#जमलं
Explore tagged Tumblr posts
ashokjagharkar · 1 year ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४८
मोबाईलवर आलेला काॅल मनोरमाचा आहे हे बघितल्यावर तो घेत शुभदाने चेष्टेच्या सूरांत विचारलं, "भर दुपारी जरा विश्रांती घ्यायचं सोडून फोन कसले करतेस ग?" "तुझ्या विश्रांतीमधे खोडा घातला असेल तर माफ कर;-- पण तुला वेळ असेल तर भेंटायचं होतं म्हणून विचारायला फोन केला होता! पण माझ्यासोबत आणखीही कुणीतरी असेल!" "मी मोकळीच आहे;-- त्यामुळे केव्हांही भेटूं शकतो! पण अशी कोड्यांत बोलूं नको! तुझ्यासोबत कोण येणार आहे ते सरळ सांगून टाक!" "सुहासिनी!" आश्चर्याच्या धक्क्यातून स्वत:ला सांवरीत शुभदा म्हणाली, " खरं सांगतेस? पण डाॅक्टरांनी मॅडमना बाहेर पडायची परवानगी कशी काय दिली?" "डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच सुहासिनीला घडल्या प्रकारातून लौकरांत लौकर बाहेर काढायचे प्रयत्न चालले आहेत! म्हणून तुला मुद्दाम सांगायला फोन केला की तिच्याशी गप्पा मारतांना गेल्या शुक्रवारी जे घडलं त्याचा विषयही काढायचा नाहीं! जणूं कांही घडलंच नाहीं अशा प्रकारे वागायचं-बोलायचं! अशक्तपणामुळे ती घेरी येऊन पडली आणि तिला लागलं असं तिच्या मनावर ठसवायचे हे प्रयत्न आहेत!" मनोरमाच्या विस्तृत खुलाशाने समाधान न होऊन शुभदाने शंका विचारली, "पण आपण कितीही सांगीतलं तरी मॅडमना हे पटेल कां? आणि त्यांनी लिहून ठेवलेली ती चिठ्ठी?" "ती चिठ्ठी भाऊसाहेबांनी फाडून नाहींशी केली आहे! सुहासिनीने चिठ्ठीचा विषय काढला तर 'पॅरॅलिसिसचा झटका येतां येतां आपण मुश्किलीने वाचलो' याच्या घबराटीतून जवळजवळ ३ महिने अंथरूण धरल्याने ��ुला नाहीं ते भास होत आहेत' असं सांगायचं ठरलं आहे! तिच्या वांट्याला आलेल्या सक्तीच्या एकटेपणावर उपाय म्हणून तिला चार माणसांत घेऊन जायला सुरुवात केली आहे! काल संध्याकाळी सारसबागेत गणपतीचे दर्शन घेऊन, तिथेच थोडा वेळ बसून आम्ही चौघेजण मग जरा चेंज म्हणून बाहेर हाॅटेलमधे जेवायला गेलो होतो!" "तुमचे हे प्रयत्न यशस्वी ठरावेत असंच मलाही वाटतं!" शुभदा म्हणाली, "बरं, तुम्ही येणार आहांत तर कांही खायला करून ठेवूं कां?" 'अजिबात नाही! आम्ही अचानक आलो असं भासवायचं आहे ना! तुझ्याकडे जायचं आहे हे अजून सुहासिनीलाही सांगितलेलं नाहीं! आम्ही आल्यावर बघूं;--- गप्पांच्या ओघांत तिलाच विचारून काय जमेल ते कर!" "किती वेळांत याल?" "आपला हा काॅल संपला की मी लगेच सुहासिनीकडे जाणार आहे! त्यामुळे तिच्याकडून तुझ्या घरी येईपर्यंत एकुण तासभर तरी लागेल!"
अनंत घरी परत आला तेव्हां संध्याकाळी ७ वाजूून गेले होते. तो फ्रेश होऊन कीचनमधे येऊन बसला तशी त्याच्या पुढे गरमागरम चहाचा कप ठेवीत शुभदा म्हणाली, "बाहेर कांही खाऊन आला असाल तर किती भूक आहे ते सांगा. मी त्याप्रमाणे जेवणाची तयारी करीन." "असा कसा मी बाहेर कांही खाऊन येईन?" अनंत डोळे मिचकावीत म्हणाला, "सप्रेमॅडमसाठी तूं खास कांहीतरी बनवलं असशील त्याला मग उचित न्याय कोण देणार? मला तर आता सणसणून भूक लागली आहे!" "म्हणजे त्या येणार आहेत हे तुम्हांला ठाऊक होतं?" चकीत होऊन शुभदाने विचारलं, "मग मला कां सांगीतलं नाहीं?" "नाहीं,नाहीं! जेवण झाल्यावर मी मनोहरपंतांबरोबर 'स्वयंसिद्ध'च्या कामासाठी बाहेर पडलो, तेव्हां मला कांहीच कल्पना नव्हती. पण वाटेमधे त्यांनी आज मनोरमावहिनी आपल्या घरीं सप्रेमॅडमना कशासाठी घेऊन येणार आहेत ते मला सविस्तर सांगीतलं! कित्येक महिन्यांनी तुम्ही भेटला असाल ना? आतां कशी आहे त्यांची तब्येत?" "जयू परत गेल्यावर मध्यंतरी २ वेळां कांंही कारणा-निमित्ताने आमची ओझरती भेट झाली होती;-- पण मोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी हवा तो वेळ मात्र आजच मिळाला! मोठ्या शर्थीने परतवून लावलेल्या, आकस्मिक पॅरॅलिसिसच्या झटक्याच्या चालण्या-बोलण्यांत आढळणाऱ्या पुसट खुणा वगळतां त्यांची तब्येत चांगली वाटली! मुख्य म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न झालाच नाहीं असं चित्र उभं करण्याचे सर्वांचे आटोकाट प्रयत्न यशस्वी होताहेत असं खात्रीने जाणवलं!" "ते कसं काय?" "अहो, मॅडम नेहमींच्या मोकळेपणाने सर्व चालूं घडामोडींबद्दल खेळीमेळीने भाष्य करीत होत्या! जयूने मागच्या भेटीनंतर त्यांच्याशी संपर्क ठेवला असल्याचंही त्यांच्या बोलण्यात आलं! पण अलीकडे दीर्घ आजारपणामुळे त्यांनाच उत्तरादाखल मेल पाठवतां आली नाही म्हणाल्या! त्यामुळे तिच्या सध्यांच्या हालहवालीची त्यांनी खुप आपुलकीने चौकशी केली! त्या अजूनही जयूचा उल्लेख प्रेमाने 'बबली' असाच करतात बरं कां!" "अरे वा! कांही म्हण, पण आपल्या जयूवर खरंच जीव आहे त्यांचा!" कौतुकाने मान डोलावीत अनंत म्हणाला, "जयूला त्यांच्या अलीकडच्या आजारपणाबद्दल माहीत नसणार! आतां तिचा फोन येईल तेव्हां तिला थोडक्यांत कल्पना दे, म्हणजे ती संपर्क साधेल! जमलं तर सरप्राईज म्हणून मॅडमना व्हिडिओ काॅल कर असं सांगायला हवं जयूला" "खरंच, 'बबलीचा काॅल आला!' म्हणून किती हरखून जातील मॅडम!" मनोमन कल्पनाचित्र रंगवीत शुभदा उत्साहाने म्हणाली, "नक्की सुचवूंया आपण जयूला मॅडमना व्हिडिओ काॅल करण्याबद्दल! पण मला आतां सांगताहांत, त्याची आठवण करून द्यायचं तुम्हीही लक्षांत ठेवा! नाहींतर जयूचा फोन आला की बाकी सगळं बोलतांना, तिला 'मॅडमना व्हिडिओ काॅल कर' असं सांगायचं नेमकं राहून जायचं!" "मनोहरपंतांच्या म्हणण्यानुसार डाॅक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबाबत खुद्द भाऊसाहेबही आधी साशंक होते! पण बायकोच्या तब्येतीमधे झपाट्याने झालेली सुधारणा पाहून त्यांचाही उत्साह आतां दुणावला आहे! विशेषत: घडल्या प्रकाराबाबत गिरीश आणि शिरीष कसे वागतील, या भीतीचं दडपण, त्या दोघांना वकीलसाहेबांनी दिलेल्या जमालगोट्यामुळे पुरतं नाहींसं झाल्याने ते आतां आम्हां सर्व मित्रमंडळींशी खुप मोकळेपणाने बोलूं लागले आहेत!!"
२० जुलै २०२३
0 notes
nirannjan17 · 1 year ago
Text
कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने.ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा,आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे..पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे श��्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे..!
"सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
N_D_PATIL_22
0 notes
namrata16 · 2 years ago
Text
हल्ली घड्याळाच्या गजराची गरज नाही वाटत....
दिपाचं ही तसंच काहीसं झालं होतं..रोज सकाळी 6 ला उठायचं...उठल्यावर मनात एकच प्रश्न आज जेवायला काय बनवायचं ..बहूूधा हा प्रश्न सगळ्यांच बायकांना पडत असेल नाहींका...तेेव्हढयात,अग थांब मी तुला भाजी कट करून देेेतो समीर डोळे चोळतच किचन मध्ये येेेतो...प्रत्येक नवऱ्याने जर असाच विचार करून घर कामात मदत केली तर सगळं किती सोपं होईल ना...दोघांंचा टिफिन भरून तिची ऑफीस ला जायची तैयारी..दिपाचं हे रोजचं ठरलेल वेळापत्रक...तसा समीर तिला मदत करायचा पण त्याच आपलं हळूहळू चाललेलं असायचं...
अरे समीर तेवढं लाईट बिल भरलंस का रे..तेवढं आज भरून घे...अरे हो आणी वेेळ मिळेल तसा गॅसचा नंबर पण लावून घे...घाई घाईत च दिपा समीर ला बोलुन निघाली...घड्याळात 7 वाजून 5 मिनिटे झाली...तशी ती पटापट पायऱ्या उतरत विचार करत होती...आज 7:15 ची लोकल चुकते की काय...आणि मग उशीर झाला की पुढे बस चुकेेेल...आणी लेट पचिंग...या महिन्यात ला हा दुसरा लेट मार्क...असा विचार रोजच तिच्या मनात येेेई...मग तशी तिची पाऊले अजून वेगाने रिक्षा च्या दिशेने जाई...कशीबशी station ला आल्यावर घड्याळात बघितलं 7:12 हुश्श...अजून 3 min आहेेेत लोकल यायला...तसा तिने जिना चढून प्लॅटफॉर्म 5 गाठला...एकदातरी माणसा ने मुंबई लोकल चा अनुभव घ्यावा तोही सकाळी 7 ते 10 आणि संंध्याकाळी 5 ते 8...अबब!! केवढी ही माणसांची गर्दी...
एका साखरेच्या कणाला शे दोनशे मुंग्यानी ओढत घेऊन जावंं अगदी तशीच.....तेेव्हढयात अनौनसमेंट होते ..."7 वाजून 15 मिनिटांची..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जाणारी 15 डब्यांची जलद लोकल थोड्याच वेळात प्लँटफॉर्म क्रमांक 5 वर येेेत आहे..."तशी बॅग पुढे घेेेऊन सगळ्यांची लोकल मद्धे चढायाची घाई....चला आज पण लोकल मद्धे चढता आलं म्हणजे आपण आज वेळेत पोहचू.. एवढ्या गर्दी मद्धे पण लोकल मद्धे चढता येणं म्हणजे एक कलाच आहे बरं का ही मुंबईकरांची...त्याहून पुढे म्हणजे, बसायला सीट मिळाली तर...कुणाला पारितोषिक मिळण्या इतका आनंद कुठे नाही...एकमेकांना ढकलून पुढें चढणारे पण हेच आणि कुणाला मद्धेच चक्कर आली की पाणी बिस्कीट देेनारे पण हेेे��! 
"आज माझ्या मुलांची परीक्षा आहे रात्रभर त्याचा अभ्यास घेत होते" .."अग, माझ्या पण मुलीची तब्बे्त ठीक नाही ..माझीही झोप झाली नाही ग " ..."उद्या मुलांच्या शाळेत मीटिंग आहे ..."अग माझ्या घरी लग्न आहे "..."माझ्या घरी पाहुणे येणार आहेेेत...""या सगळ्या बायकांंच्या गप्पा ...
रो....ज कानावर येई...पण खरंच कमाल आहे ना या सगळ्या बायकांंची....multitasking म्हणतात ना ते हेेंच!! कसं काय जमतं ना या बायकांना हा विचार रोज थक्क करूूून जाई... आणि दिवस भर काम करण्याची प्रेरणा पण देई...
एवढं करून ही ह्या प्रत्येकी आपआपल्या कामात निपुण, अत्यंत प्रामाणिक, चिकाटी आणि धाडसी सुध्दा बरं का !!हे झालं दिपाच...पण संसाराचा ब्यालन्स करण्यासाठी सर्वच स्त्रीयांना खुप मेहनत घ्यावी लागते..
वाटेवर कुठेतरी मग आपल्याला आई वडिलांची प्रत्येक क्षणी जाणीव होते...त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची, त्यांनी पार पाडलेेल्या प्रत्येक जबाबदारी ची....संसाराची गाडी पुढें नेेत असताना आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार तर होत नाही ना याची वेळोवेळी खबरदारी घेतलेली...कसंंकाय जमलं बाबा यांंना हे सगळं ...आणि परत या विचाराने नवीन काहीतरी करण्याची उम्मीद निर्माण होते...
परिस्थिती माणसाला सर्वकाही करायला शिकवते हे चांगलं समजलं होतं...कोणत्याही कामाची लाज वाटू नये...प्रामाणिक पणे केलेल्या कामात यश नक्कीच मिळते ही माझ्या वडिलांची शिकवण...यात उत्त्त्तम साथ दिली ती माझ्या आईने...time managment शिकावं तर या सगळ्या बायकांकढुन...दिपा लाही हळू हळू हे सगळं जमायला लागलं होतं..शेवटी म्हणातात ना ,"अनुभवाचे बोल "
आपल्याला नेहमीच असं सांगितलं जातं ,लग्न म्हणजे संसार रुपी रथ...या रथाची दोन चाके म्हणजे नवरा-बायको...आणि या रथाचा वेग कायम राखण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित असावी लागतात...तरच संसार टिकतो.. अगदी बरोबर...पण व्यवस्थित म्हणजे नेमकं काय...तर जेंव्हा ही दोन्ही चाके बॅलन्स मद्धे असतील ...एकमेकांना घट्ट पकडून धरतील...कुणा एकाचा तोल जात असेेेल तर त्याला वेळीच सावरतील...
आणि हा बॅलन्स म्हणजे एकमेकांबद्दल चा"आदर"....एकमेकांप्रती असणारा " विश्वास"...आणि अर्थातच "प्रेम"...तर हवेच...
कुठल्याही नात्यात प्रेम असेल तरचं ते नातं टिकत हे अगदी खरं आहे....
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो...नवरा-बायको जरी एक ����ले तरी माणूस म्हणून ही दोन विभिन्न व्यक्तीमत्त्वे असतात...त्यामुळे प्रत्येकाचे मत वेगवेेेगळे असू शकते...म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करायला शिका...
आपल्या समाजात विशेषतः भारतीय कुटुंबात
एक विरोधाभास दिसून येतो...मुलांना शिस्त लावण्यावर जास्त कष्ट घेतले जात नाहीत पण मुलींना मात्र उठता बसता शिस्त शिकवली जाते...एकींकडे आपण स्त्री-पुरुष समानता मानतो आणि आपल्याच घरात आपण मुलांना आणि मुलीना वेगळी वागणूक देतो...स्वयंपाक घरातली कामे फक्त मुलींनी च केली पाहीजे अशी
एक चुकीची प्रथा आपल्या कडे आहे...आता हळूहळू सुशिक्षित समाज होत चालल्याने ही प्रथा बदलत आहे..
प्रत्यकाने आत्मनिर्भर झालंच पाहिजे..
त्यासाठी मुलांना आणि मुलींना लहानपणा पासुनच स्वतःची कामे स्वतः करायला शिकवलं पाहिजे...
आणि या काळातील अतिशय मौल्यावान आणि महत्त्वाची शिकवण जी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना द्यायला हवी ती म्हणजे प्रत्येक स्त्री चा "आदर..."।। मुलगा-मुलगी समान म्हणार्यांनी केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून स्त्री-भ्रूण हत्या करणारे ...खरंच लाज वाटते अशा लोकांची ...मुलगा पण हवाच की...पण हा पण तुमच्याच हाडा मांसा चा
गोळा आहे....यासाठी आधी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री ने तिची मानसिकता बदलली पाहिजे... तिला रडायला नाही लढायला शिकवा...तिला वाट्टेल तसं जगू द्यात..हा खुला आसमंत तिचा पण आहे तिला हवं तसं वावरू दयात....
यामुळे स्त्रीयांवरील अत्याचार आपसूकच कमी होतील..
आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे...कुणी वैज्ञानिक कुणी डॉक्टर कुणी इंजिनिअर कोणी पोलिस कोणी शिक्षक कोणी नर्स कोणी वकील..अजून बऱ्याच क्षेत्रात...पण प्रत्येक घराला स्वर्ग बनवणारी फक्त फक्त ही स्त्री च !!त्यामुळे प्रत्येक स्त्री ला माझा मानाचा मुजरा !!!
'उठ नारी,...तू प्रेम आहेस...तू आस्था आहेस... तू विश्वास आहेस
 तू माता आहेस...जननी आहेस...भगीनी आहेस
तू आधार आहेस...तू नवी उम्मीद आहेस...तू आशेचा किरण आहेस...
उठ,तुझं अस्तित्व सांभाळ...तुझं कर्तृत्व खूप मोठं आहे.. आणी एक नाही प्रत्येक दिवस हा नारी दिवस बनव...
शेवटी विसरू नकोस तू एक "रणरागिणी" आहेस...!!!!
☺☺
नम्रता देशमाने-जैन
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Bharat Jodo: राजीव गांधींना जमलं, ते राहुल यांना जमेल का?; काँग्रेसची परंपरा काय सांगते? पाहा!
Bharat Jodo: राजीव गांधींना जमलं, ते राहुल यांना जमेल का?; काँग्रेसची परंपरा काय सांगते? पाहा!
Bharat Jodo: राजीव गांधींना जमलं, ते राहुल यांना जमेल का?; काँग्रेसची परंपरा काय सांगते? पाहा! Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासातील सर्वात लांब ‘भारत जोडो यात्रेची’ सुरुवात राहुल गांधींनी केली आहे. परंतु कॉंग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं यात्रा आखण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासातील सर्वात लांब ‘भारत जोडो यात्रेची’ सुरुवात राहुल गांधींनी केली…
View On WordPress
0 notes
akankshawritesstuff-blog · 5 years ago
Text
Tumblr media
माझ्या आठवणीतील वारी.🚩🚩
दर वर्षी शेकडो लोक ही पंढरपूरची वारी करतात. पंढरपूरची वारी करणे म्हणजे आपल्या घरातून निघून पायी चालत पंढरपूरला आपल्या आवडत्या विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला जाणे. भरपूर मैलाचा प्रवास. पण थकेल तो वारकरी कसला. संपूर्ण प्रवासात, फक्त दोन जोडी कपडे घेऊन वाटेत मिळेल ते खाउन, रात्री जागा मिळेल तिथे पाठ टेकवून हा वारकरी हरी नामाचा जप करत फक्त पुढे चालत राहतो. प्रत्येकाच्या तनात, मनात, ह्रदयात फक्त विठ्ठल कोरलेला असतो. मी हे वर्णन कुठे वाचून नाही तर स्वतःच्या अनुभवावरून लिहीत आहे. मी आजपर्यंत तिनदा आळंदी ते पुणे असा २५ मैलाचा (इतर वारकऱ्यांच्या तुलनेने) छोटा वारी प्रवास केलाय. खरंतर वारीची आणि माझी ओळख माझ्या शाळेमुळे, मी आठवीत असताना झाली. तेव्हा मी माझी पहिली वारी केली. त्यावेळी फार कळत नव्हतं पण आम्ही ४० लहान मैत्रीणी एवढा मोठा प्रवास करणार, तेही शाळे अंतर्गत यातच एक thrill होतं. मला आठवतंय, एका वारीला आम्ही मुलींनी वाटेतील कचरा, कागद, केळीचे सालं, plastic च्या पिशव्या हे सगळं उचलून माउलींसा��ी वाट स्वच्छ केली. ८वी व ९वीत तुलनेने कमी अंतर पार केलं. १०वीत आळंदी ते पुणे अशी वारी केली. त्यानंतर २०१८ व २०१९ या दोन वर्षी देखील आळंदी ते पुणे असा प्रवास झाला. या संपूर्ण प्रवासात खूप वेगवेगळे अनुभव आले. इथे सगळेजण भेटणाऱ्या प्रत्येकाला 'माउली' अशी हाक मारतात. कारण देव कधी कुठे कसा व कुणाच्या रूपात भेटायला येईल हे सांगता येत नाही. या प्रवासात वेगवेगळ्या दिंडीतील वारकर्यांशी बोलण्याचा अनुभव देखील खूप काही सहज शिकवून गेला. एकदा एक आजी आपल्या ३ वर्षाच्या नातवाला सोबत घेऊन आलेली, कारण नातवाने सोबत यायचा हट्ट केला. आता एवढ्या प्रवासात जिथे या वयात स्वतःला सांभाळण अवघड, तिथे ही आजी आपल्या नातवाला बरोबर घेऊन आलेली. जसं जमेल तसं चालत नाहीतर नातवाला कडेवर घेऊन ही माउली पुढे चालत राहीली. एक काका घरची शेतीची सर्व कामं मार्गाला लाउन पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले. काही जणांच्या पायात फाटक्या चपला व काहींच्या पायात तर त्याही नाहीत, पण मनातील हरीभक्ती व विठुरायाला भेटायची इच्छा तेवढी दांडगी. इथे एकात्मतेचं जे दर्शन होईल ते इतरत्र कुठेही होणार नाही. गरीब - श्रीमंत, जात-पात, धर्म-पंथ, आपला- परका असा कुठलाच भेद इथे पहायला मिळणार नाही. इथे दिसतील ते फक्त भक्तीरसात न्हाऊन निघालेले हे लक्ष दशलक्ष वारकरी. उन, वारा, पाउस, दगड, चिखल, काटे, माती या कशाचीच पर्वा न करता प्रसंगी एकमेकांना मदत करत, उभारी देत ही यात्रा अखंड चालत राहते. ती थेट आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाउन थांबते. या यात्रेत वाटेत भजन, हरीनामाचा जप, कथा, मुक्कामी किर्तन असे विविध कार्यक्रम चालू असतात. वाटेतील लोकसुद्धा आपापल्या परीने जमेल तशी या वारकऱ्यांची सेवा करतात. या वर्षी जमलं तर आळंदी ते पंढरपूर, अथवा पुणे ते पंढरपूर अशी वारी करण्याची माझी मनापासून इच्छा होती. परंतु ह्या lockdown मुळे ते काही जमले नाही. माझा इतर वेळी देवावर फारसा विश्वास नाही, पण वारी म्हटलं की आवर्जून जावसं वाटतं, आणि याचं मला नेहमी आश्चर्य वाटत राहतं.
असो. वारीतील अनुभव, किस्से यासाठी हे व्यासपीठ पुरणारच नाही. बाकीचे अनुभव पुन्हा कधीतरी सांगीन. शेवटी आम्हाला शाळेत (आषाढी एकादशीच्या निमित्ताने) शिकवल���ल्या व मला आवडलेल्या एका अभंगांच्या चार ओळी लिहिते आणि थांबते.
तुझी आण वाहीन गा देवराया ।
बहु आवडसि जिवांपासुनियां ॥१॥
कानडिया विठोबा कानडिया ।
बहु आवडसि जीवापासूनियां ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु राया ।
बहु आवडसि जीवांपासूनियां ॥३॥
2 notes · View notes
aptedhruv21 · 6 years ago
Text
MSD
MSD,
खरं सांगू का, वर्ल्डकपमधल्या तुझ्या खेळींनी आम्ही गोंधळून गेलोय. पण तरीही आम्हाला तू हवा आहेस. स्टंपच्या मागचे तुझे चाणाक्ष डोळे आम्हाला हवे आहेत. 
तू काल म्हणालास, People want me to retire before Sri Lanka Match आणि खरंच वाईट वाटलं लेका. म्हणजे ज्या माणसाने क्रिकेट विश्वातील प्रत्येक ट्रॉफी भारतात आणली, त्याला हाकलण्याची एवढी घाई झाली आम्हाला???
अजूनही २००७चा T20 वर्ल्डकप आठवतो. अगदी क्रिकेट त���्ञाला देखील आपण जिंकू असं वाटलं नव्हतं. पण तू आलास आणि सगळंच बदलून टाकलंस रे मित्रा...
एकतर सचिन- द्रविड- गांगुलीला घरी बसवून पूर्ण नवखा संघ घेऊन तू दक्षिण आफ्रिकेत गेला होतास. त्याआधीच काही महिने झालेल्या ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्ये आपण हाग्या मार खाल्ला होता. पण तू अशक्य निर्णय घेऊन भारतीयांना जिंकायची चटक लावलीस.
गांगुली महान होताच. पण भारताला ज्या जिंकणाऱ्या कर्णधाराची गरज होती, ती गरज तू पूर्ण केलीस.
तसे आम्ही सचिन घराण्याचे. सचिनच्या वरचढ कोणी होऊ पाहिलं कि आम्हाला नाही म्हणलं तरी पोटात गोळा येतो. अगदी कोहलीच शतकानंतर शतकं ठोकतो, तेव्हा अर्ध्या मनात सचिनचे विक्रम मोडीत निघणार याचं दुःख असतंच. 
पण तू आम्हालाही खिशात घातलंस. २०११च्या वर्ल्डकप आधी एका पत्रकार परिषदेत तू सांगितलं होतंस, We want to win this World Cup for Sachin. आणि तू ते करुन दाखवलंस. 
होय!
त्या वर्ल्डकपचं सगळं क्रेडिट तुझंच आहे...
युवराजची अष्टपैलू कामगिरी, सचिनची शतकं, झहिर आणि अश्र्विनची गोलंदाजी, गंभीरची ९७ धावांची खेळी.. सगळं सगळं ठिक आहे...
पण तुझा परिस स्पर्श नसता.. तर हे सगळं फिकं पडलं असतं.
तुला लोक म्हणाले, की हा रानटी फलंदाज आहे...
याच्याकडे तंत्र नाही..
कसोटी क्रिकेट मध्ये तुझा टिकाव लागणार नाही...
मग तू काय केलंस?
कसोटी खेळलास... जिंकलास.. आणि भारताला पहिल्या क्रमांकाचा संघ बनवलास...
तोंडाने बोलून ऊत्तरं देणं तुला कधीच जमलं नाही...
तुझी बॅट आणि त्याहीपेक्षा जास्त तुझी कॅप्टनशीप सगळ्या टीकाकारांना ऊत्तर देत राहिली...
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीए का...
कॅप्टनशीप साठी तू तुझ्या अतिशय प्रिय बॅटिंगचा त्याग केलास.
आधी आपल्याकडे महान खेळाडू आहेतच की, ज्यांनी स्वतःच्या बॅटिंगसाठी कॅप्टनशीप सोडली. कितीही महान असले तरी त्यांचा हा स्वार्थीपणा कोण विसरेल?
काय धडाकेबाज फलंदाज होतास तू... बेधडक... बिनधास्त...
गोलंदाजांची पिसं काढणं, या शब्दाचा खरा अर्थ तू भारतीयांना शिकवलास..
पण वेळ आली, तेव्हा स्वतःला आवरतं घेत तू संघ एकत्र बांधलास... 
तुझा आणखी एक पैलू आहे, जो बापजन्मात एकाही भारतीय खेळाडूला जमला नव्हता...
Wicket Keeping...
आम्ही पहिल्यांदा डुल्या विकेट किपर म्हणत तुला हिणवलं...
पण त्याच टिकेला तू जगातला सर्वोत्तम विकेट किपर बनून ऊत्तर दिलंस...
आधी आपल्याकडे Option नाही, म्हणून कोणालातरी किपर म्हणून उभं करायचे...
पण गेली कित्येक वर्षं स्टंपच्या मागे उभं राहून तू राजासारखी हुकूमत गाजवत आहेस...
पण आम्ही नेहमीच तूला शिव्या दिल्या रे!
गांगुली- द्रविड- लक्ष्मणला बाहेर काढलं म्हणून शिव्या दिल्या...
युवराज- गंभीर- कैफ- पठाणला कुजवलं म्हणून शिव्या दिल्या...
तू तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंनाच संघात घेतोस म्हणत शिव्या दिल्या..
अगदी आजही आम्ही तुला शिव्या देत आहोत... वर्ल्डकप मारला तर तो फक्त तुझ्यामुळे असेल, असंही म्हणतोय आम्ही...
तुझ्या बॅटमधून धावा आटल्यात म्हणून तुला शिव्या देतोय...
पण तुला त्याचा फरक पडणार नाही...
कारण तुला हारणं ठाऊकच नाहीए... तू लढशील... आणि जिंकशील...
आणि जेव्हा जिंकशील तेव्हा आज तुला शिव्या देणारे, तुझं गुणगान गातील...
आणि तेव्हाच तू शांतपणे निघून जाशील... आणि आम्हाला तो दिवसच बघायचा नाहीए...
पाकिस्तानविरुद्ध शांतपणे तू २२ यार्डच्या मैदानात आलास...
आणि नंतर जो काय धुमाकूळ तू घातलास.. त्याला सीमाच नाही...
तुझा हेलिकॉप्टर शाॅट...तुझं चपळ Running between the wickets.. पापणी लवायच्या आत होणारे Stumpings... Computerised Reviews पेक्षा विश्वासार्ह Reviews...
श्रीलंकेविरुद्धच्या तुझ्या १८३ धावा, अजूनही डोळ्यासमोर आहेत...
तुला माहिती नसेल,
पण तुझ्यावर टीका करणारे अर्धे लोक मुंबई इंडियन्सचे समर्थक असतात...
केवळ, तुझा Midas Touch आमच्या मुंबईच्या Team ला मिळाला नाही, म्हणून त्यांचा राग आहे तुझ्यावर...
प्रेम रे.. दुसरं काय!
कोहलीपासून ते आत्ताच्या पांड्या- बुमराहपर्यंत तू सगळ्यांना घडवलं आहेस...
कोहली कॅप्टन असला, तरीही हुकूमत कोणाची आहे, हे न समजायला आम्ही वेडे नाही...
धोनी, तो कप आम्हाला तुझ्या हातात बघायचा आहे...
आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत...
आमच्या लाडक्या कॅप्टनला निराश झालेलं आम्हाला अजिबातच बघायचं नाहीए..
भले तुझ्यामुळे एखाददुसरा सामना आपण हारलो असू... पण त्यासाठी आम्ही तुला हाकलून शकत नाही...
तू खेळ, धोनी...
सचिनपण १००वं शतक साजरं करण्यासाठी रडत-खडत खेळत होता...
आम्ही त्याला सहन केलंच की...
तू तेवढा अट्टाहास करणार नाहीस.. याची आम्हाला चांगलीच खात्री आहे...
तू खेळ, धोनी...
तुला पाहिजे तेवढं खेळ...
आम्हा ९०च्या दशकातल्या मुलांचा तू शेवटचा Hero आहेस...
त��झी स्टाईल, तुझी ती २ लिटर दूध पिण्याची हवा, तुझा हेलिकॉप्टर शाॅट, तुझ्या स्टंपमागच्या धमाकेदार Comments.. एकेक करत तू आम्हाला खिशात टाकत गेलास..
फक्त क्रिकेटच नाही...
आयुष्यात कसं जिंकायचं हे आम्ही तुझ्याकडून शिकलोय... 
मगाशी एकाची पोस्ट वाचली...
Happy Birthday MSD.. All the best for couple of last matches of your career..
अरे हट्!
You deserve the best farewell than any other player..
कारण तुझ्यामुळेच आजची Indian Cricket Team जिंकते आहे...
So माही... खेळ तू...
कोणाच्याही अपेक्षांचं ओझं न घेता खेळ...
एकदा तुझा हरवलेला हेलिकॉप्टर शाॅट दिसू दे...
बऱ्याच दिवसात, 'माही मार रहा है' म्हणालो नाही... ते म्हणण्यासाठी सेमीफायनल आणि फायनल शिवाय दुसरा चांगला चान्स कधी असू शकतो...
बिनधास्त खेळ रे!
तू Winner आहेस.. असं निराश होऊन बसलेला बघण्याची सवय नाही आम्हाला...
आणि तुला ज्याक्षणी जावसं वाटेल त्याक्षणी तू निघून जा...
You came like a King..
You played like a King..
You fought like a King..
You won like a King..
म्हणूनच जावंसं वाटेल तेव्हाही तसाच जाशील..
Like the One True King..
1 note · View note
esprite-prash · 6 years ago
Text
Valentines च्या आधी...
कधी कधी प्रेमात असून पण आपल्याला आपल्या लोकांचा, त्यांच्या मनाचा सुगावा लागत नाही.. तेव्हा काय करायचं, का संपवायचे सगळे, कुठे चुकत आहोत, काही कळत नाही... आहेत असेच दोघे.. सांगत आहेत त्यांना काय वाटतय...
ती त्याच्यासाठी...
ती बघ पुन्हा एकदा उठतीये,
सांग ना तिला ती करू शकते...
बघ आणि सांभाळ तिला,
आठवण करून दे ती काय करू शकते...
अरेरे पडली ती, थांब...
लगेच नको सावरू वाट पहा,
अरे ते बघ उठली ती,
जमणार रे तिला पण सावरायची घाई नको...
तू चिडू नकोस रे, वेडी आहे ती.
तिला तू हवा आहेस; म्हणून तू सतत बरोबर राहू नकोस,
पण तुला भाव देत नाही म्हणून सोडून जाऊ नकोस..
ती काय कोडं आहे का नेहमी एकच उत्तर यायला,
अरे ती कविता आहे mood असेल तशी बदलायला...
म्हणून तुला सांगते, तिला सांभाळणं कठीण आहे..
पण ते जमलं, तर तिच्यासारखी दुसरी मिळणार नाही..
अरेरे पुन्हा पडली ती... आता
तू ठरवं काय करतोस??? सावरून बघतोस कि बघून सावरतोस.....
तो तिच्यासाठी...
तो असा आहे का,
तुला वाटतं तो तसा आहे..
���साही असू दे,
तुला तुझा वाटतो का??
म्हणजे तो म्हणाला आहे,
त्याला काही problem नाही..
पण तू विचारुन पाहिलसं का,
तुझी काही हरकत नाही ना..
म्हणालीस का त्याला तुला काय अडचण आहे?
म्हणाली असशील की पण त्याच्या शब्दमागची बोलकी शांतता ऐकलीस का?
तेही लक्ष्यात आलं असेल तर ते कसं काढणार मनातून???
तुलाही माहितीये त्याला मनातल्या गोष्टी सांगता येत नाहीत,
तू विचारल्या तरी व्यक्त करता येत नाहीत..
मग करायचंय काय ह्याच म्हणत तूच म्हणतेस कसं होणार तुझं???
एवढं होऊनही काय त्याच्या मनात हे तुला कळेना..
बघ जरा तो नव्याने कळतोय का,
बघ जरा तुझा आहे तो फक्त तुझाच का आहे,
बघ तो कुठे अडखळतोय, धडपतोय..
आणि बघ तो तुला समजून घेण्यासाठी कित�� वेळ थांबतोय..
#अनिर्बंध
1 note · View note
ayurvedainitiative-blog · 3 years ago
Text
Tumblr media
कोणतीही गोष्ट न चिडता न रागावता समोरच्याला सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्या वर चिडणं खूप सोप्पं आहे पण त्याला न दुखावता त्याला ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे. निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघुन जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते, हवा आली की उष्णता निघुन जाते ,प्रकाश आला की अंधार निघुन जातो तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या,कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे .आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेंव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय ,आणि कोण सावरायला येतंय. कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते.आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत.
आवश्यक्तेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब ,सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.
माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो ,माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो, कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.
✍🏻झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि,
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय,
प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही,
“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही,
“विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही,
कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही…
0 notes
loksutra · 3 years ago
Text
दक्षिण चित्रपट थेरीच्या हिंदी रिमेकवर वरुण धवन आणि ऍटली काम करू शकतात
दक्षिण चित्रपट थेरीच्या हिंदी रिमेकवर वरुण धवन आणि ऍटली काम करू शकतात
वरुण धवन-अटली चित्रपट: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने अल्पावधीतच इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेणारा वरुण धवन लवकरच दिग्दर्शक नितेश तिवारीच्या पुढील चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. दरम्यान, एका चित्रपटासाठी तो साऊथ डायरेक्टर अॅटलीसोबत बोलणी करत असल्याच्या बातम्या येत आहेत. हेही वाचा – आलिया भट्टला नाही जमलं या 5 माणसांच्या अंगात, रणबीर कपूरच्या डोळ्यात दिसलं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
anahat-mankar · 6 years ago
Text
Sir, Please forgive me !?
Tumblr media
माझ्या एका मित्राला, माझ्याकडून, कॉलेजच्या आठवणी जागृत होतील, असा लेख हवा होता. तो एक छोटेसे पुस्तक छापण्याचा विचार करत होता. मी ताबडतोब लेखणी हातात घेतली ( म्हणजे मी लगेच मांडीवरील संगणक सुरु केला ) आणि मनातील विचार कागदावर उमटवू लागलो ( म्हणजे वर्ड मध्ये लेख लिहू लागलो ). वाचा. मजा आली तर कळवा.  
--------------------------------------------------------------------
सर मला माफ करा ?!
मागच्या महिन्यात, जवळ जवळ ३५ वर्षांनी मी बी वाय के मध्ये पावूल टाकत होतो. दुपारची वेळ होती त्यामुळे तशी सामसूम होती. बरोबर सद्या (अभय), हेमंत (कोचरगावकर), हेमंत ( पाठक) आणि प्रदीप (क्षत्रिय) होते. तळ मजल्यावरचे आपले वर्ग बघितले. विद्यार्थी नसल्याने एक पोकळी जाणवत होती. मी थबकलो, म्हणून थांबलो. तो पर्यंत बाकीचे पुढे निघून गेले. मग मी २ मिनिटात रिकाम्या वर्गाकडे चालत गेलो. एक मोठा श्वास घेतला. ३५ / ३८(१९८०) / ४०(१९७५) वर्षे मागे जाण्यास काही क्षण पुरेसे झाले.
बी डीव्हीजन ची मुले मराठी माध्यमातून आलेली होती याचा अर्थ कमी खोडकर होती असं नाही. मला मी केलेल्या खोड्या आठवल्या. दोनच खोड्या होत्या, पण भयंकर होत्या असे आज मला वाटते.
त्याकाळी कालिकेच्या जत्रेत पत्र्याची बेडकी मिळायची, १/२ रुपयाला. एकदा ती मी विकत घेतली. दुसर्यादिवशी ती सहज कॉलेजमध्ये आणली, पण वाजवली नाही. सायकलवरून घरी जातांना एक कल्पना सुचली, प्राध्यापकांना त्रास देण्याची. तेव्हा प्राध्यापकांना सतावण्याचा एक वेगळा आनंद होता हे सांगणे न लागे. दुसर्या दिवशी बूट घालून गेलो आणि ती पत्र्याची बेडकी पायाच्या अंगठ्याखाली लपवली. अंगठा दाबला कि ‘टुक‘ असा आवाज यायचा, तर अंगठा उचलला कि ‘टिक‘ असा आवाज यायचा. खोडी कशी करायची हे क्लीअर असल्याने घरी सराव पण केला होता. फक्त चालताना थोडी काळजी घ्यावी लागायची. सर वर्गावर येण्याच्या आधीच मी शेवटच्या बाकावर ‘स्थानापन्न’ व्हायचो. सर वर्गात शिकवू लागले कि कधी एकदा ते फळ्याकडे बघतात असे मला होऊन जायचे. कारण? त्यांनी आमच्याकडे पाठ केली कि मी अंगठा दाबून ‘ट���क‘ करायचो. मग सगळीकडे ‘हशा‘ (टाळ्या नाही). मग सर आमच्याकडे बघायचे आणि अंदाज घ्यायचे कि आवाज कोठून आला. वर्गात आवाज घुमायचा त्यामुळे शेजारच्या मित्रालाही आवाज कोठून आला हे समजत नसे. सरांनी परत आमच्याकडे पाठ केली कि ‘टीक‘. हि खोडी मी एफ वाय ला असतांना जवळपास २ आठवडे काढत होतो पण कोणालाही माहित पडले नाही. मुले/मुली हसत होत्या, प्राध्यापक बेजार झाले होते आणि माझे टुक-टीक चालू होते. ३५ वर्षानंतर वाटतं कि ‘आपलं चुकलं होतं‘. मनातल्या मनात म्हणालो, ‘ सर मला माफ करा !’.
अजून एक गम्मत सांगतो जी मी पहिल्या बाकावर बसून करत असे. त्या काळी ‘अखियोंके झारोकोन्से‘ ह्या सिनेमाचे टायटल सॉंग – गाणं, मला खूप आवडलं होतं. नेहमी ते मनात गुन्गुणायचो. नंतर नंतर गुणगुणणे घश्यापर्यंत आले. एकदा पहिल्या बाकावर बसलेलो असतांना सरांकडे बघत असतांना मी माझे गुणगुणणे सुरु केले. वर्ग आवक झाला. आवाज तर येत होता पण ‘ सोर्स ‘ सापडत नव्हता. मुला/मुलीना हसायचे होते पण हसायचे कसे हा प्रश्न. मला मात्र मजा येत होती, हि खोडी पहिल्यांदा काढल्यावर. नंतरच्या आठवड्यात मी ‘रतीबच’ घातला. कोणालाच अंदाज येत नव्हता. आणि मी सरांच्या डोळ्यात डोळे घालून माझा ‘उपक्रम‘ चालू ठेवल्याने, सर माझ्याबद्दल शंका घेतील अशी सुतराम शक्यता नव्हती. पण एक दिवस एका ‘स्मार्ट‘ प्राध्यापकाला अंदाज आला कि या खोडीचा ‘मानकरी’ मानकर आहे. सर मला उद्धेशून म्हणाले ‘ प्लीज सी मी इन प्रोफेसर’स रूम’. मीहि स्मार्ट. वर्ग संपल्यावर सरांना जिन्यातच पकडलं. सर म्हणाले ‘ अरे मानकर, तू चांगल्या घरचा ना? , मग कशाला इतर मुलांना खोड्या काढण्यास सहकार्य करतो ?’. मी उत्तरलो, ‘ नाही करणार सर ‘. मला लक्षात आले कि येथेच थांबायला हवे आणि मी थांबलोही. पण ३५ वर्षानंतर वाटतं कि ‘ आपलं चुकलं होतं ‘. मनातल्या मनात म्हणालो , ‘ सर मला माफ करा !’.
आज मला जरा जास्त वाईट वाटत होते. कारण नंतर ,पुढील आयुष्यात, मी जेव्हा ‘ शिकवणार्याच्या ‘ भूमिकेत गेलो तेव्हां मला समजलं कि शिकवतांना ‘ डीस्टर्ब ‘ केले कि लिंक तुटते. असो. नंतर मी अभ्यासात मन रमवायला सुरुवात केली. तिसऱ्या सेमेस्टरला असतांना ICWA प्रवेश घेतला.
याबाबतची एक आठवण सांगतो आणि लेख संपवतो. प्रोफेशनल कोर्सेस प्रवेश घेणारा मी पहिला असावा. मी चालेंज स्वीकारले होते. जेंव्हा इतर मुले मजा करत होती तेव्हा मी १८ तास अभ्यास करत होतो. ICWA दोनही ग्रुप मी फर्स्ट स���ट्रोक मध्ये पास झालो. तेव्हा आपण पाचव्या सेम मध्ये होतो. हि बातमी वर्गातील काही मित्रांना कळली. त्यांना आश्चर्यमिश्रित आनंद झाला. सगळ्यात जास्त आनंद हेमंत कोचरगावकर झाला होता. वर्ग चालू होता, सरांचं निम्मं शिकवून झालं होतं. हेमंतने हात वर केला व हि बातमी त्यांना सांगितली. त्यामुळे ती वर्गाला कळली. मग वर्गाने , वर्ग चालू असतांना माझे अभिनंदन केले. ते क्षण मी कधीही विसरणार नाही. मग बऱ्याच प्राध्यापकांनी माझी दखल घेतली व एक ‘ हुशार ‘ विद्यार्थी अशी वर्गवारी केली.
खोड्या करणारा विद्यार्थी हा हुशार असू शकतो का? असा विचार मनात येत होता. तेवढ्यात, मानकर लवकर इकडे ये असा प्रदीपचा ओरडा ऐकू आला. क्षणार्धात मी वर्तमानात आलो आणि कोचरगावकर सरांच्या केबिनमध्ये दाखल झालो. चाय पे चर्चा चालू होती पण माझं मन भूतकाळातून बाहेर पडत नव्हतं.
जमलं तर तुम्हीही कधीतरी जा भूतकाळात, जा बी वाय के मध्ये. आत्ता वय झालं हे लक्षात येईल.    
------------------------------------------
माझे कॉलेजचे जीवन शालेय जीवनाइतकेच सुंदर होते.
3 notes · View notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४४
शुभदाने स्वाधीन केलेल्या पिशवीतून सामान बाहेर काढून ठेवीत मनोरमा म्हणाली, "शुभदा, तूं येशील म्हणून मी चहा करायची थांबले होते! घरी पिऊन आली असलीस तरी माझ्याबरोबर पुन: घेशील ना?" "तुला कंपनी देण्यासाठी घेईन अर्धा कप;--पण तोपर्यंत मी एकदां सुहासिनी मॅडमना बघून येऊं कां? ह्यांच्या तोंडून ती भयानक बातमी ऐकल्यापासून जिवाला चैन नाहींये!" शुभदाला बेडरूमचं दार उघडून देऊन मनोरमा कीचनकडे वळली. शुभदाने दारातूनच डोकावून बेडकडे बघितलं तर अंगावर व्यवस्थित घातलेल्या पांघरुणाखाली सुहासिनीमॅडमचं शरीर दिसतच नव्हतं! दिसत होता तो फक्त त्यांचा निद्रिस्त शांत चेहरा आणि त्याभोंवतीची दाट शुभ्र केसांची महिरप! भूतकाळातील अनेक आठवणी मनांत दाटल्यामुळे शुभदा जागींच खिळल्यागत ऊभी राहून बघत असतांना नकळत तिचे डोळे भरून आले आणि हलक्या हाताने बेडरूमचं दार लावून ती परत फिरली. तिची चाहूल जाणवून मनोरमा म्हणाली, "कीचनमधेच ये, शुभदा!" साश्रू डोळ्यांनी विमनस्कपणे बसलेल्या शुभदापुढे चहाचा कप ठेवीत मनोरमा म्हणाली, "भाऊसाहेब त्यांच्या परीने ह्यांना 'स्वयंसिद्ध अनाथाश्रमा'साठी देणग्या गोळा करायला मदत करीत असतात. त्यातूनच माझी सुहासिनीची ओळख झाली! पण तुझी तिच्याशी ओळख कशी?"
"आमची जयू ८ वीत असतांना सुहासिनी मॅडम तिच्या क्लासटीचर होत्या. सायन्स विषयही त्याच शिकवायच्या. शिक्षणाचा प्रात्यक्षिक भाग म्हणून त्या हौसेनं स्टडी टुर काढीत! अशाच एका टुरनंतर त्यांनी 'भेटायला या' म्हणून निरोप पाठवला!" शुभदा भूतकाळाच्या आठवणी जागवीत सांगू लागली, "पण ह्यांना कुठे ऑफिसच्या कामांतून वेळ मिळायला! चार दिवस वाट बघून शेवटी मी एकटीच भेटायला गेले. पहिल्याच भेटीत त्या जयूचं वनस्पतींबद्दलचं कुतूहल आणि निरीक्षण यांबाबत भरभरून बोलल्या! जयूचे इतर छंद आणि आवडींची आस्थेनं चौकशी केली! जयू ९ वीत गेल्यावरही त्यांनी तिच्या प्रगतीमधे रस घेतल्याने आमच्या भेटी होत राहिल्या, ओळख वाढत गेली!" "मीसुद्धां अनेकांकडून तिच्या जीव ओतून शिकवण्याबद्दल ऐकलं आहे!" मनोरमा म्हणाली, "बाहेर पडली तर अजूनही तिचे जुने विद्यार्थी मोठ्या आदराने तिला भेटतात!" "पांच वर्षांपूर्��ी जयू आली होती तेव्हां कपड्यांच्या दुकानांत आम्ही खरेदी करीत असतांना तिने अचानक मॅडमना ओझरतं पाहिलं आणि धांवतच जाऊन त्यांना गांठलं! तिथंच त्यांच्या पायां पडली तेव्हां "अग, बबली तूं?" म्हणतांना मॅडमना केवढा आनंद झाला होता! खरेदी राहिली बाजूला आणि त्यांच्या गप्पा संपेनात, तेव्हां 'एकदां आरामांत गप्पा मारायला घरी ये' म्हणाल्या होत्या! पण जेमतेम दोन आठवड्यांच्या मुक्कामामुळे जयूला नाहींच जमलं! परत जातांना ती 'मॅडमना पुन: भेटतां आलं नाही' म्हणून जाम हळहळली होती!कारण पुढे ज्या वनस्पतींविषयक संशोधनक्षेत्रांत जयूने स्कॉलरशिप मिळवून डाॅक्टरेट केली, त्यातली तिची रुची आणि कल ओळखून मॅडमनी तिला प्रोत्साहन दिलं! आपल्या करीअरचा पाया घालण्याचं श्रेय ती नेहमी मॅडमनाच देते!"
"जयूचं टोपण नांव 'बबली' असल्याचं मला आजच समजलं!" मनोरमा कौतुकाने म्हणाली. "जयू लहान असतांना आम्ही भाड्याच्या जागेत रहात होतो तिथे शेजारी शर्मा कुटुंब होतं! त्यांच्या घरांत समवयस्क लहान मुलं असल्याने जयू तिथे रमायची!शर्मा मंडळीनीच तिला 'बबली' म्हणायला सुरुवात केली. तिच्या 'बबली' या टोपणनांवाचं सुहासिनी मॅडमना केवढं अप्रूप!'किती वेगळं आणि गोड आहे' म्हणायच्या आणि कौतुकाने हंसायच्या!" "नांवाप्रमाणे सतत हंसत असायची!" खेदाने मान हलवीत मनोरमा म्हणाली, "पण आज ही काय वेळ आली बघ तिच्यावर!" "विषय निघाला, म्हणून विचारतेय्--" काहीशी चांचरत शुभदा म्हणाली, "मॅडमचा आत्महत्येचा प्रयत्न ऐनवेळी कुणी हाणून पाडला?" "सकाळी भाऊसाहेब नेहमीप्रमाणे शुक्रवारच्पा गप्पांच्या बैठकीला गेल्यावर सुहासिनीने 'जगण्यांत रस न उरल्याने मी स्वतःहून आयुष्य संपवीत आहे. याबाबत इतर कुणालाही दोष देऊं नये!' अशा आशयाची चिठ्ठी लिहून बेडवर ठेवली! त्यानंतर ती जीव देण्यासाठी बेडरूमच्या खिडकीतून उडी मारणार होती. पण आठव्या मजल्यावरून खाली बघितल्यावर तिला बहुधा भोंवळ आली आणि ती आंतल्या बाजूला पडली! तो आवाज ऐकून खालच्या फ्लॅटमधले घाबरून चौकशी करायला धांवत आले. शेजारी कुणाकडे तरी डुप्लिकेट चावी होती ती वापरून फ्लॅटचा दरवाजा उघडला तर सुहासिनी बेडरूममधे, खिडकीखाली बेशुद्ध अवस्थेमधे पडलेली आढळली! तेवढ्यांत शेजारी बेडवर तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी कुणीतरी वाचली आणि एकच हलकल्लोळ उडाला!" सगळी हकीकत नुसती ऐकतांना थरकांप उडालेल्या शुभदाने स्वत:ला सावरण्यासाठी बाजूच्या खु��्चीचा आधार घेतला! "नशीब बलवत्तर म्हणून सुहासिनी वाचली आहे, शुभदा! अगदी सुखरूप आहे!" म्हणत मनोरमाने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला! तेवढ्यांत दरवाजाचं लॅच उघडल्याचा आवाज आला! पोलीस चौकीतील काम निपटून मनोहर भोसले भाऊसाहेबांना सोबत घेऊन परतले होते. शुभदाला उद्देशून भोसले म्हणाले, "अनंतरावांशी माझं वाटेतच बोलणं झालं! ते आणि आणखी कांही मित्र १०-१५ मिनिटांत पोहोचतीलच!"
२२ जून २०२३
0 notes
kavitadatir · 3 years ago
Text
आजीची गोधडी । पत्र पंचविसावं
आजीची गोधडी । पत्र पंचविसावं
प्रिय आज्जी, मागच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे मी अश्विनीशी बोलायचा प्रयत्न केला पण मला तसं काही जमलं नाही. मला उगाच असं वाटलं की मी मला हे आवडत नाही असं सांगितलं आणि तिचा मूड ऑफ झाला तर मग उगाचच भांडण होईल मग ती मला एक तर इग्नोअर करेल किंवा मग ती उगाच प्रयत्न करून माझ्या आवडीचं काहीतरी बोलत राहील पण त्यात तिची नेहमीची एक्साईटमेंट असेलच असं नाही. मी विचार करत होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की, ती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
एकाचवेळी 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका
एकाचवेळी 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांना झटका
जे पृथ्वीराज चव्हाण, फडणवीसांना जमलं नाही, ते ठाकरेंनी करुन दाखवलं⇒¬ σ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) किंवा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही जे जमू शकलं नव्हतं, ते उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं. मंत्रालयात वर्षानुवर्षे एकाच जागी, ठाण मांडून बसलेल्या तब्बल 300 ‘पॉवरफुल्ल’ अधिकाऱ्यांची फेरबदल केली आहे. मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Babar Hayat: हाँग काँगच्या बाबरपासून सावधान! विराट-रोहितला जमलं नाही ते करुन दाखवलंय, पाहा
Babar Hayat: हाँग काँगच्या बाबरपासून सावधान! विराट-रोहितला जमलं नाही ते करुन दाखवलंय, पाहा
Babar Hayat: हाँग काँगच्या बाबरपासून सावधान! विराट-रोहितला जमलं नाही ते करुन दाखवलंय, पाहा IND vs HKG Asia Cup t20 2022: आशिया कप २०२२ मध्ये टीम इंडियाचा सामना आज (३१ ऑगस्ट) हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून सामना रंगणार आहे. IND vs HKG Asia Cup t20 2022: आशिया कप २०२२ मध्ये टीम इंडियाचा सामना आज (३१ ऑगस्ट) हाँगकाँगशी होणार आहे. हा सामना…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 May 2021 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ मे २०२१ सकाळी ७.१० मि. ****
कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या कमी जरी होत असली तरी संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, हात वेळोवेळी साबणानं धुवावेत, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्��च्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
·      म्युकर मायकोसिस साथ प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या केंद्र सरकारच्या सर्व राज्यांना सूचना.
·      कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या परिवार आणि आश्रितांनाही लस घेता येणार.
·      कोविड प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला अडचण नाही - केंद्र सरकारचं स्पष्टीकरण.
·      राज्यात २६ हजार १३३ नवीन कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात ९७ जणांचा मृत्यू तर दोन हजार ८७६ बाधित.
·      प्रसिद्ध संगीतकार विजय पाटील उर्फ लक्ष्मण यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन.
आणि
·      आष्टीच्या कोविड केंद्रात कामचुकारपणा केल्याच्या आरोपावरुन एका डॉक्टरसह सात जणांना कामावरुन काढलं.
****
काळी बुरशी म्हणजेच, म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना, प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहिलं आहे. रुग्णालय संसर्ग नियंत्रण समिती स्थापन करून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी सूचना राज्यांना करण्यात आली आहे. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार कडून सर्व प्रकारचं साह्य मिळेल, असं आश्वासनही मंत्रालयानं दिलं आहे.
****
आयुषमान भारत आणि अन्य आरोग्य विमा योजनांनध्ये म्युकर मायकोसिस या आजाराचा समावेश करावा अशी विनंती कॉंग्रेसच्या अध्यक्ष खासदार सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. या आजाराला साथ रोग घोषित केल्यामुळे यावरील उपचारासाठी आवश्यक औषधींच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर भर दिला जावा असं गांधी यांनी पत्रात म्हटलं आहे.
****
कोवॅक्सिन तसंच कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवासाला काहीही अडचण येणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटना - डब्ल्यूएचओची मान्यता नसून, या लसी घेणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नसल्याचं, खोडसाळ वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं, जावडेकर यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे.  
दरम्यान, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी, कोरोना विषाणूच्या नव्या अव��ाराला इंडियन व्हेरियंट म्हटल्याबद्दल जावडेकर यांनी आक्षेप नोंदवला आहे. हा देशाचा अपमान असून, या प्रादुर्भावाविरोधातल्या लढाईचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या कोणत्याही रुपाला कोणत्याही देशाचं नाव दिलेलं नाही, असं जावडेकर यांनी नमूद केलं आहे.
****
कामाच्या ठिकाणी लसीकरणाची सुविधा तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या परिवारालाही आणि आश्रितांना देखील दिली जाऊ शकते असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. औद्योगिक आणि कामाच्या ठिकाणी लसीकरणासाठी लसीच्या मात्रा संबंधित कंपनी किंवा व्यवस्थापनाने ज्या रुग्णालयांशी कर��र केला आहे, त्या रुग्णालयांनी खरेदी करावा, मात्र ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत लस दिली जाईल, असं या पत्रात म्हटलं आहे.
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याची वैद्यकीय प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं मिशन ऑक्सिजन स्वावलंबन योजना हाती घेतली आहे. या योजनेतंर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. हा निर्णय जाहीर केल्यानंतर आमच्याकडे बऱ्याचशा उद्योजकांनी संपर्क साधला असून, महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास त्यांनी विशेष स्वारस्य दाखवलं असल्याचं देसाई यांनी सांगितलं.
****
राज्यात काल २६ हजार १३३ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ५३ हजार २२५ झाली आहे. काल ६८२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ८७ हजार ३०० झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ५७ शतांश टक्के झाला आहे. काल ४४ हजार ४९३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ४ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात तीन लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल दोन हजार ८७६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ९७ जणांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या २६, औरंगाबाद २४, बीड १४, उस्मानाबाद ११, परभणी आठ, नांदेड सात, हिंगोली ०४, तर जालना जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ७७९ रुग्ण आढळले. उस्मानाबाद जिल्ह्यात ५७७, औरंगाबाद ४२९, जालना ३४२, लातूर २९९, परभणी २२०, नांदेड १६९, तर हिंगोली जिल्ह्यात ६१ नवे रुग्ण आढळून आले.
****
पदोन्नती मधील आरक्षण देणं हे राज्याच्या अधिकारात असून, हे आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा शासन आदेश रद्द करावा, अशी मागणी पीपल्स रिप��्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ही मागणी मान्य न झाल्यास, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांना सोबत घेऊन १५ जूनला राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
राज्यात २०२१-२२ मधील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आली नाही, असं शिक्षण उपसंचालकांनी स्पष्ट केलं आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबत सविस्तर दिशानिर्देश शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येतील, असं शिक्षण उपसंचालक द गो जगताप यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. तत्पूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये, विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होईल अशा सूचना दिल्या जाऊ नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएससीच्या बारावीच्या परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी आज एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत सर्व राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि लाभधारक सहभागी होणार आहेत.
****
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण - एनईएफटी सेवा आज दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध राहणार नाही, असं भारतीय रिझर्व्ह बँकेनं कळवलं आहे. काही तांत्रिक सुधारणा करण्यासाठी ही सेवा काल रात्रीपासून १४ तासांसाठी सर्व सदस्य बँकासाठी बंद ठेवण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे. मात्र या काळात आरटीजीएस सेवा सुरू राहील असंही बँकेन कळवलं आहे.
****
प्रसिद्ध संगीतकार विजय पाटील उर्फ लक्ष्मण यांचं काल नागपूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं  निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. आपले सहकारी सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांच्या साथीनं विजय पाटील यांनी १९७०च्या दशकात संगीत दिग्दर्शन सुरू केलं, ‘पांडू हवालदार’ या चित्रपटापासून त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ झाला. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक दादा कोंडके यांनी या संगीतकार जोडीचं राम लक्ष्मण असं नामकरण केलं, त्यानंतर अवघ्या काही काळातच राम यांचं निधन झालं, मात्र विजय पाटील यांनी 'राम लक्ष्मण' याच नावानं जवळपास ७५ हिंदी, मराठी तसंच भोजपुरी चित्रपटांना संगीत दिलं. 'तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ आदी मराठी चित्रपटांसोबतच, एजंट विनोद, हम से बढकर कौन, आगे की सोच, मैंने प्यार किया, पत्थर के फूल, हंड्रेड डेज, हम आपके है कौन, हम साथ साथ है आदी हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालं. मैंने प्यार किया चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी राज्य शासनाचा २०१८ सालचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी लक्ष्मण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राम-मक्ष्मण युगाचा आज अस्त झाला, मात्र त्यांच्या संगीतातून ते कायम रसिकांच्या स्मरणात राहतील असं देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणूची तिसरी लाट जुलै मध्ये येण्याची शक्यता व्यक्त होत असून या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असण्याचंही सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेनं कोरोना विषाणूग्रस्त बालकांच्या तातडीच्या उपचारासाठी विविध रूग्णालयात ७३६ खाटांची व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली. या रूग्णालयात ४५ व्हेंटिलेटर आणि ४३७ ऑक्सिजनच्या खाटा असणार आहेत. यासोबतच एमजीएम आणि मेल्ट्रॉन इथल्या बाल कोविड केंद्रात महापलिकेचे डॉक्टर कार्यरत राहणार असल्याचंही पाडळकर यांनी सांगितलं.
****
कोविड उपचारादरम्यान म्यूकर मायकोसिस या आजाराचा संसर्ग झालेले आणि सध्या औरंगाबाद इथं एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेले डॉक्टर राहुल पवार यांच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची तयारी एमजीएम रुग्णालयाने घेतली आहे. लातूर इथं खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप करणारे डॉ. राहुल पवार यांना कोविड आणि त्यानंतर म्यूकर मायकोसिसची लागण झाली, आर्थिक स्थिती बेताची असल्यानं, सामाजिक माध्यमातून त्यांना मदतीचं आवाहन करण्यात आलं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पवार यांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाला दिले होते.
****
परभणी इथं जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतल्या कोविड केंद्रात काल प्राणवायू प्रकल्पातला एक पाईप अचानक फुटल्यानं, काही काळ गोंधळ उडाला, मात्र तज्ज्ञांसह कर्मचाऱ्यांनी तत्काळ पर्यायी यंत्रणा कार्यान्वीत केल्यानं, कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
****
राज्यातील आदर्श गाव असलेल्या हिवरेबाजारनं पुन���हा एकदा सामुदायिक प्रयत्नातून ‘गाव कसे कोरोना मुक्त’ होऊ शकते. हे दाखवून दिलं आहे. या महिन्याभरामध्ये गावात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसून गावातील ग्रामस्थांच्या मदतीनं संपूर्ण गाव कोरोना मुक्त झाल्याचं सरपंच पोपटराव पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले –
दोन एप्रिल ते दहा एप्रिलपर्यंत एकदम संख्या ३२ वरती गेली. मग आम्ही तातडीनं या लोकांना विलगीकरण कक्ष तयार केला आणि त्यामधे ठेवलं. आणि रिपोर्ट जेव्हा आला, त्यानंतर लक्षात आलं की ते पण पॉझिटीव्ह आहेत. मी त्यासाठी तातडीचे योग्य ते रक्त सँपल तपासणी आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगली उपाययोजना केली. आणि उत्तम चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाल्यामुळे नव्याने एकही बाधीत रुग्ण आला नाही. त्याला एकच कारण की आम्ही लोकांना घरातून विलगीकरण कक्षात नेलं. आणि तिथेच दररोजच्या तपासणीतून औषधोपचार केला. आणि त्याचा परिणाम आज हिवरे बाजार आज शुन्यावर आला.
****
परभणी जिल्ह्यात टाळेबंदीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांविरुध्द महापालिका आणि पोलिस प्रशासनानं कारवाई केली. आठ दुकानदारांकडून ५५ हजार रुपये दंड तर विनामास्क फिरणाऱ्या ७२ जणांकडून १४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरात टाळेबंदी नियमांचा भंग केल्याबद्दल सील करण्यात आलेल्या दुकानांचं सील काढण्यात यावं, अशी विनंती औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघानं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे केली आहे. व्यापाऱ्यांनी टाळेबंदीत दुकानं सुरु ठेवण्याच्या चुकीबद्दल त्यांच्यांकडून दंडात्मक रक्कम वसूल करावी तसंच त्यांना समज देऊन सील काढावेत अशी विनंती संघानं केली आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथल्या कोविड केंद्रात कामचुकारपणा केल्याच्या आरोपावरुन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी एका डॉक्टरसह सात जणांना कामावरुन कमी केलं आहे. या केंद्रातल्या सुविधा आणि उपचारांबाबत रोज तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी काल सकाळी अचानक या केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांना अस्वच्छता आणि रूग्णांच्या उपचारांकडे दुर्लक्ष होत असल्याच आढळून आलं. पवार यांनी तत्काळ एका डॉक्टरसह दोन परिचारिका, आणि चार वॉर्डबॉयवर कार्यमुक्तीची कारवाई केली.
****
औरंगाबाद इथल्या खाम नदी परिसरात एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचं महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या नदी पुनरुज्जीवनाची पाण्डेय यांनी काल पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. नदी विकास कामाला गती आली असून बाजूच्या नाल्यावर जाळ्या बसवण्यात येणार आहेत, बंधाऱ्याची उंची वाढवली जाणार आहे, असं पाण्डेय यांनी सांगितलं. विविध कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पाण्डेय यांनी केल्या.
****
नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्��ात दिघी इथं पैनगंगा नदीतून काढलेल्या रेती साठ्यावर तहसील प्रशासनानं काल कारवाई करून रेतीचे साठे जप्त केले, शिवसेनेचे कार्यकर्ते राम गुंडेकर यांनी अवैध वाळू तस्करी विरूद्ध तक्रार केली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान, बिलोली तालुक्यातील कार्ला बुद्रुक परिसरातून मांजरा नदीतील अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज तस्करी विरूद्ध, ग्राम पंचायत सदस्य आणि गावातले नागरी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारी मालमत्तेची चोरी होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन नागरिकांनी वाळूची वाहतूक करणारी वाहनं काल अडवून धरत, तस्करांवर कारवाईची मागणी केली.
****
महाराष्ट्र विधान परिषद बरखास्त करावी, अशी मागणी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते विधीज्ञ रेवण भोसले यांनी केली आहे. याबाबत विधानसभेत एक ठराव घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्याची मागणी भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. देशातल्या काही राज्यांनी आपल्या विधान परिषदा रद्द करून त्यावरील खर्च वाचवला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेचाही खर्च वाचवावा, हा निधी जनतेच्या कोणत्याही कामासाठी वापरावा, राज्यातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मोफत द्यावी, शेतकऱ्यांना - कामगारांना मदत करावी, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० मे रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७७ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
0 notes
kokannow · 4 years ago
Text
शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण
शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं ‘ब्रीच कँडी’च्या गेटवरुन भाषण
पंढरपूरच्या मतदारांशी संवाद मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या सभा नेहमीच गाजतात. त्यांच्या सभेला प्रचंड गर्दीही जमते. निवडणुकांच्या प्रचार सभांना हजेरी लावून त्या मतदारांना उत्साहित करतात. मात्र, पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली असताना शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे आपल्या आजारी वडीलांना सोडून त्यांना प्रचारसभेला जाणं जमलं नाही म्हणून त्यांनी थेट ब्रीच कॅन्डी…
Tumblr media
View On WordPress
0 notes