#रुपयांच्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल - पंतप्रधानांना विश्वास • येत्या पाच वर्षात राज्यात दहा हजार सहकारी संस्था उभारण्याचं धोरण - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती • बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चार अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि • साहित्य अकादमी पुरस्कार विजेते डॉ सुधीर रसाळ यांचा मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं सत्कार
भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीत काल रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षांत भारत विकसित देश झालेला आपण पाहू आणि दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘अब आनेवाले पच्चीस साल भारत के भविष्य के लिये, दिल्ली के भविष्य के लिये बहोत ही महत्वपूर्ण है। ये पच्चीस साल भारत को विकसित राष्ट्र बनते हुये देखेंगे। ये भारत को आधुनिकता के एक नये दौर से गुजरते हुये देखेंगे। जब भारत दुनिया की तिसरी बडी आर्थिक ताकत बनेगा।’’
राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करण्याची गरज असून, येत्या पाच वर्षात १० हजार सहकारी संस्था उभारण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं बोलत होते. सहकारी संस्थाना पतपुरवठा करणं आणि वसुली करणं या पलीकडे जाऊन त्यांना सहकारी तत्वावर वेगवेगळे उद्योग करण्याची परवानगी दिली जाईल, असं ते म्हणाले. सहकारी दूधसंघात अध्यक्ष आणि राजकारणी लोकांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे हे क्षेत्र अडचणीत आलं आहे, सहकारी चळवळ टिकवायची आणि वाढवायची असेल तर कायद्यात सुसूत्रता आणून कठोर ��ूमिका घेणं आवश्यक असल्याचं मत पाटील यांनी व्यक्त केलं.
पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र आता भारतात पहिल्या क्रमांकावर असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल राज्यातल्या विविध ठिकाणी महारेलने उभारलेल्या सात उड्डाणपुलांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. येत्या काळात महारेल मार्फत २०० रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची कामं पूर्ण केली जात आहेत, मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, विमानतळ विकास, बंदरांचा विकास अशा सर्व क्षेत्रात राज्यात आपण दूरदृष्टी ठेवून विकास कामं हाती घेतल्याचं फडणवीस म्हणाले. “गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं झाली आहेत, ती अभूतपूर्व अशा प्रकारची कामं आहेत. आज देशामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट चालले आहेत, त्यांच्यामध्ये सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट जर कुठे चालले असतील, तर ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत, हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. ते मेट्रोचे असो, रस्त्यांचे असो, ते हायवेजचे असो, ते एयरपोर्टचे असो, ते पोर्ट चे असो, सगळ्या प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ही महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेल आहेत, आणि अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत.’’ महारेल या कंपनीला दिलेली कामं त्यांनी कमी कालावधीत गुणवत्तापूर्ण ऊभारुन एक नवा मापदंड निर्माण केला असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस संपूर्ण ताकदीनं कारवाई करत आहेत, जे दोषी आहेत, त्या कोणालाही सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. या प्रकरणी नीट तपास आणि चौकशी होऊ द्यावी, याचा उपयोग निव्वळ राजकारणासाठी करु नये, असं मुख्यमंत्री म्हणाले. ‘‘बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीनी त्याठिकाणी कारवाई करतायत. निर्धाराने कारवाई होतेय. या प्रकरणामध्ये काहीही झालं, तरी कोणालाही वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, जे जे दोषी आहेत. आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोकं दादागिरी करतात, जे लोकं हप्ते वसुली करतात, अशा सर्वांवर जरब बसवायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे यासंदर्भातली योग्य कारवाई चाललेली आहे. त्या हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये तर त्यातनं समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयास आहे.’’
बीड जिल्ह्यातील हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सक्तीच्या रजेवर पाठवलेल���या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी पुण्यात काल जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनावणे, भाजपचे सुरेश धस, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील सहभागी झाले होते. दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे, अंजली दमानिया यांच्यावर समाज विघातक कृत्य अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी बीड इथल्या नागरीकांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून संगठन पर्व सदस्य नोंदणी महाभियान काल राज्यभर राबवण्यात आलं. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेशीमबाग इथल्या महात्मा फुले सभागृहात, सदस्यता नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा इथं माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजप सदस्यत्व नोंदणीचा शुभारंभ केला.
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचा काल छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, ज्येष्ठ समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील, सुमती रसाळ, डॉ. दादा गोरे, उपस्थित होते. तर्कशुद्ध मांडणी हे रसाळ सरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असल्याचं मत, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. ज्ञानाच्या क्षेत्रात उणिवा दाखवणं हेच मोठं काम असून, त्या स्वीकारता आल्या पाहिजे, असं रसाळ यांनी सत्काराला उत्तर देताना नमूद केलं.
बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वैयक्तिक नागरी स्वच्छता आणि आरोग्य बळकटीकरणासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब, ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, खत खड्डा तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या असणारं कुटुंब यासाठी पात्र असून, २६ जानेवारी रोजी अशा कुटुंबांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातले सुमारे चार लाख ७२ हजार ३७९ कुटुंब सहभागी होणार आहेत.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ मिळावा यासाठी सोयाबीन खरेदीला ४५ दिवसांची मुदत वाढ देण्यात य���वी अशी मागणी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. आमदार पाटील यांनी काल यासंदर्भात माहिती दिली. सुरुवातीला आर्द्रता आणि त्यानंतर बारदाण्याच्या तुटवड्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना हमीभाव खरेदी केंद्रांवर सोयाबीन घालता आलेलं नाही, याकडे रावल यांचं लक्ष वेधल्याचं त्यांनी सांगितलं.
नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेतल्या विविध स्पर्धांचं बक्षिस वितरण काल आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झालं. माळेगाव यात्रा ही केवळ उत्सव नसून शेतकऱ्यांच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचं व्यासपीठ असल्याचं, ते यावेळी म्हणाले. दरम्यान, स्पर्धांच्या काल शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा फड आणि अश्व शर्यत पार पडली. यासोबतच शासकीय कार्यक्रमांचाही काल समारोप झाला.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या लेखी परीक्षा सात ते २३ जानेवारी दरम्यान होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ च्या हिवाळी सत्रातल्या प्रवेशित नियमित विद्यार्थांची सत्र परीक्षा आणि मे २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. राज्यातल्या विविध २३५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या वस्सा इथं 'उमेद' महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जागृती महिला प्रभाग संघाची आमसभा काल पार पडली. यावेळी महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला हक्काचं विक्री केंद्र मिळावं यासाठी जागृती विक्री केंद्राचं उद्घाटन, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या हस्ते झालं.
परभणी जिल्ह्यातले पाणंद, शेतरस्ते, शिवार रस्ते खुले करण्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आजपासून १८ फेब्रुवारी पर्यंत मोहीम राबवण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे शेतीचे अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने संक्रांतीच्या सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता काही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काकीनाडा - नांदेड विशेष रेल्वे आज आणि १३ जानेवारीला दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी नांदेड इथून सटेल.
0 notes
Text
नगरमधील 11 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी महिलेचा जामीन फेटाळला , काय आहे प्रकरण ?
गुंतवणुकीवर ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवत तब्बल 11 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबई येथील आरोपी महिलेचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सी. एम. बागल यांनी फेटाळला आहे. उपलब्ध माहितीनुसार , अनुज मित्तल ( राहणार अहिल्यानगर ) यांचे नगर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांचे शोरूम आहेत. राहुल दर्शन जगताप ( राहणार नवी मुंबई ) हे एका कंपनीचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत…
0 notes
Text
अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता - महासंवाद
मुंबई, दि. २: कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये दरमहा 5,000 रुपये गुंतवून कोणीही करोडपती बनू शकतो, आणि केवळ 100 रुपयांच्या गुंतवणुकीने सुरुवात करता येते. गुंतवणूक आणि नफा याचे गणित समजून घेण्यासाठी पूर्ण बातमी पहा..
पैसे वाचवण्यासाठी गुंतवणूक करणे आवश्यक मानले जाते. परंतु, तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला योग्य परतावा मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवणे सर्वात विश्वासार्ह मानले जाते. अशीच एक सरकारी योजना पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Scheme) आहे, जी तुम्हाला करोडपती बनवू शकते. या योजनेत, एक निश्चित मासिक रक्कम जमा करावी लागते, जी मेच्योरिटी वेळ पूर्ण झाल्यावर निश्चित व्याजदरासह भरघोस परताव्याच्या स्वरूपात परत केली जाते. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये दरमहा एक निश्चित रक्कम जमा करून, तुम्ही 10 वर्षांत 8 लाख रुपयांपेक्षा जास्त फंड गोळा करू शकता.
0 notes
Text
लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिगंबर चालाक पुणे प्रतिनिधी :- तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय–३६, पद– सहायक पोलीस…
0 notes
Text
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १ हजार ५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र शासनाच्या ११ वर्षे मुदतीच्या १ हजार ५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वा��े मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के…
View On WordPress
0 notes
Video
youtube
नाशिक शहरात 13 लाख 35 हजार रुपयांच्या तब्बल चोरलेल्या 17 दुचाकी..
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/soybean-stealing-gang-jailed-5-accused-arrested-with-1-lakh-5-thousand-rupees/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल - पंतप्रधानांना विश्वास
येत्या पाच वर्षात राज्यात दहा हजार सहकारी संस्था उभारण्याचं धोरण - सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती
बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, तर या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चार अधिकाऱ्यांच्या बदल्या
बीड जिल्ह्यात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब या स्पर्धेचं आयोजन
आणि
बॉर्डर - गावस्कर कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा चार गडी राखून विजय, मालिकाही तीन - एक अशी जिंकली
****
भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. राजधानी दिल्लीत आज रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षांत भारत विकसित देश झालेला आपण पाहू आणि दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
अब आनेवाले पच्चीस साल भारत के भविष्य के लिये, दिल्ली के भविष्य के लिये बहोत ही महत्वपूर्ण है। ये पच्चीस साल भारत को विकसित राष्ट्र बनते हुये देखेंगे। ये भारत को आधुनिकता के एक नये दौर से गुजरते हुये देखेंगे, जब भारत दुनिया की तिसरी बडी आर्थिक ताकद बनेगा।
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या १३ किलोमीटर लांबीच्या विस्तारीत मार्गाचं उद्घाटन करून पंतप्रधानांनी, दिल्लीला पहिल्या नमो भारत रेल्वे गाडीची भेट दिली. दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी, तसंच रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं.
****
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उद्या नवी दिल्लीत पंचायत से पार्लियामेंट टू पॉइंट ओ या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या अनुसूचित जमातीच्या ५०३ महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अनुसूचित जमातीच्या निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींना घटनात्मक तरतुदी, संसदीय कार्यपद्धती आणि शासन व्यवस्थेची माहिती देणं, हे या कार्यक्रमाचं उद्दीष्ट आहे.
****
राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करण्याची गरज असून, येत्या पाच वर्षात १० हजार सहकारी संस्था उभारण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचं, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. सहकारी संस्थाना पतपुरवठा करणं आणि वसुली करणं या पलीकडे जाऊन त्यांना सहकारी तत्वावर वेगवेगळे उद्योग करण्याची परवानगी दिली जाईल, असं ते म्हणाले. सहकारी दूधसंघात अध्यक्ष आणि राजकारणी लोकांनी केलेल्या आर्थिक घोटाळ्यांमुळे हे क्षेत्र अडचणीत आलं आहे, सहकारी चळवळ टिकवायची आणि वाढवायची असेल तर कायद्यात सुसूत्रता आणून कठोर भूमिका घेणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या हत्या प्रकरणाचं राजकारण करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं ��ोलत होते. या प्रकरणातल्या पाच आरोपींना काल पकडण्यात आलं असून, हत्या प्रकरणात सहभागी आणि मदत करणाऱ्यांना देखील आम्ही सोडत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
माझं मत एवढंच आहे की, यासंदर्भात नीट चौकशी करू द्यावी. सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी. आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाही. याचा उपयोग कुठल्याही राजकारण करता करू नये ही गंभीर बाब आहे. एक अतिशय चांगल्या आणि लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या सरपंचाची निर्घृण हत्या झाली त्यामुळे त्य��� हत्येचा उपयोग हा राजकारणाकरता होऊ नये, तर त्यांना समाजामध्ये काहीतरी सुधार व्हावा असा आमचा प्रयत्न आहे.
****
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे. आता पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे केज पोलीस स्टेशनचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
****
बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे, अंजली दमानिया यांच्यावर समाज विघातक कृत्य अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी बीड इथल्या नागरिकांनी केली आहे. या नेत्यांनी जाहीर सभेमध्ये केवळ राजकिय हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने मराठा तसंच ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, विविध ठिकाणी त्यांनी केलेल्या विधानांमुळे समाज विघातकी प्रसंग घडून येत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत मोठ्या संख्येनं नागरिक आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जमले होते. यावेळी पोलीस निरीक्षकांना निवेदनही देण्यात आलं.
****
शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणं गरजेचं असून, त्यातून घडलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दाखवण्याची आवश्यकता असल्याचं, खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. चिपळूण इथं वाशिष्ठी डेअरीने आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. कोकणात मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, फळबागा, अन्नधान्य, डाळी या सगळ्यासाठी प्रचंड संधी आहेत, त्या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने पावलं टाकली, तर कोकणाचा आता बदलत असलेला चेहरा आणखी बदलेल, असं पवार यांनी नमूद केलं. हा महोत्सव नऊ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात वैयक्तिक नागरी स्वच्छता आणि आरोग्य बळकटीकरणासाठी घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातलं उत्कृष्ट कुटुंब, ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, शोषखड्डा, खत खड्डा तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या असणारं कुटुंब यासाठी पात्र असून, २६ जानेवारी रोजी अशा कुटुंबांना सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातले सुमारे चार लाख ७२ हजार ३७९ कुटुंब सहभागी होणार आहेत.
****
बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका ऑस्ट्रेलियानं तीन - एक अशी जिंकली आहे. सिडनी इथं झालेल्या पाचव्या सामन्यात भारतीय संघानं दिलेलं १६२ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलिया संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघ केवळ १५७ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहला मालिकावीर तर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्कॉट बोलंड याला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
****
पोलीस वि��ागाच्या नांदेड परिक्षेत्र अंतर्गत लातूर इथं पोलीस क्रीडा निवड चाचणी स्पर्धेचं उद्घाटन आज लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेसाठी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यातून २४ खेळ प्रकारात ४५० खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या १५ ते १९ जानेवारी दरम्यान होणार्या दहाव्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ६५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यात येणार असल्याची माहिती, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर यांनी दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे, तर ओपनिंग सिनेमा म्हणून लिटील जाफना प्रदर्शित केला जाणार आहे. महोत्सवाचा समारेप १९ जानेवारीला प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फराह खान यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याचं सुकथनकर यांनी सांगितलं.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या लेखी परीक्षा सात ते २३ जानेवारी दरम्यान होणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या हिवाळी सत्रातल्या प्रवेशित नियमित विद्यार्थांची सत्र परीक्षा आणि मे २०२४ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. राज्यातल्या विविध २३५ केंद्रांवर ही परीक्षा होईल.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेनिमित्त कचरामुक्त यात्रा ही मोहीम राबवण्यात येत असून, यात्रेतील स्वच्छता आणि कचरामुक्तीच्या उद्देशानं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन विशेष मोहीम हाती घेतली आहे. दररोज सकाळी पाच वाजता आणि रात्री ११ वाजेदरम्यान यात्रेतली गर्दी कमी झाल्यानंतर स्वच्छता कर्मचारी प्लास्टिकसह इतर कचरा उचलत आहेत. दरम्यान, यंदाही यात्रेकरुंना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या वस्सा इथं ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जागृती महिला प्रभाग संघाची आमसभा आज पार पडली. यावेळी महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला हक्काचं विक्री केंद्र मिळावं यासाठी जागृती विक्री केंद्राचं उद्घाटन, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपली प्रगती साधत आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन आपल्या कुटुंबाचं जीवनमान उंचावण्याचं आवाहन, खांडेकर यांनी यावेळी केलं.
****
0 notes
Text
‘ तुमच्या मुलाला गुन्��्यातून बाहेर काढतो ‘, शेवगावमध्ये एकजण आला जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सध्या कारवाईचा सपाटा सुरू केलेला असून शेवगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक असलेले माळी यांच्यासाठी 12 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारताना एकजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार , आफताफ नजीर शेख ( वय 22 वर्ष राहणार साईधन सोसायटी बोधेगाव ), असे लाचखोर व्यक्तीचे नाव असून त्याने तक्रारदार यांच्या मुलाला गुन्ह्यातून…
0 notes
Text
नगरविकास, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२५ वर्षाच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर
मुंबई, दि. २० :- नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या ३ हजार ४६२ कोटी १७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये नगर विकास विभागाच्या २ हजार ७७४ कोटी ४३ लाख आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ६८७ कोटी ७४ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले…
View On WordPress
0 notes
Text
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने "इतक्या" हजार कोटींचे रस्ते प्रस्तावित
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांचा ८ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये एकट्या बांधकाम विभागाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. सिंहस्थानिमित्त होत असलेल्या कामांसाठी राज्य व केंद्र सरकारने निधी दिल्यानंतर कामांचे नियोजन करून ती कामे…
View On WordPress
0 notes
Text
Oppo A3x 5G: Oppo ने भारतात आणखी एक स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन अनेक दमदार फीचर्ससह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5100mAh बॅटरीसह अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत.
Oppo ने गुपचूप आणखी एक स्वस्त 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. Oppo चा हा फोन मिलिटरी ग्रेड MIL-STD 810H बॉडी सह येतो, या फोनचा लूक आणि डिझाईन आयफोन सारखा दिसतो. Oppo ने हा फोन भारतीय बाजारात खासकरून बजेट यूजर्ससाठी लॉन्च केला आहे. हा फोन 12,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतो. या किमतीच्या श्रेणीत, ते POCO, Redmi, Vivo, Infinix, Motorola सारख्या ब्रँडच्या स्वस्त फोन्सना टक्कर देणार आहे.
0 notes