#घेतील
Explore tagged Tumblr posts
Text
तुमच्या बजेटची काळजी घेतील 'हे' शानदार स्मार्टफोन्स, किंमत ७ हजारांपेक्षा कमी
तुमच्या बजेटची काळजी घेतील ‘हे’ शानदार स्मार्टफोन्स, किंमत ७ हजारांपेक्षा कमी
तुमच्या बजेटची काळजी घेतील ‘हे’ शानदार स्मार्टफोन्स, किंमत ७ हजारांपेक्षा कमी Cheapest Smartphones: सध्या स्मार्टफोन यूजर्स बजेट फोन मोठ्या प्रमाणत खरेदी करत असून स्वस्तात मस्त या स्मार्टफोन्सची खूप चर्चा देखील आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्वस्त स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर सांगणार आहो. जर तुम्ही फीचर फोनमधून स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर, बाजारात एकापेक्षा एक उत्तम…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 19.11.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
येत्या २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. २० डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
****
नवी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या जी-20 शिखर परिषदेची एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य ही संकल्पना अद्यापही समर्पक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्राझिलच्या रीओ दी जेनेरिओ इथं जी-20 देशांच्या शिखर परिषदेत, सामाजिक समरसता तसंच भूक आणि गरिबी निर्मुलन, या विषयावर आयोजित चर्चासत्रांत ते काल बोलत होते. जी-20 गटानं महिला नेतृत्व आणि युवकांना केंद्रस्थानी ठेऊन, सर्वसमावेशक विकासाला प्राथमिकता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेचा परिणाम दक्षिणेकडील देशांत अन्न, इंधन आणि खतं या क्षेत्रावर होत असून, या मुद्यांना प्राथमिकता दिल्याखेरीज शिखर बैठकीतली चर्चा यशस्वी होणार नाही, याकडे त्यांनी जागतिक नेत्यांचं लक्ष वेधलं.
दरम्यान, जी-२० शिखर परिषदेत रिओ जाहीरनामा सादर करण्यात आला असून, यामध्ये जगभरातल्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटन, इटली, फ्रांस, नॉर्वे, पोर्तुगल आणि इंडोनेशियाच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
****
गांधीनगर इथं राष्ट्रीय रक्षा विद्यापिठांत अखिल भारतीय पोलीस सायन्स काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यावेळी उपस्थित असतील. अमित शहा दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, ते इतर काही कार्यक्रमांमध्येही सहभागी होतील.
****
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून के संजय मुर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव म्हणून ��े कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२० पासून या पदावर असलेल्या गिरीश चंद्र मुर्मू यांची ते जागा घेतील.
****
राष्ट्रीय युवक महोत्सव ११ आणि १२ जानेवारी २०२५ रोजी, विकसित भारत युवा नेतृत्व संवाद म्हणून साजरा केला जाणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या मंचामुळे देशातल्या युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची आणि आपला दृष्टीकोन त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. देशभरातल्या युवकांमधून प्रतिभा शोधणं आणि तिचा विकास करणं हा यामागचा हेतू असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध धंदे आणि पैशाची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर आणि फिरत्या पथकांमार्फत वाहनांची तपासणी केली जात आहे. या अंतर्गत निवडणूक पोलिस निरीक्षक राजेश दुग्गल यांनी काल फिरत्या पथकाच्या माध्यमातून इतर वाहनांसोबतच पोलिसांच्या वाहनांचीही तपासणी केली.
****
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल समुद्रकिनारी डिझेल तस्करी सुरू असताना पोलिसांनी नऊ आरोपींना रंगेहाथ पकडलं असून, त्यांच्याकडून बोट आणि टँकरसह एकूण दोन कोटी ���ाच लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातल्या काही किनाऱ्यांवर डिझेल तस्करी सुरू असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
****
कलावंतांना आपली कला राष्ट्र सेवेसाठी समर्पित करण्याची प्रेरणा संस्कार भारती देते, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी यांनी केलं आहे. ते काल बीड इथं संस्कार भारतीच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त घेतलेल्या कुटुंब मेळाव्यात बोलत होते. बीड इथल्या ऐतिहासिक दीपमाळेवर झालेल्या या कार्यक्रमात सहस्त्रदीपालंकार आणि गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
****
बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेतले पाचही सामने जिंकून भारत १५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
****
चीन खुल्या मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून शेनझेन इथं सुरुवात होत आहे. भारताच्या बी. सुमीथ रेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी यांची मिश्र दुहे��ीच्या ३२व्या फेरीत अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि जेनी गाई यांच्याशी लढत होईल. भारताचे सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या जोडीशी सामना होईल. पुरुष एकेरीत, लक्ष्य सेनचा सामना सातव्या मानांकित मलेशियाच्या ली झी जियाशी होणार आहे. महिला एकेरीच्या लढतीत, पीव्ही सिंधूची थायलंडच्या सुपानिडा कातेथोंगशी लढत होणार आहे.
****
राज्याच्या बहुतांश भागात थंडीची चाहूल लागली असून, अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट झाली आहे. काल अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी म्हणजे १२ पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. येत्या २४ तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
Text
‘ छाटले जरी पंख माझे ‘ , सुवर्णा कोतकर यांच्या माघारीनंतर संदीप कोतकर याची पोस्ट
संदीप कोतकर हे निवडणुकीला उभे राहणार होते मात्र ऐनवेळी त्यांनी त्यांची पत्नी सुवर्णा कोतकर यांना निवडणुकीला अपक्ष उभे केले त्यामुळे सुवर्णा कोतकर निवडणूक लढवतील की माघार घेतील ? यावर देखील शहरात चर्चा सुरू होती. सुवर्णा कोतकर यांनी अचानकपणे तांत्रिक अडचणीचे कारण देत उमेदवारी अर्ज मागे घेतला पण अद्यापपर्यंत कुठल्याही पक्षाला त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला नाही. सुवर्णा कोतकर यांचे पती आणि माजी…
0 notes
Text
ठाकरेंनी अंबादास दानवेंना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार का? खैरे 'गुरुजी' म्हणतात...
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून मी उमेदवारी मागितली नाही, तर जनतेचीच तशी मागणी आहे. जनताच म्हणते तुम्ही उभे राहा. उमेदवारीबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.आमदार संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर खैरे यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत…
View On WordPress
#Ambadas Danve#Chandrakant Khaire#chhatrapati sambhajinagar#loksabha election 2024#uddhav thackeray#अंबादास दानवे#उद्धव ठाकरे#चंद्रकांत खैरे#छत्रपती संभाजीनगर
0 notes
Text
Shivsena MLA Disqualification : सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत. झिरवळांचं मोठं विधान
सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र ठरतील” असं मोठं वक्तव्य विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केलं आहे. अपात्रतेची निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. दरम्यान, १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर व्यवस्थित अभ्यास…
View On WordPress
0 notes
Text
डॉ. कांता नलावडे साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
डॉ. कांता नलावडे साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.26 : भाजपच्या विविध राष्ट्रीय पदांवर आणि नंतर आमदार असताना आपल्या भाषणातून, आपल्या कार्यातून लोकांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. कांता नलावडे या येणाऱ्या काळात साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. राजकारण क्षणभंगुर तर साहित्य शाश्वत असते, असेही ते म्हणाले. मा��ी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांच्या “भरारी” कवितासंग्रहाचे…
View On WordPress
0 notes
Text
परिवर्तन
परिवर्तन
विश्वविजयाचा प्रचंड व दुर्दम्य संकल्प मनाशी बांधून तो तरूण राजपुत्र आपल्या सैन्यासह निघाला होता.स्वत:चे साहस,धैर्य,चातुर्य,कल्पकता,उदंड उत्साह या गुणांबरोबरच जीवास जीव देणारे सैन्य व आईचा आशीर्वाद घेऊन निघालेल्या राजपुत्राने देशामागून देश,लधायांमागून लढाया,युद्धामागून युद्धे जिंकली ती आपल्या प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर.
��ी प्रचंड व अखंड घोडदौड सतत चालू होती. नुकतीच एक अवघड मोहीम जिंकून आल्यावर हा तरूण राजपुत्र बागेतून नयनरम्यं वनश्री पाहत फिरत होता. वनश्रीचे दर्शन घेत असतानाच राजपुत्राच्या समोर केसांचे संपूर्ण मुंडण केलेला,हाती लांब सोटा व अंगावर करड्या रंगाचे वस्त्र परिधान केलेला तेजस्वी पुरूष उभा राहिला. त्याच्या चेहर्यावरिल तेज पाहून राजपुत्र प्रभावित झाला.मंद स्मित करीत तो तेजस्वी पुरूष राजपुत्राला म्हणाला,”राजपुत्रा ! कुठे निघालास ? मी येऊ तुजबरोबर ?”
त्याबरोबर राजपुत्राने त्या तेजस्वी पुरूषाकडे एक कटाक्ष टाकला. राजपुत्र त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाने आधीच प्रभावित झाला होता. आता त्याच्या वाणीती�� सामर्थ्य पाहून त्याच्या मनात एकदम पूज्यबुद्धी उत्पन्न झाली व त्याने आपल्याबरोबर येण्यास आनंदाने संमती दिली. थोड्या अंतरावर गेल्यावर त्या तेजस्वी पुरूषाने राजपुत्रास विचारले, “राजपुत्रा,तू कोणत्या उद्देशाने या मोहिमा आखत आहेस ?”
त्यावर तो राजपुत्र उत्तरला, “महाराज,मी जग जिंकण्याच्या उद्देशाने,जगास आपले अंकित करण्याच्या मनोदयाने या मोहिमांवर आलो आहे.”
राजपुत्राच्या बोलण्यावर सौम्यं शब्दांत तो भिक्षू म्हणाला, “म्हणजे राजपुत्रा, तू जगास आपले दास बनविण्याच्या उद्देशाने आपली मातृभूमी सोडून इतक्या लांब आला आहेस तर !”
“होय ! आपल्या बाहुबलाच्या-तलवारीच्या जोरावर हे जग जिंकून त्यास आपले मांडलिक बनविणे ही माझी महत्वाकांक्षा आहे. माझ्या महत्वाकांक्षेलाच मी मूर्त स्वरूपात उतरवीत आहे.”
“पण राजपुत्रा, जरा तू आपल्या अवलंबिलेल्या या मार्गाबाबत कधी सारासार विचार केला आहेस ? स्वत:ची अवास्तव व अवाजवी उच्चाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तू किती निरपराधी, निष्पाप जीवांच्या प्राणाशी खेळ करतोयस. हा रक्तपात, ही हानी केवळ एका नश्वर संपत्तीसाठी अन केवळ सुखोपभोगासाठी ? तुला आपली अविचारी व राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा रक्तपात करण्याचा अधिकार कुणी दिला ? ही अराजकसदृश परिस्थिती, शांततेच्या जागी हे भीतीचे साम्राज्यं स्थापण्याचा तुला अधिकारच काय ?”
भिक्षूच्या स्पष्टवक्तेपणाचे त्यास आश्चर्य वाटले. “यात अधिकाराचा प्रश्नच काय ? दुर्बलांबर सबलांची सत्ता प्रस्थापित होणे हा तर सृष्टीचा अलिखित नियमच आहे. या नियमास अनुसरूनच माझे वर्तन आहे. जगावर राज्यं प्रस्थापित करायचे तर ��लवारीला पर्याय नाही.
“पण तुला ही शक्ती. हे बाहुबल,हे राज्यपद बहाल करण्यात आले आहे ते त्यांचे रक्षण करण्यासाठी. त्यांचे स्वातंत्र्यं हिरावून त्यांना गुलाम बनविण्यासाठी नव्हे. तुझ्या हाती ही तलवार आहे ती दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी.पण याचा वापर होतो आहे तो रक्तपात करण्यासाठी,अराजकता माजवण्यासाठी,विषमता प्रस्थापित करण्यासाठी,दुसर्यांना गुलाम बनवण्यासाठी.अशा शस्त्रांचा,अशा अस्त्रांचा उपयोगच काय ? अशी शस्त्रे मोडीतीच निघायला हवीत. या शस्त्रांच्या दहशतीने मानवी मनाला फार थोड्या काळाकरिता ताब्यात धरून ठेवता येते,त्यावर हुकूमत गाजवता येते. अशी हुकूमत क्षणार्धात नाहीशी होते,कोलमडून पडते. तू आपल्या तलवारीच्या जोरावर आतापर्यंत भयंकर नरसंहार करून सर्वत्र धावपळीचे,दहशतीचे साम्राज्यं उभे केले आहेस. तसे पाहता मानवी मन हे संवेदनक्षम. या दहशतीऐवजी लोकांना गरज असते प्रेमाची, प्रेमाने वागनविण्याची,समजून घेण्याची. सततच्या लढायांमुळे पाहा हा आजूबाजूचा मुलूख कसा उजाड,वैरण झाला आहे. येथल्या माणसांवरच काय, पण पशू-पक्षी,झाडापनांवरदेखील दहशतीची छाया पसरली आहे. माणसाला गरज असते ती शांत वातावरणाची. शांततेच्या काळात प्रत्येक जण आपापल्या नित्यक्रमात गर्क असतो.त्याचा परिणाम राष्ट्राच्याच नव्हे तर विश्वाच्याही उत्थानात होतो. तर त्याउलट त्यांना दास बनविल्याने समाजात विषमता निर्माण होते. मनुष्याचे माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्कं नाकारण्यात येतात. तुझ्यात आणि सामान्यं दासात फरक तो काय ? तुला व त्याला दोन हात, दोन पाय, दोन डोळे ,दोन कान, त्याला व तुला एकच डोके,भूक लागणारे पोट. मग त्याला तू तुझ्यापेक्षा हीन म्हणून का वागवावे ? निसर्गाने मानवाला विचार करण्याची शक्ती प्रदान केली आहे. त्याचा उपयोग तू दासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी केलास ?”
“नाही महाराज,तशी गरजच कधी मला पडली नाही.”
“राजपुत्रा! तू केवळ तुझेच सुख पाहिलेस.यामुळे माणसामाणसातील दरी वाढत जाते. एकमेकांना दुसर्याच्या सुखाचा हेवा वाटून वासना निर्माण होते. वासना निर्माण झाली की, ती भागविण्यासाठी, ती तृष्णा शमविण्यासाठी चढाओढ लागते अन सर्व दु:खास,रक्तपातास कारणीभूत अशी वर्चस्वाची भावना निर्माण होते. ही भावना वाढीस लागली की, सबल-निर्बल, गरिब-श्रीमंत असा झगडा सुरू होतो. या झगड्यात कुणीच सुखी होत नाही. मात्र जीवनास एक अनिश्चितता,दहशत प्र��प्त होते. समोर असलेली व्यक्ती ही माझ्याच दर्जाची आहे.माणूस म्हणून तिचेही जगण्याचे,वावरण्याचे काही हक्कं आहेत. तिलाही ते मिळावेत यासाठी जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा सार्वत्रिक बंधुभाव निर्माण होतो व हा बंधुभाव अनिश्चितता व दहशत संपविण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणून हे राजपुत्रा, तू आपले नश्वर आणि क्षणिक वैभव वाढविण्यासाठी व्यर्थ रक्तपात चालविला आहेस तोही व्यर्थच आहे. हे जीवन आधीच यातनांची खाण आहे. त्यात तू आणखी भर टाकतो आहेस.तू आपल्या शरीराचे चोचले पुरविण्यासाठी जो जग जिंकण्याचा निरर्थक खटाटोप चालविला आहेस तो अस्थायी आहे. तो कधी ना कधी नाश पावणारच ! परंतु या प्रलयात अनेकांच्या जीवनाची मात्र राखरांगोळी होणार आहे. या जगात शाश्वत, चिरंजीवी असे काही नाही. तेव्हा तू विश्वविजयाच्या गृष्टीने जो रक्तपात चालविला आहेस तो फोल आहे. जगाला तलवारीची गरज नाही,तर प्रेमाची गरज आहे. प्रेमाने प्राणिमात्रांना जिंकता येते,आपलेसे करता येते. ज्या गोष्टी दहशतीने करता येत नाहीत त्या प्रेमाचे दोन गोड शब्द बोलण्याने साध्यं होतात. तर याउलट सततच्या युद्धपरिस्थितीमुळे राज्येच्या राज्ये, साम्राज्ये नाश पावतात, सुंदर नगरे,शेते उजाड होतात. परिणामी लोक अन्नं, वस्त्रं, निवारा या आपल्या मूलभूत गरजांना पारखे होतात. युद्धाची झळ दोन्ही बाजूंना सारखी सोसावी लागते. अपमानास्पद स्थिती प्राप्त झाल्यामुळे वैमनस्यं वाढीस लागते. याची परिणिती विनाशात होते. तेव्हा काही कारण नसताना या विनाशाला निमंत्रण देण्याचे कारणच काय ?”
बुद्धांच्या मुखांतून बाहेर पडत असलेले ते ओजस्वी शब्द जगज्जेतेपदाची स्वप्ने पाहात असलेला सिकंदर एकाग्रपणे ऐकत होता, आपल्या अंत:करणात साठवत होता. थोड्या वेळाने भरल्या अंत:करणाने बुद्धांच्या चरणांजवळ झुकून तो म्हणाला,”महाराज, मी चुकलो. तारूण्याच्या या उत्साहात माझ्या हातून अनेक चुका घडल्या. माझ्या या कृत्यांतील फोलपणा माझ्या ध्यानात आला आहे.”
राजपुत्राचे हे पश्चातापदग्ध बोलणे ऐकून बुद्ध त्यास म्हणाले,”राजपुत्रा,आपल्या हातून घडलेल्या वाईट कर्मांवर पश्चाताप करणाराच खरा माणूस असतो. तर आपल्या वाईट कृत्यांवर खूश होणारा,त्यातून आनंद मिळवणारा मानूस राक्षस असतो. माणूसपणाची साक्ष तू दिली आहेस. तेव्हा आपल्या राज्यात परत जा व लोककल्याणकारी कामे कर. तेव्हाच तू लोकांच्या ���ृदयावर राज्यं करशील. लोक आदराने तुझे आदराने नाव घेतील.”
बुद्धांच्या तत्वज्ञानाने ,शिकवणुकीने मनाचा खोल वेध घेतलेला तो राजपुत्र उठला व आपल्या सैन्यासह , नव्या मनुसह स्वत:वर स्वत:वर विजय म��ळविण्याच्या आकंक्षेने स्वदेशी रवाना झाला.
© :- पंकज कालुवाला
1 note
·
View note
Text
सावरकर व जाती निर्मूलन- डॉ मिलिंद कुलकर्णी यांचे व्याख्यान.
सावरकर व जाती निर्मूलन- डॉ मिलिंद कुलकर्णी यांचे व्याख्यान.
कणकवली : १६ नोव्हेंबर १९३० या ऐतिहासिक दिवशी रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्व जातींचे एकत्र सहभोजन आयोजित केले. त्यांनी केलेल्या जाती निर्मूलनाच्या प्रयत्नाबाब�� डॉ मिलिंद कुलकर्णी उद्या १६ नोव्हेंबर २०२२ ला सायंकाळी ७ ते ८ या वेळेत बोलतील. हे व्याख्यान अनादि मी अनंत मी , सिंधुदुर्ग या मंचाने आयोजित केले असून शुभांगी पवार, डॉ सतीश पवार व सरिता पवार भाग घेतील. कार्यक्रमाचे थेट…
View On WordPress
0 notes
Text
Ajit Pawar : दोन ते तीन दिवसांत अजित पवार फायनल निर्णय घेतील, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू आमदाराचं भाकित
https://bharatlive.news/?p=95884 Ajit Pawar : दोन ते तीन दिवसांत अजित पवार फायनल निर्णय घेतील, मुख्यमंत्र्यांच्या ...
0 notes
Text
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.11.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यात मेर�� बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केलं. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाचा दिवस उत्सव म्हणून साजरा करावा, सर्वांनी यात एकजुटीनं आणि उत्साहानं सहभागी व्हावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.
****
भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या आज राज्यात ठिकठिकाणी स��ा आज होत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विधानसभा निवडणुकीसाठी आज सोलापूर, पुणे आणि सांगली इथं प्रचार करत आहेत, तर भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई आणि पुणे इथं प्रचार करतील.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज दोन रॅलींना संबोधित करणार असून प्रियांका गांधी तीन रॅलींना संबोधित करतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार सोलापूर, पुणे आणि नाशिकमध्ये प्रचार करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही सातारा आणि रायगडमध्ये प्रचार करतील.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबई आणि ठाण्यात आज प्रचार करणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गुयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते नाईजेरियामधील वरिष्ठ नेत्यांसोबत धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासंदर्भात चर्चा करतील. त्यानंतर १८ तारखेला ते ब्राझील इथं सुरू असलेल्या जी-२० शिखर परिषदेला उपस्थित राहतील. १९ ते २१ दरम्यान पंतप्रधान गयाना इथं जाणार आहेत.
****
उत्तर प्रदेशातील झाशी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातील, बाल अतिदक्षता विभागाला, काल रात्री लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता जिल्हा अधीक्षक अविनाश कुमार यांनी वर्तवली. या बाल अति दक्षता विभागात ५४ बालकं दाखल झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेचा आढावा घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल अतीव दुःख व्यक्त केलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृत बालकांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर जखमी बालकांच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
****
रेल्वेच्या माध्यमातून राज्यात १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वै��्णव यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ६ हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गांचे काम सुरू असल्याची माहितीही वैष्णव यांनी यावेळी दिली.
****
देशभरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत निर्माण करण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा तरतुदींत वाढ करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं केलेल्या लक्षणीय बदलाचं, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनी कौतुक केलं आहे. काल नवी दिल्ली इथं इपीएफओच्या ७२ व्या स्थापना दिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करताना सचोटी, समर्पण, सहानुभूती आणि व्यावसायिकतेची मूल्य जोपास���वी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
आज देशभरात राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जात आहे. समाजातील स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी पत्रकार दिन साजरा केला जातो. पत्रकारितेचं कर्तृत्व, पारदर्शकता आणि सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकारांच्या जबाबदारीला प्रोत्साहन देणं हे या दिवसाचं उद्दीष्ट आहे.
****
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्यासाठी लातूर जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समिती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवार किंवा प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या किमान तीन दिवस अगोदर प्रमाणिकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज समितीकडे सादर करावा. समितीकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४८ तासांत अर्ज निकाली काढण्यात येतील असं प्रशासनाने म्हटलं आहे.
****
लातूर शहरात मतदान जनजागृतीसाठी आज मॅरेथॉन आणि वॉकेथॉनचं स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी या स्पर्धा झाल्या.
****
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणीच्या कार्यपद्धतीबाबतचं प्रशिक्षण काल पार पडलं.
दरम्यान, मतदान प्रक्रियेसाठी परभणी जिल्हा पोलिस दल सज्ज झालं आहे. निम लष्करी दलाच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या असून संवेदनशील भागात संचलन केलं जात आहे
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दरम्यान, सातारा शहर आणि जिल्ह्यात काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागातही सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळं भातशेतीचं नुकसान झालं आहे.
****
0 notes
Text
डॉ. कांता नलावडे साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
डॉ. कांता नलावडे साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.26 : भाजपच्या विविध राष्ट्रीय पदांवर आणि नंतर आमदार असताना आपल्या भाषणातून, आपल्या कार्यातून लोकांमध्ये ओळख निर्माण करणाऱ्या डॉ. कांता नलावडे या येणाऱ्या काळात साहित्य क्षेत्रातही भरारी घेतील, असा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. राजकारण क्षणभंगुर तर साहित्य शाश्वत असते, असेही ते म्हणाले. माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे यांच्या “भरारी” कवितासंग्रहाचे…
View On WordPress
0 notes
Text
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती. ती आम्ही देत आहे. एकनाथ शिंदे हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता एकनाथ शिंदे म्हणून शपथ घेतील. आणखी काही लोक आमच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही फडवणीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडवणीस म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी…
View On WordPress
0 notes
Text
मांजरा नदीकाठ आज वृक्ष दिंडीच्या वारकऱ्यांनी घोषणानीं दणाणून सोडला
मांजरा नदीकाठ आज वृक्ष दिंडीच्या वारकऱ्यांनी घोषणानीं दणाणून सोडला
चौदा गावात वाजत गाजत झाली लागवड ज्या गावात वृक्ष लागवड तिथे यात्रेचे स्वरूप ; लोकांमध्ये मोठा उत्साह ज्या महाविद्यालयांनी वृक्ष लागवड केली आहे, ते महाविद्यालय संगोपनाची पण वेळोवेळी दखल घेतील विद्यार्थी हे वृक्ष लागवडीचे समाजातील दुत म्हणून काम करतील लातूर,(जिमाका)दि.24:- वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे, हाही नागरिकांना प्रत्यय आलेला आहे, वृक्ष लागावडीसाठी प्रयत्न केल्यापेक्षा जास्तीचा…
View On WordPress
0 notes
Text
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
दसरा मेळावा वाद : “शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर…”; मंत्री अब्दुल सत्तारांचा शिवसैनिकांना इशारा
राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण तापू लागलं आहे. ��ुंबई मनपाने अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. अशात हा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मात्र, तत्पूर्वी दसरा मेळाव्याला परवानगी मिळाली नाही, तर शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा घेतील, अशी धमकी शिवसैनिकांकडून देण्यात येत होती. यावरून मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना इशारा दिला आहे. हेही वाचा –…
View On WordPress
#dasara melava#eknath shinde#उद्धव टाचक्रे#ताज्या मराठी बातम्या#दसरा मेळावा#पॉलिटिक्स बातम्या#बातम्या मराठीत#मराठी बातम्या#मराठीतील ताज्या राजकारणाच्या बातम्या#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्राचे राजकारण#महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या#महाराष्ट्राच्या राजकारणातील बातम्या#मुंबई#मुंबई उच्च न्यायालय#मुंबई ��ातम्या#मुंबई महानगरपालिका कार्पोरेशन#राजकारण बातम्या#राजकारणाच्या बातम्या मराठीत#राजकीय बातम्या#लेटेस्ट मराठी बातम्या#शिवाजी पार्क
0 notes
Text
Ahmednagar Shivsena | मातोश्रीवरून जी भूमिका तीच शहर शिवसेनेचे भूमिका : कदम
#Ahmednagar Shivsena | मातोश्रीवरून जी भूमिका तीच शहर शिवसेनेचे भूमिका : कदम #Shivsena #Mumbai #Maharashtra
Ahmednagar Shivsena | अहमदनगर (दि २५ जून २०२२) : अहमदनगर शहरात हिंदुऋदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेना उपनेते स्व. अनिल भैया राठोड यांनी शिवसेना रुजवली आहे. अहमदनगरचे सर्व व शिवसैनिक, पदाधिकारी, नगरसेवक हे कायम पक्षाच्या व मातोश्रीच्या आदेशानुसारच भूमिका घेतात. राज्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे निर्णय घेतील.…
View On WordPress
0 notes
Text
कहानी मे ट्विस्ट । एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा ब्युरो । मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री असतील असे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आज सायंकाळी ठीक ७.३० वाजता फक्त एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस हे स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर राहणार आहेत असे त्यांनी सांगितले. ब्युरो न्यूज, कोकण…
View On WordPress
0 notes