#जम्मू कश्मीरमध्ये पाऊस
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.08.2024 रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 August 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
नेपाळमधल्या बस दुर्घटनेनंतर केंद्रीय युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे काठमांडूत पोहचल्या आहेत. त्यांनी भारतीय राजदूत आणि नेपाळच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिवांशी बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत चर्चा केली. यानंतर त्यांनी टीयू रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
काल पोखराहून काठमांडूला जाणारी भारतीय पर्यटकांची बस मर्शियंदी नदीत पडल्याने २७ भारतीयांचा मृत्यू झाला होता. जखमी सोळा प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. काठमांडूमधील भारतीय दूतावास जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतांचे पार्थिव भारतात लवकरात लवकर परत आणण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी सतत संपर्कात आहे. 
****
जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात येत्या १८ सप्टेंबर रोजी सात जिल्ह्यांत २४ जागंसाठी मतदान होणार आहे. यात अनंतनाग, पुलवामा, शोपियां, कुलगाम आणि जम्‍मू प्रभागात डोडा, रामबन तसंच किस्‍तवाड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ५ लाख ६६ हजार युवा मतदारांसह २३ लाख २७ हजारांहून अधिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील.
****
के��द्रीय गृहमंत्री अमित शहा छत्तीसगढच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून काल रात्री ते रायपूर इथं पोहोचले. ते आज नक्षल विरोधी अभियानाशी संबंधित अनेक बैठकांमध्ये अध्यक्षस्थानी असतील. आंतरराज्यीय समन्वयासंदर्भात छत्तीसगढ आणि शेजारच्या राज्यांचे मुख्य सचिव तसंच पोलिस महानिदेशकांशी ते संवाद साधणार आहेत. 
छत्तीसगढमध्ये गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्ष  सत्तेत आल्यानंतर छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी अभियान मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या वर्षी आतापर्यंत सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत १४२ नक्षलवादी मारले गेले आहेत.
****
बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आजचा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला. मात्र, महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. मुंबईत दादर इथं शिवसेना भवनासमोर करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत,  आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसैनिक  सहभागी होते.
पुण्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते. गोंदिया शहरातही महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून  निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण - एफएसएसएआईने राज्यांना  कीटनाशकांचा कमीत कमी वापर करण्यास तसंच शेतकरी स्तरावर कीटनाशकांची निगराणी आणि विनियमनाकरिता अंतर-मंत्रालयीन समिती स्थापन करण्यास सांगितलं  आहे. या संदर्भातल्या केंद्रीय सल्लागार समितीच्या चव्वेचाळीसाव्या बैठकीत बोलताना प्राधिकरणचे मुख्य अधिकारी जी. कमला वर्धन राव यांनी शेती करण्याची पद्धत सुरक्षित आणि टिकाऊ राहावी हा यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं. 
कीटकनाशकं वापरुन तयार झालेली उत्पादनं आहारात समाविष्ट झाल्यामुळं होत असलेल्या आरोग्यविषयक समस्यांचा निपटारा होण्यातही यामुळे मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण-ट्राय ने काल पीएम वाणी योजनेसाठी  दूरसंचार शुल्‍क आदेशाचा प्रारूप आराखडा जारी केला आहे. ही योजना देशाच्या ग्रा��ीण आणि तळागाळातल्या नागरिकांना वेगवान  इंटरनेट सेवा उपलब्‍ध करुन देण्याच्या उद्देशानं २०२० मध्ये सुरु करण्यात आली आहे. या संशोधित आदेशाचा प्रारूप आराखडा ट्रायच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून या संदर्भात संबंधितांना आपल्या प्रतिक्रिया सहा सप्टेंबरपर्यंत पाठवता येणार आहेत.
****
जवळपास पंधरा दिवसांनंतर रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. काल दिवसभर अधून-मधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत होत्या.  मध्यरात्रीपासून मात्र जोरदार पावसाची संततधार सुरू आहे. आज  सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये लांज्यात सर्वाधिक १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर राजापुरात सर्वात कमी ४१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
****
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
[Hindi] जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश उत्तर भारत पुन्हा पहाटे पडला आहे, मैदानी भागांमध्ये होळी वर गर्भवती / [Hindi] जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आणखी एक बर्फवृष्टी झाली तर उत्तर-पश्चिम मैदानावर होळीवर उष्णता वाढणार आहे.
[Hindi] जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश उत्तर भारत पुन्हा पहाटे पडला आहे, मैदानी भागांमध्ये होळी वर गर्भवती / [Hindi] जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आणखी एक बर्फवृष्टी झाली तर उत्तर-पश्चिम मैदानावर होळीवर उष्णता वाढणार आहे.
उत्तर भारतच्या भागांमध्ये एक नवीन पश्चिमी विक्षोभ पुन्हा दस्तऐवज बनविणे आणि या प्रणालीचे कारण म्हणजे जम्मू-कश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फ्रायदाक से लद्दाख, हिमाचल और क्वेराखंड तक की क्रियाकलापांची घटना घडणे. पण हे सिस्टम मैदानी प्रदेश पंजाब, हरियाणा, दिल्ली, रेंज, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील उत्तरी भागांमध्ये कोणत्याही मौसमी हलवाल देगा नाही. सर्व भागांमध्ये हवामान स्वच्छ आणि शुष्क…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 July 2019 Time 18.00 to 18.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २७ जुलै २०१९ सायंकाळी ६.०० ****
वस्तू आणि सेवा कर परिषदेनं इलेक्ट्रीकल वाहनांवरील जी एस टी १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच इलेक्ट्रीकल वाहनांच्या चार्जरवरील जी एस टी देखील १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जर स्थानिक प्रशासनानं इलेक्ट्रीकल वाहने भाडे तत्वावर घेतल्यास त्यांना जी एस टी मधून सूट देण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जी एस टी दर कपातीचे फायदे ग्राहकांना न देणाऱ्या संस्थांवर दहा टक्के दंड ठोठावण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
****
जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा महत्त्वाचा कमांडर आणि पाकिस्तानी नागरिक असलेला मुन्ना लाहोरी ठार झाला. अत्याधुनिक स्फोटकं तयार करण्यात तो कुशल होता आणि काश्मीरच्या दक्षिणेकडच्या भागात दहशतवाद्यांची भरती करण्याचं काम तो करत होता. अनेक नागरिकांना ठार करण्यातही त्याचा हात होता, असं पोलिसांनी सांगितलं. या चकमकीत झीनातुन इस्लाम नावाचा स्थानिक दहशतवादी देखील मारला गेला आहे.
****
जम्मू-कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानी दलानं केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे लष्कराचा एक जवान शहीद झाला. आज सकाळपासून या भागात लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करून गोळीबार सुरू होता. या गोळीबारात जखमी झालेला हा जवान उपचारांदरम्यान मरण पावला. लष्करानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.
****
महिलांचा सन्मान करणं ही आपली परंपरा असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही महिलांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे.
राज्य निवडणूक आयोगातर्फे प्रथमच देण्यात येणारे ‘लोकशाही पुरस्कार’ उपराष्ट्रपती नायडू यांच्या ��स्ते आज मुंबई इथं प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. २०१६ आणि २०१७ या कालावधीत पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात पुढाकार घेतल्याबद्दल एकूण १४ विविध संस्था आणि व्यक्तींना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
निवडणुकांमध्ये राखीव जागा उपलब्ध झाल्यामुळे विविध स्तरातील महिलांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता लोकसभा आणि विधानसभांमध्येही महिलांसाठी राखीव जागांची तरतूद करण्याची गरज उपराष्ट्रपतींनी नायडु यावेळी व्यक्त केली.
****
मागास भागातली व्यक्ती उच्च पदापर्यंत मजल मारू शकते. त्यासाठी उच्च ध्येय आणि त्या ध्येयासाठी धडपड करणं आवश्यक आहे, त्यातूनच यश मिळतं, असं प्रतिपादन महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या कुलपती तथा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. बानुमती यांनी केलं आहे.
औरंगाबाद जवळच्या कांचनवाडी इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या शिलान्यास समारंभ कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या.
विद्यार्थ्यांचं  कायदेविषयक शिक्षण गुणवत्तापूर्ण असावं. या शिक्षणाबरोबरच इंटर्नशिप, कॅम्पस मुलाखत, संवाद कौशल्य यावर भर असावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
वांगणी इथं महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या सर्वच लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. त्यात नऊ गरोदर महिलांचा देखील समा��ेश आहे. या प्रवाशांसाठी ३७ डॉक्टरांसह रूग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या असून, त्यात स्त्रीरोगतज्ञांचाही समावेश आहे.
एनडीआरएफच्या आठ, नौदलाच्या चार तसंच लष्कराच्या दोन तुकड्या आणि भारतीय हवाईदलाच्या दोन हेलिकॉप्टर्सच्या सहाय्यानं सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळवलं आलं. लष्कराच्या आणखी दोन तुकड्या मार्गात असून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
दरम्यान, या एक्सप्रेसमध्ये प्रवासी अडकल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रवाशांना सर्वतोपरी मदत केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
****
संपूर्ण कोकणात पावसानं थैमान मांडलं असताना दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. आज पहाटे पासून पावसानं विश्रांती घेतली असून काही ठिकाणी सूर्यदर्शन सुद्धा झालं. आज सकाळी आठ वाजता नोंद झाल्याप्रमाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५१ पूर्णांक तीन मिलिमीटरच्या सरासरीनं एकूण ४१० पूर्णांक ४० मिलीमीटर पाऊस पडला.
****
गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं कालपासून जोरदार हजेरी लावली.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 November 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० नोव्हेंबर २०१८ दुपारी १.०० वा. **** विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत दुष्काळ आणि आरक्षणाच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजी आणि त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी फळबाग, ऊस तसंच केळीला एक लाख रुपये तसंच इतर पिकांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केली. आरक्षणाच्या मुद्यावरुनही विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला. मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगानं सादर केलेला अहवाल सभागृहात सादर करावा, अशी मागणी विरोधकांनी लाऊन धरली. ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता, मराठा-धनगर तसंच मुस्लीम आरक्षण जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी धर्माच्या आधारे आरक्षण दिलं जाणार नसल्याचं सांगितलं. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना या दरम्यान दोन वेळा सदनाचं कामकाज स्थगित करावं लागलं. विधान परिषदेचं कामकाजही याच मुद्यांवरुन झालेल्या गदारोळामुळे अर्ध्यातासासाठी तहकूब झालं होतं. त्यापूर्वी कामकाज सुरु होण्यापूर्वीही विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, सर्वपक्षीय विरोधकांची विधानभवनात बैठक झाली. अवनी वाघीण, मराठा आरक्षण, दुष्काळ या विषयावर विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. संसदीय कामकाज सल्लागार समितीची तत्काळ बैठक घेऊन, अधिवेशन एक आठवडा वाढवण्याची मागणी विरोधकांनी केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** वर्धा जिल्ह्यात पूलगाव इथल्या लष्करी तळावर झालेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी केली जाईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनाच्या परिसरात दिली. जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या घटनेवर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री निर्मला सीता��ामन यांच्याशी मदतीसंदर्भात दूरध्वनी झाला असून, मृतांच्या नातेवाईकांना सरकार मदतीची घोषणा करेल असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. दरम्यान, या स्फोटात मृत्यू झालेल्यांची संख्या सहा झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जम्मू-कश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आणि निमलष्करी दलाच्या एक जवानाला वीरमरण आलं. नादिगाम परिसरात ही चकमक झाली. **** रिजर्व्ह बँकेकडे असलेल्या नऊ लाख ६९ हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाशी संबंधित प्रश्नांचा विचार करण्यासाठी, एक उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय रिजर्व्ह बँक मंडळानं घेतला आहे. मध्यम लघू आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रातल्या थकित कर्जांचं पुनर्गठन करण्याच्या योजनेचा विचार या समितीनं करावा, असं मंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत ठरवण्यात आलं. बँकांची स्थिती कशी आहे, याबाबतच्या मुद्दयांचं परीक्षण, तत्काळ सुधार कृती आराखडा आणि रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक वित्तीय आराखड्यानुसार, रिझर्व्ह बँकेचं वित्तीय पर्यवेक्षण मंडळ करेल, असंही या बैठकीत ठरलं. **** गोव्यात पणजी इथं आजपासून ४९व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - ‘ईफ्फी’ सुरु होत आहे. बांबोलीम इथल्या श्यामा प्रसाद मुखर्जी क्रीडांगणावर आज होत असलेल्या उद्घाटन सोहळ्याचा केंद्रबिंदू नवा भारत आणि चित्रपटाच्या विविध शैली हा असेल, असं ईफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी सांगितलं. नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ६८ देशांमधले २१२ चित्रपट प्रदर्शित केले जातील. ‘अॅरस्पर्न पेपर्स’ या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात, तर ‘सिल्ड लिप्स’ चित्रपटानं महोत्सवाची सांगता होईल. **** राज्यात येत्या सत्तावीस तारखेपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत शाळाबाह्य मुलांवर विशेषत्वानं लक्ष केंद्रीत करावं, तसंच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले आहेत. आरोग्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे काल राज्यभरातले डॉक्टर्स, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या मोहिमेत, एका आठवड्यात सुमारे दहा लाख बालकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. **** उस्मानाबाद शहर आणि परिसरात आज पहाटे पाऊस झाला. हा पाऊस रब्बी हंगामातल्या ज्वारी, गहू हरभरा या पिकांच्या ��ाढीसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी पोषक असून, या पावसामुळे दुष्काळी परिस्थितीवर काही अंशी मात होऊन विंधन विहिरींचं पाणी टिकण्यास मदत होणार आहे. **** दिल्लीत सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत आज पाच वेळची विश्वविजेती एम सी मेरीकोमसह आठ भारतीय मुष्टीयोद्धा उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहेत. ४८ किलो वजनी गटात मेरीकोमची लढत चीनच्या वू यू बरोबर होणार आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद स��क्षिप्त बातमीपत्र १२ ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता.
जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर शहराच्या बाटमालू क्षेत्रात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाले. आज पहाटे ही चकमक झाली. दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी या ठिकाणी शोधमोहीम सुरु केल्याचं राज्याचे पोलिस महासंचालक एस.पी.वैद यांनी ट्विटमध्ये सांगितलं. या परिसरात अजुनही शोधमोहिम सुरु आहे. **** वस्तु आणि सेवा कर - जीएसटी प्रणालीमधे विक्रीचं विवरण पत्र भरण्याची मुदत सरकारनं दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीच्या व्यवसायांसाठी दर महिन्याच्या ११ तारखेपर्यंत वाढवली आहे. सध्या व्यापारी आणि व्यावसायिकांना दर महिन्यातल्या विक्रीचं विवरणपत्र त्याच्या पुढच्या महिन्याच्या १० तारखेपर्यंत भरावं लागतं. ते आता ११ तारखेपर्यंत भरता येईल. **** बाल आश्रय गृहामंध्ये रहाणाऱ्या ३० हजारांहून अधिक मुलांच्या आधार क्रमांकाला ट्रॅक चाइल्ड पोर्टल द्वारे जोडण्यात आलं आहे. यामुळे बाल गृहांमधून बेपत्ता झालेल्या मुलांसंबधी माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचं एका अधिकाऱ्यानं नवी दिल्लीत सांगितलं. देशातल्या विविध भागातून बेपत्ता झालेल्या आणि हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी हे पोर्टल मदत करतं. देशात नऊ हजारांहून अधिक बालगृह आहेत. **** केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते काल हैदराबाद इथं राष्ट्रीय पशु जैवतंत्रज्ञान संस्था एनआयबीच्या नव्या परिसराचं उद्घाटन झालं. एनआयबीच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. **** रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी तरुणांनी त्यांच्यातील प्रतिभा विकसित करावी आणि रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बनावं असं आवाहन केल आहे. उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एका कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन सिन्हा यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्यावेळी ते बोलत होते. **** नांदेड जिल्ह्यात काल अर्धापूर, भोकर, देगलूर, नांदेड आणि मुदखेड तालूक्यात हलका पाऊस झाला. पिकांना जीवदान मिळण्यासाठी अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. मागच्या महिनाभरापासून पावसानं खंड दिल्यामुळे सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 6 August 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ६ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा. **** राज्यघटनेतलं कलम ३५-अ च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड सुटीवर असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलली असल्याचं, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितलं. यावरची सुनावणी आता २७ ऑगस्टला होणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये राज्य सरकारला विशेष अधिकार बहाल करणारं हे कलम रद्द करावं अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. १९५४ मध्ये घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या या कलमामुळे जम्मू-कश्मीरच्या अधिवासी नागरिकांना विशेष हक्क प्राप्त झाले असून, लग्न करुन राज्याबाहेर जाणाऱ्या अधिवासी महिलांना मात्र मालमत्तेचा हक्क नाकारण्यात आला आहे. **** राज्यसभेत आज सदस्यांनी देशातली लोकसंख्या वाढीवर चिंता व्यक्त केली. शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करत भाजपचे अशोक वाजपेयी यांनी, २०२२ पर्यंत भारताची लोकसंख्या चीन पेक्षाही जास्त होईल, असं सांगितलं. या समस्येचा सामना करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे ��ेण्याचं आवाहन त्यांनी केलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांनी मानवी तस्करीच्या समस्येवर सभागृहाचं लक्ष वेधत, विविध राज्यातल्या तरुण मुलामुलींचं शोषण रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. शांततेत सुरू झालेल्या या आंदोलनाची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली नाही, त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं, ते म्हणाले. मराठा आरक्षण प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी दलवाई यांनी केली. **** दुसऱ्या महायुद्धात जपानमधल्या हिरोशिमा शहरावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यातल्या मृतांना आज लोकसभेत कामकाज सुरु होण्यापूर्वी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात लोकसभेत, जळगावचे खासदार नाना पाटील यांनी राज्यातल्या पर्यटनक्षेत्राच्या समस्यांकडे लक्ष वेधलं, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी भरीव उपाययोजना करण्याची गरज त्यांनी नमूद केली. औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद इथं गेल्या अनेक वर्षांपासून आयोजित होणारा वेरुळ महोत्सव बंद पडल्याकडे लक्ष वेधलं. यासाठी निधी उपलब्ध करून देत, हा महोत्सव कायमस्वरुपी सुरू करण्याची मागणी खैरे यांनी केली. त्यानंतर बिहार मधल्या मुजफ्फरपूर लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या रंजीत रंजन तसंच राष्ट्रीय जनता दलाचे जयप्रकाश नारायण यादव यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी केली, या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयकडे देण्यापूर्वी, पुरावे नष्ट केल्याचा आरोप यांनी केला. या मुद्यावर झालेल्या गदारोळानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित केलं होतं. **** संशोधन संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भात असलेल्या ‘इंप्रिंट - दोन’ या योजनेअंतर्गत ११२ कोटी रूपयांच्या १२२ नव्या संशोधन प्रकल्पांना सरकारनं मंजुरी दिली आहे. ऊर्जा सुरक्षा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण संस्थांमधल्या प्रगत संशोधनाला चालना देण्यासाठी ही योजना मुख्यत्वे राबवली जात असल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. एकूण दोन हजारांहून अधिक प्रस्ताव आले होते, त्यातले हे सर्वोत्कृष्ट १२२ संशोधन प्रस्ताव निवडले असून, त्यातल्या ८१ प्रस्तावांना उद्योजकांकडून प्रायोजकत्व मिळालं आहे. **** आधार प्राधिकरणाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत, असं आधार प्राधिकरणानं म्हटलं आहे. गूगलच्या एका चुकीवरून अफवा पसरवून जनसामान्यांमध्ये भीती पसरवली जात आहे, असंही प्राधिकरणानं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी ॲन्ड्रॉईड फोनवर आधार प्राधिकरणाचा जुना संपर्क क्रमांक अचानक दिसू लागला होता, मात्र कोणत्याही एजन्सीला हा नंबर मोबाईल फोन्स मध्ये समाविष्ट करण्यास सांगितलं नव्हतं, असं प्राधिकरणानं स्पष्ट केलं. पोलीस तसंच अग्निशमन दलाच्या क्रमांकासोबत आधारचा दूरध्वनी क्रमांक चुकून जोडला गेल्याचं गुगलने याआधीच स्पष्ट केलं आहे. याआधारे या फोन क्रमांकावरून मोबाईल फोनमधील डेटा चोरता येऊ शकता नाही, असंही आधार प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. **** भारतीय गोल्फ खेळाडू गगनजीत भुल्लर यानं फिजीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या ‍अँथनी क्वायलला मागे टाकलं, आणि कारकिर्दीतलं दहावं विजेतेपद पटकावलं. भुल्लर आशियाई दौऱ्यातला सर्वोत्कृष्ट भारतीय गोल्फपटू ठरला आहे. **** येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसानं खंड दिला असून, पिकांना वाढीसाठी चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १६ मार्च   २०१८ सकाळी ११.०० वाजता ****
पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधे इंफाळ इथं मणीपूर विद्यापिठात आयोजित भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन करत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातून वंचितांपर्यंत पोचायचंय, ही यावेळच्या अधिवेशनाची संकल्पना आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातले जगभरातले मान्यवर याठिकाणी उपस्थित आहेत. या अधिवेशनाबरोबरच राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, एक हजार अंगणवाडी केंद्र, शिक्षक-डॉक्टर्स-परिचारकांसाठी १९ निवासी संकुल, आणि इतर विकास प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
****
जम्मू कश्मीरमध्ये श्रीनगर शहराबाहेर काल रात्रभर चाललेल्या कारवाईत दोन अज्ञात दहशतवादी मारले गेले. एका स्थानिक भाजपा नेत्याच्या सुरक्षारक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर या भागात शोधमोहिम राबवण्यात आली. मोहिमेच्या सुरूवातीला केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक जवान जखमी झाला. या कारवाईदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी शस्त्र आणि दारूगोळ्यासह इतर काही वस्तूही जप्त केल्या.
****
नंदुरबार वनविभागाच्या पथकानं गुप्त माहीतीच्या आधारे सापळा रचून वन्य प्राणी आणि त्यांच्या कातडीची तस्करी करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. कोरीट गावानजीक जेरबंद करण्यात आलेल्या या तिघांकडून एक जिवंत मांडुळासह बिबट्याची कातडी आणि अन्य एका प्राण्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी वनविभाग अधिक तपास करत आहे.  
****
 राज्यात काल संध्याकाळपासून अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. नांदेड, हिंगोली, जालना, औरंगाबाद, उस्मानाबाद अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी पाऊस पडला. जुन्नर भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू आणि हरभऱ्याचं नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात नि��्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टया��ुळे आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
औरंगाबाद इथं आज मराठा आरक्षणावर जनसुनावणी होणार आहे. शहरातल्या सुभेदारी विश्रामगृह इथं संध्याकाळी चार वाजेपर्यंत नागरिक, संस्था, संघटनांकडून यासंदर्भातली निवेदनं स्वीकारण्यात येणार आहेत.
 //********//
0 notes