Text
It's my 4 year anniversary on Tumblr 🥳
4 notes
·
View notes
Text
It’s become very apparent to me that the older you are the less praise you’re going to get. When you’re 3 and you paint a picture outside the lines, they give you gold stars. When you’re 10 and you score a goal, they take you out for ice-cream. But when you’re 17 and struggling to fit in, no one gives you a hug just for making it through the day. And when you’re 23 and pulling long hours at the office, no one asks if you’re alright. And you start to wonder if you are, if there’s a point to any of it. The answer is yes. Because good work, real good work that shapes your character, doesn’t need to be acknowledged. You grow in the silences, in the reflections, in the inhales and exhales that let you know you’ve made it from one moment to the other.
0 notes
Text
गौतम बुद्धांची अनेक माणसं पूजा करत, अनेक माणसं त्यांना शिव्याही देत.
एकदा एका गावातून दुसऱ्या गावात निघालेले असताना त्यां��ा वाटेत एका माणसाने अडवलं आणि शिव्या द्यायला सुरुवात केली.
बुद्ध शांतपणे थांबून राहिले. तो माणूस शिव्या देऊन थकला आणि थांबला.
बुद्धाने शांतपणे विचारलं, झालं का? मी जाऊ? की काही शिल्लक आहे? नंतर आठवलं तरी हरकत नाही, मी पुन्हा येईनच या रस्त्याने चार दिवसांनी, तेव्हा तुझं बोलणं राहिलं असेलच तर पूर्ण करून टाक.
तो माणूस भडकून म्हणाला, मी तुझ्याशी बोलत नव्हतो, तुला शिव्या देत होतो. तुला शिव्याही कळत नाहीत का?
बुद्ध म्हणाले, कळतात की. पण, तू दहा वर्षं उशीर केलास. दहा वर्षांपूर्वी मी अहंकारस्वरूपात जिवंत होतो. तेव्हा तुला त्यांचं उत्तर मिळालं असतं. आता तू मुडद्याला शिव्या देतोयस. त्याचा उपयोग काय? शिवाय आता तुझीच पंचाईत होणार.
कशी काय?
बुद्ध म्हणाले, मागच्या गावात काही गावकरी माझ्यासाठी मिठाई घेऊन आले होते. मी त्यांना म्हणालो की माझं पोट भरलंय, मला नको मिठाई. तेव्हा त्या गावकऱ्यांनी मिठाई परत नेली आणि गावात वाटून टाकली. आता मी तुझ्या या शिव्यांचाही स्वीकार केलेला नाही. तू दिल्यास, पण मी घेतलेल्या नाहीत. आता तू त्यांचं काय करशील?
ओशो
1 note
·
View note
Text
चार माणसं एकत्र आहेत तिथे वादविवाद, मतभेद होणार हे मान्य आहे. पण रात्रीचे वाद सकाळपर्यंत न विसरता ते वारंवार ताणत राहणे, चिघळवत राहणे, वारंवार त्याच त्याच विषयांवर बोलणे ही जगातली सगळ्यात इरिटेट करणारी गोष्ट वाटते मला...
मला कधीच शक्य होत नाही एकच निगेटिव्हीटी मनात धरून ठेवायला.. वाद कितीही मोठा असूदे कदाचित् काही ठिकाणी मी रागही व्यक्त करून मोकळी होईल पण काही तासांनंतर ती गोष्ट मनातून आपोआपच फ्लश आऊट होऊन जाते आणि मी अगदी तेवढी नॉर्मल होऊन जाते जणू काही झालेलेच नव्हते. पण प्रत्येकवेळी समोरची व्यक्ती सेम स्वभावाची मिळेल असं होत नाही. तोच तो वाद, त्याच त्या गोष्टी, तेच ते निगेटिव्ह वातावरण.. अशावेळी माणूस कितीही चांगला असला तरी मनापासून फील होतं की दूर निघून जावं या व्यक्तीपासून..
कितीही मोठं भांडण असो वा कितीही भयंकर वादविवाद झालेले असूदे काही वेळानंतर राग मनात साठवून ठेवणे आजवर मला कधीच शक्य झालेले नाहीये..
आणि मग कधीकधी वाटून जातं.. विसरून जाण्याचा हा जो प्रकार आहे ही माझ्या स्वभावातली चूक तर नाही ना....?
0 notes
Text
एकटेपण
समजून समजून घेशील जेव्हा मला
डोळ्यात कोंडलेल्या आसवांना
तेव्हा तुला कळेल एकटेपण काय असतं
राहशील दूर जेव्हा अज्ञात ठिकाणी
नसतील सोबत जिवलग कुणीही
गलबलून जाईन मन
येतील सर्वांच्या आठवणी..
तेव्हा तुला कळेल एकटेपण काय असत..
असे दिवस जेव्हा तू जगशील...
हळूहळू तुही असाच राहू लागशील..
मला विचारणा करणार नाहीस.. तू एवढी अबोल आणि गंभीर का?
होईल नक्कीच तुलाही जाणीव.. समजेल तुला ही माझ्या हृदयाची ��्यथा आणि तेव्हा तुला कळेल एकटेपण काय असतं ...
0 notes
Text
Love is simple!
Someone who truly loves you will make you laugh, share happy moments, they will offer stability and certainty in your relationship, wiping away your fears, insecurities, and sadness. True love means living in peace, stability, and harmony. These are the basic principles of a healthy romantic relationship.
Love is simple. Don't complicate it.
0 notes
Text
नवऱ्याला विचारल्या शिवाय न्हाई...
बायको जेव्हा माहेरी जाते, त्याच्या आधी तिला सासरकडच्यांची परवानगी घ्यावी लागते. पाठवतील कि नाही याच तिला प्रचंड टेन्शन असत. पाठवलं तर ते सुद्धा अटी शर्ती घालून. कुणीतरी माहेरकडच्यांनी न्यायला सोडायला यायला पाहिजे, कधी जायचं, किती दिवस राहायचं, माहेरी गेल्यावर कुणाला भेटायचं, हे सगळं सासरकडचेच ठरवतात. माहेरी गेल्यावर समजा कुणी माहेरकडचं दुसऱ्या गावाला राहत असेल, तर तिकडं जायचं कि नाही हे सुद्धा सासरकडचेच ठरवतात. या सगळ्या गोष्टींना काय म्हणायचं?
बहुतांश बायका माहेरी गेल्यावर सुद्धा मोकळे पणाने राहू शकत नाही? आणि हे सगळं त्या निमूटपणे सहन करतात? अगदी लग्नाला दहा, पंधरा, अगदी पंचवीस वर्ष झाली तरीही?
बायकोला आपली मक्तेदारी समजणारे असे नवरे, सुनेला आपल्या "बापाची" जागीर समजणारे असे सास�� सासरे यांना काय म्हणावे? एखाद्याला माणूस म्हणून सुद्धा वागवू नये? हि गुलामगिरीची पराकाष्ठाच नाही का? आता माझ्या मित्रांनी याचा कधीना कधी अनुभव घेतलेलाच असणार, कुणी असं वागणारे देखील असतीलच आणि कुणी सहन करणाऱ्यांपैकी असतील. तर काही याला अपवादही असतील. पण बहुतांशी ठिकाणी हेच दिसून येते.
यात त्या स्त्रीची पण तितकीच चूक आहे, कारण गुलामगिरीची मानसिकता इतकी नसानसात भिनलेली आहे, कि आपल्याला स्वातंत्र्य आहे हे त्या विसरूनच गेलेल्या आहेत. हे असेच असते, हे असेच होणार, असच गृहीत धरून त्या थोडंफार रडण्याशिवाय काहीही करत नाहीत. माहेरकडचे सुद्धा आपल्या मुलीला असं वागवतात याच वाईट वाटून घेत नाहीत, कारण त्यांच्याकडे पण सून असतेच ना? ते आपल्या सुनेबाबत, बायको बाबत असेच वागत असतात.
सासर आणि माहेर हे स्त्रियांच्या आयुष्याचे दोन भाग असतात. प्रत्येक पुरुषाने हे एकदा फक्त विचार करून बघावे, कि हि प्रथा जर उलटी असती तर? कि पुरुषाला लग्न झाल्यावर बायकोकडे जाऊन राहावे लागणार असेल तर? फक्त विचार करा, तुम्हाला तुमची बायको काय आहे हे लगेच कळेल. लग्नाआधीच संपूर्ण आयुष्य वेगळं, चालीरीती वेगळ्या, आणि लग्न झालं कि दुसऱ्या दिवसापासून तीच सगळं जगच वेगळं, मानस वेगळी, चालीरीती वेगळ्या, आणि यावर कडी म्हणजे तिनेच स्वतःमध्ये सासरकडच्या नुसार बदल घडवून आणायचे आणि सासरच्या लोकांची सेवा (चाकरी, गुलामगिरी) करायची ! आधी आईवडिलांच्या इशाऱ्यावर आणि नंतर नवरा आणि सासरकडच्या इशाऱ्यावर.
स्त्रियांनी देखील यातून आपण किती गुलामगिरीत आहोत याचा अंदाज घेऊन कमीतकमी गुलामगिरीची जाणीव तरी करून घ्यावी आणि नवरोबांनी आपल्या बायकोचाहि थोडा विचार करावा ..
नाहीतर आहेच मग, नवऱ्याला विचारल्या शिवाय नाही ....
0 notes
Text
about_yesterday
काही लोकांचा उत्साह ‘संसर्गजन्य’ असतो...त्यांच्याशी बोलल्यावर त्या फ्रिक्वेंसीशी आपण अलगद जोडलो जातो...मानवी स्वभावाची हि उर्जा देखील भौतिकशास्त्रातला उर्जेचा नियम तंतोतंत पाळते. मनाचे असंख्य कंगोरे उलगडत जातात,चैतन्यदायी वाटत जातं...
यालाच कदाचित ‘सुख’ म्हणतात..
0 notes
Text
Happy birthday!
They say a brother is a friend given by nature. Yes, he is my first friend and my second father. I absolutely enjoy being his little sister.. We do share our childhood memories.. playing cricket with him was something I always enjoyed and looked forward during my school days. He literally treats me like his younger brother. Sometimes, we don't necessarily say something to each other..we can sit in a room together and just be comfortable in silence & sometimes too much kalla even our mom & dad can't handle. He is my first "bother" indeed 😛 yet first someone to lean on, someone to count on… someone to tell on!Just so you know, he is 5 years older than me...as I grew up with an elder brother, I can get pretty rowdy most of the times, just like him 😝 He has tought me countless things, being independent is one of them which I value a lot. His love and passion towards his work is inexpressible.
His cooking skills will amaze you 😂 & don't get me started with his singing skills guys. He is the only legend after Kishore Kumar 🙉
I hate his bike (I have my own reasons) but I love him. I hate how much intelligent & talented he is but that's what motivates me everyday. I still remember his lecture on career options to my whole class when I was in 12th. My classmates couldn't believe that he is my brother. (Yeah, I was outstanding in mathematics 😂)
He is my best critic. Whatever I am improving everyday, his contribution to that can't be neglected.
You have always pushed me to do something outside the comfort zone, please keep doing it. Most of the times you denied to help me because you wanted me to do things on my own. I remember how much care you took when I was admitted in the hospital. You couldn't see my face with that pain. I still can't forget your face.. looking at me that day with so much concern and love. Thank you for bearing with me and understanding my anger, frustrations, depression, my mood swings and appreciating the food prepared by me 😬😬 I am trying to improve on that front 😭
Well, why I am writing all this... Yes! it's his special day.. but I wish he won't age any farther. I wish time stands still and we stay together more 😭
Bro..you are the world's best brother. You are an awesome friend, guide and teacher in my life. Thanks for being a absolutely wonderful brother. On this special day, I wish you a very happy birthday and may God bless you. Enjoy your day and year ahead.
Never ever be quiet.. keep bugging me, annoying and irritating me...I love you a lot ❤️❤️ Now give me that million dollar smile ☺️😂😍🤗😘😇
P.s Dada mala ek vahini aan.
0 notes
Text
दिवस ओल्या पाकळ्यांचे
नव ऋतू आले आयुष्यात खूप काही करावसं वाटतंय...आयुष्यच सुंदर झाले आहे.. ते खूप खूप जगावसं वाटतय..
निळेशार टपोरे थेंब कोसळतात जेव्हा मातीवर.. मृदगंधाची लहर पसरत माझ्या सार्या जीवनभर..
मनी वाटे ओलेचिंब व्हावे त्याच्या बरोबर...हातात हात घेऊन त्याचा भिजावे वाटते क्षणभर...
शुभ्र धुक्यातून जाताना त्याला बिलगावेसे वाटते... आयुष्यच सुंदर झाले आहे, ते खूप खूप जगावंस वाटतय...
निर्मनुष्य वाटतं सारं जग.. छळते जेव्हा आठवण त्याची.. दाहीदिशी त्याचाच चेहरा, बेधुंद अवस्था ही मनाची..
शहारते मन आठवताच त्याला... हीच का ती ओढ प्रेमाची..
मन गुंतलय रे तुझ्या विचारात.. उत्तरे देशील ना त्याच्या प्रश्नांची..?
स्वप्नांच्या झुल्यावर झुलतेच, प्रत्यक्षातही झुलावसं वाटतय ...आयुष्यच सुंदर झाल आहे, ते खूप खूप जगावंस वाटतय ...
निरोप घेतला की लगेचच त्याला डोळे भरून पहावसं वाटतय.. तर कधी चंद्रप्रकाशात रात्रभर भिजावसं वाटतय...
मखमली फुलांमधून लोळावंस वाटतय.. तर कधी किलबिलत्या पक्षांसोबत गुणगुणावसं वाटतय..
माझ्याजवळ येताच तो ओल्या पात्यांतून पळावंस वाटतय.. आयुष्यच सुंदर झाले आहे... ते खूप खूप जगावसं वाटतय...
0 notes
Text
आजी..
नीट र्हा सोना... रुना... बिना..... मेलीचं नावच येत न्हाय तोंडात....आजीला सगळी मिळून १६ नातवंड... तिचा एक प्रॉब्लेम होता, समोर उभा असलेल्या नातवंडाच नाव तिला कधीच आठवायचं नाही.. आधी समोर नसलेल्या १५ जणांची नावं घेईल, मग जमलं तर राहीलेल्याचं... कष्टानं खडबडीत झालेले हात गालावरनं फिरवून आलाबला घेईल. मटामटा मुकं घेईल.. उशीरा भेटायला गेलो तर दोन चार शिव्या हमखास...
वजन कितीही वाढलं तरी किती बारिक झाली माझी नात अस म्हणून अंडयाची पोळी बनवायला घ्यायची... थकली असली तरी... वाक्यावाक्याला अस्सल गावरान म्हणी आणि शिव्या जिभेवर खेळत असायच्या. मी तिच्या शिव्या ऐकण्या साठी कधी कधी कामात मुद्दाम चुका करायचे .. वाटच बघायचे कि बोलता-बोलता फटदिशी एखादी भन्नाट म्हण अथवा शिवी हटकून येइल..
लगीन कर.. कवा करणार.. म्हातारी झाल्यावर.. हे दोन प्रश्न ठरलेले असायचे.. एकदा खूप आठवण आली म्हणून ८ दिवसांची सुट्टी काढून तिच्या जवळ रहायला गेले. दोन वेळा पॅरालिसिस मधून बरी झालेली आजी लहानपणी घालायची तशी आंघोळ, चवीचं जेवन करून घाल��े, उलट आपलीच काळजी घेते तेव्हा भल्याभल्या प्रेम कथा फिक्या वाटतात.. unconditional love ची concept प्रॅक्टीकली समजते.. ८ दिवस कसे जातात समझतच नाही.... आजीच्या दारात मोर कोंबड्यांप्रमाणे धान्य खाताना कितीदा तरी पाहीले.. मांजर एकटीच नदीत जाऊन मासे खाते हे समजल्यावर हासडल्याना तिने दोन चार शिव्या... काय गं सटवे? एकटी एकटी ताव मारतीस व्हय.. दुसऱ्या दिवशी मांजर नदीवरून फरफटत दोन मासे घेऊन हजर.. गोंडया नावाचा आजीचा एक कुत्रा होता.. तिनं जणू त्याला सांगून ठेवल होत आपलं कोण आणि तिराईत कोन..२ वर्षांनी जरी तुम्ही गोंडयासमोर गेलात तरी गोंडया तुमच्यावर भुंकेल काय... आजीचं आणि प्राणीपक्ष्यांच नातं खूप दुर्मिळ प्रकारचं अन् मला न उलघड़लेलं होतं..
आजीच्या घरी लोकं आवर्जुन यायची.. सरपंचाची बायको होती पण नानांची नानी म्हणून जास्त famous होती आजी. तिने कधी कोणाला न खाता पिता सोडलय अस कधीच नाही झालं.. तिचं अधिकारवाणीनं बोलणं, लोकांची काळजी करनं.. सगळ्यांच चांगलं व्हाव यासाठी झुरणं.. खर तर ७५ वर्षांचं आयुष्य ७५ ओळीत लिहणं अशक्य आहे...
उन्हाळयाच्या सुट्टी मधे आजीच्या घरी आम्ही सगळे जमायचो, एकच गलका व���हायचा, नदीवर पोहायला जायचो तोवर आजी सगळयांसाठी गरम गरम जेवन बनवून ठेवायची... आजीच्या संत्री आणि मोसंबीच्या बागा होत्या.. आजीने शिव्या घालू नये म्हणून फळं खावून सालं जमिनीत पुरायचो... कमी जेवलो की तिला समजून जायंचं.. नानांनी आमची बाजू घेतली की नानांना पण शिव्या.. नानांची रिअॅक्शन बघून, हसून-हसून डोळ्यांत पाणी यायच. लै लै लै ग्वाड व्हती आमची आजी!
कोणी तिला भेटून परतीच्या प्रवासाला जायला निघालं की तिच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.. हस गं आजे फोटो काढतेय.. पेटला तुझा फुटू... अस म्हणून पदराने डोळे टिपायची.. तिच्या बदद्ल जेवढं लिहावं तेवढ कमीच आहे..तुझा आशिर्वाद नेहमी सोबत जाणवतो आजे... तू आम्हाला सोडून गेलीस यावर माझा विश्वासच नाही मुळी..
0 notes
Text
होय...
अशक्य काहीच नसतं. ठरवलं. निर्धारानं प्रयत्न केले. तर सर्व शक्य असू शकतं. तरीही नाहीच मनासारखं झालं, तरी किमान आपण प्रयत्नांमध्ये कमी पडलो नाही, हे समाधान असेलच. पण भविष्यात, कोणत्या चुका, कधी, कशा टाळायच्या याचाही अनुभव येईल!
0 notes
Text
असं म्हणतात, पैसे खर्च करायला अक्कल लागत नाही..
या दहा-बारा वर्षांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये आणि अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारण���..!
घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.. वाढदिवस, अॅनीवर्सरीसाठी अनावश्यक खर्च व दिखावा. जीवन शैली बदलल्यामुळे खर्चाचे प्रमाण वाढले. मुलांचं शिक्षण,शाळा,क्लास फी यामध्ये वाढ. ( पहिली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे )..घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च यात खोटी प्रतिष्ठा.. व्यक्तिगत खर्च, ब्युटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे , पार्टी , गेट टुगेदर इत्यादी.. लग्न तर आहेच पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च. कर्जांचे व्याज फेडणे. खाण्यापिण्यात संवयी बदलल्यामुळे मेडिकल खर्चात वाढ..यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, उत्पन्न कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी ,तणाव तणाव तणाव....
लोक,नातेवाईक काय म्हणतील या भीतीपाटी कर्तव्य भावनेने पैशाचा चुराडा. पार्टी कल्चर मुळे अक्षरशः लाखो तरुण , कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत.(उदा.घड्याळ घेतलं-द्या पार्टी,गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी,कपडे,दागिने,वस्तू घेतली-द्या पार्टी, दोन-पाचशे रुपये.. पगार वाढला-द्या पार्टी,)...आपण दुसऱ्यावर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खां���ा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला?या एका भीतीपाई सामान्य माणूस आयुष्यभर,पिढ्यानपिढ्या कुजतोय.
अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न,वस्त्र,निवारा आहे, आणि इच्छा स्वप्नं अनंत आहेत त्यांचा अंत..... नाही... !
0 notes
Text
*व. पु. काळेंची भन्नाट २५ वाक्ये*
*१. गगनभरारीचं वेड*
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
*२. झुंज*
वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
*३. कॅलेंडर*
भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.
*४. संघर्ष कुठपर्यंत?*
आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आयुष्यात अनेक समस्या ती उंचीच सोडवते.
*५. पडावं तर असं!*
आपत्ती पण अशी यावी कि इतरांना हेवा वाटावा. व्यक्तीचा कस लागावा. पडायचंच असेल तर ठेच लागून पडून नये. चांगलं २००० फुटांवरून पडावं. म्हणजे माणूस किती उंचावर पोहचला होता हे तरी जगाला कळेल.
*६. परिपूर्णता?*
जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की..
*७. नको असलेला भाग*
दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने निसर्गातील इतर गोष्टींकडे पहा. झाडे, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.
*८. पशू माणसांपेक्षा श्रेष्ठ*
पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ?
*९. समस्या*
अनेक समस्या त्यावेळी सुचेल त्या मार्गाने सोडवाव्या लागतात. थोडा अवधी लोटल्यावर मग कायमचा उपाय शोधावा. दुध अचानकपणे म्हणजे आपण तंद्रीत असताना, कोणत्यातरी क्षणी लाट अंगावर यावी त्या वेगाने वर काठापर्यंत येते. चिमटा शोधायला वेळ नसतो. अशा वेळेला पाण्याचा शिडका��ा करून ते तिथल्या तिथे शांत करायचं असतं. थांबवायचं असतं. मग सावकाश चिमटा शोधावा, उसंत घेवून ते खाली उतरवावं. तसच काहीसं अनेक समस्यांचं असतं.
*१०. प्रोब्लेम्स कुणाला नसतात?*
प्रोब्लेम्स कुणाला नसतात? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतेच.ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे. या तिन्ही गोष्टीं पालिकडचा प्रोब्लेम अस्थित्वात नसतो.
*११. समोरच्याच्या दुःखाचे समाधान*
समोरच्या दुःख सांगणाऱ्या माणसाचं जर समाधान करायचं असेल, त्याला दिलासा द्यायची इच्छा असेल तर तो जे बोलतो त्यातलं सत्तर टक्के तुम्हाला ऐकू येता कामा नये. कारण त्याच्या आयुष्यातल्या दुःखाला पुष्कळदा त्याचा मूर्खपणाच कारणीभूत असतो. तो जेव्हा ऐकू येत नाही तेव्हाच सहानुभूती दाखवणं शक्य होतं. तो जे बोलतो ते जर सगळं ऐकू आलं त्यालाच एक झापड मारावीशी वाटते.
*१२. आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन'*
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहा. जेव्हा आर्थिक परिस्थती चांगली असेल तेव्हा साधे रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा शांत रहा. यालाच आयुष्याचे 'सुयोग्य व्यवस्थापन' असे म्हणतात.
*१३. पळू नका*
प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी न कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहचत नाहीत. मुक्कामाला पोहचतात ते सरळ रस्तेच.
*१४. पाठीची खाज*
पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी , आपला हात वर पोहचत नाही व दुसर्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनात ही बऱ्याचदा होते..
*१५. माफी*
माफी मागितल्याने तुम्ही चुकीचे होता आणि समोरची व्यक्ती बरोबर, हे कधीही सिद्ध होत नाही. माफीचा खरा अर्थ तुमचं नातं टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुमच्यातच जास्त आहे.
*१५. खर्च-हिशोब*
खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही कि त्रास होतो.
*१६. गैरसमज*
गैरसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकार करतो.
*१७. शस्त्रक्रिया. भीती-अभिमान*
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी प्रत्येक रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.
*१८. अपेक्षा-ऐपत*
घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी पडते.
*१९. अपयशाची भीती*
माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच नाही मिळालं तर? याची त्याला भीती वाटते.
*२०. खरी शोकांकिका:*
बोलायला कोण��च नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोहचणं हि शोकांकिका जास्त भयाण.
*२१. कौतुकाची खुमारी*
कौतुकाला थोडी हेव्याची किनार असल्याशिवाय त्याला खरी खुमारी येत नाही.
*२२. झरा आणि डबकं*
वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर ���ाजहंस!
*२२. कागद-सर्टिफिकेट*
सगळे कागद सारखेच! त्याला अहंकार चिकटला कि त्याचं सर्टिफिकेट होतं.
*२३. रातकिड्याचा आवाज*
रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षाही जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही त्याचा होतो.
*२४.फुगा किती फुगवायचा?*
एखादा फुगा फुगवता फुगवता एका क्षणी फुटतो. तो फुटल्यावर समजतं, तो किती फुगवायला नको होता.
*२५ हरवण्यासारखं घडवा*
आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं , कारण अशा स्थळावरून परतताना माणूस 'माणूस' राहत नाही. परतून येतं ते चैतन्य!
0 notes
Text
नवरा असा असावा
नवरा असा असावा
मॅचिंग मॅचिंग ड्रेस घालणारा
डोळयांवर एकसारखे गॉगल घालणारा
सजण्या सवरण्यात मदत करणारा
निऱ्या सावरुन देणारा
ए बायको अशी हाक मारणारा
गळ्यात हात घालून मित्रासारखा वागवणारा
चारचौघात एकटं नं सोडणारा
गर्दीतही माझ्यावर नजर ठेवणारा
मोठया समोर अडखळले तर डोन्ट वरी म्हणणारा
मला माझा वेळ देणारा
जितका कामसू तितकाच प्रेम सुद्धा करणारा
मला माझी स्पेस देणारा
बायको म्हणून नाही तर स्त्री म्हणून मान देणारा
एक मुलगा पती आणि बाप म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या निभावून नेणारा
0 notes
Text
प्रेम करणं सोप्प नसतं..
बायकोनं घरात मांजर पाळलेलं ..
तिचं ते खूप लाडकं.. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची... एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची... पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही... उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय... त्याचा त्याला प्रचंड राग यायचा...
एकदा नवरा जेवायला बसलेला आणि नेमकं मांजर त्याच्या ताटात तोंड घालतं... नवरा चिडतो आणि रागारागाने शेजारी असलेला ठोंब्या त्याच्या डोक्यात घालतो.. घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहतं... मेलं की काय अशी शंका येत असतानाच ते अंग झटकून उठून बसतं... हळूच नवऱ्याकडे हसून बघतं... आणि चक्क 'शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं... क्या करे आदत से मजबूर हूँ... पुन्हा नाही असं करणार..'असं माणसासारखं बोलतं... नवरा वेडा व्हायचाच बाकी...
त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक होतं.. ताटात तोंड घालणे तर सोडाच दारातला पेपर आणून दे.. टी पॉय वरचा चष्मा आणून दे अशी बारीकसारीक कामं ते करू लागतं... मग काय नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमते...ऑफिस मधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा..'अग मन्या दिसत नाही ग कुठं..?'
बायकोला सतत विचारत राहायचा..
असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्रीआणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबते..मन्या खिडकीतून ती व्हॅन बघतो.. त्याच्या मनात काय येतं कोण जाणे पण धावत जावून तो व्हॅन मधे बसतो... नवरा हे बघतो.. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावतो... मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला...
नवरा म्हणतो "मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे..तुझ्यासाठी नाही "
'मला माहितीय... पण मला जायचंय आता' मन्या शांतपणे बोलतो..
'मन्या,अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय... त�� क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही... मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास.. ए प्लिज...प्लिज उतर रे आता ' काकुळतीला येवून तो बोलतो
मन्या गोड हसतो आणि बोलतो 'तू माझ्यावर प्रेम करतोस?.....माझ्यावर?'
' म्हणजे काय शंकाय का तुला?'
'मित्रा,अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो तेंव्हा मी तुझा नावडता होतो.. सतत रागवायचास माझ्यावर...अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा... .पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो... तुला हवं तसं करू लागलो.. तेंव्हा तुला आवडू लागलो... तू माझ्यावर प्रेम करू लागलास यात नवल ते काय?
नॉट सो स्ट्रेंज यार...!!
वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते... जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?
समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं.. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं...पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही... आपल्याला हवं तसं वागत नाही... तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणही आता नकोसं वाटतं...त्याला टाळत राहतो...भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो....त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो...ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं त्याला क्षणात परकं करून टाकतो ..
आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ?
त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?
आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं... अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं,त्याला समजून घेणं जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!
0 notes
Text
My Random Thoughts about Love.
They say, the feeling of love can not be expressed. 😳
I don't know about that but I definitely know that love is not a game, when one love, one doesn't calculate, because, love is not a business. Surely, love has nothing to do with mind. It is spontaneous, it's not compulsion, it is not a compromise, it is a genuine connection of soul far from any logic. Love is unconditional commitment to an imperfect person. 😇
They say, you can not rise in love, you can not fly in love, you can not stand in love- you have to fall in love. If you want to know magic of emotion, something of you has to fall. By 'something' what I understand is..the EGO.. it has to fall. If you are too full of yourself, there is no room for devotion outside of the desire to receive for the self alone, you don't deserve to be loved 😑
I think, if you eliminate the need to get something out of human relationships, you naturally overflow with joy. You can have fabulous relationships with all sorts of people if you don't give responsibility to someone else to make you happy, when you can not do it for yourself. Because it is SELFISH. Just be happy on your own inside out & share that happiness with your partner & your partner shall do the same. I believe, this is the most amazing version of living a the life happily.
& those who haven't meet someone yet, if God is making you wait, be prepared to receive more than what you have asked for 😄
I believe that two people are connected at heart & it doesn't matter what they do, who they are or where they live. There are no boundaries and barriers if two people are destined to be together. Yess I believe.
I know, it's absolutely unrealistic dream to get someone who loves you truly & to have a devine relation these days. But, sometimes dreams do come true🤗
So, I wish I fall in love someday.. I hope, I experience that magic of emotions. I hope, somebody falls in love with me as passionately as I will and I hope, I find my soulmate.😍
Because, I believe, I deserve the best & I also believe, it would be worth the wait 😚 Let me manifest this positivity into the universe.. So that I can get it back soon 😊😊😊
August 5th
0 notes