Tumgik
#Raj Thackeray Sharad Pawar Interview Mns Ncp राज ठाकरे शरद पवार मुलाखत मनसे राष्ट्रवादी
webmaharashtra-blog · 7 years
Photo
Tumblr media
राज ठाकरे आणि शरद पावर यांची आज अभूतपूर्व मुलाखत वेब महाराष्ट्र टीम : महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन आगळी वेळगी नेतृत्व प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत. त्यामुळे राजकारणातल्या दोन पीढ्यांचे नेतृत्व असणारे हे दोन लोकप्रिय नेते नेमका काय संवाद साधतात याकडे पूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. पुण्यातील बी. एम. सी.सी. महाविद्यालयात ही मुलाखत होणार आहे. अनेकदा भल्याभल्याना गप्प बसायला लावणारे राज ठाकरे आणि फिरकी घेणाऱ्या प्रश्नांना नेमकी उत्तरे देणारे शरद पवार आज नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असेल. राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात प्रथमच शरद पवार आणि राज ठाकरे एकमेकांसमोर येणार असल्याने काय चर्चा होईल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज यांनी बाळासाहेबानंतर कुणी आवडणारे नेतृत्व असेल त्यात शरद पवारांचे नाव अग्रस्थानी आहे; मात्र राजकारणात अनेकदा एकमेकांवर दोन्ही नेत्यांनी कुरघोडी केली आहे. तर अनेकदा काही ठिकाणी एकमेकांची मदतही केली आहे. त्यामुळे पवारांची ही मुलाखत अभूतपूर्व असणार आहे. शरद पवार यांच्या राजकारणातील ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आधारवड या कार्यक्रमात दोघे एकत्र आले होते; त्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. सध्याचा पीएनबी घोटाळा, मोदी सरकारचे पोटनिवडणुकीतील अपयश, कोरेगाव भीमा प्रकरण, शेतकरी आत्महत्या या सारख्या मुद्द्यावर राज ठाकरे पवारांना बोलतं करतात का किंवा अन्य काही समिकरणांची नांदी तर होत नाहीना हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे.
0 notes