#घनदाट
Explore tagged Tumblr posts
glorious-maharashtra · 17 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.10.2024 रोजीचे सकाळी: 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 October 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उमेदवार यादी जाहीर
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ चिन्ह वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी
आणि
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा ५९ धावांनी विजय
सविस्तर बातम्या
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्या��्या प्रक्रियेला वेग आला आहे. जवळपास सर्वच प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी, वसमत मधून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, तर कळमनुरी मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला.
परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.
जालना विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल तसंच त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे यांनी, बदनापूर मधून भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बबलू चौधरी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे अब्दुल सत्तार, कन्नड मधून महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदयसिंह राजपुत, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे, फुलंब्री मधून बसपाचे अमोल पवार, औरंगाबाद मध्य मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पूर्वमधून बसपाकडून तीन अर्ज तर तीन अपक्ष, औरंगाबाद पश्चिम मधून बहुजन समाज पार्टीचे कुणाल दांडगे यांनी, पैठण मतदार संघातून महायुतीकडून शिवसेनेचे विलास भुमरे, तर गंगापूर मधून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी काल उमेदवारी काल अर्ज दाखल केले.
लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, अहमदपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील, उदगीर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंगा इथून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लिंगनअप्पा रेशमे, तर औसा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांनी काल अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्ह्यात भूम - परंडा - वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी अर्ज दाखल केला. उस्मानाबाद मतदारसंघात बसपाचे सुभाष गायकवाड, तुळजापूर मधून भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील तसंच माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाच्या वतीनं दोन तर एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला. उमरगा मतदारसंघात दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नांदेड लोकसभा मतदारसंघात काल काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून, लोकसभेसाठी आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. आठ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डी मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, पारनेर मधून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी, राहुरी मधून भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी, अकोले इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर किरण लहामटे यांनी, तर अहमदनगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. 
****
येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील, मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर, ठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे तसंच मनसेचे अविनाश जाधव, महाविकास आघाडीकडून कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मधून आदित्य ठाकरे, यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे अशोक उईके, दक्षिण सोलापूर मधून भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख, तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
काँग्रेस पक्षानं ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदार संघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली-नाना पटोले, ब्रह्मपुरी-विजय वडेट्टीवार, तेओसा-यशोमती ठाकूर, संगमनेर -विजय बाळासाहेब थोरात तर पलूस इथून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना उमेदवारी देण्यात  आली आहे, लातूर ग्रामीण धीरज देशमुख, हदगाव माधवराव पाटील, ��ोकर - तिरुपती कोंडेकर, नायगाव - मिनल पाटील खतगावकर, पाथ्री - सुरेश वरपुडकर, तर फुलंब्री मतदारसंघातून - विलास औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल ४५ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये बारामती मतदार संघातून युगेंद्र पवार, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, मुंब्रा-जितेंद्र आव्हाड, तासगाव मधून रोहित आर पाटील तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मराठवाड्यात घनसावंगी मतदार संघातून माजी मंत्री राजेश टोपे यांना, वसमत-जयप्रकाश दांडेगावकर, अहमदपूर-विनायक पाटील, उदगीर -सुधाकर भालेराव, भोकरदन-चंद्रकांत दानवे, किनवट-प्रदीप नाईक, जिंतूर-विजय भांबळे, केज-पृथ्वीराज साठे, बदनापूर-रुपकुमार उर्फ बबलू चौधरी, आष्टी मतदार संघातून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी काल प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.म्हाविकास आघाडीनं या मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर दिली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, नाशिक जिल्ह्यात नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, नाशिक शहरातल्या चारही मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी काल नाशिकमधल्या काँग्रेस भवनला कुलूप लावून आपला संताप व्यक्त केला.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
 या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह वापरण्याची सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेला अर्ज फेटाळण्यात आला. अजित पवार गटाने घड्याळ हे चिन्ह वापरताना, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा उल्लेख प्रत्येक वेळी करावा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदार जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे...
 Byte… 
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात काल मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद या कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
****
महिला क्रिकेटमध्ये, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ५९ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला ४५व्या षटकात २२७ धावांवर सर्वबाद झाल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला न्यूझीलंडचा संघ १६८ धावाच करु शकला. या मालिकेतला दुसरा सामना परवा रविवारी अहमदाबाद इथं होणार आहे.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने सात गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६ धावा झाल्या होत्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया निर्भय तसंच निष्पक्ष वातावरणात होण्यासाठी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथं काल एका व्यक्तीकडून बेहिशेबी साडे सात लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली. 
****
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं दाना चक्रीवादळ मध्यरात्रीच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं. प���िणामी ओडिशाच्या केंद्रपाडा आणि भद्र�� जिल्ह्यात सुमारे १२० किलोमीटर प्रतितास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. हे वादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकलं आहे.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 1 year ago
Text
जादुई जंगल
जंगल म्हणजे तर जादूचपक्षांचे गोड आवाज तिथे ।घनदाट झाडातून डोकावतोकधी कधी दिसतो सूर्य जिथे ।अचानक कधी समोर जनावरससा मोर हरीण त्यांचे घर तिथे ।वाहे खळखळ पाण्याचा झराभेटते वाहणारी नदीही जिथे ।दरदरून फुटतो घाम कधी तरक्षणात मिळतो आनंद तिथे ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलीस नक्षल्यांमध्ये चकमक, एक नक्षलवादी ठार
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात आज सकाळी १० वाजतापासून पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, यात एका नक्षलवाद्याला ठार करण्यात पोलिसांना यश आले. सोबतच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य व शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने त्याठिकाणी संपर्क साधण्यास अडचण निर्माण होत असून, अजूनही चकमक सुरू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gop-al · 2 years ago
Text
                       मैत्री सुख
       ग्रामीण भागातील राहणीमानाचा गोडवा काही वेगळाच असतो आणि ते सुख आत्मसात करायला भेटलं स्वतःला भाग्यवान समजतो पाचवी सहावी ची गोष्ट आहे  आम्ही बालमित्र दिवसभर सोबत असायचो सकाळची शाळा त्यानंतर दिवसभर खेळणे असा दिनक्रम असायचा आमचे मित्र म्हणजे सर्व नमुने कोणी अभ्यासात हुशार तर कोणी भांडणात हुशार कोणी खेळात हुशार तर कोणी मस्ती करण्यात हुशार अशी आमची खेळीमेडीची सर्कस बाल वयातील मित्र जीवाला जीव देणारे होते हे मात्र नक्कीच आणि ते आताही आहेत कोणी मित्रांमध्ये गरीब होतं तर कोणी श्रीमंत कोणी नोकरी वाल्याची मुलं तर कोणी शिक्षकाची यामध्ये सर्वात वेगळा मित्र होता तो श्रीमंत घरचा आणि मारवाडी मुलगा तो नेहमी पहायचा आपल्या मित्रांकडे कोणतीही वस्तू घ्यायला पैसे नसतात आणी आपल्या मित्रा ची हौस  पुर्ण होत नाही म्हणून यावर आपण काय करू शकतो म्हणून त्यांनी एक शक्कल लढव��ी घरातून पैशांची पुटली घेऊन आला त्यावेळी आमची आमचे शिक्षक यांचे कडे शिकवणी असायची त्यादिवशी शिकवणी सुरू होण्याअगोदर तो मारवाडी मित्र आम्हाला सांगू लागला माझ्याकडे पैसे आहेत ते आपण सर्व मिळून वाटून घ्या आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व त्या पैशातून तुम्ही खरेदी  करा म्हणजे आपले सर्व काम होईल पुस्तक, पाटी, दप्तर, पेन, पेन्सिल,सिनेमा जे वाटेल ते खरेदी करा आमचे मित्रांनी सांगितल्यावर आम्ही त्याला म्हटले की तू एवढे पैसे कुठून आणले घरून चोरून तर आणले नाहीस ना हे पैसे तर तो म्हणाला माझे बचत  केलेले आहेत परंतु आम्हाला ती गोष्ट खोटी वाटली आणि सर्व मित्र मिळून ते पैसे घेण्यास आम्ही सर्व मित्रांनी नकार दिला पावसाळ्याचा तो वेळ होता गांजर गवत मोठ्या प्रमाणात असायचं आमच्या मित्राने आम्हाला म्हटलं तुम्ही जर हे पैसे घेत नसाल तर मी हे पैसे फेकून देईल तुम्ही हे पैसे मुकाट्याने घ्या परंतु आम्ही त्याला नकार दिला आणि त्याने म्हटल्याप्रमाणे केले पैशाचं चुंबड त्याने खोललं 50 पैसे 1चे चे कलदार होते त्याने सर्व पैसे गांजर गवतामध्ये फेकले आम्हाला विश्वास सुद्धा बसला नाही तो असे करेल परंतु  घनदाट असलेल्या त्या गांजर गवतामध्ये  त्याने पैसे  फेकल्या बरोबर आम्ही सर्व मित्र ते शोधण्यासाठी तुटून पडलो, कारण आम्हला  माहित होते ते पैसे त्यानी आमच्या साठी आणले होते आणि  ते चोरीचे तर नसतील  ना ही शंका  घेणे ही चुकीचे होते म्हणून आम्ही सर्व मित्र मिळून ते गांजर गवतातील  पैसे  शोधून काढले  ज्यांना जेवढे मिळाले तेवढे  त्याचे, ही गोष्ट आमच्या सरांच्या  कडे पोहचली सरांचा स्वभाव कडक होता काय झाले कोणीच सांगण्यास तयार  नाही, परंतु आमच्या मित्राने झालेला प्रकार सांगितला मारवाडी मित्राच्या घरी चौकशी  झाली की चोरी वगैरे काहीही केली नव्हती  परंतु माझ्या सर्व मित्रांना सर्व सुख सुविधा भेटाव्या म्हणून त्याने स्वतःला भेटलेल्या खर्चाच्या पैशातून मित्रां चे सुख शोधले  होते हाच प्रामाणिक उद्देश त्याचा होता अशा  मैत्रीला सलाम.
-गोपाल मुकुंदे 
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
घनदाट लांब केसांसाठी करा या गोष्टीचा वापर, दोन आठवड्यात रिझल्ट नक्की अनेक अभिनेत्री वापरतात हा उपाय
घनदाट लांब केसांसाठी करा या गोष्टीचा वापर, दोन आठवड्यात रिझल्ट नक्की अनेक अभिनेत्री वापरतात हा उपाय
घनदाट लांब केसांसाठी करा या गोष्टीचा वापर, दोन आठवड्यात रिझल्ट नक्की अनेक अभिनेत्री वापरतात हा उपाय केसांवर आणि टाळूवर कांद्याचा रस लावल्याने होणारा फायदा तुम्ही अनेकांकडून ऐकलेच असेल. अनेक तज्ञ लोकांचा असा दावा आहे कांद्यांच्या रसामुळे केस ग���ती थांबते आणि नवीन केस वाढू लागतात. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री देखील आहेत ज्यांना याची १००% खात्री आहे. याच कारणामुळे त्या बिधास्तपणे कांद्याच्या…
View On WordPress
0 notes
miraculouslyyoursblog · 4 years ago
Text
*शाळेचा माझा पहिला दिवस*
आज दहा ऑगस्ट.माझा शाळेमध्ये हजर होण्याचा पहिला दिवस आज सुध्दा ते दिवस आठवला की अंगावर शहारा आणि तेवढीच हुरहुर वाटणारा तो दिवस.
आदल्या दिवशी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेच्या ऑर्डर दिल्या. मला ऑर्डर मिळाली.जावली पंचायत समितीकडून आता महाबळेश्वर तालुक्यात असलेले आरव हे ठिकाण जेथून चगदेव, सिंधी, यासारखी सातारा जिल्ह्याच्या बॉर्डर वर असलेली अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत किंवा सध्या पेपरमधे येत असतात.त्यांच्या जवळ असलेले हे आरव हे ठिकाण माझ्यासारखेच अनेक शिक्षकांना त्या भागातल्या ऑर्डर मिळालेल्या होत्या. आदल्या दिवशी अधिकार्‍यानी शिवसागर जलाशयांमध्ये असलेल्या सर्व शिक्षकांची मिटिंग हॉलमध्ये घेतली आपला प्रवास कुठून कसा होणार आहे याची पुसटशी कल्पना दिली कसे द्यावे ते सांगितले त्यावेळेस अंगावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले.
दुसरे दिवशी आमच्याच आळीतील श्री गोरख शिंदे या माझ्या बंधूला घेऊन आमचा प्रवास शाळा सर करण्यासाठी सुरू झाला एकतर घरात अठरा पगड दारिद्र्य त्यामुळे नोकरी शिवाय पर्याय नव्हता एका पोत्यामध्ये एक महिन्यावर पुरेल एवढी चटणी कडधान्य रॉकेल स्टो हे साहित्य घेतला ऑर्डर घेतली कपडे घेतले झोपण्यासाठी दोन चादर घेतल्या. अन् शाळेच्या दिशेने प्रवास सुरू झाला लिंबाचीवाडीतून सकाळी लवकरच निघालो कारण सकाळी साडे नऊची बामनोली एस.टी सातारा डेपोतून हलते असे सांगण्यात आले होते त्यामुळे बंधु व मी प्रवासाला लागलो. एसटीनेच स्टॅंडवर पोचलो. माझ्यासारखे अनेक शिक्षक माझ्यासारखाच बाडा बिस्तार घेऊन स्टॅंडवर आलेली होती. आम्ही सर्वांनी बामणोली एस.टी वाट पहिली.आम्ही सर्वजण एसटीमध्ये बसलो अन् प्रवाशांना लागला
यापूर्वी जावळीच्या जंगलाच्या संदर्भात पुस्तकात वाचले असेल पण प्रत्यक्ष अनुभव कधीच घेतला नव्हता एसटीने सातारा सोडला हळुहळु ती कास पठाराला लागली. कांसच्या जवळ आली. जशी पुढे जाऊ लागली तसेच दोन्ही बाजूला असलेले घनदाट जंगल सतत पडणारा पाऊस या गोष्टी पाहून खरंतर मनामध्ये भीतीच वाटत होती कधी आपलं गाव येणार असं वाटतं पण एस्टीचा अखंड प्रवास चालत होता एक एक व्यक्ती एक एक शिक्षक कालपासून आपली गावं आली की उतरत होते सर्वांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देत होते मला पण वाटत होतं . जंगलातच कुठेतरी आपलं पण गाव असेल पण कुठलं काय एसटी बामनोली मध्ये आली आणि आमच्या पैकी राहिलेले काही एक शिक्षक एसटीने बामणोलीत मध्ये उतरलो. त्या ठिकाणी आल्यानंतर तो परिसर पाहिला. उतरत्या छपराची घर लाल दगड आणि वेगळीच भाषा बोलणारी माणसं. आम्हांला वाटल लवकर पुढला प्रवास सुरू होण���र आहे किंवा येथेच पुढे चालत आपल्या शाळेच्या गावात जायाचं असेल पण कशाचं काय एका शिक्षकांनी सांगितले आता सोडा आपली भाकरी अन् खायला सुरुवात करा तीनला लाँच त्या वेळी पुढचा प्रवास सुरू होईल. तोपर्यंत बसा. खरं पाहिलं तर आम्ही बामणोली पर्यंत येईपर्यंत भिजलो नव्हतो. पण एसटीतून उतरल्यापासून सतत पडणारा पाऊस यामुळे बऱ्यापैकी अंगांमध्ये थंडी भरायला सुरुवात झाली होती. छत्रीने अंग मोडायला सुरुवात केली होती सर्व काडया मोडायला मोडल्या होत्या. आता ते पोत्याला साहित्य चादर कपडे या सर्वांनी भिजायला सुरुवात केली होती काय करावे सुचत नव्हते असे करतच ३ वाजले.कोणीतरी आवाज दिला लॉन्च आली आणि आम्ही त्या समुद्रासारख्या दिसणाऱ्या शिवसागराच्या ठिकाणी पोहोचलो.लाँचमध्ये प्रथमच चढत होतो. लाँच म्हणजे काय असते ती गोष्ट प्रथमच पाहत होतो. बरेच नवे संबोध आज मिळत होते. तसाच गप्प लाँच वर चढलो. एका कोपऱ्यात जाऊन बसलो. आता पाण्यातून प्रवास सुरू झाला होता. लॅांन्चा धडधड आवाज येत होता. जुने प्रवासी गप्पा मारत होते. लांन्चावाला नवी शिक्षकांच्या ओळखी करून घेत होता. कोण कोठे उतरणार आहे याची खात्री करत होता. आम्ही मात्र गप्प होतो.मी मात्र शांत होतो. मला वाटायचे त्या कुठल्यातरी पाण्याच्या किनाऱ्यावर आपलं गाव दिसेल त्या गावा उतरायचं आणि लगेच गावात गेल्यानंतर प्रमुखाची गाठ भेट घ्यायची आणि चित्रपटाप्रमाणे प्रवास सुरू करायचा. पण कशाचं काय लाँच सोळशी खोऱ्यांमध्ये गेली तिथून पुन्हा माघारी आली. पुन्हा शिंदी खोऱ्यांमध्ये घुसली. अशी गरज करत करत पुढे ती जात होती आता मात्र मी रडकुंडीला आलो होतो. मी आणि माझ्या सारखे एक शिक्षक तेवढेच राहिलेलो होतो. सांयकाळचे सहा वाजायला आले होते तरी सुध्दा गावचा पत्ता नव्हता. रात्र पडत चालली होती मी खूप घाबरलो तो चारी बाजूला दिसणारे पाणी जंगल. काय करावे ते कळत नव्हते माझे बंधू गोरख शिंदे सुद्धा घाबरलेले दिसत होते. आता ह्या असल्या अंधारात आम्हाला मोरणीला उतरवण्यात आले. आणि मला सांगण्यात आले की येथुन पुढे एक किलोमीटर अंतरावर आरव हे गाव आहे तुम्ही या जंगलातून उत्तरेला चालत जा. अशा रात्रीत परिसर नवा .रात्र, परिसराचा अंदाज नाही बॅटरीचा चांगली चालत नव्हती. वेगवगेळ्या प्राण्यांचे आवाज येत होते. सापांची भीती होती. अशा परस्थितीत डोक्यावर बोझा. बंधु जवळ पिशवी .सर्व तोलत पुढे जात होतो. सर्व कपडे भिजले होते. काही सुचत नव्हतं जंगलातून पुढे जात होतो तो काळाकुट्ट अंधार होता कुठे घराचा किंवा कशाचा पत्ता लागत नव्हता. बराच वेळ चालतोय तरी ��ाव दिसत नव्हती काका म्हणाला बघ बाबा माघारी फिरू या पहिल्या गावात जाऊया. काय करावे ते सुचत नव्हते. सूचन्याचे ते वय सुध्दा नव्हते एकोणीस वर्षी सर्व्हिसला लागलो होतो. काय करावं ते कळत नव्हतं शिक्षक म्हणजे काय तेच मुळात समजत नव्हतं. काकाला म्हटले थोडा कड काढूया पुढे जाऊया तेवढ्यात जंगलांमध्ये जाळ दिसला अन् जाळच्या दिशेने जात राहिलो. आज कळते की जाळ म्हणजे त्या घरांमध्ये जनावरे अथवा थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेली लाकडांची भट्टी त्याला एक विशिष्ट नाव आहे आज मी विसरलोय खरं. शेवटी त्या घरांमध्ये पोहोचलो. घरात पोहोचलो आणि विचारलं गावाचं नाव काय? आणि ती व्यक्ती म्हटली *आरव* .-----
एवढा लेखनाचा प्रपंचा कशासाठी तर आज नोकरीला लागून *अठ्ठावीस वर्षे पूर्ण* झाली. पण आज सुद्धा तो नोकरीचा पहिला दिवस आठवला की ते दिवस आठवले शिवाय राहत नाहीत
----- श्री. कचरनाथ शिंदे
2 notes · View notes
aakrshnachasiddhant · 6 years ago
Photo
Tumblr media
मनाला मानसिक दृष्टीला पाती लावून आयुष्य जगू नका ह्या मानसिक दृष्टीला लावलेल्या पातीचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठी समाज उद्योग व्यवसाय करू शकत नाही म्हणून. क्षमता हि प्रचंड असते, अनेक कंपन्यांवर उच्च पदे देखील भूषवतात, कंपनीसाठी मोठमोठ्या डील यशस्वी करतात, कंपनीसाठी चांगले वाईट काम करतात पण स्वतःची कंपनी काढून आपण असे काही करू शकतो ह्याचा त्यांना मागसुमच नसतो. तसे चौकटीबाहेर आयुष्य जगणारे मराठी आहेत पण त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. जेव्हा पैसे कमवायचे असतात तेव्हा मराठी समाजाला नोकरीची पाती आणि उद्योग व्यवसाय केला तरी कमी पैसे कमावण्याची पाती हि असते म्हणजे असतेच. कितीही क्षमता असली तरी स्वतःची क्षमता कमी करायची करोडो कमवायची लायकी असताना सुद्धा पगाररुपी पैसा येवू द्यायचा आणि बाकीचा पैसा हा मालकाला आयता कमवून द्यायचा. काही लोकांच्या सर्वांगीण आयुष्याला पाती लावलेली असते तर काही जणांच्या ठराविक आयुष्याच्या भागाला पाती लावलेली असते. उदाहरणार्थ एक व्यक्ती हि व्यवसायिक आयुष्यात यशस्वी असेल तर तीच व्यक्ती खाजगी आयुष्यात सपशेल अपयशी असते. जर तुम्ही अश्या व्यक्तींचे व्यवसायिक यश बघून त्यांच्याकडून खाजगी आयुष्याबद्दल सल्ला घेत असाल तर तुम्हाला देखील प्रचंड प्रमाणात खाजगी आयुष्यात अपयशाला सामोरे जावे लागेल. जर तुम्ही पाती लावलेल्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेत असाल तर तुम्ही सुद्धा त्यांनी ज्या ज्या संकटांना तोंड दिले ती संकटे तुमच्या वाट्याला येतील, कदाचित त्यांचे स्वरूप अजून भीषण झालेले असेल, जसे आपण काळानुसार बदलतो सक्षम होतो तशीच संकटे सुद्धा स्वतला बदलत असतात, हा श्रुष्टी चा अलिखित नियम आहे बदलाचा. तुमच्या मानसिकतेला पाती लावण्याचे काम तुमच्या लहानपणापासून सुरु होते, जर मोठ्या व्यक्तीला गुलाम बनवायचे असेल तर लहानपणापासून सुरवात करा हा अध्यात्मिक आणि मानसशास्त्राचा नियम आहे, ह्याला माइंड कंट्रोल म्हणजे दुसर्याच्या मनावर ताबा मिळवणे असे म्हणतात. वातावरणानुसार मनुष्य प्राणी स्वतला बदलत असतो हे नैसर्गिक आहे पण तुम्हाला अनेक मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले कृत्रिम भेदभाव प्रचंड प्रमाणात दिसून येतील. अनेक संस्कृती आणि परंपरा ह्या बिनकामाच्या असताना सुद्धा लादलेल्या असतात व मनुष्य प्राणी न प्रश्न विचारता लादलेले ओझे पिढ्यान पिढ्या वाहत जातो, ह्यामध्ये नुकसान फक्त आणि फक्त गरीब मध्यम वर्गाचे होते, श्रीमंत, समृद्ध आणि सत्ताधारी मुक्त आयुष्य जगत असतात. साधे उदाहरण घ्या, समजा तुमचे मुल हे नुकतेच जन्माला आलेले आहे, त्या मुलाला तुमच्यापासून अलग करून जे त्यांचे पालक नाही त्यांना सुपूर्द केले व पालन पोषण करायला सांगितले, जेव्हा ते मुल मोठे होत जाईल तेव्हा जे पालनपोषण करतात पण ज्यांनी जन्म दिला नाही त्यांना तो त्याचे आई वडील समजेल, ते जे संस्कार देतील त्याचेच अनुसरण करेल व त्याचे संपूर्ण आयुष्य व्यतीत करेल. म्हणजे आता जे तुम्ही चांगले वाईट आयुष्य जगत आहात त्याची प्रोग्रामिंग हि लहान पणीच संस्कार रुपात तुमच्यावर झाली आहे. अर्थात इथे अनुवांशिकता हा भाग वेगळा आहे त्याबद्दल वेगळा लेख लिहू शकतो. ह्याचा विरुद्ध अर्थ हा होतो कि ह्या पृथ्वीतलावर जन्माला येणारे प्रत्येक बाळ हे नैसर्गिकरीत्या स्वतंत्र असते, त्याच्यामध्ये अध्यात्मिक मानसशास्त्रीय शक्त्या ह्या जन्मजात असतात. जस जसा तो मोठा होत जातो तस तसे त्याच्या मानसिकतेला विविध प्रकारच्या संस्काररूपी पात्या लावून एकसारखे निरस दुर्भाग्यशाली आयुष्य जगू लागतो किंवा जगायला मजबूर केले जाते. कधी कधी मानसिक पात्या ह्या गरजेच्या असतात उदाहरणार्थ तुम्हाला ३० वर्षांचे ध्येय ३ वर्षात, ३ वर्षांचे ध्येय ३ महिन्यात, ३ महिन्याचे ध्येय ३ दिवसात, ३ दिवसाचे ध्येय ३ तासात, ३ तासाचे ध्येय ३ मिनटात आणि ३ मिनिटांचे ध्येय ३ सेकंदात गाठायचे असेल तर स्वताहून ते ध्येय गाठण्यासाठी मानसिक पाती लावून घेतलेली बरी, ती मानसिक पाती ध्येय पूर्ण झाल्यावर गळून पडते, पण जर इतरांकडून मानसिक पाती लावून घेतली तर सहसा आपण ती काढायला तयार होत नाही कारण एक भीती असते कि परत आपण मागे गेलो तर? ध्येय गाठण्यासाठी लावलेली मानसिक पाती हि आपले लक्ष्य विचलित होऊ नये म्हणून आपण लावून घेतो, व ते ध्येय अगदी कमी वेळेत गाठतो. ह्यामुळे आपण घनदाट आयुष्याच्या जंगलात न भरकटता ध्येय कुठल्याही संकटात न पडता साध्य करून घेतो, हि मानिसक पाती ���० % नकारात्मक विचार आणि १९ % सकारात्मक विचार ह्यांना बाजूला सारते, व १ % ध्येयाच्या विचारांना ठेवते जेणेकरून प्रत्येक क्षणी आपण ध्येयाच्या योग्य दिशेने वाटचाल करत असतो. आता तुम्ही तुमचे आयुष्य तपासून पहा कि तुम्ही मानसिक पाती लावली आहे कि नाही, ती तुम्ही लावली आहे कि इतरांनी? ती तुमच्या फायद्याची आहे कि नाही? तात्पुरती आहे कि कायमस्वरूपी? जितक्या लवकर मानसिक पाती काढाल तितक्या लवकर तुम्ही खर्या अर्थाने मुक्त आयुष्य जगाल. जर स्वताहून मानसिक पाती निघत असतील तर ठीक आहे जर नाही तर तज्ञांची मदत घ्याल. अश्विनीकुमार मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध
1 note · View note
marathinewslive · 2 years ago
Text
माउंट एव्हरेस्ट गाठणारा पहिला अरुणाचल गिर्यारोहक चीन सीमेजवळ बेपत्ता झाला
माउंट एव्हरेस्ट गाठणारा पहिला अरुणाचल गिर्यारोहक चीन सीमेजवळ बेपत्ता झाला
तापी म्रा हिने २१ मे २००९ रोजी एव्हरेस्टवर चढाई केली होती. (फाइल) इटानगर: माउंट एव्हरेस्ट जिंकणारा अरुणाचल प्रदेशातील पहिला गिर्यारोहक तापी म्रा, चीनच्या सीमेवर असलेल्या पूर्व कामेंग जिल्ह्यातील बर्फाच्छादित माउंट कायरीसाटमचा शोध घेण्यासाठी गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत असलेला तापी म्रा यांचा सहकारी निकू दाओही बेपत्ता आहे. घनदाट जंगलातून मागोवा घेत खरव साटमच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र : लोणावळ्याच्या जंगलात ट्रेकिंगसाठी गेलेल्या दिल्लीतील अभियंत्याचा मृतदेह सापडला, श्वान पथकाच्या मदतीने शोध सुरू
महाराष्ट्र : लोणावळ्याच्या जंगलात ट्रेकिंगसाठी गेलेल्या दिल्लीतील अभियंत्याचा मृतदेह सापडला, श्वान पथकाच्या मदतीने शोध सुरू
प्रतीकात्मक फोटो महाराष्ट्रातील लोणावळ्यातील जंगलात फिरायला गेलेला तरुण बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा शोध सुरू होता, आता तरुणाचा मृतदेह सापडला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि खंडाळा येथील घनदाट जंगलात बेपत्ता झालेल्या दिल्लीतील अभियंत्याचा मृतदेह सापडला आहे.लोणावळ्यात दिल्लीतील अभियंता बेपत्ता, फरहान सिराजुद्दीन शाह असे बेपत्ता अभियंत्याचे नाव आहे. फरहान २० मे रोजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashik-exploring · 3 years ago
Photo
Tumblr media
सह्याद्री पर्वताच्या उत्तर-दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते.उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी आणि डोलबारी रांग म्हणतात.सेलबारी रांगेवर मांगीतुंगी तांबोळ्या,न्हावीगड हे किल्ले आहेत, तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, हरगड, साल्हेर, सालोटा हे किल्ले आहेत.पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग त्यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत.न्हावीगड या किल्ल्याला "रतनगड" असे देखील म्हणतात.समुद्रसपाटीपासून ४१०० फूट उंचीवर असलेल्या ह्या गडाची चढाई श्रेणी मध्यम असून उपयोग टेहळणीसाठी होत असावा.गडावर सप्तश्रृंगी देवीचे छोटे मंदिर आहे.मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर कातळात कोरलेल्या ८५ पायऱ्या लागतात.तिथेच प्रवेशद्वाराचे काही उध्वस्त अवशेष बघण्यास मिळतात.अजून थोडे अंतर चालत गेल्यावर ६ उध्वस्त बुरुज व पाण्याचे काही टाके दिसतात.न्हावीगडावरील शेवटच्या टप्यात एक नेढे आहे.गडाच्या अत्युच्च टोकावर असलेल्या पायऱ्या जपून चढाव्या लागतात,बऱ्याच पायऱ्या तुटलेल्या असून घसरण्याची शक्यता आहे.सोबत ४०/५० फुटी रोप ठेवल्यास उत्तम. इसवी सन १४३१ मधे अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी तुंबळ युध्द झाल.पण दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झाल्याने दोन्ही सैन्यांनी रात्रीच्या अंधाराचा फ़ायदा घेऊन माघार घेतली.पुढील काळात शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड होता.शिवकालिन कागदपत्रात या गडाचा ���ल्लेख "नाहावागड" असा आला आहे.गडमाथ्यावरून मांगी-तुंगी,तांबोळ्या,पिसोळगड,मुल्हेर,मोरागड,हरगड,पाच-पांडव,साल्हेर,सालोटा,पिलघाट्या,धामण्या,शेंदवड,दिघाई असा सर्व परिसर नजरेस पडतो. Reposted from @__.amol.__96k_ #incredibleindia #information #exploring #naturephotography #viralreels #daily #instagood #informatica #travelgram #instagram #gadkille #ranwara #fort #trekking #traveldiaries #travelblog #explorpage #satana #baglan #sahyadri #maharashtratourism #exploretheworld #travelling #appleiphone #click _ (at Nashik नाशिक Maharashtra) https://www.instagram.com/p/Cd7MVInpRb0/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
glorious-maharashtra · 2 months ago
Text
Bhamragarh Wildlife Sanctuary, nestled in the Chandrapur district of Maharashtra, is a hidden gem for nature and wildlife enthusiasts. Spanning approximately 104 square kilometers, it features dense forests, rolling hills, and winding rivers, offering a rich habitat for diverse flora and fauna. Key wildlife includes leopards, sloth bears, and various deer species. The best time to visit is between November and March, when wildlife sightings are more frequent. Visitors can also explore the vibrant local tribal culture.
For more information, visit the full article at: https://www.gloriousmaharashtra.com/bhamragarh-wildlife-sanctuary/
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 24 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला वेग-राज्यभरात अनेक दिग्गजांकडून अर्ज दाखल
गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या सर्वबाद २५९ धावा-वॉशिंग्टन सुंदरचे सात बळी
****
राज्य विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे आणि जयकुमार रावल यांच्यासह जवळपास सर्व पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.
बीड जिल्ह्यात परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे, माजी खासदार डॉ प्रीतम मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
हिंगोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांनी दोन उमेदवारी अर्ज तर भाऊ पाटील गोरेगावकर यांनी एक अर्ज दाखल केला. वसमत विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांनी, कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. हिंगोली जिल्ह्यात आज २८ जणांनी ५८ अर्जांची उचल केली.
परभणी जिल्ह्यात पाथरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निर्मला विटेकर यांचा अर्ज त्यांचे पुत्र आमदार राजेश विटेकर यांनी दाखल केला.
जालना विधानसभा मतदार संघासाठी आज महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, त्यांच्या पत्नी संगीता कैलास गोरंट्याल, तर भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना विधासनभेसाठी ११ उमेदवारांसाठी २१ नामनिर्देशन पत्राची उचल झाली. घनसावंगी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बदनापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद मध्य मतदार संघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अभय टाकसाळ तसंच बहुजन समाज पार्टीचे विष्णू तुकाराम वाघमारे यांनी, औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून बहुजन समाज पार्टीचे कुणाल सुरेश दांडगे यांनी, गंगापूर मतदार संघातून महायुतीकडून भाजपचे प्रशांत बंब, यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.
धाराशिव जिल्ह्यात भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले तर दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे ��ुभाष गायकवाड यांनी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, यांच्यासह बहुजन समाज पक्षाचे वतीनं दोन तर एका अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला.
नांदेड लोकसभा मतदारसंघात आज काँग्रेसचे रविंद्र चव्हाण यांच्यासह अन्य एका इच्छुकाचा अर्ज दाखल झाला असून लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. ८ विधानसभा मतदारसंघासाठी १६ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान, नांदेड लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या दिवशी १३ उमेदवारांनी २३ अर्ज घेतले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लहामटे यांनी अकोले विधानसभा मतदारसंघातून, तर नगर शहर विधानसभा मतदारसंघातून संग्राम जगताप यांनी अर्ज दाखल केला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपकडून तर डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पारनेर विधानसभा मतदार संघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी तर राहुरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
येवल्यामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ, कोथरुड मधून भाजपचे चंद्रकांत पाटील, आंबेगाव मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, शिर्डी इथून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, इंदापूर मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज अर्ज दाखल केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आज विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबईत मलबार हिल्स इथून भाजपचे मंगलप्रभात लोढा, तर कांदिवली पूर्व मधून भाजपचे अतुल भातखळकर यांनी अर्ज दाखल केला. विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी, ठाणे विधानसभा मतदार संघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार अमित साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय महाविकास आघाडीकडून कळवा -मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे, तर इस्लामपूर मतदातसंघातून जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला.
रायगड जिल्ह्यात अलिबाग विधानसभा मतदार संघातील शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदार संघातून भाजपचे काशिराम पावरा यांनी तर धुळे शहर विधानसभा मतदार संघातून अनुप अग्रवाल यांनी, सिंदखेडा मतदारसंघातून भाजपाचे जयकुमार रावल यांनी, साक्री विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मंजुळा गावीत यांनी अर्ज दाखल केले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा- तळोदा मतदारसंघतून भाजपचे उमेदवार राजेश पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार, जेष्ठ नेते डॉ विजयकुमार गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
परभणी जिल्ह्यात गंगाखेड मतदार संघाचे माजी आमदार सीताराम घनदाट यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. आघाडीने या मतदार संघात शिवसेनेचे विशाल कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागा��ार्फत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मतदान प्रशिक्षण, मतदानाची शपथ आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक, यासोबतच सृजनशील लेखन, वक्तृत्व, रांगोळी, भित्ती चित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट - प्रशांत दामले
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय महाविद्यालयात आज मतदार जनजागृती कार्यक्रम तसंच युवा संवाद हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
नांदेड विधानसभा तसंच लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान जनजागृतीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात स्वीपकक्ष, उमेद आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सहभाग घेऊन स्वाक्षरी केली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात आज पहिल्या डावात न्यूझीलंडच्या संघानं सर्वबाद २५९ धावा केल्या. न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रविचंद्रन अश्विनने तीन तर वॉशिंग्टन सुंदरने सात गडी बाद केले. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एक गडी गमावत १६ धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला, यशस्वी जैस्वाल सहा आणि शुभमन गील दहा धावांवर खेळत आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज अहमदाबाद इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत, ४४ षटकांत सर्वबाद २२७ धावा केल्या. भारताच्या दिप्ती शर्माने ४१ आणि मेली केर हिनं ४२ धावा केल्या.
****
0 notes
ayurvedainitiative-blog · 3 years ago
Text
Tumblr media
*गुरू कशाला हवा - मार्गदर्शन लाभण्यासाठी.*
*गुरू कशाला हवा - परमेश्वर साध्य होण्यासाठी.*
*गुरू कशाला हवा - मला देव कधी भेटेल, तो भेटण्यासाठी मला काय करावे लागेल हे ज्ञान मिळण्यासाठी.*
सद्गुरू श्री रामकृष्ण परमहंस हे श्री स्वामी विवेकानंदांचे लौकिक, आध्यात्मिक असे सर्वार्थाने गुरू होते... स्वामी विवेकानंदाना अष्टमहासिद्धी प्राप्त होऊन ते योगीपदाला पोहोचण्याअगोदर एक दिवस ते गुरूभेटीसाठी परमहंसांकडे गेले होते... त्या दिवशी गुरू शिष्यांत बर्‍याच विषयांवर चर्चा झाली... अनेक गोष्टीत स्वामींना परहंसांचे मार्गदर्शन लाभले... अचानक स्वामी विवेकानंदानी गुरूंना विचारले की, 'मला देव कधी भेटेल..?.. तो भेटण्यासाठी मला काय करावे लागेल..?.. श्री परमहंसांनी या प्रश्नाचे उत्तर राखून ठेवले व या उत्तरासाठी उद्या सकाळी नदीकिनारी भेटण्यास आपल्या शिष्याला म्हणजेच स्वामी विवेकानंदांना सांगितले... झाले...
दुसर्‍याच दिवशी स्वामी विवेकानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे नरेंद्र, लगबगीने श्रीगुरू परमहंसांना भेटायला नदीवर गेले... श्री परमहंस नरेंद्राचीच वाट पहात होते... परमहंसांनी नरेंद्राला नदीत उतरण्याची आज्ञा दिली व स्वतःदेखील त्याच्यासोबत नदीत उतरते झाले... दोघे��ी नदीत उतरल्यावर परमहंसांनी नरेंद्राला डुबकी मारण्यास सांगितले... त्याप्रमाणे नरेंद्राने डुबकी मारली... परंतु श्वास पुन्हा भरून घेण्यासाठी त्याला वर येता येईना कारण परमहंसांनी पाण्याखालीच त्याचे डोके गच्च धरुन ठेवले होते... जोपर्यंत श्वास होता तोपर्यंत नरेंद्र वर येण्यासाठी फारसे प्रयत्न करीत नव्हता... परंतू जसजसा श्वास संपत आला तसतशी त्याची हालचाल वाढली व अगदी शेवटच्या क्षणी परमहंसांच्या हाताला एक जोरदार झटका देऊन नरेंद्र वर आला... तेव्हा त्याच्या जीवात जीव आला...
आपल्या गुरूंच्या या अनाकलनीय कृतीमागील हेतू नरेंद्राच्या लक्षात येईना... तेव्हा त्याने याबाबत श्रीगुरूंना विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले की, 'यातच तुझ्या कालच्या प्रश्नाचे उत्तर दडले आहे... फुफ्फुसातील प्राणवायू संपल्यावर ज्याप्रकारे तू तुझ्यातील सर्व शक्तीनिशी माझा विरोध न जुमानता माझ्या हाताला झटका देऊन पाण्यातून वर आलास व श्वास घेतलास तशा तळमळीने जर तू परमेश्वरप्राप्तीची साधना केलीस तर अगदी अल्पावधीतच व निश्चितपणे तुला परमेश्वर भेटेल... मी
*तुझ्या डोक्यावर दाबलेला माझा हात हे मोहाचे व विषयांचे प्रतीक समज... त्यांना न जुमानता सर्व शक्तीनिशी जेव्हा तू तळमळून मायापाशांना जोरदार झटका देशील तेव्हाच तुला प्राणवायुरूपी परमेश्वर साध्य होईल*...
गुरुविण कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम,
अवघड डोंगर-घाट
गुरुवीण ……
अजाणता मी पथिक एकटा
झांजड पडली, लपल्या वाटा
अवतीभवती किर्रर्र दाटले
काटेबन घनदाट
गुरुवीण ……
दिशा न कळती या अंधारी
नसे आसरा, नसे शिदोरी
कंठ दाटला आले भरुनी,
लोचन काठोकाठ
गुरुवीण …………
भुकेजलो मी, तहान लागे
पुढे जाऊ की परतू मागे
सांजेपाठी सुदीर्घ रजनी,
दिसणे कुठून पहाट
गुरुवीण ……
क्षणभंगुर हे जीवन नश्वर
नेतिल लुटुनी श्वापद तस्कर
ये श्रीदत्ता सांभाळी मज,
दावी रूप विराट ।
गुरुवीण ……………
*गुरू आपल्याला अंतिम सुख दाखवितात, म्हणून "गुरू हवा"!*
----------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
----------------------------------------------
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
पट्टेदार वाघांचे दर्शन : नागरिकांमध्ये दहशत, शेतकऱ्यांनी शेतात जावेतरी कसे?
वन विभाग म्हणते रात्रीला जंगल परिसरात जावू नका तर विद्युत विभाग रात्रीलाच वीज देते; शेतकऱ्यांनी काय करावे? सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : घनदाट जंगलाने व्याप्त असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जंगली हिंस्त्र प्राण्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बिबट, अस्वल व रानडुकरासह आता तर तालुक्यात पट्टेदार वाघांचेही दर्शन होत असल्याने शेतकरी व मजुरवर्गांना तसेच सायंकाळच्या सुमार��स सायकल व दुचाकीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
ब्राझिलियन अ‍ॅमेझॉनमधील जंगलतोडीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि जगातील सर्वात मोठ्या पर्जन्यवनाच्या वाढत्या नाशाची चिंताजनक चिन्हे
ब्राझिलियन अ‍ॅमेझॉनमधील जंगलतोडीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आणि जगातील सर्वात मोठ्या पर्जन्यवनाच्या वाढत्या नाशाची चिंताजनक चिन्हे
ब्राझिलियन ऍमेझॉनमध्ये जंगलतोड: जंगलांच्या सततच्या तोडणीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. ब्राझीलमध्ये अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात विक्रमी पातळीवर झाडे तोडली जात आहेत. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलातील जंगले विक्रमी पातळीवर कमी होत आहेत. अॅमेझॉनची जंगले पाऊस पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, पण उद्ध्वस्त झालेली जंगले पर्यावरणाबाबतच्या चिंतेकडे…
View On WordPress
0 notes