Don't wanna be here? Send us removal request.
Text
हल्ली घड्याळाच्या गजराची गरज नाही वाटत....
दिपाचं ही तसंच काहीसं झालं होतं..रोज सकाळी 6 ला उठायचं...उठल्यावर मनात एकच प्रश्न आज जेवायला काय बनवायचं ..बहूूधा हा प्रश्न सगळ्यांच बायकांना पडत असेल नाहींका...तेेव्हढयात,अग थांब मी तुला भाजी कट करून देेेतो समीर डोळे चोळतच किचन मध्ये येेेतो...प्रत्येक नवऱ्याने जर असाच विचार करून घर कामात मदत केली तर सगळं किती सोपं होईल ना...दोघांंचा टिफिन भरून तिची ऑफीस ला जायची तैयारी..दिपाचं हे रोजचं ठरलेल वेळापत्रक...तसा समीर तिला मदत करायचा पण त्याच आपलं हळूहळू चाललेलं असायचं...
अरे समीर तेवढं लाईट बिल भरलंस का रे..तेवढं आज भरून घे...अरे हो आणी वेेळ मिळेल तसा गॅसचा नंबर पण लावून घे...घाई घाईत च दिपा समीर ला बोलुन निघाली...घड्याळात 7 वाजून 5 मिनिटे झाली...तशी ती पटापट पायऱ्या उतरत विचार करत होती...आज 7:15 ची लोकल चुकते की काय...आणि मग उशीर झाला की पुढे बस चुकेेेल...आणी लेट पचिंग...या महिन्यात ला हा दुसरा लेट मार्क...असा विचार रोजच तिच्या मनात येेेई...मग तशी तिची पाऊले अजून वेगाने रिक्षा च्या दिशेने जाई...कशीबशी station ला आल्यावर घड्याळात बघितलं 7:12 हुश्श...अजून 3 min आहेेेत लोकल यायला...तसा तिने जिना चढून प्लॅटफॉर्म 5 गाठला...एकदातरी माणसा ने मुंबई लोकल चा अनुभव घ्यावा तोही सकाळी 7 ते 10 आणि संंध्याकाळी 5 ते 8...अबब!! केवढी ही माणसांची गर्दी...

एका साखरेच्या कणाला शे दोनशे मुंग्यानी ओढत घेऊन जावंं अगदी तशीच.....तेेव्हढयात अनौनसमेंट होते ..."7 वाजून 15 मिनिटांची..छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ला जाणारी 15 डब्यांची जलद लोकल थोड्याच वेळात प्लँटफॉर्म क्रमांक 5 वर येेेत आहे..."तशी बॅग पुढे घेेेऊन सगळ्यांची लोकल मद्धे चढायाची घाई....चला आज पण लोकल मद्धे चढता आलं म्हणजे आपण आज वेळेत पोहचू.. एवढ्या गर्दी मद्धे पण लोकल मद्धे चढता येणं म्हणजे एक कलाच आहे बरं का ही मुंबईकरांची...त्याहून पुढे म्हणजे, बसायला सीट मिळाली तर...कुणाला पारितोषिक मिळण्या इतका आनंद कुठे नाही...एकमेकांना ढकलून पुढें चढणारे पण हेच आणि कुणाला मद्धेच चक्कर आली की पाणी बिस्कीट देेनारे पण हेेेच!
"आज माझ्या मुलांची परीक्षा आहे रात्रभर त्याचा अभ्यास घेत होते" .."अग, माझ्या पण मुलीची तब्बे्त ठीक नाही ..माझीही झोप झाली नाही ग " ..."उद्या मुलांच्या शाळेत मीटिंग आहे ..."अग माझ्या घरी लग्न आहे "..."माझ्या घरी पाहुणे येणार आहेेेत...""या सगळ्या बायकांंच्या गप्पा ...
रो....ज कानावर येई...पण खरंच कमाल आहे ना या सगळ्या बायकांंची....multitasking म्हणतात ना ते हेेंच!! कसं काय जमतं ना या बायकांना हा विचार रोज थक्क करूूून जाई... आणि दिवस भर काम करण्याची प्रेरणा पण देई...

एवढं करून ही ह्या प्रत्येकी आपआपल्या कामात निपुण, अत्यंत प्रामाणिक, चिकाटी आणि धाडसी सुध्दा बरं का !!हे झालं दिपाच...पण संसाराचा ब्यालन्स करण्यासाठी सर्वच स्त्रीयांना खुप मेहनत घ्यावी ल��गते..
वाटेवर कुठेतरी मग आपल्याला आई वडिलांची प्रत्येक क्षणी जाणीव होते...त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची, त्यांनी पार पाडलेेल्या प्रत्येक जबाबदारी ची....संसाराची गाडी पुढें नेेत असताना आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार तर होत नाही ना याची वेळोवेळी खबरदारी घेतलेली...कसंंकाय जमलं बाबा यांंना हे सगळं ...आणि परत या विचाराने नवीन काहीतरी करण्याची उम्मीद निर्माण होते...
परिस्थिती माणसाला सर्वकाही करायला शिकवते हे चांगलं समजलं होतं...कोणत्याही कामाची लाज वाटू नये...प्रामाणिक पणे केलेल्या कामात यश नक्कीच मिळते ही माझ्या वडिलांची शिकवण...यात उत्त्त्तम साथ दिली ती माझ्या आईने...time managment शिकावं तर या सगळ्या बायकांकढुन...दिपा लाही हळू हळू हे सगळं जमायला लागलं होतं..शेवटी म्हणातात ना ,"अनुभवाचे बोल "
आपल्याला नेहमीच असं सांगितलं जातं ,लग्न म्हणजे संसार रुपी रथ...या रथाची दोन चाके म्हणजे नवरा-बायको...आणि या रथाचा वेग कायम राखण्यासाठी ही दोन्ही चाके व्यवस्थित असावी लागतात...तरच संसार टिकतो.. अगदी बरोबर...पण व्यवस्थित म्हणजे नेमकं काय...तर जेंव्हा ही दोन्ही चाके बॅलन्स मद्धे असतील ...एकमेकांना घट्ट पकडून धरतील...कुणा एकाचा तोल जात असेेेल तर त्याला वेळीच सावरतील...
आणि हा बॅलन्स म्हणजे एकमेकांबद्दल चा"आदर"....एकमेकांप्रती असणारा " विश्वास"...आणि अर्थातच "प्रेम"...तर हवेच...
कुठल्याही नात्यात प्रेम असेल तरचं ते नातं टिकत हे अगदी खरं आहे....
प्रत्येक माणूस हा वेगळा असतो...नवरा-बायको जरी एक असले तरी माणूस म्हणून ही दोन विभिन्न व्यक्तीमत्त्वे असतात...त्यामुळे प्रत्येकाचे मत वेगवेेेगळे असू शकते...म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करायला शिका...
आपल्या समाजात विशेषतः भारतीय कुटुंबात
एक विरोधाभास दिसून येतो...मुलांना शिस्त लावण्यावर जास्त कष्ट घेतले जात नाहीत पण मुलींना मात्र उठता बसता शिस्त शिकवली जाते...एकींकडे आपण स्त्री-पुरुष समानता मानतो आणि आपल्याच घरात आपण मुलांना ���णि मुलीना वेगळी वागणूक देतो...स्वयंपाक घरातली कामे फक्त मुलींनी च केली पाहीजे अशी
एक चुकीची प्रथा आपल्या कडे आहे...आता हळूहळू सुशिक्षित समाज होत चालल्याने ही प्रथा बदलत आहे..
प्रत्यकाने आत्मनिर्भर झालंच पाहिजे..
त्यासाठी मुलांना आणि मुलींना लहानपणा पासुनच स्वतःची कामे स्वतः करायला शिकवलं ��ाहिजे...
आणि या काळातील अतिशय मौल्यावान आणि महत्त्वाची शिकवण जी प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना द्यायला हवी ती म्हणजे प्रत्येक स्त्री चा "आदर..."।। मुलगा-मुलगी समान म्हणार्यांनी केवळ वंशाचा दिवा पाहिजे म्हणून स्त्री-भ्रूण हत्या करणारे ...खरंच लाज वाटते अशा लोकांची ...मुलगा पण हवाच की...पण हा पण तुमच्याच हाडा मांसा चा
गोळा आहे....यासाठी आधी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्री ने तिची मानसिकता बदलली पाहिजे... तिला रडायला नाही लढायला शिकवा...तिला वाट्टेल तसं जगू द्यात..हा खुला आसमंत तिचा पण आहे तिला हवं तसं वावरू दयात....
यामुळे स्त्रीयांवरील अत्याचार आपसूकच कमी होतील..
आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी प्रगती केली आहे...कुणी वैज्ञानिक कुणी डॉक्टर कुणी इंजिनिअर कोणी पोलिस कोणी शिक्षक कोणी नर्स कोणी वकील..अजून बऱ्याच क्षेत्रात...पण प्रत्येक घराला स्वर्ग बनवणारी फक्त फक्त ही स्त्री च !!त्यामुळे प्रत्येक स्त्री ला माझा मानाचा मुजरा !!!
'उठ नारी,...तू प्रेम आहेस...तू आस्था आहेस... तू विश्वास आहेस
तू माता आहेस...जननी आहेस...भगीनी आहेस
तू आधार आहेस...तू नवी उम्मीद आहेस...तू आशेचा किरण आहेस...
उठ,तुझं अस्तित्व सांभाळ...तुझं कर्तृत्व खूप मोठं आहे.. आणी एक नाही प्रत्येक दिवस हा नारी दिवस बनव...
शेवटी विसरू नकोस तू एक "रणरागिणी" आहेस...!!!!
☺☺
नम्रता देशमाने-जैन
1 note
·
View note