Tumgik
#पंतप्रधानांच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
दीड हजार कोटी रुपयांच्या नागपूर एम्स रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन नागपूर  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अत्याधुनिक सुविधा असलेल्या एम्स रूग्णालयाचे उद्घाटन केले.पंतप्रधानांनी जुलै 2017 मध्ये या रुग्णालयाची पायाभरणी केली होती, हे रूग्णालय प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आले आहे. एम्स नागपूर हे रूग्णालय 1575 कोटी खर्च करून उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 19 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
सविस्तर बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले...
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्ज मंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती इथं, पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनात विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पंतप्रधानांनी पाहणी केली. हे प्रदर्शन आज आणि उद्या सर्वांसाठी खुलं आहे.
****
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३, नांदेड २८, लातूर १९, धाराशिव १८ तर परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात, नांदेड इथं महात्मा गांधी मिशनचं अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी जिल्ह्यात धर्मापुरी इथं ब्लेसिंग कॉलेज ऑफ नर्सिंग, तर धाराशिव इथं बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. 
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्या प्रकरणी केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारकडून तत्काळ अहवाल मागवला आहे. या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचं, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, तिरुपती तिरुमला देवस्थाननं संबंधित पुरवठादाराचं कंत्राट रद्द केलं असून, त्याला काळ्या यादीत टाकलं आहे.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
जालना जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जणांचा मृत्यू झाला. जालना-वडीगोद्री महामार्गावर काल सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बसच्या वाहकासह तीन महिला प्रवासी आणि ट्रकमधील चालक आणि त्याच्या सहायकाचा समावेश आहे. अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. काल सकाळी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला, रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या.बांगलादेशचा संघही पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
धनगर आरक्षण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली.सकल धनगर समाजाच्या ��ागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल त्यांची नियमीत तपासणी केली, परंतू उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला.
दरम्यान ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री इथे कालपासून आमरण उपोषण सुरू केलं, याच मागणीसाठी विधिज्ञ मंगेश ससाणे आणि सहकाऱ्यांनी १८ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी इथेच आमरण उपोषण पुकारलं आहे.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे काल रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी लोकसहभागातून सुमारे तीन टन कचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते काल एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
लातूर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी दंतोपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच���या माईर्स इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यात यासाठीचा सांमजस्य करार करण्यात आला. येत्या सोमवारपासून महापालिकेच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यल्प दरात दंतोपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात काल विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका काल काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
धाराशिव जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी २८ कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी, छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्र्यांकडे सादर केलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं विविध पथकांची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक घेऊन समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले
****
रेल्वे लाईन च्या देखभाल आणि दुरुस्ती च्या कामांमुळे नांदेड ते रायचूर एक्सप्रेस येत्या १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत  तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे तर  रायचूर ते नांदेड एक्सप्रेस २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 25 days
Text
Pimpri : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही - काशिनाथ नखाते
एमपीसी न्यूज – नौदल दिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यावरील (Pimpri) राजकोट परिसरामध्ये 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मोठ्या डामडौलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र केवळ 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला. यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. केवळ टक्केवारीत अडकलेल्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण आहे. शिवछत्रपतींचा अवमान…
0 notes
Video
youtube
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात नाशिकचे स्केटर्स करणार प्रदर्शन..
0 notes
nandedlive · 1 year
Text
हायड्रोजनवर चालणारी पहिली बस आता लडाखमधून धावणार
Tumblr media
नवी दिल्ली : भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी बस सेवा केंद्रशासित प्रदेश लडाखच्या रस्त्यांवर लवकरच सुरु करण्यात येणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बससेवा लेहमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिक चाचण्यांसह सुरू करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी एनटीपीसी या प्रकल्पाअंतर्गत शहरातील आंतर-शहर सेवेसाठी लेह प्रशासनाला ५ हायड्रोजन इंधन सेल बसेस पुरवणार आहे. सरकारी कंपनीने बसेसला इंधन देण्यासाठी ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी इंधन केंद्र आणि १.७ मेगावॅटचा सोलर प्लांटदेखील बांधला आहे. यासाठी लेह प्रशासनाने पायाभूत सुविधांसाठी शहरातील ७.५ एकर जमीन भाड्याने दिली आहे. हा प्रकल्प पंतप्रधानांच्या २०२० च्या स्वातंत्र्यदिनी कार्बन-न्यूट्रल लडाखच्या घोषणेच्या दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्यात आला आहे. हायड्रोजन फ्युएल सेल बसेस भारतातील सार्वजनिक रस्त्यांवर व्यावसायिकरित्या कार्यरत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाची चाचणी ११,५०० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या दुर्मिळ वातावरणात आणि हवेतील कमी ऑक्सिजनमध्ये होणार आहे. Read the full article
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले प्रधानमंत्री श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
समृद्धी महामार्ग व विविध लोकाभिमुख उपक्रमांचा रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले प्रधानमंत्री श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
इन्फोसिस फाऊंडेशन सर्वेसर्वा पदमश्री डॉ सुधा कुलकर्णी-मुर्ती देवगड मध्ये
इन्फोसिस फाऊंडेशन सर्वेसर्वा पदमश्री डॉ सुधा कुलकर्णी-मुर्ती देवगड मध्ये
बापर्डेतील देवी दुर्गामातेचे घेतले दर्शन ब्रिटन च्या पंतप्रधानांच्या वतीने साकडे सिंधुदुर्ग : सुधा मूर्ती या बुधवारी सिंधुर्दुगात दाखल झाल्या. सुधा मुर्ती यांनी यावेळी बापर्डे येथील पुरातन असलेल्या श्री दुर्गादेवीचे दर्शन घेतले. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. त्यांच्यासाठी सुधा मूर्ती यांनी दुर्गादेवीला साकडे घातले. सूनक यांचे श्री दुर्गादेवी हे श्रद्धास्थान आहे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"नॉट ऑन माय माइंड": नितीश कुमार यांनी पुन्हा पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षा नाकारल्या
“नॉट ऑन माय माइंड”: नितीश कुमार यांनी पुन्हा पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षा नाकारल्या
नवी दिल्ली: बिहारमध्ये भाजपसोबतच्या त्यांच्या पक्षाच्या सत्ताधारी युतीतून बाहेर पडून मोठे राजकीय वादळ निर्माण केल्यानंतर, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा सांगितले की, सध्या पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा त्यांच्या मनात नाही. आज राष्ट्रीय राजधानीत पत्रकारांशी बोलताना श्री कुमार म्हणाले की ते विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतील आणि त्या सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे. @NitishKumarने…
View On WordPress
0 notes
Link
राष्ट्रवादीने केली पंतप्रधानांच्या घरासमोर नमाज अदा करण्याची मागणी | PM Narendra Modi | NCP News
2 notes · View notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम
समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम
समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला भरगच्च कार्यक्रम मुंबई – महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्जमंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी या ठिकाणी उभारलेल्या विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पाहणी केली. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती, इथं पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस केंद्रांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथला मुख्य कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सभागृहात झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात २८ केंद्राचा शुभारंभ झाला. आपले कौशल्य आणखी प्रभावी आणि आधुनिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या केंद्राचा उपयोग करावा, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केलं.
परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत धर्मापुरी इथल्या ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सिंग इथं शुभारंभाच्या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम झाला. धाराशिव जिल्ह्यात १८ केंद्राचा शुभारंभ झाला. बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं.
****
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शाह यांच्या २४ तारखेला नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं आणि २५ तारखेला नाशिक, कोल्हापूर इथं भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होणार आहेत.
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
मुंबईतल्या पश्चिम उपनगरात लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज जनसंवाद यात्रा काढली. खासदार शिंदे यांनी मालाड, मागाठाणे, कांदिवली, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी इथं जनसंवाद बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
****
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता बांधण्‍यात येत आहे. शामलदास गांधी मार्ग उड्डाणपूल ते वरळीपर्यंतच्या या मार्गाचं ९२ टक्‍के काम पूर्ण झालं आहे. उद्या शनिवारपासून हा रस्ता दररोज सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
****
नंदुरबार शहरात काल एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेल्या वादप्रकरणी ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात चार विधी संघर्ष त्रस्त बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी फरार ५४ संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
****
जालना-वडीगोद्री महामार्गावरील मठतांडा गावाजवळ आज सकाळी साडे आठच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या ��पघातात बसमधील वाहकासह तीन महिला प्रवाशी आणि ट्रकमधील चालक, वाहक असे सहाजण जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १३ जणांवर जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एसटी बस गेवराईहून जालन्याला जात असताना बीडकडे जाणाऱ्या संत्र्याच्या भरधाव ट्रकने धडक दिल्यानं, हा अपघात झाल्याचं बसच्या चालकानं सांगितलं.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वाचं काँग्रेस पक्षात स्वागत केलं.
****
चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. आज सकाळी भारताचा पहिल्या डाव ३७६ धावांवर आटोपला, भारतानं कालच्या ३३९ धावांवरुन आज डाव सुरु केला. अवघ्या ३७ धावातच भारताचे चार फलंदाज तंबूत परतले. रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
अहमदनगर इथं माळीवाडा परिसरात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेशी शपथ दिली, तसंच स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे आज रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कारभारी दिवेकर यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होत तीन टन कचरा उचलला. नांदेड इथं विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत डी. आर. एम. कार्यालय परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आलं.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका आज काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या ०८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे करीमनगर गाडी पुणे स्थानकावरुन २१ आणि २८ आक्टोबर तसंच ४ आणि ११ नोव्हेंबरला रात्री पावणे अकराला सुटेल. तर परतीच्या प्रवासात २३ आणि ३० ऑक्टोबर तसंच ६ आणि १३ नोव्हेंबरला करीमनगर स्थानकावरुन सकाळी ६ वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? गणेशोत्सवानंतर शिंदे किंवा ठाकरे गटाचा निर्णय
मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार? गणेशोत्सवानंतर शिंदे किंवा ठाकरे गटाचा निर्णय
खरी शिवसेना कोण हे अजून ठरलेले नाही? शिंदे गटात की ठाकरे गटात? न्यायालयातील सुनावणी पूर्ण झालेली नाही. मग मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा बोलवण्याचा अधिकार कोणाला? उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Tv9 नेटवर्क मुंबईतील शिवाजी पार्क गेल्या 40 वर्षांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांच्या भाषणाची देशवासी ज्या प्रकारे वाट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
ENG vs NZ: ब्रिटीश पंतप्रधानांच्या गेटअपमध्ये स्टेडियममध्ये घुसला माणूस, पोलिसांना करावा लागला संघर्ष
ENG vs NZ: ब्रिटीश पंतप्रधानांच्या गेटअपमध्ये स्टेडियममध्ये घुसला माणूस, पोलिसांना करावा लागला संघर्ष
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड: इंग्लंडने कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटीत न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२९ धावा आणि दुसऱ्या डावात ३२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 360 धावा आणि दुसऱ्या डावात 296 धावा करत सामना जिंकला. तिसऱ्या चाचणीदरम्यान…
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 2 years
Text
पंतप्रधानांच्या हस्ते आसाममधल्या सात कर्करोग रुग्णालयांचे लोकार्पण आणि आसाममधील आणखी नव्या सात कर्करोग रुग्णालयांची पायाभरणी https://prasidhipramukh.in/?p=9108
0 notes
kokannow · 2 years
Text
वागदे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका निधी राऊळ यांचा देखील पंतप्रधानांकडून गौरव
वागदे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका निधी राऊळ यांचा देखील पंतप्रधानांकडून गौरव
कोविड लसीकरण कामगिरी केलेल्या कामाचे केले कौतुक पंतप्रधानांच्या गौरवपत्राने निधी राऊळ भारावल्या दिगंबर वालावलकर । कणकवली : कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या कामात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून कर्मचाऱ्यांचा अभिनंदन पत्र देत गौरव करण्यात आला आहे. अशाच प्रकारे कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वागदे उपकेंद्राच्या एन आर एच एम अंतर्गत च्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes