#बिष्णोई
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
भाषा ही सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा-अभिधम्म दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
लॉरेन्स बिष्णोई टोळीतल्या निशाणेबाजाला हरियाणातल्या पानिपत इथून अटक
रेल्वे प्रवासासाठीचं आरक्षण आता १२० ऐवजी ६० दिवसआधी करता येणार
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसकडून रविंद्र वसंत चव्हाण यांना उमेदवारी
आणि
न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीत पहिल्या डावात भारताच्या सर्व बाद ४६ धावा- विराट कोहलीसह पाच खेळाडू शून्यावर बाद
****
भाषा केवळ संवादाचं माध्यम नसून, सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त नवी दिल्लीत, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट महासंघ आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या समारंभात ते आज बोलत होते. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा भगवान बुद्धांच्या महान वारशाचा सन्मान असल्याचं पंतप्रधान म्हणाले. करुणा आणि सद्भावनेमुळेच आपण जगाला अधिक चांगलं बनवू शकतो, याची आठवण हा अभिधम्म दिवस आपल्याला करुन देतो, असं त्यांनी नमूद केलं. अभिधम्म दिवसाचं आणि पाली भाषेचं महत्त्व, तसंच बौद्ध धम्माचा समृद्ध वारसा जपण्यासाठी सरकारकडून सुरू ��सलेले प्रयत्न याविषयी त्यांनी भाष्य केलं. या कार्यक्रमात बौद्ध भिक्खूंचा सत्कार करण्यात आला.
****
आसाममधल्या अवैध स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याशी संबंधित, नागरिकत्व कायद्याच्या कलम ‘६ अ’ ची घटनात्मक वैधता, सर्वोच्च न्यायालयानं आज चार एक अशा बहुमतानं कायम ठेवली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आसाम करार, हा बेकायदेशीर स्थलांतराच्या समस्येवरचा राजकीय उपाय होता, असं निरीक्षण न्यायालयानं हा निर्णय देताना नोंदवलं. १९८५ मध्ये आसाम करारानंतर कलम ‘६ अ’ समाविष्ट करण्यात आलं होतं. २०१९ साली आसाममधल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी साठी हे कलम आधारभूत मानलं गेलं होतं. कलम ‘६ अ’ ने आसामसाठी एक विशेष तरतूद तयार केली, ज्याद्वारे १ जानेवारी १९६६ पूर्वी बांगलादेशातून आलेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तींना त्या तारखेपर्यंत भारताचे नागरिक मानलं गेलं.
****
दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आज नाशिक ते दिल्ली ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना करण्यात आली. एक हजार ६०० मेट्रिक टन कांदा घेऊन निघालेली ही विशेष रेल्वे गाडी, येत्या २० ऑक्टोबरला नवी दिल्ली इथं पोहोचणार असून, त्यानंतर हा कांदा दिल्लीतल्या घाऊक बाजारपेठांमध्ये वितरित केला जाईल. ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव निधी खरे यांनी आज ही माहिती दिली. लखनौ, वाराणसी आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये देखील लवकरच कांदा एक्स्प्रेस गाड्या रवाना होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
****
मुंबई पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीतील आणखी एका निशाणेबाजाला हरियाणातील पानिपत इथून अटक केली आहे. सुखा असं आरोपीचं नाव असून, त्याच्यावर अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. बिष्णोई गँगकडून सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेकदा धमक्या दिल्या गेल्या असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
****
विमानात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. १४ ऑक्टोबर रोजी आरोपीने समाजमाध्यमावरच्या बनावट खात्यावरुन चार विमानांमध्ये स्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. यात तीन आंतरराष्ट्रीय विमानं होती. धमकीमुळे दोन विमानांना उशीर झाला तर एक विमान रद्द करावं लागलं होतं.
****
गेल्या जून महिन्यात राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीएनं घेतलेल्या यूजीसी नेट २०२४ परीक्षेचा निकाल उद्या १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. संस्थेने समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे.
****
रेल्वेनं प्रवासाच्या आरक्षणाची आगाऊ कालमर्यादा निम्म्यावर आणली आहे. आता प्रवाशांना प्रवासाच्या ६० दिवसांआधी आरक्षण करता येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं रेल्वे मंडळानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. सध्या प्रवासाच्या १२० दिवस म्हणजे सुमारे चार महिने आधीच आरक्षण करता येतं, या निर्णयाचा सध्या तिकिट आरक्षित केलेल्या नागरिकांच्या प्रवासावर काहीही परिणाम होणार नाही. परदेशी प्रवाशांसाठी आरक्षणाची ही कालमर्यादा पूर्वीप्रमाणे ३६५ दिवस असेल.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं देश तसंच राज्यांच्या विकासासाठी, जनहितासाठी अनेक निर्णय घेतले असून प्रवक्त्यांनी सरकारची कामं तसंच पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी अशा सूचना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत प्रदेश प्रवक्ते आणि जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. जोपर्यंत प्रवक्ते आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण हे मुद्दे मतदारांसमोर मांडणार नाही तोवर ते तळागाळापर्यंत पोहोचणार नाहीत, याकडे त्रिवेदी यांनी लक्ष वेधलं.
****
मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागास सहकार्य करावं असं आवाहन आयकर उपसंचालक अनिल खडसे यांनी केलं आहे. काळा पैसा वापरला जात असल्याची, किंवा रोख रकमेचे वाटप होत असल्याची किंवा रोख रकमेची हालचाल होत असल्याबाबत विश्वसनीय मिळाल्यास माहिती १८-००-२३३-०३५५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा ९४ ० ३३ ९० ९८ ० या क्रमांकावर व्हॉट्सॲप संदेश पाठवावा असं आवाहन खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉग्रेसने रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पत्रकाद्वारे ही घोषणा केली. रवींद्र हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत. वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळं इथं विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेची पोटनिवडण��क होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज कन्नड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. स्ट्रॉंगरुम पाहणी, निवडणूक विषयक कामकाजासंदर्भात प्रशासनाने केलेल्या सर्व पूर्वतयारीचं त्यांनी अवलोकन केलं. सर्व अधिकारी ��णि कर्मचाऱ्यांना आपण करत असलेल्या कामाबाबत पूर्ण माहिती असायला हवी, तसंच मतदान केंद्र, त्याचा परिसर, मतदान यंत्रे, त्याची प्रक्रिया, तसेच मतदान केंद्रावर मतदारांना द्यावयाच्या सुविधांच्या पूर्ततेबाबत प्रत्येक केंद्राधिकाऱ्याने वेळोवेळी आढावा घेण्याची सूचना स्वामी यांनी दिली.
****
वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळ्यातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिरसाठ यांनी महापालिकेत १५ वर्ष नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे.
****
विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणारा ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम आजपासून आकाशवाणीवर सुरू होत आहे. दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी प्रसारित होणारा हा कार्यक्रम आमच्या Youtube चॅनलवरुनही आपण ऐकू शकाल. आज या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
कसोटी क्रिकेट क्रमवारीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याच्या पहिला डावात अवघ्या ४६ धावात तंबूत परतला. भारताची ही देशातली सर्वात कमी आणि एकूण तिसऱ्या क्रमांकाची किमान धावसंख्या आहे. बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला भारतीय संघ खेळपट्टीवर टिकाव धरुच शकला नाही. विराट कोहलीसह भारताचे एकूण ५ खेळाडू शून्यावर बाद झाले. ऋषभ पंतनं २० आणि यशस्वी जयस्वालनं १३ धावा केल्या. मॅट हेन्रीनं १५ धावात ५ तर विल्यम ओरूक यानं १२ धावात ४ बळी घेतले. या कसोटीचा हा दुसरा दिवस आहे. पावसामुळं काल पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. आजचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडच्या तीन बाद १८० धावा झाल्या होत्या.
****
नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली.
****
धाराशिव नगरपालिकेतील विविध घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील कचरा संकलन आणि त्यावर प्रक्रिया करून बायोमायनिंग प्रकारच्या प्रक्रियेला कार्यान्वित कण्याअच्या प्रकल्पात हा घोटाळा झाला होता, भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाकडे आणि विधिमंडळात मागणी करून वार���वार पाठपुरावा केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव ��ांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशावरून विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
****
तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा संपून आज अश्विनी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. अश्विनी पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले असल्याचं आमच्या वार्ताहारनं कळवलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ३० नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्या पक्षकरांची तडजोड पात्र दिवाणी तसंच फौजदारी अपीलं उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी प्रकरणे आपसी समन्वयातून तडजोडीद्वारे निकाली काढण्याकरीता ही एक सुवर्णसंधी आहे. संबधीत पक्षकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे
****
0 notes
Text
19 जून रोजी मनोरंजन जगतातील मोठी बातमी
19 जून रोजी मनोरंजन जगतातील मोठी बातमी
19 जून 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या: 19 जून रोजी अनेक मोठ्या बातम्यांनी सिनेमा आणि टीव्हीवर लक्ष वेधून घेतले आहे. लॉरेन्स विश्नोईच्या टार्गेट लिस्टमध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचेही नाव होते. करण जोहरकडून 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा त्याचा कट होता. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा एक फोटो समोर आला आहे. यानंतर शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन ‘डॉन 3’मध्ये एकत्र दिसणार असल्याची अटकळ…
View On WordPress
#19 जून 2022 रोजीच्या मनोरंजन बातम्या#अमिताभ बच्चन#करण जोहर#करण जोहर लॉरेन्स#करण जोहर लॉरेन्स बिश्नोई#थलपती विजय#दिवसाच्या मनोरंजन बातम्या#पंकज त्रिपाठी#पंकज त्रिपाठी मिर्झापूर ३#बिष्णोई#मनोरंजन बातम्या#लॉरेन्स बिश्नोई#विशाल आदित्य सिंग#शाहरुख खान#शाहरुख खान अमिताभ बच्चन डॉन ३
0 notes
Text
जयंत पाटील यांनी चित्ता भिष्णे समाजाला काळवीट खायला विरोध केला, नरेंद्र मोदींना पत्र
जयंत पाटील यांनी चित्ता भिष्णे समाजाला काळवीट खायला विरोध केला, नरेंद्र मोदींना पत्र
चित्त्यांसमोर भक्ष म्हणून जिवंत काळवीट सोडणे क्रुरता असल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. चित्त्यांपुढे जिवंत प्राणी सोडण्यापेक्षा त्यांना इतर पद्धतीने अन्न दिले पाहिजे, अशी मागणी पाटलांनी केली आहे. दरम्यान, आफ्रिकेच्या नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिश्नोई समाजाने विरोध दर्शवला आहे. या संदर्भात बिश्नोई समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. Namibian…
View On WordPress
#bishnoe समुदाय#pm नरेंद्र मोदी#pm नरेंद्र मोदी वाढदिवस#काळवीट#काळवीट वर bishnoe समुदाय#कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्ता#चित्ता#जयंत पाटील#जयंत पाटील चितेवर#पंतप्रधान नरेंद्र मोदी#बिष्णोई समाज#भारतातील काळवीट#भारतातील चित्ता#सलमान खान
0 notes
Text
सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई धमक्या नक्की का देतोय ?
सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई धमक्या नक्की का देतोय ?
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना रविवारी सकाळी धमकीचे पत्र मिळाले असून त्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आहे. वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रविवारी सकाळी आठच्या सुमारास सलीम खान हे मॉर्निंग वॉकसाठी बांद्रा येथील बसस्टॅन्ड जवळ असलेल्या नेहमीच्या बाकड्यावर बसलेले असताना तिथे त्यांना हे पत्र…

IPL 2022: 21 वर्षीय फिरकीपटूसमोर हतबल डेव्हिड वॉर्नर सलग तीन वेळा बाहेर
IPL 2022: 21 वर्षीय फिरकीपटूसमोर हतबल डेव्हिड वॉर्नर सलग तीन वेळा बाहेर
आयपीएल 15 मध्ये दिल्ली आणि लखनऊ यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीला पुन्हा एकदा विजयी गती मिळवण्याची संधी आहे. या सामन्यात दिल्लीने तीन बदल केले. डेव्हिड वॉर्नर, सर्फराज खान आणि एनरिच नॉर्टजे संघात परतले आहेत. त्याचबरोबर गौतमला लखनौसाठी संधी मिळाली आहे. या सामन्यात युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईने पुन्हा एकदा डेव्हिड वॉर्नरला आपला शिकार बनवले आहे. बिश्नोईविरुद्ध डेव्हिड वॉर्नर…
View On WordPress
0 notes
Text
घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना पुण्यात दोघांना अटक; राजस्थानमधून बेकायदेशीररित्या रिफिलींग शिकून आल्याची कबुली
घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना पुण्यात दोघांना अटक; राजस्थानमधून बेकायदेशीररित्या रिफिलींग शिकून आल्याची कबुली
घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना पुण्यात दोघांना अटक; राजस्थानमधून बेकायदेशीररित्या रिफिलींग शिकून आल्याची कबुली कात्रज येथे एका गॅस सिलेंडरमधील गॅस दुसऱ्या व्यावयायिक सिलेंडरमध्ये भरत असताना स्फोट होऊन मोठी दुर्घटना ताजी असताना, अशाच प्रकारे घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरत असताना मुंढवा पोलिसांनी कारवाई करुन दोघांना पकडले. ओमप्रकाश साजनराम बिष्णोई (वय…
View On WordPress
#अटक#आल्याची#कबुली;#गॅस#घरगुती#दोघांना#पुण्��ात#बातम्या#बेकायदेशीररित्या#भरताना#राजस्थानमधून#रिफिलींग#व्यावसायिक#शिकून#सिलेंडरमधील#सिलेंडरमध्ये
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या यात्रेच्या देशभरातल्या हजारो लाभार्थ्यांसह, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार तसंच इतर लोकप्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरात पदमपुरा भागात विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांचा हा कार्यक्रम दाखवण्यात येत आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान आजपासून तीन दिवस गुजरात दौऱ्यावर जात असून, उद्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथं जागतिक नेत��यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. दहा जानेवारीला गांधीनगर इथं त्यांच्या हस्ते व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचं उद्घाटन होईल. “भविष्याचे प्रवेशद्वार” अशी या परिषदेची संकल्पना आहे.
****
शालेय जीवनातच विद्यार्थांना रस्ता वाहतुकीचे नियम शिकवणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल 'सडक सुरक्षा अभियान २०२४ - संवेदना का सफर' या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी गडकरी यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. १८ वर्षाखालील मुलांना रस्ता सुरक्षतेसाठी जागरूक करण्यासाठी समाज माध्यमे, महाविद्यालय, सामाजिक संघटनांनी पुढाकर घ्यावा, असं आवहन गडकरी यांनी केलं. देशात रस्ते अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
आकाशवाणी दिल्ली इथले माजी उर्दू वृत्तनिवेदक अशरफ आबिदी यांचं काल रात्री दिल्लीत निधन झालं, ते ८१ वर्षांचे होते. आबिदी यांनी १९८२ ते २००२ पर्यंत जवळपास २० वर्ष आकाशवाणी दिल्लीच्या वृत्त विभागात काम केलं.
****
नागरिकांमध्ये सुदृढ आरोग्याविषयी जागरुकता वाढावी या उद्देशानं यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. यात नागपुर, पुणे, मुंबई सारख्या इतर अनेक शहरांमधले धावपटुही सहभागी झाले होते. यात पोलीस विभागानं नशामुक्त पहाट अभियानातून व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली. विजेत्या धावपटूंना आणि नशामुक्त पहाट अभियानात आयोजित स्पर्धेतल्या विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आलं.
****
रत्नागिरी इथं काल पहिल्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. २१, १० आणि पाच किलोमीटर्स अशा वेगवेगळ्या अंतराच्या स्पर्धेत पाच ते ८८ वर्षं या वयोगटांतल्या एकूण दीड हजार स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. क्रीडा पर्यटनाला चालना मिळण्याच्या दृष्टीने सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचं सहकार्य लाभलं.
****
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन - सीटू प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मा��ण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या ११ तालुक्यांमधल्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी काल लोणी इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावं, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन पगारी रजा, शासकीय भत्ते, आरोग्य विमा आणि इतर सुविधा द्याव्या, आदी मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या जेष्ठ कवयित्री संध्या रंगारी यांना साहित्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार' माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आला. नांदेड इथल्या सावित्री -रमाई महोत्सवात हा पुरस्का�� वितरण सोहळा पार पडला.
****
इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं सुरु असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एयर रायफल पिस्टल सांघिक प्रकारात भारतीय खेळाडुंनी सुवर्ण पदक पटकावलं. वरुण तोमर, अर्जुन सिंह चीमा आणि उज्वल मलिक यांच्या संघानं हे यश संपादन केलं. वरुण आणि अर्जुन यांनी वैयक्तिक प्रकारात देखील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
****
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेन्टी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं टी ट्वेन्टी संघात पुनरागमन झालं आहे. या मालिकेसाठी रोहीत शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुभमन गिल, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, आवेश खान, अर्षदिप सिंग आणि मुकेश कुमार गोलंदाजीची बाजू सांभाळणार आहेत. येत्या ११ जानेवारीपासून भारतात या मालिकेला सुरुवात होईल.
****
हवामान
राज्यभरात पुढचे दोन दिवस विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
Text
सुपरस्टार सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, बिष्णोई टोळीने दिली जीवे मारण्याची धमकी
सुपरस्टार सलमान खानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली, बिष्णोई टोळीने दिली जीवे मारण्याची धमकी
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतल्यानंतर सलमान खान आपल्या घरी रवाना झाला आहे. सलमान खान प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram रात्रीचा तारा सलमान खान मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला आले. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर सलमान खान सोबत त्याच्या घराकडे रवाना झाला आहे. काही दिवसांपूर्वी बिष्णोई टोळीने तिचे वडील सलीम खान आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही बातमी नुकतीच फुटली आहे.…
View On WordPress
0 notes
Text
"बुल्ली बाई", "सुल्ली डील्स" अॅप निर्मात्यांना मानवतावादी आधारावर जामीन मिळाला
“बुल्ली बाई”, “सुल्ली डील्स” अॅप निर्मात्यांना मानवतावादी आधारावर जामीन मिळाला
न्यायालयाने आरोपींना कडक अटी घातल्या होत्या नवी दिल्ली: दिल्ली न्यायालयाने सोमवारी ‘बुल्ली बाई’ अॅप प्रकरणातील आरोपी निरज बिश्नोई आणि ‘सुल्ली डील्स’ अॅप निर्माता ओंकारेश्वर ठाकूर यांना मानवतावादी आधारावर जामीन मंजूर केला. न्यायालयाने असे मानले ��ी आरोपी हे प्रथमच गुन्हेगार आहेत आणि सतत कारावास त्यांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी हानिकारक असेल. न्यायालयाने आरोपींना कठोर अटी घातल्या होत्या की त्यांनी…
View On WordPress
0 notes
Text
पुणे ब्रेकिंग..सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधव ताब्यात , अशी झाली कारवाई ?
पुणे ब्रेकिंग..सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधव ताब्यात , अशी झाली कारवाई ?
पंजाबचा प्रसिद्ध गायक सिद्धू मूसे वाला हत्याकांड प्रकरणातील पुणे जिल्ह्यातील दोनही संशयितांना अटक करण्यात आलेली असून संतोष जाधव याला गुजरात येथील मांडवी येथे बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. सिद्धू मूसेवाला हत्याकांडात संतोष जाधव याचा कितपत सहभाग आहे तसेच लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात तो कसा आला याची देखील पोलीस चौकशी करत असून चौकशीत अनेक धागेदोरे हाती येतील असे पोलिस महासंचालक कुलवंतकुमार…

पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना ‘राष्ट्रपती पदक’
पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना ‘राष्ट्रपती पदक’ .
कोल्हापूर : वृत्तसेवा- गुन्हेगारी जगतात प्रचंड दहशत निर्माण केलेल्या आणि कोल्हापूर पोलिस दलावर काळ बनून आलेल्या कुख्यात ‘07 बिष्णोई गँग’च्या म्होरक्यासह साथीदारांना बेड्या ठोकणारे ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना सोमवारी ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर झाले. वरिष्ठ अधिकार्यांसह विविध संस्था, संघटनांनी सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. गृह राज्यमंत्री सतेज पाटील, विशेष पोलिस…
View On WordPress
0 notes