#महाराष्ट्र पोलीस
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 January 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – २६ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• ७६वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा, दिल्लीत कर्तव्य पथावर देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन. • राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम. • आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचं आवाहन. • नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा इथं कोंबड्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव, दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित. आणि • १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांग्लादेशवर आठ खेळाडू राखून विजय.
७६वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या सामरिक सज्जतेचं, आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपतींनी स्वीकारली. देशाची तीनही सेनादलं, सीमासुरक्षा तसंच तटरक्षक दल, सशस्त्र पोलीस दलं, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना, गृहरक्षक दल अशी अनेक पथकं संचलनात सहभागी झाली होती. देशाची विविधता आणि सांस्कृतिक एकात्मता दाखवणारे १६ विविध राज्यांचे तसंच इतर मंत्रालयांचे मिळून ३१ चित्ररथही संचलनात सहभागी झाले होते. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या सेनादलांचं ३५२ जणांचं पथकही संचलनात सहभागी झालं होतं. स्वर्णिम भारत विकास, विरासत ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती. या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
प्रजासत्ताक दिनाचा राज्याचा मुख्य सोहळा मुंबईत ��िवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचं निरीक्षण केलं तसंच विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्याची सर्वांगीण प्रगती आणि लोककल्याणासाठी राज्य सरकार करत असलेल्या कामांची राज्यपालांनी आपल्या भाषणातून माहिती दिली. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून, राज्य सरकारच्या वतीनं राबवल्या जात असलेल्या उपक्रमांना गती देण्याकरता सर्वच विभागांना आराखडा तयार करायचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजवंदन केलं. यावेळी पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रध्वजाला सलामी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम झाला.
मराठवाड्यात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट यांनी, आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपले प्रजासत्ताक, आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मुल्याची जपवणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावत असतो. लोकशाही बळकट करत असतो. या संविधानाचे महतीही आपण घरोघरी पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो.
यावेळी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, सहायक फौजदार एकनाथ गायकवाड, तुकाराम आव्हाळे, तसंच जीवन रक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख, आणि हवालदार दादासाहेब पवार यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते, धाराशिव इथं पोलिस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.
परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. खासदार संजय जाधव, आमदार डॉ राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना बोर्डीकर यांनी शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न कर���ार असल्याचं सांगितलं , त्या म्हणाल्या… पालकमंत्री म्हणून माझ्यावरती दिलेली आहे, त्या जबाबदारीचं भान राखत जिल्हावासियांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रण केलेला आहे. चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभ करणार. आणि जेवढ्याकाही केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करु.
लातूर इथं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वावर चालत एक भारत श्रेष्ठ भारत घडवूया, असं आवाहन पालकमंत्री भोसले यांनी यावेळी केलं. ते म्हणाले… आपल्या जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे. संविधानाची शिकवण, स्वातंत्र्य लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत, श्रेष्ठ भारत घडवू शकतो. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवुया.
नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक संजय जोशी आणि पोलीस हवालदार दिलीप राठोड यांचा सावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलीस आणि अन्य विभागाचे पथसंचलन, विविध विभागाचे चित्ररथ तसंच अन्य सादरीकरणाने हा सोहळा साजरा झाला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वरिष्ठ न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते, नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ म���ाठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ इंद्र मणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विभागात विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संघटनांच्या वतीनं तिरंगा फेरी, देशभक्ती गीत गायनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी आज प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडवरून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. ही मार्गिका उद्यापासून सकाळी सात ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुली करून देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या किवळा इथं कोंबड्यांमध्ये 'बर्ड फ्लू' चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. २० जानेवारी रोजी अनेक कोंबड्या मृत आवस्थेत आढळून आल्याने पशुसंवर्धन विभागाने मृत कोबंड्यांचे नमुने पुणे इथल्या राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा आणि भोपाळ इथल्या कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थान या प्रयोगशाळेत पाठव��े होते. त्या नमुन्यांच्या तपासणीत 'बर्ड फ्लू' लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये म्हणून लोहा तालुक्यातल्या किवळा जवळचा दहा किलोमीटर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कार काल जाहिर झाले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रतिक्रिया माझी आनंदाची आहे. महाराष्ट्रभूषण मिळालं आणि त्याची वरची पायरी म्हणजे पद्मश्री आहे. त्यामुळे आनंद हा माझा आणखी वाढलेला आहे, एक पायरी वरती चढल्यामुळे. हा जो एक पायरी वरती चढल्याचा जो प्रसंग आहे, तो तुम्ही लोकांनी माझ्यावर आणलेला आहे. माझ्या लोकांनी, माझ्या ऑडीयंसनी आणलेला आहे. त्यामुळे मला त्यांचे अभिनंदन करायला पाहिजे. Thank You Very Much म्हणून.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज जिल्ह्यात विविध विभागांमार्फत होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. जनहित हा प्राधान्यक्रमाचा निकष असायला हवा त्यानुसार विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा, असं त्यांनी सांगितलं. जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात आलेल्या निधीतून होणाऱ्या कामांचा देखील शिरसाट यांनी आढावा घेतला.
धाराशिव इथं जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज झाली. या बैठकीत २०२५-२६ साठी ४३५ कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्तावित आराखडा मांडण्यात आला. दरम्यान, महा आवास योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचं प्रकाशन आज सरनाईक यांच्या हस्ते झालं.
आयसीसी १९ वर्षांखालील महिलांच्या टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या साखळी सामन्यात भारताने बांग्लादेशवर आठ खेळाडू राखून विजय मिळवला. बांग्लादेशच्या महिलांनी प्रथम फलंदाजी करत अवघ्या ६४ धावा केल्या. भारताने आठव्या षटकात दोन गडी गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं. भारत या स्पर्धेत अ गटात पहिल्या स्थानावर आहे.
नाशिक इथं झालेल्या रणजी सामन्यात महाराष्ट्राने बडोद्याचा ४२९ धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या डावात मिळालेल्या आघाडीच्या बळावर महाराष्ट्राने बडोद्यासमोर विजयासाठी तब्बल ६१६ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करतांना बडोद्याचा संघ अवघ्या १८७ धावाच करु शकला.
0 notes
nagarchaufer · 7 days ago
Text
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट , चौकशी अहवालात धक्कादायक माहिती समोर
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर बनावट , चौकशी अहवालात धक्कादायक माहिती समोर
महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या बदलापूर येथील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेला होता मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा ठपका न्यायदंडाधिकारी यांनी आपल्या अहवालात ठेवल्यानंतर पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  मयत अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच खरे आरोपी दुसरेच आहेत मात्र पोलिसांनी आपल्या मुलाचा एन्काऊंटर केला असा आरोप…
0 notes
darshanpolicetime1 · 28 days ago
Text
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.O’च्या प्रकल्पास अधिक गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, दि. ३१ : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असतांना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील, तर संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेऊन घेऊन त्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील १५ दिवसामध्ये  मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Pune: साई, पीएनबीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम
एमपीसी न्यूज -भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), (Pune)पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संघांनी (कॅग) अनुक्रमे केंद्रीय सचिवालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) संघांवर विजय मिळवताना हॉकी महाराष्ट्र आयोजित मेजर ध्यानचंद स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे सोम��ारी चौथ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद…
0 notes
mhlivenews · 5 months ago
Text
Dhule News: भररस्त्यात आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह, धुळ्यात एकच खळबळ
Dhule News : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा रोड नजीकच्या नालीत एक मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. आझाद नगरच्या कृषी महाविद्यालय परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ काल सायंकाळी हा मृतदेह आढळून आला. घटनेने संपूर्ण आझाद नगर परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स अजय गर्दे, धुळे : धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारोळा रोड नजीकच्या नालीत संशयास्पद मृतदेह आढळून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
newjobupdate27 · 7 months ago
Text
0 notes
marmikmaharashtra · 8 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/retired-police-patil-zabusingh-rathod-passed-away/
0 notes
gajananjogdand45 · 9 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/dried-ganja-worth-rs-33-thousand-750-seized-from-waranga-phata-action-taken-by-local-crime-branch/
0 notes
vishwasdgaikwad · 10 months ago
Video
youtube
सुभव कॅरिअर अकॅडमी,सांगोला,जिल्हा सोलापूर,महाराष्ट्र,पोलीस भरती व सैन्य ...
0 notes
mdhulap · 11 months ago
Link
महाराष्ट्र राज्यात 17471 जागांसाठी पोलीस भरती 2023 - पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई चालक/बॅण्डस्मन/सशस्त्र पोलीस शिपाई/कारागृह शिपाई
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 22 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
बेटी बचाओ बेटी पढाओ योजना हा एक परिवर्तनकारी, लोकसक्षम उपक्रम बनल्याचं आणि जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांचा यात सहभाग असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी सामाजिक माध्यमावर हा संदेश जारी केला. बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम लिंगभेदावर मात करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं, आणि त्याच वेळी मुलीला शिक्षण आणि तिची स्वप्नं साध्य करण्यासाठी संधी मिळतील यासाठी योग्य वातावरण निर्माण करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. लोकांच्या आणि विविध सामाजिक संस्थांच्या समर्पित प्रयत्नांमुळे या अभियानानानं उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत, ऐतिहासिकदृष्ट्या लिंग गुणोत्तर कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत आणि जागरुकता मोहिमांनी लैंगिक समानतेच्या महत्त्वाची सखोल जाणीव निर्माण केली आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेलाही देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून, या योजनेत आत्तापर्यंत चार कोटीहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.
****
प्रयागराज इथं आयोजित महाकुंभमेळ्यात आज सुमारे तीस लाख सत्तेचाळीस हजार भाविकांनी त्रिवेणी संगमावर अमृतस्नान केलं. आतापर्यंत एकूण सुमारे सव्वानऊ कोटी भाविकांनी कुंभमेळ्यात अमृतस्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारनं दिली आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते, थोर स्वातंत्र्यसेनानी, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन केलं असून, आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणाऱ्या या लोकप्रिय नेतृत्वाला नमन, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातल्या एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली. या अभियानाचा शुभारंभ उद्या सरनाईक यांच्या हस्ते कुर्ला नेहरूनगर बस स्थानकावर होणार आहे. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर तीन महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचं मूल्यमापन होणार असून, शहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी, निमशहरी गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख तर ग्रामीण गटातून पहिल्या येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.
****
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका खाली अटकेत असलेला आरोपी वाल्मीक कराड याला आज बीड जिल्हा सत्र न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर आज कराड याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला.
दरम्यान, केज इथल्या खंडणी प्रकरणाची सुनावणी उद्या गुरुवारी होणार आहे.
****
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने वीजचोरीविरोधात धडक कारवाई केली आहे. गेल्या ९ महिन्यांत जवळपास साडेतीन हजार प्रकरणांत महावितरणने पावणेसात कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.
****
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर संविधान गौरव अभियान राबवण्यात येणार असून त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातही हे अभियान राबवलं जाणार आहे. लातूर शहरात संविधान गौरव सभेचं आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या तथा संविधान गौरव अभियान समितीच्या सदस्या प्रेरणा होनराव यांनी दिली. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध-वक्तृत्व स्पर्धा, विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार असून, नागरिकांना माफक शुल्कात संविधानाच्या प्रतीही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं होनराव यांनी सांगितलं.
****
नांदेडमध्ये काल पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आठ कंपन्यांनी ९३१ रिक्त पदांसाठी आपला सहभाग नोंदवला होता. यात १५२ उमेदवारांची प्राथमिक तर ५० उमेदवारांची ‍अंतिम निवड करण्यात आली.
****
0 notes
nagarchaufer · 1 month ago
Text
अहिल्यानगर जिल्हा गोहत्यामुक्त करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट
अहिल्यानगर जिल्हा गोहत्यामुक्त करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी घेतली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट
‘ अहिल्यानगर जिल्हा गोहत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी. गाय ही हिंदू धर्माची गोमाता आहे. गाईंना वाचवण्यासाठी आमचे सतत सहकार्य राहील ,’ अशा आशयाचे निवेदन नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेले आहे.  संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना ,’ महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राजमाता घोषित केलेले असून गोवंश हत्याबंदी कायदा…
0 notes
darshanpolicetime1 · 2 months ago
Text
परभणीतील दंगलीबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा – उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम
नागपूर, दि. १३: परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीला बाधा पोहचविल्याच्या घटनेबाबत महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश अॅड. मेश्राम यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 5 months ago
Text
Pimple Saudagar: राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा प्रतिनिधी सांगणाऱ्या तोतयावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी म्हणून सांगणाऱ्या एका तोतया व्यक्तीवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 4 मे 2025 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत पिंपळे सौदागर परिसरात घडली. ओंकार श्यामराव जोशी (वय 45, रा. पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या तोतयाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुषार साळुंखे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
बृहन्मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
मुंबई, दि. 12 : मानवी जीवन, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी, सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यांनी पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांच्याद्वारे  सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार दि. 20 डिसेंबर 2023 अखेर पाच…
View On WordPress
0 notes
news-34 · 1 year ago
Text
0 notes