#उत्तराखंड हवामान
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 July 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशभरात आज गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणून याला व्यासपौर्णिमाही म्हणतात. जीवनाच्या विविध क्षेत्रात मार्गदर्शकाची भूमिका बजावणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा समजला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना सामाजिक माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी आज सकाळी शताब्‍दी ध्‍वजाचं पूजन करण्यात आलं. साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत, तर संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भपंढरी शेगाव इथं भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर शहरात हरिहर शक्तिपीठ रेणुका माता मंदिराच्या वतीनं गुरू लॉन्सवर महोत्सवाचं आय��जन करण्यात आलं आहे. गारखेडा परिसरातल्या गजानन महाराज मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
****
भारतात प्रथमच, जागतिक वारसा समितीची बैठक होत आहे. आज संध्याकाळपासून नवी दिल्लीच्या भारत मंडपम् इथं या कार्यक्रमाला सुरुवात होईल. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांद्वारे व्यक्त केलं आहे. देशाचा वारसा जतन करण्याच्या मार्गांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही बैठक एक महत्त्वाचं व्यासपीठ असल्याचंही मोदी यांनी म्हणाले.
****
बांग्लादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, तिथले जवळपास एक हजार भारतीय विद्यार्थी काल मायदेशी परतले. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, सहउच्चायुक्तालय अजूनही बांग्लादेशातल्या विविध विद्यापीठात शिकणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्यासाठी संपर्कात असून, नेपाळ-भूतान या देशांच्या विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्यास मदत देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. विमानसेवेसह भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षितपणे ओलांडण्यासाठीदेखील उपाययोजना केल्या जात आहेत.
****
उत्तराखंडमधील पवित्र धाम केदारनाथसाठी जाणाऱ्या पादचारी मार्गावर चिरबासा इथं हेलिपॅडनजीक आज भूस्खलन झाल्यानं तीन जण दगावले, तर पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये जालन्याच्या सुनील काळे, तर नागपूरच्या किशोर पराटे या युवकांचा समावेश आहे.
****
चांदीपुरा विषाणू प्रकरणासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेशातील मेंदूशी संबंधित तीव्र एन्सेफलायटिस आजाराबाबत आरोग्य सेवा महासंचालनालयाचे संचालक अतुल गोयल यांनी काल तज्ञांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. विविध विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी आणि इतर रसायनांमुळे हा आजार होत असल्याचं या बैठकीत नमूद करण्यात आलं. महाराष्ट्राच्या चांदीपुरा इथं प्रथम आढळलेल्या या विषाणूचा देशाच्या पश्चिम, मध्य आणि दक्षिणेकडील भागात, विशेषत: पावसाळी हंगामात उद्रेक होतो. माशा आणि गोचिडं यांद्वारे हा विषाणू पसरतो. प्रतिबंध, स्वच्छता आणि जागरूकता हेच या रोगावरील उपाय आहेत.
****
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून केंद्र सरकारनं किरकोळ विक्रेत्यांना आतापर्यंत साडेआठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वितरीत केल्याची माहिती आरोग्य आणि ��ुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी दिली आहे. नड्डा यांच्या हस्ते काल रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी अन्नसुरक्षेसंदर्भातल्या संकेतस्थळाचं दिल्ली इथं उद्घाटन झालं. देशभरात खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू झाल्याचं सांगून, ते सुरक्षित खाद्यपदार्थांचा वापर करत असल्याच्या खात्रीसाठी एका नावीन्यपूर्ण चाचणी संचाची सुविधा गरजेची असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले.
****
गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषदेअंतर्गत कुंभारटोली आणि पाऊळडौना हा रस्ता दुरुस्त होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज स्थानिकांसह या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये धान पिकाची रोवणी करत आंदोलन केलं. प्रशासनानं हा रस्ता लवकर दुरुस्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
****
भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भ, छत्तीसगड, किनारी कर्नाटक, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, हरयाणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, आणि तेलंगणमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच नवी दिल्लीमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
****
भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातल्या वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे २३ दरवाजे एक मीटरनं, तर अन्य दहा दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले आहेत. दरम्यान, भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयातील विद्युत प्रवाह नियंत्रक संचाला आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलानं काही क्षणातच आगीवर नियंत्रण मिळवत अनर्थ टाळला.
गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू असून, गडचिरोलीहून नागपूर, तसंच चामोर्शी यासह आलापल्लीहून भामरागड, तसंच सिरोंचा या चार राष्ट्रीय महामार्गांसह तीस मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
[Hindi] जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश उत्तर भारत पुन्हा पहाटे पडला आहे, मैदानी भागांमध्ये होळी वर गर्भवती / [Hindi] जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आणखी एक बर्फवृष्टी झाली तर उत्तर-पश्चिम मैदानावर होळीवर उष्णता वाढणार आहे.
[Hindi] जम्मू कश्मीर, हिमाचल प्रदेश उत्तर भारत पुन्हा पहाटे पडला आहे, मैदानी भागांमध्ये होळी वर गर्भवती / [Hindi] जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आणखी एक बर्फवृष्टी झाली तर उत्तर-पश्चिम मैदानावर होळीवर उष्णता वाढणार आहे.
उत्तर भारतच्या भागांमध्ये एक नवीन पश्चिमी विक्षोभ पुन्हा दस्तऐवज बनविणे आणि या प्रणालीचे कारण म्हणजे जम्मू-कश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फ्रायदाक से लद्दाख, हिमाचल और क्वेराखंड तक की क्रियाकलापांची घटना घडणे. पण हे सिस्टम मैदानी प्रदेश पंजाब, हरियाणा, दिल्ली, रेंज, उत्तर प्रदेश किंवा मध्य प्रदेशातील उत्तरी भागांमध्ये कोणत्याही मौसमी हलवाल देगा नाही. सर्व भागांमध्ये हवामान स्वच्छ आणि शुष्क…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१२ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात, राज्यात उद्या, १३ मे रोजी, अकरा मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण २९८ उमेदवार निवडणूक लढवत असून, दोन कोटी २८ लाख एक हजार १५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था -इस्रोनं काल द्रवरूप रॉकेट इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली. या इंजिनात वेगवेगळे चौदा भाग जोडण्याऐवजी, एकसंध नवीन भाग तयार करण्यात आला आहे. यामुळे इंधन वापराचं प्रमाण पूर्वीच्या ५६५ किलोवरून सुमारे साडे तेरा किलोवर आलं आहे.
****
उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. उत्तराखंड मधल्या चार धामांपैकी केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या इतर तीन मंदिरांचे दरवाजे परवा अक्षय्य तृतीयेला उघडण्यात आले होते.
****
शिवसेना नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ते आज सायंकाळी विविध समाजघटकांशी चर्चा करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित असतील.
****
यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्रात काल शास्त्रीय सल्लागार समितीची २२ वी सभा पार पडली. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती.
****
राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 
दरम्यान, राज्यात काल नाशिक, अहमदनगर, रत्नागिरी, कोल्हापूर, तर मराठवाड्यात बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 02 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
चारधाम तीर्थयात्रेच्या दृष्टीनं उत्तराखंड प्रशासनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. चारधाम तीर्थयात्रा करण्याऱ्या भाविकांसाठी व्यापक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकार सज्ज झालं आहे. यासंदर्भात उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुडी यांनी सर्व राज्यांना एक पत्र जारी केलं असून सामान्य यात्रेकरुंच्या सुविधेसाठी या चारधाम यात्रेच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत केदारनाथ धामसाठी विशेष व्यक्तिंसाठींच्या अर्थात व्हिआयपी यात्रांची संख्या कमी करण्याबाबत या पत्राद्वारे सूचित केलं आहे. तसंच कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी यात्रेकरुंनी आयआरटीसीच्या माध्यमातूनच हेलिकॉप्टर सेवांची नोंदणी करण्याचं आवाहनही उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे.
****
इंडिया आघाडी पाच वर्षात पाच पंतप्रधान बदलेल हे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य निरर्थक असून इंडिया आघाडीत अद्याप पंतप्रधान���दाबाबत चर्चा झालेली नाही. पुरेसं संख्याबळ आल्यास निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
अन्य राज्यात लोकसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जात आहे. मात्र महाराष्ट्रात अधिक ठिकाणी प्रचारासाठी संधी मिळावी, म्हणून राज्यातली निवडणूक पाच टप्प्यांमध्ये जाणीवपूर्वक घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
****
गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सगळेच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गुजरात राज्यात येत्या सात तारखेला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज आणंद इथं सभा झाली. या सभेनंतर ते सुरेंद्रनगर, जामनगर आणि जुनागढ या ठिकाणी सभा घेतील, तर काँग्रेस नेते तथा राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आज अहमदाबाद इथं एका पत्रकार परिषदेला संबोधित करतील. दुसरीकडं आम आदमी पक्षाच्या नेत्या सुनीता केजरीवाल भावनार आणि भरुच इथं आप उमेदवारांच्या प्रचारासाठी बोटाद आणि डेडियापाडा इथं रोड शो करत आहेत.
****
छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीचा जोरदार प्रचार सुरु आहे.  काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून आज त्या चिरमिरी इथं जाहीर सभा घेतील. प्रियंका गांधी यांचा छत्तीसगडचा हा दुसरा प्रचार दौरा असून त्यांनी दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी या आधी राजनांदगांव तसंच कांकेर इथं जाहीर सभा घेतल्या आहेत.
****
बारावी विज्ञान शाखा, सामाईक प्रवेश परीक्षा-सीईटीचं छत्रपती संभाजीनगर जवळच्या कुंभेफळ इथलं केंद्र बदलण्यात आलं आहे. आजपासून चार मे पर्यंत होणाऱ्या या परीक्षेचं कुंभेफळ इथलं केंद्र आता जालन्याजवळच्या नागेवाडी इथं शासकीय तंत्रनिकेतन हे असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीईटीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
****
येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसंच विदर्भात येत्या चार दिवसांत कमाल तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सियसपर्यंत वाढ होईल, असंही नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं कळवलं आहे.
****
भारतीय बुद्धीबळपटू वैशाली रमेश बाबू हिला आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ फिडेनं अधिकृतपणे ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित केलं आहे. कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांच्यानंतर या किताबानं सन्मानित झालेली वैशाली ही तिसरी महिला बुद्धीबळपटू आहे. ग्रँडमास्टर या किताबानं सन्मानित असलेली वैशाली आणि तिचा भाऊ रमेशबाबू प्रग्यानंद ही विश्वातली पहिली भावा बहिणीची जोडी आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद सनरायजर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेत काल पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जनं दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य पंजाब किंग्जनं १७ षटकं आणि पाच चेंडूत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठलं. या स्पर्धेतल्या गुणतालिकेत पंजाब किंग्ज सातव्या तर चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 November 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·      राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या जिल्ह्यात तातडीनं पंचनामे करुन मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
·      हिंगोली जिल्ह्यात वीज कोसळून एकाचा मृत्यू;पशूधनासह शेतपिकं आणि फळबागांचं नुकसान
·      धुळे सोलापूर महामार्गावर कन्नड घाटात कार दरीत कोसळून चार ठार तर सात जखमी
आणि
·      जालना इथं विकसित भारत संकल्प यात्रेला प्रारंभ;छत्रपती संभाजीनगर इथं आज यात्रेचं औपचारिक उद्‌घाटन
सविस्तर बातम्या
राज्यात ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे, तिथे तातडीनं पंचनामे करुन शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेआहे. काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
Byte…
गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे, त्यामध्ये नाशिक आहे, नगर आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपिट झालेली आहे, सकाळीच सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी गारपीट झालेली आहे, अवकाळी पडलेला आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागपूर इथं बोलताना त्यांनी, कुठल्याही परिस्थितीत शेतक-यांना मदत करण्याचीच राज्य सरकारची भूमिका असल्याचं आश्वासन दिलं.
****
दरम्यान, राज्यात कालही अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. विभागात काल सकाळपर्यंत १०७ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे ज्वारी, गहू, मका, कपाशी, तूर आदी पिकांसह फळबागांचं नुकसान झालं आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे आठही जिल्हा प्रशासनाला पिकांसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
****
या पावसामुळे परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीला पूर आला असून, शेतात पाणी साचलं आहे.
धाराशिव शहर आणि परिसरात आज पहाटेपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्याने राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात वीज कोसळून ५० शेळ्या-मेंढ्या दगावल्या, तर जिल्हाभरात सात मोठी जनावरं दगावली. भोकरदन आणि घनसावंगी तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्वारी आणि फुलोरा अवस्थेत असलेल्या द्राक्षबागांचं नुकसान झालं.
नांदेड जिल्ह्यात मुदखेड, किनवट आणि नांदेड तालुक्यात एकूण चार जनावरं दगावल्याचं आणि एका घराची अंशत: पडझड झाली असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून तातडीने सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
****
राज्यात पुढच्या दोन दिवसांसाठी मराठवाड्यातल्या जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस आणि गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या तीस तारखेनंतर हे वातावरण निवळणार असून, त्यानंतर थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड घाटात धुक्यामुळे कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. वाहनाच्या पुढच्या काचेवरचं दव पुसण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं वृत्त आहे.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसाठी अत्याधुनिक १५ वाहनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
राज्यातल्या दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडे पाठवलेला निधी प्रस्ताव मंजूर झाल्यावर भरीव मदत करण्यात येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय, दुष्काळसदृष्य स्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य शासनाकडून मदतीची ग्वाहीही पवार यांनी दिली.
****
उत्तराखंड मधल्या उत्‍तरका��ी जिल्ह्यात निर्माणाधीन सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न अथकपणे सुरु आहेत. याबाबतची एकूण स्थिती नियंत्रणात असल्याचं, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सदस्य निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन यांनी सांगितलं आहे.
****
जालना इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली. जिल्हा परिषद कार्यालयापासून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संकल्प रथास हिरवा झेंडा दाखवला. आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यावेळी उपस्थित होते. या मोहिमेविषयी माहिती देताना रावसाहेब दानवे म्हणाले,
Byte…
२०१४ ते २०२३ पर्यंत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये या देशात विकासाची कोणती कोणती कामं झालीत, गरीबासाठी कोणती कामं झालीत, आणि शेतकरी तरूणांसाठी कोणती कामं झालीत ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेची सुरूवात करण्यात आली आहे. जालन्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन शासनाच्या योजनेची माहिती या संकल्प यात्रेमध्ये दिली जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार आहे. शहरातल्या सिद्धार्थ उद्यानात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे
****
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं ४२५ वं समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडेचारशेव्या जयंतीनिमित्त पैठण इथं सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची काल सांगता झाली. एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज योगीराज महाराज गोसावी यांनी सांगतेचं काल्याचं कीर्तन केलं. त्यापूर्वी या सोहळ्यात काल सकाळी गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधल्या एकनाथ मंदिरामध्येही भागवत जयंतीसह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
****
बीड जिल्ह्यत शिरूर कासार तालुक्यातून जाणाऱ्या पैठण - पंढरपूर पालखी मार्गाचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी काल नागरिकांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केलं. अधिकाऱ्यांनी याबाबतचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांची भेट घेतली. धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पाठिंबा असून येत्या विधिमंडळ अधिवेशनामध्येही आपण याबाबत प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली.
****
समन्यायी पाणी वाटप धोरण एखाद्या वर्षापुरते अंमलात न आणता मराठवाड्याच्या शाश्वत पाण्यासाठी ते कायमस्वरुपी राबवावं, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेनं केली आहे. काल लातूर इथं झालेल्या विभागीय बैठकीत ही मागणी करण्यात आली. वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्स्थापनेसाठी आता थेट राष्ट्रपतींचेच दरवाजे ठोठावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं काल ‘साक्षात‘ उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांचं व्याख्यान झालं. माझी कविता ही बाहेरचा आणि आतलाही आवाज ऐकते, म्हणून मी आत आणि बाहेर पाहू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
अंबाजोगाई इथं तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचा काल समारोप झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष तथा ज्येष्ठ लेखक रविंद्र शोभणे यांनी यावेळी बोलताना, यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या राजकीय आणि सामाजिक विचारात अंतर पडत  असल्याची खंत व्यक्त केली. कृषी, साहित्य, संगीत आणि युवा या क्षेत्रातील चार गुणवंतांना यावेळी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देवून गौरवण्यात आलं. धावपटू अविनाश साबळे याला क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल "युवा गौरव" सन्मान प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, आणि पाच हजार रुपये असं या सर्व पुरस्कारांचं स्वरूप आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या जालना-छपरा-जालना विशेष साप्ताहिक गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. जालना ते छपरा या गाडीला २९ नोव्हेंबर ते तीन जानेवारी २०२४ पर्यंत, तर छपरा ते जालना गाडीला एक डिसेंबर ते ०५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे.
****
रेल्वेच्या सिकंदराबाद आणि नांदेड विभागात सुरू असलेल्या रेल्वेमार्गाच्या देखभालीच्या कामांमुळे येत्या दोन आणि तीन डिसेंबरपर्यंत काही रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या उशिरा धावणार आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे चालवत असलेल्या ओखा-मदुराई-ओखा  या विशेष गाडी ला येत्या २९ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी उभारल्या जाणाऱ्या सभामंडप उभारणीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे उपस्थितीत प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेऊन पाहणी केली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१२ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तराखंड दौऱ्यामध्ये आज स्थानिकांनी पारंपारिक पद���धतीनं स्वागत केलं. पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज उत्तराखंडमधल्या चार हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उदघाटन तसंच प्रकल्पांच्या कार्याचा प्रारंभ होणार आहे.
****
बिहारमध्ये काल रात्री बक्सर जिल्हयातल्या रघुनाथपूर रेल्वेस्थानकाजवळ ईशान्य जलदगती रेल्वेचे आठ डबे रुळावरून घसरल्यामुळं झालेल्या अपघातात, चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. ही रेल्वे नवी दिल्लीहून गुवाहाटीकडे निघाली होती.
****
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी डॉ. अण्णासाहेब कोरपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज अकोला इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महामे‍ळावा होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या महामेळाव्यात आभासी पद्धतीनं मार्गदर्शन करणार आहेत.
****
बीड जिल्ह्यात वाळू माफियांनी काल तपास करणाऱ्या पोलिस पथकाला गाडीनं धडक देऊन हल्ला केला. यात सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांच्यासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून जालना जिल्ह्यातल्या गोंदी इथल्या रहिवासी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या बोंडे सडवणाऱ्या रोगाचं तसंच तुरीवरच्या मररोगाचं एकात्मिक व्यवस्थापन करण्याचा सल्ला, कृषी विभागानं दिला आहे. जास्त पाऊस, किडींचा प्रादुर्भाव आणि दाट पेरणी या कारणांमुळं बोंडे सड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं  शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची सूचनाही कृषी विभागानं केली आहे.
****
राज्यातलं हवामान आज कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. कोकणात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना होणार आहे. लखनऊ इथं अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रीडासंकुलात हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१२ जूलै २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
देशाच्या अनेक भागात अद्याप पूरपरिस्थिती कायम आहे. राजधानी दिल्लीत जोरदार पाऊस पडत असून, यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. उत्तराखंड आणि ईशान्य भारतात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.
***
नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी घाटात एस टी बस च्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, २१ प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटे सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं जात असताना घाटातल्या गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फूट खोल दरीत कोसळली. आशा पाटील असं मृत महिलेचं नाव असून, त्या जळगाव जिल्ह्यातल्या होत्या, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. या अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याची सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
***
बनावट औषधी बनवणाऱ्या कंपन्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश, रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी औषधी महानियंत्रकांना दिले आहे. नवी दिल्लीमध्ये त्यांनी औषध कंपनीच्या प्रतिनीधींची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या औषधीनिर्मितीच्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचं मांडविया यावेळी म्हणाले.
***
भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्य निर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं, संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. विविध घटकांवर आधारित जागतिक गरीबी निर्देशांकाबाबतच्या अहवालात, गेल्या १५ वर्षांत भारतातल्या ४१ कोटी ५० लाख नागरिकांचं उत्पन्न वाढलं आणि त्यांची दारिद्र्य रेषेवरील नागरिकांमध्ये गणना झाली, असं नमूद करण्यात आलं आहे.
***
मुंबईत काल निर्भया पथकाच्या वाहनाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. शीघ्र कृती दल या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक अतिशय सक्षमतेनं काम करत असल्याचं, फडणवीस यावेळी म्हणाले.
//*************//
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन, हिंगोलीसह राज्यात सात ठिकाणी सुरू होणार एफ एम सेवा
धर्मादाय रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार देण्यासाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे निर्देश
येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य, शेतकऱ्यांची नियोजित मोर्चा स्थगित
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान
मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट, वीज पडण्याच्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाची चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
देशात रेडिओ संपर्क व्यवस्थेला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ९१ एफएम ट्रान्समीटर्सचं दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करणार आहेत. १८ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या ८४ जिल्ह्यांमध्ये, हे शंभर वॅटचे ट्रान्समीटर्स बसवण्यात आले आहेत. यामध्ये आकांक्षी जिल्हे आणि सीमावर्ती भागात व्याप्ती वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात, केरळ, छत्तीसगड, नागालँड इत्यादी राज्यांचा समावेश आहे. या अंतर्गत राज्यात हिंगोली, सटाणा, नंदुरबार, वाशिम, अचलपूर, अहेरी आणि सिरोंचा या सात ठिकाणी, एफ एम सेवा सुरू होणार आहे. आकाशवाणीच्या एफ एम सेवेच्या विस्तारामुळे अतिरिक्त दोन कोटी लोकांना संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार आहे.
****
नागपूरमध्ये राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग म��त्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नव्यानं उभारण्यात आलेल्या या राष्ट्रीय कर्करोग संस्थेमध्ये संशोधन केंद्रंही असल्यानं देशाला कर्करोगमुक्त बनवण्याचं स्वप्न ही संस्था पूर्ण करेल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले…
Byte…
टाटा कॅन्सर के सिवाय कोई पर्याय नही था। और मुंबई मे इस प्रकार की सेवा, वहां रहना काफी मुश्किलें होती थी। पर मुंबई मे जो टाटा कॅन्सर का जो स्टँडर्ड था, जो इक्विपमेंट थे, डॉक्टर्स थे, उसी स्तर का ये नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूट तयार हुआ है। और मुझे इस बात की खुशी है, की ये स्टेट ऑफ आर्ट ऐसा बना है की इसकी हर चीज केवल देश मे ही नही तो वर्ल्ड स्टँडर्ड का ये इन्सिट्यूट बना है। और इसलिये ऐसा संकट जिनके उपर आता है, उनको .फिर से जीवन मे जीने की उम्मीद देना, उनका आत्मविश्वास बढाना, उनकी सेवा करना, उनको वैद्यकीय उपचार रिजनेबल रेट मे उपलब्ध कराके देना ये बहोत ही आवश्यक काम है।
हवामान बदल, जीवनशैलीतील बदल यामुळे कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कर्क रोगावर उपचार करणाऱ्या अशा विशेष रुग्णालयांची गरज असल्याचं, मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भविष्यात परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सर्वांना उपलब्ध करून देणं हे आव्हान असून, शासन यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीनं या राष्ट्रीय कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेत रुग्णांच्या नातेवाईकांच्या नि:शुल्क निवासासाठी धर्मशाळा उभारण्यात येणार असून, एक संशोधन केंद्र देखील उभारण्याचा मानस असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
****
धर्मादाय रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा आणि सवलतीच्या दरात उपचार मिळणं आवश्यक आहे. यादृष्टीनं सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. मुंबईत काल या रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागानं धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारं, सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असं ॲप प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदारानं दिलेला उत्पन्नाचा दाखला, या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त, अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशी सूचनाही सावंत यांनी केली.
****
येत्या महाराष्ट्र दिनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते, त्यासंदर्भात पुराव्यांनिशी तपशीलवार अंतरिम अहवाल राज्यानं २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तेव्हापासून सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याचं पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्वसंबंधित विभागांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यास मान्यता दिली असून, फक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करणं बाकी असल्याकडेही अजित पवार यांनी या पत्राद्वारे लक्ष वेधलं.
****
रायगड जिल्ह्यात खारघर इथं महाराष्ट्र भ��षण पुरस्कार वितरण वेळी, उष्माघाताच्या त्रासामुळे झालेल्या १४ जणांचा मृत्यू प्रकरणी, संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास, मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. विरारच्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या इतर दहा जणांविरुद्ध या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी, या याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या आठ जूनला सुनावणी होणार आहे.
****
सौर ऊर्जेद्वारे शेतकऱ्यांसाठी सात हजार मेगावॅट वीज निर्मितीमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळेल, असं महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते काल वार्ताहरांशी बोलत बोलत होते. राज्य सरकारनं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला असून, त्याअंतर्गत ‘मिशन २०२५’ ला सुरुवात झाली आहे. सौर ऊर्जेचा वापर करून डिसेंबर २०२५ पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० टक्के कृषी फीडर्स सौरऊर्जेवर चालवण्याचं या अभियानाचं उद्दीष्ट असल्याचं पाठक यांनी सांगितलं. राज्यात ४५ लाख कृषी पंपधारक शेतकरी आहेत आणि त्या सर्वांसाठी आगामी काळात हे अभियान महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते म्हणाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग परवा रविवारी प्रसारीत होणार असून, प्रेरणा आणि माहिती देणारा हा कार्यक्रम सर्वांनी ऐकावा, असं आवाहन, अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. 'मन की बात' कार्यक्रमाचा शंभरावा भाग विशेष असल्यामुळे सर्वांना तो ऐकता यावा, यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, सोसायटी कार्यालय, अंगणवाडी तसंच जिथे जिथे शक्य आहे तिथे कार्यक्रम ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
भारतीय किसान सभेच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी नियोजित मोर्चा स्थगित केल्याचं, महसूल मंत्री राधाकृष्ण वि��े पाटील यांनी सांगितलं. ते काल अहमदनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी, दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात अकोला ते लोणी दरम्यान, लाँग मार्च काढला होता. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलडाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमधले शेतकरी, या मोर्चात सहभागी झाले होते. किसान सभेनं केलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी काल संगमनेर इथल्या बैठकीत चर्चा झाल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीचं आज आणि परवा ३० तारखेला मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कन्नड तसंच लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज तर पैठण, गंगापूर आणि फुलंब्री बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान होणार आहे. जालना जिह्यातल्या परतूर आणि घनसावंगी बाजार समितीसाठी आज, तर अंबड, आष्टी आणि मंठा बाजार समितीसाठी ३० तारखेला मतदान होणार आहे.
बीड जिल्ह्यातल्या नऊ पैकी कडा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, केज आणि वडवणी या बाजार समित्यांसाठी आज, तर माजलगाव आणि पाटोदा या बाजार समित्यांसाठी परवा ३० तारखेला मतदान होणार आहे.
****
`प्रधानमंत्री स्वनिधी` योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल या संबंधी महोत्सवा अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महापालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहितीही कराड यांनी दिली. ते म्हणाले,
Byte…
या जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका आहेत. ही योजना जशी महानगरपालिकेला आहे तशी नगरपालिकेला सुद्धा आहे. म्हणून कन्नड असेल, वैजापूर असेल, गंगापूर असेल, सिल्लोड असेल, खुलताबाद असेल याठिकाणी सुद्धा ही योजना चालू आहेच. पण त्याचं रिव्ह्यू मिटींग आपण लवकरात लवकर घेऊ. म्हणून जिल्हा परिषदेचे असिस्टंट सीईओ जिल्हा परिषदेमार्फत मी त्यांना सूचना करतो की लवकरात लवकर तुम्ही आढावा घ्या. आणि एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी कन्नड किंवा वैजापूर असा मेळावा ठेवा. आणि त्यात एसबीआय बँक असेल सर्व बँक असेल सर्व सहकार्य करतील.
****
मराठवाड्यात काल सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटनांमध्ये विभागात काल पाच जणांचा मृत्यू झाला. 
हिंगोली शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश गावांत काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान कळमनुरी, वरूड, जवळाबाजार, वाकोडी, रामेश्वरतांडा, डिग्रस कऱ्हाळे, कनेरगाव नाका, सवना, कडोळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हळद काढणी आणि वाळवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव शहरात काल अवकाळी पाऊस पडला. सिल्लोड तालूक्यातील घटांब्री आणि आमसरी इथं दुपारी दोनच्या सुमारास गारपीटीसह पाऊस पडला.
जालना जिल्ह्यातही विरेगाव, रामनगर परिसरात काल रात्री वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.
लातूर जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला. निलंगा तालुक्यातल्या मुबारकपूर इथं आरुषी राठोड या १३ वर्षीय मुलीचा, तर तगरखेडा इथं राजाप्पा कल्याणे हा शेतकर्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
नांदेड जिल्ह्यातही काल अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. माहूर तालुक्यात सातघरी इथं घराच्या पत्र्यावर ठेवलेला दगड अंगावर पडल्यानं सोनुबाई पवार या महिलेचा मृत्यू झाला. मालटेकडी परिसरातल्या कामठा इथं वीज पडून शेख वजीर शेख चांद यांचा मृत्यू झाला.
परभणी जिल्ह्यात पांगरी तालुक्यातही एका मुलाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
दरम्यान, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक दहा हजार आठ शेतकऱ्यांच्या पाच हजार ४८७ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात गारपीटीचा फटका बसला असून, गहू पिकासह मोसंबी, आंबा या फळपिकांचं नुकसान झालं आहे.
दरम्यान, आजही मराठवाड्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल जयपूर इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघानं चेन्नई सुपर किंग्जवर ३२ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानच्या संघाने २० षटकात २०२ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला चेन्नईचा स���घ १७० धावातच सर्वबाद झाला. या विजयाबरोबरच राजस्थानचा संघ पदक तालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
****
पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा घडवणाऱ्या भारत गौरव रेल्वेला, आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे पुणे इथं हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 'देखो अपना देश' आणि 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उदात्त पर्यटन संकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशानं, ही योजना सुरू करण्यात आली आहे.
****
मुंबई इथल्या `आफ्टरनून व्हॉईस`च्या १५ वा `न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड` २०२३ मधला 'सर्वोत्कृष्ट कार्यशील राजकारणी'चा पुरस्कार, छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना जाहीर झाला आहे. जलील यांची संसदेतली भाषणं हा लोकांचा आवाज असल्यानं, त्यांची ��ा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं, या संदर्भातली घोषणा करताना संयोजक डॉ. वैदेही तमन यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनी - येत्या एक मे रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जलील यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 
****
कोविड -१९ लसीकरणा अंतर्गत इन्कोव्हॅक ही नाकवाटे घ्यावयाची लस छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चिकलठाणा इथल्या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली आहे. ही लस फक्त ६० वर्षांवरील नागरिकांच्या वर्धक मात्रेसाठीच वापरण्यात येणार असल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितलं.
****
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
आज या states राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिला आहे
आज या states राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिला आहे
हवामान चेतावणी देशातील बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे नद्या तुरळक आहेत, उत्तराखंड आणि बिहारच्या बर्‍याच भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दिल्लीकरांना पावसाळ्यासाठी आणखी थोडा वेळ थांबावे लागेल. वस्तुतः हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात नैwत्य मॉन्सूनच्या ��गमनाची गती काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
हवामान विभागातील अशक्त हवामानाचा नमुना, लोक आश्चर्यचकित झाले आहेत, जाणून घ्या हवामान खात्याचा हा मोठा इशारा
हवामान विभागातील अशक्त हवामानाचा नमुना, लोक आश्चर्यचकित झाले आहेत, जाणून घ्या हवामान खात्याचा हा मोठा इशारा
हवामान अद्यतन चक्रीवादळ टुटेचा प्रभाव आता कमकुवत झाला असला तरी त्याचे वातावरण दररोज दिवसेंदिवस बदलत आहे, परंतु त्याचा परिणाम राजधानी दिल्लीवर अजूनही दिसून येत आहे. दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर पूर्व राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ व काही ठिकाणी मुसळधार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
देशाच्या या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता!
देशाच्या या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता!
हवामान इशारा हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तराखंड राज्यात 2 दिवसांच्या स्वच्छ हवामानानंतर पाऊस, हिमवृष्टीची मालिका 27 एप्रिलला पुन्हा परतणार आहे. वास्तविक, हवामान खात्याने 28 एप्रिल रोजी उत्तरकाशी, चमोली, पिथौरागड जिल्ह्यात पाऊस, बर्फवृष्टी आणि वीज कोसळण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर राजस्थानमधील हवामान पुढील days दिवस मुख्यत: कोरडे राहील. पुढील 72 तासात किमान आणि कमाल तापमानात दोन ते चार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years ago
Text
उत्तराखंड चमोली बातम्या लाइव्ह अपडेट्स: एका आठवड्यानंतर बोगद्यातून मृतदेह सापडले - उत्तराखंड चमोली थेट
उत्तराखंड चमोली बातम्या लाइव्ह अपडेट्स: एका आठवड्यानंतर बोगद्यातून मृतदेह सापडले – उत्तराखंड चमोली थेट
बोगद्याच्या आतील मृतदेह सापडले – फोटो: अमर उजाला अमर उजाला ई-पेपर वाचा कोठेही कधीही. * फक्त ₹ 299 मर्यादित कालावधी ऑफरसाठी वार्षिक सदस्यता. लवकर कर! बातमी ऐका बातमी ऐका तपोवन प्रदेशात हवामान खराब, बोगद्याच्या आत बचावकार्य सुरूच आहेतपोवन परिसराचे वातावरण दुपारनंतर आणखी खराब झाले आहे. परिसर ढगाळ आहे. पाऊस झाला नसला तरी थंडी वाढली आहे. त्याचबरोबर बोगद्यातून मोडतोड हटवण्याचे कामही सुरू आहे.…
Tumblr media
View On WordPress
#ishषीगंगा वीज प्रकल्प#आज उत्तराखंडची बातमी#आज भारतीय बातमी#आजची बातमी#आपत्ती#इंडिया न्यूज#उत्तराखंड#उत्तराखंड चामोली बातमी#उत्तराखंडखंड हिमनद ब्रेक न्यूज#उत्तराखंडखंड हिमनदी#उत्तराखंडखंड हिमनदीचा ब्रेक#उत्तराखंडखंड हिमनदीची बातमी#उत्तराखंडखंड हिमस्खलन#उत्तराखंडचा पूर#उत्तराखंडचा हिमनदी फुटला#उत्तराखंडची ताजी बातमी#उत्तराखंडची बातमी#उत्तराखंडमधील आपत्ती#उत्तराखंडमध्ये ग्लेशियर फुटला#उत्तराखंडमध्ये पूर#गूगल बातमी#ग्लेशियर क्रॅक झाला#चमोली#चमोली उत्तराखंड#चमोली जिल्हा#चमोली बातमी#चमोली हिंदी समचार#चमोलीमध्ये हिमस्खलन#चामोली ग्लेशियर ब्रेक#चामोली हिमनदी
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 February 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नई इथं युद्धादरम्यान वापरासाठीच्या सुसज्ज अशा अर्जुन- एम.के.- वन ए हा रणगाडा सशस्त्र सेना दलाकडे सुर्पूद केला. पंतप्रधान मोजी आज तामिळनाडूच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध विकास कामांचा शुभारंभ होणार असून यात चेन्नई मेट्रो रेल्वे टप्पा एक, रेल्वे विद्युतीकरण, नविन रेल्वे मार्ग, जलसंधारणासाठीच्या महत्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंध्र प्रदेशात कर्नूल जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुःखाच्या या क्षणी आपण मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस-ट्रक यांच्यात हा आज पहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्ह्यात मदारपूर गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते.
****
देशातल्या आरोग्य सेवकांना कालपासून कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीला ज्यांना पहिली मात्रा देण्यात आली होती, त्यांना काल दुसरी मात्रा देण्यात आली. या लसीची दुसरी मात्रा २८ दिवसांच्या अंतरानं दिली जाते.  काल एका दिवसात ३५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून चार लाख, ६२ हजार, ६३७ जणांना लस दिल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत देशभरात ८० लाख, ५२ हजार लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
****
दरम्यान, राज्यात काल संध्याकाळपर्यंत ६९२ लसीकरण केंद्रामधून एकूण ३१ हजार ९७६ लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ६ लाख ८३ हजार चार इतकी झाली आहे.
३१ हजार ८२८ लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड तर १४८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
****
चालू खरीप हंगामात केंद्र सरकारनं केलेल्या शेतमाल खरेदीतून किमान एक लाख, वीस हजार कोटी रुपयांच्या आधारभूत किंमतीचा ९१ लाखांहून अधिक धान्य उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकार सध्या अस्तित्त्वात असलेल्या किमान विक्री मूल्य- एम. एस. पी. योजनांच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमतीत दरानं शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी करत असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तमिळनाडू, चंदीगड, जम्मू-कश्मीरसह एकंदर २१ राज्यांमधून ६३८ लाख टनाहून अधिक धान्याची खरेदी करण्यात आली आहे. सरकारनं आपल्या मध्यवर्ती संस्थांमार्फत तीन लाख, ९ हजार टन मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनची खरेदी केली. यामुळे एक लाख ६७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे
****
दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या काळात डाळींच्या शंभराहून अधिक सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती विकसित झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. जागतिक डाळ दिवसानिमित्त “ रोम इथं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. गेल्या पाच ते सहा वर्षांत भारतानं डाळीचं उत्पादन १४० लाख टनांवरून २४० लाख टनांपर्यंत वाढवलं असल्याचं तोमर यांनी यावेळी सांगितलं.
****
भारत -इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या आपल्या पहिल्या डावात ५ बाद ७६ धावा झाल्या आहेत. आज भारतानं ६ बाद ३०० धावांवरुन पुढे खेळ सुरू केला. मात्र अवघ्या २९ धावांची भर घालत भारताचा सर्व संघ तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या इग्लंडच्या संघाचीही सुरूवात निराशाजनक झाली. पाच फलंदाज बाद झाले असून दोन फलंदाज रविचंद्रन अश्विननं तर अक्षर पटेल आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एका फलंदाजास बाद केले. चार सामन्यांच्या या मालिकेत इग्लंड एक शुन्यनं आघाडीवर असून जागतिक कसोटी क्रमवारी तालिकेत अव्वल स्थान���वर आहे.
****
राज्यभरात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस त्यानंतर बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे. येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कोकण वगळता मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यात तापमानातही अपेक्षित वाढ सुरू झाली असून आगमी ३६ तासांत दोन अंशांची तापमान वाढ अपेक्षित आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या येळेगाव इथं भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यची २७ वी वार्षिक सभा काल झाली. या सभेला संबोधित करतांना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला असल्याची टीका केली.
****
नांदेड इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर काल शिव जयंती उत्सव मिरवणुकांसंदर्भात राज्य शासनानं घातलेल्या विविध अटी मागे घेण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आलं.
***///***
0 notes
amhikastkar · 4 years ago
Text
उत्तर भारतातील सखल भागात थंडीची लाट 
नवी दिल्ली : उत्तर भारतातील सखल भागात येत्या चार दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यादरम्यान किमान तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पंजाब, हरियानाचा काही भाग, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे गारठा वाढू शकतो.  माउंट आबूसह राजस्थानात अनेक जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडत आहे. माउंट आबूत चोवीस तासात किमान तापमान अडीच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 26 November 2020 Time 13.00 to 13.05 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० ****
संविधान दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं. २६ नोव्हेंबर १९४९ ला देशाच्या संविधान सभेनं संविधानाचा स्वीकार केला होता, हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झालं.
****
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारावा स्मृतीदिन पाळण्यात येत आहे. पाकिस्तानातल्या लष्कर- ए- तय्यबा या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या या हल्ल्यात १६० हून अधिक व्यक्तींचा बळी गेला होता. या हल्ल्यात बळी पडलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतल्या पोलीस मुख्यालयात अलिकडेच बांधण्यात आलेल्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम होणार आहे. मात्र कोरोना विषाणू साथीच्या पार्श्र्वभूमीवर लोकांना मर्यादित संख्येतच या कार्यक्रमात उपस्थित राहता येईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर मंत्र्यांनी या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
कोविड रुग्णांची संख्या सलग १८ व्या दिवशी ५० हजारांपेक्षा कमी राखण्यात भारताला यश आलं आहे. काल दिवसभरात ४४ हजार ४८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५२४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ९२ लाख ६६ हजार ७०६ झाली आहे, तर मृतांचा आकडा एक लाख ३५ हजार २२३ इतका आहे. काल ३६ हजार ३६७ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८६ लाख ७९ हजार १३८ रुग्ण बरे झाले असून, सध्या ��ार लाख ५२ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक सात दोन टक्के तर मृत्यूदर एक पूर्णांक चार सहा टक्के इतका आहे.
****
देशात चालू खरीप विपणन हंगामात ३०४ लाख टन धानाची खरेदी करण्यात आल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी १७ पूर्णांक आठ दोन टक्के अधिक आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगढ, जम्मू काश्मीर, केरळ, गुजरात आणि आंध्र प्रदेशात धान खरेदी योग्य रितीने सुरु असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.
****
लँडलाईन फोनवरुन मोबाईलवर फोन करण्यासाठी संबंधित नंबरच्या आधी शून्य लावावा लागणार असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं सांगितलं. पुढच्या वर्षी १५ जानेवारीपासून हा बदल लागू होईल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं. लँडलाईन वरुन लँडलाईनवर आणि मोबाईल वरुन लँडलाईनवर फोन करण्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं.
****
शेतकरी विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला २५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असं शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्य शासनाच्या वतीनं संत साहित्य तसंच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१९-२० चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे. कार्तिकी एकादशीचं औचित्य साधून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली. संत साहित्याविषयी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेलं मानवतावादी कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं दर वर्षी ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारा’नं सन्मानित केलं जातं. पाच लाख रुपये, मानपत्र तसंच मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे. ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपूर इथल्या तनपुरे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून, वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. साने गुरुजींपासून ते डॉ.दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचं साहचर्य राहिलं आहे.
****
सातार्याहून मुंबईकडे जाणारया एस. ��ी. बसला मुंबई - पुणे दृतगती मार्गावर आज पहाटे अपघात झाला. यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. मृत व्यक्ती मुंबईतला बेस्ट कर्मचारी असल्याचं समजतं. बसने पाठीमागून एका अज्ञात वाहनास धडक दिल्यानं हा अपघात झाला.
****
निवार चक्रीवादळ काल रात्री तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर धडकलं असून, चेन्नईसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. सहा तासानंतर चक्रीवादळाचा जोर कमी होईल, मात्र याचा प्रभाव म्हणून १५ तास पाऊस पडत राहील, असं हवामान विभागानं सांगितलं.
****
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 September 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ सप्टेंबर २०२० दुपारी १.०० वा. ****
कृषी सुधारणा कायद्याला विरोध करणारे लोक शेतकरी विरोधी असून, त्यांना दलालांचा विकास हवा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज उत्तराखंड राज्यात ‘नमामी गंगे मोहिमे��अंतर्गत ६ मोठ्या योजनांचा दूरदृश्य संवाद पद्धतीने प्रारंभ केल्यानंतर बोलत होते. या नव्या कायद्यांमुळे अनेकांचा काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्यानं, ते या कायद्यांना विरोध करत असल्याचं, मोदी यांनी नमूद केलं. काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत, ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत, असं मोदी म्हणाले. दरम्यान, नमामी गंगे अभियान हे देशातलं सर्वात व्यापक नदी संरक्षण अभियान असल्याचं, ते म्हणाले. जलजीवन मिशनच्या बोधचिन्हाचं तसंच या मिशनअंतर्गत ग्रामपंचायती तसंच पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचंही पंतप्रधानांनी अनावरण केलं.  
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वनाधिकार अधिनियम २००६ मध्ये बदल करीत अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी कुटुंबांना निवासालगतच्या वनक्षेत्रात घरे बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. सदर अधिसूचनेमुळे अनुसूचित क्षेत्रात परंपरेने राहत असलेले वननिवासी तसेच अनुसूचित जमातीतील लोकांना दिलासा मिळणार असून त्यांचे मूळ गावातून स्थलांतर कमी हाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
****
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून लवकरच जनतेच्या सेवेत हजर होऊ असं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार ५५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईत रुग्णांची संख्या २ लाख ७७५ झाली असून एकूण मृतांचा आकडा ८ हजार ८३१ वर पोहचला आहे
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार १७४ झाली आहे. यापैकी २६ हजार ३५९ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ५ हजार २३४ झाली असून त्यापैकी ४ हजार ३९५ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २२२ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ६१७ जणांवर उपचार सुरु आहेत.  
****
बालिका योजनेच्या नावाखाली गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी केंद्र शासनातर्फे पन्नास हजार रूपये देण्याची योजना असल्याचं वृत्त एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालं होतं. ही बातमी चुकीची असून अशी कोणतीही योजना आणली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयाकडून सांगण्या�� आलं आहे.
****
अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे अंमली पदार्थांचे व्यवहार करणाऱ्या गटाचे सक्रीय स���स्य असल्यानं, या प्रकरणात त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबीने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. याबाबतचं एक शपथपत्र एनसीबीने न्यायालयात सादर केलं आहे. या दोघांनी अंमली पदार्थ व्यवहारांना उत्तेजन दिलं असून, पैसाही पुरवला असल्याचं, या शपथपत्रात म्हटलं आहे. रिया आणि शौविक या दोघांनाही या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीने अटक केली होती, सध्या हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.
****
मुंबईत सचिवालयानजिकच्या आमदार निवासात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आल्यानं, हे आमदार निवास काल रात्री तत्काळ रिकामं करण्यात आलं. या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर कोठेही बॉम्ब आढळला नाही, त्यामुळे ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पोषण आहार योजने अंतर्गत सांगली जिल्ह्यात महापालिका शाळेत वितरित करण्यात येत असलेला डाळीचा साठा अन्न आणि औषध विभागाने जप्त केला आहे. शालेय मुलांना देण्यात येणारी हरभरा आणि मूग डाळ निकृष्ट प्रतीची असून ती अप्रमाणित असल्याचं लक्षात आल्यानंतर अन्न आणि औषध विभागाने महापालिकेच्या शाळा क्रमांक तीन मध्ये छापा टाकून या डाळीचा साठा जप्त केला.
****
येत्या दोन दिवसांत देशातल्या नैऋत्य मोसमी पावसाची परतीच्या प्रवासाला उत्तर भारतातून सुरुवात होईल, अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या वर्षीच्या एकूण मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.  
****
0 notes