#पीएम मोदी बातम्या
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १४ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• देशाचा प्रत्येक भाग, प्रत्येक कुटुंब प्रगतीपथावर वाटचाल करेल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल - पंतप्रधानांचं प्रतिपादन • सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना • प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला प्रारंभ - पहिल्या दिवशी सुमारे दीड कोटींहून अधिक भाविकांचं कुंभस्नान • मकरसंक्रातीनिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साह आणि • डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ३१ व्या नामविस्तार दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
देशाचा प्रत्येक भाग, प्रत्येक कुटुंब प्रगतीपथावर वाटचाल करेल तेव्हाच विकसित भारताचं स्वप्न साकार होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. जम्मू काश्मीर मध्ये श्रीनगर- सोनमर्ग मार्गावरच्या बोगद्याचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. या बोगद्यामुळे श्रीनगर आणि सोनमर्गदरम्यान बारमाही संपर्क कायम राहून पर्यटनाबरोबरच रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा यानांही चालना मिळेल, असा विश्वास त्यानीं व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मुंबई इथं नौदलातील आयएनएस सूरत, आयएनएस नीलगिरी आणि आयएनएस वागशीर या तीन लढाऊ जहाजांचं जलावतरण त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. नवी मुंबईत खारघर इथल्या श्री श्री राधा मदनमोहनजी या इस्कॉन मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी आकाशवाणीवरून प्रसारित होणारा मन की बात हा कार्यक्रम या महिन्यात येत्या रविवारी १९ तारखेला प्रसारित होणार आहे. या कार्यक्रम मालिकेचा हा ११८ वा भाग असेल. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन आल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.
पणन विभागामार्फत सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी, अशी सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विभागाकडून १०० दिवसात करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेताना ते काल बोलत होते. राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कृषी साठवणूक केंद्राचा प्रस्ताव सादर करावा, कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळींची संख्या वाढवावी अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जाभूरगाव इथं कृषी केंद्राची उभारणी पूर्ण झाली असून, येत्या ४५ दिवसात त्याचं लोकार्पण करण्यात येणार असल्याचं पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी यावेळी सांगितलं. शालेय शिक्षण, पर्यटन, दळणवळण, महाज्योती आदी विभागांच्या १०० दिवसांचा आराखड्याचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी काल घेतला. राज्य अभ्यासक्रम आराखड्याची पुढील वर्षापासून अंमलबजावणी, पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास करणं, शिक्षक भरती प्रक्रिया जलदगतीने राबवणं, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलिसांची नियुक्ती, अजिंठा वेरूळ पर्यटन विकास कामांना गती देणं, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पर्यटन पोलिस नेमणं, राज्यात पाच ठिकाणी शिवसृष्टी थीम पार्क उभारणं आदीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना केल्या. शासनाच्या महत्त्वकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृह हे विभागाच्या सचिवांपासून प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला दत्तक देऊन, संबंधितांनी महिन्यातून किमान एकदा प्रत्यक्ष मुक्कामी भेट देत तिथल्या व्यवस्थेची खातरजमा करून घेण्याचे आदेश दिल्याचं, ऊईके यांनी सांगितलं.
महाकुंभमेळ्याला कालपासून प्रारंभ झाला. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं काल पौष पौर्णिमेपासून सुरु झालेला हा कुंभमेळा पुढचे ४५ दिवस म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमात काल पहिलं शाही स्नान झालं. काल ��ायंकाळपर्यंत सुमारे दीड कोटींहून अधिक भाविकांनी संगमावर स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर विविध आखाड्यांचं अमृत स्नान सुरु झालं. महाकुंभ मेळ्यासाठी भारतीय रेल्वेनं पाच हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. यातून नवीन पायाभूत सुविधा आणि विद्यमान सुविधांचं अद्ययावतीकरण करण्यात आलं असल्याचं, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश तसंच दक्षिणायनातून उत्तरायणात संक्रमणाचं पर्व, मकरसंक्रांतीचा सण आज साजरा होत आहे. या दिवशी परस्परांना तीळगुळ वाटपाचा तसंच महिलावर्गात सौभाग्यदानासह मातीच्या सुगड्यांमधून विविध वस्तूंचं वाण देण्याचा प्रघात आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठा विविध पूजा साहित्यासह ऊस, बोरं, हरभरा आणि इतर साहित्यानं फुलून गेल्या आहेत. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे, या निमित्तानं विविध प्रकारच्या पतंगांनी दुकानं सजली आहेत. पतंगाच्या खरेदीसाठी आबालवृद्धांचा उत्साह दिसून येत आहे. नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करत असून, असा मांजा वापरू नये यासाठी शहरातल्या अनेक चौकात वाहतूक पोलिसांकडून भोंग्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. ‘‘नायलॉन मांजा मुळे पक्षी, सामान्य जनता सर्वाधिक जखमी होतात म्हणून नायलॉन मांजाची खरेदी अथवा विक्री होत असतांना तसंच नायलॉन मांजाच्या सहाय्याने कुणी पतंग उडवत असल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’’ नायलॉन मांजाचा साठा, विक्री आणि वापर केल्याचं आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसोबतच गरज भासल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असं छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३१ वा नामविस्तार दिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नाशिकच्या डॉ बी आर आंबेडकर एस सी, एसटी महासंघाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ इंदिरा आठवले यांचं आज सकाळी साडे दहा वाजता विद्यापीठाच्या सभागृहात व्याख्यान होणार आहे.
पहिल्या खो-खो विश्वचषक क्रीडा स्पर्धांना कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. १९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २३ देशांचे ३९ संघ सहभागी झाले आहेत. काल सलामीच्या सामन्यात भारताने नेपाळचा ४२ - ३८ अशा गुण फरकाने पराभव केला. महिला संघाची सलामीची लढत आज कोरिया संघासोबत होणार आहे.
अहिल्यान��र इथं २९ जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धे��ी तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते काल या स्पर्धा मैदानाचं मातीपूजन करण्यात आलं.
बीड जिल्ह्यातले मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी निगडित खंडणी प्रकरणी अटक झालेल्या वाल्मिक कराड विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल मस्साजोग इथं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. या आंदोलनात देशमुख कुटुंबासह गावकरीही सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी देशमुख यांच्याशी संवाद साधला, त्यानंतर हे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्थापन विशेष तपास पथकात बदल करण्यात आला आहे. जुनं पथक बरखास्त करुन आता या पथकात बीड चे पोलिस उपअधिक्षक अनिल गुजर, छत्रपती संभाजीनगर इथल्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस अधिक्षक किरण पाटील यांच्यासह पुणे इथल्या अधिकार्यांचा समावेश आहे.
बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल केज इथं पत्रकार परिषद घेतली, देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतल्या सर्व दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं, सोनवणे यांनी सांगितल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
बीड जिल्ह्यात आजपासून २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली आणि नियोजित असलेली विविध आंदोलनं, आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातही अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी शस्त्रबंदी तसंच जमावबंदी आदेश जारी केले आहेत.
धाराशिव इथं पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा काल सत्कार करण्यात आला. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं.
तुळजापुरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्राची काल घटोत्थापनाने सांगता झाली. यानिमित्त मंदीराच्या मुख्य गाभाऱ्याला विविध फुलांची आकर्षक आणि सुंदर सजावट करण्यात आली होती. काल मोठ्या संख्येनं भाविक तुळजापुरात दाखल झाले होते.
छत्रपती संभाजीनगर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात १६ ते १८ जानेवारी दरम्यान विवेकानंद व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. व्याख्यानमालेचं हे सातवं वर्ष असून महाविद्यालयाच्या प्रांगणात दररोज संध्याकाळी सहा वाजता होणारी ही व्याख्यानं सर्वांसाठी खुली आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात ��ाळेगण सिद्धी इथल्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी संस्थेचा अण्णा हजारे सामाजिक गौरव पुरस्कार चार जणांना जाहीर झाला आहेत. बीडच्या गेवराई इथल्या आई संस्थेचे अध्यक्ष संतोष गर्जे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग: पोलिसांचा निष्काळजीपणा, सर्वोच्च न्यायालय म्हणतो, अहवालाचा हवाला
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग: पोलिसांचा निष्काळजीपणा, सर्वोच्च न्यायालय म्हणतो, अहवालाचा हवाला
पीएम मोदी सुरक्षा उल्लंघन: समितीने काही उपाय सुचवले आहेत (फाइल) नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा भंगाची चौकशी करणार्‍या समितीला जानेवारीत त्यांच्या राज्याच्या दौऱ्यात पंजाब पोलिसांच्या वर्तनात त्रुटी आढळल्या, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी स्थापन केला नवा पक्ष, मोदींच्या बालेकिल्ल्यात भाजपला आव्हान देणार आहे
माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी स्थापन केला नवा पक्ष, मोदींच्या बालेकिल्ल्यात भाजपला आव्हान देणार आहे
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी प्रजा शक्ती डेमोक्रॅटिक पार्टी या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांचा पक्ष गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला (फाइल फोटो). प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय गुजरात माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी रविवारी ‘प्रजा शक्ती डेमोक्रॅटिक पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना केली. त्यांचा पक्ष गुजरातमध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
देशाला भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीपासून मुक्त करण्याची वेळ आलीय – पीएम मोदी
देशाला भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीपासून मुक्त करण्याची वेळ आलीय – पीएम मोदी
देशाला भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीपासून मुक्त करण्याची वेळ आलीय – पीएम मोदी नवी दिल्ली – देशाला भ्रष्टाचार आणि वशिलेबाजीपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे. देशवासियांनी या दोन दुर्गुणांचा द्वेष करण्याची सवय लावावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्यावरून केलेल्या भाषणात केले. आगामी 25 वर्षात देशाला विकसित देश बनवण्यासाठी “पंच प्राण’ निश्‍चित करण्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
मुलायम सिंह यादव सून 2022 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये का सामील होतात अपर्णा यादव यांनी मोठा खुलासा केला
मुलायम सिंह यादव सून 2022 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये का सामील होतात अपर्णा यादव यांनी मोठा खुलासा केला
लखनौ. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या कोणत्याही दोन पक्षांची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ती भाजप आणि सपा. निवडणुकीच्या वातावरणात दोन्ही पक्षांमधील हेराफेरीच्या खेळाबरोबरच भाषणबाजीचाही काळ सुरू आहे. दोन्ही पक्षांचे नेतेही सातत्याने अशा प्रकारची भाषणबाजी करत असून, त्यामुळे राजकीय पारा सातत्याने चढत आहे. या सगळ्यात नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला. मुलायमसिंह यादव यांची सून (मुलायम सिंह यादव सून) अर्पणा…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
पीएम किसान योजनेंतर्गत 4000 रुपये मिळण्याची शक्यता, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या
पीएम किसान योजनेंतर्गत 4000 रुपये मिळण्याची शक्यता, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या
पीएम मोदी सहकारी कंपनी इफ्��ोने जगातील पहिले ‘नॅनो यूरिया’ खत तयार केले आहे. त्याचे उत्पादन जूनपासून सुरू होईल आणि हे जगभरातील शेतक to्यांना देण्यात येणार आहे. कंपनीने May१ मे रोजी सांगितले की, स्वदेशी विकसित ‘नॅनो यूरिया’ द्रव स्वरूपात असून त्याची किंमत प्रति २०० मिली २ 24० रुपये आहे. पारंपारिक युरियाच्या प्रत्येक बॅग किंमतीपेक्षा हे दहा टक्क्यांनी स्वस्त आहे. यूपीएलने आशिष डोभाल यांची भारताचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 13 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत • संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक; १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी • नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे आणि • बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताचा दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचं लक्ष्य
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले… पी एम किसान सम्मान निधी से किसानों को करीब तीन लाख करोड रूपये की आर्थिक मदत दी गई है। पिछले दस वर्षों में कृषी लोन की राशी साढे तीन गुना हो गई है। अब पशु पालकों और मत्स्य पालकों को भी किसान क्रेडीड कार्ड दिया जा रहा है। देश मे मौजुद नौ हजार से ज्यादा एफ पी ओ, किसान उत्पाद संघ उन्हें भी आर्थिक मदत दी जा रही है।
कृषी मालाच्या किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी वाहतूक आणि साठ���णूकीच्या किंमतीचा भार सरकार उचलणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. यावर्षी कृषी आणि संबंधित क्षेत्रातला वाढीचा दर साडेतीन ते चार टक्क्यांदरम्यान राहणं अपेक्षित असल्याचं चौहान यांनी सांगितलं.
देशाच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं काल पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव, अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. चिदंबरम यांना पद्मश्री तसंच पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राज्यातल्या विविध नियोजन प्राधिकरणांचं सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते काल नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते. महिला आणि बालविकास विभागाच्या पुढील १०० दिवसात करायच्या कामांचाही मुख्यमंत्र्यांनी काल आढावा घेतला. राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागात विशेषत: मुंबई महानगरात झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतले फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याना पुण्यातून तर सिध्दार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती, या सर्व आरोपींना केज न्यायालयात काल हजर करण्यात आलं, न्यायालयानं या सर्वांना १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे… नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण, अमानुष मारहाण आणि हत्या केल्यापासून फरार असलेल्या सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात चर्चेत असलेले बहुतांश प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत, त्यामुळे आता विशेष तपास पथक तसंच सीआयडीकडून तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल हो��्याची प्रतीक्षा आहे. रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड दरम्यान, ��ंतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत काल सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर यांच्यासह दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
नांदेड शहरातल्या बहुचर्चित स्फोट प्रकरणात न्यायालयाने सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. नांदेड शहरात पाटबंधारे नगरातल्या एका घरात सहा एप्रिल २००६ रोजी झालेल्या या स्फोट प्रकरणात काल तब्बल १८ वर्षांनंतर न्यायालयानं निकाल सुनावला. या प्रकरणातल्या १२ आरोपींपैकी दोन आरोपींचा स्फोटातच मृत्यू झाला होता. केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयने या प्रकरण दोन हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं, मात्र हा बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही. त्यामुळे हा फटाक्यांचा स्फोट असल्याचं ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आता जर्मन भाषेत एबीसीडीचे धडे गिरवत आहेत. महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षात हा उपक्रम सुरू केला आहे. जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हे या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आकाशवाणीला सांगितलं. ते म्हणाले.. जर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे स्कोप पाहिजे असेल, तर त्यांना जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. बेसिक जर्मन भाषा जर आपण मुलांना शिकवली तर मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ती मुलं निश्चित उच्च शिक्षण जर्मन भाषेतून घेतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी आमच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक आली होती. जर जर्मन भाषा काही शिक्षकांना शिकायची असेल, तर ऑनलाईन ही शिकता येणार आहे. तर यासाठी जर्मनीमध्ये असलेले मिस्टर दावोस ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. आमचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून ती भाषा शिकत आहेत. तेच शिक्षक आता शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६२ धावांचं आव्हान दिलं आहे. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचा दुसरा डाव केवळ १५७ धावांवर आटोपला. या डावात ॠषभ पंतच्या ६० धावा वगळता कुणालाही मोठी धावसंख्या करता आली नाही. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या उपाहारापर्यंत तीन बाद ७१ धावा झाल्या होत्या..
लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाच्या एकोणसाठाव्या तीन दिवसीय अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनात शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थिती, स्वयंरोजगार आणि रोजगार निर्मिती तसंच उद्योजकता विकासाकडे युवकांची ओढ निर्माण करण्यासाठी सरकारने धोरण आखावं, असे प्रस्ताव संमत करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' या विषयावर शिक्षण तज्ञ अनिल राव यांनी मार्गदर्शन केलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांची या सत्रास प्रमुख उपस्थिती होती.
भोपाळ इथं होत असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे खेळाडू काल रवाना झाले. या स्पर्धा आजपासून सुरु होत आहेत. शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने आणि नांदेड जिल्हा मल्लखांब संघाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी संघाला शुभेच्छा दिल्या.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या शासकीय कार्यक्रमांचा आज समारोप होत आहे. या यात्रेत कुस्त्यांची दंगल आज होणार असून, आठवडाभरात झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळाही होणार आहे. काल या स्पर्धेत नागरिकांनी शंकरपटाचा थरार अनुभवला. ५८ बैलजोड्यांनी या शर्यतीत भाग घेतला होता. त्यापैकी हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यात पिंपळदरी इथले महादू कोंडिबा रिटे यांच्या बैलजोडीने निर्धारित अंतर अवघ्या साडे चार सेकंदात पार करत पहिला क्रमांक पटकावला. परिसरातल्या गोरगरीब कुटुंबांमध्ये प्रसिद्ध असलेला जुन्या कपड्यांचा बाजार काल या यात्रेत आकर्षणाचं केंद्र होता.
वाहतूक नियमांचं पालन केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी बोलताना, रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत विविध कार्यशाळा, दुचाकी फेरी, नेत्र तपासणी शिबीरं तसंच, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.
लातूर शहरात एका खाजगी रुग्णालयातले दिवंगत कर्मचारी बाळू डोंगरे यांच्या दोन्ही मुलांचा लातूर इथल्या केशवराज विद्यालयाने शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारलं आहे. माजी मंत���री आमदार अमित देशमुख यांनी याबाबतचं पत्र विद्यालयाला दिलं होतं.
0 notes
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशभरातल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पाच आरोपींना अटक;१८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे
आणि
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या पाचव्या सामन्यात भारताला १४५ धावांची आघाडी
****
पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. गेल्या दहा वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पटीनं वाढ झाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
पी एम किसान सम्मान निधी से किसानों को करीब तीन लाख करोड रूपये की आर्थिक मदत दी गई है। पिछले दस वर्षों में कृषी लोन की राशी साढे तीन गुना हो गई है। अब पशु पालकों और मत्स्य पालकों को भी किसान क्रेडीड कार्ड दिया जा रहा है। देश मे मौजुद नौ हजार से ज्यादा एफ पी ओ, किसान उत्पाद संघ उन्हें भी आर्थिक मदत दी जा रही है।
****
देशाच्या विज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद्रीय सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे सांभाळल्या होत्या. चिदंबरम यांना पद्मश्री तसंच पद्मविभूषण या नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर चिदंबरम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करुन त्यांचं कामकाज कंपनीच्या धर्तीवर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. ते आज नगरविकास विभागाच्या बैठकीत बोलत होते. शहरातील पायाभूत विकासासाठी भांडवली गुंतवणूक करावीच लागण��र आहे, हा निधी उभारण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्थिक पर्याय उभारले पाहिजेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांतील फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याना पुण्यातून तर सिध्दार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींसह त्यांना सहकार्य करणारे डॉ.संभाजी वायबसे आणि त्यांची वकील पत्नी या दोघांना पोलिसांनी नांदेड इथून अटक केली होती, या सर्व आरोपींना केज न्यायालयात आज हजर करण्यात आलं, न्यायालयानं या सर्वांना १८ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे –
नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं दिवसाढवळ्या अपहरण, अमानुष मारहाण आणि हत्या केल्यापासून फरार असलेल्या सुदर्शन घुलेसह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडी आणि एसआयटी पथकाच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली. या प्रकरणात चर्चेत असलेले बहुतांश प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत, त्यामुळे आता विशेष तपास पथक तसंच सीआयडीकडून तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.
****
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी करायच्या कारवाईबाबत पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांना वेगळी वागणूक देत असून याबाबतचं प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा कोकाटे यांनी दिला आहे.
****
लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाचे निर्देश नाही, त्यामुळे धुळे जिल्ह्यातील लाडकी बहिण योजनेच्या कोणत्याही लाभार्थ्यांची चौकशी करण्यात करण्यात आलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली आहे. धुळे जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यीची रक्कम परत घेतल्याचं वृत्त प्रसार माध्यमातून पसरलं होतं, त्यासंदर्भात पापळकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ही बाब स्पष्ट केली.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाचा राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज आढावा घेतला, महाजन यांनी पांडूरंगाचं सहकुटूंब दर्शन घेतलं, यावेळी मंदिर समितीच्या वतीने महाजन यांचा शाल आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. पुरातत्त्व विभाग आणि संबधित कंत्राटदारानी संबंधित कामास गती देऊन वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना महाजन यांनी दिल्या. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूर शहरचे पोलीस आयुक्त एम राज कुमार यावेळी उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेतले विद्यार्थी आता जर्मन भाषेत एबीसीडीचे धडे गिरवत आहेत. महापालिकेच्या प्रियदर्शनी शाळेने मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या वर्षात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर उच्च माध्यमिक शिक्षणाच्या व्यावसायिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थी घडवणं हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं, शाळेचे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी आकाशवाणीला सांगितलं. ते म्हणाले –
जर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे स्कोप पाहिजे असेल, तर त्यांना जर्मन भाषा येणं गरजेचं आहे. बेसिक जर्मन भाषा जर आपण मुलांना शिकवली तर मुलांना त्याच्यात आवड निर्माण होईल. आणि आवड निर्माण झाल्यानंतर ती मुलं निश्चित उच्च शिक्षण जर्मन भाषेतून घेतील म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी मागील तीन महिन्यांपूर्वी आमच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक आली होती. जर जर्मन भाषा काही शिक्षकांना शिकायची असेल, तर ऑनलाईन ही शिकता येणार आहे. तर यासाठी जर्मनीमध्ये असलेले मिस्टर दावोस ऑनलाईन ट्रेनिंग घेतात. आमचे शिक्षक गेल्या तीन महिन्यांपासून ती भाषा शिकत आहेत. तेच शिक्षक आता शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
****
क्रिकेट
��ॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला. तत्पूर्वी पहिल्या डावात भारतीय संघानं १८५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर सहा गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत १४५ धावांची आघाडी मिळाली आहे.
****
भोपाळ इथं होत असलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे मल्लखांब खेळाडू आज रवाना झाले. या स्पर्धा उद्या ५ जानेवारी पासून सुरु होणार आहेत. शारिरीक शिक्षण विभागाचे संचालक भास्कर माने सर आणि नांदेड जिल्हा मल्लखांब संघाच्या कर्मचाऱ्यांनी यावेळी संघाला शुभेच्छा दिल्या.
****
सोलापूर इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा २०वा दीक्षांत समारंभ येत्या १० जानेवारीला होणार आहे. यावेळी एकूण १५ हजार २९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाहतूक नियमांचं पालन केल्यास अनेक लोकांचे प्राण वाचू शकतात, असं नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी म्हटलं आहे. ते आज हिंगोली इथं रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्धाटनप्रसंगी बोलत होते. अल्पवयीन तसंच कुणीही विनपरवाना वाहन चालवू नये, असं आवाहन उमाप यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी बोलतांना रस्ता सुरक्षा अभियानाशी निगडीत विविध कार्यशाळा, दुचाकी फेरी, नेत्र तपासणी शिबीरं तसंच, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगितलं.
****
लातूर शहरात एका खाजगी रुग्णालयातले दिवंगत कर्मचारी बाळू डोंगरे यांच्या दोन्ही मुलांचं लातूर इथल्या केशवराज विद्यालयाने शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारलं आहे. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबतचं पत्र विद्यालयाला दिलं होतं, त्यानुसार केशवराज विद्यालयाने दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. बाळू डोंगरे यांची ते काम करत असलेल्या रुग्णालयातच हत्या झाली होती.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत आज जुन्या कपड्यांचा आकर्षक बाजार भरवण्यात आला होता. परिसरातल्या गोरगरीब कुटुंबांसाठी हा बाजार वर्षभर पुरणाऱ्या कपड्यांची खरेदी करण्याचं ठिकाण म्‍हणून प्रसिध्द आहे. दरम्यान, माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा, तसंच कृषी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण करण्यात आलं. उद्या कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 14 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 04 January 2025 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०४ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
ग्रामीण भारताला सशक्त करण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ग्रामीण भारत महोत्सवाचं उद्घघाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. २०१४ पासून सरकार खेड्यातील लोकांचं जगणं समृद्ध करण्यासाठी प्राधान्य देत असून, हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकारनं प्रत्येक गावात मूलभूत सुविधांची हमी देणारी मोहीम सुरू केल्याचं ते म्हणाले. ग्रामीण समाजांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे तसंच स्वच्छ भारत अभियान, पीएम आवास योजना, जल जीवन मिशनद्वारे सर्व ग्रामीण भागाचा फायदा आणि विकासाचे उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. येत्या नऊ तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून विकसित भारत २०४७ साठी स्वावलंबी ग्रामीण भारताची निर्मिती ही या महोत्सवाची संकल्पना आहे.
चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस HMPV हा विषाणू वेगाने पसरत असून तेथील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. या विषाणुमुळे चीनमध्ये अनेक मृत्यु झाले असून त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. HMPV, कोरोना आणि माइकोप्लाज्मा न्यूमोनिया यासारखे आजार देखील चीनमध्ये वेगाने पसरत असल्याचंही वृत्त आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील सर्व अधिकारी परिस्थितीचं निरीक्षण करत असून, नागरिकांनी सातत्याने मास्क वापरावा, हातही धुवावेत, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
एस. टी महामंडळ नफ्यात राहण्यासाठी महामंडळाने बृहत कृती आराखडा तयार करावा. यासाठी परिवहन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्��ा, वाहतूकदार यांच्या सूचना व अभिप्रायांचा अभ्यास करावा, अशा सूचना परिवहन, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात समिती सभागृहात परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना दर्जेदार सुविधा देऊन स्वच्छतेची कोटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. महिला प्रवाशांसाठी प्रत्येक बसस्थानकावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या.
रोजगार हमीच्या कामांची मजुरी वाढवून देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे सादर करावा, अशा सूचना रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत तसंच ग्रामीण भागात उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणावर होत असून उद्योग क्षेत्रातील मजुरीचे दर जास्त आहेत. या बाबींचा विचार होऊन मजुरीचे दर ठरवावेत, अशा सूचनाही मंत्री गोगावले यांनी यावेळी दिल्या.
ग्रामीण भागातील प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा व्हावा असं जलजीवन योजनेचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला लवकरात लवकर या सुविधांचा लाभ मिळू शकेल, यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत येत्या १०० दिवसांत होणाऱ्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेत उद्या पाच तारखेला दुपारी बारा वाजता कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर माळेगाव यात्रेत विजेत्या मल्लास माळेगाव केसरी हा पुरस्कार दिला जातो. नांदेडसह विविध राज्यांतून कुस्तीपटू मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेणार आहेत. माळेगावच्या लाल मातीत या कुस्त्या रंगणार आहेत. दरम्यान माळेगाव यात्रेनिमित्त पशु प्रदर्शन, दुग्ध स्पर्धा, तसंच कृषी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आज माळेगाव यात्रेत बक्षीस वितरण केलं जाणार आहे.
क्रिकेट बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ आज संपला. तत्पुर्वी पहिल्या डावात भारतीय संघानं १८५ धावा केल्या तर ऑस्ट्रेलिया संघ १८१ धावांत सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या दुसऱ्या डावात दिवसाअखेर सहा गडी बाद १४१ धावा केल्या आहेत. भारताला आतापर्यंत १४५ धावांची आघाडी मिळाली आहे.
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान ८ पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. दरम्यान, आज राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि किमान तापमानात काहीशी घट होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा, तीन ऑक्टोबर 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
पंतप्रधान उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, केंद्र आणि राज्याच्या किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता होणार वितरीत
पंतप्रधान आंतरवासिता योजनेला सुरुवात, येत्या पाच वर्षात एक कोटी युवकांना अग्रणी कंपन्यांमधे मिळणार प्रशिक्षणाची संधी
शारदीय नवरात्रोत्सवाचा राज्यात उत्साह
आणि
महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत-न्यूझीलंड सामना
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषांना देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाचं साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत करत, या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली. ते म्हणाले...
“उशीरा का होईना मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला, त्याबद्दल भारत सरकारच्या मंत्रिमंडळाचे मी अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या तत्काळ कार्यवाहीची मराठी समाजाला, महाराष्ट्राला अपेक्षा आहे. तशी कार्यवाही तातडीने व्हावी, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या वतीने मी करतो.’’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळं भाषेच्या समृद्धीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जातात. यात केंद्र सरकारकडून दरवर्षी २५० ते ३०० कोटी रुपये अनुदान मिळते. तसंच देशभरातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषेसाठी विशेष केंद्र उभारुन, मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था केली जाते.
दरम्यान, राष्ट्रीय खाद्य तेल मिशनला मान्यता, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएम राष्ट्रीय कृषी विकास योजनेला मंजुरी, रेल्वे कर्मचाऱ्यांना दोन हजार २९ कोटी रुपये बोनस, आदी निर्णयांनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पाच ऑक्टोबरला राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वाशिम इथं होणाऱ्या एका कार्यक्रमात पी.एम. किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचे ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीतले अनुक्रमे १८ वा आणि पाचवा हप्ता मोदी यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ही महिती दिली.
****
पंतप्रधान आंतरवासिता योजनेला काल प्रायोगिक तत्वावर प्रारंभ झाला. या पथदर्शी प्रकल्पासाठी सरकारने ८०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी पीएम इन्टर्नशीप डॉट एम सी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन, या पोर्टलवर येत्या १२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करायचे आहेत. २१ ते २४ वर्ष वयोगटातल्या आणि पूर्णवेळ नोकरी किंवा पूर्णवेळ शिक्षण न घेणाऱ्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल. पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दरमहा साडेचार हजार रुपये तर नियोक्ता कंपनीकडून दरमहा ५०० रुपये मिळतील. येत्या पाच वर्षात देशातल्या एक कोटी युवकांना ५०० अग्रेसर कंपन्यांमधे आंतरवासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई महानगरपालिकेने दादर इथं शिवाजी पार्क मैदानावर येत्या १२ तारखेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा ��ांद्रे कुर्ला संकुलावर होणार आहे.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तीपीठांसह देवीच्या सर्वच मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. राज्यातल्या महत्त्वाच्या देवी मंदिरांतल्या घटस्थापनेचा आढावा घेणारा हा वृत्तांत...
“नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुका देवीच्या नवरात्रोत्‍सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शेकडो लोकांनी काल पहिल्या माळेला रेणुकामातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांच्या वाहतुक सेवेसाठी एसटीच्या ११० बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, तसंच याठिकाणी तीन आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत’’
**
“धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटाची कल्लोळतीर्थापासून मिरवणूक करण्यात आली. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात.’’
**
“कोल्हापूर इथं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची काल श्रीसूक्तवर्णित श्रीमहालक्ष्मी रुपात पूजा बांधण्यात आली. मंदिरात सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना होताच तोफेची सलामी देण्यात आली.’’
**
“नाशिक जिल्ह्यात वणी इथं सप्तशृंगी देवीची प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यापूर्वी देवीच्या अलंकाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेनंतर देवीच्या दर्शनासाठी भाचिकांनी गडावर मोठी गर्दी केली होती.’’
**
“अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीच्या वर्णी पूजेनंतर घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ झाला. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी सपत्निक महापूजा केली. १२ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.’’
**
“खान्देश कुलस्वामिनी असलेल्या धुळ्याच्या एकविरा देवीची नवरात्राच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छा�� यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली, भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.’’
**
“अहमदनगर जिल्ह्यात मोहोटा देवीसह जिल्हाभरातल्या विविध ३६ स्थळांवर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे.’’
**
“छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरात तुळजाभवनी मंदीरात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते तथा मंदिराचे मुख्य पुजारी अंबादास दानवे यांच्या हस्ते आज घटस्थापनेनंतर आरती करण्यात आली. शहर परिसरातून शेकडोच्या संख्येनं भाविक पहाटेपासूनच देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे.’’
****
हिंगोली इथल्या १७० वर्षाची परंपरा असलेला दसरा मेळाव्याला काल सुरुवात झाली. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने यानिमित्तानं भरवण्यात आलेल्या औद्योगिक आणि कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झालं. या दसरा मेळाव्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
क्रिकेट
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान देखील आज सामना होणार आहे.
दरम्यान, शारजा इथं काल या स्पर्धेला सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात बांग्लादेशनं स्कॉटलंडचा १६ धावांनी, तर अन्य एका सामन्यात पाकिस्ताननं श्रीलंकेचा ३१ धावांनी पराभव केला.
****
राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंडनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅरा शूटींगसाठी सुमा शिरुर, दिव्यांगांच्या ॲक्वेटीक्सकरता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी शुभांगी रोकडे, जिम्नॅस्टिकसाठी पवन भोईर आणि कबड्��ीसाठी अनिल घाटे यांची निवड झाली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्य��्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
सविस्तर बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले...
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्ज मंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती इथं, पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनात विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पंतप्रधानांनी पाहणी केली. हे प्रदर्शन आज आणि उद्या सर्वांसाठी खुलं आहे.
****
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३, नांदेड २८, लातूर १९, धाराशिव १८ तर परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात, नांदेड इथं महात्मा गांधी मिशनचं अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी जिल्ह्यात धर्मापुरी इथं ब्लेसिंग कॉलेज ऑफ नर्सिंग, तर धाराशिव इथं बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. 
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्या प्रकरणी केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारकडून तत्काळ अहवाल मागवला आहे. या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचं, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, तिरुपती तिरुमला देवस्थाननं संबंधित पुरवठादाराचं कंत्राट रद्द केलं असून, त्याला काळ्या यादीत टाकलं आहे.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
जालना जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जणांचा मृत्यू झाला. जालना-वडीगोद्री महामार्गावर काल सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बसच्या वाहकासह तीन महिला प्रवासी आणि ट्रकमधील चालक आणि त्याच्या सहायकाचा समावेश आहे. अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश के��ा. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. काल सकाळी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला, रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या.बांगलादेशचा संघही पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
धनगर आरक्षण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली.सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं
****
मराठ�� आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल त्यांची नियमीत तपासणी केली, परंतू उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला.
दरम्यान ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री इथे कालपासून आमरण उपोषण सुरू केलं, याच मागणीसाठी विधिज्ञ मंगेश ससाणे आणि सहकाऱ्यांनी १८ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी इथेच आमरण उपोषण पुकारलं आहे.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे काल रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी लोकसहभागातून सुमारे तीन टन कचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते काल एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
लातूर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी दंतोपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच्या माईर्स इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यात यासाठीचा सांमजस्य करार करण्यात आला. येत्या सोमवारपासून महापालिकेच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यल्प दरात दंतोपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात काल विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका काल काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
धाराशिव जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी २८ कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी, छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्र्यांकडे सादर केलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं विविध पथकांची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक घेऊन समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले
****
रेल्वे लाईन च्या देखभाल आणि दुरुस्ती च्या कामांमुळे नांदेड ते रायचूर एक्सप्रेस येत्या १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत  तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे तर  रायचूर ते नांदेड एक्सप्रेस २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
****
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्जमंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी या ठिकाणी उभारलेल्��ा विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पाहणी केली. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती, इथं पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस केंद्रांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर इथला मुख्य कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या सभागृहात झाला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात २८ केंद्राचा शुभारंभ झाला. आपले कौशल्य आणखी प्रभावी आणि आधुनिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या केंद्राचा उपयोग करावा, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी केलं.
परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत धर्मापुरी इथल्या ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सिंग इथं शुभारंभाच्या थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम झाला. धाराशिव जिल्ह्यात १८ केंद्राचा शुभारंभ झाला. बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं.
****
भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २४ आणि २५ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. शाह यांच्या २४ तारखेला नागपूर, छत्रपती संभाजीनगर इथं आणि २५ तारखेला नाशिक, कोल्हापूर इथं भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद बैठका होणार आहेत.
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
मुंबईतल्या पश्चिम उपनगरात लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज जनसंवाद यात्रा काढली. खासदार शिंदे यांनी मालाड, मागाठाणे, कांदिवली, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी इथं जनसंवाद बैठक घेऊन नागरिकांशी संवाद साधला.
****
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्‍वराज्‍यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्‍ता बांधण्��यात येत आहे. शामलदास गांधी मार्ग उड्डाणपूल ते वरळीपर्यंतच्या या मार्गाचं ९२ टक्‍के काम पूर्ण झालं आहे. उद्या शनिवारपासून हा रस्ता दररोज सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री १२ ते सकाळी ७ या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
****
नंदुरबार शहरात काल एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान दोन गटात झालेल्या वादप्रकरणी ५५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात चार विधी संघर्ष त्रस्त बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी फरार ५४ संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
****
जालना-वडीगोद्री महामार्गावरील मठतांडा गावाजवळ आज सकाळी साडे आठच्या सुमारास एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील वाहकासह तीन महिला प्रवाशी आणि ट्रकमधील चालक, वाहक असे सहाजण जागीच ठार झाले. तर एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी १३ जणांवर जालना इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. एसटी बस गेवराईहून जालन्याला जात असताना बीडकडे जाणाऱ्या संत्र्याच्या भरधाव ट्रकने धडक दिल्यानं, हा अपघात झाल्याचं बसच्या चालकानं सांगितलं.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वाचं काँग्रेस पक्षात स्वागत केलं.
****
चेन्नईत एम एम चिदंबरम मैदानावर सुरु असलेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. आज सकाळी भारताचा पहिल्या डाव ३७६ धावांवर आटोपला, भारतानं कालच्या ३३९ धावांवरुन आज डाव सुरु केला. अवघ्या ३७ धावातच भारताचे चार फलंदाज तंबूत परतले. रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
अहमदनगर इथं माळीवाडा परिसरात स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेशी शपथ दिली, तसंच स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे आज रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आयुक्त डॉ.महेशकुमार डोइफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कारभारी दिवेकर यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागी होत तीन टन कचरा उचलला. नांदेड इथं विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत डी. आर. एम. कार्यालय परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आलं.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका आज काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या ०८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे करीमनगर गाडी पुणे स्थानकावरुन २१ आणि ���८ आक्टोबर तसंच ४ आणि ११ नोव्हेंबरला रात्री पावणे अकराला सुटेल. तर परतीच्या प्रवासात २३ आणि ३० ऑक्टोबर तसंच ६ आणि १३ नोव्हेंबरला करीमनगर स्थानकावरुन सकाळी ६ वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्धा इथं होत असलेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांनी या योजनांचा प्रारंभ केला. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येत असून, या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात येणार आहे. ��ा कार्यक्रमासाठी व्यासपीठावर येण्यापूर्वी पंतप्रधानांनी या ठिकाणी उभारलेल्या विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तुंची पाहणी केली.
राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
अमरावती, इथं पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज रांची मधल्या नमकुम इथं राष्ट्रीय माध्यमिक कृषी संस्थेच्या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन झालं. यावेळी राज्यपाल संतोष कुमार गंगवार, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित होते.
****
देशातून नक्षलवादाची विचारधारा मार्च २०२६ पूर्वी पूर्णपणे नष्ट करण्याचा सरकारचा निर्णय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधील नक्षलवादी हिंसाचारातील जवळपास ५५ पीडितांशी शाह यांनी आज संवाद साधला, बस्तरचे चार जिल्हे वगळता संपूर्ण देशातील नक्षलवाद संपवण्यात केंद्राला यश आल्याचं त्यांनी सांगितलं. नक्षल गटांना शस्त्रे आणि हिंसाचार सोडून आत्मसमर्पण करावं, अन्यथा सरकार लवकरच त्यांच्याविरोधात कारवाई करेल, असंही अमित शाह यांनी नमूद केलं.
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा मुद्दा गंभीर असल्याचं केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असून प्रसादाच्या लाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या तुपात प्राण्यांची चरबी आढळल्याची पुष्टी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेने दिली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं जोशी म्हणाले.
****
प्रत्येक गोष्टीत न्याय केला तर मानवाची प्रगती होईल, त्यासाठी शांतता आणि न्यायाची भूमिका घेणं  आपले सर्वांचे कर्तव्य अहे असं मत, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते तथा आंतरराष्ट्रीय मुस्लिम धर्मगुरू मौलाना सज्जाद नोमानी यांनी व्यक्त केलं आहे. ईद-ए- मिलादनिमित्त ते आज जळगाव इथं झालेल्या प्रवचनात बोलत होते. यावेळी राज्य तसंच देशातील विविध प्रातांमधून आलेले २२ धर्मगुरू उपस्थित होते.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
जालना जिल्ह्यात आज सकाळी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून जालन्याकडे जाणारी बस आणि जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली, बस मधल्या किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
****
दसरा आणि दिवाळी निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता  पुणे - करीमनगर - पुणे विशेष गाडीच्या ०८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पुणे करीमनगर गाडी पुणे स्थानकावरुन २१ आणि २८ आक्टोबर तसंच ४ आणि ११नोव्हेंबरला रात्री पावणे अकराला सुटेल. तर परतीच्या प्रवासात २३ आणि ३० ऑक्टोबर तसंच ६ आणि १३ नोव्हेंबरला करीमनगर स्थानकावरुन सकाळी ६ वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्या हस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
***
हायड्रोजन इंधनाचा वापर करुन इंधन आयातीचं  प्रमाण २२ लाख कोटी रुपयांवरुन ४ लाख कोटी रुपयांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा मानस असल्याची माहिती  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली  आहे. यासाठी केंद्र सरकार मिराई प्रकल्प राबवत असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
सोलापूर विमानतळा संदर्भात नवी दिल्ली इथं काल  केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. आमदार सचिन कल्याणशेट्टी,जिल्हाधिकारी  कुमार आशीर्वाद या बैठकीला उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत नवीन हवाई रस्ते मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु आहे, याअंर्तगत नोव्हेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल,  सोलापूर ते गोवा, सोलापूर ते तिरुपती, सोलापूर ते हैद्राबाद, सोलापूर ते मुंबई या दरम्यानच्या हवाई मार्गाना प्राधान्याने उडाणे होतील असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अ��ेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तिथल्या डेलावेअर इथं होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.
***
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना एकत्र लढावं लागणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.आघाडीतील जागावाटपासंदर्भात आज बैठक  होणार असून या मुद्द्यावरुन आघाडीत कोणताही वाद नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं.
***
वीजनिर्मिती कंत्राटी कामगारांना मेडीक्लेम अंतर्गत राज्यातील उत्तम खाजगी रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.ते काल नागरपूरमधील दहेगाव इथं वीज निर्मिती कंत्राटी  कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते.या  कामगारांच्या सहा मागण्या मान्य केल्याबद्दल कामगार संघटनेतर्फे  यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.
***
जालना वडीगोद्री मार्गावर शहापूर गावाजवळ आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास बस आणि आयशर ट्रकच्या  भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. जखमी पैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई इथून  जालन्याकडे जाणारी बस  आणि  जालन्याहून बीड कडे मोसंबी घेऊन जाणाऱ्या ट्रकची    समोरासमोर  धडक झाली, प्रत्यक्षदर्शीच्या माहिती नुसार भरधाव वेगाने येणारी  ट्रक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस वर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला, बस मध्ये एकूण २४ प्रवाशी होते यातील किरकोळ जखमींना अंबड इथल्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं  आहे.
***
नंदुरबार शहरात ईदच्या जूलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काल आढावा घेतला. त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली. या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा कराळे यांनी दिला आहे. तसेच  दंगलीचे काही व्हिडिओ फोटो नागरिकांकडे असतील  तर त्यांनी ते पोलीस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केलं. काल एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईद च्या जुलूसा दरम्यान दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का याचा शोध घेतला जात असल्याचं कराळे यांनी सांगितलं.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या स्व-विकास व्याख्यानमालेत मोबाईल आणि मुलं या विषयावर पुण्याचे  समुपदेशक दिनेश ताठे यांनी आपले विचार मांडले. मोबाईल मुळे माणसाच्या अनेक गरजा पूर्ण होत असल्या तरी मोबाईलच्या अति वापरा मुळे अनेक समस्या  देखील निर्माण होत आहेत,असं  ताठे याप्रसंगी म��हणाले. व्याख्यानमालेचं हे  १८ वं वर्ष आहे. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला  केंद्राच्या अध्यक्षा मानसी काशीकर, सचिव श्रीकांत काशीकर, कोषाध्यक्ष राजश्री कुलकर्णी  यावेळी उपस्थित होते.
***
पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार���ग आता मोकळा झाला आहे.
***
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 20.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
स्वच्छ, निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा दौऱ्यावर
विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी बँकांची महत्त्वाची भूमिका, केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आतापर्यंत पंधरा लाख कोटी रुपयांच्या विविध योजनांची सुरुवात
आणि
बांगलादेशविरुद्ध क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
सविस्तर बातम्या
स्वच्छ भारत, तसंच निरोगी आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं निरीक्षण राष्ट्रपतींनी नोंदवलं. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचं उद्दीष्ट साध्य करायचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जंवाटप पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही त्यांच्याहस्ते जारी करण्यात येईल. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या“आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा आरंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तेहतीस महाविद्यालयांचा समावेश आहे.
****
विकसित भारताचं ध्येय साकारण्यासाठी देशातील बँकिंग क्षेत्राला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या काल पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी सुसज्ज असण्याची आवश्यकता सीतारामन यांनी व्यक्त केली. आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यम वर्ग, महिला आणि युवक अशा सर्व घटकांसाठी पंधरा लाख कोटी रुपये योजनांची सुरुवात केली आहे. सरकारनं देशात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला बळकट करण्यासाठी नवनवीन पावलं उचलली आहेत.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले…
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ��या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  ��ान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी काल पुण्यात 'परिवर्तन महाशक्ती'ची घोषणा केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना सहभागी करून घेण्यासाठी चर्चा केली जाणार आहे.
****
स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा काल मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
****
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत काल नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी या फेरीत सहभागी झाले.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगान युनेस्कोचं पथक  विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यात शंकरनगर इथलं एसबीआय बँकेचं एटीएम फोडून वीस लाख ४३ हजार रुपये लंपास केल्याची घटना काल घडली. एटीएम मॅनेजर कैलास कांबळे यांच्या तक्रारीवरून रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा द���खल करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील ग्रामसेवकाला साडे तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं. ग्रामसेवक ईश्वर डफडे याने तक्रारदाराकडे नमुना आठ-असाठी साडेतीन हजार रुपयांची लाच मागितली होती. डफडे याच्याविरुद्ध कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील मातंग समाज आणि तत्सम जातीतील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी तीन महिन्यांचं व्यावसायीक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार  आहे. यासाठी प्रमाणपत्राच्या सत्य प्रती जोडून महामंडळाच्या लातूर कार्यालयात अर्ज सादर करावेत, असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराजनं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
आमदार संजय शिरसाट यांनी काल नवी मुंबईतल्या सिडको भवन इथं सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. नगर नियोजन आणि विकास क्षेत्रातील अग्रगण्य प्राधिकरण ही सिडकोची ओळख कायम ठेवण्यासह सिडको विकसित करत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसंच सिडकोची इतर उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचं,  शिरसाट यांनी सांगितलं.
****
राज्य महिला आयोगाकडून काल जळगाव इथं महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत जनसुनावणी घेण्यात आली. जिल्ह्यात महिला तक्रारींच्या दाखल ९४ प्रकरणांवर तीन पॅनल कडून सुनावणीची कारवाई करण्यात आली. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी उपस्थित होत्या.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ काल धाराशिव इथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे ��संच राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. लातूर इथंही संविधान चौकात काँग्रेस पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा काल सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त काल जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली. या मिरवणुकीत युवक, पुरुष, लहान मुलेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं निरीक्षण जिल्हास्तरीय समितीने नोंदवलं आहे. समितीने जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थितीची अधिसूचना लागू केली आहे. अशा परिस्थितीत मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पिक विमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रीम तातडीने द्यावा, अशी सूचना विमा कंपनीला करण्यात आली आहे.   
****
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन
पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा दौऱ्यावर
महिला अत्याचार प्रकरणी फाशीची तरतूद करण्यासंदर्भात काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आणि
बांगलादेशविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या दिवसअखेर सहा बाद ३३९ धावा
****
स्वच्छ भारत, स्वस्थ भारत आणि विकसित भारत घडवण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज मध्यप्रदेशात उज्जैन इथं सफाई मित्र संमेलनात बोलत होत्या. स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून आपल्या देशवासियांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता वाढली असून वर्तनातही अभूतपूर्व बदल झाला असल्याचं त्या म्हणाल्या. २०२५ पर्यंत चालणाऱ्या स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला संपूर्ण स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे असंही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी उज्जेनच्या गौरवशाली इतिहासाचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रपतींचं आज सकाळी इंदूर विमानतळावर राज्यपाल मंगुभाई पटेल, मुख्यमंत्री मोहन यादव आणि लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वागत केलं. राष्ट्रपतींनी इंदूर इथं मृगनयनी राज्य कलादालनाला भेट दिली, यावेळी त्यांनी खरेदी करुन युपीआयद्वारे किंमत अदा केली. इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यालाही राष्ट्रपतींनी संबोधित केलं.
****
आपल्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतानाच, जोखीम कमी करण्यासाठी आपण सुसज्ज असण्याची आवश्यकता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे. त्या आज पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ९० व्या स्थापनादिन सोहळ्यात बोलत होत्या. जगभरात आज होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी सुमारे ४५% व्यवहार भारतात होतात, हे प्रमाण अधिक वाढवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं. भारताचं यूपीआय हे ॲप भूतान, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, संयुक्त अरब अमिरात, मॉरिशस आणि फ्रान्स या सात देशांमध्ये वापरण्यात येत असल्याकडे सीतारामन यांनी लक्ष वेधलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून राष्ट्रीय ‘पीएम विश्वकर्मा’ कार्यक्रमात ते सहभागी होतील. यावेळी विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रं आणि कर्जं त्यांच्या हस्ते देण्यात येतील तसंच योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त टपाल तिकिटही जारी करतील. अमरावती, इथं पीएम मित्रा म्हणजे भव्य समन्वित वस्त्रोद्योग उद्यानाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर असलेलं हे उद्यान, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केलं जाणार आहे. पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचाही आरंभ करतील.
****
महिला अत्याचाराच्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात सरकार काम करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आज बुलडाणा इथं, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळाव्यात मुख्यमंत्री म्हणाले –
जसं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आहे, तसंच मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण योजनादेखील आमची आहे. ज्या लोकांनी माझ्या मुलीबाळींशी, माझ्या बहिणींशी पंगा घेण्याचं काम केलं, कुठे अन्याय-अत्याचार करण्याचं काम केलं, तर त्या नराधमाला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक  मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचं आज दुपारी छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर आगमन झालं. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आदींनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने बुलडाण्याकडे रवाना झाले
****
दरम्यान, स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करून पाण्याने धुतले जातात, त्यामुळे मुंबईचं प्रदूषण कमी झालं असून, सफाई कर्मचारी हाच खरा मुंबईचा हिरो असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महात्मा गांधी जयंती पर्यंत राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात चालणारं हे अभियान “स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता” या संकल्पनेवर राबवण्यात येणार आहे. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यावेळी उपस्थित होते.
स्वच्छता ही सेवा पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज सर्व २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये जवळपास तीन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत स्वच्छता मोहीम राबवली.
स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत आज नांदेड रेल्वे स्थानकावर ‘एकल वापर प्लॅस्टिक’ च्या विरोधात जनजागृती ���रण्यात आली. यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर विजय कृष्णा यांच्या मार्गदर्शनात जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत रेल्वेचे अधिकारी आणि वाणिज्य विभागातील इतर कर्मचारी सहभागी झाले.
****
२७ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’म्हणून साजरा केला जातो. ‘पर्यटन आणि शांतता’ हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांतर्फे ‘पर्यटन आणि शांतता’ या विषयाच्या अनुषंगानं परिसंवाद, चित्रकला आणि निबंध स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केलं आहे.
****
आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास हमखास यश संपादन करता येतं, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोणी बुद्रुक इथं प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीनं सन्मानित करण्यात आलं. या पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं.
****
भारत आणि बांगलादेश दरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात आज पहिल्या दिवसअखेर भारतानं सहा बाद ३३९ धावा केल्या आहेत. रविचंद्रन अश्विन १०२ तर रविंद्र जडेजा ८६ धावांवर खेळत आहेत. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत, अवघ्या ३४ धावांत भारताचे तीन फलंदाज बाद केले. शुभमन गिल शून्य तर रोहीत शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक सहा धावा काढून बाद झाले. बांगलादेशच्या हसन महमूदनं चार तर नाहीद राणा आणि मेहदी हसन मिराज नं प्रत्येकी एक बळी घेतला.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर शिवसेना आणि भाजपाचे पदाधिकारी यांनी नुकतीच कांही आक्षेपार्ह विधानं केली असून यांच्यावर भाजपने अद्यापही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ आज धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह काँग्रेसचे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत दीर्घकाळ सेवा करुन निवृत्त झालेल्या अभियंत्याचा ��ज सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. निवृत्त अभियंत्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत, नव्याने रुजू झालेल्या अभियंत्यांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड शहरात ईद ए मिल्लादुन्नबी निमित्त जुलूस काढण्यात आले. शहरातील विविध भागातून या मिरवणुका निघाल्या होत्या. शहरातील निझाम कॉलनी येथून निघालेली मुख्य मिरवणूक हबीब टॉकीजपर्यंत नेण्यात आली.
****
0 notes