कि तेव्हढा जेवणाचा डबा करून दिला तर छान होईल”. हो ��ो सांगतो आणि घेऊन येतो डबा, नितीन म्हणाला आणि फोन बंद केला. नंतर आम्हीही लवकर सगळं आवरून झोपी गेलो.  
सकाळी महेश ने मला लवकर उठवलं. मी उठलो तो पर्यंत महेशची अंघोळपण झाली होती आणि तो सगळं आवरून बसला होता. मी पण पटकन आवरा-आवर केली आणि तयार झालो. सहजच वेळ पाहण्यासाठी फोन हातात घेतला. फोनच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसला. मी ओपेन केला तर तो मेसेज नितीनचा होता. मेसेज वाचून मला काय बोलावं काहीच सुचेना.  मी काहीही न बोलता फोन महेश कडे दिला. अन खुणेनेच सांगितलं मेसेज वाच, महेशने मेसेज वाचला आणि स्तिमित नजरेने माझ्याकडे पाहत राहिला. थोडा वेळ आम्ही दोघेही काहीही न बोलता एकमेकांकडे द्विधा मनस्थित पाहत राहिलो. डोक्यात अनेक शंका येत होत्या... की काय झाले असेल? नितीनच्या घरी सगळे ठीक असेल ना? त्याची तब्येत बरी असेल ना? घरी कुणी पाहुणे आले असतील का अचानक? वहिनी नका जाऊ म्हणाल्या असतील का? या सर्व आमच्या प्रामाणिक शंकांनी डोक्यात काहूर माजलं होतं.
नितीनचा मेसेज  – “मला तुमच्यासोबत उद्या महाबळेश्वरला येता येणार नाही, तुम्ही दोघे जाऊन या. हैप्पी जर्नी ! “ :(
1 note · View note
kokannow · 4 years
Text
"बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथ ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी"
“बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये एकनाथ ठाकूर यांची पुण्यतिथी साजरी”
कुडाळ: “एकनाथ ठाकूर म्हणजे बुद्धिमान सौजन्याचा वस्तुपाठ,चालतं बोलतं ज्ञानपीठ !!तत्त्वं जगत, मूल्य घेऊन जनसामान्यांसाठी काम करणार नेता कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे एकनाथ ठाकूर होय. सुसंस्कारक्षम जीवन जगत असताना स्वतःला इतरांपासून वेगळे बनवा. परिस्थिती नुसार आपण स्वतःवर संस्कार केले पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे न वागता संयम आणि शिस्त बाळगावी.चांगल्या व्यक्तींच्या सहवासात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 December 2019 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ११ डिसेंबर २०१९ दुपारी १.०० वा. **** नागरिकत्व सुधारणा विधेयक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेसमोर मांडलं. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगला देशातून धार्मिक छळामुळे भारतात निघून आलेल्या त्या देशातल्या अल्पसंख्याक समुदायातल्या लोकांना नागरिकत्व देणं पूर्ण समर्थनीय असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातल्या मुस्लिमांवर या विधेयकाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधकांच्या यासंदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास तयार असल्याचं सांगत, पक्षीय राजकारणाच्या बाहेर पडून विरोधकांनी चर्चा करावी, सभात्याग करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं. या विधेयकामुळे अनेक दशकांपासून त्रास सहन करत असलेल्या लाखो लोकांना नवं जीवन मिळणार असल्याचं प्रतिपादन शाह यांनी केलं. सरकार आसामच्या मूळ रहिवाशांच्या हिताचं पूर्ण रक्षण करेल, असं आश्वासन शाह यांनी दिलं. या विधेयकाबाबत सर्वांशी चर्चा झाल्याचं सरकारचं प्रतिपादन आपल्याला मान्य नसल्याचं काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी या चर्चेदरम्यान सांगितलं. आपल्या पक्षाचा या विधेयकाला विरोध आहे, असं त्यांनी सांगितलं. हे विधेयक भारताच्या धर्मनिरपेक्ष धोरणाला अनुकूल नसल्याचं मत शर्मा यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यापूर्वी आज राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच सभापती एम.व्यंकय्या नायडू यांना ते स्थगित करावं लागलं. तेलुगु देशम पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी, राज्यांना वस्तू आणि सेवा कर महसुलातला वाटा मिळण्यास होत असलेल्या विलंबाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू केल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित केलं. **** नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत विरोधी पक्ष पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. हे विधेयक भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल, असं सांगत, धार्मिक छळामुळे शेजारच्या देशांमधून पलायन करून भारतात आलेल्यांना कायमचा दिलासा मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, सरकार पाक आणि बांगला देशातल्या अल्पसंख्यकांबद्दल बोलतं, मात्र श्रीलंकेतल्या तामीळ आणि नेपाळ मधल्या हिंदूंच्या वाईट स्थितीबद्दल बोलत नाही, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केली. **** पादत्राणं, हस्तकला, औषधी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, यासह अन्य उद्योगांना चालना देण्याचा सरकारचा सातत्यानं प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे, आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात औरंगाबादचे खासदार इम्तियाझ जलील यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. लातूर इथला रेल्वेचे डबे तयार करण्याचा नियोजित प्रकल्प हा या प्रयत्नांचाच भाग असल्याचं गोयल यांनी नमूद केलं. देशाची अर्थव्यवस्था आणि सकल घरेलू उत्पादन खालावलेलं असतानाच्या स्थितीत, जागतिक व्यापार आणि औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी सरकार नेमक्या कोणत्या उद्योगांना पाठबळ देणार आहे, असा प्रश्न खासदार जलील यांनी विचारला होता. जागतिक व्यापाराचा भाग होण्याच्या दृष्टीनं मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागांसाठी सरकारच्या काय योजना आहेत, असा प्रश्नही जलील यांनी केला होता. **** राज्यातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रती क्विंटल पाचशे रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. २०१९-२० या हंगामात धान उत्पादकांसाठी केंद्र शासनानं किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे, मात्र धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलपर्यंत दर क्विंटलला पाचशे रुपयांचं प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता.शासनाच्या या निर्णयानं शेतक-यांना दिलासा मिळणार आहे. **** अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठीची पोट निवडणूक येत्या एकोणतीस तारखेला होणार आहे. नगराध्यक्ष शीला रोडे यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झालं आहे. **** भारतीय शास्त्रीय संगीतातल्या मानाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात होत आहे. या महोत्सवाचं हे सदुसष्टावं वर्ष आहे. स्वरतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात यावर्षी नव्या जुन्या पिढीतले एकोणतीस कलाकार आपली कला सादर करणार आहेत. पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यामध्ये कला सादर करणार असून, या महोत्सवात कला सादर करणारे ते आतापर्यंतचे सर्वात लहान वयाचे कलाकार ठरणार आहेत. ****
0 notes
bloggerdeepu · 5 years
Text
प्रेम करणं सोप्प नसतं..
बायकोनं घरात मांजर पाळलेलं ..
तिचं ते खूप लाडकं.. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची... एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची... पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही... उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय... त्याचा त्याला प्रचंड राग यायचा...
एकदा नवरा जेवायला बसलेला आणि नेमकं मांजर त्याच्या ताटात तोंड घालतं... नवरा चिडतो आणि रागारागाने शेजारी असलेला ठोंब्या त्याच्या डोक्यात घालतो.. घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहतं... मेलं की काय अशी शंका येत असतानाच ते अंग झटकून उठून बसतं... हळूच नवऱ्याकडे हसून बघतं... आणि चक्क 'शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं... क्या करे आदत से मजबूर हूँ... पुन्हा नाही असं करणार..'असं माणसासारखं बोलतं... नवरा वेडा व्हायचाच बाकी...
त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक होतं.. ताटात तोंड घालणे तर सोडाच दारातला पेपर आणून दे.. टी पॉय वरचा चष्मा आणून दे अशी बारीकसारीक कामं ते करू लागतं... मग काय नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमते...ऑफिस मधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा..'अग मन्या दिसत नाही ग कुठं..?'
बायकोला सतत विचारत राहायचा..
असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्रीआणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबते..मन्या खिडकीतून ती व्हॅन बघतो.. त्याच्या मनात काय येतं कोण जाणे पण धावत जावून तो व्हॅन मधे बसतो... नवरा हे बघतो.. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावतो... मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला...
नवरा म्हणतो "मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे..तुझ्यासाठी नाही "
'मला माहितीय... पण मला जायचंय आता' मन्या शांतपणे बोलतो..
'मन्या,अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय... तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही... मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास.. ए प्लिज...प्लिज उतर रे आता ' काकुळतीला येवून तो बोलतो
मन्या गोड हसतो आणि बोलतो 'तू माझ्यावर प्रेम करतोस?.....माझ्यावर?'
' म्हणजे काय शंकाय का तुला?'
'मित्रा,अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो तेंव्हा मी तुझा नावडता होतो.. सतत रागवायचास माझ्यावर...अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा... .पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो... तुला हवं तसं करू लागलो.. तेंव्हा तुला आवडू लागलो... तू माझ्यावर प्रेम करू लागलास यात नवल ते काय?
नॉट सो स्ट्रेंज यार...!!
वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते... जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?
समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं.. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं...पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही... आपल्याला हवं तसं वागत नाही... तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणही आता नकोसं वाटतं...त्याला टाळत राहतो...भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो....त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो...ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्याला क्षणात परकं करून टाकतो ..
आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ?
त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?
आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं... अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं,त्याला समजून घेणं जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!
0 notes
shrikrishna-jug · 9 months
Text
जेव्हा आम्ही चौघे तळ्यावर एकत्र भेटतो.
आज योगायोग असा की,आम्ही चौघे तळ्यावर एकत्र जमलो होतो.धर्म आणि विज्ञान या विषयावर थोडीफार चर्चा करावी असं वाटून,प्रो. देसायांना बोलतं करावं म्हणून, मीच सुरुवात करीत म्हणालो,“मनुष्याची विचार शक्ती एव्हढी प्रगल्भ होत चालली आहे की धर्मविचार आणि विज्ञान ह्या दोन्ही पैलूंवर,इतकी प्रगती झाली आहे की अभ्यासू व्यक्ती अगदी अस्खलित चर्चा करताना दिसतात.मला असं वाटतं की,एकमेकाचं वादविवाद करताना उणंधुणं…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
राज ठाकरेंच्या टीकेवर नरेंद्र मोदी म्हणतात....
राज ठाकरेंच्या टीकेवर नरेंद्र मोदी म्हणतात….
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभर सभा घेऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडीला मतदान न करण्याचे आवाहन केले. आता राज ठाकरे यांच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. राज ठाकरे म्हणजे महाआघाडीने आऊटसोर्स केलेले नेते आहेत, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की,  राजकारणाचा भाग आहे. आज काल ‘आऊटसोर्स’ केले जाते. हेही तसेच आहे. जनता हुशार आहे. कोण काय आणि कशासाठी बोलतं…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कोण काय बोलतं त्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे महत्वाचं- दिलीप लांडे
कोण काय बोलतं त्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे महत्वाचं- दिलीप लांडे
कोण काय बोलतं त्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे महत्वाचं- दिलीप लांडे “आज शेतकऱ्याचा मुलगा, सच्चा कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, यापेक्षा दुसरा आनंद कुठला नाही. कोण काय बोलतं त्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे महत्वाचं,” अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे यांनी दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज पदभार स्वीकारला. त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेचा विकास,…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Photo
Tumblr media
राज ठाकरे आणि शरद पावर यांची आज अभूतपूर्व मुलाखत वेब महाराष्ट्र टीम : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन आगळी वेळगी नेतृत्व प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे राजकारणातल्या दोन पीढ्यांचे नेतृत्व असणारे हे दोन लोकप्रिय नेते नेमका काय संवाद साधतात याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. पुण्यातील बी. एम. सी.सी. महाविद्यालयात ही मुलाखत होणार आहे. अनेकदा भल्याभल्याना गप्प बसायला लावणारे राज ठाकरे आणि फिरकी घेणाऱ्या प्रश्नांना नेमकी उत्तरे देणारे शरद पवार आज नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल. राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच शरद पवार आणि राज ठाकरे एकमेकांसमोर येणार असल्याने काय चर्चा होईल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज यांनी बाळासाहेबानंतर कुणी आवडणारे नेतृत्व असेल त्यात शरद पवारांचे नाव अग्रस्थानी आहे; मात्र राजकारणात अनेकदा एकमेकांवर दोन्ही नेत्यांनी कुरघोडी केली आहे. तर अनेकदा काही ठिकाणी एकमेकांची मदतही केली आहे. त्यामुळे पवारांची ही मुलाखत अ���ूतपूर्व असणार आहे. शरद पवार यांच्या राजकारणातील ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आधारवड या कार्यक्रमात दोघे एकत्र आले होते; त्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. सध्याचा पीएनबी घोटाळा, मोदी सरकारचे पोटनिवडणुकीतील अपयश, कोरेगाव भीमा प्रकरण, शेतकरी आत्महत्या या सारख्या मुद्द्यावर राज ठाकरे पवारांना बोलतं करतात का किंवा अन्य काही समिकरणांची नांदी तर होत नाहीना हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे.
0 notes
anilskpanchgani · 7 years
Text
*"बाप......!!!"* हि कहाणी आहे मला भेटलेल्या एका बापाची ...... त्याचं नाव...? बापच म्हणु त्याला... तर असा हा बाप, चार पिढ्यांची गरीबी ! एका गोंडस मुलीला पदरात टाकुन तीची आई देवाघरी गेलेली... मुलीचं नाव काहीही असलं तरी तीला तो चिमणी म्हणायचा... तो तीचं सगळं करायचा...वेणी फणी पासुन जेवणापर्यंत ... तो राजा नव्हता पण त्याच्या झोपड्यातली राजकन्या होती ती... या बापानं तीला शिकवलं... तीच्या शिक्षणासाठी स्वारगेट स्टँडवर हमाली केली, भवानी पेठेतल्या गोडावुनचा माल गाडा ओढत दुकानात पोचवला, आणखीही बरंच काही... एके दिवशी ही चिमणी शिकुन मोठी झाली, आयटि मध्ये जॉब मिळाला.. मधल्या काळात या बापाला कुष्ठरोग जडला, औषधं चालु करेपर्यंत बोटं झडायला सुरुवात झाली... बसला नशिबाला दोष देत.... चिमणी ने फ्लॕट घेतला अॉफिसजवळ....आता ती झोपड्यात कशी राहील ? आता झोपड्यात उरला हा बाप आणि त्याची झडलेली बोटं... एके दिवशी चिमणीनं बापाला रस्त्यावरच भेटुन सांगितलं (झोपड्यात नाहिच आली हि चिमणी), आण्णा, मी लग्न करणाराय , आमच्या कंपनीतलेच मॕनेजर आहेत.... बाप आनंदला, म्हणाला मला पण भेटव जावईबापुंना....! चिमणी म्हणाली, तुम्हाला झालेला कुष्ठरोग त्यांना समजला तर लग्न करतील ते माझ्याशी ? नेहमीप्रमाणेच बापाला हे सुद्धा पटलं.... लेकीचं लग्न हॉलबाहेरुन त्यानं पाहिलं, हॉलमध्ये त्याच्यासारख्या कुष्ठरोग्याला आत तरी कोण सोडेल ....? झडलेली बोटं आता डोळे पुसायच्या पण लायकीची राहिली नव्हती ! डोळ्यातलं,पाणी घेवुन आला पुन्हा झोपड्यात.... कामं सगळी सुटली होती.... नाही म्हणायला, संपुर्ण आयुष्यात चिमणीच्या लग्नासाठी साडेपाच तोळे सोनं त्यांनं पोट मारुन साठवलं होतं पण आता काय उपयोग ....? एके दिवशी चिमणीनं पुन्हा रस्त्यावरच बापाला भेटायला बोलावलं, यावेळी तोंडावर स्कार्फ होता, कुणी बघितलं असतं या कुष्ठरोग्याशी बोलतांना तर लोक काय म्हणाले असते ? तीनं सांगितलं आम्ही आता अमेरिकेला जात आहोत, बघु पुन्हा केव्हा येईन ते सांगता यायचं नाही.... घशात आलेल्या आवंढ्यामुळे बापाला हे सुद्धा सांगता आलं नाही कि चिमणे तोंडावरचं फडकं काढ, एकदा तरी बघु दे तुला ! डोळ्यांनी पण दगा दिला, ओघळणार्या पाण्यानं तीची पाठमोरी आकृती पण अस्पष्टच दिसली आणि डोळे पुसायला बोटंच नव्हती ....चिमणी डोळ्या देखत भुर्र उडुन गेली .... आता हा झोपडीतला राजा बसतो मंदिराबाहेर, आपली झडलेली बोटं घेवुन, कुष्ठरोग मिरवत, चिमणीच्या येण्याची वाट पहात....! इथंच माझी आणि त्याची भेट झाली.... ! दरवेळी मला विचारतो, डाक्टर , माजी चिमणी येइल का वो परत ? आणि मी दरवेळी तोंड लपवत सांगतो, नक्की येईल आण्णा.... म्हातार्याच्या डोळ्यात डोळे घालुन खोटं बोलण्याचं धाडस माझ्यातही नसतं.... डाक्टर, आमेरीका किती लांब आसंन वो ? इमानाला लई पैशे लागत आसत्याल ना ? किती येळ लागत आसंन ? चिमणीला माजी आटवण येत आसंन का? मी ही प्रश्नोत्तरे टाळतो... एका बापाशी मी तरी किती खोटं बोलु रोज रोज ....! एके दिवशी मला हा बाप म्हणाला, डाक्टर, समजा साडेपाच तोळं सोनं मी मोडलं आणि पेशल गाडी करुन आमेरिकेला गेलो तर ? काय फकस्त डिजेलचाच खर्च हुयील, इमानाचा खर्च तरी वाचंल.... चिमणी आन जावाईबापुला म्हागल्या सीटवर बसवुनच आणतो, येत कशी न्हाई त्येच बगतो....! कसं समजावु या "वेड्या बापाला" ......? कि त्यांच्या चिमणीनं तीचा वेगळा संसार केलाय आणि त्यात आता तुम्हाला स्थान नाही.....! पण हल्ली ते मला कुठलाही प्रश्न विचारत नाहित, बहुधा त्यांना हे कळलं असावं..... हल्ली एका कोपऱ्यात बसुन ते कोणाशीही न बोलतो आभाळाकडे एकटक बघत बसलेले असतात.... कदाचीत त्यांना वाटत असावं, अमेरीकेतुन उडत उडत त्यांची चिमणी परत येईल.... !!! मी खुप बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण नंतर त्यांनी बोलणंच सोडुन दिलं.... पुन्हा त्या मंदिरात जायला बरेच दिवस मलाही जमलं नाही.... आज पुन्हा त्या मंदिरात पेशंट तपासायला आलो, ते बसत होते तो कोपरा रिकामा दिसला, शेजारच्या आज्जीला विचारलं, आण्णा कुठे गेले ? म्हणाली, म्हाईत न्हाई बा.... 8-10 दिस झालं दिसलाच न्हाई, म्हणला, लेकिकडं जावुन येतो..... माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी आभाळाकडं पाहिलं, उंच आभाळात उडणारा एक पक्षी दिसला.... लेकिच्या ओढीनं तीला शोधणारा हा आण्णा नावाचा तोच बाप असावा का ????
0 notes
chandrabal-blog · 8 years
Photo
Tumblr media
बितास्ता सालिनी साहा तिचं पूर्ण नाव...सकाळी तिची बातमी वाचली आणि काही वेळापूर्वी तिचे फेसबुक प्रोफाईल चेक केले.... तिच्या अपार्टमेंटमधील राहत्या घरातील सिलिंगला तिचा मृतदेह दोन दिवसापासून लटकत होता...तिचे एक मनगट जखमांनी भरून गेले होते तर शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या...ती एकटीच राहत होती तिथे... भाऊ, बहिण आणि आईसोबतचे फोटो तिच्या प्रोफाईलवर आहेत... माझ्या सोनागाछीतल्या परिचितांशी बोललो तर त्यांनी तिच्याबद्दल वाईट साईट सांगितलं, जे कुठं छापून आलेलं नाही असलं सांगितलं... आता त्यावर सर्वत्र बोललं जातंय... खूप कमी काळासाठी ती बांग्ला चित्रपटसृष्टीत चमकली, नंतर स्पर्धेच्या युगात मागे फेकली गेली... चकचकाट फार वाईट असतो, एकांतात अंधाराची धारदार सुरी चालवतो..तिच्यावरही ही सुरी चालली.... पण तिने त्याची पूर्वकल्पना देणाऱ्या पोस्ट जवळपास सहासात महिन्यांपासून बांग्लातून तिच्या प्रोफाईलवर दिलेल्या आहेत.... कुणालाच त्याचे काही कसे वाटले नाही ?... एक तरुणी आपलं आयुष्य संपवून टाकण्याच्या पोस्ट टाकते त्यावर तिला कुणाला आवरता येऊ नये हीदेखील एक शोकांतिकाच... बितास्ता तिच्या वडिलांचे नाव लावत नव्हती, ती एक स्वाभिमानी मुलगी होती... तिला टॉपची हिरॉईन व्हायचे होते,पण त्यासाठीचे 'अन्य' कौशल्य तिच्याकडे नव्हते... तिला स्क्रीन टेस्टमध्ये वाईट अनुभव आले होते, ते तिने व्यक्त केले होते... कधी कधी खरे बोलणे अंगाशी येते, तसे तिचे झाले.... तिला त्यामुळे म्हणावे तसे चित्रपट भेटलेच नाहीत... घरादारापासून दूर फसव्या ग्लॅमरला भुलून संधीची वाट बघत ती एकटीच राहिली...संधी काही आली नाही पण डिप्रेशन येत गेले जे तिच्या पोस्टमधून ठिबकते आहे... बितास्ता देखणी होती, तरुण होती, शिक्षित होती पण महत्वाकांक्षी होती... आजच्या पोरी ठोरी काढतात तशा ढीगभर सेल्फ्या तीही काढायची अन एफबीवर लोड करायची.... आपलं फिलिंग सांगण्यासाठी तिला कुठलं कोंडाळं जिवलग वाटलं नाही की कुणा मित्राकडे शेअर करावे वाटले नाहीत.... ती लिहिते - রং আছে তবু রঙ্গিন নয়.... Nevertheless, it is not dyed colors .... জানি না ফুরাবে কবে এই পথ চাওয়া........ I do not know when to terminate In this way it ........ तिचं लेखन हळवं आहे, एखाद्या कवयित्रीसारखं तिनं अनेकदा लिहीलंय... कदाचित आपल्यातल्या हरलेल्या अभिनेत्रीच्या अगम्य शोधात तिने तिच्यातल्या कवयित्रीचा शोध कधी घेतलाच नसावा... आता पोलीस तपास करताहेत... अनेक संशयाची भुते उभी राहतील... ज्यांना ती असून नसल्यासारखी होती ते नातेवाईक शोक व्यक्त करतील.... तिला मरून तीन दिवस होत आले तरी ज्यांना तिची साधी विचारपूस करावीशी वाटली नाही ते शेजारी पाजारी तिच्याबद्दल कोरडं दुःख व्यक्त करत वाहिन्यांना बाईट देतील.... ज्या बांग्ला इंडस्ट्रीने तिला कामं दिली नाहीत ती तिचे मेकअप चढवून,डोळ्यात ग्लिसरीन घालून कौतुक करेल.... हे सारं खोटं असतं.... कुणाएका जवळ तरी तिने मन मोकळं करायलाच हवं होतं... मन मोकळं केलं की जगण्याची उमेद वाढते.... आपल्या आसपास कुणी जीव देण्याची भाषा करत असेल वा किंवा डिप्रेशनमध्ये असल्याची भाषा करत असेल तर त्याच्या खांद्यावर हात टाकायला हवा, त्याला बोलतं करायला हवं... कसं का असेना पण जगण्यासाठी प्रवृत्त करायला हवं... ही लढाई एकतर्फीच असते, विधाता खेळवत असतो आणि आपण प्यादी बनून खेळत राहतो. म्हणून का आपण हा आयुष्याचा सारीपाट सोडून जायचं का ?... कदाचित आपल्या पाऊलखुणा दुसरयाच्या आयुष्यासाठी हमरस्त्याचे काम करू शकतील... वाईटसाईट, फालतूची अनेक कामे आपण एफबीवर करतच असतो पण एव्हढेसे छोटे पण महत्वाचे काम करायला काय हरकत आहे ?.... बितास्ता तू चुकलीस, तुझ्या मनातलं तू एफबी वर सांगायच्या ऐवजी कुणाजवळ तरी तू बोलायला पाहिजे होतंस, कारण ही आभासी दुनिया आहे....इथली नाती बहुत करून आभासी अन इथलं प्रेमही तात्कालिकच ! माझ्यासारखे रिकामटेकडे लोक लेख लिहितील...रुपेरी पडद्याआडचा काळाकुट्ट चेहरा पुन्हा पुन्हा समोर आणतील.. लोक rip लिहून किंवा ohh so sad असलं काही तरी लिहून पुढे जातील... त्या ऐवजी लोकांनी यातून थोडं जरी भान राखलं तरी किमान एफबीवर व्यक्त होणाऱ्या अन्य बितास्ताचा जीव जाण्याची वेळ येणार नाही.... बोलूनसुद्धा तू अबोल ठरलीस, तुझ्या निशब्द मृत्यूसाठी माफ कर ... ईश्वर तुझ्या आत्म्यास सद्गती देवो .... - समीर गायकवाड. http://ift.tt/2k2mVsJ via Facebook http://ift.tt/2kqNRFM
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट
तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट
तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देत असतात. मुलांनी चांगल वागावं, ही एवढीच यामागे त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा मुलांना खोटं बोलण्याची सवय लागते. या सवयीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. कारण हीच खोटं बोलण्याची सवय उद्या त्याच्या भविष्यासाठी घातक ठरणार आहे. मुलांना लहान वयातच चांगल्या आणि वाईट…
View On WordPress
0 notes